Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • थोडा विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला एखादे लग्न किंवा मुंज आठवणीत राहते ती जेवणामुळे. अमक्याच्या लग्नातले भरीत-भाकरी वा तमक्याच्या मुंजीतले आम्रखंड काय भारी होते, अशी वाक्ये घरोघरी सतत ऐकू येत असतात. या आठवणींचे श्रेय जाते केटररला. जाणून घेऊया केटररकडून यंदाचे ट्रेंड्स कोणते आहेत ते. लाइव्ह टेबलला मागणीहल्ली ब-यापैकी खर्च करून लग्न थाटामाटात करणा-या कुटुंबात लग्नाच्या वेळेनुसार आणि आवडीनुसार पदार्थ ठरवले जातात. पंगत पद्धत मागे पडली असली तरी बुफेमध्येही नवनवीन...
  November 4, 08:37 AM
 • दिवाळी येते आणि अनेक शुभ व उज्ज्वल गोष्टींबरोबर घेऊन येते लग्नसराईची नांदी. तुळशी विवाह पार पडला की लग्नाच्या मुहूर्तांना सुरुवात होते. आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रसंगाची तयारीही व्हायला हवी तेवढ्याच उत्साहाने, हो ना? किंबहुना आपल्याकडे लग्नासाठी पेहराव की पेहरावांसाठी लग्न ते न कळे, अशीच परिस्थिती अनेकदा दिसते. अशा या वेडिंगवेअरचे सध्याचे ट्रेंड बघण्यापूर्वी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी बघूया, ज्यामुळे आपल्याला ट्रेंड्समधून हव्या असलेल्या गोष्टी नेमकेपणाने ठरवता...
  November 4, 08:33 AM
 • काही वर्षांपूर्वी एका चारचाकीची जाहिरात खूप गाजली होती. पाठीवर सॅक घेतलेला मुलगा, अनेक वाहनांना हात करतोय; पण कोणीच त्याला लिफ्ट देत नाहीए. अखेर तो एका मोठ्या कागदावर लिहितो, दिवाळीसाठी घरी जायचंय. आणि अर्थातच या चारचाकीचा चालक त्याच्यासाठी थांबतो...दिवाळीसाठी घरी जाणं हे भारताचा पूर्व भाग वगळता (तिकडे दुर्गापूजेच्या वेळी जातात) बहुधा सगळीकडे दिसून येतं. नोकरी वा शिक्षणानिमित्त घराबाहेर राहणारी मंडळी एक दिवस का होईना, अभ्यंगस्नानासाठी म्हणा वा पाडव्यासाठी किंवा भाऊबीजेसाठी निश्चित...
  October 27, 06:14 AM
 • यंदा तुमच्या फराळाच्या, म्हणजे फराळाचे पदार्थ तयार करायच्या, वेळापत्रकात बदल झाला असेल ना? ब-याच घरांमध्ये रात्रीची जेवणं आटपून मग निवांतपणे करंज्या किंवा चकल्या करायचा कार्यक्रम असतो. अनारसेही असेच घाई न करता तळायचे असतात. शिवाय लाडूचं छान फेटून ते वळायचे असतात. दिवसा एवढा निवांत वेळ अगदी गृहिणींनाही मिळत नाही, नोकरी व्यवसाय करणा-यांना तर सोडाच. खेरीज आॅक्टोबरमध्ये आपल्याकडे दिवसा खूप उकडतही असतं. रात्री हे पदार्थ केले तर घरातल्या मुलांचा सहभाग असतो त्यात आणि अहोंनाही चकल्या पाडायला...
  October 27, 06:13 AM
 • सालाबादप्रमाणे याही वर्षी घरी आत्या, तिची मुलं, काका व चुलतभावंडं, मामेभाऊ, मावशीच्या मुली असा मस्त जमघट होता. घरच्यांची फराळ आणि फटाके, नवे कपडे आणि इतर जमवाजमव सुरू झाली. दिवाळीचे दिवस किती? भाकड दिवस किती इथपासून ते तुळशीच्या लग्नापर्यंतच्या सर्व दिवसांची यादी करून झाली. फोनाफोनी करून कोण केव्हा येणार, कसे परत जाणार यावर चर्वितचर्वण सुरू झाले. घरी समीर आणि श्रुती यांची खलबते सुरू झाली.देशमुखांचे घर मोठे. वाडासदृश ऐसपैस खालचे घर. मोठे अंगण. त्यामुळे बच्चेकंपनीच्या उधम करण्याला ऊत येत...
  October 27, 06:12 AM
 • दिवाळी... आनंद, उल्हास आणि मांगल्याची उधळण करणारा सण. अशी ही चमचमणारी दिवाळी सिनेतारे कशी साजरी करत असतील ही उत्सुकता सगळ्यांनाच असते. खास मधुरिमाच्या वाचकांसाठी मराठी सिनेतारे-तारकांची दिवाळी, त्या दिवाळीच्या काही आठवणी...टीव्ही पाहूनच आनंद मानला - आजपर्यंत दोनदा मी दिवाळी भारताबाहेर साजरी केली आहे. न्यूझीलंडला शूटिंगनिमित्त गेले असताना भरपूर खरेदी करून दिवाळी साजरी केली. तिथे दिवाळी अशी वाटतच नव्हती. आम्ही टीव्ही पाहून भारतात साजरी केली जाणारी दिवाळी आठवत होतो; मला प्रत्येक दिवाळीत...
  October 27, 06:09 AM
 • दिवाळी हा अनेक व्यावसायिकांसाठी खूप कामाचा आणि कमाईचा सीझन, पण त्यांना इतके काम असते की त्यांना त्यांच्या घरच्यांसोबत दिवाळी साजरी करायला वेळच नसतो. अशा काही व्यावसायिकांशी गप्पा मारल्या आहेत यामिनी कुळकर्णी (जळगाव), प्रियांका डहाळे व मोहिनी घारपुरे (नाशिक) आणि वंदना धनेश्वर (औरंगाबाद) यांनी. चला तर मग, आपल्या कर्तव्यालाच आपली पूजा मानून शेवटच्या क्षणापर्यंत काम करून आपल्या दिवाळीच्या आनंदात भर घालणा-यांची दिवाळी कशी जाते ते जाणून घेऊ....पारंपरिक व्यवसायाला कलाकुसरीची जोड - दिवाळी जवळ...
  October 27, 06:05 AM
 • आजच्या संगणकयुगात ब-याचदा रांगोळी फक्त दिवाळीत काढली जाते. ब्लॉक संस्कृतीत तर रांगोळी काढायला कुठे असते अंगण आणि कुठे असते प्रशस्त जागा? नोकरी करणा-या स्त्रियांना रांगोळी काढायला वेळही मिळत नाही. म्हणून स्टिकर्सची रांगोळी दाराच्या उंबरठ्याबाहेर चिकटवली की झाले; पण हे सर्वच ठिकाणी असते असे नाही. काही वेळेस आजही काही स्त्रिया अगदी मनापासून रांगोळी काढतात. कॉलेज युवतीसुद्धा रांगोळीचे पुस्तक घेऊन सुंदर रंगीबेरंगी रांगोळी काढतात, तिला सजवतात. देवापुढे, तुळशी वृंदावनापुढे, भाऊबीजेच्या...
  October 27, 06:01 AM
 • रेसिपी - चिरोटे साहित्य - 2 वाट्या मैदा, 2 टेबलस्पून डालडा तूप, कॉर्नफ्लॉवर 2 टेबलस्पून, तूप 4 स्पून, पिठीसाखर 2 टेबलस्पून.कृती - मैदा घट्ट मळून ठेवणे (अर्धा तास). त्यात भिजवताना डालडा तुपाचे मोहन घालणे. नंतर तुपात कॉर्नफ्लॉवर घालून फेटणे (साटा तयार करणे). मैद्याच्या पाच पोळ्या लाटून घेणे. नंतर प्रत्येक पोळीला साटा लावून घेणे. एक पोळी रोल करून ती दुस-या पोळीच्या कडेवर ठेवून रोल करणे. नंतर तो रोल तिस-या पोळीवर ठेवणे. रोल करणे. तो रोल चौथ्या पोळीवर नंतर पाचव्या असे करून नंतर त्यावर अलगद हाताने प्रेस...
  October 27, 05:59 AM
 • मागील वेळेस ठरल्याप्रमाणे, आपली दिवाळीच्या पेहरावाची तयारी आपण केली आहे तेव्हा आता आपल्याला त्याबरोबरील गोष्टींची, (अर्थात अॅक्सेसरीज) म्हणजेच बॅग्ज व फूटवेअरची तयारी करायचीय...फॅशन अॅक्सेसरीज हे काही खास सुशोभनाचे प्रकार असतात जे आपल्या वेशभूषेस पूरक असतात व त्यास अधिक उठाव आणतात. त्यामुळे यात महत्त्वाचा समावेश बॅग्ज आणि चपला/बूट/सँडल्सचा असतो. हा पेहराव तर नाही; पण याच्याशिवाय कुठचाच पेहराव पूर्ण होत नाही. तसेच पूर्ण लूकचा गेट-अप यांच्यावर खूपसा अवलंबून असतो! तेव्हा यांची निवडही...
  October 27, 05:57 AM
 • हवेत थंडावा आला आणि घराघरातून तळणीचे आणि गोडाचे वास यायला लागले की समजावे दिवाळी अगदी जवळ आली आहे. दिवाळीच्या पदार्थांची ही रेलचेल आपल्याला ब्लॉग्जवरही अनुभवायला मिळते. त्यामुळे भारताबाहेर राहणा-या किंवा नवीनच गृहिणीपद मिळालेल्या बायकांसाठी खूपच सोयीचे होते. खास मराठी टच असलेले दिवाळीचे पदार्थ चकल्या, कडबोळी, चिरोटे, अनारसा करण्यासाठी योग्य प्रमाण आणि विशेष टिप्सची आवश्यकता असते. दिवाळीत हा प्रश्न सोडवण्यासाठी http://chakali.blogspot.com वेबसाइटला भेट द्यायलाच हवी. चकली या ब्लॉगवर दिवाळीचा फराळ,...
  October 20, 11:51 PM
 • कोणत्याही क्षेत्रात वेगळं काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करायला हवं. स्वयंपाक बनवणं हे काम नसून ती एक कला आहे. आयुष्यात नेहमी मोठी स्वप्नं पाहा आणि नेहमी खरं बोला, असा संदेश जगप्रसिद्ध शेफ खाना खजानाफेम संजीव कपूर यांनी दै. दिव्य मराठीशी केलेल्या खास बातचीतमध्ये दिला. मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होतो, जेव्हा बारावीनंतर मी हॉटेल मॅनेजमेंटला जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा इतर सर्व घरांप्रमाणे मलाही विरोध झालाच होता; पण मला आत्मविश्वास होता की मी जे काही करतोय ते योग्य आहे. अगदी छोट्या...
  October 20, 11:46 PM
 • एक- एक करत चढत्या रंगतीने आपण सण साजरे करत पुढे जातोय. आता परमोच्च गाठायला दिवाळी आली! तिची तयारी खासच हवी यात शंका नाही. या वेळेचा ड्रेसअप असा हवा, ज्यात आपल्याला विचार करायचाय दिवाळीच्या चार-पाच दिवसांचा व तोही केवळ वेशभूषेचाच नाही तर त्याबरोबर त्यावरील दागदागिने, अॅक्सेसरीज म्हणजेच बॅग्ज व फुटवेअर! आता एवढे मोठे आपले काम आहे, तर त्याला आपण वेळ आणि विचार दोन्ही त्याचप्रमाणे द्यायला/करायला हवा. सर्वात आधी आपण पाहूया आपल्या पोशाखाचे :दीपावली हा सणच प्रकाशाचा, उज्ज्वलतेचा! त्यामुळे आपल्या...
  October 20, 11:36 PM
 • आज शेंडेबाई आल्या व आल्या-आल्या माझी स्तुती करू लागल्या. तेव्हाच मनात पाल चुकचुकली. त्या कशासाठी आल्या त्याचा अंदाज यायला वेळ लागला नाही. दर महिन्याच्या 15 तारखेनंतर त्या अशाच उगवतात. कारण अर्धा महिना संपताच त्यांच्या पगाराची विल्हेवाट लागलेली असते. उरलेल्या दिवसात गॅस संपला किंवा इतर खर्च आला तर त्या माझे दार ठोठावतात किंवा इतर कुणाकडे जातात. पैसे मिळेपर्यंत चिकाटीने बसून राहतात. गप्पांच्या ओघात कुठे सेल पाहिले, काय खरेदी केली, डोसा कुठे चांगला मिळतो, ही माहिती पुरवत असतात. पैसे पदरी...
  October 20, 11:31 PM
 • मॅडम, तुमच्याकडे माझ्या मुलाला घेऊन यायचे आहे? विद्यार्थ्यांसाठी योगासने उपयुक्त आहेत, असे ऐकले आहे. एकाग्रता अजिबात नाही. अभ्यास करतो; पण त्या मानाने परीक्षेत हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तुमच्याकडून एकाग्रता वाढविणे, ग्रहणक्षमता वाढविणे या संदर्भात योगिक सल्ला मिळेल का?संध्याकाळी अपॉइंटमेंट घेऊन आल्यानंतर, त्यांच्याशी चर्चा करताना काही तक्रारी अशा होत्या : एकाग्रता व ग्रहणक्षमता कमी आहे. ऐन परीक्षेच्या वेळेस मुले आजारी पडतात, आत्मविश्वास कमी आहे, टेन्शन लवकर येते, भीती वाटते,...
  October 20, 11:26 PM
 • रक्तगटाचे मुख्यत: चार प्रकार असतात. ए, बी, एबी आणि ओ. याबरोबरच रक्तातील लाल पेशींवर खास प्रकारचे प्रोटीन असते. या प्रोटीनच्या अस्तित्वाचा शोध सर्वप्रथम र्हीसस नावाच्या माकडांमध्ये लागल्यामुळे त्याला र्हीसस फॅक्टर असे म्हणतात. ज्यांच्या लाल पेशींवर हा र्हीसस फॅक्टर असतो, त्यांचा रक्तगट आरएच पॉझिटिव्ह असतो व ज्यांच्यामध्ये हा नसतो त्यांचा आरएच निगेटिव्ह. म्हणून या आठ प्रकारांपैकी कोणता तरी एक रक्तगट सर्वांचा असतो, ए आरएच पॉझिटिव्ह व निगेटिव्ह, बी आरएच पॉझिटिव्ह व निगेटिव्ह, ओ आरएच...
  October 20, 11:22 PM
 • सध्या सणांचे दिवस आहेत. नवरात्र पार पडले, दिवाळी तोंडावर आली आहे. त्यामुळे दुकानेही सज्ज झाली आहेत. मॉल्समध्ये वेगवेगळ्या ऑफर्स सुरू आहेत. विविध ऑफर्समुळे मनात असणा-या वस्तूंची खरेदी याच काळात केली जाते. खूपदा असे होते की आपण आधीपासून अभ्यास करून एखादी गोष्ट खरेदी करायची असे ठरवलेले असते; पण ऐन वेळी दुकानात गेल्यावर कोणत्या तरी ऑफर्समुळे किंवा सेल्समनने केलेल्या स्तुतीमुळे घरी आणतो वेगळेच मॉडेल. म्हणजे तुम्हाला घ्यायचा असतो डिजिकॅम; पण दुकानात गेल्यावर वेगवेगळ्या ऑफर्समुळे तुम्ही...
  October 20, 11:08 PM
 • मागच्या आठवड्यात दुपारी वाचत बसले होते; तेवढ्यात दारावरची घंटी वाजली. दारात खालच्या मजल्यावरच्या आजी. आत आल्यावर आजी म्हणाल्या, अगं, उद्या मला एका नातवाच्या वाढदिवसाला जायचं आहे. तू बाहेर जाशील तेव्हा कुठला तरी खेळ घेऊन येशील का? त्यांना हो असं सांगितल्यावर थोड्या गप्पा मारून त्या बाहेर पडल्या. मला मात्र वाटले, अजूनही खेळांकडे आम्ही सर्वजण किती सर्वसामान्य दृष्टीने पाहतो? खेळ हा मुलांच्या वाढण्यातला, मोठे होण्यामधला अविभाज्य घटक! त्यांच्या शारीरिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक जाणिवा...
  October 20, 11:05 PM
 • या महिन्याच्या सुरुवातीलाच सगळ्या इंग्रजी, मराठी वृत्तपत्रांत आलेली ही बातमी पाहिलीत? भारतीय तरुण सर्वात जास्त प्रमाणात असुरक्षित लैंगिक संबंध ठेवतात! नुकत्याच झालेल्या एका जागतिक पातळीवरील सर्वेक्षणात असे दिसून आले की, भारतातले जवळजवळ 72% तरुण-तरुणी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवतात. यापैकी काहींनी शाळेतून लैंगिक शिक्षण किंवा त्याबाबत माहितीच मिळत नसल्याचे सांगितले, तर याबाबत डॉक्टरांना माहिती विचारण्याची आपल्याला लाज वाटत असल्याचेही बयाच जणांचे म्हणणे होते. तरुण मुलांना...
  October 20, 11:00 PM
 • हल्ली कोणताही सण किंवा विशेष दिवस आला की आदल्या रात्री झोपण्यापूर्वी मी आठवणीने मोबाइल सायलेंट मोडवर करते. नाहीतर मध्यरात्रीपासूनच सणाच्या शुभेच्छा देणारे एसएमएस वाजू लागतात आणि झोपेचे खोबरे होते. अगदी रक्षाबंधन, अक्षय्य तृतिया, नागपंचमी अशा दिवशीही हाच अनुभव येतो. (हॅप्पी रक्षाबंधन किंवा हॅप्पी नागपंचमी म्हणजे काय हे मला कुणाकडून तरी समजावून घ्यायचे आहे.) हल्ली एसएमएस जवळपास फुकटात करता येत असल्याने कुठला तरी आलेला एसएमएस ऑल कॉन्टॅक्ट्सना सेन्ड करायचं फॅडच आहे. त्यातल्या...
  October 20, 10:54 PM
 
जाहिरात

RECOMMENDED