Home >> Magazine >> Akshara

Akshara

 • इतर प्रदेशांना नुसताच भूगोल आहे. महाराष्ट्राला मात्र उज्ज्वल इतिहास लाभलेला आहे, हे अनेकवार उगाळले जाणारे वाक्य साहित्य संमेलनांमधून हटकून ऐकावे लागते. प्रचंड ऐतिहासिक-सामाजिक वारसा असलेल्या सासवडसारख्या गावात संमेलन असेल तर हे अनेकदा ऐकण्याची तयारी ठेवावी लागते. महाराष्ट्राला इतिहास असल्याचे श्रद्धापूर्वक मान्य केल्यानंतर साहजिकच या इतिहासाने दिलेल्या (की लादलेल्या) प्रथा-परंपरांचेही ओझे बाळगावे लागणार हे ओघाने येतेच. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या भारदस्त नावालाही...
  January 15, 07:38 AM
 • देवगिरीचे यादव राजे रामदेवराय यांनी 800 वर्षांपूर्वी मराठीचा राजभाषा म्हणून स्वीकार केला होता, तर वेरूळचे आजोळ असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी 400 वर्षांपूर्वी मराठीला राजमान्यता दिली होती. त्यांच्याच या भूमीत हे छोटेखानी टुमदार साहित्य संमेलन झाल्याचे विशेष महत्त्व. साहित्य परिषदेकडे उत्साहाने भांडून संमेलन मिळवण्याचे दिवस सरले असतानाही.... डिसेंबर-जानेवारी म्हणजे साहित्य संमेलनांचा मोसम. ज्या लेखकांची पुस्तके वाचली जातात, त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची, पाहण्याची संधी देणारे हे...
  January 8, 01:00 AM
 • जिल्हा परिषदेच्या शाळांनी समाजाला अनेक मोठी माणसं दिली. ग्रामीण भागातून आलेले मोठमोठे साहित्यिक, सनदी अधिकारी, डॉक्टर, वकील, अभियंते देशाचे रक्षण करणारे सैनिक, लष्करी अधिकारी, रणांगणावर वीरमरण आलेले जय जवान आणि देशाला पोसणारे जय किसान यांना जिल्हा परिषदेच्या शाळांनीच घडवलं. पण अलीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा म्हटलं की, गावचे राजकारण करत फिरणारे, त्यांच्यासाठी उभारलेल्या बँका-सोसायट्यांच्या सभेत एकमेकांवर अंडी-चपला फेकणारे शिक्षक अशी एक दुर्दैवी प्रतिमा शिक्षकांनीच तयार केली आहे....
  January 8, 01:00 AM
 • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात 2003 हे वर्ष वेगळे ठरले. कधी नव्हे तो संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा वाद न्यायालयात गेला. अध्यक्षपदासाठी उभे होते ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी सावंत, सुभाष भेंडे आणि प्रा. जवाहर मुथा. सावंत यांच्या आकस्मिक निधनामुळे अखिल भारतीय साहित्य महामंडळाने निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला. नंतर भेंडे, मुथा आणि प्रा. जनार्दन वाघमारे अशा तिघा उमेदवारांत लढत होऊन भेंडे निवडून आले. त्यांच्या निवडीला मुथा यांना आव्हान दिले. कराड येथे...
  January 8, 01:00 AM
 • सकस आणि कसदार काव्यप्रवासाच्या ताकदीवर महाराष्ट्राच्या वाङ्मयीन विश्वात आपल्या वस्तुनिष्ठ आणि प्रयोगशील लेखणीचा खोलवर ठसा उमटवणारे प्रख्यात मराठी कवी अजीम नवाज राही यांच्या कल्लोळातला एकांत या बहुचर्चित कवितासंग्रहाला विदर्भ साहित्य संघ नागपूरचा शरदचंद्र मुक्तिबोध काव्यपुरस्कार जाहीर झाला. विदर्भ साहित्य संघाच्या 91 व्या वर्धापन दिनानिमित्त 14 जानेवारीला हा मानाचा पुरस्कार राही यांना समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. उपरोक्त पुरस्काराच्या सहर्ष निमित्ताने अजीम नवाज राही...
  January 8, 01:00 AM
 • स्ट्रगलर- चंदेरी दुनियेतील प्रत्येक कलावंताने उमेदवारीच्या काळात संघर्ष केलेला असतो. कलावंत म्हणून स्वत:ची ओळख प्रस्थापित करण्याच्या प्रवासात अनेक अडथळे येतात, निराशा पदरी पडते, कधी अपमान सहन करावा लागतो. अपेक्षाभंगही होतो. कुणाला मोक्याच्या क्षणी संधी मिळते, चांगला गुरू मिळतो, कुणाचा मदतीचा हात लाभतो. कितीही सेलिब्रेटी कलावंत असला, तरी स्ट्रगल त्याला चुकलेला नसतो. मराठी चित्रसृष्टीतील सेलिब्रेटींनी पूर्वी केलेली तपश्चर्या, घेतलेली मेहनत जगाला कळावी, म्हणून आशिष निनगुरकर यांनी या...
  December 25, 02:25 AM
 • गेल्या वर्षासह 15 महिन्यांच्या कालावधीतील भारतातील प्रकाशित पुस्तके पुरस्कारासाठी ग्राह्य : या वर्षी क्रॉसवर्ड बुक अवॉर्ड 2013 या पुरस्कारांसाठी आर्थिक वर्षावर आधारित कालावधी विचारात घेतला गेला होता. त्यामुळे 1 जानेवारी, 2012 ते 31 मार्च 2013 (प्रवेश अर्जासाठी 15 महिन्यांचा कालावधी) या काळात भारतात प्रकाशित झालेली पुस्तके ग्राह्य धरण्यात आली. पुढील वर्षासाठी एप्रिल 2013 ते मार्च 2014 या काळात प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा विचार पुरस्कारासाठी केला जाईल. पुरस्काराची एका तपाची परंपरा : क्रॉसवर्ड...
  December 25, 01:26 AM
 • अकोला.-येथील स्थानिक श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे निर्माता, दिग्दर्शक कै. डॅडी देशमुख यांच्या पुढाकाराने 1999 मध्ये मराठी विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या अंगी असणार् या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना योग्य असं व्यासपीठ मिळावं म्हणून विद्यार्थी मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना करण्यात आली. पुढे लोककवी विठ्ठल वाघ यांच्या पुढाकाराने त्यास मोठ्या प्रमाणात चालना दिली. सध्याही प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांच्या मार्गदर्शनात मराठी वाङ्मय मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे....
  December 25, 12:47 AM
 • रसिकांच्या पसंतीला उतरले कथा कथनाचे वेगळे रूप : विदर्भ साहित्य संघ आणि आधार या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय लेखिका संमेलन नुकतेच 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर 2013 रोजी पार पडले. दोन दिवसांच्या या संमेलनात मी आणि माझे लेखन, स्त्रीवादी साहित्य-सामर्थ्य आणि मर्यादा,दृक्श्राव्य माध्यमातील स्त्रीप्रतिमा इत्यादी स्त्रीजीवनाशी निगडित विविध विषयांवरच्या परिसंवादांनी संमेलन गाजले. त्याचबरोबर नेहमीच्या कथाकथन या कार्यक्रमाला वेगळे रूप देत अनुभवकथन हा कार्यक्रमदेखील रसिकांच्या पसंतीला उतरला....
  December 11, 06:53 AM
 • मौखिक परंपरा लुप्त झाल्याने भाषा हेच साहित्याच्या प्रकटीकरणाचे माध्यम : जगभरात विविध ठिकाणी अस्तित्वाचा मुद्दा वादाचा, संघर्षाचा ठरत आला आहे. आपल्या देशात तर हा मुद्दा अतिशय जाज्वल्य स्वरूपाचा आहे. धर्म, वंश, जात, प्रांत, वर्ण.. अशा अनेक मुद्द्यांवर अस्तित्वाचे संघर्ष स्वातंत्र्यानंतर साठ वर्षे उलटूनही सुरू आहेत. त्यातही देशाची प्रांतरचनाच भाषावार झाली असल्याने भाषिक अस्तित्व, हा नेहमीच कळीचा घटक राहिला आहे. कालांतराने भाषेपाठोपाठ तिचे नियम व्याकरणाच्या स्वरूपात निर्माण झाले. मग...
  December 11, 06:49 AM
 • भावभावनांना वाट मोकळी करून देणारा त्याचा कैफ हा नवा मराठी गझलसंग्रह आणि डायरीतील कविता हा काव्यसंग्रह लवकरच चोखंदळ वाचकांच्या भेटीस येणार आहे.गेल्या दशकभरापासून त्याला मस्क्युलर डिस्ट्रॉफी ही स्नायू कमकुवत होण्याची असाध्य व्याधी जडली आहे. मात्र, जगण्याचं दु:ख कुरवाळत न बसता दु:खाला कवेत घेऊन नि:शब्द वेदनेशी शब्दरूपी औषधाच्या बळावर संवाद साधण्यावर त्याने भर दिला आहे. राज्यभरातून साहित्यविषयक कार्यक्रमांचे आग्रही निमंत्रण मिळूनही नाइलाजाने त्याला या व्याधीमुळे जाता येणे शक्य होत...
  December 4, 06:34 AM
 • खासगी बेकायदा सावकारांच्या तावडीत सापडलेल्या बबन नावाच्या नामवंत शिक्षकाची घुसमट येथील प्रा. श्रावण गिरी हे लेखक आपल्या घर गेलं वाहून या कादंबरीतून मांडत आहेत. स्वेच्छा निवृत्तीनंतर देवगिरी प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गिरी यांनी लिखाण सुरू असलेल्या या कादंबरीच्या माध्यमातून संस्थाचालकांना चुकीचे मार्गदर्शन करत शिक्षकांविरुद्ध भडकावणारे मुख्याध्यापक, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील दलाली करणा-या अधिकारी स्तरावरील आणि मध्यमवर्गीयांना वेठीस धरून...
  December 4, 06:30 AM
 • वाशीमसारख्या गावातून विष्णू जोशींची कविता चळवळ सध्याचे युग हे टीव्ही, इंटरनेटचे आहे. त्यामुळे आता मुद्रित माध्यम रेडिओप्रमाणे पडद्याआड होतील, अशी हाकाटी दशकभरापूर्वी ऐकायला मिळत होती; पण तसे काही झाले नाही. उलट मुद्रित माध्यमांची लोकप्रियता वाढून दिवसेंदिवस त्याचा खपसुद्धा वाढत आहे. असे असताना मराठी साहित्याला समृद्ध करणारी महाराष्ट्रातील वाङ्मयीन नियतकालिकांची चळवळ थंडावली. 1980 नंतरची शब्दवेध, सौष्ठव, शब्द (लातूर) अभिधानंतर, अनाघ्रात ही दर्जेदार नियतकालिके बंद पडली. मात्र,...
  December 4, 06:22 AM
 • मध्य प्रदेशातील मराठी भाषा अणि संस्कृतीचे बेट असलेल्या इंदूर शहरातील प्रसिद्ध साहित्यिक, प्रकाशक, कवी संपादक श्रीकृष्ण बेडेकर येत्या शुक्रवारी वयाची सत्तरी पूर्ण करत आहेत त्यानिमित्ताने... महाराष्ट्रापासून ब-याच दूर असणा-या इंदूरनगरीत वास्तव्य असूनही मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा झेंडा मोठ्या दिमाखानं मिरवणारा एक ध्येयधुंद धडपड्या माणूस म्हणून मी ब-याच काळापासून बेडेकर यांना ओळखतो. पहिला परिचय झाला तो त्यांच्या अफलातून अशा पत्रसारांश या केवळ एका आंतरदेशीय पत्रातून प्रसिद्ध...
  December 4, 06:17 AM
 • महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा प्रथम स्मृतिदिनानिमित्त बुलंद रेषा या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईला श्री. उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे व रामदास आठवले यांचा उपस्थितीत झाले. बुलंद रेषा या पुस्तकात देशभरातील नामवंत व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली अर्कचित्रे आहेत. विविध व्यंगचित्रकारांच्या नजरेतून बाळासाहेब कसे होते हे शोधण्याचा हा एक प्रयत्न आहे. व्यंगचित्रे निवडताना त्यात बाळासाहेबांचा उपहास नसावा हे कटाक्षने पाहिले गेले आहे. पुस्तकाचे संपादक प्रभाकर...
  November 27, 12:43 AM
 • महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा प्रथम स्मृतिदिनानिमित्त बुलंद रेषा या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईला श्री. उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे व रामदास आठवले यांचा उपस्थितीत झाले. बुलंद रेषा या पुस्तकात देशभरातील नामवंत व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली अर्कचित्रे आहेत. विविध व्यंगचित्रकारांच्या नजरेतून बाळासाहेब कसे होते हे शोधण्याचा हा एक प्रयत्न आहे. व्यंगचित्रे निवडताना त्यात बाळासाहेबांचा उपहास नसावा हे कटाक्षने पाहिले गेले आहे. पुस्तकाचे संपादक प्रभाकर...
  November 27, 12:43 AM
 • सेलूचे कवी आणि गझलकार म. मो. जोशींचा ऐतिहासिक प्रयत्न कविवर्य सुरेश भटांनंतर संगीता जोशी, इलाही जमादार, नीता भिसे, प्रदीप निफाडकर, चंद्रशेखर सानेकर, शरयू आसोलकर, अविनाश सांगोलकर, मनोहर रणपिसे आदींनी हा प्रवाह अव्याहत सुरू ठेवला. इलाही जमादारांच्या भावनांची, वादळांची ओळख करून देणारे गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी गझल घराघरात पोहोचवली. मराठीत गझल लिहिणार्या अनेकांनी या काळात विशेष संग्रह प्रकाशित केले. भीमराव पांचाळे यांंच्या प्रयत्नांमुळे प्रमाण मराठी भाषेबरोबरच कोंकणी, वहाडी, गोंडी,...
  November 27, 12:37 AM
 • स्वा. भाई फुटाणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोकण, मराठवाडा, खान्देश, विदर्भाचे कवी एकाच व्यासपीठावर जामखेड हे नगर जिल्ह्यातील दुष्काळी गाव, पण रसिकांची इथे कमतरता नाही. पंचमीच्या घुंगरांच्या नादाप्रमाणेच कवितांनाही इथे भरभरून दाद मिळते. संत नामदेव पुरस्काराच्या निमित्ताने होणार्या कविता उत्सवात याचा प्रत्यय दरवर्षी येतो. म्हणूनच पुण्या-मुंबईचेच नव्हे, तर चांद्यापासून बांद्यापर्यंतचे नवे-जुने कवी या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावतात. अरुण म्हात्रे, शाहीर संभाजी भगतांचा नामदेव...
  November 27, 12:30 AM
 • महिला लेखिका साहित्य संमेलनाला औरंगाबादेतून सुरुवात झाली. यंदा बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे 1 व 2 फेब्रुवारी 2014 रोजी मराठवाडा साहित्य परिषदेचं पाचवं लेखिका साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ललिता गादगे यांची निवड झाली यानिमित्ताने त्यांची साहित्यविषयक व मराठीच्या सद्य:स्थितीविषयीच्या प्रश्नांसंदर्भात घेतलेली विशेष मुलाखत ..... प्रश्न : माजलगावसारख्या ठिकाणी पाचवं लेखिका साहित्य संमेलन होणार आहे. त्याविषयी तसेच बीडला झालेलं चौथं साहित्य संमेलन सफल झालं असं...
  November 20, 01:00 AM
 • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सातारा येथे येत्या 22,23 आणि 24 नोव्हेंबर दरम्यान बाविसावे विभागीय साहित्य संमेलन थोरले प्रतापसिंह महाराज साहित्य नगरीत भरत आहे. यानिमित्ताने * ज्येष्ठ कवी नारायण कुलकर्णी-कवठेकर संमेलनाध्यक्ष, फ.मुं.शिंदे उद्घाटक महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे राज्यातील 64 शाखा आणि दहा हजार आजीव सदस्यांच्या माध्यमातून निरनिराळे उपक्रम राबवत असून त्याव्दारे मराठी संवर्धनाचे काम चालू आहे. या अंतर्गत 22,23 व 24 नोव्हेंबरदरम्यान बाविसावे विभागीय साहित्य संमेलन सातारा...
  November 20, 01:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED