Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • कधी आठवण लपलेली असतेहृदयाच्या बंद कप्प्यातकधी आठवण लपलेली असतेवसंतातल्या गुलमोहरातकधी ती लपलेली असतेसागराच्या अथांग निळाईततर कधी ती लपलेली असतेबहरलेल्या चैत्रपालवीतया साऱयाभोवती फिरत असतोश्वास आपला मंद धुंदआणि मग यातूनच दरवळतो तो आठवणींचा बकुळगंधआज आपण भरभरून या बकुळफुलांचा सुवास घेणार आहोत प्रसिद्ध लेखिका, उत्कृष्ट अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांच्या आठवणीतून.तिनं पाहिलं आहे पंचतारांकित उपाहारगृहातील रंगढंगापासून रस्त्यावरच्या धुळीत बरबाद होऊन चाललेल्या निष्पाप...
  August 4, 11:33 PM
 • जवळजवळ प्रत्येक गरोदर स्त्रीची मनापासून इच्छा असते, की आपली प्रसूती नैसर्गिक मार्गानेच व्हावी. आणि या समजुतीपोटी काहीजणी कधीकधी चुकीचे निर्णयही घेतात. ऑपरेशनबद्दलची भीती आणि गैरसमज याला कारणीभूत असतात.माझ्या मते, नैसर्गिक प्रसूती बहुतांशी स्त्रियांनी अनुभवल्यामुळे त्यांना हे सर्व सहज, नैसर्गिक व सुरक्षित आहे, असा ठाम समज असतो. परंतु ही प्रसूतीची प्रक्रिया म्हणजे नक्की काय? त्या काळात मातेच्या व बाळाच्या शरीरात कोणकोणते बदल होतात? यात कोणते अडथळे येऊ शकतात व मातेला व बाळाला कोणत्या...
  August 4, 11:30 PM
 • आपण मागील लेखात जे पीएफचे प्रकार पाहिले, ते फक्त पगार घेणाऱया नोकरदारांसाठीच होते. पण पीपीएफ हा जरा वेगळा प्रकार आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे. म्हणजे जसे पगारदार व्यक्ती आपल्या मिळकतीतला काही भाग पीएफमध्ये गुंतवतो, तसेच सामान्य व्यक्तीही- म्हणजे व्यापारी, विद्यार्थी अथवा गृहिणीही पीएफमध्ये गुंतवणूक करू शकतात. वैयक्तिक बचतीला प्राधान्य मिळण्याच्या हेतूने केंद्र सरकारने पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाची स्थापना केली. अगदी पगारी नोकरदार, ज्याचा इतर ठिकाणी पीएफ आहे, तोदेखील पीपीएफमध्ये...
  August 4, 11:27 PM
 • आम्हा मुलांमध्ये ती लेडी आयर्न होती. ती मुलगी आहे, असे कधी आम्हाला वाटले नाही. कधीच नाही. म्हणजे तिच्यामधला बेधडकपणा फक्त पुरुषवर्गालाच शोभून दिसतो, अशी ठाम समजूत होण्याइतपत आम्ही पुरुषी मानसिकतेचे बळी ठरलो होतो. कपडे घालण्यापासून वागण्या-बोलण्यापर्यंत समाजाच्या सर्व प्रचलित नियमांना धुडकावून लावत ती वागायची. टिपिकल टॉम बॉय लूक. डोळ्यांमधली तुफानी चमक तिचं वेगळेपण जाणवून द्यायची. अकरावीपासूनचा आमचा ग्रुप होता. चार-दोन इतर मुलीही त्यात होत्या. पण, तिच्या तेजतर्रारपणाची सर कुणाला...
  August 4, 11:25 PM
 • मनुवंशामध्ये पृथु नामक एक अत्यंत पराक्रमी राजा होऊन गेला. तरतऱहेच्या अ-कर्तृत्वाने गांजलेल्या माणसांच्या विकारांनी ग्रासलेल्या धरेस मुक्त करून तिच्या ठायी त्याने पुन्हा एकदा पुरुषार्थाची स्थापना केली. पुत्र-कर्तृत्वाने धन्य झालेली धरा पुढे पृथ्वी झाली. पृथुचा पणतू प्राचीनवर्ही याने सवर्णा नामक समुद्रकन्येशी लग्न केले. त्यांना दहा मुले झाली, ती प्रचेतं. मारिषा ही या दहांची एकच पत्नी. म्हणजे मारिषा ही शिवाची आजेसासू. प्रजापती दक्षाचा जन्म होऊन त्याच्याकरवी या पृथ्वीवर विविध...
  August 4, 11:23 PM
 • ती झपझप चालत होती. दुपारी मुलं शाळेतून घरी परतायच्या आत तिला बाजारहाट करून घरी पोहोचायलाच हवं होतं. पहाटे उठल्यापासून सगळा दिवसभर काम काम आणि फक्त कामच... जरा म्हणून उसंत नसे. लग्नापूर्वी आईच्या घरी असताना केलेली मजा, मैत्रिणींच्या बरोबर केलेली धम्माल हे सगळं आठवून कधी तरी मन काहीसं कावरंबावरं होई; पण ते तेवढ्यापुरतंच असे. पुन्हा आयुष्य मागच्या पानावरून पुढे सुरू होई.आजही का कुणास ठाऊक, राहून राहून सगळे कॉलेजचे दिवस आणि तेव्हा केलेली धम्माल तिला आठवत होती. रस्त्यानं चालता चालता तिचं मन...
  August 4, 11:15 PM
 • उद्या दर्श किंवा दिव्यांची अमावास्या. निरांजने/समया चकचकीत धुऊन झाल्या असतील ना? काही घरी कणकेचे गोड दिवे केले जातील, तर काही जण (विशेषत: मुंबईतले) गटारी साजरी करतील. अनेकांसाठी हा दिवस इतर दिवसांसारखाच एक असेल. आणि येणारा श्रावणही त्यांच्यासाठी फार विशेष नसेल. मग काही लोकांसाठी, विशेषत: बहुतांश महिलांसाठी, श्रावण हा खूप काही करण्याजोगा, आनंदाचा का असतो बरे? एक तर या महिन्यातील खूप दिवस उपासाचे असतात. सगळेच दिवस शाकाहाराचे असतात. त्यातल्या अनेक दिवशी ठरावीक पदार्थ करायचे असतात. कोणती ना...
  July 29, 01:14 AM
 • आजीचे बदलणा-या जगाबद्दलचे ऑब्झर्वेशन नि मते खूप मजेशीर वाटतात ऐकायला. एकदा माझी बहीण खूप कंटाळत परीक्षेचा अभ्यास करत बसली होती नि वैतागून आजीला म्हणाली : च्यायला! तुझ्या पिढीत जन्माला यायला हवे होते... मग त्या वेळी नाही तरी स्त्रियांना शिकण्याची बंदीच होती... काय मजा आली असती, अभ्यासच नाही, किती सोपे सगळे... आजी पटकन म्हणाली : खरे आहे बघ; पण एकच छोटासा प्रॉब्लेम... तुझा कितवा बॉयफ्रेंड आहे आत्ताचा? तो काही मिळाला नसता... एकच मिळालेला नवरा चालवून घ्यावा लागला असता... आणि तुला आतापर्यंत दोन मुले असली...
  July 29, 12:57 AM
 • सगळीकडे सनईचे सूर गुंजत होते, घामाघूम झालेले नवरानवरी उठा, बसा, अर्घ्य द्या, आचमन करा, अशा गुरुजींच्या सूचनांचे पालन करत होते. त्यांचे मायबाप कृतकृत्य होऊन येणा-या-जाणा-यांचे स्वागत करत होते. पंचपक्वान्नांचा घमघमाट दरवळत होता. मात्र, एका कोप-यात स्वराली आबाबांच्या फोटोपुढे उभी राहून हमसाहमशी रडत होती. तिच्याकडे तिच्या आजीचे लक्ष जाताच, तिला जवळ घेऊन तिने विचारलं, काय झालं बाळ रडायला? तशी रडत रडत स्वराली म्हणाली, मला नं, आबाबांची खूप खूप आठवण येतेय गं! स्वरालीचं बोलणं ऐकून सर्वांनाच खूप...
  July 29, 12:43 AM
 • श्रावणात झाला पावसाळी धारांचा शिडकावासोसवेना जिवा बोचरा गारवामन झाले मोर, शब्द झाले ओले, मातीच्या मंद-धुंद सुगंधाचे किती गाऊ गोडवे,दूरवर घंटा मंदिरात वाजते, नाद घुमतो कानी.... पाना-फुलांचा सुगंध दरवळतो रानोरानीटपो-या थेंबांनी सजवावे अंगण अंगणात भिजतो प्राजक्त माझा साजणओल्या गाण्यात माझ्या शब्द मोत्यांचे गुंफलेअन् कधी नाही ते रथाला कल्पनेचे कागदी घोडे जुंपलेअसा हा श्रावणोत्सव पाहण्या सर्वांनी व्हावे गोळा
  July 29, 12:34 AM
 • श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम श्रावणधाराउलगडला पानातून अवचित हिरवा मोरपिसारा...हे गाणे लावून मी अभ्यासिकेत बसले होते. समोरचा वाफाळणारा चहाचा कप ओठाला लावत गाण्यात रमतेय... अगदी मग्न होऊन. डोळे मिटून गाणे ऐकताना माझी तंद्री लागते अन् अलगद मन बालपणात उतरते. जिथे श्रावण मला प्रथमच भेटला, उमगला. शालेय जीवनातल्या पहिल्या पावसाच्या सरींसाठी आसुसलेल्या आम्ही कुमारिका श्रावणातल्या सणावारांचीही तितक्याच आतुरतेने वाट बघत असू. आई आणि आजी देवघरातील तांब्या-पितळेची, चांदीची भांडी लख्ख घासून...
  July 29, 12:27 AM
 • भविष्यनिर्वाह निधी म्हणजे भविष्यासाठी केलेली गुंतवणूक. भविष्यनिर्वाह निधीमध्ये सर्व प्रकारचे लोक गुंतवणूक करू शकतात. उदा. नोकरदार, व्यापारी अथवा घरीच असणारे लोक.भविष्यनिर्वाह निधीचे चार प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंड. हा निधी प्रॉव्हिडंट फंड अॅक्ट, १९२५च्या नियमानुसार तयार केलेला असतो. हा फंड शासकीय, निमशासकीय, स्थानिक संस्था, रेल्वे आणि इतर संस्थांच्या देखरेखीखाली असतो. या प्रॉव्हिडंट फंडाच्या टॅक्स इम्प्लिकेशनचा आपण अभ्यास करूया. एसपीएफमध्ये...
  July 29, 12:19 AM
 • स्वस्तिकासन हे एक सहजसुलभ बैठकीचे आसन आहे. अनेक यौगिक प्रकारांमध्ये हे आसन पायाभूत आसन म्हणून बघितले जाते. या आसनातील पायांची रचना स्वस्तिकातील एकमेकांना छेदणा-या रेषांप्रमाणे असते, म्हणून याला स्वस्तिकासन म्हणतात. यामध्ये पायांची घडी अशा प्रकारे घातली जाते की, अभ्यासकाला ती अवस्था सुखकारक वाटते. या आसन स्थितीमध्ये बसून ध्यान, चिंतन, मनन, विचारांचे बौद्धिक कार्य आरामशीरपणे दीर्घकाळपर्यंत करता येते, म्हणून या आसनाला सुखासन असेही म्हणतात. ल्लसावधानता : गुडघे कडक किंवा दुखरे असतील...
  July 29, 12:13 AM
 • गर्भारपणाचे शेवटचे काही आठवडे बहुतेक गरोदर स्त्रियांना अवघडलेपणामुळे खूपच जड जातात. मधल्या काही काळामध्ये कमी झालेले निरनिराळे त्रास पुन्हा सुरू व्हायला लागतात. पाठ दुखणे : पाठीच्या कण्याच्या वक्रतेमध्ये बदल झाल्यामुळे विशेषत: पाठीच्या खालच्या भागात दुखते. बसायला योग्य पद्धतीची खुर्ची वापरणे, तसेच खूप जास्त मऊ/कडक गादीवर न झोपणे, वजन प्रमाणापेक्षा जास्त न वाढू देणे; तसेच दैनंदिन शारीरिक हालचाली केल्याने फायदा होतो. श्वास घेण्यास त्रास वाटणे : या तीन महिन्यांत पोटाचा आकार बराच...
  July 28, 11:59 PM
 • रात्री 4.45 चा गजर लावून झोपले. सकाळी पाचला उठायचे होते. वेदांतच्या शाळेचा पहिला दिवस होता. अडीच वर्षांचा मुलगा शाळेमध्ये काय गोंधळ घालेल, हा विचार करता करता कधी झोप लागली कळलेच नाही. शेवटी दिवस उजाडला, गजर बंद करून, रेंगाळता रेंगाळता शेवटी पाच वाजता उठले. किती जरी झाला तरी व्यायाम सोडायचा नाही म्हणून मॉर्निंग वॉकला निघाले. वॉक कमी आणि विचारच जास्ती. 25 वर्षांपूर्वीचे दिवस आठवले. आई कशी मागे लागायची लवकर उठायला, शाळेत जायला आणि मला कसा राग यायचा. अगं, पाच मिनिट अजून झोपू दे, म्हणून जवळजवळ अर्धा...
  July 28, 11:47 PM
 • स्वत:चे कुटुंब - फॅमिली हा प्रत्येक व्यक्तीचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. समाजजीवनातलं सर्वात आद्य एकक म्हणजे कुटुंब. कुटुंबामुळे आपल्याला समाजात एक स्थान, ओळख, सुरक्षितता मिळते. प्रत्येक व्यक्तीच्या जन्मापासून ते अंतापर्यंतची शारीरिक, मानसिक आणि भावनिक वाढ उत्तम व निरोगी होण्यासाठी सुखी आणि स्वस्थ कौटुंबिक जीवनाची नितांत आवश्यकता असते. समाजशास्त्राच्या दृष्टीने विवाह संस्था व कुटुंब संस्था या सर्वांत जुन्या सामाजिक संस्था आहेत. आदिम काळापासून आजतागायत वेगवेगळे आघात सहन करत, बदल...
  July 28, 11:39 PM
 • जर तुमचे बाळ दीड वर्षापेक्षा मोठे असेल तर त्याला चित्र म्हणजे काय ते समजू लागले असेल. रंगीत शाईच्या पॅडवर बाळाची बोटं आणि अंगठा टेकवा. त्यानंतर ३-४ कागदांवर त्याला ती बोटं टेकवण्यास सांगा. त्याच्या अंगठ्याचे किंवा बोटांचे कागदावर उमटलेले ठसे सुकू द्या. त्यानंतर त्या ठशांवर तुम्ही पेनाने डोळे, केस, कान, नाक व कपडे रेखाटून मानवी आकृती पूर्ण करा. त्या आकृतीमधील पात्रांना गट्टू, बंटी, बबली, अशी नावं ठेवा. त्या पात्रांना मध्यवर्ती भूमिकेत ठेवून एक गोष्ट तयार करा. ते चित्रांचे कागद हातात घेऊन...
  July 28, 11:31 PM
 • संत्री घातलेला केशरी भातसाहित्य1 वाटी बासमती तांदूळ, 200 ग्रॅम साखर, 1 मोठे किंवा 2 लहान संत्री, 3 मोठे चमचे लोणकढी तूप, 4 दालचिनीचे लहान तुकडे, 4 लवंगा, 4 वेलदोडे, पाव चमचा केशर (दुधात भिजवावे), 1 मोठा चमचा संत्र्याच्या सालीचा किस, 8-10 बदाम व काजूचे काप, 10-12 बेदाणे, खास प्रसंगी चांदीचा वर्ख व चेरीज, 3-4 थेंब ऑरेंज रंग.कृतीतांदूळ धुऊन तासभर बाजूला ठेवावे. 4 कप आधण पाण्यात तांदूळ वैरावे व 12-13 मिनिटे प्रखर आचेवर अर्धवट शिजवावे. चाळणीवर निथळावे व त्यावर थोडे गार पाणी ओतावे. एका ताटात भात पसरून गार करत ठेवावा....
  July 28, 11:23 PM
 • द्राक्षेद्राक्षे हिरवी व काळी अशी दोन प्रकारची असतात. हिरवी द्राक्षे - रसरशीत दिसणारी पिवळसर हिरव्या रंगाची व लांबट आकाराची द्राक्षे चवीला एकदम गोड असतात, तर हिरवीगार दिसणारी द्राक्षे कच्ची व चवीला आंबट असतात. द्राक्षे तांबूस पिवळ्या रंगाची व डागाळलेली असल्यास व देठ काळे सुकल्यासारखे असल्यास ती द्राक्षे शिळी व जास्त तयार झालेली असतात व लवकर खराब होतात. काळी द्राक्षे काळ्याभोर रंगाची, टवटवीत, तांबूस घट्ट देठांची, ताजी असतात. पपईहिरवट पिवळसर रंगाची लांबट गोल आकाराची मध्यम रसरशीत पपई...
  July 28, 11:13 PM
 • आपण अंघोळ करून चेहरा खूप गरम पाण्याने धुऊन बाथरूमच्या बाहेर पडतो. त्यावर नुसती पावडर लावतो अथवा काहीच लावत नाही. अशा या संपूर्ण उघड्या त्वचेवर तीव्र ऊन व जोरदार वारा यांचा परिणाम होऊन त्यावरील बाष्प काढून टाकले जाते. त्वचेचे या दोन्ही गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी त्यावर प्रसाधनांचाच वापर करावा लागतो. तरुण मुलींना स्किन फ्रेशनर किंवा स्किन टॉनिक वापरता येईल. ज्यांची त्वचा तेलकट आहे अशांना अॅस्ट्रिजंटचा वापर करावा लागेल. किंवा कॅम्फर लोशनसुद्धा चालू शकतो. या दोन्ही गोष्टी ओल्या...
  July 28, 11:05 PM
 
जाहिरात

RECOMMENDED