Home >> Magazine >> Akshara

Akshara

 • मराठी पुस्तक विश्वात अलीकडच्या काळात विविध विषयांची आणि वेगळ्या अनुभव विश्वातल्या पुस्तकांची भर पडू लागली आहे. भाषेच्या समृद्धीसाठी प्रक्रिया आवश्यकच आहे. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे वंदना अत्रे यांनी लिहिलेले व राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले टीएलसी : टीचिंग-लर्निग कम्युनिटी : तरुणाईसाठी उद्योजकतेचा नवा मंत्र हे पुस्तक. ८०च्या दशकापासून महाराष्ट्राच्या उद्योगजगतात अनेक धाडसी आणि उत्साही तरुणांनी प्रवेश केला. प्रारंभी प्रगती अाणि नंतर घाेडे अडले हा अनुभव बहुतेक सर्व...
  August 4, 03:03 AM
 • विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील प्रमुख चार विषयांतून काही भाषांसाेबत मराठीला बाहेर काढून जे भेदपूर्ण वर्तन दिल्ली विद्यापीठाने केले अाहे. त्याकडे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाद भालचंद्र जाेशी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पत्र दिले अाहे. त्याची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अाणि शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनाही देण्यात अाली अाहे. याअगाेदर भारतीय भाषांच्या साैहार्दपूर्ण एकतेचे दर्शन घडविणाऱ्या प्रतीकाच्या स्वरूपात असलेल्या...
  August 4, 03:03 AM
 • ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागले अाहेत. संमेलन दिल्लीत हाेणार अशीही शक्यता निर्माण झाली अाहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चार साहित्यिकांनी अापली उमेदवारीही जवळपास जाहीर केलेली अाहे. त्यात सध्यातरी विदर्भ विरुद्ध पुणे असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत अाहेत. कारण नागपूरचे डाॅ. रवींद्र शाेभणे, वर्ध्याचे किशाेर सानप तर पुण्याचे रवींद्र गुर्जर अाणि राजन खान यांची उमेदवारी असणार अाहे. या साहित्यिकांनी अापल्या उमेदवारीविषयी भूमिका मांडताना काहींनी सांगितले...
  August 4, 03:01 AM
 • छत्रपती शिवरायांच्या आईसाहेब एवढीच जिजाऊसाहेबांची ओळख मर्यादित नाही..स्वातंत्र्याचा खरा अर्थ नेमका उमगलेले, भरकटलेल्या तरुणाईला, पोरपणाला योग्य दिशा दाखवणारे, त्या वाटेवरची पहिली पावले टाकण्यास साह्य करणारे, सतत प्रेरणा देणारे, जागृत ठेवणारे आणि प्रत्येकावर मायेची पाखर घालणारे विश्वव्यापी आईपण जिजाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वात सामावले होते. वीरकन्या, वीरपत्नी, वीरमाता..आणि या सगळ्यापलीकडे एक मनस्विनी स्त्री, असे जिजाऊसाहेबांचे अद्वितीय चरित्र कादंबरीसारख्या ललितकृतीतून...
  June 23, 03:06 AM
 • राष्ट्रीय पांडुलिपी मिशनने जानेवारी २०१७मध्ये ज्या धारणीसंग्रह नामक हस्तलिखिताचे प्रकाशन केले, त्या हस्तलिखिताची लिपी ही नेवारी किंवा नेवा आहे. हे हस्तलिखित कार्यशाळेचे आयोजक आणि TRIBILS चे संस्थापक-संचालक अतुल भोसेकर यांनी मिळविले. सातव्या शतकातील हे ५४१ पानांचे (folios) हस्तलिखित त्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या आम्हा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन, त्यांनी देवनागरी लिपीत लिप्यंतरीत करवून घेतले. प्रस्तुत धारणीसंग्रहाची भाषा ही संकरित संस्कृत आहे. संकरित संस्कृत म्हणजे...
  June 23, 03:01 AM
 • खरं तर याआधी कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्या भाषेतील उपलब्ध साहित्य हे ५०० वर्ष जुनं असावं ही अट होती. ती अट बदलून सरकारनं आता ते साहित्य १५०० वर्षांपूर्वीचं असेल तरच ते अभिजात समजलं जाईल, असा नियम केला आहे. त्या अनुषंगानं मग यासाठी प्रयत्नशील असलेले हरी नरके यांनी यामधील गाहा सत्तसई या ग्रंथाचा संदर्भ मराठीसाठी दिला आहे. या ग्रंथाबद्दल एक गोष्ट अशी सांगता येईल, की १८७० मध्ये एका जर्मन अभ्यासकाने जर्मनीत याचा पहिल्यांदा प्रसार केला. भारतात येऊन त्यावर संशोधन...
  May 5, 03:04 AM
 • रहस्यकथांचे दालन ही नेहमीच वाचकांसाठी आवडीची बाब असते. जगातील अनेक भाषांमध्ये रहस्यकथांना उत्तम वाचक मिळत आले आहेत. भारतीय भाषांमध्येही ही गोष्ट आढळते. बंगाली साहित्यात निर्माण झालेली आणि कालांतराने इंग्रजीसह अन्य भारतीय भाषांमध्येही अनुवादित झालेल्या व्योमकेश बक्षी ही रहस्यकथांची मालिकाही अशीच वाचकप्रिय ठरली आहे. २०११ साली रोहन प्रकाशनतर्फे व्योमकेश बक्षी मराठीमध्ये अनुवादित झाले होते आणि त्याला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक अशोक जैन...
  April 7, 03:05 AM
 • मैत्री हा अायुष्यातील एक सुरेख रेशीमबंध असताे, जाे अायुष्यातील चढ-उतारात अापली साेबत करताे, अाधार देताे, अापली उमेद टिकवून ठेवताे, पण जर या सुंदर नात्याची वीण उसवत गेली, तर माणसाचं अायुष्य वैराण हाेऊ शकतं, त्याचे दूरगामी परिणाम घडू शकतात. वैयक्तिक अायुष्य, करिअर, इतर नातेसंबंध यावरही ठळक दुष्परिणाम घडू शकतात. अशा या मैत्रीच्या नात्याचं महत्त्व अाेळखून लेखिका जॅन येगर यांनी दीर्घ संशाेधनातून या विषयाची सविस्तर मांडणी केली अाहे. मैत्रीचं नातं जाेडण्यासाठी, ते टिकवण्यासाठी, त्यामुळे...
  April 7, 03:05 AM
 • महाराष्ट्राबाहेरील मराठी लाेकांची भाषा, साहित्य व संस्कृतीचे बृहन्महाराष्ट्रात जतन, संवर्धन अाणि संरक्षण करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज असून ती निर्माण करणे व टिकविणे अाज अतिशय अावश्यक झाले अाहे, अन्यथा पुढच्या पिढीत मराठी भाषेचे बृहन्महाराष्ट्रात अस्तित्व कसे व किती उरेल याबद्दल सांगता येणे कठीण अाहे, अशी खंत प्रख्यात लेखक अाणि भारत सरकारच्या परराष्ट्र विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केली. भाेपाळ येथील रवींद्र भवनात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या...
  March 24, 03:58 AM
 • डोंबिवली - अाजपासून सारस्वतांच्या कुंभमेळ्याला डाेंबिवलीत सुरुवात हाेणार अाहे. पिंपरी येथे झालेल्या ८९व्या संमेलनाचा दिमाख बघता पुढील संमेलन कुठे अाणि कसे हाेते यावर बरीच चर्चा झाली. ती शमते ताेच पुन्हा निवडून अालेले अध्यक्ष काेण? हे साहित्य विश्वाला माहितीच नाही यावरही बरेच चर्चा-चर्वण झाले. या सगळ्यातून बाहेर पडत अाता डाेंबिवलीत हा मराठीचा उत्सव हाेत अाहे. या संमेलनात नियमित परिसंवादांबराेबरच कवितेसाठी खास वेगवेगळी व्यासपीठं देण्यात अाली अाहे हे विशेष. तर तीन दिवस भरगच्च...
  February 3, 12:52 PM
 • भारताच्या इतिहास आणि सांस्कृतिक महाराष्ट्राचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीत महाराष्ट्राने महत्त्वाची भर घातलेली आहे. जगप्रसिद्ध असलेली अजिंठा, भाजे, कार्ले, जुन्नर व वेरुळ लेणी, बीबीका मकबरा, देवगिरी किल्ला व गुरुद्वारा ही ऐतिहासिक स्थळे महाराष्ट्रातच आहेत. मराठा आणि मुस्लिम राजवटीच्या काळात महाराष्ट्राचा विकास झाला. इ. स. १८१८ मध्ये पेशवाईचा शेवट झाला व महाराष्ट्रावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्थापन झाली. ब्रिटिशांच्या सत्तेमुळे...
  January 13, 03:12 AM
 • नवलेखक अनेक संमेलनांच्या व्यासपीठापासून दुरावले जातात. अर्थातच आयोजकांचा प्रामाणिक प्रयत्न असतो की सर्वांना संधी मिळावी, मात्र वेळेचं बंधन आयोजकांना कुठेतरी थांबण्यास बांधील असते. परिणामी बहुतांश युवा लेखकांना व्यासपीठाचा स्पर्श न होताच तेथून परतावं लागतं. शिवाय अनेकवेळा युवकांनी हे करावे, ते करू नये, साहित्य क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करा असे उपदेशवजा सल्ले देणारे ज्येष्ठ साहित्यिक, मंडळी व्यासपीठावर पहायला मिळतात. युवकांनी साहित्य क्षेत्रात काहीतरी करावे असे सांगताना...
  January 13, 03:08 AM
 • अनेकदा अशी चर्चा हाेते की, काेणी काही सांगून साहित्याची निर्मिती हाेऊ शकते. पण, मुळात ते प्रत्येकाच्या अात असावं लागतं अाणि असं सगळं असलं तरी अापल्या अातील कलेला अाकार द्यावा लागताे. हाच अाकार देण्याचं काम राजहंस लेखन शिबिरातून झाले. राजहंस प्रकाशनतर्फे नाशिकमध्ये नुकतेच लेखन शिबिर पार पडले. त्यात अनेक विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. नवलेखकांसह काही प्रस्थापित लेखकांनीही त्यात सहभाग घेऊन अापला अनुभव मांडत शंकांना वाट करून दिली. तर त्याला राजहंसच्या संपादक मंडळाने उत्तरे...
  January 13, 03:06 AM
 • मुंबईतील विक्रोळी हे एक उपनगर. पण या उपनगराची ख्याती अवघ्या आशिया खंडात पसरलेली. विक्रोळीतील कन्नमवारनगर ही वसाहत आजही सर्वात मोठी लोक-वसाहत म्हणून गणली जाते आणि कन्नमवारनगराची ही ओळख सर्वार्थानं योग्यच आहे असं मला वाटतं. याचं कारण, कन्नमवारनगर ही वसाहत केवळ लोकसंख्येनंच मोठी नाहीये. तर ती सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि साहित्यिक दृष्टीनंदेखील समृद्ध आहे. हे नगर दिग्गज व्यक्तिमत्त्वांनं बहरलेलं आहे. या कन्नमवारनगरात सर्वच क्षेत्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी राहतात... ज्येष्ठ...
  December 30, 03:00 AM
 • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून २०१७ या वर्षासाठी ज्याचे एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही अशा नवलेखकांच्या पहिल्या प्रकाशनाला अनुदान देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. नवलेखकांना कविता, नाटक, एकांकिका, बालवाङ्मय (६४ ते ९६ टाइप केलेली पृष्ठे ८० कविता), कथा (१२८ ते १४४ टाइप केलेली पृष्ठे ४५००० शब्द), नाटक/एकांकिका (६४ ते ९६ टाइप केलेली पृष्ठे २८००० शब्द), कादंबरी (१२८ ते १४४ टाइप केलेली पृष्ठे ४५००० शब्द), बालवाङ्मय (६४ ते ९६ टाइप केलेली पृष्ठे २८००० शब्द) वैचारिक लेख,...
  December 30, 03:00 AM
 • परभणीचे अासाराम लाेमटे यांच्या अालाेक या कथासंग्रहाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्त लाेमटे यांचे कथा या लेखनप्रकाराविषयी हे मनाेगत. अाजची मराठी कथा ही समकालाची बखर अाहे. कधीकाळी मध्यमवर्गीय जीवनजाणिवेच्या अाणि संकुचित परिघातल्या कथेने मराठी कथासृष्टीचा पैस व्यापला हाेता. अाजची कथा या किरट्या विश्वातून बाहेर पडून विस्तीर्ण अवकाशात अाली अाहे. अाजची मराठी कथा वेगवेगळ्या समूहातून, बाेलीतून, सामाजिक स्तरांमधून येत अाहे. ती बहुस्तरीय अाहे. एका अर्थाने...
  December 30, 03:00 AM
 • वटवृक्षाच्या छायेतील या ज्ञानमंदिरास हा कवितासंग्रह समर्पित केलेला आहे. कवी लिहितो कशासाठी..? खूप गोष्टी कवीला दिसतात, जाणवतात त्या कुणाशी तरी व्यक्त होण्यात धन्यता असते कवी हे कवितेतून करतो. तेच कवी गोकुळ वाडेकर यांनी अापले गूज येथे व्यक्त केलेले दिसून येते. कधी कुणाच्या वाटेवरती ठेवू नका अंधार, इतक्या सध्या सोप्या शब्दांमधून कवी विचार मांडतो. वटवृक्षांच्या छायेत चंदनासारखे झिजणारे अण्णा असतील, कर्मवीर असतील, नवे जग पाहण्याची जिज्ञासा असलेले, राष्ट्रवीरांची विटंबना असेल,...
  December 30, 03:00 AM
 • ईझेलादिन अबुइलेश हे एक पॅलेस्टिनी डॉक्टर आहेत. त्यांचे बालपण गाझापट्टीतील जबलिया निर्वासित छावणीत गेले. जिथे जन्मदेखील झाला ते स्त्रीरोगतज्ज्ञ होते. शिवाय वंध्यत्वावर उपाय या शास्त्रावर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे ते गाजत राहत होते परंतु कमला ते इस्रायलच्या हॉस्पिटलला जात असत. तिथे त्यांचे बहुतांश आयुष्य गेले. हॉर्वर्डमध्ये त्यांनी सार्वजनिक आरोग्य या विषयात प्रशिक्षण घेऊन प्रावीण्य मिळवले. या विषयावरील त्यांची मते आणि त्यांचे संशोधन जगभरात प्रमाण मानले जाते. टोरोंटो...
  December 30, 03:00 AM
 • खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण, हवामान बदल अाणि सर्वच स्तरांवर जलसंघर्षाच्या संख्येत व तीव्रतेत सातत्याने हाेत असलेली जीवघेणी वाढ या व्यापक पार्श्वभूमीवर पाणपसारा हे पुस्तक अाहे. राज्यातील व विशेषत: मराठवाड्यातील दुष्काळाचा दाहक संदर्भही त्याला अाहे. माती, पाणी, उजेड, वारा हा सर्व पसारा समजावून घेत पाणी-प्रश्नाला भिडणे हे अाव्हान अाहे. ते स्वीकारताना पाण-पसाराची निश्चतच मदत हाेणार अाहे. पर्यावरण, जलनियाेजन व जलविकास, मराठवाड्याचा पाणीप्रश्न, पाण्याचे खासगीकरण अाणि दुष्काळ अशा...
  December 30, 03:00 AM
 • ग्रंथ हेच गुरू या अर्थाचे पारंपरिक वचन आहे. पण, सध्याच्या सोशल मीडियाने बुजबुजलेल्या वातावरणात पुस्तकं कोण वाचतंय असाही सूर अधूनमधून ऐकू येत आहे. या दोन्ही बाजूंकडे स्वत:ची अशी बलस्थाने आहेत आणि मर्यादाही आहेत.. पण तरीही ग्रंथदालनांना मिळणारा प्रतिसाद सकारात्मक आहे, असे चित्र शहरी भागात तरी दिसत आहे. मान्यवर प्रकाशक मंडळींची स्वत:ची ग्रंथदालने सुरू झाली आहेत. काही स्वतंत्र ग्रंथदालनांनी ग्रंथप्रदर्शनांची साखळी निर्माण करून स्वत:ला ग्रंथांशी आणि वाचकांशी जोडून घेतले आहे. त्यांच्याशी...
  December 23, 03:18 AM
 
जाहिरात

RECOMMENDED