जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • आई, मी दहावीनंतर सायन्स घेणार नाही. सायन्स मला आवडतं ग, पण पुढे झेपेल असं वाटत नाही, सोहन कळवळून बोलला. हे बघ, थोडा जास्त अभ्यास केलास तर नक्की जमेल. तुला इंजिनिअर झालेला आम्हाला बघायचा आहे. त्याकरिता तुला सायन्स घेणं आवश्यक आहे. अजून काही क्लासेस लावायचे असतील किंवा पुस्तकं हवी असतील तर तसं सांग, सोहनच्या आईने निक्षून सांगितले. आपण स्वत: गणित विषयात एम.फिल. केले आहे. सोहनचे वडीलदेखील इंजिनिअरिंगमध्ये गुणवत्ता यादीत आले आहेत. असे असताना आपला मुलगा अभ्यासात मागे आहे, या गोष्टीचे सोहनच्या...
  October 7, 06:11 AM
 • भारतातल्या अनेक राज्यांत वेगवेगळे उत्सव, सण साजरे होतात. त्यापाठीमागे त्या त्या सणाचे निश्चित महत्त्वही असते. ते सण साजरे करण्यात एक वेगळा आनंद असतो. मला अजूनही आठवतात ती म्हणजे भुलाबाईची गाणी. भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विनी (कोजागरी) पौर्णिमेपर्यंत भुलाबाई बसवायची. पाटावर रांगोळीने हत्ती काढून त्याभोवती सगळ्या मुलींनी फेर घेऊन गाणी म्हणायची. आजही ती मनात गुणगुणतात. त्यातीलच ही काही गाणी.. ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे, करीन तुझी सेवा, माझा खेळ मांडीला, वेशीच्या दारी, पारवा...
  October 7, 06:06 AM
 • खान्देशातल्या प्रत्येक उत्सवाला इथल्या मातीचा सुखद दरवळ येतो. गणेशोत्सवानंतरची भाद्रपद पौर्णिमा येते, ती मुली-महिलांसाठीचा भुलाबाई उत्सव घेऊन. लाडक्या गणरायाचे मातापिता पार्वती-शंकराचं रूप म्हणजे भुलाबाई आणि भुलोजी. मातीची सुंदरशी मूर्ती गावातल्या घराघरांत पुजली जाते. शहरातल्या धावपळीत मात्र काही ठिकाणीच या देवतेची स्थापना केली जाते. संपूर्ण कुटुंबात सौख्य नांदावे तसेच मुलींना नाचता, गाता, बागडता यावे हा त्यामागचा उद्देश. गणेशोत्सवात मुलांना नाचून आपला आनंद व्यक्त करता येतो...
  October 7, 06:01 AM
 • साधारणत: 150-300 नॉर्मल गर्भधारणांपैकी एकदा गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा होण्याची संभावना असते. 98} वेळा ही गर्भधारणा गर्भनलिकेत होते व 2} अशी गर्भधारणा बीजकोश, गर्भाशयाचे तोंड किंवा पोटात दुसर्या कोणत्या तरी जागी होऊ शकते. गर्भाशयाच्या बाहेर असलेला गर्भ का वाढत नाही? गर्भधारणेच्या प्रक्रियेत बीजकोषातून बाहेर पडलेले बीज गर्भनलिकेच्या आत जाते. योग्य वेळी स्त्री व पुरुषांच्या शारीरिक संबंधानंतर शुक्रजंतू गर्भाशयाच्या मुखातून गर्भनलिकेत जातात. या ठिकाणी स्त्रीबीज फलित होते. फलित झालेले...
  October 7, 05:56 AM
 • मॅडम, माझा मुलगा इंजिनिअरिंगला लागला आहे. चार-पाच दिवसांत तो मुंबईला जाणार आहे. अतिशय चंचल आहे. खूप महत्त्वाकांक्षी आहे पण कुणाचे ऐकून घेत नाही. त्याच्या मनाला योग्य वाटेल तेच करतो. राग खूपच येतो त्याला. रागात आल्यावर काय करेल ह्याचा नेम नाही. मला खूप काळजी वाटते त्याला पाठवताना. तुम्ही या त्याला घेऊन. आपण बोलूया. 18-19 वर्षांच्या त्या मुलाला घेऊन आई-वडील आले. तुझे नाव काय? किती टक्के पडले बारावीत? माझ्या नावाशी काय करायचंय तुम्हाला? मी आईवडिलांसाठी तुमच्याकडे आलो. मला योग वगैरे शिकण्याची...
  October 7, 05:51 AM
 • महाराष्ट्राची मुख्य देवता श्रीमायभवानी. तिच्या दरबारात सगळ्यांना मुक्तदार. तिचा नवरात्र महोत्सव हाच वास्तविक महाराष्ट्राचा राष्ट्रीय महोत्सव. प्राचीन काळचा इतिहास सोडा, छत्रपती श्री शिवरायांपासून हा नवरात्रोत्सव सबंध महाराष्ट्रात घरोघरी आणि गडोगडी थाटामाटाने साजरा होत असे. पेशवाईच्या नि त्यांच्या गणेश दैवताच्या स्तोमामुळे, तो उत्सव माजी पडला. लो. टिळकांनी त्याला सार्वजनिक स्वरूप देऊन त्या स्तोमाचे पुनरुज्जीवनच केले. आपण यापुढे नवरात्र महोत्सव साजरा करण्याचा परिपाठ चालू करून,...
  October 7, 05:48 AM
 • आपण जेव्हा एखाद्या योजनेत पैसे गुंतवतो तेव्हा त्याचा मिळणारा परतावा हा मर्यादित असतो आणि तो त्या संस्थेच्या व्यावसायिक बुद्धिमत्तेवर अवलंबून असतो. आपण आपल्या कौशल्याचा वापर करून जर तो पैसा आपल्याच व्यवसायासाठी वापरला तर?व्यवसाय हा पैसे कमावण्याचा मार्ग खूप कमी जण अवलंबतात. व्यवसाय न करण्यामागची मुख्य भीती असते ती त्यात इन्व्हॉल्व्ह असलेल्या धोक्याची. पण जर आपल्याला चांगला परतावा हवा असेल तर हा धोका आपण घेतलाच पाहिजे. महिलांना खरे तर व्यवसाय ही एक चांगली संधी असते स्वत:ला सिद्ध...
  October 7, 05:43 AM
 • राज्यश्री, दोन भावांमधली एकुलती एक, लाडकी. नावाप्रमाणे खरोखरीच राजाघरची धनाची पेटी. उत्तरेतील राज्ये जिंकून पूर्वेत आपला साम्राज्यविस्तार केल्यानंतर महाराज अशी उपाधी मिरवणा-या प्रभाकरवर्धनाची कन्या, कनोजपती ग्रहवर्म्याची राणी. ती सम्राट हर्षवर्धनाची भगिनी असे म्हटले म्हणजे आपल्याला ओळखीची वाटेल. चंद्रगुप्ताच्या कुलातील उत्तम सैन्यशास्ता, शांतिप्रिय आणि धर्मपालक राजा- जणू दुसरा अशोक, विक्रमादित्याच्या परंपरेतील अत्यंत बुद्धिमान नि चतुर पराक्रमी अशी सम्राट हर्षवर्धनाची जगाला...
  October 7, 05:38 AM
 • काही दिवसांपूर्वी शाळेतला जुना मित्र भेटला. त्याच्या मुलीच्या वक्तृत्व स्पर्धेतल्या भाषणासंबंधी आम्ही बोलत होतो. विषय दिला होता अतिथी, कब जाओगे? आणि पटकन माझ्या तोंडून बाहेर पडले, सगळ्याच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या दृष्टीने नको असणारा पाहुणा म्हणजे परीक्षा. परीक्षेसंबंधी शिक्षण खाते, शाळा यांचे निर्णय आणि मते आजपर्यंत सतत बदलती राहिली आहेत. दर वर्षी दर महिन्याला सरप्राइज टेस्ट असावी इथपासून वर्षामध्ये एकच परीक्षा असावी इथपर्यंत किंवा सर्वच परीक्षा लिखित स्वरूपात...
  October 7, 05:30 AM
 • दांडिया म्हटलं तर फक्त दोन दांड्या आणि मनसोक्त डान्स आणि म्हटलं तर झकास फॅशन, खूप काही दागिने, चटक रंग आणि सजलेले तरुण... नवरात्री पर्वात होणा-या दांडियाची हीच तर गंमत आहे की, चार वर्षांच्या मुलीपासून चाळिशी गाठलेली बाईपण अशी नाचते जशी सोळा वर्षांची तरुणी. गरबा आणि दांडिया हे रासलीलेचे प्रकार. गरबा टाळ्यांचा असतो आणि दांडिया हातात छोट्या दांड्या घेऊन खेळला जातो. या दांड्या 18 इंचांच्या असतात. ताल धरायचा आणि धूम नाचायचं. गाण्यापेक्षाही बीट्सला महत्त्व, ढोलकीची थापच गरजेची. आता तर डीजेच...
  September 30, 12:06 AM
 • नवरात्र जवळ येऊ लागल्यावर सगळ्या गुजराती बांधवांची खरेदीसाठी धांदल उडते. मोठ्या प्रमाणात व्यापारीवर्ग असलेल्या गुजराती समाजात नवरात्रीसाठी सर्व बायका घराबाहेर पडतात. निरनिराळे दागिने घालून नटण्यासजण्याची हौस शिकावी ती गुजराती भाभींकडूनच. अगदी नखशिखान्त नटण्यासाठी लागणाया निरनिराळ्या अॅक्सेसरीजनी मुंबईतला सर्वात मोठा बाजार असलेल्या भुलेश्वरमधले रस्ते फुलून गेले आहेत. गरब्यासाठीचा ड्रेसकोड म्हणजे चनिया चोली आणि पुरुषांचे केडिया. कच्छी बांधणीची पारंपरिक चनिया चोली कवड्या...
  September 30, 12:03 AM
 • जय जय भवानी । मनरमणी। मातापूरवासिनी। चौदा भुवनांची स्वामिनी।महिषासुरमर्दिनी। जय जय भवानी।नवरात्र जवळ आले की हा जयघोष दुमदुमायला लागतो. नवरात्र म्हणजे आदिशक्तीची, स्त्रीशक्तीची पूजा. पिढ्यान्पिढ्या एखादी परंपरा आपल्यापर्यंत चालत येते. याच परंपरेचे एक अनुष्ठान म्हणजे नारीशक्तीची पूजा. आज आधुनिक काळाच्याही पलीकडे आपण गेलो आहोत; पण नवरात्रीच्या निमित्ताने एकत्रित येणा-या स्त्रीशक्तीचे अफाट आणि विराट रूप पाहिल्यावर जुन्याचे आवरण गळून जाते आणि उरते ती फक्त एक पॉझिटिव्ह सिंड्रोम...
  September 29, 11:59 PM
 • नवरात्र म्हटलं की सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. श्रद्धेने नऊ दिवस देवीची पूजा, उपासना केली जाते. अनेक महिला या नऊ दिवसांमध्ये उपवासही करतात. चला, तर मग जाणून घेऊयात विज्ञानाच्या दृष्टिकोनातून उपवासाचे शरीरावर होणारे परिणाम आणि घ्यावयाची काळजी... अनेक महिला उपवास करून देवीची उपासना करतात. मात्र, देवीची उपासना करताना शरीराकडे दुर्लक्ष करू नका. आयुर्वेदात लंघनं परमौषधमं असे म्हटले आहे. पोटाला एक दिवस विश्रांती मिळावी म्हणून आठवड्यातून एक दिवस उपवास करावा. त्यामुळे शरीरात साचलेले...
  September 29, 11:57 PM
 • जगात जेव्हा असुरी शक्ती बलवान होऊन उत्तम आचारविचारांचा -हास होतो तेव्हा आदिशक्ती देवीरूपाने अवतीर्ण होऊन असुरांचा संहार करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याचेच प्रतीक म्हणून प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा होतो. नवरात्र शरद ऋतूत येत असल्याने शारदीय नवरात्र असेही संबोधतात. पार्वती, जगदंबा, गौरी, भवानी, उमा, महालक्ष्मी ही देवीची सौम्य रूपे आहेत, तर चामुंडा, दुर्गा, महाकाली या रौद्ररूपी देवी आहेत. महिषासुरमर्दिनी किंवा चामुंडा ही महाशक्तीची विविध नावे त्यांच्या पराक्रमाने...
  September 29, 11:56 PM
 • नमो देवी महामाये विश्वोत्पत्तिकरे शिवे।निर्गुणे सर्वभूतोशि मात: शंकर कामदेत्वं भूमि: सर्वभूतानां प्राण: प्राणवतां तथा। महाराष्ट्रात शक्तीचा जागर हरप्रकारे केला जातो. अखिल विश्वाला व्यापणा-या शक्तीने विविध रूपांतून असुरी शक्तीचा नाश करत नवनिर्मितीचा संदेश दिला आहे. ही शक्ती साडेतीन शक्तिपीठांच्या रूपाने जागृत आहे.पहिले पीठ कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे साडेतीन शक्तिपीठांपैकी पहिले पीठ कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे. शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते, नमस्ते गरुडारूढे...
  September 29, 11:53 PM
 • हळवी असली तरी आयुष्यातले चढ-उतार पार करण्याची स्त्रीची क्षमता, वयाच्या प्रत्येक टप्प्यावरच्या प्रसंगांना सहजतेने सामोरे जाण्याची तिची ताकद, धडपड लक्षात घेतली तर तिची जगण्याची आणि जगवण्याची प्रबळ इच्छाशक्ती लक्षात येते. कर्तव्याप्रती निष्ठा, कुटुंबाप्रती आस्था, सत्य आणि न्यायाचा आग्रह याबरोबरच परिश्रमाला आपला जोडीदार आणि इच्छाशक्तीला मार्गदर्शक बनवून स्त्रीचा आजही प्रवास सुरू आहे. स्त्रीमुक्तीऐवजी स्त्री समानता एवढाच काय तो प्रवासातला बदल. आपल्या आनंदाच्या परिघात शक्य...
  September 29, 11:50 PM
 • स्मृतिचित्रे (1934) हे लक्ष्मीबाई टिळक या साध्या गृहिणीने लिहिलेले आत्मचरित्र मराठीत सर्व थरांतल्या वाचकांनी गौरवलेला अक्षरग्रंथ आहे, हे निरनिराळ्या सर्वेक्षणांमधून सिद्ध झाले आहे. हे आत्मचरित्र म्हटले जाते; परंतु ते नकळत लक्ष्मीबार्इंचे पती रेव्हरंड नारायण वामन टिळक या कवीचे चरित्रही झाले आहे. ती आणि मी हे भवरलाल यांचे आत्मचरित्रही असेच कांताबाई जैन यांचे चरित्र झाले आहे. आपल्या विवाहसंस्थेचे हे अगम्य असे रूप आहे, की पती-पत्नी हे उशिरा विवाहोत्तर एकत्र येऊनही किती एकमेकांशी एकरूप होऊ...
  September 23, 07:53 AM
 • जळगावस्थित ज्येष्ठ उद्योगपती भवरलाल जैन यांचं ती आणि मी हे त्यांच्या पत्नी कांताबाई यांचं चरित्र (की भवरलालजींचं चरित्र?) काहीसं उशिरा माझ्या हाती आलं. पण हातात घेतल्यावर दोन दिवसांतच वाचूनही झालं. वाचून मनात विचारांचं काहूर उठलं. अवघ्या पावणेदोन वर्षांच्या कालावधीत तब्बल 18 हजार प्रती खपाव्या असं या पुस्तकात काय आहे, असं मला प्रथमदर्शनी वाटलं होतं. परंतु वाचल्यावर जाणवलं की मराठी मनाला, विशेषत: मराठी स्त्रीमनाला, भावेल असं या पुस्तकात एक मोठं आकर्षण आहे ते म्हणजे एकत्र कुटुंबपद्धतीचा...
  September 23, 07:51 AM
 • हा घास चिऊचा, तो घास काऊचा असे म्हणत तासन्तास आपल्या बाळाला भरवणारी आई मनातून खरंतर वैतागलेली असते. तरी आपला संयम ठेवून सगळ्या प्रकारचे पौष्टिक अन्न बाळाला कसे देता येईल, ह्याच चिंतेत रोज असते. दिल्लीच्या स्मिता श्रीवास्तवने ह्यावर छान उपाय शोधला. आपल्या पाच वर्षांच्या नंदिकासाठी रोजच्या जेवणात कार्टून्स, आगगाडी, क्रिसमस ट्री, पतंग, मोर आणले. स्मिताची ही पदार्थ मांडणीची कल्पकता तिने http://littlefoodjunction.blogspot.com ह्या ब्लॉगवर वाचकांशी शेअर केली आहेत. ह्या ब्लॉगवर स्मिताने फळ, भाज्या, भात, ब्रेड, मिल्क...
  September 23, 07:47 AM
 • सांग सांग भोलानाथ... भोलानाथ, उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर... आणि नकळत मला हसायला आले. पुलंच्या भाषेतल्या गणिताच्या पुस्तकातल्या गळक्या तोट्यांचे हौद इतिहासजमा झाले. गणिताच्या पुस्तकात फुलांची, मुलांची, पक्ष्यांची सुंदर चित्रे आली. पण गणित या विषयाची दहशत काही कमी झाली नाही. गणोबाच्या पेपरला खरेच पोटात गोळा येतो. शालेय शिक्षणाच्या पातळीवर गणित हा विषय ऐच्छिक करावा का, ही चर्चाही अधूनमधून होते. आता शासनाने शालान्त परीक्षेत दोन पातळ्यांवर गणित विभागून,...
  September 23, 07:41 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात