Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • रोज कामाला जाण्यापूर्वी आपल्यातल्या बहुतेकांना विचार करावा लागतो तो कोणते कपडे घालायचे याचा. विद्यार्थ्यांना काॅलेजात गणवेश नसतो, तरीही साधारण कोणते कपडे घातलेले चालतात, याचे नियम असतातच. ते अनेक कार्यालयांमध्येही असतात. काही ठिकाणी फाॅर्मल म्हणजे औपचारिक कपडे आवश्यक असतात. आता या फाॅर्मलमध्ये काय चालतं, ते प्रत्येक कार्यालय ठरवतं. स्त्रियांसाठी कुठे यात साडी वा सलवार कुडता चालतो, तर कुठे केवळ ट्राउजर्स व शर्ट चालतो. पुरुषांनीही ट्राउजर्स आणि फुल शर्ट, क्वचित टायही, घालणं अपेक्षित...
  August 22, 03:00 AM
 • ज्या ठिकाणी पुरुषांसाठी हंड्या बांधल्या जातात, तिथेच तशाच वातावरणात महिलांसाठी हंड्या बांधल्या जातात. एकीकडे स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने वावरू नये अशी सामाजिक परिस्थिती तयार केली जात आहे आणि दुसरीकडे उत्सवांचा पुरुषी ढाचा न मोडता त्यात महिलांना सामावून घेतले जात आहे. पुरुषांनी केलेल्या मूर्खपणाची बरोबरी करण्याला सक्षमीकरणाचे नाव देणे खूपच धोक्याचे आहे... अगर लडके कुछ कर सकते हैं , तो हम क्यों नहीं? आजच्या जगात जर बायका डॉक्टर, इंजिनिअर, पायलटसुद्धा होऊ शकतात तर...
  August 22, 03:00 AM
 • गणवेश परिधान केल्याबरोबरच विशेष अशी ऊर्जा जणू शरीरात येते, प्रत्येक व्यक्तीला आपापल्या कर्तव्याची जाणीव होते. कर्तव्याबद्दलची दक्षता वाढलेली दिसते. आपापल्या कार्यक्षेत्राची आवड मनातून तयार होते. सोबतच समानतेची भावना निर्माण होते. घरात प्रवेश करताच छोटीशी रचू पळत आली आणि तिच्या चाॅकलेटच्या चिकट हातांनीच तिने मला पकडण्याचा प्रयत्न केला. मी नकळत ओरडले, अगं, सरक सरक बाजूला. किती घाणेरडे हात तुझे, माझा गणवेश खराब होईल. तरीही माझं वाक्य पूर्ण होण्याच्या पूर्वीच तिने मला पकडलं. माझी...
  August 22, 03:00 AM
 • सावधान! स्मार्टफोनमध्ये कुठलेही अॅप्लिकेशन अथवा गेम्स डाउनलोड आणि इन्स्टॉल करताना काळजी घ्या. बहुतेक लोक हे करताना अॅपच्या टर्म्स अँड कंडिशन्स सविस्तर न वाचता अॅक्सेप्ट हा पर्याय निवडतात. जेव्हा तुम्ही अॅक्सेप्ट हा पर्याय निवडता तेव्हा स्मार्टफोनमधील फाइल्स, फोन नंबर्सची यादी, सर्व माहिती, फोटो, तुमचं लोकेशन अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्या अॅपला वापरण्याची परवानगी तुम्ही देत असता. अशा रीतीने नकळत तुम्ही तुमच्या फोनचा कंट्रोल त्या अॅपच्या कंपनीच्या हातात देत असता. आणि ही डाउनलोड...
  August 22, 03:00 AM
 • अंगणवाड्यांमधल्या मुलांसाठी आकार या उपक्रमाखाली भाषा व गणित विषयांचा साचेबद्ध अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे, तो लवकरच सगळीकडे शिकवायला सुरुवात होईल. यानिमित्ताने यासंबंधीच्या काही प्रश्नांचा आढावा. महाराष्ट्र शासनाने २५ जुलै २०१७ रोजी पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढला असून याअंतर्गत आता अंगणवाड्यांमधील ० ते ६ वयोगटातील मुलांसाठी आकार या उपक्रमाखाली भाषा व गणित विषयाचा साचेबद्ध अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणात...
  August 22, 03:00 AM
 • मागच्याच आठवड्यात राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा झाला! गेल्या तीन वर्षांपासून भारतीय हातमाग उद्योगाला हातभार लावण्यासाठी हा दिवस साजरा होऊ लागलाय. त्या निमित्ताने... मला आठवतंय तसं मी नेहमी कॉटन आणि सिल्कचे कपडेच घालत आलेय. अर्थात ते कधी ठरवून घडलं नाही. पण तेच कपडे नेहमी आवडत गेले आणि त्यामुळे वापरलेही गेले. अर्थातच सुरुवातीला हॅन्डलूम आणि पॉवरलूम वगैरे काही समजत नसे. पण पारंपरिक पद्धतीचं कापड, चांदीचे दागिने आवडू लागले आणि मी त्याकडे खेचली जाऊ लागले. मग हळूहळू याबद्दल वाचू लागले आणि...
  August 15, 03:19 AM
 • फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीच्या संपन्न वारश्यातून सामाजिक बांधिलकी जपत स्त्रियांचं आत्मभान जागवणाऱ्या कविता प्रा. सुनिता यांच्या संग्रहात वाचायला मिळतात. स्त्रीमनाच्या अस्तित्व स्थापनेसाठीचा संघर्ष अतिशय सहजतेनं कवियत्रिनं व्यक्त केला आहे. प्रा. सुनिता बोर्डे - खडसे लिखित अस्तित्वाचा अजिंठा कोरताना हा पहिलाच कवितासंग्रह! यात एकूण ८५ कविता असून सर्वच मुक्तछंदातील आहेत. या कवितांमधून फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांतून संपन्न झालेले कवयित्री खडसे यांचे आत्मभान प्रकर्षाने...
  August 15, 03:11 AM
 • या आईने ना सगळ्यांना माझी मोदकाची गोष्ट सांगितली, म्हणून सगळे हसतात मला. उग्गाच मला खादाड आणि हावरट-बिवरट म्हणतात. पण मी अजिबात नाहीये हं तसा. उलट कधी कधीतर मला मूडच नसतो जेवायचा. पण या आईला कोण सांगेल? सारखीच नुसती भाजी-चपाती नाहीतर वरणभात घेऊन मागे लागते माझ्या. मी आर्यन दादाच्या घरी जाऊन लपलो, तरी ती शोधून काढते मला. आता नाही आवडत मला असलं जेवण. मला ना चपाती बरोबर मुरांबा, तूप-साखर, हलवा, शिकरण, बासुंदी, श्रीखंड असं छान-छान सगळं खायला आवडतं. पण आई मला रागावते नुसती. म्हणते, तू खूप गोडखाऊ झालायस,...
  August 15, 03:09 AM
 • वर्षा ऋतूत येणाऱ्या चतुर्मासात राजस गुणधर्म असलेले पदार्थ सेवन केल्यास मनाचा सात्त्विक भाव कमी होऊन श्रावणातील व्रतांमध्ये अडथळा येऊ शकतो. म्हणून श्रावणात सुपाच्य, अल्प, स्निग्ध, गरम आणि पचायला हलका आहार घेणे योग्य ठरते. भारतीयांमध्ये चतुर्मास आणि त्यातही श्रावणाचे विशेष महत्त्व आहे. चतुर्मासातला श्रावण महिना पवित्र समजला जातो. या महिन्यात विविध व्रतवैकल्यं केली जातात. बरेच सणवारसुद्धा या महिन्यात असतात. अशा या श्रावणात लोक मांसाहार आणि मद्यपान टाळतात. भाद्रपद आणि गणपतीच्या...
  August 15, 03:07 AM
 • आपल्या समजुती, आपल्या धारणा आपल्या जीवनाला घडवत-बिघडवत असतात. धार्मिकतेच्या बाबतीत नाही तर सगळ्याच बाबतीत. त्या वेळोवेळी पडताळल्या पाहिजेत. परिस्थितीनुरूप स्वीकारल्या-बदलल्या किंवा नाकारल्या पाहिजेत. आयुष्य उगाच अवघड करून जगण्यात काय मजा? आपण नेहमी भविष्याच्या चिंतेने ग्रासलेले असतो, उद्याच्या काळजीने आज हातात असलेला क्षण जगायचे सोडून उद्याच्या तजविजीच्या मागे धावत असतो. अर्थात आपण नेहमी कम्फर्ट झोनमध्ये जगण्याला प्राधान्य देत असतो. आणि तसे जगण्यासाठी आपल्याभोवती काही चौकटी...
  August 15, 03:04 AM
 • एखाद्या स्त्रीला, कायम वा वारंवार, कामेच्छा होत नसेल आणि तिला किंवा जोडीदाराला याचा त्रास जाणवत असेल, तरच याला कामनिरसता म्हणता येईल, अशी एक सर्वमान्य व्याख्या आहे. निव्वळ एखादीला कामक्रीडेबाबत अनिच्छा आहे, पण याबाबत तिची काही तक्रार नाही, त्याचीही तिच्याबद्दल नाही आणि दोघांची एकमेकांबद्दलही काही तक्रार नाही; तर मग हा काही आजार समजला जात नाही. महिलांसाठी खास व्हायग्रा आलंय बरं का बाजारात. नेहमीप्रमाणे ते सध्या फक्त अमेरिकेत उपलब्ध आहे. पण येईल लवकरच, इंडियात. भारतात यायला थोडा वेळ...
  August 15, 03:02 AM
 • नाच गं घुमा म्हणतेय सखी, शंभराची नोट, नको दारूचा घोट, मन करू मोठं, दु:ख होईल छोटं, हात धरीन तुझा, हा विश्वास माझा, सोडू नको गाव, मोडू नको डाव, ओलांड तरी शीव मी पाहतेच कशी. नाच गं घुमा...नाचू मी कशी? खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. नाही हो, कालचीच. आटपाट नगरातली नाही, आपल्याच महानगरातली. उपनगरातल्या प्रवाशांची या टोकापासून त्या टोकापर्यंत, त्या टोकापासून या टोकापर्यंत वाहतूक करणाऱ्या मुंबापुरीची अभिसरणसंस्था अशा लोकल ट्रेनमधली. संध्याकाळची वेळ, महिलांचा डब्बा. पहाटेपासून दमलेल्याचा मागमूस नाही...
  August 15, 02:59 AM
 • सत्तरीतल्या माणसाच्या गाठीशी प्रचंड अनुभव असतो, जीवनाविषयीची प्रगल्भ समज व उमज असते. आयुष्याच्या सायंकाळी भल्याबुऱ्या अनेक आठवणींच गाठोडं जमा झालेलं असतं. तसंच सारासार विचार करून काय जपून ठेवायचं नि काय सोडून द्यायचं, याचीही पुरेशी जाण अालेली असते. आपल्या भवताली अशा अनेक व्यक्ती वावरत असतात. आज सत्तरीतल्या या आजीआजोबांची आठवण येण्याचं कारण, भारतीय लोकशाही आज सत्तर वर्षांची होतेय. खूप मोठा पल्ला एक राष्ट्र म्हणून व एक लोकशाही म्हणून आपण गाठलाय. त्यामुळे एकाहत्तराव्या...
  August 15, 02:57 AM
 • भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख. विवाहाचे अनेक प्रकार समाजात रूढ होऊ लागले आणि त्यानुसार जन्माला आलेल्या मुलांचेही प्रकार मानले जात. मूल हवं, मात्र ते पुरुषाला स्वत:च्याच बीजाचं हवं ही कल्पना रुळली महाभारत काळात (अंदाजे इ.स. पूर्व ३००० ते इ.स. पूर्व १५००); अर्थात त्या आधीच ती...
  August 15, 02:21 AM
 • दर दोन वर्षांनी नवऱ्याच्या बदलीमुळे पॅक-अनपॅक करावा लागणारा संसार. त्याच्या सोबतीशिवाय पार पाडाव्या लागणाऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या. चारचौघींसारखं सरळसाधं नसलेलं आयुष्य. अस्थिरतेमुळे स्वत:च्या करिअरला घालावी लागणारी मुरड. अनिश्चिततेत उगवणारा आणि तणावात मावळणारा दिवस. सीमेवर तैनात लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीच्या जीवनाची झलक आजच्या एकाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त. अधिकाधिक वेळ, लक्ष आणि समर्पण मागणारी नवऱ्याची सैन्यातली नोकरी ही त्याची पहिली बायको आहे, हे आम्ही...
  August 15, 02:13 AM
 • पाॅर्न स्टार सनी लिओनीने मुलगी दत्तक घेतली आणि तिच्या पूर्वायुष्यातल्या व्यवसायावरून तिचा आईपणा नाकारणाऱ्या मेसेजेसचा सोशल मीडियावर पाऊस पडला. नैतिकतेच्या याच निकषावर भ्रष्टाचारी व्यक्तींना पालक होण्यापासून नाकारलेलं या तथाकथित संस्कृतिरक्षकांना पचेल का? स नी लिओनी आणि तिचा नवरा डॅनियल वेबर यांनी मुलगी दत्तक घेतली आणि सोशल मीडियावरचे ट्रोल सनीच्या अंगावर धावून गेले. पॉर्न स्टार म्हणून कारकीर्द गाजवलेल्या सनीला मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे का? तिच्या मुलीचे भवितव्य कसे असेल?...
  August 8, 01:11 AM
 • शरीरसंबंधांसाठी लग्नाला पूर्वापार अधिष्ठान असल्यानं कुमारी घटस्फोटिता समाजमान्य नाही. मागच्या अंकातल्या कव्हर स्टोरीच्या या भागात जाणून घेऊ, पती-पत्नींत संबंध प्रस्थापित न होण्याची कारणं. पती-पत्नींमध्ये संबंध निर्माण न होण्याला वैद्यकीय भाषेत अनकाॅन्झमेशनम्हणतात आणि ही खूप सामान्य बाब आहे. सामान्य बाब यासाठी की, अनेक जोडपी कमी-अधिक प्रमाणात याचा अनुभव घेतात. मुळात लग्नानंतर महिने सरायला लागले तरी पती-पत्नीमध्ये संबंध निर्माण झाले नाहीत म्हणून उगीच गावगोंधळ घालण्यात काही अर्थ...
  August 8, 01:10 AM
 • भारतभरात गेल्या काही वर्षांत शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली असली तरी, नोकरी करणाऱ्या वा अर्थार्जन करणाऱ्या महिलांची संख्या कमी होत चालल्याचं एका आर्थिक सर्वेक्षणातून पुढे आलंय. चालू वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये तब्बल २४ लाख महिलांनी नोकऱ्या सोडल्या आहेत, अशिक्षित व सुशिक्षित मिळून. एकूण बेराेजगारी वाढते तेव्हा महिलांवर त्याची कुऱ्हाड अधिक जोराने कोसळते, असं अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रही सांगतंच. ग्रामीण भागांमध्ये ६७ टक्के तर शहरी भागांमध्येही...
  August 8, 01:09 AM
 • बाळाची शी हा काही कोणाचा आनंदाचा विषय असू शकत नाही. बऱ्याच घरांमध्ये ही गोष्ट स्त्रीकडे सक्तीने येते. कधी त्याभोवती चांगलं वलय निर्माण करून, तर कधी वाईट. यातली सक्ती अयोग्य वाटते. आई उपलब्ध नसेल तर तितक्याच सहजपणे बाबाला ते काम करता यायला हवं. बाबानं या गोष्टीला नाही म्हणून तरी चालणार नाही. मागच्या पिढीतल्या एक अगदी जवळच्या बाई मला सुचवत होत्या, डायपर वापरायला हरकत नाही. रात्रीसाठी तरी! बाळाची आणि तुझीही झोप पुरी होईल त्यामुळे! डायपर न वापरण्याबद्दल मी बऱ्यापैकी कट्टर आहे, हे त्यांना...
  August 8, 01:08 AM
 • फेसबुक उघडलं आणि फ्रेंड रिक्वेस्टमध्ये ओळखीचं नाव दिसलं क्षितिज. प्रोफाइल बघितलं; पण चेहरा काही फारसा ओळखीचा वाटला नाही. अचानक मन १०-१५ वर्षं मागे गेलं. माझ्या वर्गात एक विद्यार्थी होता. त्याचं नाव पण क्षितिजच होतं. माझ्या नजरेसमोर त्याचं पहिल्या वर्गातील बालरूप उभं झालं. क्षितिज शाळेत सुरुवातीला रमला नव्हता; परंतु नंतर शाळेत रुळल्यावर तो मनमोकळा राहू लागला. त्याच्या घरी शैक्षणिक वातावरण नसल्यामुळे त्याचं शिकण्यात विशेष लक्ष दिसत नव्हतं. बऱ्याचदा तो घरच्यांना कामात मदत करण्यासाठी...
  August 8, 01:07 AM
 
जाहिरात

RECOMMENDED