Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच या वृत्तीच्या मंडळींची कमतरता नाही. भारतात तर नाहीच नाही. स्वत:चं पोट भरलेलं असूनही दुसऱ्यांच्या ताटावर नजर ठेवणाऱ्या अशाच काही वल्लींचा आलेला हा अनुभव. हसवणारा आणि विचार करायला लावणाराही... नाशिकला आल्यावर भुक्कड या शब्दाची माझ्या शब्दकोशात भर पडली. भुक्कड म्हणजे भुकेलेला नव्हे, तर ज्याचं पोट भरलंय तरीही दुसऱ्याच्या ताटातील पोळीवर ज्याची नजर आहे असा कद्रू मनाचा माणूस. यामागे प्रामुख्याने मिळतंय तर का सोडा? ही वृत्ती असणारे असे भुक्कडगिरीतील बादशहा...
  August 7, 07:11 AM
 • एकीकडे भावना समजून त्या आपल्या गाण्यात व्यक्त करणं ही गरज असणारं संगीत क्षेत्र आणि दुसरीकडे भावनांच्या आहारी न जाता तटस्थपणे नवनव्या आव्हानांना सामोरं जाण्याची मागणी करणारं वैद्यकीय क्षेत्र, यांचा समतोल सांभाळत दोन्ही कलांवर भरभरून प्रेम करणारी डॉक्टर गायिका नेहा राजपाल हिच्याशी मारलेल्या गप्पा! गाणं आणि मेडिकलची सुरुवात कशी झाली? माझी आई डॉक्टर असल्यामुळे लहानपणापासून मी तिला काम करताना बघत आले आहे. डॉक्टर ही देवानंतरची सगळ्यात पॉवरफुल पोझिशन आहे, असं मला वाटतं. त्यामुळे...
  August 7, 07:07 AM
 • हिलियमचा फुगा वर का जातो? हलक्या गोष्टी तरंगतात आणि जड वस्तू का बुडतात? हिलियम हवेपेक्षा हलका असतो, त्यामुळे तो हवेच्या वर तरंगण्याचा प्रयत्न करतो. पण वर म्हणजे नक्की किती वर जाईल? तो अवकाशात जाऊन पोहोचेल का? मला लहानपणी हिलियम भरलेल्या फुग्यांचं खूप आकर्षण होतं. हे फुगे आपोआप तरंगतात. सोडून दिले तर वर जातात. खाली दाबून धरण्यासाठी तुम्हाला अगदी लहानसा का होईना, पण जोर लावावा लागतो. हे सगळं जादूने भरल्यासारखं वाटायचं. कधी चुकून तो फुगा सुटला आणि आकाशात निघून गेला तर मी शेवटपर्यंत बघत...
  August 7, 07:04 AM
 • भाताचं आणि डाळीचं एक समीकरण असतं. शक्यतो भाताने कुठेही एकटं नाही जायचं. कधी एखादी श्रीमंत लोण्यात गुंग अशी डाळ, कधी मेथी, पालक लोकांशी विचारपूर्वक युती केलेली डाळ; कधी कधी तर भांडून भांडून दोन डाळी एकत्र येऊन अद्रक लसूण टोमॅटोमध्ये रमलेली डाळ; आणि कधी कधी सात्त्विकतेचा परमोच्च आविष्कार असलेलं साधं वरण. त्यामुळे जेव्हा काही बाळबोध डाळी, शिजतानाच भातात पडू लागल्या, आणि बरोबर फोडण्या, कढीपत्ते, जिरेपूड घेऊन मिसळू लागल्या, तेव्हा भात अगदी हुरळून गेला. अति मसालेदार खाणे, दमून भागून कुठून...
  August 7, 06:57 AM
 • तरुणांप्रमाणेच इंटरनेटच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक वापरणाऱ्या ज्येष्ठांची संख्या वाढते आहे. या माध्यमांमुळे त्यांना आपलं एकटेपण वाटून घेण्याचं निमित्त मिळालं आहे. मात्र, या आभासी जगात मित्रमंडळीचं वर्तुळ तयार करण्याआधी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी त्याबद्दल थोडंसं... अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, अनुपम खेर, शोभा डे ही सर्व मंडळी प्रत्यक्ष आयुष्यात जेवढी सक्रिय आहेत तेवढीच सोशल मीडियावरसुद्धा सक्रिय आहेत. त्यांच्याच वयाचे तुमच्यापैकी अनेक वाचकही सोशल...
  August 7, 06:54 AM
 • आपल्या सर्वांनाच आयुष्यभर योग्य पोषणाची आवश्यकता असते. वाढत्या वयातल्या मुलांच्या पोषणाकडे लक्ष पुरवण्याची तर नितांत आवश्यकता असते. त्या दृष्टीनं बाळाच्या जन्मानंतरचे पहिले हजार दिवस महत्त्वाचे ठरतात. यावर आधारित युनिसेफच्या संकल्पनेबद्दल सजग करणारा हा लेख. आपल्या घरात नवीन बाळ येणार म्हटलं की, आपण बाळासाठी काय काय करायचं याची तयारी सुरू करतो. बाळाची सोय, बाळ आरामात असणं ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट होते. कपडे, खेळणी इतकंच काय, अगदी आपण कुठलं तेल, साबण, काजळ, पावडर याचाही...
  August 7, 06:50 AM
 • आजची कव्हर स्टोरी आणि वरचा लेख, दोन्हींचे विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचे. टीव्ही आणि त्यावरच्या मालिका, मग त्या कोणत्याही भाषेतल्या का असेनात; आणि मोबाइल/स्मार्टफोन. तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात आपसूक आलेली ही दोन उपकरणं. अात्यंतिक गरीब व्यक्ती वगळता टीव्ही आणि मोबाइल न बाळगणारी माणसं जरा विरळाच. दोन्ही संपर्काची साधनं. टीव्ही एकमार्गी, तर फोनमुळे संवाद वा संभाषण होऊ शकतं हा एक फरक. पण दोहोंतली साम्यं पुष्कळच. व्यसन हे सर्वात मोठं कदाचित. दोन्ही उपकरणं मनुष्यप्राण्यासाठी वरदान आहेत,...
  August 7, 06:46 AM
 • मराठी मालिका सुधारल्यात (?). म्हणजे पूर्वीची सासूसुनांची भांडणं, आसवं गाळणारी सून यांची जागा आता एक नवरा आणि दोन बायकांनी घेतलीय. विवाहबाह्य संबंधांवरच्या कथानकांचा ट्रेंड आता मराठी मालिकांमध्ये नुसताच रुळला नाहीये तर त्यानं (मठ्ठ) प्रेक्षकांच्या मनातली जागा बळकावलीय. इतरांच्या खाजगी आयुष्यात डोकावणाऱ्या विशेषत: पती, पत्नी और वो पद्धतीच्या मालिका यशस्वी का होतात, हा खरं तर संशोधनाचा विषय होऊ शकतो. सखे ग सये गाऊ या अाता अानंदाची गाणी ग... अातल्या अात पिऊन टाकू डाेळ्यातले पाणी ग... असा...
  August 7, 06:38 AM
 • मुलींच्या भल्यासाठी म्हणून त्यांना स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची ओळख निर्माण करायच्या संधी नाकारल्या जातात. कुटुंबातून, शाळेतून, प्रसारमाध्यमांतून आणि एकूणच समाजातून त्यांना मोबाइल फोन तंत्रज्ञानाच्या जोखमीपासून दूर ठेवायचे प्रयत्न केले जातात, काय आहे यामागचं वास्तव? समाजात दंगलींचे प्रमाण वाढण्याचे कारण? स्मार्टफोन स्त्रियांवरच्या वाढत्या अत्याचारांचे कारण? स्मार्टफोन तरुणांमधल्या व्यसनाधीनतेचे कारण? स्मार्टफोन स्मरणशक्ती कमी होण्याचे कारण? स्मार्टफोन आपल्या देशात सध्या...
  August 7, 06:38 AM
 • व्हाय नॉट आय? हे पुस्तक आहेे मायलेकींच्या प्रवासाचं. सकारात्मकतेचं. पतीच्या माघारी वैधव्य आलेल्या पत्नीच्या जिद्दीचं. डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे दृष्टी गमावून बसलेल्या मुलीला लोकांची सहानुभूती मिळवण्याची धडपड न करण्याऐवजी तिला अंधारापलीकडचं लोभस जग दाखवणाऱ्या आईचं... सु टीमध्ये मुलीकडे गेले होते तेव्हा वृंदा भार्गवे यांचं व्हाय नॉट आय हे पुस्तक वाचण्यात आलं. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्रावर माझे डोळे खिळून राहिले. ते चित्र होतं उंच आकाशात ढगांच्या अंधाराला चिरत...
  July 31, 06:28 AM
 • कविता महाजन यांचा हातात बुकं, मास्तरणी जशा हा लेख १७ जुलैच्या मधुरिमामध्ये वाचला आणि जणू माझ्या आयुष्याचा, किंबहुना ज्या स्त्रियांनी आज साठी पार केली आहे, अशा सर्वांचा लेखाजोखा वाचत असल्याचा अनुभव आला. मी १९७४मध्ये नोकरीला लागले. तेव्हा स्त्रियांचं नोकरी करण्याचं प्रमाण कमी होतं. जुन्या काळातील असूनही माझ्या आईने आम्हा भावंडांना शिक्षणाने समृद्ध केले होते. त्यामुळे आम्ही सगळीच नोकरी करत होतो. त्यामुळे लोक अनेकदा, तुमचं काय बाई, सगळी मुलं नोकरी करतात, मुली नोकरी करून आपापल्या...
  July 31, 06:20 AM
 • हसण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो पण कित्येक वेळा त्या ओठाच्या छोट्याशा हालचालीने एखाद्याचा जगण्यावरचा विश्वास वाढतो. हसऱ्या लोकांकडे लोक आकृष्ट होतात. त्यांच्या सहवासात काही क्षण का असेना, आपली दुःखे विसरतात. हास्याचं वर्णन करणारीही अनेक गीतं हिंदी चित्रपटांनी दिली आहेत. देवाने एक मोठे वरदान मनुष्यप्राण्याला दिले आहे. हसण्याचे वरदान. त्या बाबतीत माणूस इतर प्राण्यांपेक्षा नशीबवान आहे. कितीही निराशाजनक परिस्थिती असू दे, एखादी हास्याची लकेर कानी पडली तर थोडा वेळ का होईना उदासी, काळजी...
  July 31, 06:10 AM
 • रुग्णांशी संवाद साधणं, त्यांना बोलतं करणं आणि त्याचं दुखणं जाणून घेणं हे तर खरं डॉक्टरांचं कौशल्य. पण कधीकधी काही रुग्णांशी बोलल्यानंतर डॉक्टर नि:शब्द होतात. रुग्णांना कुठल्या पद्धतीनं प्रतिसाद द्यावा हे सुचत नाही. पावसाळ्यातला एक रिपरिपता दिवस. माझ्या नेहमीच्या पेशंट असणाऱ्या सोनवणेआजी कशाबशा छत्री, पिशवी सांभाळत वेटिंग रूममध्ये आल्या. आजी आल्यात हे त्यांच्या जोडव्यांच्या ठकठक होणाऱ्या आवाजाने आणि त्यांना लागणाऱ्या धापेच्या आवाजाने मला न बघताही लक्षात यायचं. त्या वेळी समोर...
  July 31, 06:05 AM
 • आपण प्रत्येकजण कुठलं ना कुठलं काम करतच असतो. मात्र फक्त काम करणं म्हणजे एक प्रकारची यांत्रिकता. सर्वांना घेऊन, नियोजनपूर्वक तसंच कुठलीही चूक होणार नाही याची काळजी घेऊन काम करणं ही प्रयत्नपूर्वक साधण्याचीच बाब आहे. आपल्या कामात व्यवस्थितपणाचं सातत्य राखणाऱ्या जबाबदार आणि प्रामाणिक स्वभावाच्या माणसांविषयी... शशांक शहा शाळेचा आदर्श विद्यार्थी म्हणून स्नेहसंमेलनात गौरविला गेला तेव्हा त्याच्या पालकांप्रमाणेच सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान दिसत होता. शशांकचा अभ्यास,...
  July 31, 06:00 AM
 • लग्नाला काही कालावधी लोटल्यानंतरही गुड न्यूज आली नाही की मंडळी अस्वस्थ होतात. मूल होणे ही खूपच गुंतागुंतीची प्रक्रिया. दिवस राहण्यात स्त्रीपुरुषांचा समान वाटा आहे. त्यामुळे बिघाडातही जवळपास समसमान वाटा आहे. मात्र यामागचं विज्ञान माहिती नसल्यामुळं दोष एकट्या बाईच्याच माथी मारला जातो. या विषयावर मोकळेपणाने बोलायला हवं सर्वांनीच. मू ल राहत नाही म्हटले की दवाखान्यात तपासायला जाणे होते. मूल होणार असते दोघांना, हवे असते दोघांना. काउंटरवरची सिस्टर विचारते, पेशंटचे नाव? मग पत्नीचे नाव...
  July 31, 05:55 AM
 • प्रत्येकाकडे सांगण्यासारखी एक कहाणी असते. अगदी सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या माणसांच्या आयुष्यातही काहीतरी भन्नाट होतंच. हे झालं एका माणसाचं. अशी दोन माणसं एकत्र एक आयुष्य सुरू करतात तेव्हा हा भन्नाटपणा द्विगुणित होणं साहजिकच आहे. समीर आणि सिद्धी ही अशी दोन माणसं एकत्र आली. स्वातंत्र्य दोघांनाही प्रिय होतं, पण स्वातंत्र्याचा अर्थ त्यांच्यासाठी वेगळा होता. हे स्वातंत्र्य जपण्यासाठीच त्यांनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला. ते तिथपर्यंत कसे पोचले? स मीर आणि सिद्धी एका बँकेत पण वेगळ्या...
  July 31, 05:46 AM
 • पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधली एक खास बात होती महिला मतदारांची मोठी संख्या! जरी निवडणूक आयोगाने टाकलेली एक अट याला कारणीभूत होती, तरी हे महत्त्वाचंच आहे. एखाद्या उमेदवाराला मिळालेल्या एकूण मतांच्या किमान १० टक्के मतं महिलांची नसतील तर त्याचा विजय रद्द करण्यात येईल, असं आयोगाने निवडणुकांच्या आधीच स्पष्टपणे जाहीर केलेलं होतं. एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के महिला असल्या तरी आयोगाने १० टक्केच म्हटलं होतं, याचं कारण पाकिस्तानातल्या सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीत दिसतं....
  July 31, 05:39 AM
 • भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख. आ दर्श स्त्रीविषयीच्या कवींच्या जुन्या कल्पना पाहता स्त्रियांचं शिक्षण ही किती दुष्कर गोष्ट होती, हे ध्यानात येतं. होनाजी बाळा यांना कोणती स्त्री चांगली वाटते हे पाहू. दास्य सासु सासऱ्यांचें मग पतिसेवा त्यावरी। मर्जी माफक विनोद, एकांतीं...
  July 31, 05:34 AM
 • वातानुकूलित शोरूममध्ये काम म्हणजे किती सुखाचं असं वाटत असतं अनेकांना. पण तिथल्या विक्रेत्यांना दिवसभरात पाच मिनिटं खाली बसण्याचीही मुभा नसते, मूलभूत सोयीसुविधांचाही अभाव असताे, हे ठाऊक नसतं. केरळ विधानसभेने नुकतीच अशी सुविधा देण्याविषयीची सुधारणा कायद्यात केली आहे, त्या निमित्ताने... गिन्यांच्या वा तयार कपड्यांच्या दुकानात काउंटरच्या मागे उभे असलेले विक्रेते/विक्रेत्या हे दृश्य आपल्या सर्वांच्या अगदी परिचयाचे. माॅलमध्ये हे विक्रेते/विक्रेत्या उभे तरी किंवा सामानाची व्यवस्था...
  July 31, 05:30 AM
 • मधुरिमाच्या वर्धापन दिन विशेषांकात बदलत्या विवाह व कुटुंब संस्थेचा आढावा घेणारे लेख प्रसिद्ध झाल्यानंतर एका वाचक मैत्रिणीने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर पाठवलेला हा अनुभव. मी एका सुसंस्कृत, सुखवस्तू घरातली मुलगी. एमएस्सीपर्यंत शिक्षण झालेलं. उपवर असल्यामुळे वरसंशोधन सुरू झालं. अपेक्षा माफकच, पण मुलगा निर्व्यसनी असावा असा कटाक्ष. कित्येक वरपरीक्षा झाल्यानंतर अखेर मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील छोट्याशा गावातला, पण कुटुंब मुंबईत स्थिरस्थावर झाल्यामुळे मुंबईत लहानाचा मोठा झालेला...
  July 24, 07:20 AM
 
जाहिरात

RECOMMENDED