जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • थंडीचा महिना आटोक्यात आलेला असतो. अशात फेब्रुवारी महिना उजाडताच सर्वांना हुरड्याची आठवण होते. त्यासाठी शहरातील लोक सुट्टी काढून याचा प्लॅन करतात. हुरडा. कोवळा लुसलुशीत, गुळभेंडीचा, कुचकूचीचा. आपल्या अंगभूत वैशिष्ट्यानं खवय्यांची हौस भागवणारा. नातेसंबंधांचे आणि मैत्रीचे धागे अधिक दृढ करणारा. हा हुरडा म्हणजे महाराष्ट्राच्या कृषी जीवनातलं एक सांस्कृतिक संचितच आहे. हुरडा हा शब्द ऐकून नवल वाटलं का? शहरी मंडळींसाठी हा शब्द नवलाचाच आहे. थंडीचा महिना आटोक्यात आल्यानंतर व फेब्रुवारी...
  February 12, 11:28 AM
 • नाट्यगृहासारख्या सामाजिक जागी इतरांसोबत बसलेले असतांना लैंगिकता वा तत्सम गोष्टीवरील विनोदाला हसणे म्हणजे गुन्हा किंवा शरमेची बाब आहे, असे जर अजूनही मुलींना वाटते आहे तर सत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा होऊनसुद्धा व्यक्तिस्वातंत्र्याच्या बेड्या खोलल्या गेलेल्या नाहीत, हे स्पष्ट होते. मागच्या प्रयोगाला प्रेक्षकांमध्ये असलेल्या मुली हसतच नव्हत्या, या लेखक प्रतीक पुरी यांच्या प्रतिसादाने मला अंतर्मुख केलं. पुणे नाट्यसत्ताकमध्ये वाफाळलेले दिवस या नाटकाच्या प्रयोगावेळी...
  February 12, 11:23 AM
 • गजर वाजल्यावर पुन्हा बंद करून झोपण्याच्या आनंदापेक्षा गजर ऐकूही न यावा अशी गाढ झोप लागली तर परमानंद! वा! सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा पाहिलं तर साडेनऊ केव्हाच वाजून गेले होते. सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस, कामाचा महत्त्वाचा दिवस. तरीही सगळं बाजूला ठेवून आज मनाने मनासारखं जगायचं ठरवलं. कोणत्याही तणावाशिवाय झालेली सकाळ किती सुंदर असते हे तेव्हा मला अनुभवायला मिळालं. सकाळी छान आवरून मस्त गरम चहाचा कप, आवडती खिडकी आणि अगदी नदीतल्या पाण्यासारखी शांत मी. आणि मग त्या पाण्यावर कुणी तरी दगड...
  February 12, 11:18 AM
 • भाजीत मीठ जास्त पडलं म्हणून सुनेला माहेरी पाठवून दिलं. आता तुम्ही म्हणाल, आता हे काय कारण झालं? असं कुठे घडत असतं का? वाचकहो, हे असं घडलंय. तेसुद्धा २०१६ सालात. या अशा अवघड प्रसंगातून हिमतीनं वाट काढून आपल्या मुलीला सन्मानानं न्याय मिळवून देणाऱ्या आईबद्दलचा लेखिकेनं घेतलेला अनुभव. जालना जिल्ह्यातील एका गावात महिलांची बैठक आयोजित केली होती. महिलांसोबत चर्चा करून पुढे काय करायचे यावर आम्ही सगळ्या बोलत होतो. तोच काही जणींची आपापसातली कुजबुज कानावर पडली. नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी...
  February 12, 11:17 AM
 • बाळाला जन्म दिल्यानंतर बाईनं अमुक एक करू नये किंवा अमुक एक करावं याबाबत अनेक समजुती आहेत. त्यात काही तथ्य आहे का? मला नाही, तुम्ही आईला सांगा डॉक्टर! (आई कसली वैरीण आहे माझी वैरीण.) कंसातलं वाक्यं मनातल्या मनात बोललेलं असतं. पण माझ्या सरावल्या कानांना स्पष्ट ऐकू येतं. माझ्या सगळ्या सूचना ऐकून घेऊन समोरची नवप्रसवा विनवत असते, डॉक्टर, आईला सांगा प्लीज. तिच्या विनंतीला मान देऊन मी सांगतोसुद्धा. पण हे आई प्रकरण मॅनेज करणे अवघडच. कितीही सांगा, समजवा, शास्त्रीय माहिती द्या, या आपल्या हेका...
  February 12, 11:14 AM
 • उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना नुकत्याच उघडकीस आल्या. घरगुती अथवा सार्वजनिक ठिकाणी हिंसाचाराविरोधात जागोजागी मुली/महिला आवाज उठवू लागल्यात. पण कायदेशीर पातळीवर, राजकीय दबावाशी लढताना समाज म्हणवल्या जाणाऱ्या यंत्रणेकडून त्यांना भक्कम पाठिंब्याची गरज आहे. वडिलांचा मृत्यू आणि भोळसर आई बेपत्ता झाल्याने अनाथ झालेली पोर. आजीने एका निवासी शाळेत शिकायला ठेवले. तिसरी-चौथीतली पोर उन्हाळ्याच्या सुटीत मावशीच्या गावाला जाते. मावशीचा नवरा...
  February 12, 11:08 AM
 • व्हॅलेंटाइन डे जवळ आलाय आणि तरीही बाजारपेठा गुलाबी किंवा लाल रंगलेल्या दिसत नाहीयेत. टीव्हीवर वगैरे जाहिरातींचा थोडाफार मारा आहे फक्त. याचा एक अर्थ असा असू शकतो की, तरुणवर्ग या प्रकारच्या सेलिब्रेशनला कंटाळलाय. त्यांना फुगे, फुलं, चॉकलेटं, टेडी बेअर वगैरे जुनं वाटतंय. हे सेलिब्रेशन हा कंपन्यांच्या मार्केटिंगचं फलित होतं, हे या वर्गाला कळलं असेलच असं मात्र नाही. आता हातात मोबाइल असतो. व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट, यांसारखी अत्यंत खाजगी संवादाची माध्यमं दिमतीला हजर असतात. त्यामुळे प्रेमाचा...
  February 12, 11:01 AM
 • अतूट स्नेहानं बांधलेली दोन मनं कितीही दूर असली तरी एकमेकांच्या जवळच असतात. प्रत्यक्ष कडकडून भेटण्याचा आनंद त्यांच्या नशिबी क्वचित येतो. आणि म्हणूनच पत्रांमधून होणारी शब्दभेट आणि त्यातून जागवल्या जाणाऱ्या आठवणी यांचं मोल अशा नात्यांमध्ये काही औरच असतं. आजच्या पत्रात बालपणीच्या फुलपंखी दिवसांतल्या स्नेहसंमेलनाच्या जागवलेल्या आठवणींची उजळणी... प्रिय अव्वा, तुझं पत्र आलं त्या दिवशी मी घरीच होते, याचा मला सर्वाधिक आनंद झाला. पत्र आलं तेव्हा तासभर तरी मी ते पाकीट उलटसुलट करून नुसतीच...
  February 12, 10:55 AM
 • राजस्थानातल्या अलवर जिल्ह्यातल्या ठाणागाजी या छोट्याशा गावी नुकतंच जल जन जोडो शिबिर पार पडलं. धावत्या पाण्याला चालायला, चालत्या पाण्याला थांबायला आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीमधे मुरवावं कसं याचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं हा या शिबिराचा मुख्य उद्देश. या शिबिरात सहभागी झालेल्या एका वाचकाचा हा अनुभव. जेंद्रसिंह राणा. त्यांना मिळालेल्या पारितोषिकांची, सन्मानपत्रांची यादी व जीवनकार्य सांगत बसलो तर एक स्वतंत्र पुस्तकच लिहावे लागेल. या वर्षात आपण सर्वांनी हे नाव खूपदा ऐकलं आहे....
  February 5, 11:39 AM
 • पत्रकारितेच्या पेशाचं अनेकांना खूप अप्रूप असतं. विशेषत: सामान्य माणूस ज्याला या क्षेत्रातल्या कामकाजाच्या पद्धतीची, या क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या किमान अभ्यासाची माहिती नसते. खरंतर हे क्षेत्रं म्हणजे कडू-गोड अनुभवांचा खजिना. असेच काही अनुभव सदराच्या आजच्या भागात. पत्रकार असण्याचे अनेक फायदे असतात. त्यात सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अनेक क्षेत्रातल्या दिग्गज माणसांना ओळखदेख नसताना तुम्हाला सहज जवळून भेटता येतं. कोणी फॅन, भक्त, पाठीराखे त्यांना भेटत असतात. पण त्यांच्या नात्यात फरक...
  February 5, 11:22 AM
 • आपल्यावर सध्या सोशल मीडियाचा प्रभाव फार आहे. परंतु ज्याने आपल्याला सोशल मीडियाचं वेड लावलं तो फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग रोजचा वेळ वाचावा म्हणून एकाच रंगाचे कपडे घालतो. केवढी ही विसंगती! लिओनार्डो दा विंचीने म्हटलंय की, simplicity is the ultimate sophistication. हे केवळ तत्त्वज्ञान नसून आर्थिकदृष्ट्या आणि त्यामुळेच शाश्वत विकासासाठीसुद्धा जास्त व्यावहारिक आहे. आपण यातून काही शिकणार आहोत का? र्वसाधारणपणे विकास अर्थव्यवस्थेनुसार ठरवला जातो. सकल उत्पादन (GDP) हा त्यातला एक घटक. तो जितका जास्त तितका विकास...
  February 5, 11:17 AM
 • जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचा दुसरा दिवस. मीडिया गॅलरीत बसून बातमी लिहीत असताना टेबलावर सॅक धप्पकन टाकून शेजारच्या खुर्चीवर एक मुलगी येऊन बसली आणि ईश्वर! असं म्हणून तिने एक सुस्कारा सोडला. क्यों ईश्वर को याद कर रही हो? असं विचारल्यावर म्हणाली, अब इतनी भागदौड करने के बाद बैठने मिला है, तो ईश्वर को ही याद करूँगी ना? कौन से पेपर के लिए लिख रही हो? मैं ब्लाॅगर हँू. फेस्टिवल के ब्लाॅग लिखती हँू. फेस्टिव्हलमध्ये होणाऱ्या सत्रांविषयी ब्लाॅग लिहिण्यासाठी स्पर्धा घेऊन सहा जणांना ब्लाॅगर म्हणून...
  February 5, 11:12 AM
 • गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश दिव्य मराठीच्या टीमने केला. औरंगाबादेतील सूरज राणा नावाचा एक डॉक्टर आता गजाआड आहे. गर्भलिंगनिदान आणि स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्यांचे मोठे रॅकेटच यातून उद्ध्वस्त झाले. एकविसाव्या शतकातही महिलेला गर्भात मारणारी मानसिकता आजही जिवंत आहे. स्टिंग ऑपरेशन फत्ते करणाऱ्या दिव्य मराठीच्या टीममधील सहकारी सांगताहेत त्यांचा अनुभव आणि विचार कोलाहल! दुपारी दोन वाजता मी ऑफिसात पोहोचते आणि फोन खणखणतो. फोनवर एक महिला असते. ती म्हणते, हॅलो मॅडम, तुम्ही काल...
  January 29, 07:15 AM
 • पाच रुपयके तीन क्याडबर्या लगिंगे. येक तेरेकनेशे, एक रौफ्याकनेशे न् एक अर्श्याकनेशे. चलते क्या? तो बोलो. नैतो इ चल्या मइ एकलाच खेलने, शैद्या भलताच फॉर्मात आला. हाईटपेक्षा फॉर्म दुप्पट. नै हो नै हो करत डील बारा बारा गट्ट्यांवर सेट झाली. हंटरसहित. गोट्यांचा डाव पडला होता. हिरवे निळे लाल नारंगी पिवळे अंजिरी तपकिरी गोल काची गोळे रिंगणात चमचमत होते. चिल्लर गँग लांब आखलेल्या रेषेपाशी ओळीने आडवी उभारून रिंगणाच्या एकदम जवळ कसे कचता येईल या बेतात होती. एवढ्यात चिंगळा शैद्या डावात झेप मारून जितक्या...
  January 29, 12:38 AM
 • गेल्या तीन दशकांहून जास्त काळ साहित्य क्षेत्रात ग्रंथालय सेवक, मुद्रितशोधक, पुस्तक विक्रेता, वृत्तपत्र प्रतिनिधी संपादक, प्रकाशक अशा विविध जबाबदाऱ्या निभावणाऱ्या तसंच या क्षेत्राशी प्रदीर्घ व सखोल परिचय असणाऱ्या सुनील कर्णिक यांच्या, न छापण्याजोग्या गोष्टी आणि म्हाताऱ्या बायका काय कामाच्या! या दोन पुस्तकांबद्दल आज... अलीकडेच सुनील कर्णिक यांची दोन पुस्तकं वाचण्याचा योग आला. न छापण्याजोग्या गोष्टी या शीर्षकामुळे त्यातील मजकुराविषयी माझं कुतूहल जागं झालं. दुसऱ्या पुस्तकाच्या...
  January 29, 12:37 AM
 • हल्ली मोबाइल आणि इंटरनेटचा वापर जीवनावश्यक सर्व कामासाठी होताना दिसतो. जीवनाचा जोडीदारही इंटरनेटवर शोधता येतो. या साइटच्या जाहिराती आपण पाहतो तेव्हा फार छान वाटतात, मात्र वास्तव काही वेळा त्यापेक्षा वेगळेही असू शकते. प्रीती वय वर्ष २१. दिसायला सुंदर. नुकतेच कॉलेज पूर्ण झालेले. घरी लग्नाची बोलणी सुरू होती. प्रीतीच्या घरचे स्वतंत्र विचाराचे होते. तिला स्वत: जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य होते. घरी इंटरनेटवर सोशल नेटवर्किंग साइटवर मित्रमैत्रिणीशी चॅटिंग हा तिच्या जीवनाचा भाग होता....
  January 29, 12:33 AM
 • माता-पालकांशी संवाद, अलार्म ऑन टीव्ही ऑफ, विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल फील्ड ट्रिप, वैज्ञानिक घटनांचे-संकल्पनांचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन,क्यूआर कोडेड नोटबुक्स अशा नानाविध उपक्रमशिल प्रयोगातून माढा तालुक्यातल्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतलं शिक्षण आनंददायी आणि ज्ञानदायी बनवणाऱ्या रणजितसिंह डिसले सरांना भेटूयात यावेळच्या बदलाचे वारे सदरात. साल २०१६ - एका जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी स्काइपच्या माध्यमातून चक्क पेंग्विन्सना भेटतायत. दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनमधल्या...
  January 29, 12:24 AM
 • बरोबर असलेले चार लोक आपापल्या मोबाइलमध्ये डोकं घातलेले आणि या प्रकाराने किंचित वैतागलेल्या आशा भोसले बाजूला हे छायाचित्र गेल्या काही दिवसांत फार गाजतंय. त्या निमित्ताने... वकडच्या चौकातल्या, पारावरच्या, देवळाच्या कट्ट्यावरच्या बैठकीला काही खास विषय असा लागत नाही. पूर्वी मोबाइल नव्हते, मग मोबाइल नसल्यावरच तोंड चालू होतं हे आपल्याला ठाऊक आहे. आता संवाद म्हणजे कसा असायला पाहिजे याचं हुबेहूब उदाहरण तुम्हाला गावच्या म्हाताऱ्या बैठकीत पाहायला मिळेल. लगेच त्यासाठी प्रभावी संवादाचे १०...
  January 29, 12:17 AM
 • ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा नुकतीच संपली. अमेरिकी टेनिसपटू सेरेना विल्यम्स उपांत्य फेरीही गाठू शकली नाही, याचं तिच्या चाहत्यांना फार वाईट वाटलं. सेरेनाने त्याआधीचे सर्व सामने उत्तम खेळून जिंकले होते. ती योग्य फॉर्ममध्ये होती. उपउपांत्य फेरीच्या सामन्यात तिचा पाय मुरगळला आणि त्यानंतर तिचा खेळ घसरत गेला. या पराभवानंतरही ती पाय मुरगळल्यामुळे हरले असं मानत नाही. माझी स्पर्धक उत्कृष्ट खेळत होती, माझ्या काही चुकाही झाल्या. पायाच्या दुखापतीचा संबंध नाही, असं ती म्हणाली. प्रेक्षकांना...
  January 29, 12:10 AM
 • कानात इअरफोन्स आणि हातातल्या मोबाइलमध्ये घुसलेली नजर हे दृश्य डेटा स्वस्त झाल्यापासून सर्वदूर दिसू लागलेलं. यातले बरेच जण वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून मालिका पाहणारे असतात. या हिंदी, मराठी मालिकांची बरीच चर्चा होते. अशा इंग्रजी मालिकांविषयीची ही लेखमाला. चांगलं काही पाहायची भूक असलेल्या वाचकप्रेक्षकांसाठी खास. महिन्यातून एकदा एका नवीन मालिकेची ओळख करून देणारी. इंटरनेटवर मनोरंजन ही संकल्पना कॉन्सेप्ट सुरू झाला आणि उत्तमोत्तम सिरीजची दारं प्रेक्षकांसाठी उघडली गेली....
  January 29, 12:05 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात