Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख. जु न्या ओव्यांची संकलनं वाचताना त्या-त्या काळाचा एक सामाजिक पटदेखील डोळ्यांपुढे उभा राहतो. स्त्रीशिक्षण सुरू झालं, त्या सुरुवातीच्या काळात शिकणाऱ्या मुलींना नावं ठेवली जात; त्याची झलक या ओवीतून मिळाली - साठ्यांच्या मुली तुम्ही अशा गं कशा ।...
  July 17, 05:35 AM
 • बाळंतपणाची रजा २६ आठवडे देण्यात यावी, असं विधेयक नुकतंच लोकसभेत मंजूर करण्यात आलं. वरवर महिलांसाठी उपयुक्त वाटणारं हे पाऊल प्रत्यक्षात त्यांच्या नोकरीवर गदा आणणारं ठरू शकतं, हे सूचित करणारी ही कव्हर स्टोरी. तुम्ही नवविवाहित दिसता, पण जर तुम्हाला नोकरीत रुजू व्हायचे असेल तर तुम्हाला काही वर्षे चान्स घेता येणार नाही. प्रथम या वाक्याचा अर्थ काही उमगला नाही. मग जेव्हा वरिष्ठ हसून म्हणाले, पगारी मॅटर्निटी रजेची सोय नाही हो आपल्याकडे! तेव्हा लक्षात आले की, आता आपल्या आयुष्यातले पुढचे...
  July 17, 05:29 AM
 • कधी तरी सिंहकटीवरून दुमडून दुमडून अचानक खूप फुलणारा पिवळा भोपळ्याचा गाउन, गळ्याशी दाटीदाटीने झालर करणारे ओले खोबरे, दाणे, मोहरी-जिऱ्याचे बुट्टे आणि केसात खुपसलेला कोथिंबिरीचा राजमुकुट... आणि कार्टलंड बाईंची रथातून धावणारी गोष्ट. आणि कधीतरी एखाद्या शेलाट्या भांड्यात, चापूनचोपून नेसलेली पिवळी धमक नऊवारी पैठणी, जिरे-मोहरीचे काठपदर, लावणीचे बोल थिरकताना उडलेले थोडे कुंकू, थोडी मिरची कढीपत्त्याची कलाकुसर आणि त्यावर शुभ्र खोबऱ्याचा अंगावर पेललेला रेशमी शेला आणि दहीशेठना बघताच...
  July 10, 06:50 AM
 • कुटूंबातल्या इतर सदस्यांच्या त्वचेच्या रंगाचा इतिहास काही का असेन पण गर्भवतीनं केशर खाल्लं की गोरं गुटगुटीत बाळ जन्माला येतं असा एक समज आहे. भारतीयांचा गोऱ्या रंगाकडे असणारा ओढा लक्षात घेता, याच विषयाची सांगोपांग चर्चा करणारा आजच्या सदरातला लेख. डॉक्टर, केशर किती पिऊ? जरा लाडिक प्रश्न. कशाला? माझा स्थितप्रज्ञ प्रतिप्रश्न. ....! चेहऱ्यावर माहीत असून मलाच विचारता होय? असे भाव. मी गप्प. नाही डॉक्! डॉक्? अरेच्चा, ही तर गुगल संप्रदायातील स्त्री, मी मनोमन ओळखतो. आजकाल हे डॉक्, डॉक् ऐकून ऐकून माझं...
  July 10, 06:45 AM
 • अर्चनाच्या आयुष्यातल्या पोस्टपार्टम सायकाॅसिस च्या अवघड काळात तिला व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन, परस्परांना जमेल तसा, जमेल तेवढं समजून, सावरून, सांभाळून घेत, मानसोपचाराबद्दल कुठल्याही शंकाकुशंका न घेता डोळसपणा दाखवणाऱ्या एका कुटूंबाचा प्रवास... अर्चनाची आई एका लग्नात भेटली. मी विचारलं, आता कशी आहे अर्चना? गोळ्या सुरू हायेत पन् आता तशी बरीये, त्या म्हणाल्या. अर्चनाची केस म्हणजे टिपिकल पोस्टपार्टम सायकाॅसिसची. बेबी ब्लूज आणि पोस्टपार्टम डिप्रेशन यात थोडासा फरक आहे. बेबी ब्लूज म्हणजे...
  July 10, 06:37 AM
 • बदललेल्या शिक्षण पद्धतीनुसार तू अनेक पर्याय निवडलेस, त्यात तू यशस्वी झालास, तर तू त्याला दिलेला प्रतिसाद आहे तो बरोबर आहे असे समज. तू कोठेही कमी आहोत असे समजू नकोस. प्राप्त परिस्थितीत आपण किती गोष्टीवर विचार करू शकतो त्यातून मार्ग काढू शकतोस, याची क्षमता यातून दिसते हे मी तुला सांगतो. त्यामुळे तू हुशारच आहेस व प्रॅक्टिकली विचार करणारा आहेस हे लक्षात घे. आज अमोघचा रिझल्ट होता. बारावी म्हणजे मुख्य वर्ष, महत्त्वाचे वर्ष, आयुष्याला आकार देण्याचे वर्ष. खूप अभ्यास, सगळ्यांचे सल्ले, आणि क्लास...
  July 10, 06:28 AM
 • आजकाल सगळीकडेच विजेवर चालणारी घड्याळं आलेली आहेत. पण चाळीसपन्नास वर्षांपूर्वी घरोघरी चावी द्यायची घड्याळं असत. चावीने स्प्रिंग ताणली जाई, आणि त्या स्प्रिंगमध्ये साठवलेली शक्ती हळूहळू वापरत एक लंबक हलत राही. या लंबकाच्या एका झोक्याला सेकंदाचा काटा पुढे जात असे. हा लंबक म्हणजे नक्की काय? आणि तो घड्याळांमध्ये का वापरला जाई? कुठलीही टांगलेली, झुलणारी वस्तू म्हणजे म्हणजे लंबक. आपण झोपाळ्यावर झोके घेतो, तेव्हा आपण आणि झोपाळा मिळून एक लंबकच झालेलो असतो. आदर्श लंबक हा एका दोरीचा किंवा एका...
  July 10, 06:20 AM
 • थिंक महाराष्ट्र डॉट कॉम हा प्रकल्प गावोगावच्या कर्तबगार व्यक्तींचा सातत्याने शोध घेऊन ती माणसे समाजासमोर मांडत अाहे. अाजच्या या सदरामध्ये महाराष्ट्राबाहेर जाऊन मोत्यांच्या शेतीसारख्या वेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या मयूरी खैरे-अांबटकरच्या संघर्ष अाणि जिद्दीची कहाणी. मयूरी खैरे ही बुलडाण्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली मुलगी. वय वर्षे केवळ २५! एमपीएससी देऊन सरकारी नोकरी करावी अशी इच्छा एकीकडे होतीच, पण ती अचानक शेतीकडे वळली. तीदेखील साधीसुधी नाही, मोत्यांची शेती!...
  July 10, 06:13 AM
 • लवकरच येणाऱ्या आषाढस्य प्रथम दिवसे म्हणजेच महाकवी कालिदास दिनानिमित्त त्यांच्या काव्यातील सौंदर्यस्थळे उलगडून दाखवणारा लेख. वैशाखाच्या उष्मादाहानंतर वर्षाऋतूची मोहक चाहूल लागते. आकाशामध्ये ढग दाटीवाटी करतात. कविमन उद्युक्त नाही झाले तर नवलच! पावसांच्या सरींबरोबर कविता, चारोळ्यांच्या सरी देखील बरसू लागतात. पर्वतीय प्रदेशामध्ये जलभारामुळे नभ जणू काही डोंगरावरच उतरले आहेत असा भास होतो. परंतु या नियमित घडणाऱ्या भौगोलिक घटनेकडे पाहून शंभर-सव्वाशे श्लोकांचे नितांत सुंदर...
  July 10, 06:04 AM
 • महिलांना २६ आठवडे भरपगारी बाळंतपणाची रजा देण्यात यावी, असं विधेयक गेल्याच आठवड्यात लाेकसभेत मंजूर झालं आहे. बाळाला इतके दिवस आईची, स्तनपानाची गरज असते, त्यातून त्याची सुयोग्य वाढ होते, व त्याच्या आयुष्याचा भक्कम सुरक्षित पाया या काळात उभा राहातो. वरकरणी हा अगदी साजरा करण्याजोगाच निर्णय. परंतु, त्याचे परिणाम काय होतील, याची कल्पना आपण करू शकतो. या निर्णयाचा आर्थिक भार संपूर्णपणे कंपनीवर पडणार. अगदी कोट्यवधीची उलाढाल असलेल्या कंपन्यांना हा आर्थिक बोजा झेपेलही, परंतु लहान कारखाने, उद्योग,...
  July 10, 05:56 AM
 • पोलीस कर्मचारी ललित साळवे नुकतेच लिंगबदल शस्त्रक्रिया करून नोकरीवर रुजू झाले अाहेत, त्यामुळे या विषयावर चर्चा होऊ लागली आहे. अशीच लिंगबदल शस्त्रक्रिया केलेल्या कोलकात्यातील एक शिक्षिकेचे हे अनुभव. या व्यक्तींचा प्रवास किती खडतर होतो, तोही निव्वळ समाजातील चुकीच्या मानसिकतेमुळे, हे सांगणारे. दुपारची वेळ. तिशीतील सुचित्रा प्राचार्यांच्या केबिनमध्ये गेल्या. इंग्रजी आणि भूगोल विषयात एमए, बीडएडची पदवी आणि जोडीला १० वर्षांचा शिकवण्याचा अनुभव असल्याने नोकरी आपल्यालाच मिळेल हा...
  July 10, 05:48 AM
 • समाजाच्या लेखी अस्पृश्य असलेल्या लैंगिक शिक्षणासारख्या गंभीर नि महत्त्वाच्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करून त्यावर स्वतंत्रपणे सातत्याने परखड विचार मांडण्यासाठी समाजस्वास्थ्य मासिकाला रधों यांनी सलग हत्यार बनवले. रघुनाथ धोंडो कर्वे (जन्म : १४ जानेवारी १८८२ मृत्यू : १४ ऑक्टोबर १९५३) हे मुळात गणित विषयाचे प्राध्यापक. त्यांच्या जडणघडणीवर प्रामुख्याने समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा प्रभाव होता. वडील धोंडो केशव कर्वे यांच्या प्रगल्भ सुधारणावादी विचारांची त्यांना प्रेरणा मिळाली...
  July 3, 05:56 AM
 • विज्ञानाची भीती अनेक विद्यार्थ्यांना वाटत असते. हे आपल्या रोजच्या जीवनाचा भाग नाही, ते आपल्याला कळणारच नाही, अशा विचारांतून आलेली ही भावना असते. नेमकं हेच लक्षात घेऊन वैज्ञानिक संकल्पना कशा शिकवायच्या, याची ही युक्ती... मुळातच ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षण हे माझे आवडते विषय आणि ते शिकवायचं म्हणलं की, जाम हुरूप येतो मला. एकतर यात अनेक रोजच्या जीवनातल्या गोष्टी सांगता येतात आणि त्यांचा संदर्भही पटकन लागतो विद्यार्थ्यांना. आणि वर्ग हसताखेळता राहतो. बारावीला...
  July 3, 05:56 AM
 • चित्रपट, नाटकं, जाहिराती, आणि दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम अशी सगळीच प्रसारमाध्यमं आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतात. आपण कसं वागावं, कसं दिसावं याबद्दल निरनिराळे संदेश त्यातून आपल्यासमोर येत असतात. कधी पारंपरिक तर कधी अत्याधुनिक! पण हे सगळे माध्यमसंदेश आपल्याला लिंगभावाबद्दल काय सुचवतात? आणि कशासाठी? याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देण्याचा प्रयत्न करणारे हे सदर. माझी अगदी खात्रीच पटत चालली होती की, अखेर समाजसुधारकांची वर्षानुवर्षांची मेहनत फळाला आली आहे आणि...
  July 3, 12:36 AM
 • आजकाल विद्यार्थी सोशल मीडियावर किमान दोन ते तीन तास तरी घालवतात. याकरिता पालक आणि शिक्षकांच्या नाराजीलाही त्यांना सामोरं जावं लागतं. मात्र, किमान त्यातली काही मिनिटं एखाद्या विषयाला धरून शिक्षणात भर घालणारी करता येतील? अभ्यास आणि सोशल मीडियाची जोडणी करून अभ्यासाविषयी एक शिस्त निर्माण करता आली तर...? घराघरातून ऐकू येणारं एक वाक्य म्हणजे आधी तो फोन बंद कर! शाळा, कॉलेज, ऑफिस, आणि घर या सर्व ठिकाणी वापरले जाणारे माध्यम म्हणजे फोन. सोशल मीडियाचा सर्वाधिक वापरसुद्धा स्मार्टफोनद्वारे अधिक...
  July 3, 12:35 AM
 • भिडस्त व्यक्ती दयाळू, प्रेमळ असतात. खरं तर सद्गुणी माणूस म्हणून आवश्यक असणारं सारं काही त्यांच्यात असतं. नसते ती स्वअस्तित्वाची जाणीव. म्हणूनच त्यांना अशा जीवनशैलीमधून बाहेर काढून स्वत:करिता जगण्यासाठी तयार करायला हवं. आपल्या दोषांवर अधिक जोर न देता आपल्यातली गुणैवशिष्ट्ये अगदी सहजपणे सांगायला त्यांना प्रवृत्त करायला हवं. अप्पासाहेबांना कोणी फोन केला किंवा फोन त्यांनी उचलला तर ते फक्त कोण बोलतंय एवढं बोलून लगेच तो फोन त्यांच्या बायकोकडे म्हणजे सुधाकडे देत. समोरच्याला जे काही...
  July 3, 12:34 AM
 • एखाद्या कुटुंबातले सगळे सदस्य अतिशय खेळीमेळीने एका घरात नांदतात, तशा संगीतकार, गायक, कवी, चित्रकार या चारही भूमिका अतिशय सलोख्याने मिलिंद जोशी यांच्या ठायी नांदत असतात. या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाशी झालेला हा कलात्मक संवाद... सं गीतकार मिलिंद जोशी यांच्या घरात हॉलच्या एका भिंतीवर हिरव्या गर्द रंगाचं एक मोठ्ठं चित्र लावलं होतं. चित्रकलेवर माझं प्रेम असल्याने मी साहजिकच त्यांना विचारलं वाह! कुणाचं पेंटिंग? ते म्हणाले, माझं! मला आश्चर्य वाटलं. बिनधास्त, गोळाबेरीज, अशाच एका बेटावर,...
  July 3, 12:33 AM
 • आम्ही लहान असताना किती खेळ खेळायचो, नदीत पोहायचो, घरी येण्यासाठी आईला हाका माराव्या लागायच्या. नाहीतर आताची मुलं, सारखं त्या मोबाइल नाहीतर टीव्हीत डोकं घालून बसलेली असतात. आम्ही लहान असताना दाणे, कुरमुरे, मऊभात, पेज, शिळी भाकरी/पोळी दह्यात कुस्करून, धपाटे वगैरे पौष्टिक खायचो. नाहीतर आताची मुलं, डाव्याउजव्या हाताने ब्रेडचे तुकडे मोडत असतात. आम्ही लहान असतानाची ही यादी कोणत्याही घरगुती समारंभात कानावर पडतेच. आताच्या पिढीचं कसं होणार, किती दुर्दैवी ही मुलं असं म्हणताना त्याचा दोष...
  July 3, 12:32 AM
 • भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख. गेल्या दोन लेखांमध्ये आपण इतिहासाचा थोडक्यात आढावा घेतला. आता त्यापुढील काळ पाहून मग वर्तमानात प्रवेश करू. ब्राह्मण आणि क्षत्रियांखेरीज बाकीच्या जाती-जमातींचे जीवन हे दैनंदिन जगण्यातच रस असलेले असावे आणि या राजकारणात व लढायांत आणि...
  July 3, 12:31 AM
 • क्रीडा पत्रकारिता हे अगदी काही वर्षांपर्यंत पुरुषांचं क्षेत्र होतं. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या महिला क्रीडा पत्रकार भारतभरात होत्या. १९८०च्या दशकात मुंबईत क्रीडा पत्रकार म्हणून कामास सुरुवात केलेल्या शारदा उग्रा यांपैकी एक. त्या सध्या ईएसपीएन क्रिकइन्फो संस्थेत आहेत. दोन जुलै हा दिवस जगभरात क्रीडा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हे मनोगत. झाॅल फुटबाॅल क्लबच्या स्पर्धा पाहायला मागच्या वर्षी गेले होते. म्हटलं तर ही स्पर्धा लहान, राज्य पातळीवरची. पण तिथली...
  July 3, 12:30 AM
 
जाहिरात

RECOMMENDED