Home >> Magazine >> Akshara

Akshara

 • हिंदी-मराठी चित्रपटांना-मालिकांना सशक्त संहिता मिळत नाहीत म्हणूनही कादंबरीसारख्या साहित्यकृतीचे माध्यमांतर केले जाते, असे मत एका ज्येष्ठ साहित्यिक व नाटककारांनी नुकतेच व्यक्त केले. कादंबरीवर चित्रपट बनविण्याचा सिलसिला त्या त्या कादंबरीला नवे परिमाण, नवा लूक आणि नव्या पिढीशी संवादाचे माध्यम देऊन जातो, हे मात्र नाकारता येत नाही. या माध्यमांतराचा घेतलेला हा धांडोळा : रज्जो हा नुकताच विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट येऊन गेला. त्याला फारसे यश मिळाले नसले तरी पुन्हा...
  November 20, 01:00 AM
 • बाबाराव मुसळे हे मागील तीन दशकांपासून मराठी रसिकांना परिचित असलेले नाव. मुसळ्यांनी आजवर मराठी साहित्याला हाल्या हाल्या दुधू दे, पखाल, वारूळ, पाटिलकी, दंश, स्मशानभोग या गाजलेल्या कादंब-या दिल्यात. त्यांच्या साहित्यकृतीला अनेक मानाचे पुरस्कारसुद्धा मिळाले. वेगवेगळ्या विद्यापीठांत त्यांच्या साहित्यकृतींचा अभ्यासक्रमात समावेश आहे. आता मुंबईच्या मॅजेस्टिक प्रकाशनाकडून मुसळ्यांची आर्त ही सातवी कादंबरी यावर्षाच्या शेवटी प्रकाशित होत आहे. या कादंबरीविषयी सांगताना मुसळे म्हणाले,...
  November 20, 01:00 AM
 • जळगाव जिल्हा दूधसंघाचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक ज्ञानेश मोरे हे तीन दशकांपासून साहित्यसाधनेत रममाण झालेले आहेत. काव्य, कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा चारही प्रकारांत त्यांची नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची गुलारा बेगम ही नव्या धाटणीची, पण इतिहासाच्या झरोक्यातून फुलवलेली आशयघन कादंबरी लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहे. साहित्याच्या प्रांतात ज्ञानेश मोरे यांनी चिंतनशील अन् संशोधनात्मक लेखनशैलीतून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. मध्यप्रदेशातील ब-हाणपूर परिसरात मोगलांच्या काळात...
  November 13, 02:00 AM
 • वाचनसंस्कृती अजूनही लयाला गेली नसल्याचे अधोरेखित एका हॉलमधून काही वाचक 10-12 पुस्तकांचे गठ्ठेच घेऊन बाहेर पडत होते. एक नाही दोन नाही, तर असे अनेक पुस्तकप्रेमी पुस्तकांकडे बघत आपल्याला मिळालेल्या या अक्षरधनाचा ठेवा आनंदाने जपताना दिसत होते. 700 रुपयांचे चांगले पुस्तक केवळ 50 रुपयांना मिळते. म्हणजे आजच्या लोकल लॅँग्वेजमध्ये फुकटच म्हणावे लागेल, पण स्वागतमूल्याच अमूल्य असलेल्या या अक्षरधनाचा अनमोल ठेवा आपल्याकडेही जपण्यासाठी पुस्तकप्रेमींनी केलेली गर्दी वाचनसंस्कृती अजूनही लयाला गेली...
  November 13, 12:15 AM
 • शाहीर आत्माराम पाटील, संयुक्त महाराष्ट्रलढ्यातील एक धगधगती तोफ. वैयक्तिक जीवनापेक्षा समाजासाठी, दीन- दुबळ्यांसाठी झटणारा, लोककलेतून समाजाची सुख-दु:खं मांडतानाच वैगुण्यांवर प्रहार करणारा तळमळीचा लोकसेवक, संघर्षातही स्वत्व आणि स्वाभिमान जपणारा... गरिबीच्या वैभवात ताठ मानेनं जगणारा लोककलावंत. शाहिरांच्या चरित्र लेखनाच्या निमित्ताने जवळपास अडीच-तीन वर्षे त्यांच्या सहवासाचा योग आला. आत्माराम वरवर साधे वाटणारे, साधं-सुधं आयुष्य जगणारे, पण प्रचंड संवेदनशील प्रतिक्रियावादी! त्यांचं...
  November 13, 12:09 AM
 • कादंबरीकार, कथाकार आणि समीक्षक अशा तिहेरी भूमिकेतून केलेली ही समीक्षा आहे. या तिहेरी दृष्टीचा पुरेपूर प्रत्यय या ग्रंथातून येतो. लेखकाने केलेली समीक्षा ही त्याची कार्यशाळाचा असते. यालाच इंग्रजीत वर्क शॅप क्रिटिसिझम म्हणतात. आपल्या साहित्यात तो जे नवे प्रयोग करत असतो. त्याचे सुप्त समर्थन आणि स्पष्टीकरण अशा समीक्षेत असते. या समीक्षेला सहज समजणारा एक बाहेरचा रंग असतो, तसाच एक सुप्त असा आतला रंगही असतो. हे समीक्षेचे रूप येथेही आढळते. समकालीन साहित्यातील नव्या जाणिवांचा शोध हा या समीक्षेचा...
  November 13, 12:03 AM
 • छपाईचे तंत्र विकसित झाल्यानंतरच्या अगदी नवजात काळात छपाई कला आणि इंग्रज लोक यांच्याबद्दल सनातनी लोकांच्या मनात काय भावना होत्या, त्या काळात कोणती महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली, दोनशे वर्षांपूर्वी मराठी लेखकांची प्रतिभा कोणत्या पातळीवरची होती, हा अभ्यास विचारवंत आणि अभ्यासकांच्या दृष्टीने नुसता मनोरंजकच नाही, तर बुद्धीत भर घालणारा ठरावा. आजच्या फास्ट फूड जमान्यातही ही माहिती, भाषिक इतिहासाचे ज्ञान या दृष्टीने महत्त्वाची ठरते. मराठी भाषेतील दुर्मिळ पुस्तकांच्या...
  November 13, 12:00 AM
 • हे वर्ष वा. रा. कांत (जन्म 1913-1991 मृत्यू) यांच्या जन्मशताब्दीचे आहे. हैदराबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948 रोजी मुक्त झाले. हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या दिनानिमित्त आपला जल्लोष-आनंद साजरा करताना कवी वा.रा. कांतांनी उघड ऊर्मिले कवाड ही आपली कविता लिहिली असून तिचा त्यांनी वेलांटी या आपल्या कवितासंग्रहात समावेश केला आहे. आज रोजी कांतांची जन्मशताब्दी आणि या कवितेचे नव्याने स्मरण होते. मराठवाड्यात पहिले राजकीय आंदोलन 1938-39 मध्ये झाले. निजामाच्या सत्तेला आव्हान देणारे नि:शस्त्र वीर पाहून त्या वेळच्या...
  November 6, 12:30 AM
 • आधी बोली नंतर प्रमाण भाषा तयार होते मराठी बोली ही ठराविक जनसमूहाची नाही. अनेकांकडून ती बोलली जात असल्याने समाजमान्य बोली आहे. त्या जनसमूहाच्या जगण्याच्या संघर्षातून अनेक बोल्या निर्माण होतात. तशीच मराठी बोली निर्माण झालेली आहे. डॉ. ना. गो. पालेरकर यांच्या मतानुसार अहिराणी मराठीची पोटभाषा आहे. प्रत्येक भाषेमधील शब्द प्रत्येक भाषेत पेरले गेले आहेत. अभिजात याचा अर्थच भाषेची प्राचीनता. मराठी बोली बोलणार्यांची प्राचीनता आहे. आधी बोली नंतर प्रमाण भाषा तयार होते. यादवकालीन मराठी भाषेचा...
  November 6, 12:26 AM
 • स्वामी विवेकानंद हे एक बहुआयामी आणि चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांना खूप भाषणे करावी लागत. त्यांचे भाषण हे त्यांच्या वक्तृत्वाचे प्रदर्शन घडवण्यासाठी होत नसे, तर त्यांचे भाषण म्हणजे त्यांच्या उत्कट अंत:करणाचा सहज आविष्कार असे. त्यांनी लोकांना साहित्यिक आध्यात्मिकदृष्ट्या आहे त्या स्तरावरून वरच्या स्तरावर नेण्यासाठीच भाषणे केली. विवेकानंदांच्या ग्रंथांचा प्रभाव नोबेल पारितोषिकप्राप्त जागतिक कीर्तीचे लेखक रोमां रोलां म्हणतात, आज तीस...
  November 6, 12:22 AM
 • दिवाळी अंक ही मराठी साहित्याची एक अभिमानास्पद संस्कृती असून ही संस्कृती जपण्यात संपादक, प्रकाशक यांच्यासह प्रिंटर्स, लेखक, कवी, ऑपरेटर, डिझायनर यांचा महत्त्वाचा असा वाटा आहे. मराठीतील नामवंत चित्रकारांनी, व्यंगचित्रकारांनी, मुखपृष्ठकारांनी, रेखाचित्रकारांनी दिवाळी अंकाची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जपण्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. पण आता संगणकाचा तसेच स्टॉक चित्रांचा प्रभाव वाढून प्रकाशक, वाचक यांची मानसिकताही बदललेली आहे. या पार्श्वभूमीवर नामवंत चित्रकारांनी व्यक्त...
  October 30, 07:36 AM
 • जुलै महिन्याच्या 1७ तारखेच्या अंकातील एक लेख नुकताच वाचनात आला. रा. चिं. ढेरे यांना भावलेली शुकसारिका धर्मापुरीला, निलंग्याला नाही. ... हा लेख होता डॉ. किरण देशमुख (नांदेड) यांचा. प्रथमत: मी त्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी प्रत्यक्षरीत्या जाऊन पाहून या मथळ्याचा लेख लिहिला... आता एक वाचक आणि अभ्यासक म्हणून काही मुद्दे मला नोंदवावेसे वाटतात. लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा या परिष्कृत आवृत्तीमध्ये पृ. क्र. 142-149 मध्ये शुक आणि सुंदरी या लेखात पृ. क्र. 145 वर डॉ. ढेरे यांनी निलंगे येथील मंदिरावरील...
  October 30, 07:31 AM
 • हिंगोली जिल्ह्यातील वसमत या ठिकाणी नोव्हेंबरात पस्तिसावं मराठवाडा साहित्य संमेलन होणार आहे. यानिमित्ताने संमेलनाध्यक्ष आणि ख्यातनाम ज्येष्ठ साहित्यिक, माजी सनदी अधिकारी भारत सासणे यांची या अनुषंगाने विविध साहित्यविषयक प्रश्नांवर घेतलेली विशेष मुलाखत प्रश्न : सध्याच्या काळात मराठी साहित्य कोणत्या दिशेने जात आहे ? सासणे : मराठी साहित्याने अलीकडे उत्तराधुनिक काळात प्रवेश केलाय. त्यामुळे जागतिकीकरण आणि जगात घडणा-या विविध घटनांचे पडसाद सर्वसामान्य माणसाला ग्रासून आहेत. कोणे...
  October 30, 07:20 AM
 • भुसावळच्या दयाराम शिवदास विद्यालयातील उपशिक्षिका सीमा भारंबे यांनी साहित्य सेवेचा वसा जोपासला आहे. पॅराप्लेझिया नावाच्या दुर्धर व्याधीने ग्रासलेल्या पतीला आत्मिक बळ देण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्याच्यावर त्या लढा ही कादंबरी लिहीत आहेत. कादंबरी लिखाणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, लवकरच ती वाचकांच्या भेटीला येणार आहे. प्रतिकूल परिस्थितीचे तुणतुणे तर सारेच नेभळट लोक वाजवत असतात. कारण त्यांच्या हातात तेवढेच असते. वाजवत बसणे, गळा काढून रडणे आणि सारे खापर परिस्थितीच्या माथी...
  October 23, 03:00 AM
 • लेखिका प्रतिमा जोशी या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका मुसळधार पावसासाठी, निसर्गसौंदर्यासाठी आणि रताळ्यांसाठीही प्रसिद्ध. 29 सप्टेंबरचा दिवस चंदगड तालुक्याच्या इतिहासात वेगळा म्हणून नोंदवला जाईल. ग्रामदैवत रवळनाथ मंदिराच्या परिसरात महिलांची लगबग सुरू होती. मंडप उभारण्यात आला होता. निमित्त होतं पहिल्या महिला साहित्य संमेलनाचं. ग्रामीण साहित्य संमेलने ही जागोजागी होत असली तरी या महिला साहित्य संमेलनाचं वेगळेपण सर्वांना जाणवत होतं. ऑगस्ट आणि...
  October 23, 03:00 AM
 • बस, एसटीत चढलं आणि डबल बेल पडली की आपल्या प्रवासाला गती मिळालीच समजायचं. खरं म्हणजे आपण वाटच पाहत असतो....ही डबल बेल पडते कधी आणि आपल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचतो कधी. शासनातील काही व्यक्ती, अधिकारीदेखील असंच योजनांना गतिशील करत पुढेच जात राहतात. अशाच एक अधिकारी असलेल्या बेलसरे यांनी कामात येणार्या तमाम अडथळ्यांवर लीलया मात करत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलेल्या त्यांच्या अनुभवांची डबल बेल, म्हणजे हे पुस्तक आहे. सार्यांनाच विश्वासात घेऊन, प्रशासनाचा मानवी चेहरा म्हणून यशस्वी झालेल्या एका...
  October 23, 03:00 AM
 • परी गं परी ही बालकथेची छोटीशी पुरचुंडी आहे. मंगला अवलगावकर यांनी बालकथारूपी जीवनभर पुरणारी शिदोरीच दिली आहे असं म्हणावंसं वाटतं. विविध नीतिमूल्यांनी भरलेल्या या चौदा गोष्टी बालकाच्या जीवनात निश्चितच प्रेरक ठरतील याची खात्री वाटते. परी गं परी या कथागुच्छातील प्रत्येक फूल पूर्णत: विकसित, सुगंधित व नीतिमूल्यांनी ओतप्रोत भरलेले आहे. विषयभिन्नता आली तरी छोट्यांच्या गळी उतरण्यास लावलेले नीतितत्त्व मुलांना आकर्षक व कुतूहलास्पद आहे. पहिली कथा फकीर सेनापतीची आहे. राजाचा व सैन्याचा...
  October 23, 03:00 AM
 • मिरजेचे खरे मंदिर वाचनालय म्हणजे व्याख्यात्यांचे तीर्थक्षेत्रच, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महाराष्ट्रात गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ अव्याहतपणे ज्या व्याख्यानमाला सुरू आहेत, त्यांमध्ये मिरजेच्या खरे मंदिराची व्याख्यानमाला वरच्या क्रमांकावर आहे. जो जो ज्ञानार्थी तो तो विद्यार्थी, या हेतूने मिरज विद्यार्थी संघाची 9 नोव्हेंबर 1919 ला स्थापना झाली. तो काळ पारतंत्र्याचा होता. स्वातंत्र्याच्या प्रेरणेने झपाटलेल्या विद्यार्थ्यांना जगभरचे साहित्य उपलब्ध व्हावे, या हेतूने या...
  October 23, 02:00 AM
 • मराठी साहित्यात नवा प्रवाह ठरेल व त्याची दखल घ्यावी अशा या दीर्घ समीक्षाग्रंथात मराठीतील सर्व नव्या-जुन्या सर्व समीक्षक आणि अभिरुचीच्या उदाहरणार्थ डॉ. सदानंद मोरे, सुधीर रसाळ, दि. पु. चित्रे, सूर्यनारायण रणसुभे, अरुणा ढेरे, वसंत आबाजी डहाके, दासू वैद्य, आर. आर. पाटील, शरद पाटील, एन. डी. पाटील आदी सर्व प्रांतातल्या आघाडीच्या 105 वर मान्यवरांनी तीन भागांत खास मराठवाडी आघाडीचे कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितांवर लिहिले आहे. मराठी साहित्यातील सर्व सुर्वे या अपवादात्मक टीका समीक्षा ग्रंथानंतर...
  October 22, 03:36 PM
 • श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सर सर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे... या ओळी सहजच येतात. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या कवितांनी मागील शंभर वर्षांपासून रसिकांना वेड लावलं आहे. या निसर्गकवीला अवघं 28 वर्षांचं अल्पायुष्य मिळालं. नगर, पुणे, महाबळेश्वर या ठिकाणी बालकवींची प्रतिभा बहरली. निसर्गाची रूपं त्यांनी आपल्या कवितेत आणली. उमेदीच्या काळात बालकवी अहमदनगरमध्ये होते. फुला-मुलांचे कवी म्हणून ओळखल्या जाणा-या रेव्हरंड...
  October 9, 07:15 AM
 
जाहिरात

RECOMMENDED