Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • एखाद्या व्यक्तीला जोडून घेताना त्या व्यक्तीला भेटले असलात तर उत्तमच, अन्यथा ही जोडणी काळजीपूर्वक करावी. तुमच्या नवनवीन कौशल्यांविषयी इथे लेखन करणे फायद्याचे आहे. निवडक आणि नेमक्या व्यक्तींच्या संपर्काने LinkedIn चा फायदा जास्त मिळतो. तुम्हाला नोकरी हवीय, किंवा एखाद्या कंपनीला प्रकल्पासाठी योग्य व्यवस्थापक शोधायचा आहे, अशा वेळी नोकरी शोधणाऱ्या साइटवर आपले नाव नोंदवतात तशाच पद्धतीने LinkedIn वर नाव नोंदवायचे आहे. म्हणजे इथे प्रोफाइल तयार करायचे. जगभरातील व्यवसाय आणि व्यावसायिकांनी...
  June 5, 01:21 AM
 • किशोरवयीन मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या, त्यांना पूरक ठरणाऱ्या जीवनकौशल्यांची माहिती लेखिकेनं या आधीच्या सदरातून आपल्याला दिली. मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचा आढावा घेणारं त्याच लेखिकेचं हे नवं सदर या अंकापासून... माणसाचे आयुष्य खरेच मजेदार आहे. घरात, समारंभात, ऑफिसमध्ये समाजिक जागी आपला सतत विविध प्रकारच्या माणसांशी संबंध येत असतो. कधीकधी असे काही विचित्र प्रसंग घडतात की अगदी नकळत आपल्या तोंडून शब्द निघून जातात की, काय नमुना भेटला आज मला. एक माणूस दुसऱ्या माणसासारखा थोडीच असतो?...
  June 5, 01:19 AM
 • एखादा मनुष्य किती विषयांवर प्रभुत्व मिळवू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. विद्याधर ओक. कलाक्षेत्राला ते ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि २२ श्रुतींचं अस्तित्व दाखवणारे संशोधक म्हणून परिचित आहेत. वैद्यकीय क्षेत्राला ते उत्तम फार्माकाॅलॉजिस्ट म्हणून माहीत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. तर भारतीय, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य ज्योतिषतज्ज्ञ म्हणून चाळीसहून अधिक वर्षांचा त्यांचा व्यासंग आहे. याशिवाय विविध...
  June 5, 01:16 AM
 • ग्रामीण आरोग्य सुधारण्यात मोलाचा वाटा असतो तो आशा स्वयंसेविकांचा. खासकरून महिला व लहान मुलींच्या आरोग्याची प्रत या आशा सेविकांमुळे नक्कीच सुधारते आहे. यवतमाळ जिल्ह्यात असणाऱ्या झरीजामणी तालुक्यातील आदिवासी पाड्यावरती राहणारी सुनीता (नाव बदलेले आहे) सांगते, गर्भवती राहिल्यानंतर आधी कोणत्याही प्रकारची तपासणी केली जायची नाय. बाळंतपणही घरीच केले जायचे. त्यात गावातल्या एक-दोन बायका दगावल्या. पण करणार काय, आमच्या पाड्यावरून सरकारी दवाखाना लय लांब हाय. डॉक्टरकडे गेलं तरी त्यांची भाषा...
  June 5, 12:59 AM
 • पाऊस कधी एकदा येतोय असं झालंय सध्या सगळीकडेच. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा वणवा तर मुंबई आणि कोकणात घामाच्या धारा. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पावसाचे वेध लागले आहेत, त्यात हवामान खात्याने पावसाच्या आगमनाच्या तारखा जाहीर करून पाऊस वेळेवर महाराष्ट्रात पोचणार असं सांगितल्याने जरा दिलासा मिळालाय. गेल्या काही वर्षांपासून ऋतूंमधले बदल आपण सगळेच अनुभवतोय. उन्हाळा अधिक तीव्र झालाय, थंडी कमी झालीय, पावसाचं प्रमाण कमीजास्त झालंय इतकंच नव्हे तर तो कधीही...
  June 5, 12:53 AM
 • मेळघाटातल्या लवादा येथे १९९६मध्ये पहिलं बांबूचं घर सुनील आणि निरुपमा देशपांडे यांनी बांधलं. गेल्या २२ वर्षांत देशभरात बांबूची पर्यावरणपूरक १७०० घरं उभी करणाऱ्या या दांपत्याच्या कार्याची ओळख आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं. छोटंसं टुमदार कौलारू घर हे जणू परीकथेसारखं वाटू लागलं आहे. शहरात तर सोडाच, पण गावातदेखील जिकडेतिकडे सिमेंटची घरं बांधली गेली. दगड, मातीची घरं आता बांधणं शक्य तरी आहे का, त्यापेक्षा सिमेंटची घर आम्हाला सुटसुटीत, सोयीस्कर वाटू लागली. पण या सिमेंटच्या जंगलातून...
  June 5, 12:45 AM
 • आजच्या अनेक टीनेजर मुली बॉयफ्रेंडची गरजच नाही असं म्हणतात, म्हणजे त्यांचा भ्रमनिरास होतो आहे का? याच मुली पुढे लग्नाचीही गरज नाही असं म्हणतील. किंवा जरी पडल्याच लग्नात तर ते मोडतानाही फार विचार करणार नाहीत. ओघाने याचा कुटुंबसंस्थेवर परिणाम होणारच. कारण लग्नंच झाली नाहीत तर कुटुंबं कशी तयार होणार? कुटुंबसंस्था नष्ट होईल म्हणून माणसं एवढी का घाबरतात? ती तर सुरुवातीपासूनच पुरुष सत्तेच्या बळावरच उभी आहे. माझ्या वयाच्या मुलींना लग्न करायचा सतत आग्रह होत असतो. पण लग्न सोडाच, तरुण मुलींना...
  May 29, 12:48 AM
 • नवीन पिढीत लग्न उशिरा होणार,भीडभाड न बाळगता लग्नं मोडली जाणार, परत लग्नं केली जाणार. लग्न नाकारून जगणारे बरेच असणार. लग्न करून निवडीने अपत्य नाकारणारी जोडपी अधिक दिसणार. मित्रमंडळी कुटुंबाचा भाग अधिक होणार. नुकतीच जवळच्या नात्यात लागोपाठ तीन लग्नं झाली. नुकताच जवळच्या नात्यात एका मुलाचा डिव्होर्सही झाला आणि नुकतंचमुलीला लग्नापेक्षा खरेदीत रस आहे, असं म्हणूनलग्नाच्या दहा दिवस आधीचमोडलेलं एकलग्नही पाहिलं. पूर्वीच्या काळी वरपक्षाकडून पसंत आहे मुलगी असा निरोप आला की वधुपिता खुशालून...
  May 29, 12:41 AM
 • येत्या काळात संसार हा एखाद्या भागीदारी संस्थेप्रमाणे समजला जावा. आणि तो भले खंडित करायची वेळ आली तर त्यावेळी आर्थिक विभागणी कशी करावी हेदेखील रीतसर ठरायला हवे. जी प्रथा आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या देशांमध्ये सुरू झाली असून नजीकच्या भविष्यात ती आपल्या देशातही रुळण्याला पर्याय नाही. विवाहसंस्था कालबाह्य होत चालली आहे आणि शेवटचे आचके देते आहे, अशी एक गंभीर स्वरूपाची काळजी अधनंमधनं कानावर येत असते. विवाहसंस्था ही काही कालची पोर नव्हे, तसं पाहिलं तर ती एक जख्ख म्हातारी असायला हवी...
  May 29, 12:40 AM
 • जे प्रश्न पंधरावीस वर्षांपूर्वी मला छळत होते, तेच आज नव्याने लग्न झालेल्या मुलींना विचारले जातात. मुलींचं घराबाहेर पडणं, स्वतंत्र्य असणं, स्वत:च्या जगण्याचे निर्णय लग्नाआधी आणि नंतरही स्वतः घेणं या गोष्टी आजही समाजाला तितक्याच खटकतात जितक्या तेव्हा वर्षांपूर्वी खटकत होत्या. मग आपण प्रगती केली असं म्हणणार तरी कसं? पालकांच्या दृष्टीने मी लग्नाच्या वयाची जेव्हा झाले तेव्हा डोक्यात एकच मुद्दा होता, कुठल्याही परिस्थितीत कांदापोह्याचे कार्यक्रम करून लग्न करायचं नाही. अरेंज्ड मॅरेज हा...
  May 29, 12:28 AM
 • सप्तपदी आम्ही रोज चालतो, तुम्हा सवे! बरोबर सात वर्षांपूर्वी आपल्या वाचक-लेखक या नात्याचा शुभारंभ झाला. चुकतमाकत आम्ही शिकत गेलो, अजूनही शिकतोय. तुमच्या प्रतिक्रिया, कौतुकाची थाप, क्वचित केलेली टीका यांतून धडा घेत वेगळं, चांगलं, आणि वाचनीय असं लिखाण देण्याचा आमचा प्रयत्न असतो. तुम्हालाही यातून काहीतरी हवंहवंसं, वाट पाहायला लावणारं, मिळत असेल अशी खात्री वाटते. सात वर्षं ही एका वृत्तपत्राच्या दृष्टीने फार नाहीत, विशेषकरून आपल्या आजूबाजूला शेदीडशे वर्षं जुनी वृत्तपत्रं असतात तेव्हा. परंतु...
  May 29, 12:17 AM
 • कुठल्याही जाती, पंथ, धर्म, वर्गातून येणाऱ्या स्त्रीने स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी एका वयानंतर कुठल्याही पुरुषावर कोणत्याही प्रकारे अवलंबून राहू नये. याबद्दल दुमत असण्याचे काही कारणच नाही. नोकरी, व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे, स्वतःच्या नावाने एखादी स्थावर मालमत्ता असणे आणि म्हातारपणासाठी स्वतःच्या स्वतंत्र खात्यात स्वतंत्र पैसा साठवून ठेवणे, यासारखे काही अगदी ठळक टप्पे स्त्रीने ठरवून गाठलेच पाहिजेत. या ना त्या कारणाने जगभरात लग्नसंस्था हळूहळू खिळखिळी होऊन आपली...
  May 29, 12:15 AM
 • ग्रामीण भागात लग्न जुळवायला उत्सुक शेजारी-पाजारी, नातेवाईक जसे असतात तसे एखाद्याचं जुळत आलेलं तोडायलाही टपून बसलेले लोक असतात. आपले आमदार सांभाळून सत्ता स्थापन करेपर्यंत राजकीय पक्षाची जी अवस्था असते तीच अवस्था लग्न ठरवताना नवरदेव आणि त्याच्या घरच्या लोकांची असते. साधारणतः उन्हाळ्याची सुटी जशी लहानपणी मजेशीर असते तशी ती तरुणपणीही असतेच. त्याच सुटीत वार्षिक निकाल लागत असतो. सुटी तर असतेच, शिवाय लग्नसराई असल्याने आपल्याला त्या त्या ठिकाणी सहकुटुंब जावं लागतं. तिथे काही नातेवाईक,...
  May 29, 12:14 AM
 • अनेकदा मुलगा किंवा मुलगी यांना एखादी गोष्ट मान्य असते, त्यांना तसं वागायचं असतं पण पालकांच्या दबावाखाली किंवा आदरयुक्त धाकामुळे त्यांना तसं करता येत नाही. मुलींच्या जोडीदाराकडून अपेक्षा अवास्तव आहेत असा आरोप सर्रास मुलींवर केला जातो. पण त्यासोबत पालकांच्या अपेक्षा, मुलांच्या अपेक्षा किती अवाजवी होत आहेत, कोणत्या काळाला धरून आहेत, हासुद्धा विचार व्हायला हवा. काय लग्नाचा काही विचार आहे की नाही? पुढे पण नोकरी करणार का? अशा किती मुली पाहणार आहे? अशा कोणत्या अपेक्षा आहेत? घर सांभाळणारी...
  May 29, 12:13 AM
 • भरताचं वांगं, सुस्कारा टाकून हिरव्या ढब्बू मिर्चीशेजारी टेकून बसलं, आणि पलीकडे बसलेल्या हळद कुंकू ढब्बू व्हरायटीचं अभिवादन स्वीकारून विचारात पडलं. आजकालची तरुण वांगी आणि मिरच्या, जरा गरम डोक्याचीच. एकाच्या डोक्यात काळ्या बिया जमतात, आणि दुसऱ्या इतक्या शीघ्रकोपी, त्यांना हात लावला की, जळतो. काय करणार! सगळी फिटनेसच्या मागे धावणारी. स्लिम, कमनीय, साइझ झीरो, बनण्याची धडपड. हिरवी ढब्बू मिरची दुसऱ्या बाजूला रेलली, आणि म्हणाली, आपल्याला देवानी जे दिले आहे, त्याबद्दल कृतज्ञता मनात...
  May 22, 01:18 PM
 • पुरुषांच्या स्वभावातला उतावीळपणादेखील त्यांच्या आत्महत्यांना कारणीभूत ठरतो आणि दारूच्या व्यसनामुळे त्यात भर पडते. खेरीज पुरुषत्वाच्या संकल्पनाही घातकच ठरतात, असं दिसून येतं. म हाराष्ट्राचे दबंग पोलिस अधिकारी हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येच्या बातमीने मागच्याच आठवड्यात खूप मोठी खळबळ उडवून दिली. त्यांच्या मृत्यूविषयी हळहळ व्यक्त करताना अनेक जण त्यांच्या धडाडीचा आणि त्यांच्या दणकट शरीरयष्टीचा उल्लेख करत होते. अशा कणखर व्यक्तिमत्त्वाचा पुरुष आत्महत्या करू शकतो, हे अनेकांना...
  May 22, 08:41 AM
 • बिग बॉस चा क्षण अन् क्षण पुढे ताट ठेवून घास चघळत-चघळत डोळ्यांची पापणी न लवता पाहिला जातोय घराघरांतून. मालिकेचा टीआरपी मोठा आहे, नि त्यावर नैतिकतेचं प्रश्नचिन्ह उभारणाऱ्यांची संख्याही तितकीच. काय अर्थ लावायचा याचा? ​त्या राक्षसाने पकडूनच ठेवलं होतं (राजेश) ती सांगकामीच आहे (स्मिता) ती खूप डॉमिनेट करते (रेशम) छुपी रुस्तुम आहे (जुई) स्वत:ला अति समजतो (सुशांत) शांतीत क्रांती करणारा आहे (भूषण) पन्नास वर्षांचे झाले तरी यांना अकला नाहीत, घरात वयाने लहान सदस्य आहेत तरी चाळे करतात (राजेश आणि रेशम)...
  May 22, 01:00 AM
 • भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख. विधवा स्त्रीच्या पुनर्विवाहास मान्यता नसणे ही अनेक जातींमधली सामाईक बाब होती. पूर्वी पुनर्भू ही संज्ञा त्यासाठी वापरली जात असे. प्रामुख्याने पुनर्विवाह करणाऱ्या विधवांना पुनर्भू म्हटले जाई. अशा स्त्रियांचे तीन प्रकार नारदाने सांगितले...
  May 22, 01:00 AM
 • हे लिहिताना ब्रिटनच्या राजघराण्यातली राजपुत्र हॅरी आणि अमेरिकी अभिनेत्री मेघन यांचा विवाहसोहळा सुरू आहे. ब्रिटिश वृत्तपत्रं अाणि प्रसिद्धीमाध्यमांमध्ये या विवाहसोहळ्याच्या क्षणाक्षणाचं वार्तांकन सुरू आहे. यात एक मुद्दा विशेष वाटला. मेघनचे वडील आजारी असल्याने ते उपस्थित राहून तिला विवाहवेदीपर्यंत नेऊ शकणार नसल्याने हॅरीचे वडील, राजपुत्र चार्ल्स ही जबाबदारी घेणार आहेत.मेघनची आई सोहळ्याला उपस्थित होती. ख्रिस्ती विवाहविधींनुसार वधूला तिचे वडील चर्चमध्ये धर्मगुरूंपर्यंत घेऊन...
  May 22, 01:00 AM
 • मूल कसं वाढवायचं, ते वाढवताना आपण कसं आणि काय शिकत जायचं, कोणत्या गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करायचा, कोणत्या मुद्दाम टाळायच्या, या व अशा मुद्द्यांना स्पर्श करणाऱ्या या सदराचा आजचा हा समारोपाचा लेख. आ जचा आपला शेवटचा दिवस, पालकत्वावर बोलायचा! माझं बोलणं संपलं तरी माझं आणि तुमचंही पालकत्व चालू राहणार, ते चालू राहायलाच लागणार, मुलं कमीत कमी अठरा वर्षांची होईपर्यंत तरी! भारतात तर ते फारच काळ सुरू राहतं. माणसाच्या सामाजिक उत्क्रांतीमध्ये आजही पालकत्वाला खूप महत्त्व आहेच. माणसाचं मूल...
  May 22, 01:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED