जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Divya Education

Divya Education

 • केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणा-या भारतीय प्रशासकीय सेवा (प्राथमिक) परीक्षा २०१५ या राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणा-या पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. जागांची संख्या व तपशील : या स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्र सरकारच्या विविध सेवा आणि आस्थापनांमध्ये भरण्यात येणा-या जागांची संख्या ११२९ असून त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत. आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व...
  June 3, 06:51 AM
 • मूल्यमापन या गोष्टीवर चर्चा करतो आहोत. ई. पी. टोरांस यांच्या समकालीन अनेक संशोधकांनी कल्पकता मोजण्याचे प्रयत्न केले. जसे की जे. पी. गिल्फोर्ड, त्यांनी विशेषत: Divergent थिंकिंग या पैलूवर संशोधन करून त्यांची चाचणी विकसित केली. त्यानंतर चीकचेन्क्मिहाली या संशोधकाने एखादी निर्मिती ही त्या क्षेत्रातले तज्ज्ञ कशाप्रकारे स्वीकारतात यावरून ती निर्मिती खरंच सृजनशीलतेचा नमुना आहे की नाही हे ठरवण्याची पद्धत विकसित केली. ही पद्धत फारच संकुचित आणि एकांगी असल्याचं संशोधकांना वाटलं. संशोधकांनी...
  June 3, 06:47 AM
 • प्र. १. मला बीकॉमनंतर एमबीए करायची इच्छा आहे, पण स्पेशलायझेशन म्हणून मार्केटिंग घ्यावे की एचआर कळत नाही. कारण मला बोलण्याची, संवादाची आवड आहे. - प्रशांत कदम, ठाणे. उत्तर : तुमचा प्रश्न खरोखर चांगला आहे. बोलता येणं, संवादाची आवड असणं या दोन्ही गोष्टी एचआर आणि मार्केटिंगसाठी आवश्यक आहेतच, परंतु प्रश्न त्यांच्यामध्येच असलेल्या स्पेशलायझेशनचा आहे. मार्केटिंगमध्ये बोलणं अत्यावश्यक आहे, ज्यामुळं तुमच्या कंपनीचा बिझनेस वाढू शकतो. एचआरमधील बोलणं हे कर्मचारी, वरिष्ठ, ग्राहक यांच्यापुरतं...
  June 3, 06:41 AM
 • शिक्षण झाल्यानंतर वेध लागतात ते नव्या नोकरीचे. बहुतांशी क़ॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यु होत असल्याने जवळपास विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी धडपड करण्याची फारशी गरज भासत नाही. पहिल्या नोकरीचे ऑफर लेटर आपल्याला बरच काही शिकवत असते. त्यामुळे ऑफर लेटर स्विकारतांना गोंधळून न जाता काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. 1-निर्णय स्वत: घ्या - विद्यार्थी दशेतच आपण मनाचा पक्का निर्धार करुन घ्या की, आपल्याला भविष्यात नेमके काय करायचे आहे. यासाठी आपण मार्गदर्शनही घेऊ शकता. परंतु,...
  May 30, 08:41 AM
 • नवी दिल्ली - दिल्लीतील मयूर विहारमध्ये राहणारी राधिका कपूर हिचे लग्न मागीलवर्षी डिसेंबरमध्ये झाले. दोन महिन्यांनंतर ती घरात बसून कटाळू लागली. तेव्हा अचानक तिच्या एका मैत्रिणीने तिला सांगितले की, तू घरबसल्या तुझा कुकिंग बिझनेस सुरू करू शकतेस. यामध्ये चांगला पैसाही मिळतो. मग काय राधिकाने स्वयंपाकालाच स्वतःचे करिअर बनवले. आज राधिका महिन्याला १० हजार रुपये कमावते. साधारणतः महिला घर आणि कुटुंबामुळे करिअरसोबतच या गोष्टींकडेही दुर्लक्ष करतात, मात्र निराश होण्याचे कारण नाही. आम्ही...
  May 20, 04:00 AM
 • चिन्मयी, एक अतिशय गुणी, लाघवी आणि हुशार मुलगी. शाळेत असल्यापासूनच तिला गाण्याची, चित्रकलेची अतिशय आवड होती. गाण्यात तर आपण प्रावीण्य मिळवावं असं तिला वाटायचं. तिच्या आई-वडिलांना मात्र हे मान्य नव्हतं. अभ्यासात हुशार असल्यामुळे तिने डॉक्टर, इंजिनिअर असं काहीतरी व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी ते सतत तिचा पाठपुरावा करायचे. इतर मुलांची उदाहरणं देऊन तिच्याकडूनही काय अपेक्षा आहेत हे सांगायचे. ह्या सगळ्या सततच्या चर्चेमुळे ती नेहेमी तणावाखाली राहायला लागली. तिच्यामधली कवयित्री,...
  May 20, 03:04 AM
 • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लँट रिसर्च, नवी दिल्ली येथे उपलब्ध असणार्या संशोधनपर पीएचडीसाठी नांेदणी करण्यासाठी खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत - उपलब्ध विषय आणि तपशील : या संशोधनपर पीएचडीसाठी प्रामुख्याने प्लँट बायोलॉजी, काँम्पुटेशनल बायोलॉजी, जेनॉम अॅनलॉसिस व मॉस्युक्युलर मॅपिंग, मॉस्युक्युलर मेकॅनिझम ऑफ अॅबियॉटिक स्ट्रेस रिस्पाँसेस, न्यूट्रीशनल जेनॉमिक्स, प्लँट डेव्हलपमेंट अँड आर्किटेक्चर प्लँट इम्युनिटी, ट्रांसजेनिक ऑफ क्रॉप इंप्रूव्हमेंट, मॉस्युक्युलर ब्रीडिंग व प्लँट...
  May 20, 03:00 AM
 • एज्यु कॉर्नर (छंदातून तणाव घालवा) दररोज त्याच त्याच गोष्टी करून जेव्हा कंटाळा येतो, तेव्हा हेच छंद आपल्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करतात. ताणतणावापासून दूर ठेवतात. नवे काही तरी करण्याची प्रेरणा देतात. त्यामुळे नकळतच व्यक्तिमत्त्व विकास घडून येतो. त्यामुळे प्रत्येकाने छंद हे जोपासलेच पाहिजेत. प्रत्येक वेळी जन्मत:च आपल्याकडे कलाकौशल्य असतात असे नाही. छंद सुटीपुरते मर्यादित नकाे सुटी म्हणजे मौजमजा. सुटी म्हणजे करमणूक. सुटी म्हणजे छंद. हो हो छंद. पूर्ण वर्षभर शाळा, क्लास फक्त अभ्यास...
  May 13, 10:53 PM
 • जिंदाल इन्स्टिट्यूट ऑफ पॉवर टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित पदव्युत्तर पदविका व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. अभ्यासक्रम : उपलब्ध जागांची संख्या १२०. शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन यासारख्या विषयातील पदवी कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण. वयोमर्यादा : १ जुलै २०१५ रोजी २८ वर्षांहून अधिक नसावे. } थर्मल पॉवर...
  May 13, 10:49 PM
 • जाहिरात क्षेत्रात माेठ्या संधी प्र. १ . मी बी. कॉम. झाल्यानंतर मासमीडिया, कम्युनिकेशनचे शिक्षण घेऊन अॅडव्हरटायझिंग करण्याचा विचार करतोय. त्यासाठी नेमकं काय लागतं आणि पुढे स्कोप आहे का? - संजय गद्रे, पुणे. उत्तर: केवळ भारतामध्येच नव्हे तर भारताबाहेरही जाहिरात क्षेत्र आज खूप मोठ्या प्रमाणावर फोफावले आहे. या क्षेत्रासाठी खरं तर पुस्तकी शिक्षणापेक्षा सुद्धा प्रतिभा आणि सतत नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची कुवत असावी लागते. या दोन्ही गोष्टी दुर्दैवाने शिकून येत नाही. त्यामुळे...
  May 13, 10:13 PM
 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्रिवेंद्रम येथे उपलब्ध असणार्या बीटेक पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी खालीलप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी, उमेदवारांकडून प्रवेशअर्ज मागवण्यात येत आहेत. बीटेक : एव्हिऑनिक्स. विशेष सूचना : वरील पदवी अभ्यासक्रमांचा कालावधी ४ वर्षांचा, त्यासाठी प्रत्येकी ६० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावाची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय...
  April 8, 03:27 AM
 • माणूस म्हणजे गुण-अवगुणांचं अजब मिश्रण आहे. मानवाला निसर्गाने काही चांगल्या गुणांबरोबरच काही दुर्गुणही दिलेले आहेत. कोणताही माणूस चांगल्या गुणांचा असा काही नसतो. म्हणजे तो परिपूर्ण नसतो. गुण-दोष हे व्यक्तिपरत्वे असतात. एखाद्याचा गुण तो दुसर्याचा दोष असू शकतो, त्याचप्रमाणे दुसर्याचा दोष हा एखाद्याचा गुण असू शकतो. आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तींमध्ये कोणतीच उणीव नसते, असा सर्वसामान्य समज असतो; परंतु या आपल्या समजाला छेद देणार्या घटना आजूबाजूला घडत असतात. ज्यांना आपण...
  April 8, 03:22 AM
 • पावसात सतत गळणारी झोपडी, अभ्यासासाठी जुनी पुस्तके आणि त्यातही आजारी आजीची सेवा. अशा संघर्षमय स्थितीत अमितचे बालपण गेले. मात्र, त्याने इंजिनिअर बनायचे ध्येय निश्चित केले आणि त्यात यशही मिळवले...त्याच्याविषयी अधिक माहिती अानंदकुमार यांच्याकडून... पाटणा जिल्ह्यातील दक्षिणचक्र गावात वीरेंद्रप्रसाद सिंह यांचे कुटुंबीय राहत हाेते. शेती करून कसबसे आपले आणि तीन अपत्यांचे पोट भरायचे. मात्र, कुटुंबाच्या विभागणीनंतर त्यांच्या वाट्याला एक गुंठा जमीन आली आणि त्यांना उदरनिर्वाहही करणे जड होऊ...
  March 28, 02:46 AM
 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, भोपाळ येथे उपलब्ध असणाऱ्या वातावरणातील बदल आणि अनुषंगिक विषयातील एमफिल या विशेष अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. जागांची संख्या व तपशील : या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असणाऱ्या जागांची संख्या २० असून, त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत. आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी कृषी, विज्ञान, पर्यावरण, शास्त्र, वनशास्त्र, लाइफ सायन्सेस, कृषी...
  March 25, 07:04 AM
 • क-कल्पनाशक्तीचा पालकांना एकच सांगावसं वाटत की, पुढे जाऊन तुमचं मूल स्वतः कसं आहे यावरच त्याची प्रगती अवलंबून आहे. तुम्ही जितका त्याला स्वत:चा शोध घेऊ द्याल तितकं ते अधिक स्वयंप्रज्ञ, स्वतंत्र होईल. तेव्हाच ते समाजात उठून दिसेल. आपल्या मुलाची तुलना इतरांशी करणं म्हणजे अविश्वास दाखवणं आहे. कल्पकता हे जीवनमूल्य म्हणून रुजवा कल्पकता हे जीवनमूल्य आहे हे तर आपण जाणून घेतलं. आता ते जीवनमूल्य आपल्यात रुजवण्यासाठी आपण काय करू शकतो त्याचा जरा विचार करू या. कल्पकता आपल्याला आपल्या स्व ची ओळख...
  March 25, 06:58 AM
 • अनुभवी उमेदवाराची गरज बिझनेस विश्लेषकाला आकडेवारी व तथ्यांचे विश्लेषण तसेच वापर करावा लागतो. त्याआधारे बिझनेससंबंधी धोरणे आखली जातात. वर्ष २०१३ च्या अखेरीपर्यंत भारतातील बिझनेस विश्लेषण क्षेत्रातील उलाढाल ६० अब्ज कोटींची होती. मात्र, येत्या पाच वर्षांत यात दुपटीपेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. नॅसकॉमच्या अनुमानानुसार २०१८ च्या अखेरीस या उद्योगाची वार्षिक उलाढाल १४३ अब्ज होण्याची शक्यता आहे. जगात सर्वत्रच या उद्योगाची व्याप्ती वाढत आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशननुसार २०१०...
  March 25, 06:52 AM
 • बारावीनंतर पाच वर्षांचा हा थेट अभ्यासक्रम असतो प्र. १. इंटिग्रेटेड कोर्स म्हणजे काय? आणि तो करणे चांगला असतो का? - सुशांत लिमये, मुंबई. उत्तर : मुळात इंटिग्रेटेड हा कुठला अभ्यासक्रम किंवा कोणता कोर्स नसून तो केवळ इंग्रजी शब्द आहे. आपल्याकडे १०+२+३ अशी पद्धती आहे. म्हणजे दहावीनंतर तुम्हाला दोन वेळेला अभ्यासातील, कोर्समधील बदल अपेक्षित असतात. परंतु काही व्यवस्थापन किंवा औषधनिर्माण किंवा कायद्यासंबंधित शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांमध्ये ही सोय असते की बारावीनंतरच थेट तुम्ही...
  March 25, 06:52 AM
 • आयआयएम संस्थेतून एमबीए करताना स्पेशलायझेशन घ्या प्र. १. पदवीनंतर मला एमबीए करावयाची इच्छा होती. परंतु तिथे सगळा सावळा गोंधळ आहे. सीईटीसुद्धा केवळ नावापुरतीच घेतात. तर मी कुठून एमबीए करू?- तेजस पारेकर, पिंपरी. उत्तर : शिक्षण क्षेत्रातील या बजबजपुरीचे तुमच्यासारखे बरेच विद्यार्थी बळी आहेत. तुम्ही कॅट (कॉमन अॅडमिशन टेस्ट) देऊन आयआयएम सारख्या संस्थेतून एमबीए करू शकता किंवा मग कुठल्याही यूजीसी किंवा डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए करू शकता. फक्त...
  March 18, 02:00 AM
 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, भोपाळ येथे उपलब्ध असणा-या वातावरणातील बदल आणि अनुषंगिक विषयातील एमफिल या विशेष अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. जागांची संख्या व तपशील : या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असणा-या जागांची संख्या २० असून, काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत. आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी कृषी, विज्ञान, पर्यावरण, शास्त्र, वनशास्त्र, लाइफ सायंसेस, कृषी अभियांत्रिकी,...
  March 18, 02:00 AM
 • मागील लेखात आपण मुलांच्या कल्पनाशक्तीच्या वाढीकरिता शिक्षकांचा सहभाग याविषयी बोललो. या लेखात आपण सदर विषयात पालकांचाही सहभाग किती महत्त्वाचा आहे याविषयी विचारमंथन करूया. सामान्यतः कोणतेही बालक दिवसातील किमान ३ ते कमाल ८ तास इतका वेळ शाळेत घालवते. उरलेला सर्व वेळ ते घरीच आपल्या पालकांच्या सहवासात असते. असे असले तरीही वर्गातील प्रत्येक बालक हे त्याच वर्गातील अन्य मुलांपेक्षा वेगळे असते. यावरूनच शाळेव्यतिरिक्तच्या वेळात बालक नेमके काय करत असावे याचा अंदाज बांधता येईल. पालकांनी...
  February 25, 02:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात