Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • शाळेमधे सायलीने छबीदार छबी या गाण्यावरती सादर केलेली लावणी मला आजही आठवते. हिरव्यागार नऊवारी साडीतली लहानगी सायली आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. प्रख्यात सिने-नाट्य कलावंत दिलीप घारे यांनी आपल्या मुलीची सायलीच्या लहानपणच्या आठवणी सांगायला सुरुवात केली आणि एक-एक आठवण अलगद बोलती झाली. सायली अवघ्या आठ वर्षांची असेल ज्यावेळी ती पहिल्यांदा स्टेजवर नाटकासाठी उभी राहिली होती.अरविंद जगताप च्या पुन्हा एक गांधारी या नाटकात तिने काम केले होते. त्या वेळचे तिचे पाठांतर, प्रसंगावधान, निरीक्षणशक्ती...
  June 17, 12:20 PM
 • साहित्य* 250 ग्राम बटर/मार्गारिन* 250 ग्राम साखर* 4 अंडी* 150 ग्राम मैदा + 150 ग्राम कॉर्न स्टार्च किवा आरारुट* 3 चमचे बेकिंग पावडर* 1 चमचा वॅनिला अर्क* 4 चहाचे चमचे कॉफी* 2 चहाचे चमचे कोको* 2 चमचे रम (आॅप्शनल)* 2 मोठे चमचे दूध* गार्निशिंगसाठी- 2 चमचे किसलेले व्हाइट चॉकलेट कृती* बटर फेटून घेणे, साखर घालून भरपूर फेटणे. अंडी घालून भरपूर फेटणे. मैदा+ आरारुट+ बेकिंग पावडर घालणे व फेटणे. दूध घालून थोडेसे फेटून मिश्रण एकजीव होईल असे पाहणे. * ह्या मिश्रणाचे 1/3 आणि 2/3 असे दोन भाग करून वेगवेगळ्या भांड्यात काढून घेणे. * 1/3 भागात...
  June 17, 12:11 PM
 • आपण आपल्या दैनंदिन वेळापत्रकाकडे एक नजर टाकली तर आपल्याला एक लक्षात येईल की आपण एखादी गोष्ट करतो त्यामागे काही विचार असतो. आपल्याला कसे राहणीमान हवे आहे त्यानुसार आपण कृती असतो.कंपनीचाही एक विचार असतो त्यानुसार तिची धोरणे असतात. उदा. तिला आपल्या processes मध्ये कमीत कमी wastage हवा असतो अथवा आपल्या Process ecofriendly व्हाव्यात असे वाटते. तेव्हा आपण म्हणू शकतो की आता आपल्याला आणि कंपनीलाही काय हवेय ते माहीत आहे. पण ते कसे साध्य करायचे त्यासाठी एक Management tool उपयोगात येते, ते म्हणजे Benchmarking. Benchmarking म्हणजे सतत identify करून,...
  June 17, 11:28 AM
 • लग्नापूर्वी योग्य समुपदेशन, मार्गदर्शन मिळाले असते तर खानदानी जगण्यातला काच कदाचित तिला वेळेवर उमगला असता आणि लग्न मोडून दोन जीवांची आणि कुटुंबांची झालेली फरपट कदाचित टळली असती. हल्ली मुला-मुलींना जरा ब-यापैकी नोकरी लागली की हळूहळू त्यांच्या लग्नाचा विचार सुरू होतो. वेगवेगळ्या विवाह मंडळांतून नावे नोंदवली जातात. वधुवर परिचय मेळाव्यांतून पालकांबरोबर हजेरी लावली जाते. फोटोंच्या, परिचयाच्या, पत्रिकेच्या प्रती, ठिकठिकाणी पत्रे आणि उत्तरे पाठवणे, चहा-पोह्यांच्या भेटी-कार्यक्रम ठरवणे...
  June 17, 11:01 AM
 • वंशाला दिवा देण्याची सर्व जबाबदारी फक्त स्त्रीवरच आहे, अशीच मानसिकता आजही आपल्या समाजात जास्त प्रमाणात आढळते. परंतु वैद्यकीय शास्त्र सांगते की, याला स्त्रीप्रमाणेच पुरुषही कारणीभूत आहे.प्रजनाची आस ही मानवामध्ये असलेली अत्यंत मूलभूत आणि प्रबल इच्छा आहे. दुर्दैवाने ती पुरी न झाल्यामुळे येणा-या निराशेला, दु:खाला साधारणत: २० टक्के जोडप्यांना सामोरे जावे लागते.साशंक मन:स्थितीत आलेली स्त्री चाचरत सांगते, लग्नाला २ वर्षे झाली, अजून... त्या स्त्रीच्या व तिच्या नातेवाइकांच्या डोळ्यांत काहीसे...
  June 17, 10:01 AM
 • योगशास्त्र हे मुख्यत: प्रायोगिक शास्त्र applied science किंवा experimental science असल्यामुळे त्यात सैद्धांतिक भागाबरोबर किंवा त्यापेक्षा अधिक महत्त्व प्रयोगाला किंवा साधनेला आहे. म्हणूनच महामुनी पतंजलींनी योगदर्शनामध्ये चित्तवृत्तींच्या निरोधाचे उपाय, क्रियायोग, साधनेच्या मार्गात येणारे अडथळे आणि ते दूर करण्यासाठी ध्यानादी प्रकार सांगितले आहेत. ते म्हणजेच योगाची आठ अंगे किंवा अष्टांग योग होय.ही आठ अंगे मुख्यत्वे दोन विभागांत आहेत. बहिरंग योग - ज्यात यम, नियम, आसन, प्राणायाम येतात आणि अंतरंग योग - ज्यात...
  June 17, 09:41 AM
 • अभिनयातली तिची गती पाहून आम्ही नसिरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग स्कूलमध्येही पाठवले होते. मॉडेलिंग, रॅम्प वॉक वगैरेनंतर आता पुन्हा ती अभ्यासाकडे वळलीय. फावल्या वेळात कधी पाककलाही आजमावते.मुलगा हवा किंवा मुलगी हवी असे मला आणि मनालीला कधी वाटले नाही. दोघांनाही आम्ही सारख्याच प्रेमाने वाढवणार होतो. फक्त सशक्त मूल हवं एवढीच इच्छा होती. नकुल झाला तेव्हा मी भारतात होतो. मुलगी पल्लवी झाली तेव्हा मात्र श्रीलंकेविरुद्ध मालिकेत खेळत होतो. त्या वेळी कानपूरला कसोटी सामना सुरू होता....
  June 17, 09:33 AM
 • आजच्या मुली, नव्याने लग्न झालेल्या स्त्रिया आणि त्याचबरोबर आजचे तरुणदेखील, लग्नाच्या उंबरठ्यावर उभे असलेले व तो उंबरठा ओलांडलेले पुरुष असाच विचार करताना दिसतात.परवाचीच गोष्ट. दादर स्टेशनला मी ट्रेन पकडली. आत शिरताच खिडकीजवळची एक जागा मला रिकामी दिसली. माझ्यासोबत चढलेल्या इतर कोणत्याही बाईचं लक्ष जाण्याआधी मला ती जागा पकडायची होती. मी पटकन जाऊन बसले. बाहेर ढग भरून आले होते. थंड वारा... त्यात रिपरिप पाऊस... आहा... किती छान वातावरण झालं होतं! मस्तच. माझी न्याहाळणी चालूच होती. पण तितक्यात माझ्या...
  June 17, 09:29 AM
 • नुकतंच एका वर्तमानपत्रात वाचनात आलं की योगासनं करून गुडघ्यांना इजा होते आणि आपल्याकडल्या बहुतेक योगगुरू-महाराज-बाबांच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. सुमारे वर्षभरापूर्वी एकूण प्रकृती स्वास्थ्यासठी योगासनांना सुरुवात केल्याच्या पार्श्वभूमीवर ही बातमी अंमळ धक्कादायकच होती. अतिशय सुखावह वाटणारं वज्रासन या गुडघेदुखीला कारण आहे हे वाचल्यावर तर काय करावं हेच सुचेना झालं; पण नंतर वाटलं की, असं विरोधाभासी किंवा वादग्रस्त वाचनात येण्याची ही काही पहिली वेळ नव्हती.सर्व...
  June 17, 09:12 AM
 • संसार आनंदाने फुलवत नेण्याऐवजी तो मोडू नये याचीच जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळे एक प्रकारची सामाजिक अस्वस्थता, असुरक्षितता सर्वत्र प्रत्ययाला येते. वटपौर्णिमा नुकतीच साजरी झाली. त्यानिमित्ताने...नुकतीच वटसावित्री पौर्णिमा होऊन गेली. जरी-काठाच्या साड्या घालून पूजेचे तबक हातात घेऊन वडाच्या झाडाकडे उत्साहाने जाणा-या स्त्रिया ठिकठिकाणी दिसत होत्या. अक्षय्य सौभाग्यासाठी वडाला साकडं घालणा-या आणि या पूजेने अखंड सौभाग्यवती होऊ, अशी श्रद्धा असणा-या या स्त्रियांना जन्मसावित्री हो असा...
  June 17, 09:06 AM
 • कर्णभूषणे हा स्त्रियांचा सर्वात प्रिय अलंकार असून तो अत्यंत प्राचीन अलंकार आहे. ऋग्वेद तसेच अर्थवेदात याचा उल्लेख आढळतो. आधुनिक काळात विविध धातूची, विविध आकारांची, विविध नाजूक नक्षीची कर्णभूषणं बनवली जातात. कर्णभूषणांमध्ये मोत्यांची कुडी, झुपके, वेल कुडकं, बुगडी यांची चलती आहे. हल्लीच्या काळात या प्रकारची आभूषणे फारच प्रचलित आहेत.कुंडल व कर्णिका अशा दोन प्रकारांत कर्णभूषणे वापरली जायची. कर्णिका कानाच्या वरच्या भागात, तर कुंडल खालच्या भागात घातली जायची. सापाच्या वेटोळ्याप्रमाणे...
  June 10, 03:14 PM
 • ब्युटी पार्लर हा प्रकार खेड्यापाड्यातल्या गल्लीबोळात पोहोचायच्या अनेक वर्षे आधी, तब्बल 45 वर्षांपूर्वी, माया परांजपे यांनी ब्युटिक हे पार्लर मुंबईत खार येथे सुरू केले. हा प्रवास उत्तरोत्तर अधिकाधिक महिलांना सुंदर करत आणि त्यांना सौंदर्यसाधना शिकवत आजही सुरू आहे. 67 वर्षांच्या मायाताई आजही आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवण्याचे काम करतात. हेअरकट करताना त्यांचा झपझप चाललेला हात आपल्याला स्तिमित करतो. याच मायाताई घेऊन आल्या आहेत सौंदर्य राखायचे कसे, यासाठी काही खास टिप्स. आपल्याकडला...
  June 10, 03:08 PM
 • लग्नानंतर आयुष्य वेगळं वळण घेतं. माहेरच्या वाटेतल्या ओळखीच्या खुणा इथं सासरी कुठेच सापडत नाहीत. सासरची ही वाट निराळी. यावर भेटणाया व्यक्ती वेगळ्या. तरी सुरुवातीचे गुलाबी स्वप्नांचे सप्तरंगी दिवस आठवले की, आजही मन ताजंतवानं होतं. तेव्हा नुकताच सुखाचा कोश विणायला सुरुवात झाली होती. सासरची माणसं, त्यांचे स्वभाव यांची ओळख हळूहळू होत होती. लग्नाला जेमतेम सहा महिनेच झाले होते. वीस मे, सासरी आल्यावरचा पहिला वाढदिवस!सकाळी नवयाच्या शुभेच्छांची साद कानावर आली आणि मी भानावर आले. घड्याळाकडे लक्ष...
  June 10, 03:00 PM
 • वाढदिवस साजरा करण्याची पद्धत जुनी असो अथवा नवीन; वाढदिवस साजरा करण्याची मनापासूनची इच्छा आणि त्यादृष्टीने केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरतात. होणारे सेलिब्रेशन सर्वांच्या मनापासून असेल तर साध्या-साध्या गोष्टीतही आनंद वाटतो. वाढदिवस अविस्मरणीय होतो. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण. पती-पत्नीचा एकमेकांवरील विश्वास, प्रेम आणि आदर यावरच तर संसाराचा गाडा सुरू असतो. या गाड्याची दोन्ही चाके मजबूत असतील तर जीवनात येणाया प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची शक्ती आपोआप...
  June 10, 02:46 PM
 • पालकांच्या प्रेमाच्या, डोळस स्वीकाराच्या आणि मजबूत आधाराच्या आकाशाखाली फुलणे, वाढणे, बहरणे हा प्रत्येकच मुलाचा जन्मसिद्ध हक्क असतो. मग त्याला या मुलांचा अपवाद का? पर्यायानं ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. जबाबदारी उत्तम निभावण्यासाठी हवे त्या विषयाचे ज्ञान आणि प्रामाणिक प्रयत्न.नु कतीच एका मुंजीला गेले होते. घोळक्याघोळक्यांत सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या. पुण्यात कार्यासाठी हवं तेव्हा कार्यालय मिळणं, मुंबईत जागा मिळणं आणि हव्या त्या शाळेत, कॉलेजमध्ये प्रवेश मिळणं अवघडच... नव्हे,...
  June 10, 02:39 PM
 • बीजनलिकेच्या टोकाशी असलेल्या बोटांच्या अकाराच्या फ्रिंब्रियांमुळे हे स्त्रीबीज बीजनलिकेमध्ये शिरते. बीजामध्ये फलित होण्याची क्षमता साधारणत: २४ तासांपर्यंत असते. या कालावधीत जर शुक्रजंतू उपलब्ध झाले तर गर्भधारणा होण्याचा संभव असतो. अ से म्हणतात की, या जगात अगदी तंतोतंत आपल्यासारखी दिसणारी एकूण ७ माणसे असतात. पण मला वाटते की, सर्वसाधारणत: कोणालाही अशी व्यक्ती भेटलेली नसते. केवढे मोठे आश्चर्य आहे ना हे? इतकी विविधता आणि तरीही मूलभूत कार्यपद्धतीमध्ये १०० टक्के समानता!खरोखरच निर्मिती...
  June 10, 01:32 PM
 • एका ज्येष्ठ डॉक्टरच्या ओपीडीत बसले होते. नेहमीप्रमाणेच रुग्णांची गर्दी होती. डॉक्टरांचा योग थेरपीवर विश्वास होता. त्यामुळे विशिष्ट रुग्णांना आवश्यकतेनुसार योग शिकविणे हे माझे काम मी करत होते. तेवढ्यात एक स्थूल बाई डॉक्टर, गुडघे, कंबर फार दुखते, चालताना धाप लागते, अशी तक्रार घेऊन आल्या. वजन, रक्तदाब आणि इतर तपासण्या झाल्यावर डॉक्टर म्हणाले, औषध घेऊ नका, फक्त वजन कमी करा. कमरेचे व्यायाम केले की दुखणं आटोक्यात येईल. मला म्हणाले, मॅडम, ह्यांना कंबरदुखी कमी होण्यासाठी योगासन शिकवा.मी त्यांना...
  June 10, 01:18 PM
 • महत्त्वाकांक्षी, करिअर वूमन आणि नातीगोती सांभाळणारी केअर टेकर गृहिणी या दोन्ही अवघड जबाबदाया पार पाडणारी अशी आजच्या आधुनिक स्त्रीची सार्थ ओळख. अशीच एक गृहिणी लता प्रताप पाटील यांनी एका व्यवसायाच्या वाटेवर गेल्या पंधरा वर्षांत मोठी उद्योगभरारी मारली आहे. त्यांचा जीवनप्रवास पाहिला तर प्रत्येक वेळी प्रतिकूल परिस्थितीत मार्ग काढत जाण्याची वृत्ती सहज ध्यानात येते. बारावीला असताना लग्न झाले. लग्नानंतर भेंडा (नेवासा) साखर कारखान्यावर क्वार्टर्समध्ये एकाकी राहण्याची वेळ आली; पण दुर्दम्य...
  June 10, 01:12 PM
 • नटरंगफेम सोनाली कुलकर्णी नुकतीच दिव्य मराठीच्या कार्यालयात आली होती, तेव्हा तिने मधुरिमाचा पहिला अंक चाळला आणि वाचकांना शुभेच्छा दिल्या.
  June 10, 01:02 PM
 • खर्च आणि त्यावरील नियंत्रण हे आपण मागील लेखात वाचले. आपण बघितलेच आहे की, खर्चावर नियंत्रण करण्यासाठी तो identify होणे महत्त्वाचे असते.खर्चाचे आणखीही काही प्रकार असतात. ते जसे कंपनीसाठी लागू होतात तसेच ते दैनंदिन व्यवहारामध्येही दिसून येतात. ते प्रकार म्हणजे Fixed Cost, Variable Cost, Semi-variable Cost. Fixed Cost म्हणजे असे खर्च जे दर महिना अथवा वर्षाला करावेच लागतात. उदा. आॅफिसच्या जागेचे भाडे. Variable Cost म्हणजे असे खर्च जे आपल्या गरजेवर अवलंबून आहेत. म्हणजे उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल. जसे उत्पादन करायचे असेल त्या कच्च्या...
  June 10, 12:58 PM
 
जाहिरात

RECOMMENDED