जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Divya Education

Divya Education

 • दिवसेंदिवस जग स्टायलिश बनत चाललंय. या स्टायलिशपणाला हातभार लागलाय तो डिझाइनचा. डिझाइन्सचं क्षेत्र आता सर्वव्यापी झालंय. विविध प्रकारच्या डिझायनर्सना मार्केटमध्ये मोठी मागणी निर्माण झाली आहे. या डिझायनर्सनी आपला अभ्यासक्रम जर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइन या संस्थेतून केलेला असल्यास त्याच्या करिअरचा ग्राफ सदैव चढता राहतो. डिझायनिंगच्या क्षेत्रात उत्कृष्ट करिअर घडवणारी संस्था असा नावलौकिक या संस्थेने निर्माण केला असला तरी या संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी मराठी पालक वा त्यांची...
  June 9, 05:30 PM
 • दहावी-बारावी आणि ग्रॅज्युएशन होताच कुठलाही विद्यार्थी करिअरच्या पुढच्या वाटचालीला लागत असतो. काही जण मेडिकल-इंजिनिअरिंगच्या सीईटीची तयारी करतात, तर ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षा किंवा इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांकडे वळताना दिसतात. दहावी-बारावी किंवा ग्रॅज्युएशन हा आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे, यात दुमत नाही. मात्र, अशा या टप्प्यावर करिअर निवडताना किंवा निवडल्यावर आपण योग्य ती काळजी घेतो का? स्वत:च्या क्षमतांचा विचार करतो का? गोंधळलेल्या मानसिकतेतून...
  June 9, 05:24 PM
 • कल्पनाशक्ती ही ज्ञानाची सुरुवात समजली जाते. लहान वयात मुलांना कल्पनाशक्तीची वाढ करण्याचे शिक्षण मिळाल्यास ते मूल ज्ञानाच्या लालसेने धडपड करू लागते. आपल्या शिक्षण व्यवस्थेत पाठांतराला अधिक महत्त्व दिले जाते. त्याऐवजी मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे शिक्षण आपण अभ्यासक्रमात आणू शकलो, ते रुजवू शकलो तर ज्ञानी समाज निर्माण होण्यात कोणतीच अडचण नाही. कल्पनाशक्ती मुलांचा मेंदू अधिक विकसित करत असते. कल्पनाशक्तीमुळे मुले अनेकांगी विचार करू शकतात. या विचारांमुळे त्यांच्यामध्ये तल्लखपणा...
  June 9, 05:09 PM
 • 'गेमिंग' म्हटलं की हातातल्या सर्व गोष्टी टाकून तासन्तास कॉम्प्युटरवर असणा-या कित्येक तरुण-तरुणींना आपण पाहिले असेल. ते तुमचे मित्रमंडळी किंवा तुम्ही स्वत:देखील असू शकता. पण कॉम्प्युटरवर तासन्तास बसले की पालक ओरडतात. शिवाय कॉम्प्युटर इतरत्र नेणे हे देखील शक्य नसते. कधी कॉलेजला, तर कधी बाहेर, बंक केले किंवा फावला वेळ मिळाला, तर नेमके करायचे काय? मग अशावेळी मोबाइल किंवा तत्सम डिवाईसेस्' काढून त्यावरील गेम्स खेळणे हा खूपशा तरुणांचा टाइमपास झालाय. पण यामध्ये गेमिंग या संज्ञेशी तडजोड...
  June 2, 10:23 PM
 • मानवी जीवनाचा फार मोठा भाग विज्ञानाने व्यापला आहे. बाह्यसृष्टीचा शोध घेण्याचा ध्यास जसा माणसाने घेतला तसा त्याचा प्रयत्न वाढत गेला. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणजे साधन निर्मिती. आपली कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये यांना मर्यादा आहे. आपण पायाने चालतो पण थोड्या वेळात जास्त अंतर काटता यावे म्हणून सायकलचा शोध लागला. त्यामुळे सायकल हे साधन आणि पाय हे करण. ज्ञानेंद्रियांच्या बाबतीत डोळा हे करण आणि दुर्बीण हे साधन. दुर्बिणीशिवाय डोळयांनी पाहण्याची ताकद वाढणार कशी? मग सामर्थ्य महत्त्वाचे काय...
  June 2, 10:08 PM
 • पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पाकिस्तानात दडून बसलेल्या ओसामाचा अंत घडवून आणण्यासाठी मुक्रर करण्यात आलेला दिवस ३ मे ठरवण्यात आला... मिट्ट काळोखातही अमेरिकी नेव्ही सील कमांडोंनी बरोबर अबोटाबाद इथे ओसामा राहत असलेल्या हवेलीवर झडप घालून मोहीम फत्ते केली... या सगळ्याचं कारण आणि दिशा ठरवण्याचे साधन एकच- जीपीएस सिस्टिम...मी कोण, कुठून आलो, का आलो, या प्रश्रांची उत्तरं माणसाला मिळालेली नसली तरीही, मी कुठे आहे किंवा माझी दिशा नेमकी कोणती, हा प्रश्र मात्र त्याने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम म्हणजेच...
  June 2, 09:50 PM
 • घरात डॉक्टर असेल तर डॉक्टरकी करावी, ८० टक्क्यांच्या वरच्यांनी इंजिनिअरच व्हावे, अगदीच नाही तर जर आणि ४० - ५० टक्के मिळवणा-या मुलांनी गुपचूपपणे आर्टस् किंवा कॉमर्सलाच जावे आणि द्वाड मुलांनी कुठचे तरी व्होकेशनल कोर्स करून झटपट मार्गाला लागावं ही समाजाची आणि पर्यायाने पालकांची झालेली मानसिकता. याला कारणे खालीलप्रमाणे आहेत.निकालाची गैर पद्धत बेस्ट ऑफ फाईव्ह, शालान्त परीक्षेत मुलांना शाळांनी २० मार्क देणे या पद्धतींमुळे पाल्यांचा दहावीपर्यंतचा दिसत असलेला बुद्ध्यांक हा बारावीच्या...
  June 2, 08:55 PM
 • जीवनाच्या सर्व क्षेत्रांत मोठमोठे लोक होते, आता हल्ली तसं उरलेलं नाही. नव पिढीसमोर काहीच आदर्श उरलेले नाहीत.' असं आपण नेहमीच म्हणतो. पण खरंच असं असतं का याचा शोध घेतला तर परिस्थिती फारशी चांगली नसल्याचं जाणवतं. विद्वान, कर्ते लोक कमी झालेत हे काही प्रमाणात खरं असलं तरी स्वत: पलीकडे जावून काम करणारेही अनेक असल्याचं जाणवतं. या शोधातून 'खरेखुरे आयडॉल्स' हे पुस्तक तयार झालं. दीर्घकाळ काम करणा-या आणि कमी अधिक प्रमाणात यशस्वी झालेल्या प्रयोगांनी, प्रयत्नांना समाजापुढे आणण्याच्या हेतूने हे...
  June 2, 08:04 PM
 • रिसर्च ऑफिसर संस्था - रिझर्व्ह बँक (डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिसी रिसर्च) पदाचे नाव - रिसर्च ऑफिसर (बी ग्रेड) पदांची संख्या - १३ वय - २१ ते ३० पात्रता - एमकॉम (अर्थशास्त्र) किमान ५५ टक्के गुण वेतन : २१ हजार दरमहा अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : ४ जून २०११ अधिक माहितीसाठी संपर्क - http://www.govtjobs.in/ notifications/ प्रोबेशनरी ऑफिसर संस्था- स्टेट बँक ऑफ इंडिया पदाचे नाव- प्रोबेशनरी ऑफिसर पदसंख्या- सुमारे १००० वयोमर्यादा - २१ ते ३० वर्षे पात्रता - कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर अधिक माहितीसाठी संपर्क -...
  June 2, 07:52 PM
 • तंत्रशिक्षणाचा झपाट्याने विस्तार होत चालला आहे. माहिती-तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग यांच्यात मिलाफ होऊन नव्या जगाची उभारणी होत आहे. दर आठवड्याला प्रसिद्ध होणा-या या सदरातून तंत्रशिक्षणातील करिअरच्या संधी यांचा वेध घेतला जाणार आहे.नियोजनबद्धरीत्या कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रातील भविष्यकालीन संधीचे पृथक्करण करून युवकांसाठी देशातच प्रशिक्षणाच्या संधी आपण उपलब्ध करून देऊ शकलो, तसेच त्यांच्या अंतर्गत ऊर्जेला यथायोग्य आकार देऊ शकलो तर यंत्र, तंत्र व मंत्र या त्रिसूत्रीचा वापर करून...
  June 2, 07:41 PM
 • भारत सरकारच्या पब्लिकेशन डिव्हिजनतर्फे हे पुस्तक दरवर्षी प्रकाशित केले जाते. इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये हे पुस्तक असून या पुस्तकामध्ये असणारी माहिती आणि आकडेवारी ही सरकारने दिली असल्याने ती अचूक आणि वस्तुनिष्ठ व ग्राह्य धरली जाते. याच आकडेवारीचा उपयोग करून इतर प्रकाशने त्यांचे स्वत:चे 'इअर बुक' प्रकाशित करतात. त्यामुळे हे अस्सल पुस्तक संग्रही असणे अत्यंत आवश्यक आहे. या पुस्तकामध्ये देश-विदेशातील घडलेल्या सर्व घडामोडींचा वेध घेतला जातो व त्यांच्यावर विश्लेषणही केले जाते. हे...
  June 2, 07:22 PM
 • प्रश्र: करिअर म्हणजे काय? करिअर योजना का व कशी करावी? त्यासाठी उपयुक्त घटक कोणते? उत्तर: करिअर म्हणजे व्यक्तीच्या जीवनातील होणा:या व्यावसायिक प्रगतीची चढती कमान तसेच जीवनातील गतिशीलता. करिअर एकाच जागी स्थिर नसते. वाटेत कितीही अडथळे येवोत. सर्व अडथयांना दूर सारून पुढील वाट शोधून पुढेच जातो. तशाच प्रकारची वाटचाल करिअरची आहे. प्रश्न : संरक्षण दलात डॉक्टर होण्याची संधी कोठे उपलब्ध आहे? असल्यास संस्थेचे नाव, पत्ता, प्रवेश पद्धती, जाहिरात, शैक्षणिक व इतर पात्रता, निवड प्रक्रिया व परीक्षेचे...
  June 2, 07:16 PM
 • नोकरी करणे म्हणजे नेमके काय करावे लागते? आपले करिअर आपल्या पेशात कसे उठावदारपणे करता येऊ शकते? आपणच स्वत:ला कसा 'ब्रँड' करू शकतो याचा आढावा घेणारे हे सदर 'रॅंडेट्रॉन इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड', डिझेल जनित्रांची निर्मिती करणारी एक प्रसिद्ध कंपनी. रमाकांत सैनी यांनी अथक परिश्रमातून गेल्या ३ वर्षांत मोठीच घोडदौड केलेली. मालक असूनही सैनी कामगारवर्गात लोकप्रिय. सकाळचे ९ वाजलेले आहेत. कंपनीत काम करणारे विविध खात्यातील जवळपास ५ व्यवस्थापक (मॅनेजर्स) कॉन्फरन्स रूममध्ये जमलेले....
  June 2, 06:48 PM
 • मातृभाषेबरोबरच इंग्लिशचा सखोल अभ्यास केल्याने आपल्याला करिअर उत्तम घडवता येते. इंग्लिश भाषा उत्तमरीत्या कशी अवगत करावी, त्याचा वस्तुपाठ देणारा हा खास स्तंभ. वैश्विक नागरिक म्हणवून घेण्यासाठी व स्वातंत्र्य आणि आर्थिक मानसिक, वैचारिक यशाचे शिखर गाठण्यासाठी सर्वात महत्त्वाचे माध्यम कोणते हे कुणी विचारल्यास आपण न अडखळता उत्तर देणार 'इंग्रजी'! spoken english किंवा 'फाडफाड' इंग्रजीचे पानपट्टीसारखे 'दुकानावळ' चालवणारे नगण्य उत्साही बंधुभगिनींचे अखंड प्रयास पाहता यात काहीही शंका शेष राहिलेली...
  June 2, 06:34 PM
 • सरकारी अधिकारी, सरकारी कार्यालय आणि सरकारी काम ही बहुतेक वेळा सामान्य माणसाच्या मनस्तापाचे निमित्त ठरणारी कारणे आहेत. सरकारी ऑफिसची पायरी चढणे म्हणजे दैवाने माथी मारलेलं संकट, अशी साधी-सरळ मानसिकता एका बाजूला या व्यवस्थेच्या वाट्याला येते. तर दुसरीकडे सरकारी अधिकारी, सरकारी नोकरी याविषयीचे आकर्षण, मान, प्रतिष्ठा आजही तितकीच अबाधित आहे. हे विचित्र सत्य आहे. आयएएस/आयपीएस/आयएफएस अशा पदांसाठीच्या परीक्षेचे आकर्षण प्रचंड असले तरी या परीक्षा प्रक्रियेविषयी भीती व गैर समज फार रुजलेले आहेत....
  June 2, 06:14 PM
 • आज स्पर्धा परीक्षांमध्ये न दिसणारा मराठी टक्का आता हळूहळू वाढतोय. नुकत्याच लागलेल्या युपीएससीच्या निकालातून ठळकपणे हेच जाणवतं. एवढ्या मोठ्या संख्येने महाराष्ट्राचे विद्यार्थी उत्तीर्ण होणे, हा विक्रमच आहे. हा निकाल बारकाईनं न्याहाळल्यास काही गोष्टी अगदी ठळकपणे जाणवतात. पहिली म्हणजे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. यावेळी मराठवाडा आणि विदर्भाने पश्चिम महाराष्ट्राकडून हा मान खेचून घेतला आहे. नागपूरचा कार्तिक अय्यर राज्यातून पहिला, नांदेडचा राहुल...
  June 2, 05:45 PM
 • आठवी नववीत असताना माझ्या वडिलांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची कल्पना दिली. ही परीक्षा खूप अवघड असते, ती तू पास कर असा सल्ला त्यांनी दिला. त्या वेळेपासून माझे ध्येय निश्चित झाले. एक आव्हान म्हणून ते स्वीकारले. पण ती वेळ या परीक्षेसाठी काही करण्याची नव्हती. प्रारंभी इतरांप्रमाणे मीसुद्धा माझ्या शिक्षणाकडेच लक्ष दिले. १९९९ मध्ये मी पीपल्स हायस्कूल नांदेड येथून दहावीची परीक्षा दिली. या परीक्षेत ९१ टक्के गुण घेऊन मी उत्तीर्ण झालो. २००१ मध्ये मी सायन्स कॉलेजमधून बारावीची परीक्षा...
  June 2, 05:31 PM
 • वेगळया वाटेवर निघा भावी इंजिनिअर्स अगदी ऐटीत आयटी निवडताहेत आणि 'सिव्हिल इंजिनिअरिंग'सारख्या एकेकाळी वैभवात लोळणाऱ्या करिअरला वाळवी लागलीय. करिअरविषयी माहितीचा प्रचंड मारा होत असल्याने खोऱ्याने दिसत असलेल्या संधींच्या महाजालात विद्यार्थी अडकत जातात आणि 'रॅट रेस'मध्ये धावत राहतात. अखेर त्यांच्या लक्षात येते की आपण 'रॅट रेस'मध्ये 'रॅट'च राहिलो. रेस तर भलताच कोणीतरी जिंकून गेला. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो.रॅट रेसमध्ये अडकू नकाकोणत्याही क्षेत्रात एखाद्याने देदीप्यमान शिखर गाठलेले...
  June 2, 04:48 PM
 • मनुष्यजातीचे एकमेव ध्येय असते ते ज्ञान संपादनाचे. 'ज्ञान' हे या चराचर सृष्टीत सामावलेले असते. ते बाहेर कुठे निर्माण होत नाही की कुठून येत नाही. त्यामुळे ज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला झटावे लागते, कष्ट करावे लागतात. ज्ञान कोणीही शिकवत नाही ते आपणहून शिकावे लागते. आपला आत्मा हाच हा आपला खरा शिक्षक असतो. आपण म्हणतो की, 'ही व्यक्ती ज्ञानी आहे'. याचा अर्थ त्या व्यक्तीला स्वत:च्या अंतरंगात दडलेल्या प्रतिभेचा उलगडा झालेला असतो. ही प्रतिभा मग तो समाजाला अर्पण करतो. अशा समर्पित भावनेमुळे...
  June 2, 04:32 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात