जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • कुर्तीजच्या मागच्या भागात आपलं ठरल्याप्रमाणे आपण तीन कुर्तीजचा समावेश (किमान) आपल्या वॉर्डरोबमध्ये केला असेलच. तर मग या वेळेस आपण त्याची सांगड कशी-कशी व किती वैविध्यपूर्ण करता येते हे पाहूया!कुर्तीजचे तिन्ही मुख्य प्रकार करता येतात - कॅज्युअल, फॉर्मल/ सेमी फॉर्मल व पार्टी वेअर, हे आपण पाहिलेलं आहेच. कसं? ते आता जरा डीटेलमध्ये बघूया. एखादी छानशी पिकनिक आहे, आपल्याला स्कर्ट घालायचाय (घेरदार - लांब किंवा मिडीवजा) तर त्यावर आपली कुर्ती ही लाइट कॉटन, मलमल, क्रश, पॉलिकॉट किंवा शिफॉनमध्ये कॅज्युअल...
  September 16, 06:52 AM
 • तिशी ओलांडल्यानंतर स्त्री-पुरुषांना निसर्ग फारशी मदत करत नाही. त्वचेमध्ये निर्माण होणारे नैसर्गिक तेल व बाष्प या दोन्हींचे प्रमाण उतरत्या क्रमात असते. त्यामुळे त्वचा निस्तेज दिसणे, त्यावर सुरकुत्या पडणे वगैरे वार्धक्याची लक्षणे या काळात दिसू लागतात. रोज नियमितपणे किंवा आठवड्यातून निदान तीन वेळा तरी चेहयाला पोषक द्रव्यांचा मसाज आवश्यक आहे. शरीराला व चेह-याला मसाज (मर्दन) करणे ही एक अतिप्राचीन कला आहे. त्वचेच्या थराखाली असलेल्या स्नायूंना चिवटपणा व लवचीकपणा यावा, त्यांची शिथिलता...
  September 9, 01:28 AM
 • तुडुंब भरलीस मातृत्वाने, फितूर जाहले तुजला अंबर कविवर्य विंदांच्या कवितेच्या या ओळी पावसाळ्यातल्या सुरुवातीच्या दिवसांत अनुभवास येतात. उन्हाच्या कडकडीत तापातून धरतीला पावसाने थंडावा तर मिळतोच, पण त्याचबरोबर तिच्या सृजनाने सगळीकडे हिरवाई पसरते. सोसण्यानंतर मिळालेलं हे मातृत्व. सगळ्यांनाच आनंदी करणारं, आल्हाददायक. आश्चर्यचकित करणारं. दोन-तीन वेळा पावसाच्या सरी येऊन जातात. नंतर अचानक ठिकठिकाणी हिरवी बारीकशी मखमल आजूबाजूला दिसू लागते. धरतीचं हे रुजणं दरवर्षीच आपण अनुभवतो तरीही...
  September 9, 01:25 AM
 • वाचक मित्र व मैत्रिणींनो, सर्वत्र विघ्नविनाशक, मंगलमूर्ती गणरायाचे आगमन झाले आहे. आनंद आणि चैतन्य भरून राहिले आहे. गणराया ही विद्येची देवता. सर्वांसाठीच बुद्धी देणारी देवता. श्रीगणरायांची अनेक रूपे आपल्याला ठाऊक असली, तरी त्यात चतुर गणराया हे रूप आपल्या मनाला फारच भावते. ब्रह्मांडाला प्रदक्षिणा करण्याऐवजी पटकन् माता-पित्याला प्रदक्षिणा करणारे, आपल्या सूक्ष्म नजरेने प्रत्येक गोष्टीतला सूक्ष्मार्थ टिपणारे, व्यक्त करणारे; म्हणूनच श्रीव्यासमुनींच्या सूक्ष्म सूत्राचा विस्तार...
  September 9, 01:21 AM
 • शलभ म्हणजे टोळ. टोळ जमिनीवर बसलेला असतो, तेव्हा त्याचा शेपटीसारखा मागील भाग वर उचललेला असतो. या आसनात दोन्ही पाय कमरेपासून उचलून जमिनीपासून दूर, वरच्या बाजूला ठेवावे लागतात. हात आणि हनुवटीपासूनचा नाभीपर्यंतचा शरीराचा भाग जमिनीवरच असतो. त्यामुळे हा आकृतिबंध जमिनीवर बसलेल्या टोळाप्रमाणे दिसतो, म्हणूनच या आसनाला शलभासन असे म्हणतात. पाठीचा कणा, विशेष करून कंबर आणि पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी या आसनाचा अतिशय उपयोग होतो. सावधानता - हर्निया, अॅपेंडिसायटिसचा त्रास असणायांनी किंवा नाजूक...
  September 9, 01:17 AM
 • साधारण १५-२० वर्षांपूर्वीची एक केस मला आठवते आहे. पहाटेच्या वेळी एक कोळी पेशंट हॉस्पिटलमध्ये आली. बरोबर फक्त माहेरची एक स्त्री नातेवाईक. प्रसूतीला अजून दोन ते तीन तास होते. बाळाचे वजन चांगले होते आणि पेशंटही खूप स्थूल होती. नैसर्गिक प्रसूती जरा कठीणच वाटत होती आणि शिवाय अचानक ऑपरेशन करायला लागले तर सही द्यायला नवरा हजर नाही व नातेवाईक तयार नाहीत. आयत्या वेळेला थोडेसे वरच असलेले बाळ चिमट्याने सुखरूप खेचून काढताना दमछाक झालीच! आणि नंतर मनोमन पूर्वी शिकाऊ असताना मिळालेल्या अनुभवाचे आभार...
  September 9, 01:11 AM
 • तुमच्याकडे अमुक अमुक मॉलचे/शॉपिंग चेन स्टोअरचे क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्हाला तुमच्या खरेदीवर ५% कॅश बॅक (पैसे परत) मिळतील किंवा काही टक्के डिस्काउंट मिळेल. पण आता जरा विचार करा. तुम्ही रोख पैसे दिले तर तुम्हाला डिस्काउंट मिळत नाही; पण तुम्ही क्रेडिट कार्डने पैसे दिलेत तर मात्र हा डिस्काउंट मिळेल, असे का? बरेचसे मॉल्स असा विचार करतात की, आता आपण २% डिस्काउंट देऊ; पण बहुतेक जण आपले क्रेडिट महिन्याच्या आत क्लिअर करत नाहीत. मग मॉल्स त्याच्यावर व्याज लावतात. हे क्रेडिट कार्ड स्वत: मॉलनेच...
  September 9, 01:05 AM
 • पुरुषांची कामेही त्यांच्याइतक्याच सफाईने करणा-या महिला आता प्रत्येक क्षेत्रात दिसतात; मग पेपर टाकणारा पण भाऊ कशाला, बाई का नाही? तर याही क्षेत्रात एक नवी आशा, उम्मीद दिसते आणि तिचे नाव आहे - आशा बापूराव खरात. पेपर बाल्कनीत फेकून जायचा नाही, दारात द्यायचा, तोही खाली टाकायचा नाही, कडीला लावायचा अशा लिखित-अलिखित भरपूर सूचना दिसल्या म्हणजे समजायचे की मुक्काम पोस्ट पुणेच. बाकी सर्व ठिकाणी पेपरवाले खालूनच वरच्या मजल्यावर पेपरची गुंडाळी करून फेकतात; पण ते पुण्यात चालत नाही. म्हणजे इथे रोज...
  September 9, 01:01 AM
 • काही वर्षांपूर्वी माय वाइफ्स मर्डर या नावाचा रामगोपाल वर्माच्या टिपिकल पठडीतला एक चित्रपट पाहण्यात आला होता. चित्रपटाच्या नावावरूनच चित्रपटाचं कथानक काय असावं याचा अंदाज येतो. अनिल कपूरच्या उत्कृष्ट अभिनयाने संपन्न असा हा चित्रपट पाहिल्यानंतर काय वाटलं? मनावर परिणाम करणारे वास्तव या चित्रपटात अधोरेखित झालेले असल्यामुळे ते मनाला भिडले. अगदी टोकाला जाणारं आणि अंतर्यामी टोचणारं कटू वास्तव दाखवणारा हा चित्रपट फारसा चालला नाही. कारण ब-याच वेळा समाजमनाच्या भळभळणा-या जखमा उघड्या...
  September 9, 12:54 AM
 • फेसबुकवर मला दोन दिवस सारखे मेसेज येत होते. ताई, मला तुझ्याशी बोलायचं आहे गं. तुझे दोन- तीन लेख मी वाचले. तू मला मार्ग दाखव ना. तिला माझ्याशी बोलायचे होते, दोन दिवस ती फार प्रयत्न करत होती. शेवटी वेळ काढून मी तिच्याशी बोलायचे ठरवलेच. तिचा नवरा तिला खूप मारझोड करतो, संशय घेतो, ती सांगत होती. मी ते ऐकतानाच इतकी हादरले, तर ती सहन कशी काय करत असेल, असा मनात प्रश्न आल्यावाचून राहिला नाही. मग त्याच दिवशी मी फेसबुकवर माझ्या बिनधास्त बोला या सदरात बायकांना त्यांच्यावर होणा-या अन्यायाबद्दल बिनधास्त...
  September 9, 12:48 AM
 • व्यक्तीचा स्वभाव दिसण्यापूर्वी दिसते ते तिचे व्यक्तिमत्त्व. म्हणूनच या व्यक्तिमत्त्वाला अधिक खुलविण्यासाठी टीनएजर्सपासून अगदी मध्यमवयीन व्यक्तींपर्यंत सर्वच जण कॉस्मेटिक सर्जरी करून घेण्याचा नवा मार्ग अवलंबत आहेत. हे वेड केवळ मोठाल्या शहरांपुरतेच मर्यादित नसून औरंगाबादसारख्या शहरातदेखील पसरू लागले आहे. सुंदर चेहरा आणि आत्मविश्वास यांचा खरंच इतका जवळचा संबंध आहे का? तुमचं नाक जरा जास्तच नकटं आहे? पोट जरा जास्तच सुटलंय? कॉस्मेटिक सर्जरी केल्याने लोकांच्या व्यक्तिमत्त्वात आणि...
  September 9, 12:42 AM
 • कॉलेजच्या पहिल्या दिवशी आमच्या शिक्षकांनी स्वत:ची ओळख करून दिली. त्यांनी आम्हा सर्वांना एका अनोळखी व्यक्तीशी मैत्री करण्यास सांगितले. तितक्यात माझ्या खांद्यावर कोणी तरी आपला मऊ हात ठेवला. मी चमकून मागे पाहिले. मी मागे वळून पाहिले तर एक आजी हस-या चेह-याने माझ्याचकडे पाहत होती. तिच्या हसण्याने ती अधिकच गोड दिसत होती. ती म्हणाली, हाय हँडसम, मी रोझ. मी 87 वर्षांची आहे. मी तुला मिठी मारू का? मी मोठ्याने हसलो आणि म्हणालो, हो... का नाही? आणि तिने मला आपल्या प्रेमळ मिठीत घेतले. इतक्या तरुण वयात तुम्ही...
  September 2, 01:04 AM
 • आज आपण एका ट्रेंडी आयटमवर नजर टाकूया. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिले ते पारंपरिक पोशाख प्रकार होते व त्यांची नवी व बदलती रूपे आपण पाहिली.आजचा पोशाख प्रकारच नव्वा आहे - एक नवआविष्कार - अर्थात कुर्ती. हे केवळ कुडता वा कुर्ताचे स्त्रीरूप समजू नये. कुर्ती खास करून शॉर्ट कुर्तीज हा एक स्वतंत्र आयटम आहे बरं!कुर्ती ही एक सेतू आहे - कमीज व वेस्टर्न वेअरमधल्या टॉपमधली... म्हणजेच ती एक पर्फेक्ट ब्लेंड दोन्हींतल्या हव्याहव्याशा वाटणाया सर्व गोष्टींचे! ज्या कोणी स्त्रिया वेस्टर्न वेअर घालू शकत नाहीत...
  September 2, 12:56 AM
 • ताणतणावांचा संबंध आरोग्यापेक्षा मानसिक व अध्यात्माशी जास्त आहे. (श्रीमद्भगवतगीता अध्याय २, श्लोक ६२, ६३) माणसाला आज खूप लवकर, खूप कमी श्रमात सर्वच पाहिजे, असे विनोबाजी म्हणून गेले; पण त्या वाक्यातल्या प्रत्येक शब्दावर आज प्रश्नार्थक चिन्ह लागले आहे.ताणतणाव येतो याचे एक कारण म्हणजे माझंच बरोबर, हे आहे. वस्तुत: बरोबर ते माझं, असं पाहिजे. या हट्टाग्रहामुळे तुम्ही वादविवाद जिंकता; पण माणसं तुटतात. दुसरं म्हणजे उसकी कमीज मेरी कमीज से सफेद क्यों २८ल्ल१िङ्मेी.यामुळे माणूस दुसयाची इर्षा, द्वेष...
  September 2, 12:50 AM
 • खरं म्हणजे हा टेन्शन शब्द जरा वेगळ्या प्रकारे लिहिता येईल,TEN SI(O)NS!! Ten Sins, म्हणजे दहा प्रकारची पापे! आपल्या एकूण जडणघडणीत आपल्या स्वभावात काही विलक्षण गंड तयार झालेले असतात. हे भोवरे आपल्याला नॉर्मल वागूच देत नाहीत. अशा विचित्र वागण्यामुळे आपल्या एकूणच जीवनात अनेक तणाव निर्माण होतात, आणि गंमत म्हणजे आपल्या कधी लक्षातही येत नाही की आपण आपल्या विचारात जरा बदल करून स्वत:ला तणावमुक्त करू शकतो. अशा ह्या स्वभावगंडांनाच मी आपली पापं म्हणतो. आज आपण त्यांची ओळख करून घेऊया. ह्या प्रक्रियेत आपण हे गंड कसे...
  September 2, 12:39 AM
 • आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव नाहीच अशा व्यक्ती शोधून सापडणे कठीणच. अगदी सहा महिन्यांच्या मुलापासून ते सत्तर वर्षांच्या म्हाता-यांना राग येतो अन् तणाव वाढतो. प्रत्येकाला कसली तरी टेन्शन असतातच. आपल्या मनात असुरक्षेची भावना असते. आतल्या आत आपण कसल्या तरी अनामिक भीतीने घाबरलेलो असतो. आयुष्यात आघात, अडचणी, समस्या, चिंता, आजार या सर्वांचा परिणाम प्रकृतीवर होतो. यातच आपण आत्मविश्वास गमावून बसतो. तरीपण या सर्व गोष्टींवर आपण मात करू शकतो. सर्वप्रथम तुमच्यातील सकारात्मक विचारांना, आचारांना...
  September 2, 12:35 AM
 • मी सहस्रबुद्धे. वय वर्षे २९. प्रमाणबद्ध बांधा. पाच वर्षांच्या एका मुलाची आई. प्रथमदर्शनी छाप पाडणारे व्यक्तिमत्त्व. मॅडम, मला माझ्या डॉक्टरांनी योगवर्गाला जा, फायदा होईल, असे सुचविले आहे; पण त्याआधी जरा सविस्तर माझ्या आजाराबद्दल सांगावे म्हणून मी आले.माझ्या उत्तराची वाट न पाहता तिने बोलायला सुरुवात केली. तशी माझी प्रकृती चांगली आहे; पण गळ्यापासून नाभीपर्यंत हात दाखवत, इथे सगळा प्रॉब्लेम आहे. म्हणजे पचनक्रियेच्या संदर्भातील तक्रारी जास्त आहेत, खाल्लेले पचन होत नाही. सारखे ढेकर येतात, पोट...
  September 2, 12:32 AM
 • प्रत्येक स्त्रीची अशीच इच्छा असते की, गरोदरपणाचा काळ रोगमुक्त अवस्थेत जावा. डॉक्टरही याच भूमिकेत असतात; परंतु तरीही काही जणींच्या बाबतीत दुर्दैवाने हे शक्य होत नाही. जर मातेला इतर कोणतेही आजार असतील, तर त्याचा विपरीत परिणाम या नऊ महिन्यांत तिच्यावर होतोच; पण तिच्या बाळावरही होऊ शकतो. शिवाय काही आजार असे असतात, ज्यामध्ये नैसर्गिक प्रसूतीदरम्यान धोकादायक प्रसंग उद्भवू शकतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा प्रकारच्या आजारांसाठी त्या स्त्रीला वेगवेगळ्या प्रकारच्या औषधयोजना...
  September 2, 12:29 AM
 • गणपतीबाप्पाच्या आगमनाच्या वेळी जितका उत्साह असतो, तितकेच वाईट वाटते ते गणपतीबाप्पाला निरोप देताना. आता तुम्ही म्हणाल, कालच घराघरात आवडत्या बाप्पाचं आगमन झालं आहे. दहा दिवस नुसती धम्माल करायची, देखावे पाहायचे, मंडळांच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा; त्यात हे विसर्जन मध्येच कुठून आलं? बरोबर आहे तुमचं. पण ज्यांच्या घरी दीड दिवसाचा, पाच दिवसांचा किंवा सात दिवसांचा गणपती असतो त्यांना तर विसर्जन करावेच लागणार ना! मग अशा वेळी हौसेनं सजावट केलेल्या मखरातून बाहेर काढून गणपतीबाप्पाची पूजा...
  September 2, 12:24 AM
 • गणपतीबाप्पा मोरयाच्या गजरात कालच घरोघरी गणरायाचे आगमन झाले आहे. मराठी संस्कृतीचा मानबिंदू म्हणून गणेशोत्सवाचे नाव घेतले जाते; मात्र गणरायाच्या चरणी नितांत श्रद्धा ठेवून काही अमराठी बांधवांनीही या लाडक्या पाहुण्याला घरातही स्थान दिले आहे.गणपती घरात आले म्हणजे त्याच्या पूजेअर्चेसंबंधात खूपच अटी पाळाव्या लागतात. त्याचे सोवळे-ओवळे, उजव्या सोंडेच्या गणपतीचा कठोरपणा या सर्व गोष्टींमध्ये अडकल्याने देवावर केवळ श्रद्धा असावी लागते या सत्यापासून आपण अलिप्तच राहतो. मीरा रोड येथे राहणारे...
  September 2, 12:13 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात