Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे बुद्धिमत्ता की एका विशिष्ट विषयातलं प्रावीण्य म्हणजे बुद्धिमत्ता? हॉवर्ड ग्रीन नावाच्या अमेरिकन डेव्हलपमेंटल सायकॉलॉजिस्टनं वेगवगळ्या कौशल्यांबद्दलची मांडणी केली आहे. त्याच्या मते बुद्धिमत्ता ही एकच गोष्ट नाही. तिचे नऊ वेगवेगळे प्रकार आहेत. आजच्या लेखात नऊ प्रकारांबद्दल. शाळा मुलांना माहिती देते, वेगवेगळी तंत्रं शिकवते, आणि एका विशिष्ट प्रमाणापर्यंत संस्कारही घडवून एक चांगला नागरिक घडवण्याचा प्रयत्न करते. मात्र आपल्या मुलाचा एक व्यक्ती म्हणून...
  February 20, 01:42 AM
 • मागच्या अंकातल्या कव्हर स्टोरीत आपण सारंगचा संघर्षमय प्रवास पाहिला. या भागात पाहू तिच्या प्रवासात तिला व तिच्यासारख्या अनेकांना कोणाची साथ मिळतेय. फक्त स्त्री-पुरुष या नातेसंबंधांना मान्यता असलेल्या पारंपरिक समाजात या लैंगिक अल्पसंख्याकांची अशी भावनिक, शारीरिक घुसमट होणं हे नवलाईचं नाही जी त्यांना निमूटपणे सहन करावी लागते. प्रश्न हा की आणखी किती काळ त्यांना ही घुसमट सहन करावी लागणार आहे? त्यांना ती घुसमट कुणाला सांगावीशी वाटली तरी ती ऐकून घेणारं, त्यांना समजून घेणारं कुणी नसतं....
  February 20, 01:41 AM
 • रोजच्या वापरातील अंगाचा साबण वापरून वापरून अगदी बुळबुळीत होऊन जातो. त्याचा सुगंध लोप पावतो आणि फेसही कमी होतो. थोडक्यात काय तर तो विरतो. या कारणामुळेच विविध वाहिन्यांवरून दाखवण्यात येणाऱ्या दीर्घकालीन मालिकांना डेली सोप ही संज्ञा दिली असावी. कारण पाहून पाहून त्यांचा वीट यायला लागतो. सुरुवातीला दाखवलेली हुशार, धाडसी, तडफदार कुमारिका नायिका सौभाग्यवती झाली की एकदम फुग्यातून हवा काढून घेतल्यासारखी पिचलेली आणि डेली सोपसारखी बुळबुळीत करून टाकतात. टीआरपी जसजसा कमी-जास्त होतो तसतसा...
  February 20, 01:30 AM
 • प्रसूती हा शब्द पुरुषांना ऐकून आणि बायकांना अनुभवून माहिती असतो. लेखिकेनं विद्यार्थिदशेत असताना पहिल्यांदा डिलिव्हरीची पेशंट बघितली. तो अनुभव तिच्या मनावर कोरला गेला. काय होता तो अनुभव? आज पहिल्यांदाच डिलिव्हरी बघणार त्यामुळे उत्सुकता, भीती; आणि डॉक्टर व माणूस म्हणून असणाऱ्या सर्व भावनांची डोक्यात गिचमिड झालेली. प्रत्यक्ष लेबर रूममध्ये पाऊल ठेवलं आणि समोरचं दृश्य पाहून डिलिव्हरीला चिकटून असणाऱ्या माझ्या सर्व पारंपरिक आणि उदात्त संदर्भांची वाफ होऊन गेली. समोर विव्हळत पडलेल्या...
  February 20, 01:23 AM
 • अनेकांना विविध कारणांमुळे जास्त शब्दांत लिहिणे शक्य नसते. फेसबुक वा इतर सर्व सोशल मीडियापेक्षा ट्विटरवर कमी शब्दांत पोस्ट करावे लागतात. ज्यांना कमी शब्दांत व्यक्त होता येते, ज्यांना वेळेची मर्यादा आहे, अशा सर्वांचेच ट्विटर हे अतिशय आवडते आणि प्रभावी माध्यम बनले आहे. जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती, राजकीय नेते, विविध संस्था आणि कंपन्यांचे प्रमुख यांच्याशी संपर्क करण्याचे ट्विटर हे नवे व्यासपीठ आहे. निवडणूक असो, एखाद्या खेळाचा महत्त्वाचा सामना असो की पुरस्कार सोहळा, त्याचे ट्विटर हँडल...
  February 20, 01:18 AM
 • भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख. बहुभर्तृकत्व हा शब्द आपल्यातील बहुतांश लोकांना माहीत नसणार. बहुभार्या किंवा बहुपत्नी मात्र नक्कीच माहीत असणार. पुरुषाने एकाहून अधिक लग्नं करणं समाजमान्य होतं, तसं स्त्रीने एकाहून अधिक लग्नं करणं मान्य तर नव्हतंच, पण अशी कल्पनाही लोकांनी कधी...
  February 20, 01:10 AM
 • येत्या आठवड्यात दोन दिवस साजरे होताहेत. जागतिक मुद्रण दिन आणि मराठी भाषा दिन. या दोन्हींच्या निमित्ताने मराठी छापील पुस्तकांविषयी काही बोलणं अस्थानी ठरू नये. पुस्तकं खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होत आहेत, म्हणजेच छापली जात आहेत. प्रकाशन संस्थांची संख्या वाढते आहे, लेखक/कवींची संख्या वाढते आहे. छापील शब्दाचा अपवाद केला तर आॅनलाइन प्रचंड साहित्य निर्माण होतंय. तेही खूप वाचलं जातंय. सोशल मीडियामुळे, विशेषकरून फेसबुक, ब्लाॅग, ट्विटर, व्हाॅट्सअॅपवर सातत्याने लिहिणारे हजारो लोक आहेत, ही...
  February 20, 01:04 AM
 • कोणताही महिना असो, दुकानांवर सेलच्या पाट्या असतातच. कधी दिवाळी, कधी पाडवा, कधी चक्क आॅफसीझन. आॅनलाइन तर सेल कायमच असतात. स्वस्तात खरेदीच्या मोहात पडून आपली कपाटं भरत राहतात. आणि एक दिवस कपाटातनं कपडे अंगावर कोसळतात. हेच कपाट कसं लावायचं, खरेदी कशी नि कसली करायची, याचे तज्ज्ञ आता उपलब्ध आहेत. काय करतात हे तज्ज्ञ नेमकं? भारतीय संस्कृतीतील बायकांच्या कामांच्या म्हणजेच बायकांनीच करायच्या कामांच्या भल्यामोठ्या यादीतील एक काम म्हणजे घरातील कपड्यांचे कपाट नीटनेटके आवरणे, कपड्यांच्या...
  February 20, 01:00 AM
 • स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडणारा तृतीयपंथी समाज. आपल्या लैंगिक ओळखीव्यतिरिक्त आता शिकायला मिळावं, स्वत:च्या पायावर उभं राहातं यावं यासाठीही समाजाशी लढा देत आहे. तृतीयपंथीयांनी शिक्षण घेणं ही त्यांची स्वत:ची, शिक्षणव्यवस्थेची आणि समाजाचीही परीक्षा आहे... समाजाच्या सांस्कृतिक, आर्थिक, पारंपरिक मर्यादेत अनेक घटकांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. या वंचितांमधील एक प्रचंड दुर्लक्षित घटक म्हणजे तृतीयपंथीयांचा. आपल्या लैंगिक ओळखीसाठी या व्यक्ती कायमच स्वतःशी आणि समाजाशी झगडत असतात....
  February 13, 01:32 AM
 • मुलांच्या शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं या विषयावर आजपर्यंत खूप चर्चा, वादविवाद झालेले आहेत. मातृभाषेतून शिक्षणच योग्य अशी एक बाजू आहे तर जगाची भाषा असणाऱ्या इंग्रजीमधून शिक्षण असावं अशी दुसरी बाजू आहे. काय असू शकेल यातला मध्यम मार्ग? वाघू अत्यंत जिंदादिल माणूस. बोलघेवडा. एकतर तो समोरच्याकडून काहीतरी समजून तरी घेत असतो नाहीतर समजावून तरी देत असतो. तो जे समजावून देत असतो ते त्याच्या अनुभवविश्वातलं असतं, त्याला नीट कळलेलं आणि त्याला नीट ठाऊक असलेलं. जे समजून घेतो ते त्याला नेहमीच नीट...
  February 13, 01:30 AM
 • जगात डिस्पोझेबल सॅनिटरी नॅपकिनचे १४.५ अब्ज डॉलर्सचे मार्केट आहे. सगळीकडून तयार सॅनिटरी नॅपकिनच्या महत्त्वाबद्दल आपल्यावर होणाऱ्या माऱ्याचे कारण या एवढ्या मोठ्या उलाढालीच्या आकड्यात तर दडलेले नसेल ना? गेल्या काही महिन्यांपासून सॅनिटरी नॅपकिन्सबद्दल खूपच चर्चा होताना दिसते आहे. सुरुवात झाली होती, या तयार सॅनिटरी नॅपकिन्सवर लावलेल्या जीएसटीचा निषेध करण्यापासून. नंतर महाराष्ट्र सरकारने खेड्यातल्या महिला आणि मुलींसाठी स्वस्त दरात हे नॅपकिन देण्यासाठी तीन कोटी रुपये खर्चाची...
  February 13, 01:28 AM
 • हसण्याचे खूप प्रकार आपल्याला माहीत अाहेत. खुदुखुुदु, गडगडाटी, खोखो, विकट, कसनुसं, आसू आणि हासू एकत्र, निरागस, राक्षसी, हास्याची खसखस, स्मितहास्य, पोट धरून, पोट दुखेपर्यंत, गडाबडा लोळून, वगैरे वगैरे. या प्रकारांचं वर्गीकरण बायकांचं आणि पुरुषांचं हास्य असं करता येऊ शकतं बरं. कोणतं हसू पुरुषांचं नि कोणतं बायकांचं ते तुम्हाला समजलं असेलच. जे पुरुषी हास्य असतं ते ना फक्त पुरुषांनीच हसायचं असतं. मुळात बायकांनी कमीच हसायचं, तेही अगदी दिसेल न दिसेल, म्हणजे पदरात तोंड दडवून वगैरे. त्या हसण्याचा आवाज...
  February 13, 01:28 AM
 • वर्तमानातून भविष्याकडे वाटचाल सगळेच करतात. या प्रवासात अनेकदा अपयशही येऊ शकतं. नव्हे, ते येतंच. पण या नकारात्मकतेतून काहीच मिळत नाही. अशा गोष्टी मनाला न लावून घेता पुढं चालत राहणं हे कौशल्य आहे. अभय शाळेत पहिलीपासून दहावीपर्यंत सर्व तुकड्यांमधून सतत पहिला यायचा. मात्र दहावीचा निकाल लागला आणि अभय शाळेत तिसऱ्या क्रमांकावर आला. त्या दिवसापासून अभयचा मूड गेला. त्याच्या मनाची अवस्था फारच वाईट झाली. ही गोष्ट त्याच्या मनाला फार लागली. त्याने तो स्वत:चा मोठा अपमान मानला आणि आता...
  February 13, 01:25 AM
 • २४ आठवड्यांपर्यंत गर्भपाताला परवानगी दिली तर त्याचा स्त्री भ्रूणहत्येसाठी गैरवापर होईल हा एक बागुलबुवा उभा केला जातो. त्यावरही काही उपाययोजना करायला हव्यात. ती मुंबईतली होती. तिच्यावर बलात्कार झाला होता. तिच्या गर्भातल्या बाळाला डोकं नव्हतं आणि पोट होतं सगळं उघडं. इतकं उघडं की, आतले अवयव बाहेर सांडत होते. हे निदान होईपर्यंत २० आठवडे उलटून गेलेले. डॉक्टर म्हणाले, गर्भपात नॉट अलाऊड! ती गेली कोर्टात अगदी सुप्रीम कोर्टात. कोर्टाला फुटला पाझर. कोर्टानी हातोडा आपटला, डॉक्टरांना म्हणाले,...
  February 13, 01:24 AM
 • अाज प्रकर्षाने टीव्हीवरच्या मालिकांबद्दल लिहावेसे वाटले. आम्ही गृहिणी, त्यातून उतरवयात जरा विरंगुळा, मनोरंजन, आणि मनाचे रितेपण घालवण्यासाठी दूरदर्शन आणि इतर वाहिन्यांवरच्या मालिका पाहात असतो. पण त्या मालिका पाहात असताना असं लक्षात आलं की, मनावरचं दडपण वाढतं आहे. नको त्या विचारांचा धुमाकूळ सुरू होतो आहे. मराठी मालिका सगळी संवेदनशीलता हरवून भरकटत चालल्या आहेत. नावं गोंडस द्यायची आणि वर्षानुवर्षं लांबवत त्याचा मूळ गाभाच हरवून टाकायचा. प्रत्येक मालिकेत एक लग्नाची बायको, एक प्रेयसी, एक...
  February 13, 01:18 AM
 • पर्यावरणाला हानिकारक ठरेल अशी आपली कृती म्हणजे कार्बन फूटप्रिंट. आणि पर्यावरण रक्षणासाठी समजून -उमजून आपल्या कृतीत केलेला सकारात्मक बदल म्हणजे कार्बन हँडप्रिंट. जेव्हा आपली पावलं चुकीची पडायला लागतात आणि तोल जायला लागतो तेव्हा सावरण्यासाठी हातांचाच आधार घ्यायला लागतो. मागच्या वेळी आपण पाहिलं की, कार्बन फूटप्रिंट हे आपण पर्यावरणावर करत असलेल्या नकारात्मक गोष्टींचं मापक आहे. त्या नकारात्मक गोष्टींवरचा सकारात्मक उतारा म्हणजे कार्बन हँडप्रिंट. कार्बन हँडप्रिंटची संकल्पना प्रथम...
  February 13, 01:18 AM
 • माणसातली सत्तेची, संपत्तीची आणि शरीराची भूक अनिवार आहे. या भुकेला नीतिमत्तेची, तत्त्वांची चाड नाही, नात्यांचे बंधन नाही. यातून निर्माण होणाऱ्या बेबंद, बेलगाम आणि बीभत्स जगण्याचे दर्शन दंशकाल ही हृषीकेश गुप्ते लिखित कादंबरी घडवते... मानवजातीची भूक अमर्याद आहे. खरंतर या भुकेमुळेच माणसाची अफाट प्रगती झाली आहे. दुसरीकडे या भुकेमुळेच माणसाची अधोगतीही झालेली आहे. आपण भूक म्हणतो तेव्हा केवळ पोटाची भूक अपेक्षित नाही, ही पोटाखालचीही भूक आहे. लैंगिक भुकेचं व्यवस्थापन अजूनही माणसाला नीटसं...
  February 13, 01:07 AM
 • गूगल प्लेस्टोअरवर 123 ABC Handwriting Game असे टाइप करा. हे अॅप फ्री डाऊनलोड करता येते. सदर शैक्षणिक अॅप अंगणवाडी व पहिलीच्या विद्यार्थ्याकरिता उपयुक्त आहे. यामध्ये lower case, upper case, Numbers 123, shapes याबद्दल सखोल कृतिशील घटक आहेत. उदा. Lower case यावर क्लिक करा. यानंतर आपणास A पेन्सिल, कलर बॉक्स आणि नंबर बॉक्स दिसेल. स्क्रीनच्या वरच्या बाजूला एकएक लेटर येतील. लेटर गिरवण्यासाठी पर्याय आहेत. तसेच त्याच्या खाली पेनानेसुद्धा लिहिता येते. स्क्रीनच्या सर्वात खाली डाव्या कोपऱ्यात चुकलेले खोडण्यासाठी रबर आहे. यामुळे सराव चांगला करता...
  February 13, 01:06 AM
 • उद्या व्हॅलेंटाइन डे. त्यानिमित्ताने एक आठवडाच प्रेमाला वाहिलेला असतो. त्यातला एक असतो चुंबन दिन. या चुंबन दिनाच्या निमित्ताने ओठांविषयीची गाणी... मला अँजेलिना जोली आवडत नाही. पण तिचे ओठ! आहा. परवाच बसमध्ये ऐकू आलेला संवाद. सौंदर्याचे मापदंड गेल्या काही दशकात बदलले आहेत. आमच्या वेळी अशा जाड ओठांना हबशी ओठ असे हिणवले जाई. खरं तर आमच्या वेळी लांबून दिलेले उडते चुंबनसुद्धा प्रचलित नव्हते. आता सुख आकारमानावर अवलंबून आहे. बालकवी यांची फुलराणी ही कविता आम्हाला अभ्यासाला होती, पण रविकिरण...
  February 13, 01:06 AM
 • वर्षानुवर्षे चिखलात दाटीदाटीने आपल्या जांभळ्या देठांवर दिमाखाने मोठाली हिरवी पाने सांभाळत घालवलेले दिवस, आणि मग अचानक गठ्ठ्यात बांधून कुणा एकीच्या घरी येऊन पडणे. मग एखाद्या लहान बाळाला अंघोळ घातल्यासारखे पाण्याने स्वच्छ करणे, अलगद पुसणे. मग इतक्या कोमल त्वचेला साबू कशाला, म्हणून डाळीचं पीठ लावणे; फरक एवढाच की, वयात आलेल्या पानांना जरा चटकदार डाळीचे पीठ बनवून लावणे, आणि मग एकावर एक ठेवून, गुंडाळी करून, वाफेतला अगदी अंतिम सौंदर्य उपचार. मग वड्या कापणे आणि तळणे. होतं काय की,...
  February 13, 01:06 AM
 
जाहिरात

RECOMMENDED