Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • तुम्ही फेसबुक वा ट्विटरवर असाल तर #metoo असं लिहिलेल्या काही पोस्ट वाचल्या असतील. काय आहे हा हॅशटॅग आणि काय सांगायचंय तो वापरून काही लिहिणाऱ्यांना? #metoo ही मोहीम अलिसा मिलानो या अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी सुरू केली ती हाॅलीवूडमधील प्रतिष्ठित व यशस्वी निर्माता हार्वे वाइनस्टाइन याच्यावर अनेक महिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केल्यानंतर. Me too, म्हणजे मीही. मीही अशा अत्याचाराची शिकार झाले आहे, असं महिलांनी जाहीररीत्या सांगण्यासाठी पुढे यावं, म्हणून ही मोहीम. गेल्या आठदहा दिवसांत...
  12:52 AM
 • भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख. मोठेपणी पंडिता होईल अशी मुलगी जन्माला यावी म्हणून धार्मिक विधी केले जात असल्याचा उल्लेख बृहदारण्य उपनिषदात आहे. (४.१८). स्मृतिकाळात ही परिस्थिती बदलली. तिला वस्तू म्हटलं जाणं सुरू होण्याइतकं गौण स्थान आलं. कन्या, तिचं कौमार्य आणि तिचा विवाह या...
  12:48 AM
 • आज खास मधुरिमाच्या पुरुष वाचकमित्रांशी संवाद. सांगा बरं, या परिस्थितीत तुम्ही काय करता ते. - बायको आॅफिसातनं घरी आल्यावर सांगते की, तिचा एक सहकारी तिला त्रास देतो. उगीच जवळ यायचा प्रयत्न करतो, ती जवळपास असेल तेव्हा गाणी गुणगुणतो, वगैरे. - मुलगी सांगते की, ट्यूशनचे सर तिच्या अवतीभोवती करतात, काही ना काही कारण काढून जवळ बोलावतात. - बहीण सांगते की, बसमध्ये कंडक्टर वाईट वागतो, गर्दीचा फायदा घेऊन हात लावतो. - आॅफिसातली सहकारी सांगते की, बाॅस मला कामाशिवाय केबिनमध्ये बोलावतो. - तुम्ही मित्रमित्र...
  12:45 AM
 • लहान मुलांनी किती तास झोपायला हवं? मोठ्यांसाठी झोपेचं टाइमटेबल किती महत्त्वाचं आहे? अपुरी झोप आणि जास्त झोप, दोन्ही चुकीचं. काय आहे या झोपेचं नेमकं गणित? आयुष्याचा बराच भाग डॉक्टरकी केलेले हे गृहस्थ मला त्यांच्या मेडिकल कॉलेजमधल्या आठवणी सांगत होते. कोणी झोपलेला असला की त्याला उठवायचं नाही, असा अलिखित नियम होता आमच्याकडे. कोण कुठली शिफ्ट करून आलं असेल, कशी केस करून दमलं असेल काही सांगता येत नाही. आणि तातडीच्या सेवेला त्या व्यक्तीला (डॉक्टरला) उठवावं लागतंच. पण इतर कुठल्याही कारणास्तव...
  12:42 AM
 • पुस्तकांच्या निर्मितीमागे प्रसिद्ध कवी गोविंद पाटील यांची मोठी भूमिका आहे. शिक्षक आणि विद्यार्थी मिळून अशा बोलक्या कथा निर्मित असतील तर मराठी साहित्यात एका सुंदर अन परिणामकारक साहित्यप्रकाराला महत्त्वाचं स्थान प्राप्त होईल. बालसाहित्यातून नवीन काही उपजत आहे. उगवत आहे, नवे प्रयोग समजून घेऊन त्यात दुरुस्त्या करत साहित्याची ही शाखा जोपासली गेली पाहिजे. एखाद्या व्यक्तीला लेखन करण्याची इच्छा का होत असेल? का त्याला वाटत असेल की, आपल्या मनात जे विचार, कल्पना आहेत त्यांना मोकळी वाट...
  12:39 AM
 • अमोल पालेकर, विद्या सिन्हा आणि दिनेश ठाकूर यांच्या साध्या पण सहजसुंदर अभिनयानं नटलेली कलाकृती म्हणजे रजनीगंधा. अमोल पालेकर आणि विद्या सिन्हाचा हा पहिलाच चित्रपट. १९७४ सालच्या या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवला होता. चित्रपटातल्या कई बार यूं ही देखा है या गाण्यासाठी मुकेश यांना सर्वोत्कृष्ट गायक म्हणून गौरवण्यात आलं होतं. हृदयाचा आवाज ऐकणे सोपे आहे का? दुसऱ्यांचा तर सोडाच; स्वतःचा तरी आवाज ऐकू येतो का? बाहेरील कोलाहलात आपण इतके गुंगून गेलेलो असतो की,...
  12:39 AM
 • मोठमोठ्या पदव्या, चार-पाच आकडी पगार, भौतिक सुखं, शिक्षणानं मिळवता येतात.याशिवाय आदर, मान-सन्मान मिळण्यासाठी आवश्यक असते ते चरित्र. आज याच जीवनकौशल्याबद्दल.... रियाची आई फोनवर सांगत होती की, मॅडम गेल्या काही दिवसांपासून रियाच्या वागण्याबोलण्यात फार बदल झालाय. सारखी आरशासमोर असते. तिचं नटणं-मुरडणं वाढलंय. तिचं लक्ष पिक्चरमधल्या हीरो-हीरोइन्सच्या कपडे, केस, ज्वेलरी प्रमाणे आपल्याला सगळं मिळालं पाहिजे असा हट्ट असतो. आता आठवीत गेली आहे. अभ्यासात लक्ष द्यायचं सोडून या अशा गोष्टीत गुंतते आहे....
  12:31 AM
 • लहान मुलं घरातल्या लोकांचं, मग हळुहळू बाहेरच्या लोकांचं अनुकरण करतात. बऱ्याचदा आपल्याला माहीतही नसलेले आपलेच बारकावे ही मुलं अचूक टिपतात. आता आमच्या गंपूचंच घ्या. जशीच्या तशी आमची नक्कल करायला लागलाय. कालचीच गोष्ट. दुपारी त्याचं जेवण झाल्यावर मी माझं ताट वाढून घेतलं. पोटात भर पडली की, तो त्याचा एकटाच खेळतो. मग तहान लागली, शू आली तरच त्याला मी हवी असते. खेळता खेळता तो देवाच्या खोलीत गेला. तशी मीही माझं ताट घेऊन देवाच्या खोलीत पटकन डोकावता येईल असा आडोसा शोधून बसले. देव्हाऱ्यात निरांजन...
  12:28 AM
 • ना. धों. महानोरांनी जैत रे जैत चित्रपटापासून चित्रपटगीतं लिहायला सुरुवात केली. सर्जा, दोघी, मुक्ता, अबोली, उरूस, एक होता विदूषक, अजिंठा, अशा विविध मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिली. चित्रपटबाह्य गाणीही लिहिली. महानोरांचा हा कवितेतून गाण्याकडे झालेला प्रवास म्हणजेच कवितेतून गाण्याकडे हे पुस्तक... चित्रपटांसाठी गीते लिहिणारे मुळात प्रतिभावंत कवी असतात. त्यामुळेच त्यांना चित्रपटातील कथानकासाठी अनुकूल अशी उत्तमोत्तम गाणी लिहिता येतात. ग. दि. माडगूळकर, जगदीश खेबूडकर, सुधीर मोघे हे...
  12:24 AM
 • अहो, डबा घेतला का? नाही तर घरी विसरून जाल. अरे राजू, डबा ठेव लवकर दप्तरात, शाळेला उशीर होईल. कॉलेजकुमार, तुमचा डबा तयार आहे. अशी वाक्यं नित्यनियमाने आपल्या कानावर पडत असतीलच. डबा, मग तो ऑफिसचा असो वा शाळेचा, प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय. घरातील अनेक वस्तूंची साठवण करून ठेवण्यात डब्याची महत्त्वपूर्ण भूमिका. घरातील डबे म्हणजे स्त्रीवर्गाच्या प्रतिष्ठेचा विषय. जुन्या काळापासून संसारात मानाचे स्थान असणाऱ्या या डब्यांना आधुनिक युगातही तितकेच महत्त्व आहे. डब्यांचे स्वरूप, जडणघडण बदलली...
  12:19 AM
 • शंतनू अभ्यंकर हा मधुरिमाचा अफलातून शोध आहे (याआधी त्यांचे काही वाचनात आले नव्हते याअर्थी.) त्यांची शैली खेळकर, प्रसन्न आहेच. तरी विषयाचे गांभीर्य ती अजिबात सोडत नाही, जोडीला बहुश्रुतता आहेच. असो. त्यांचे पुरुष नसबंदीसंबंधातले दोन्ही लेख मस्त. एकेकाळच्या आततायी अंमलबजावणीमुळे वादग्रस्तठरलेला पण कुटुंबनियोजनाच्या दृष्टिकोनातून परिणामकारक, म्हणून महत्त्वाचा असलेला हा विषय पुन्हा चर्चेच्या पृष्ठभागावर येतोय हे चांगलेच. इथले आमचे स्त्रीरोगतज्ज्ञ असलेले एक मित्र, हा विषय त्यांच्याही...
  12:17 AM
 • स्वयंपाकघरातील दिनचर्येविषयी मी जो विचार केला आहे तो तुझ्यापुढे मांडते. सकाळी मी तुझा आणि समीरचा डबा तयार करणार. नाश्त्याची जबाबदारी तू घे. सर्वजण मिळून चहा-नाश्ता करत जाऊ. नंतर ते घेऊन तू ऑफिसला जात जा. सकाळचा स्वयंपाक मी करणार, रात्रीचा तू करत जा. आणि हो, संध्याकाळी तू आल्यावर मी चहा करणार. त्या वेळी दिवसभरात काय घडलं ते आपण एकमेकींना सांगत जाऊ. सहा वाजता गजर झाला. केतकी बिछान्यावर उठून बसली. दोन्ही हात जोडून कराग्रे वसते लक्ष्मी म्हणाली, आरशासमोर आली आणि स्वत:च्या प्रतिबिंबाशी हसून...
  October 17, 03:00 AM
 • ग्रामीण भागांमध्ये मुलींना मैदानी खेळ खेळायला फारसं उत्तेजन नसण्याच्या काळात, गावात होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत संघात एक खेळाडू कमी पडतो म्हणून कोचनी केलेली युक्ती म्हटलं तर संघाच्या अंगलट येते, म्हटलं तर एका व्यक्तीच्या आयुष्यात आनंदाचे क्षणही आणते, याचं वर्णन करणारी काही वर्षांपूर्वी घडलेली ही सत्यकथा. राजेश आज वेगळ्याच मूडमध्ये घरी परतला. घरासमोरच्या लिंबाच्या झाडाला खेटून बसला. बीडहून लवकर आलेला. हातात दोन दिवसांपूर्वीचं सायंदैनिक होतं. थोडंफार वाचून झाल्यावर त्याची नजर एका...
  October 17, 03:00 AM
 • एकीकडे आमच्या पोरांचं हे लाडकं बालपण तर दुसरीकडे तो मुलगा. कुटुंबाची जबाबदारी किती सहजपणे घेतलीय त्याने. पावसाळ्यापूर्वी बयतन जमा करायला निघालाय. हे काम खरं तर मोठ्या माणसांचं आणि संपूर्ण एका दिवसाचं होतं. हा चिमुरडा हे कसं काय करणार होता कुणास ठाऊक. मला मोठाच प्रश्न होता. पण माझ्याकडे काहीएक करण्याजोगं नव्हतं. हातात चहाचा कप घेऊन खिडकीत बसून पाणी पिणाऱ्या कोकिळेला न्याहाळत बसणं हा माझा रोजचा आवडता उपक्रम. आज मी तशीच बसले होते. नेहमीच्या पक्ष्यांच्या आवाजाऐवजी आज झाड तोडण्याचा आवाज...
  October 17, 03:00 AM
 • पाेरांनाे, मला कळतं रं की तुम्हाले साळंत घालावं. पण कसं? त्याला कापडं लागतेत. पुस्तक, दफ्तर, माेप पैका लागताे. मी कुठून अाणू? पाेरांच्या शिक्षणासाठी अाईचा जीव कासावीस हाेताेय हे काशीला उमगलं तसं ती बाेलली, माय तू रडू नगं. अागं गावाकडं मी शाळेत गेलेच की, काय बी नसतं तिथं, तू नगाे रडू. तवा शाळेत जायची तर तू नव्हतीस, अाता मला तू पाहिजे तर शाळा न्हाई अासं कसं. शाळेत तसं काय बी नसतं, असं समजावत काशीनं अाईचे डाेळे पुसले. शाळेची घंटा वाजली अन् पहिलीच्या वर्गातल्या काशीने धावतच घराकडे अश्शी काही धूम...
  October 17, 03:00 AM
 • पॅडी, तुझ्या हातून न सांगण्याचा गुन्हा घडलाय पण तो चांगल्या गोष्टीसाठी म्हणून तुला माफ करते. काय? आता रविवारी तू बबनला वाढदिवसाला बोलवायचं बरं का. मला पाहायचाय हा तुझा मित्र कोणेय तो! आईचं हे बोलणं ऐकून तो तिच्या कुशीत शिरला आणि म्हणाला, थँक यू, मम्मी. शाळा सुटताच पॅडी वर्गातल्या बबनला सोबत घेऊनच बाहेर आला. सारी मुलं जाताच तो त्याला म्हणाला, बबन, चल बरं दुकानात. दुकानात? कशाला? बबननं गोंधळून विचारलं. आता माझा वाढदिवस आहे ना रविवारी. मला गणवेष घ्यायचाय तुला त्या निमित्तानं. पॅडी त्याच्याकडं...
  October 17, 03:00 AM
 • मागच्या दीपावली विशेषांकातील कथांना तुमचा छान प्रतिसाद मिळाल्याने आम्हाला आणि लेखकांना प्रोत्साहन मिळालंय. यातले बरेच लेखक प्रस्थापित नाहीत, लेखनाची सुरुवात करत आहेत. त्यांच्यासाठी असा प्रतिसाद अगदी महत्त्वाचा आणि आवश्यक. आजच्या अंकात आणखी काही कथा देत आहोत, या कथा मानवी नातेसंबंधांवर टिप्पणी करणाऱ्या आहेत, आपल्यातल्या कमतरतांवर हलकेच बोट ठेवणाऱ्या आहेत, पण काहीतरी चांगलं सुचवणाऱ्याही आहेत. त्याही तुम्हाला आवडतील, याची खात्री वाटतेय. पुढच्या चार दिवसांत मस्त फराळावर ताव मारा...
  October 17, 03:00 AM
 • सकाळची सगळी कामं आवरून झाली होती. म्हणजे मुलं शाळेत आणि अहो आॅफिसात गेले होते. कामवाल्या मावशी पण काम आवरून गेल्या होत्या. टीव्हीवरच्या आवडत्या मालिका पाहून झाल्या होत्या. एका जासूसी पुस्तकाची काही पानं वाचून झाली होती. मग वर्तमानपत्र वाचायला घेतलं. त्यात एक बातमी होती, सुधारगृहातून पळून गेलेल्या मुलांची. अशाच प्रकारची आणखी एक बातमी होती, मजा म्हणून शाळेत न जाता पळून गेलेल्या मुलांची. कंटाळून शेवटी मी वर्तमानपत्र बंद केलं. आणि मोबाइल हाती घेतला. त्यातही दोनतीन ग्रुपवर पळून गेलेल्या...
  October 17, 03:00 AM
 • आज तुमच्यापुरती खिचडी करून घेता का जरा, आता सवय करायला हवी तुम्हांला, की फलाहारावरच भागवता, पोट बिघडलंय नं तुमचं, की लंघनच करता? बरं असतं तब्बेतीला, मला तर बाई अजिबाऽऽत भूक नाही. अगं, फलाहार काय, लंघन काय? प्ली ज, मला जरा बॅग भरायचीय, मी निघाऽऽले, परदेशी. अहो, हे पाह्यलंत का, सुधाताईंनी पेपर सतीशरावांसमोर धरून उत्साहानं म्हटलं. हुं. सतीशरावांची थंड प्रतिक्रिया. अहो... क्काय? ते शब्दकोडं सोडवत होते. किती मोठ्ठी जाहिरात आलीय ह्या प्रवास कंपनीची. हं. ते शब्दकोडं ठेवा बाजूला, नाहीतर मी जातेच कशी,...
  October 17, 03:00 AM
 • अचानक वामनरावांच्या बंगल्यात एक वीस-पंचवीस वर्षांची तरुणी दिसू लागली. ती दिसायला सुंदर होती. तिची देहयष्टी भरदार होती. तिच्या अंगी चपळपणा होता. तिच्या हालचाली तारुण्यसुलभ होत्या. ती कधीकधी काही खरेदी करण्यासाठी बाहेर पडायची. कधी ती झाडावेलींना पाणी देताना दिसायची. त्या तरुणीला पािहल्यानंतर कॉलनीतल्या तरुण मुलांच्या चकरा वामनरावांच्या बंगल्यावरून सुरू झाल्या. सरस्वती कॉलनीत एकूण चाळीस बंगले होते. सर्वच बंगले सुंदर होते. मोठा प्लॉट, त्यात मध्यभागी इमारत आणि सभोवती मोकळी जागा. या...
  October 10, 12:06 AM
 
जाहिरात

RECOMMENDED