जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • ग्लोबल वॉर्मिगच्या चिंताजनक परिस्थितीत पर्यावरणाचं संरक्षण, जतन नि संवर्धन करण्यात स्त्रियांची भूमिका व जबाबदारी फार महत्त्वाची आहे. या क्षेत्रात गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या, तळागाळातल्या लोकांपर्यत पर्यावरणाचं महत्त्व पोहचवणाऱ्या पण आजवर फारश्या प्रकाशात न आलेल्या निसर्गकन्यांच्या कार्याची ओळख, उद्याच्या पर्यावरण दिनानिमित्त... बंगारी मथाई : पर्यावरण संरक्षणात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या बंगारी मथाईंचं योगदान विस्मयचकित करणारं आहे. Green Belt या आंदोलनाच्या त्या प्रणेत्या. मथाई...
  June 4, 12:10 AM
 • आत्मचरित्र लिहिणारा लेखक ते स्वत:च्या दृष्टिकोनातून लिहितो. ते पूर्ण सत्य नसते. सत्यालाही अनेक कंगोरे असतात. काही गोष्टी आवृत, तर काही चतुराईने अनावृत होतात. म्हणजे सामाजिक इतिहासाचा एकाच बाजूचा हा झोत ठरतो. स्त्रियांवर तर वैयक्तिक, कौटुंबिक नि सामाजिक अभिरुचीचे, वाचकांच्या अप्रगल्भतेचेही निर्बंध असतात. एका प्रथितयश लेखिकेला मुलाखतीत पत्रकाराने विचारले, तुम्ही अद्याप आत्मचरित्र का लिहिलं नाही? लिहायचा विचार आहे का? त्यावर स्मितहास्य करत त्या म्हणाल्या. प्रत्येक लेखकानं...
  June 4, 12:08 AM
 • नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण नसतानाही स्वकर्तृत्वावर महिलांनी अभूतपूर्व यश मिळवले. मात्र, कामाच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध करणाऱ्या तीच्या शक्तीचे कौतुक कमी आणि सौंदर्याची चर्चाच जास्त होताना दिसते. मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ ही त्याची दोन ताजी उदाहरणं. महिलांचा पेहराव, वागणं, दिसणं यापलीकडे जाऊन तिच्या कार्यक्षमतेबद्दल आपण कधी बोलणार...? आदर्श नेत्याचे, त्याच्या वर्तणुकीचे, पेहरावाचे काही ठोकताळे ठरलेले असतात. त्याला छेद देणारं वर्तन सहजासहजी स्वीकारलं...
  June 4, 12:07 AM
 • ज्यांची शायरी वाचून वाचकाच्या तोंडून स्वाभाविकपणे वाह, क्या बात है क्या खूब अशी दाद बाहेर येते त्या जहिदा जैदींबद्दल आजच्या भागात. आमिर खुस्रोने भारत हा धरित्रीवरील स्वर्ग आहे असं म्हणले आहे. विविध भाषा, विस्तीर्ण भूप्रदेश, नैसर्गिक सौंदर्य, भिन्न-भिन्न विचारधारा, वििवधतेतही एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. विविध प्रांत, विविध भाषा ही आपल्या देशाची खासियत असली तरी समन्वयाच्या, राष्ट्रप्रेमाच्या धारा इथं वेगवेगळ्या भाषेत गुंजारव करत आहेत. जितक्या विविध भाषा त्यापेक्षा किती तरी...
  June 4, 12:06 AM
 • उन्हाळा जसा पोटभर आंबे हादडण्याचा मोसम तसाच आंब्याशी निगडित आठवणींना उजाळा देण्याचाही मोसम. आपल्या वाचकानं पाठवलेली अशीच एक आठवण... सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही सहकुटुंब कोकणच्या सहलीवर निघालो होतो. एकदम सावंतवाडीपर्यंत जायचा विचार होता.निघाल्यापसून सौभाग्यवतींचा सारखा धोशा चालला होता. मला original हापूस खायचाय, हापूस खायचाय म्हणून. मी तिला म्हणालो बाई, असे सारखे सारखे म्हणू नकोस. आपण उन्हाळ्यातच कोकणात चाललो आहोत, तिथे फक्त दोनच गोष्टी खायच्यात- एक मासे आणि आंबे आणि आपल्याल्या...
  June 4, 12:05 AM
 • सुशिक्षितांची एक मोठीच अडचण आहे. काही बाबतीत आपले (गैर) समज ठाम असतात. हे समज बहुतांश वेळा ऐकीव माहिती, माध्यम सुनामीच्या अफाट वेगात आपल्यावर आदळलेले असतात. ते आपण निमूटपणे स्वीकारतो. शहानिशा करण्याचा सद्सदविवेक बाजूला सारून. विचारदुवे जोडण्याचे कष्ट न घेता. चित्रपट सृष्टीनं लावणी, तमाशा कलाकारांबदद्ल करून ठेवलेले समज हे अशापैकीच एक. यामुळेच कामुक, अश्लील हावभाव म्हणजे लावणी इतकंच आपल्यापर्यंत पोहोचलेलं असतं. पण खरंच लावणी म्हणजे इतकंच असतं? कशी असतात लावणी सादर करणारी माणसं? कसा असतो...
  May 28, 12:20 AM
 • गवळण ते गोंधळ असोत, भारुडे, कीर्तने असोत की काळाच्या पडद्याआड लुप्त होणारी लोकगीते असोत, लोककलांच्या विस्तारणाऱ्या अवकाशाच्या साक्षीदार असलेल्या या तिघी. लोककला, लोकगीते आणि लोकनृत्य यांची अंगभूत आवड असलेल्या, त्यात काही तरी करण्यासाठी धडपडणाऱ्या, धडपडू पाहणाऱ्या महिलांसाठी, मुलींसाठी एका अमर्यादित अवकाशाची दारं खुली करून देतात. जात्यावरच्या ओव्या, पाळणे, लग्न गीतं, सणांची गाणी आणि उत्सवांमधील नाच... एरवी चार भिंतींत दबलेल्या स्त्रियांच्या आवाजाला मोकळं होण्याची संधी मिळाली ती...
  May 28, 12:18 AM
 • भारुडात असलेल्या या गारुडाची ताकद एकनाथांनी ओळखलेली होती. म्हणूनच समाजप्रबोधनासाठी कीर्तनाऐवजी त्यांनी या कलाप्रकाराला जवळ केलं. नाथांना समाज-मनाची नस कळलेली होती. म्हणूनच अलुतेदार-बलुतेदारांसह साऱ्यांना सामावून घेत त्यांनी भारुडं रचली. नाथांच्या भारुडांचं वैशिष्ट्य म्हणजे ती लिहिताना त्यांनी शैलीही बहुजन समाजाला जवळची अशीच निवडली. लहानग्या मीराबाईला या भारूंडांचा खुप लळा. तिची आवड लक्षात घेऊन नाथांनी आपल्याकडची खंजिरी मिरेला दिली आणि तुकडोजी महाराजांच्या आशीर्वादाने...
  May 28, 12:16 AM
 • लोककलेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या लावणी कलाकरांची पुढची पिढी शिकून-सवरून स्वत:चा ठसा उमटवते आहे. अर्थात पालकांनी जपलेल्या लोककलेबद्दल त्यांना आदर आहेच. पण या पुढच्या पिढीला स्वत:चं अवकाश निर्माण करण्याची जिद्द आहे. लहानपणी सगळीच लहान मुले आईच्या मायेत, सावलीत वाढत असतात. आईकडे आपले हट्ट पुरवून घेत असतात अशा वयात मला माझ्या आईने आपल्यापासून दूर ठेवलं. शिक्षणासाठी हाॅस्टेलला ठेवलं. मला तेव्हा खूप वाईट वाटायचे. पण आईने शिक्षण घेण्यासाठी तुला हाॅस्टेलला राहावेच लागेल, असे सांगितले....
  May 28, 12:14 AM
 • एकेदिवशी वाटे कर्णाला जावं जी, पांडवांच्या महाली जावं जी सत्कार केला कर्णाचा धन्य महाराज जी, कर्णाला पाहून द्रौपदीस वाटे लाज जी झाली सर्द-गर्द, कामोन्नत देह चळलं, कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं... जांभूळ आख्यान रंगात आलेलं असायचं आणि बाबांची (गोंधळ महर्षी राजारामबापू कदम) द्रौपदीही. पाच पांडव असताना सहाव्या पांडवावर मन आलेली द्रौपदी बाबा असे काही सादर करायचे की, वाटायचं कर्ण आताच हिच्या रंगमहाली येऊन गेलाय. द्रौपदी सैरभैर झालीय. द्रौपदीच्या रूपातला त्यांचा नखरा, मुरका, आवेग असा...
  May 28, 12:12 AM
 • या विमुक्तये, सा कला, अशी कला या संज्ञेची व्याख्या केली जाते. जी मुक्त करते, ती कला होय असा याचा वाच्यार्थ आहे. अर्थातच, कलेसारख्या विस्तीर्ण आणि विलक्षण संवेदनशील क्षेत्राच्या संदर्भात, हा वाच्यार्थ पुरेसा नाही. त्याचा लक्ष्यार्थ आणि ध्वन्यार्थ इथे अभिप्रेत आहे. मग या मुक्ततेचे अनेक पदर लक्षात येतात. विशेषत: तमाशा, लावणी या लोककलांच्या बाबतीत, ही मुक्तता अर्थांचे कित्येक पदर ओढून वावरते. संगीतबारीसारख्या आगळ्यावेगळ्या सादरीकरणाच्या माध्यमातून या कला प्रकाराचा, परंपरेचा आणि ती...
  May 28, 12:10 AM
 • मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनी ठेका धरला होता. सासनकाठ्या आणि देवाच्या पालखीला अंगाखांद्यावर घेऊन वर्षभर वाट पाहणारी गावाची शरीरं आनंदाने नाचत होती आणि अचानक मधूनच कुठून तरी गर्दीत हलगी कडाडल्याचा आवाज येऊ लागला. तसाच अंधारातून गर्दीत घुसलो. हलगी वाजवणाऱ्यापाशी पोहोचलो, तर नाचत बडवत ती व्यक्ती क्षणात पाठमोरी झाली. धोतर पटका नेसलेली एक म्हातारी व्यक्ती हलगी दणाणून सोडत होती. पाठीमागून पुढच्या बाजूला गेलो, हलगीवाल्याचं तोंड न्याहाळलं. डोळ्यावर विश्वासच बसेना... शंभरीकडे निघालेला आणि...
  May 28, 12:08 AM
 • वर्षातले सहा महिने नाटकासाठी फिरतीवर. फिरतीमुळे पूर्णवेळ नोकरी नाही. निश्चित मानधन नाही. सरकारकडून मिळणारी मदत अत्यल्प, अनियमित. उपजीविकेसाठी प्रसंगी सुतारकाम, गवंडीकाम आणि मोलमजुरी करावी लागणं ही दशावतारात काम करणाऱ्या कलावंतांची शोकांतिका आहे. पण तरीही केवळ या लोकांच्या कलेवरच्या प्रेमामुळेच आज दशावतार जिवंत आहे. बहुरूपी रूपे नटला नारायणा। सोंग संपादून जैसा तैसा। बहुरूपी नटलेल्या नारायणाचे संकीर्तन व त्याच्या विविध लीलांची सोंगे संत आणि भगवत भक्तांनी प्रमाण मानली....
  May 28, 12:06 AM
 • रात्री राजा आणि दिवसा डोक्यावर बोजा.. असे समीकरण बनलेल्या दशावतारी नाट्यकलेला बाबी कलिंगण यांनीच खऱ्या अर्थाने मूर्तस्वरूप दिले. ख्यातनाम दशावतारी कलावंत राष्ट्रपती पदक विजेते बाबी कलिंगण यांचा जन्म नेरूरगावचा. घरात गरिबी, शेतीवाडी नाही. लहानपणी वाण्याच्या दुकानात पुड्या बांधत असताना रात्री दशावतार पाहून त्यांना त्याची ओढ लागली. पण दशावतारात मोठी भूमिका कोण देणार? मग पेटारा उचलण्यापासून, गणपतीसमोर चादरीचा पडदा धरणे, अडीअडचणीला झांज वाजवण्यापासून, बिलिमारा ह्या स्त्री...
  May 28, 12:05 AM
 • चित्रकथी परंपरा प्रामुख्याने कथनशैली परंपरा आहे. चित्रकथांमध्ये आणि पुराणिकांमध्ये बरेचसे साम्य असते. निरूपण, संवाद आणि गायन अशा त्रिसूत्रीतून चित्रकथी कथाकथन केले जाते. या कथनात सहजता व उत्स्फूर्तता असते. चित्रकथीच्या सादरीकरणाची पद्धती हरदासी कीर्तनकारासारखी असते. सन १८४३ मध्ये मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या विष्णुदास भावेंनी नाटकाच्या खेळांची प्रेरणा भागवत मेळे आणि कळसूत्री बाहुल्या यांच्याकडून घेतली. बाहुल्यांची परंपरा भारतीय लोकरंगभूमीवरील प्राचीन परंपरा असून...
  May 28, 12:04 AM
 • महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत. काळू आणि बाळू दोन जुळे भाऊ. काळू म्हणजे लहू संभाजी खाडे, तर बाळू म्हणजे अंकुश संभाजी खाडे. वडिलोपार्जित तमाशाची परंपरा असणाऱ्या संभाजी आणि शेवंताबाईं कवलापूरकर या दांपत्यापोटी कवलापूर (जि. सांगली) येथे १६ मे १९३३ रोजी दोघांचा जन्म झाला. काळू-बाळू सहा वर्षांचे असताना वडिलांचे अर्धांगवायूच्या झटक्याने निधन झाले. शिवा-संभाचा तमाशा त्या काळी वर्तमानकाळातील घडामोडींवर भाष्यकरणारा एकमेव तमाशा होता. सामाजिक समस्यांना वाचा फोडणारा हा तमाशा संभाजी खाडे...
  May 28, 12:03 AM
 • सर्व पुरूष वाचकांसाठी काही प्रश्न आहेत, रात्री एखादी मुलगी,महिला, फ्रेंड लिस्टमधली मैत्रीण ऑनलाइन दिसली तर तुमच्या मनात नक्की काय येतं? स्त्रिया अपरात्री ऑनलाइन असतात म्हणजे अव्हेलेबल असा परस्पर सोयीचा अर्थ तुम्ही काढता का? एखादी महिला अवेळी ऑनलाइन असण्यावरून जर तिच्या चारित्र्याबद्दल कमेंट करत असाल तर त्याच निकषावर तुम्ही स्वत:बद्दल काय स्पष्टीकरण देणार? या प्रश्नांची उत्तरं ही केवळ समाजाची प्रातिनिधिक मानसिकता दर्शवणारीच नसतील. नवे शोध हे नव्या समस्यांना जन्म देत आहेत,...
  May 21, 12:20 AM
 • व्यावसायिक क्षेत्रात ज्याचं बोट धरून आपण चालतो, यश मिळवतो त्याचं आयुष्यात वेगळं महत्त्व असतं. त्याची कौतुकाची थाप मोलाची असते. पण कधी या आदराच्या स्थानासाठी कृतज्ञता व्यक्त करायची राहून जाते... सावरखेड-एक गाव, सनई-चौघडे, जोगवा, ७२ मैल एक प्रवास, सारख्या दर्जेदार कलाकृती देणारे दिग्दर्शक राजीव पाटील ही माझे आयुष्य घडवणारी व्यक्ती होती. यशाच्या वाटेवर अडखळताना, पुढचे पाऊल टाकताना, यश मिळवताना प्रत्येक क्षणी राजीव सर आठवतात. वंशवेळ चित्रपट मी त्यांच्यासोबत केला होता. दुर्दैवाने...
  May 21, 12:18 AM
 • रेल्वेच्या दुसऱ्या डब्यात एका परिवारातले काही लोक आपल्या प्रियजनाचा ताबूत (शवपेटी) घेऊन बसले होते. पेटीत त्यांच्या प्रियजनाचा मृतदेह होता आणि ते त्याला आपल्या गावी घेऊन चालले होते. खूप विनवण्या करून, काही देवघेव करून त्यांनी हा मृतदेह रेल्वेतून नेण्याची परवानगी मिळवली होती. ताबूत घेऊन त्यांनी जेव्हा डब्यात प्रवेश केला, तेव्हा अन्य प्रवाशांनी आपला विरोध प्रकट केला. खूप वादावादी झाली, पण स्टेशनमास्तरांनी परवानगी दिल्यामुळे शेवटी ते ताबूत घेऊन डब्यात चढलेच. ते सीटवर बसले आणि...
  May 21, 12:14 AM
 • २१ मे ते २८ मे हा मासिक पाळी सुरक्षा सप्ताह. या विषयात पुरूषांचा सहभाग वाढण्यासाठी अनेक स्तरांवरून प्रयत्न सुरू आहेत. मासिक पाळीचा आई, पत्नी आणि मुलगी असा अनुभव सांगतो आहे एक संवेदनशील पुरूष... माझ्या चिमुरडीनं खेळण्याच्या नादात सॅनिटरी पॅड हातात घेतलं. याचं डायपर करता येईल का, असं विचारलं. न रागावता तिच्या चिमुकल्या मनाचं कौतुक केलं. तिच्या आयडियाची दाद दिली. पाळीबद्दल समजावून सांगायचं वय नसल्यामुळे खेळायला पाठवून दिलं. मला माझं बालपण आठवलं. कधी दिवसा, रात्री बेरात्री कावळा शिवला...
  May 21, 12:14 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात