Home >> Magazine >> Akshara

Akshara

 • अस्सल मराठवाडी बोलीतील वाक्प्रचारही या संशोधकांनी अतिशय कष्टांनी जमा केले आहे. अडक्याची काडी, लाखाची जाळी माडी (छोट्याशा चुकीमुळे मोठे नुकसान होणे); ऊन पाण्याने घर जाळणे (खोटे आरोप करणे); करडीच्या अक्षता पाठवणे (अपमानित करणे) असे ८०० पेक्षा जास्त वाक्प्रचार आणि म्हणींनी हा संग्रह सजला आहे. प्रा. डॉ. गिमेकर सांगतात, आमचे संशोधन हे काही अंतिम नाही. त्यामुळे यापुढेही हे काम सुरूच राहणार आहे. कामासाठी ही पद्धत अवलंबली सर्वप्रथम नागरिकांचा वयोगट निश्चित केला. ६८-८० या वयोगटातील स्त्री-पुरुष...
  August 15, 12:08 AM
 • भाषा संशोधन मराठवाडा हा शब्द उच्चारताच समोर दिसू लागतो तो भौगोलिक वैशिष्ट्यांनी नटलेला सुंदर प्रदेश, सुरेख वनराई, औपचारिकतेचा लवलेशही नसणारी भोळीभाबडी अन् काहीशी अघळपघळ माणसं... अनौपचारिकपणा हीच या प्रदेशाची आणि या भागातील माणसांची खासियत. हीच खासियत साहजिकच बोलीभाषेतही उतरली आहे. इतर अनेक भाषांतील शब्द आपल्यात सामावून घेतानाच या मराठवाडी बोलीने आपला मूळ ठसकाही जपला आहे. हिरव्या मिरचीचा ठसका आणि इंग्रजी चिंचांचा मधुर स्वाद अशा अनेक लहेजांचे उपपदरही या बोलीभाषेला आहेत. कोल्हापूरचा...
  August 15, 12:07 AM
 • व्याख्यानमालांतून मराठी साहित्यावर अलीकडे कमीच चर्चा झालेली पाहायला मिळते. काही व्याख्यानामालांनी मात्र सातत्याने साहित्यावर चर्चा सुरू ठेवल्या आहेत. मिरज येथील मिरज विद्यार्थी संघाच्या खरे मंदिर वाचनालयाची वसंत व्याख्यानमाला यापैकीच एक. गेली 89 वर्षे अव्याहतपणे सुरू असलेल्या या व्याख्यानमालेत आजवर प्रा. ना.सी.फडके, न.चिं.केळकर, ना.ग.गोरे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कुसुमाग्रज, सेतुमाधव पगडी, मंगेश पाडगावकर, नरहर कुरुंदकर, व्यंकटेश माडगूळकर, यांच्यापासून द.मा.मिरासदार, मधू...
  July 16, 12:17 AM
 • व-हाडी शब्द, म्हणी, वाक्प्रचार कोश तयार करण्याचा प्रकल्प अमरावती विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठाद्वारे डॉ. विठ्ठल वाघ (संशोधक), डॉ. रावसाहेब काळे (सहायक संशोधक) यांच्याकडे सोपविला. सतत तीन वर्षांपासून हाती घेतलेल्या या कामातून व-हाडी बोलीचे तीन कोश पूर्ण होत आहेत. अजूनही हे काम पूर्ण झाले असे म्हणता येणार नाही. कितीतरी शब्दांचे संकलन अजून बाकी आहे. यासाठी पुढेही हे काम आयुष्यभर डॉ. विठ्ठल वाघ व मी डॉ. रावसाहेब काळे म्हणजे आम्ही दोघे मिळून करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. व-हाडी बोलीच्या...
  July 16, 12:08 AM
 • नगरच्या किल्ल्यात असताना मी डिस्कव्हरी ऑफ इंडिया लिहिले. आता मला रिकव्हरी ऑफ इंडिया लिहायचे आहे. पण आता वेळ कुठे मिळतोय?.... पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह 12 नेत्यांना नगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात स्थानबद्ध करण्यात आलं. ऑगस्ट 42 ते मार्च 45 असा सुमारे अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ पंडितजी या किल्ल्यात होते. सुरुवातीचे वीस महिने चर्चा, वाचन आणि मननात गेल्यानंतर एप्रिल ते सप्टेंबर 1944 या काळात पंडितजी द डिस्कव्हरी ऑफ इंडिया (भारताचा शोध) हे हजार पानांचे हस्तलिखित हातावेगळे केले. या...
  May 21, 07:18 AM
 • 1960 नंतर मराठी साहित्याची विभागणी होऊ लागली. पुढे दलित, ग्रामीण, प्रादेशिक, स्त्रीवादी आदी विविध प्रकार समोर आले. जनसाहित्य हे सर्व प्रकारच्या साहित्याला एकत्र करेल या उद्देशाने जनसाहित्य विचार समोर आला. साहित्यिक, समीक्षक डॉ. सुभाष सावरकर यांनी अमरावतीहून जनसाहित्य चळवळ सुरू केली. साहित्यावर एका विशिष्ट वर्गाचे वर्चस्व नसावे, ते जनासाठी असावे. सर्व वर्गाच्या जाणिवा, साहित्यात उमटाव्या, असा विचार या चळवळीतून समोर आला. पुढे डॉ. सावरकर यांनी मांडलेल्या संकल्पनेवर अभ्यासकांनी आक्षेप...
  May 21, 12:56 AM
 • मोदी यांच्या नावाभोवतालचे वलय जसे वाढत गेले तसे त्यांच्यावर पुस्तक लिहावे असा विचारप्रवाह इंग्रजी,हिंदी तसेच मराठीमध्येही सुरू झाला आणि ढोबळमानाने पाहायला गेले तर केवळ तीनच भाषांमध्ये 25 वर पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहे असे दिसते. मोदी-लीडरशिप गव्हर्नन्स अँड परफॉर्मन्स, उदय माहुरकर यांचे सेंटरस्टेज-इनसाइड द नरेंद्र मोदी मॉडेल ऑफ गव्हर्नन्स, मोदी-पॉलिटिकल बायोग्राफी या काही पुस्तकांबरोबरच मराठीतही काही पुस्तके अलीकडच्या काळात प्रकाशित झालेली आहेत आणि काही प्रकाशित...
  May 21, 12:53 AM
 • मराठी भाषेतल्या हस्तलिखितांच्या शास्त्रीय सूचीचा पहिला खंड नुकताच पुण्यात प्रसिद्ध करण्यात आला. अमेरिकेच्या डॉ. अॅन फेल्डहौस आणि भांडारकर संस्थेचे निवृत्त ग्रंथपाल वा. ल. मंजूळ यांच्या परिश्रमातून संपादित झालेला हा ग्रंथ साहित्य-संस्कृतीच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. या सूचीमध्ये हजारांहून अधिक हस्तलिखितांच्या नोंदी करण्यात आल्यात. ज्ञानाचे संवर्धन मौखिक परंपरेने पिढ्यान्पिढ्या करण्याची पद्धत लॅटिन अमेरिकेतल्या इंका संस्कृतीपासून, आफ्रिकेतल्या आदिम जमातींपासून...
  May 21, 12:42 AM
 • चार वर्षांपूर्वी भारत विद्यालयाचे ग्रंथपाल व साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांच्या मनात पुस्तकमैत्री बालवाचनालयाची संकल्पना आली. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांचे मित्र विनोद देशमुख व रविकिरण टाकळकर यांनी त्यांना साथ दिली. शासनाचे कोणत्याही स्वरूपाचे अनुदान न घेता या तीन मित्रांनी ही चळवळ मागील चार वर्षांपासून सुरू ठेवली आहे. बालग्रंथपालच बघतात सर्व कारभार त्यामुळे मुलांना आपले वाटते बालवाचनालय मुलांना देण्यात येणार्या पुस्तकांची नोंद बालगं्रथपालच घेतात....
  May 14, 03:00 AM
 • डॉ. हेमंत खडके हे मराठी साहित्य क्षेत्रातील वारकरी असून, त्यांची विडंबन, कविता लेखन, संशोधनाच्या माध्यमातून या क्षेत्राची मुशाफिरी अविरत सुरू आहे. आजवर अनेक उपक्रमांमधून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसारात ते व्यग्र असतात. अर्वाचीन मराठीतील काव्यविचार (1850 - 1975) हे प्रमुख संशोधन त्यांनी केले. या काव्यग्रंथानंतर नवकवींचा काव्यविचार यावर त्यांचे संशोधन सुरू आहे. बा. सी. मर्ढेकर, शरश्चंद्र मुक्तिबोध, गो. वा. करंदीकर आदी कवींच्या कवितांवर हा काव्यविचार बेतणार आहे. कुसुमाग्रज, पु. शी. रेगे, कवी अनिल...
  May 14, 03:00 AM
 • मराठी विषय परीक्षेपुरता मर्यादित ठेवण्याचा विषय नाही. साहित्याचा अभ्यास करताना अनेक नवीन गोष्टींचा उलगडा होत जातो. महाविद्यालयीन काळातच तरुणांमध्ये वाङ्मयाची अभिरुची वाढावी, या उद्देशाने महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना केली जाते. सध्या नॅकमुळे महाविद्यालयात अनेक विषय मंडळे स्थापन केली जातात. पण फक्त वाङ्मय, साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, त्यांना साहित्याची गोडी लागावी म्हणून जवळपास 30 वर्षांपूर्वी सीताबाई कला महाविद्यालय, अकोला येथे मराठी वाङ्मय मंडळाची...
  May 14, 03:00 AM
 • पितृभक्तीचे साक्षात्कार घडवणारे चरित्र महावितरणचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी सोपान केळे लिखित जगी ऐसा बाप व्हावा या पुस्तकाची समीक्षा डॉ. महेश खरात (औरंगाबाद) यांनी जगी ऐसा बाप व्हावा : संदर्भ आणि समीक्षा यात केली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन 30 मार्चला औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात निशिकांत जोशी (चिपळूण) यांच्या हस्ते होत आहे. पुस्तकाचे मूळ लेखक डॉ. केळे यांनी लिहिलेले हे चरित्र म्हणजे एका निष्ठावंत एकलव्याची कहाणी आहे. त्यांनी वडिलांबद्दल (सोपानकाका केळे) व्यक्त केलेली कृतज्ञता...
  May 14, 03:00 AM
 • आपल्या वडिलांच्या ऋणातून तसे पाहता कोणीही मुक्त होऊ शकत नाही, पण त्यांच्यावर आठवणीपर लेखन करून काहीतरी उतराई होण्याचा प्रयत्न प्रा. बाळासाहेब बोरसे यांनी आपल्या वडिलांवरील (रघुनाथ बोरसे) सार्थक या पुस्तकाचे संपादन करून केला आहे. मनोगत अर्पणपत्रिका आणि रघुनाथ बोरसे यांनी लिहिलेले माझी जडणघडण हे प्रकरण खूपच सुंदर व प्रामाणिक मनोगत आहे. पुस्तकात बाळासाहेब बोरसे यांचे संपादकीय तसेच त्यांच नाते पिता-पुत्राचे, तपस्वी पी.एस.आय, आमचे बोरसे दादा, माझे व्याही दादासाहेब बोरसे, दादा एक स्नेही,...
  March 12, 01:19 AM
 • साहित्य संमेलनांची संख्या वाढता वाढता वाढे..असे चित्र दिसत असले, तरी युवा पिढी त्यातही नावीन्य आणण्याचा प्रयत्न करते आहे. मुख्य म्हणजे हे प्रयत्न नवे शिपाई, नव्या माध्यमांचा वापर करूनच चोखाळत आहेत. असाच एक वेगळा, तंत्रज्ञानाधारित पण मराठी साहित्याशी इमान राखणारा प्रयत्न ई-साहित्य संमेलनाच्या रूपाने 24 मार्चला नाशिकमध्ये होणार आहे. ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. यानिमित्ताने... वाद, निवडणुका, भूमिका, मतदार भेटीगाठी, प्रवास, पत्रापत्री,...
  March 12, 01:07 AM
 • मराठी ही जगातील प्राचीन भाषांपैकी एक भाषा आहे. ही भाषा बोलणारे संबंध भारतात कोट्यवधी लोक आहेत. जागतिक पातळीवर मराठीचा विचार केला तर नवव्या क्रमांकावर तिचे स्थान आहे. त्यामुळे मराठी ही महत्त्वाची भाषा आहे, पण दुर्दैवाने आपल्या या भाषेला अद्यापही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. हा मराठीवर अन्यायच आहे. हिंदीपेक्षाही हजार ते बाराशे वर्षे जुनी असलेल्या मायमराठीत लीळाचरित्रापासून आताच्या हजारो कलाकृतींचा अनेक भाषांमधून अनुवाद झालेला आहे. त्यामुळेच कन्नड, तामिळ, तेलुगू आणि संस्कृत या...
  March 11, 11:51 PM
 • मराठी भाषा ही प्राचीन भाषा आहे. तिला समृद्ध अशी साहित्य परंपरा आहे. पण दुर्दैवाने आपल्या मायमराठीला अजूनही अभिजात भाषा म्हणून दर्जा दिला गेला नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. अभिजात भाषेच्या दर्जासाठी लागणार्या सर्व निकषात मराठी बसते. आपली भाषा ही दोन हजार वर्षे जुनी आहे. मराठीतून कोरले गेलेले अनेक शिलालेख सापडलेले आहेत. एक हजार वर्षापासून मराठीतून सकस अशी साहित्यनिर्मिती होत आहे. मायमराठीला स्वतंत्र अशी परंपराही आहे. मराठी भाषेचे आधुनिक रूप तिच्या प्राचीन रूपाहून वेगळे असले तरी...
  March 11, 11:46 PM
 • मराठीसाठी टाहो फोडणा-या शिवसेना पक्षाच्या पक्षप्रमुखांचे स्वीय सचिव जेव्हा-जेव्हा भेटतात तेव्हा ते हिंदीमध्येच बोलण्यास सुरुवात करतात. केवळ तेच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक मराठी माणसे एकत्र येतात तेव्हा मराठीत बोलण्याऐवजी हिंदीतच बोलतात. काही मराठी राजकारण्यांचे ड्रायव्हर, नोकर अमराठी भाषी आहेत. त्यांच्याशी बोलताना मालक हिंदीमध्ये बोलतो. खरे तर मालकाने मराठीतच बोलले पाहिजे. मराठी वाहिन्यांमध्ये काम करणारे पत्रकारही वाहनाच्या चालकांशी, कॅमेरामनशी हिंदीत बोलताना सर्रास...
  March 5, 01:00 AM
 • रंगनाथ पठारे यांनी सांगितले, समितीने आपले काम केले आहे. आता राजकीय नेत्यांनी आपले वजन वापरून मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळवून देण्याचे काम केले पाहिजे. राज्यातील अनेक मराठी खासदार दिल्लीत आहेत. काही मंत्रीही आहेत. स्वत: शरद पवार दिल्लीमध्ये असतात. केंद्रीय गृह विभागाच्या मागे लागून मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राजकीय नेत्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव : - यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून रंगनाथ पठारे म्हणाले, खासदारांनी...
  March 5, 01:00 AM
 • मुक्ताईनगर तालुक्यातील काकोड्याचे साहित्यिक निंबाजी हिवरकर हे गेल्या दीड दशकापासून कृषिसंस्कृतीवर कसदार लिखाण करीत आहेत. अलीकडच्या काळात त्यांना फिरत्या चाकावरती या चाकोरीबाह्य अन् विचारप्रवर्तक आत्मकथनाने वाङ्मयनिर्मितीच्या प्रांतात मानाचे स्थान मिळाले आहे. ग्राम्यजीवनावर सूक्ष्म भाष्यात्मक लेखन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. शेतकरी आत्महत्या, शासनाचे व्यापारधार्जिणे धोरण या विषयांवर शाब्दिक प्रहार करणारी त्यांची बळीराजाच्या वेदना ही नवी कादंबरी लवकरच वाचकांच्या भेटीस...
  February 26, 06:02 AM
 • रानटी अवस्था संपली. माणूस व्यक्त व्हायला लागला. उत्तरोत्तर प्रगत झाला. हा आदिम इतिहास आपल्याला माहिती आहे तो चित्र, शिल्प आणि साहित्य या आपल्या आदिम कलेमुळेच. हाच धागा पकडून जागतिक कीर्तीचे ख्यातकीर्त चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी अहमदनगर येथून वर्ष 1979 मध्ये आदिम हे नियतकालिक सुरू केले होते. चित्र, काव्य, कथा आणि ललित यांचे मिश्रण आदिममध्ये होते. त्यामुळेच आदिम मराठी साहित्यात माइल स्टोन ठरले. ऐंशीच्या दशकातील साहित्याला ऊर्जित करून 1982 मध्ये आदिम बंद झाले. मधल्या 30-35 वर्षांत माध्यमांत बदल...
  February 26, 05:59 AM
 
जाहिरात

RECOMMENDED