जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • या इंग्रजी मार्च महिन्यातच मराठी कालगणनेतील आपले चालू वर्ष संपते आणि नवे वर्ष सुरू होते. म्हणजे पुन्हा एकदा आपण नव्या वर्षाच्या स्वागताचा आणि जात्या वर्षाच्या निरोपाचा क्षण अनुभवणार आहोत; पण हा सोहळा मात्र शुद्ध, सात्त्विक आणि मंगल असतो. हे नव्या वर्षाचे स्वागत कसे करायचे ते आपण नंतर पाहूच, त्या आधी हुताशनी पौर्णिमेचे म्हणजेच होळीचे स्वागत करूया. फाल्गुनी पौर्णिमा, हुताशनी पौर्णिमा, होळी, शिमगा, मदनदहन अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा सर्वांचा आवडता सण आहे. सामाजिक एकतेचे आणि सांघिक...
  March 2, 12:02 AM
 • हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये एक 70 वर्षांच्या आजी आपल्या सुनेबरोबर आल्या होत्या. चेह-यावर प्रचंड अस्वस्थता दिसत होती. अत्यंत संकोचाने त्यांनी सांगितले, की त्यांचे अंग बाहेर आलेय. त्यांना धीर देऊन आत तपासाच्या खोलीत घेऊन गेले व लक्षात आले, की त्यांचा हा त्रास अनेक वर्षांपासून आहे. आणि पुढच्याच आठवड्यात केलेल्या शस्त्रक्रियेने आजींना 20-25 वर्षांपासून होणा-या त्रासापासून सुटका मिळाली. लाज वाटल्याने, भीती वाटल्यामुळे अनेक जणी अशा प्रकारे वागतात व त्रास हळूहळू वाढत जातो. म्हणूनच अंग बाहेर येते...
  March 1, 11:55 PM
 • मध्यंतरी एका इंटरनॅशनल स्कूलमधली बालवाडी पाहायला गेलो होतो. ही शाळा असेल यावर माझा प्रथम विश्वासच बसेना. एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखी ती इमारत होती. मी अवाकच झालो! साहजिकच ती शाळा व त्या शाळेत मिळणारे शिक्षण याबाबत माझी उत्सुकता दसपटीने वाढली. इतकी हाय-फाय शाळा असेल तर तिथे मिळणारे शिक्षणही तितकेच उच्च दर्जाचे असणार, असे मला वाटू लागले होते. संस्थाचालकांसोबत मी बालवाडी पाहायला गेलो. प्रशस्त वातानुकूलित हॉल. वेगवेगळी ढीगभर महागडी खेळणी. चकाचक कलरफुल फर्निचर. मुलांनी तयार केलेल्या...
  March 1, 11:39 PM
 • साधारणपणे 45 वर्षे वयाचे एक उद्योजक मला सांगत होते. मी खूप शांत आणि गाढ झोपायचो; पण आताशा मला झोपच लागत नाही. रात्री 9.30ला मी झोपायला जातो; पण कशीतरी 2.00 वाजता झोप लागते. जेमतेम 3-4 तास. झोप न लागल्यामुळे दिवसभर अस्वस्थता, उदासीनता, छातीत जळजळ होणे, पोट साफ न होणे, नकारात्मक विचार, असुरक्षिततेची भावना, बीपी वाढणे, रक्तातली साखर वाढली आणि वजन कमी होतेय. अॅलोपॅथी डॉक्टरांना दाखवले. त्यांच्याकडून काही गोळ्या घेतल्या. त्याने जरा झोप लागतेय, पण त्या गोळ्यांची सवय नकोय मला. मी चालतो ट्रेडमिलवर, घरी...
  March 1, 11:25 PM
 • वाचकांनो, आई-बाबांनो, पुन्हा खूप दिवसांनी आपली भेट होते आहे. आता जिकडे तिकडे परीक्षांचे दिवस आहेत. आंब्यांचा मोसम, द्राक्षांचा मोसम तसा परीक्षांचा म्हणजे ताणतणावांचा मोसम असे चित्र आपल्याला सर्वसाधारण दिसून येते. सध्या अस्तित्वात असलेली शिक्षणपद्धती आणि परीक्षापद्धती यामुळे अनेक कोडी, समस्या निर्माण होत आहेत. प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीप्रमाणे त्या हाताळत आहेत; पण हे खरे की, या कुठल्याच प्रश्नाचे मॅगीप्रमाणे दोन मिनिटांत मिळणारे तयार उत्तर नाही आणि जरी ते उत्तर मिळाले तरी...
  March 1, 11:18 PM
 • शालेय अध्यापन विश्वात सुख-दु:खाच्या असंख्य अनुभवांनी, संवेदनांचे रेशीम वस्त्र विणले जाते. माझी शाळा, माझे विद्यार्थी, खूप खूप अनुभवायला मिळते. अनुभवांच्या शिदोरीत रोज भर पडतच असते. असाच एक अनुभव अगदी परवाचा. ताजाताजा. माझ्या शाळेत, चेन्नईहून एक कलाकार ओरिगामी व टाकाऊपासून शोभिवंत वस्तू तयार करण्यासंदर्भात अनेक गावे, अनेक शाळा फिरत-फिरत आला होता. उंच, धिप्पाड, मद्रासी, हिंदी, इंग्रजी भाषेत खणखणत्या आवाजात आपली कला प्रदर्शित करत होता. त्याच्या गमतीदार बोलण्याने अन् कला प्रदर्शन...
  March 1, 11:11 PM
 • चेह-यापेक्षाही हातापायाचे हाल थंडीत फारच होतात. टाचा, गुडघे, कोपरे, घोटे हे इतर वेळी कोरडे असणारे शरीराचे भाग शरीरातील पाण्याच्या अभावाने अधिकच काळे पडतात. त्यांना भेगा पडतात. आपण त्याला क्रीम व तेल लावून मऊ ठेवण्याचा प्रयत्न करतो; पण त्यापेक्षाही शरीरातील पाणी टिकवून ठेवणा-या क्षाराचा विचार या ऋतूमध्ये होणे आवश्यक आहे. हे काळे पडलेले अवयव मळले आहेत म्हणून परत परत साबणाने धुण्याचा वेडेपणा ब-याच जणी करतात; पण त्यामुळे उलट त्वचा अधिकच कोरडी पडून शुष्क होते. अशा वेळी जर दुपारी उन्हात...
  March 1, 11:02 PM
 • विश्वाच्या अफाट पसा-याबद्दलचे कुतूहल, त्यात घडणा-या घडामोडींचा मागोवा घेणे आणि काही तर्क लावून रहस्यवेध करायचे प्रयत्न अनंत काळापासून सुरूच आहेत. यात स्त्री व पुरुष दोघांचेही कुतूहल सारख्याच पातळीवरचे होते व आहे असेच म्हणावे लागेल; पण युगानुयुगे अनुभवलेल्या दुटप्पी धोरणांमुळे व प्रसारमाध्यमे व अन्य महत्त्वाच्या जागेवर पुरुषांची मालकी असल्याने महिलांच्या योगदानाचे पुरावेदेखील धूसर, पुसट असेच दिसतात. अतिप्राचीन काळात ग्रहणाबद्दल भविष्यकथन करणा-या स्त्रियांचे तसेच पायथागोरसच्या...
  February 24, 12:09 AM
 • वीणा धावतच घरात शिरली. आनंदाने मला तिने मिठीच मारली. अगं, काय झालं ते तर सांग! मी हसत तिला विचारले. ओळख बघू? तिचा प्रतिप्रश्न! नवरोबाचे प्रमोशन झाले? लेकाचे किंवा सुनेचे प्रमोशन झाले? त्यांच्याकडे गोड बातमी आहे? तुला एखादा पुरस्कार मिळाला? माझे प्रश्न अखेर संपले. सांग बाई तूच आता! मी हार मानत म्हटले. अगं, चक्क सासूबाई येणार आहेत माझ्याकडे! वीणा हसत म्हणाली. काय? मी किंचाळलेच. कारणही तसेच होते. एक नाही, दोन नाही, तब्बल 10 वर्षे झाली होती त्यांनी वीणाशी संबंध तोडून! त्यांचा विषय काढला की एरवी कणखर...
  February 24, 12:07 AM
 • बोलणा-याचे दगडही विकले जातात, न बोलणा-याचे हिरेसुद्धा पडून राहतात अशी म्हण आजकाल सर्वच ठिकाणी लागू होते. सध्याचे युग जाहिरातीचे, माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. माहिती आणि ग्राहक यांच्यातला महत्त्वाचा दुवा म्हणजे सूत्रसंचालक असतो. टीव्ही चॅनल, एफएम, आकाशवाणी यांसारखी प्रसारमाध्यमे असोत वा उत्सव समारंभ, सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमात जान येते. किती वेळा तर रटाळ कार्यक्रमही चुणचुणीत सूत्रसंचालकांमुळे सहज लोकप्रिय होतात. नीटनेटका साजेसा पोशाख, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, स्पष्ट उच्चार,...
  February 24, 12:06 AM
 • नोकरीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांना जाण्याचा योग येतो. पण आजचा कार्यक्रम वेगळा होता. मी ज्या ठिकाणच्या कार्यक्रमासाठी जात होते, त्या कार्यक्रमातील सहभागी लोकांचा वयोगट वेगळा होता, त्या वयोगटातील लोकांचा समूह तयार होण्याचे कारण फारसे चांगले नाही - समाजातील घटक म्हणून लाजेने मान खाली घालायला लावणारे ते कारण असेल या बाबत मला तीळमात्रही शंका नव्हती... आणि म्हणूनच या कार्यक्रमाला जाताना मी बरीच अस्वस्थ होते, याची जाणीव मला होत होती.कार्यक्रम छान पार पडला; पण मला ओढ लागली होती ती...
  February 24, 12:04 AM
 • गळ्याच्या भागामध्ये असलेल्या ग्रंथींवर दाब निर्माण करून त्याद्वारे उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी सर्वांगासन केले जाते. या अशा महत्त्वाच्या सर्वांगासनानंतर लगेचच मत्स्यासन केल्यामुळे, सर्वांगासनामुळे होणारे फायदे जलद व अधिक फलदायी होतात. म्हणूनच मत्स्यासनाला सर्वांगासनाचे पूरक आसन समजतात. माशाप्रमाणे सहजपणे पाण्यावर तरंगत राहण्याकरिता मत्स्यासनातील शरीराची स्थिती सोयीची ठरते म्हणूनच या आसनाला मत्स्यासन हे नाव पडले आहे.* सावधानता : मानेचे कोणत्याही प्रकारचे आजार, गळ्यातील सूज...
  February 24, 12:03 AM
 • कार्यक्रमाचं आमंत्रण देणारं पत्र माझ्या समोर पडलं होतं. मला वेळ आहे का, कार्यक्रमात सहभागी होणे शक्य आहे का याबद्दल एकाही शब्दाने चौकशी करण्याची आयोजकांना गरज वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. खरं तर ते आमंत्रण नव्हतंच. तो आदेश होता आणि अत्यंत इमानेइतबारे मी तो पाळायचा हे ठरून गेलं होतं. काही ठिकाणी संबंध असे आणि इतके घट्ट असतात की तिथे औपचारिकता पाळणं हा एक मोठा गुन्हा ठरतो. ठरलेल्या दिवशी मी कार्यक्रमस्थळी पोहोचलो. फाटकातून आत शिरताच सर्वप्रथम राममंदिराचं दर्शन झालं. देवळातील...
  February 24, 12:00 AM
 • प्रसंग पहिला - संध्याकाळी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कल्याणला जाणा-या महिला विशेष लोकलमध्ये तुम्ही शांतपणे पुस्तक वाचताय. ही गाडी दादरपर्र्यंत तुलनेने कमी गर्दीची असते आणि फर्स्ट क्लासमध्ये क्वचित सीटही रिकाम्या असतात. गाडी दादरला येते, बायका पटापट चढतात आणि उरल्यासुरल्या सीटही भरून जातात. तेवढ्यात एक जवळजवळ काटकोनात वाकलेल्या, नऊवारी साडी नेसलेल्या आजीबाई काठी टेकत चढतात आणि थर्ड सीटवर बसलेल्या तुम्हाला सरकायला सांगतात. मुंबईत मध्य रेल्वेच्या फर्स्ट क्लासमध्ये चौथ्या...
  February 23, 11:59 PM
 • नुकतीच महाशिवरात्र होऊन गेली. सर्वांच्या घरी साबुदाण्याची खिचडी, उपासाचे थालिपीठ-वडे, लाल भोपळ्याचे रायते असे पारंपरिक मराठी पदार्थ खाल्लेच असतील. सहज म्हणून वेगवेगळ्या प्रांतांत वेगळे काही उपास पदार्थ ब्लॉग्जवर मिळतात का हे सर्च केले आणि प्रत्येक प्रांततल्या उपासाचे पदार्थ खरोखर वेगळे असतात हे कळले. जसे दुधीभोपळा, गाजर महाराष्ट्रात उपासाला चालत नाही; पण उत्तरेत चालतो. महाराष्ट्रात मखाणे इतके प्रचलित नाहीत; पण उत्तरेत मखाण्याची खीर उपासाला लागतेच. बंगालमध्ये पनीर उपासाला...
  February 23, 11:57 PM
 • बालपण सरलं. तारुण्यात पदार्पण केलं. सगळ्यांचं होतं तसं माझंही लग्न झालं. पण सगळ्यांच्या सारखेपणात, खूप काही वेगळंही असतं, नाही का?लग्नानंतर ओघानी येणारं आईपण आलं. आई होण्यातला आनंद वेगळाच. पण आमच्या वेळी नात्यात एवढा मोकळेपणा नव्हता - जेवढा आता आहे. मैत्रिणी भेटल्यावर नव-याविषयी बोलताना आणि वर्गातले मुलगे भेटले की कडेवर बाळाला घेऊन मिरवताना कुठे तरी लाजल्यासारखं व्हायचं. पण आजी झाल्यावर? आजी झाल्यावर मात्र फक्त आनंद आणि आनंदच झाला. संसारमंदिरावर चढलेला कळस म्हणजे आजीपण. आयुष्याच्या...
  February 23, 11:55 PM
 • आठ मैत्रिणींचा एक ग्रुप. जवळजवळ 25 वर्षांपासूनचा, म्हणजे कॉलेजजीवन सुरू झाल्यापासूनचा. आता सगळ्या जणी चाळिशीत आलेल्या. पंचवीस वर्षांत नेहमी भेटत नसल्या तरी फोन/ईमेलवरून संपर्क होता. सगळ्या जणी एकमेकींच्या लग्नाला, मुलींच्या बारशाला गेलेल्या. (सगळ्यांना मुलीच आहेत आणि त्याही आता एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या आहेत.) हळूहळू प्रत्यक्ष भेटी कमी होऊ लागल्या आणि भेट व्हावी म्हणून मुद्दाम काहीतरी करावंसं वाटायला लागलं त्यांना. मग एकीने पुढाकार घेऊन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये संडे ब्रंच बुक...
  February 23, 11:54 PM
 • रेल्वेखाली तीन जण चिरडले, ही बातमी नेहमीच्या पद्धतीने वाचली. मनात खोलवर अरेरे! अशी प्रतिक्रिया उमटली आणि सरावलेले मन रूटीनसाठी सज्ज झाले. दुस-या दिवशी समजले, त्यात माझ्या एका विद्यार्थिनीचे वडील होते. ओळख न पटल्याने त्यांचे नाव बातमीत नव्हते. विद्यार्थिनी नेहमीच्या भेटण्यातील होती. वडील मुलगी यांच्या भावसंबंधांच्या जाणिवेने मन कळवळले. मृत्यूबद्दलचे विचार मनात फेर धरू लागले़दोन दिवसांनी वर्गात इनव्हिजिलेशन करत होते. उत्तरपत्रिका वाटून झाल्या. एका मुलीने मला बाहेर बोलावले....
  February 23, 11:53 PM
 • महिला मुळातच मल्टिटास्किंग असतात. त्यांनी स्वत:मधल्या क्षमता ओळखायला हव्यात. महिलांमधील नेतृत्व गुणांचा पूर्ण क्षमतेनं वापर होण्याच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांमधले महिलांसाठीचे पन्नास टक्के आरक्षण ही एक सुवर्णसंधीच मानायला हवी. आजकालच्या निवडणुकांमध्ये महिला आरक्षित पद म्हटले की अनेक जण आपल्या महिला नातेवाइकांना उभं करतात. मात्र, संबंधित पक्षानं आपल्याकडच्या महिला कार्यकर्त्यांना प्राधान्याने संधी दिली पाहिजे, राजकारणाची कोणतीच पार्श्वभूमी नसताना आणि शासकीय...
  February 17, 01:00 AM
 • मनीषा लासुरे, नाशिकमध्ये वनविहार कॉलनीमध्ये राहणा-या. नाव तसे सामान्य. सामान्य घरातली एक गृहिणी; पण विशेष हे की, यंदाच्या मनपाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना उतरल्या. पैसा, संवादकौशल्य यापैकी काहीच परंपरेने चालत आलेले नाही. हाताशी होती ती फक्त जिद्द. त्यांच्या या जिद्दीचा प्रवास छोटा, पण उल्लेखनीय आहे. पंढरपूरहून लग्न होऊन सासरी नाशिकला आले तेव्हा अत्यंत साधीसुधी, घर-दार सोडून काही ठाऊक नाही, अशा स्वभावाची होते मी. मुंबईत कल्याणला बीए हिंदी केलेलं. पुढे दोन...
  February 17, 12:58 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात