Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • आपण प्रत्येक गोष्ट किती सहजपणे व केव्हा करावी, ते पाहूया. आपण गृहीत धरू की, बायकांना स्वत:ची सौंदर्यनिगा राखायला दिवसातून दोनदा वेळ मिळू शकतो. एकदा दुपारी जेवण झाल्यावर व दुस-यांदा रात्री झोपण्यापूर्वी. यापैकी कोणतीही वेळ त्वचासौंदर्याची निगा राखायला चालेल. फक्त प्रथम उत्साह व नंतर निरुत्साह असे व्हायला नको. नित्यनियमाने या गोष्टी केल्या तरच त्यांचा उपयोग होतो. चेह-याची निगा राखणा-या गोष्टी खालीलप्रमाणे- बालिका गटातील मुलींनी फक्त हीच प्रक्रिया रोज रात्री झोपताना करावी. यामध्ये...
  July 28, 10:56 PM
 • उष्ण प्रदेशात राहणाºया आपल्यासारख्या स्त्रियांना लेप हे वरदानच आहे, असे म्हणायला हरकत नाही. अगदी वयाच्या दहाव्या वर्षापासून ते साठीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे मास्क वेगवेगळ्या कारणास्तव लावता येतात. विशेषत: उन्हाळ्यात तर चेहºयाला तेल, क्रीम लावले म्हणजे अधिकच गरम होते. अशा वेळी खाली दिलेले लेप हे तर थंडावा निर्माण करणारी गुणकारी औषधेच ठरतात. या सर्व गोष्टी आपण नेहमी वापरतो व खातो. तेलकट त्वचा असणाºयांनी स्टार्च करावे. तेलकट त्वचेचे दोष यामुळे नाहीसे होतात.
  July 28, 10:46 PM
 • उष्ण प्रदेशात राहणाया आपल्यासारख्या स्त्रियांना लेप हे वरदानच आहे, असे म्हणायला हरकत नाही. अगदी वयाच्या दहाव्या वर्षापासून ते साठीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे मास्क वेगवेगळ्या कारणास्तव लावता येतात. विशेषत: उन्हाळ्यात तर चेहयाला तेल, क्रीम लावले म्हणजे अधिकच गरम होते. अशा वेळी खाली दिलेले लेप हे तर थंडावा निर्माण करणारी गुणकारी औषधेच ठरतात. या सर्व गोष्टी आपण नेहमी वापरतो व खातो. तेलकट त्वचा असणायांनी स्टार्च करावे. तेलकट त्वचेचे दोष यामुळे नाहीसे होतात.
  July 28, 10:46 PM
 • श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून पोलर सॅटेलाइट लाँच व्हेइकलच्या साहाय्याने जीसॅट-१२चे १५ जुलैला यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले आहे. ही आपल्या देशासाठी अतिशय अभिमानाची घटना आहे. भारतीय राष्टीय उपग्रह प्रणाली (कठरअळ)ची स्थापना १९८३ मध्ये करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत आधीच काही आठ-दहा उपग्रह आकाशात सोडण्यात आलेले आहेत. जीसॅट-१२ व पृथ्वीची स्वत:भोवती फिरण्याची वेळ जवळपास समान आहे. आपल्या देशात सुमारे ६ लाख खेडी आहेत व या ठिकाणी सुमारे ६० कोटी लोक वास्तव्य करून...
  July 26, 11:28 PM
 • छे छे! अंबाडा कोण घालतं आजकाल? अगं, असं काय करतेस? एथनिक ड्रेसवर अंबाडा छान दिसतो, त्यावर फुलांची वेणी बघ किती मस्त, शोभून दिसते. दोन मैत्रिणींचे हे संवाद एकले आणि माझी मीच प्रश्नात पडले. खरंच आहे का अंबाडा फॅशनमध्ये, की बारीक-छोट्या केसांची नुसती बुचडीच? तेवढ्यात जणू अंबाडाच तोयात बोलून गेला. मी आहे की तुमच्या डोक्यावर फ्रेंच रोल म्हणून बसलेला. नाव बदललं तरी काय? माझं रूप आणि शोभा तर तीच आहे. म्हणतात नं, तीच ती फॅशन परत परत येते, ते बहुतांशी खरंही आहे. अगदी सहा...
  July 22, 12:30 AM
 • उष्णता आणि धुळीमुळे चेह-याची त्वचा मरगळल्यासारखी होते. त्वचेवरील चमक कायम राहण्याकरिता ज्याप्रमाणे आपण स्वच्छता व आहाराला महत्त्व देतो त्याप्रमाणे व्यायामही गरजेचा आहे. रोजच्या वेळापत्रकात थोडा बदल करून फक्त दहा मिनिटे हे व्यायाम करून त्वचेची चमक परत मिळवू शकता. ताठ बसा. डोळे शक्य तितके मोठे करा. आधी घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने व विरोधी दिशेने डोळे फिरवा. डोळे बंद करून पाचपर्यंत आकडे मोजा. हीच क्रिया दहा वेळा करा. ल्लतोंड मिटा. नंतर एक दीर्घ श्वास घेऊन तोंड...
  July 22, 12:28 AM
 • इंग्लिशमध्ये सातवीपर्यंत ढ होते मी. मग मला आठवीपासून जोशी मॅडमकडे इंग्लिश शिकायला पाठवलं. त्या उत्तम शिक्षिका आहेत आणि फ्रेंडली आहेत. फॅमिली फ्रेंड असूनही त्यांनी मला इतर मुलांसारखीच वागणूक दिली. खरं तर क्लासमध्ये चुकांसाठी सगळ्यात जास्त धपाटे मीच खायचे. खूप प्रश्न विचारायचे; पण त्यांनी न कंटाळता दर वेळेला शांतपणे समजावून सांगितले. स्पेलिंगच्या खूप चुका करायचे. प्रत्येक स्पेलिंगच्या चुकीसाठी त्या माझा कान पिळायच्या. अजूनही आठवलं की कान लाल होतात. थट्टा,...
  July 22, 12:26 AM
 • गुरुपौर्णिमेनिमित्त केलेल्या आवाहनाला वाचकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला. त्यातील काही प्रतिक्रिया आज प्रसिद्ध करत आहोत... गुरू या शब्दातच सामर्थ्य आहे. जीवनाला गती देणारे बळ आहे. जीवनाला आकार, आधार देणारा गुरू भारतीय संस्कृतीत ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे. गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीत गुरूचे स्मरण करण्याचा दिवस. असं म्हणतात की, मातृऋण, पितृऋण व गुरूचे ऋण कधीच फिटत नाही. व्यक्तीच्या जन्मानंतर त्याचा पहिला गुरू असतो आई, मग आयुष्याला मार्ग दाखवणारा आपला मार्गदर्शक...
  July 22, 12:24 AM
 • गुरुपौर्णिमेनिमित्त केलेल्या आवाहनाला वाचकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला. त्यातील काही प्रतिक्रिया आज प्रसिद्ध करत आहोत... गुरू हा संतकुळीचा राजा, गुरू हा प्राणविसावा माझा या अभंगाप्रमाणेच माझ्या संगीत गुरुवर्या शुभदाताई पराडकर. संगीताचा प्रचंड व्यासंग, सुगम, तेवढीच आकलनास कठीण अशी गायनशैली. गजाननबुवा जोशी यांच्यासारख्या मातब्बर संगीतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली प्रगल्भ झालेली ख्याल गायकी. स्पष्ट शब्दोच्चार, अनाकलनीय लयकारी, चित्रविचित्र कल्पनेने बांधलेला...
  July 22, 12:22 AM
 • अनेक वर्षे आमच्या स्नेही असणा-या एक बाई माझ्याकडे आल्या. चेह-याची डावी बाजू वर ओढलेली, डावा पाय घासत घासत पाय-या चढत त्या आल्या आणि माझ्या लक्षात आले की त्यांना लकवा / पॅरालिसिस झाला आहे. खुर्चीवर बसकण मारल्यावर त्या म्हणाल्या, तीन आठवड्यांपूर्वी एकाएकी पॅरालिसिसचा अॅटॅक आला. डाव्या बाजूची शक्ती कमी झाली. आता बरे आहे. डॉक्टरांनी सांगितले, थोडे फिरत जा. म्हणून म्हटले, तुम्हाला विचारावे. मी विचारले, काही मधुमेह/उच्च रक्तदाब आहे का? हो, दहा-बारा वर्षांपासून आहे; पण गोळ्या चालू...
  July 22, 12:19 AM
 • गर्भारपणाचा हा काळ सर्वात सुखद काळ आहे. पहिल्या १२ आठवड्यांत रोज वाटणारी मळमळ, उलट्या या काळात जवळजवळ थांबतात व गरोदर स्त्री सुटकेचा नि:श्वास सोडते. या काळात भूक वाढायला लागते, तसेच अनेक वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खाण्याची इच्छा वाढते. एकत्र कुटुंबात राहत असेल तर तिचे खाण्यापिण्याचे डोहाळेही मनसोक्त पुरवले जातात. या मधल्या तीन महिन्यांच्या काळात गर्भाशयाचा आकार हळूहळू वाढायला लागतो; पण अजून खूप जास्त मोठा न झाल्याने अवघडलेपणा कमी असतो व सर्व हालचाली सहज शक्य असतात....
  July 22, 12:15 AM
 • रिस्क म्हणजे धोका. आपण दैनंदिन व्यवहारात करतो त्या सर्व गोष्टींत धोका असतोच. पैशांचे व्यवहार असोत की स्वयंपाक, प्रवास असो की परीक्षा किंवा मग तो नोकरी-धंदा असो. हे धोके कॉर्पोरेट पातळीवर कसे हाताळले जातात ते आपण पाहू या. पहिली पद्धत आहे ती म्हणजे धोके टाळण्याची. म्हणजे ज्या गोष्टीत आपल्याला धोका आहे असे वाटतेय ती गोष्टच न करणे. म्हणजे समजा एखादी योजना तुमच्या ऐकिवात आली आहे, त्यात खूपसे पैसे परतावा म्हणून मिळणार आहेत. पण अशी योजना देणारी कंपनी तुमच्या कधी ऐकिवात आली नाही किंवा...
  July 22, 12:12 AM
 • साता-याच्या जवळ असलेल्या एका छोट्याशा गावात राहणारी चाळिशीतली संगीता. भाऊ ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेला. धाकटी बहीण लग्नानंतर इंदूरला राहणारी. वडील काही वर्षांपूर्वी गेलेले. अविवाहित संगीता आणि आई दोघीच त्यांच्या भल्यामोठ्या घरात राहतात. घराभोवती थोडीफार शेती आहे, संगीता ती पाहते. कामाला गडीमाणसं आहेत, त्यांच्या मदतीने भाज्या, भुईमूग, असं काही तरी उगवते. एकदा हौशीने तिने मुंबईहून काही आर्टिफिशियल दागिने आणले आणि जवळपासच्या मैत्रिणींना दाखवले. त्यांना ते खूप आवडले म्हणून...
  July 22, 12:09 AM
 • त्या : अशिक्षित. आम्ही : उच्चशिक्षित. त्या : देशाच्या कुठल्या तरी खेडवळ कोप-यातल्या. आम्ही : आमचा जन्मच मुळी महानगरातला. त्या : महानगरीच्या काठावर आठ बाय दहाच्या झोपड्यांत राहणा-या. आम्ही : उपनगरातल्या फ्लॅट संस्कृतीत वाढलेल्या. त्या : दिवसाला पाच हंडे पाणी अख्ख्या घरादारासाठी पुरवणा-या. आम्ही : सकाळ-संध्याकाळ गरम पाण्याच्या शॉवरखाली रिलॅक्स करणा-या. त्या : पोटाची खळगी भरण्यासाठी कधी तरी दोन पायांमधल्या खळगीचा वापर करणा-या. आम्ही : समाजाने घालून दिलेल्या पावित्र्याच्या चौकटीत मानाने...
  July 22, 12:07 AM
 • प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे, असा आमच्या आईचा आग्रह असे. ती मला, रुप्याला, दादाला सहलीला पाठवी, स्कॉलरशिपला बसवी, गावात सर्कस आली तरी घेऊन जाई. पोहायला पाठवी. एवढेच नव्हे, तर मोदक करताना थोडी जास्त उकड काढून तिघांना मोदकही वळवायला बसवी. बाबा आईला विद्यापीठ म्हणत थट्टेने. मला नि रुप्याला विद्यादेवीच्या रूपात आई पीठ चाळते आहे, असे तेव्हा वाटे. शाळेत वक्तृत्व, निबंध स्पर्धा असल्या की आई भाग घ्यायला लावी. नंबर नाही आला तरी चालेल; पण भाग घ्यायचा, असे तिचे रोखठोक म्हणणे असे. रुप्याचे भाषण...
  July 22, 12:06 AM
 • वीरगावचा थरार समोर आला आणि माणुसकीने पुन्हा एकदा शरमेने मान खाली घातली. अकोले तालुक्यातील वीरगाव येथे घडलेली घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. पुरोगामित्वाचा डंका पिटणा-या महाराष्ट्रात अशा घटना घडणे घृणास्पद आहे. रविवार, दि. १० जुलैची पहाट नगर जिल्ह्यातील टेमगिरे वस्तीवरील एका कुटुंबाचे आयुष्य उजाड करणारी ठरली. वडिलांच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या दोन विवाहित मुलींवर जिवंतपणीच मरणयातना भोगण्याची वेळ दरोडेखोरांनी आणली. वीरगाव शिवारात पाच ते सात दरोडेखोरांनी घातलेला हैदोस महिलांच्या...
  July 22, 12:02 AM
 • पहाटेची वेळ योगाभ्यासासाठी सर्वात उत्तम. कारण त्या वेळी पोट रिकामे व हलके असते. ही वेळ ज्यांना सोयीस्कर नसेल त्यांनी दिवसभरात कुठल्याही वेळी रिकाम्या पोटी योगाभ्यास करावा. योगाभ्यास पूर्ण झाल्यावर अर्ध्या तासानंतर थोडे पेय किंवा फराळ घ्यावा, एक तासानंतर जेवण्यास हरकत नाही.एखाद्या निवांत, हवेशीर, कीटकविरहित व स्वच्छ जागी योगाभ्यास करावा. घरामधील एक छोटा कोपरा असला तरीही चालेल; पण तो हवेशीर व स्वच्छच हवा. कमीत कमी, हलके, स्वच्छ व सैलसर कपडे घालावेत. योगाभ्यास साध्या, स्वच्छ बैठकीवर करावा....
  July 15, 12:27 AM
 • वर्षाऋतू आता आपल्यात चांगलाच स्थिरावलाय. ज्येष्ठ महिन्याचा टप्पा पूर्ण करत आषाढस्य प्रथम दिवसे... म्हणत कवी कालिदासाची स्मृती जागवतोय. स्मृती कशी ती? ती तर आपली जगण्याची म्हणजेच सुंदर दिसण्याची प्रेरणाच!ही प्रेरणा साकार करायची तर तिला साथ हवी साडीचीच. साडी आपलं रूप इतकं सहजपणे आपल्याला हवं तसं बदलू शकते की बस्स... ही पाच ते नऊवार लांबीची सत्तिका (साडीचे मूळ संस्कृत नाव) साजशृंगार ते मानमरातब सर्व काही आपल्यास लेववून देते. म्हणजे फॉर्मल, कॅज्युअल, ब्राइडल, पार्टीवेअर, फेस्टिव इ. सर्व काही....
  July 15, 12:26 AM
 • लग्नानंतरच्या नव्या नवलाईचे दिवस लवकर संपतात व नवविवाहित तरुण-तरुणी इवल्याशा गोड बाळाची स्वप्ने बघायला लागतात. देवदयेने कोणताही अडथळा न येता साधारण ७५-८० टक्के जोडप्यांना लवकरच गर्भधारणेच्या बातमीचा आनंद घेता येतो. गर्भारपणाच्या या दिवसांत स्त्रीच्या शरीरात कोणते बदल होतात? या बदलांमुळे कोणती लक्षणे दिसतात? तिला कोणते त्रास होतात? कोणती काळजी घेतली पाहिजे? आहार कसा असावा, इत्यादी अनेक प्रश्नांकडे आपण पुढील ३-४ लेखांत नजर टाकणार आहोत.गर्भारपणाचा नक्की काळ किती व प्रसूतीची अपेक्षित...
  July 15, 12:23 AM
 • ही पॉलिसी कुटुंबातील सगळ्या व्यक्तींसाठी योग्य आहे. म्हणजे आई-वडील किंवा मुलं कोणीही घेऊ शकतात. कारण या पॉलिसीमुळे बचत, गुंतवणूक आणि इन्शुरन्स कव्हर मिळते. तुम्हाला हवा तसा प्लॅन तुमच्या विमा एजंटकडे उपलब्ध आहे का ते तपासा. मागील लेखात आपण काही प्लॅन बघितले जे इन्शुरन्स एजंटकडे उपलब्ध असतात. अजूनही काही प्लॅन आपण या लेखात पाहूया.एन्डोव्हमेंट इन्शुरन्स पॉलिसी ही पॉलिसी एक सेव्हिंग ओरिएंटेट पॉलिसी आहे. या पॉलिसीमध्ये आपल्याला कुटुंबासाठी एक प्रोव्हिजन मिळते. पॉलिसीवर जेवढ्या रकमेचा सम...
  July 15, 12:14 AM
 
जाहिरात

RECOMMENDED