Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • मोठ्या शहरातला मोठा बंगला. प्रशस्त हॉल. समोर बागबगीचा, फाटक, गाडी, गॅरेज सारं कसं आलिशान. जेवण झालं होतं, विश्रांती पण झाली होती. हॉलमध्ये सुमती पाठीमागे हात बांधून अस्वस्थपणे फेया मारीत होती. मनात विचारांचं वादळ घोंघावत होतं. काय करू? मीरा तिची मैत्रीण. तिनं किती योग्य सल्ला दिला होता, याचीही तिला जाणीव झाली. आता काही तरी निर्णय घेतलाच पाहिजे, हे तिच्या लक्षात आलं. हे असं इथलं एकटेपण अंगावर यायला लागलं आहे. तिकडे आपल्या गावी एकटीच होते; पण सारा परिसर, खिडक्या-दारं तिच्याशी बोलायची....
  June 10, 12:44 PM
 • सध्या सगळीकडेच विमेन इन पॉवर या विषयावर चर्चा होत आहे. स्त्रियांना अनेक आघाड्या एकदम सांभाळाव्या लागतात हाच चर्चेचा सूर पहावयास मिळतो. प्रत्येक ठिकाणी आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी पुरुषांपेक्षा अधिक कष्ट घ्यावे लागतात, तेव्हा कुठे बाईचा प्रभाव पडतो, यश मिळते; परंतु कित्येकदा अंतिम यश मिळाले नाही तरी प्रभाव कमी होत नाही. याचे ठळक उदाहरण म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई.लक्ष्मीबाईचा जीवनारंभ आणि अंत यांमधल्या अवकाशाचा तिने केलेला प्रवास स्तिमित करणारा आहे. दुस-या बाजीरावासारख्या...
  June 10, 11:48 AM
 • कॉटन कुर्ते आणि स्टोल्सचा जमानाचु भती जलती गर्मी का मौसम आया... वाढलेल्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत असल्याने मराठवाड्यात सगळ्यांच्या तोंडी सध्या हेच एेकायला मिळत आहे. पण अशा गरम वातावरणातही आपण मात्र कूल दिसावं, असं प्रत्येकीलाच वाटत असतं. त्यामुळे या हॉट हॉट वातावरणाचा सामना करण्यासाठी स्टोल्स आणि सुती कुडत्यांनी सध्या बाजार फुलून गेलाय. केवळ डोक्याला बांधता येणारा रुमाल आता काहीसा आउटडेटेड झाल्यासारखा वाटतो. त्यामुळे उन्हापासूनही संरक्षण आणि वेळ पडल्यास ओढणीसारखे वापरता...
  June 4, 12:56 PM
 • गव्हाच्या रव्याची खिचडीसाहित्य .गव्हाचा रवा किंवा लापशी रवा एक वाटी, पाव ते अर्धा वाटी (आवडीनुसार आणि सोसेल त्या प्रमाणात) दाण्याचे कुट, जिरे चमचाभर, हिरवी मिरची फोडणीत चवीनुसार, मीठ - साखर चवीनुसार, पाणी, ओले नारळ किंवा सुक्या खोब:याचा कीस दोन चमचे सजावटीसाठी, कोथिंबीर आणि फोडणीसाठी तेल किंवा तूप.कृती . ही पाककृती तीन प्रकारे करता येते.1. गव्हाचा रवा अडीच तास पाण्यात भिजवून ठेवावा. कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात जि-याची फोडणी करावी. मिरची घालावी आणि रव्यातले पाणी पिळून तो रवा घालावा. रवा...
  June 4, 12:36 PM
 • टेस्टी टेक अवेसंपूर्ण तयारी म्हणजे अर्धी लढाई जिंकणं, असं म्हणतात. रोज सकाळी स्वयंपाकघरात चहा-डबा-न्याहारी-जेवण, चहा- नाश्ता-जेवण ही टप्प्याटप्प्यातली लढाई आपल्यापैकी बहुतेकींच्या नशिबी असतेच. या लढाईवर निघण्याआधी आपल्याला ब:याच प्रकारे तयारी करणं शक्य असतं. रात्री भाजी चिरून ठेवणं, पोळ्यांसाठी कणीक भिजवून ठेवणं अशी तयारी सगळ्याच जणी करतो. स्वयंपाकघरातल्या या लढाईत कोणती अस्त्रं, म्हणजे उपकरणी आपल्याला वापरता येतील त्याची आपण माहिती करून घेऊ.फ्रेंच किंवा शेफ्स नाइफ : या सुरीचं पातं...
  June 4, 12:23 PM
 • आज मी 53 वर्षांची आहे, दोन मुली आहेत. एक कमावती, तर एक शिकते आहे. नव-याची नोकरी उत्तम आहे. गेल्या दहा वर्षांपासून माझा वाढदिवस खूप दणक्यात साजरा होतो. नवरा आणि मुलीच नव्हे, तर मैत्रिणीसुद्धा आठवण ठेवून काहीतरी देतात, मध्यरात्री बारा वाजताच केक कापला जातो, छान जेवण होते. पण तरी दरवर्षी मला माझा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आठवतोच. तीसहून अधिक वर्षे झाली लग्नाला आता. माझे माहेर ठाण्यातले तर सासर देशावरचे, गावाकडचे.सासूबाई पूर्णपणे निरक्षर, नव-याने मुंबईत नोकरी करून पाठवलेल्या पैशावर संसाराचा गाडा...
  June 4, 12:15 PM
 • पूर्वीच्या काळी होत असे तसेच माझे लग्न झाले. म्हणजे कांदे-पोहे, चहा आणि प्रश्रोत्तरे वगैरे. मी माहेरची देशस्थ, तर 'हे' पक्के कोकणस्थ. लग्न झाल्यावर हा फरक तीव्रतेने जाणवायचा. सासरे आता काय करत आहेत, यावरून घड्याळात किती वाजले आहेत, याचा अंदाज यायचा. घरी सर्वांनाच वाचनाची आवड. त्यात मी ग्रंथपाल असल्याने मलाही छान वाटले. आमचे हे रोज बॅडमिंटन खेळतात, पण मी मात्र कॅरमवाली.लवकरच मी नवीन घरी स्थिरावले. प्रत्येक महिन्यात काही ना काही सण असायचेच. ते सर्व रीतिरिवाजाप्रमाणे होत असत. बघता बघता माझा...
  June 4, 12:09 PM
 • कायदा आणि समाज यांचं अतूट, अजब नातं आहे. कायद्याच्या विद्यार्थ्यांना ज्युरिसप्रुडन्सचा (कायद्याचे तत्त्वज्ञान) अभ्यास करताना कायदा, समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांच्याशी निगडित खूप वेगवेगळ्या आणि इंटरेस्टिंग प्रश्नांचा अभ्यास करावा लागतो. कायद्याच्या विद्यार्थ्यांना किचकट अॅब्स्ट्रॅक्ट संकल्पना असलेला हा विषय बहुतांशी नावडता असतो; पण ज्युरिसप्रुडन्स कायद्याच्या मुळाशी जाऊन मूलभूत प्रश्नांनाच हात घालतो. कायदा कोणासाठी? कायदा कशासाठी? समाजाला कायद्याची गरज का भासते? कायद्याची...
  June 4, 11:58 AM
 • प्रसूती म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच. परंतु, हे त्या निसर्गदेवतेला माहीत असल्यामुळेच प्रसूतीच्या वेदना सहन करण्याचे बळ निसर्ग तिला देतो.आज सकाळी सिझेरियन शस्त्रक्रिया करत होते. सर्व काही सुरळीत चालू होते. बाळ गर्भाशयाच्या बाहेर काढून बालरोगतज्ज्ञाकडे सोपवले आणि पुढचे काम सुरू केले. पाच-सात मिनिटांतच दरवाजाच्या बाहेरून जोरदार गलका कानावर पडला, मुलगा झाला, अहो, मुलगा झाला. नंतरच्या पाच दिवसांत पेढे, लाडू, शीतपेये, नातेवाइकांची रीघ आणि आनंदाचा जल्लोष. आणि माझ्या रुग्णाच्या चेह-यावर त्या...
  June 4, 11:43 AM
 • योग या शब्दाची निर्मिती संस्कृत भाषेतील युज् या धातूपासून झाली असून त्याचा अर्थ जोडणे वा एकत्र आणणे असा आहे. पातंजल योगदर्शन या ग्रंथाची निर्मिती सुमारे 200 वर्षांपूर्वी महामुनी पतंजली यांनी केली. मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट कैवल्यावस्था आणि त्या अवस्थेप्रत जाण्याचे मुद्देसूद विवेचन या ग्रंथात केले आहे. माणसाचा जीव, त्याचा आत्मा यांचे परमात्म्याशी संयोग पावणे म्हणजेच कैवल्यावस्था किंवा मोक्ष होय. म्हणजेच योगशास्त्र मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे....
  June 4, 11:25 AM
 • महिला उद्योजिकेची यशकथा तयार करायची म्हणून जयश्री जोशी यांच्या ऑफिसात गेले. त्यांना यायला थोडा वेळ होता म्हणून वाट पाहत थांबले. त्यांच्या खुर्चीच्या मागच्या बाजूला लावलेल्या एका चित्राने माझे लक्ष वेधून घेतले. त्या चित्रात प्लॅटफॉमवर धावणा-या रेल्वेच्या पाश्र्वभूमीवर घड्याळ दाखवलेले होते आणि खाली वाक्य होते, टेक अॅण्ड मेक डिसीजन क्विकली. गती आणि वेळ याचं महत्त्व पटवून देण्यासाठी किती सूचक प्रतीके वापरली होती. त्या चित्राच्या निवडीवरूनच जयश्रीताईंच्या एकंदर प्रवासाची थोडक्यात...
  June 3, 09:27 PM
 • गुंतवणूक, आर्थिक उलाढाल या संकल्पना महिलांच्या दैनंदिन किंवा त्यांच्या आयुष्याचा भाग होताना दिसत नाहीत. काही जणी याला अपवाद असतीलही; पण बहुतांश या संकल्पना महिलांच्या कक्षेत येत नाहीत. महिलांची गुंतवणूक फार तर दागिन्यांपुरती किंवा नवरा अथवा वडिलांनी काढलेल्या डिपॉझिट वा विमा पॉलिसीपुरती मर्यादित असते. आर्थिक उलाढाल महिन्याच्या मिळकतीवरून महिन्याचा खर्च भागवणे यापुरतीच असते; पण बचत मात्र प्रत्येक स्त्री मग ती गृहिणी असो, नोकरदार अथवा व्यावसायिक स्त्री करतच असते. बचत नक्की कशी...
  June 3, 09:11 PM
 • न्यूयॉर्क शहरात नुकतेच एक मोठ्ठे दुकान उघडले आहे, जेथे कोणीही स्त्री जाऊन नवरा निवडू शकते. मात्र, त्यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे, तुम्ही केवळ एकदाच या दुकानाल भेट देऊ शकता. तुम्ही कोणत्याही मजल्यावरचा एक पुरुष निवडू शकता. तुम्ही वरच्या मजल्यावर जाऊ शकता परंतु खाली उतरायचे झाले तर ते केवळ दुकानाला बाहेर पडण्यासाठी.तर या दुकानात एक स्त्री गेली. पहिल्या मजल्यावरील प्रवेशद्वारावर पुढीलप्रमाणे पाटी लवली होती :या पुरुषांकडे नोकरी आहे आणि त्यांची ईश्वरावर श्रद्धा आहे.दुस-या मजल्यावरील...
  June 3, 08:21 PM
 • मी अपालाची गोष्ट ऐकली तेव्हापासून तिने माझा कब्जा घेतला आहे. अपाला ही अत्री ऋषींची कन्या. ऋग्वेदात तिने रचलेल्या ऋचा आहेत. पुराणातील एका कथेनुसार ती त्वचारोगी वा शापित होती. नव-याने टाकलेली, पालनापासून वंचित म्हणूनच अपाला असलेली आणि बापाच्या घरी राहत असलेली. एका कथेत असे वर्णन आहे. एके दिवशी अपाला पाणी आणायला गेली असता तिला सोम वनस्पती दिसली. ती वनस्पती चावत चावत ती म्हणते, इंद्रा, मी तुझी स्तुती करीत आहे. शुक्रा, हे इंद्राचेच दुसरे नाव, मी तुझी स्तुती करते आहे. कथेच्या शेवटी इंद्र तिच्यावर...
  June 3, 08:00 PM
 • कव्हर स्टोरी अत्यंत लोकप्रिय ठरलेली 'बालिका वधू' ही मालिका सध्या एका रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. बालवयात लग्न झाल्यानंतर घरी आलेली आणि जिवाभावाची सखी झालेली आनंदी ही पत्नी, दुसरी मुलगी आयुष्यात आल्यानंतर, जगतला अचानक गावंढळ आणि नकोशी वाटू लागली आहे. आमचं लहान वयात लग्न लावून तुम्ही मोठी चूक केली आहे आणि ती मी अजिबात खपवून घेणार नाही, मी माझ्या पसंतीच्या मुलीसोबतच राहणार आहे,' असं त्याने आईवडिलांना ठणकावून सांगितलं आहे. गावात राहणा:या आनंदीवर यामुळे आभाळ कोसळलं. आनंदीचं पुढे काय होणार,...
  June 3, 07:19 PM
 
जाहिरात

RECOMMENDED