Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • तुम्ही शेती करत असाल तर नक्कीच, पण शेतकरी नसाल तरीही, ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असता तो आलाय. या पावसाला आता आपण सर्रास मान्सून या नावाने ओळखतो. त्या मान्सूनचं स्वागत करणारी ही कव्हर स्टोरी. मान्सून केरळात दाखल, लवकरच महाराष्ट्रात. वर्तमानपत्र उघडल्यावर सकाळीच ही बातमी वाचली, वाचूनच मनावर जलधारेचा शिडकाव झाला. चैत्र पालवीला वैशाख वणव्यानं चांगलंच भाजून काढलेलं, सूर्याच्या प्रखरतेनं पोळून निघालेल्या सृष्टीच्या चराचराला मृग नक्षत्राचे वेध लागलेले... रापलेली जमीन असो की...
  June 12, 01:00 AM
 • कुलपाची किल्ली ही म्हटलं तर क्षुल्लक वस्तू. पण रस्त्यात सापडलेल्या किल्लीमुळे नायकाचं विचारचक्र कसं सुरू होतं आणि वळणावळणानं ते कुठं येऊन थांबतं याचं वर्णन करणाऱ्या मूळ कन्नड लेखक के गणेश कोडुरू यांच्या कथेचा हा अनुवाद... ऑफिसातून निघालेला अनंता घराजवळच्या बस स्टॉपवर उतरून नेहमीप्रमाणे चालत चालत घरी निघाला. तंद्रीत चालत असताना अचानक त्याला रस्त्यात धुळीत पडलेली एक किल्ली दिसली. ही किल्ली कोणाची असावी? ती अशी कशी पडली असेल? तो विचार करू लागला. पण या किल्लीची काय कथा? या शहरातल्या...
  June 12, 01:00 AM
 • अगदी दहापंधरा वर्षांपूर्वीपर्यंत, वार्षिक परीक्षा संपण्याची तारीख होती १३ एप्रिल आणि नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची तारीख होती १३ जून. विदर्भात उन्हाळ्यामुळे ही तारीख थोडी पुढची असते. तो काळ होता राज्यभर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा असण्याचा, म्हणजे एसएससी बोर्डाचा. गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या परीक्षा मंडळांना शाळा संलग्न होऊ लागल्या आणि शाळांचं वार्षिक सत्र सुरू होण्याच्या व संपण्याच्या तारखा वेगवेगळ्या झाल्या. एसएससीच्या शाळा अजूनही हेच वेळापत्रक पाळतात. बाकी कोणाला...
  June 12, 01:00 AM
 • त्रिकोणमितीचे नियम विद्यार्थ्यांना खूप नंतर शिकवले जातात. जेव्हा ते नियम शिकवले जातात, तेव्हा ती कोरडी, निरर्थक सूत्रं म्हणून येतात. पण जर त्या सूत्रांचा उपयोग काय याचा पाया तुम्ही आधीच घालून ठेवला असेल तर तेव्हा त्यांना ती शिकताना कंटाळा वाटण्याऐवजी ते का शिकतो आहोत हे समजेल. आणि जेव्हा मुलांना ज्ञान का मिळतं आणि त्याचा उपयोग कसा करावा हे कळतं, तेव्हा शिकण्यातून आनंद मिळतो. एव्हरेस्ट हे जगातलं सर्वात उंच शिखर. या शिखराची उंची २९०२९ फूट किंवा ८८४८ मीटर आहे. आपल्याला ही माहिती शोधून...
  June 12, 01:00 AM
 • बरणीवर सावली पडली आणि आमसुला टरकली. आता कोणीतरी येणार, आपल्याला नेणार आणि आमटी नाहीतर कुळथाच्या पिठल्यात आपला भविष्यकाळ ठरलेला. रातांब्याच्या बनातले बालपण, मोहक फिक्कट पांढऱ्या-गुलाबीसर गराला कवटाळून काढलेले दिवस, आणि मग एके दिवशी इतर रातांब्यांच्या सालांबरोबर उन्हात घर. पण या वेळी वेगळेच घडले. थंड पाण्यात थोड्या वेळ डुंबणे, कोणाच्या तरी हाती लागून चुरले जाणे, आणि मग ते सर्व पाणी गाळून, जणू सोमरस असल्यासारखे पातेल्यात. थोडे पाणी घालून उकळणे, आणि मग एक सुंदर तूप जिऱ्याची मीठ मिरची...
  June 12, 01:00 AM
 • डॉक्टर फक्त शरीरावरच उपचार करतात असं नाही. मनाच्या दुखण्यावरही डॉक्टरांची मात्रा लागू पडते. पण जेव्हा रुग्णाच्या मनावर उपचार करता करता डॉक्टरच बुचकळ्यात पडतात तेव्हा? हल्लीच्या संवेदनाहीन समाजात डॉक्टर म्हणून संवेदनशील असणं त्रासदायक ठरतं. कारण डॉक्टर म्हणजे फक्त शरीराच्या तक्रारींसाठी असतो असं नाही. ग्रामीण भागात काम करताना अगदी नवराबायकोची भांडणं सोडवण्यापासून सासूसुनेची दिलजमाई करेपर्यंत सगळ्या गोष्टी घरचा सदस्य असल्याप्रमाणे पार पाडाव्या लागतात. पण जेव्हा खरोखर काही...
  June 12, 01:00 AM
 • रोमँटिक गाण्याच्या चित्रीकरणात पावसाचा हातभार लागतोच पण रोमान्स काही प्रेक्षणीय नसतो. तो अनुभवायचा असतो. ओल्या शरीराला चिकटलेल्या नजरा म्हणजे थोडाच रोमान्स असतो? पाऊस अंगावर कोसळला नाही तरी चालेल पण मनात झिरपावा लागतो. सिनेमातील गाण्याच्या चित्रीकरणातील पाऊस नाठाळ असतो, खोडकर असतो, व्रात्य असतो, एखादी फटाकडी मिळाली तर चावटही होतो, अंगाला झोंबतो, कधी नजरेच्या मर्यादाही ओलांडतो. रोमँटिक गाण्याच्या चित्रीकरणात पावसाचा हातभार लागतोच पण रोमान्स काही प्रेक्षणीय नसतो. तो अनुभवायचा...
  June 12, 01:00 AM
 • भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख. स्मृतिकाळापासून स्त्रियांना शूद्र लेखले जाऊ लागले. परकीय आक्रमणांमुळे स्त्रियांबाबतचा अनुदार दृष्टिकोन वाढत गेला. यादवकाळापर्यंत स्त्री जीवन पूर्णतः परावलंबी बनले. लीळाचरित्रामध्ये तत्कालीन स्त्रीजीवनाचे जे चित्र तुकड्यातुकड्याने...
  June 5, 07:39 AM
 • माझी शिक्षण परिक्रमा (राजहंस प्रकाशन) आणि शिक्षकांसाठी साने गुरुजी (मनोविकास प्रकाशन) ही दोन्ही पुस्तके नुकतीच प्रसिद्ध झाली. यात लेखकाने शिक्षणक्षेत्रात १२ वर्षे घेतलेले विविध अनुभव ललित शैलीत मांडले आहेत. ते मांडताना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, सोबत त्या प्रश्नांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्नही केला आहे. या दोन्ही पुस्तकांमागील भूमिका स्पष्ट करणारा हा लेख... शिक्षणातील विविधरंगी अनुभवांना आणि ते घेण्यासाठी केलेल्या भटकंतीला मी परिक्रमा म्हटले आहे. मला ही भटकंती नर्मदा...
  June 5, 01:45 AM
 • जेंडर गॅप या काहीशा क्लिष्ट विषयाचा दैनंदिन घटनांच्या आधारे आढावा घेणाऱ्या, या विषयाचे वेगवेगळे पैलू वाचकांसमोर आणणाऱ्या लेखांच्या या सदराचा आजचा समारोपाचा लेख. काल-परवाच बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आणि पुन्हा एकदा यंदाही मुलींनीच बाजी मारली अशा हेडलाइन्स झळकताना दिसायला लागल्या, तेव्हा आठवण झाली की, मागच्या वर्षी मी अशाच बातम्यांच्या निमित्ताने माझ्या या सदरातला एक लेख लिहिला होता. आता पुन्हा त्याच अर्थाच्या बातम्या दिसू लागल्या म्हणजे भेदाभेद अमंगळ हे सदर लिहायला...
  June 5, 01:26 AM
 • एखाद्या व्यक्तीला जोडून घेताना त्या व्यक्तीला भेटले असलात तर उत्तमच, अन्यथा ही जोडणी काळजीपूर्वक करावी. तुमच्या नवनवीन कौशल्यांविषयी इथे लेखन करणे फायद्याचे आहे. निवडक आणि नेमक्या व्यक्तींच्या संपर्काने LinkedIn चा फायदा जास्त मिळतो. तुम्हाला नोकरी हवीय, किंवा एखाद्या कंपनीला प्रकल्पासाठी योग्य व्यवस्थापक शोधायचा आहे, अशा वेळी नोकरी शोधणाऱ्या साइटवर आपले नाव नोंदवतात तशाच पद्धतीने LinkedIn वर नाव नोंदवायचे आहे. म्हणजे इथे प्रोफाइल तयार करायचे. जगभरातील व्यवसाय आणि व्यावसायिकांनी...
  June 5, 01:21 AM
 • किशोरवयीन मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या, त्यांना पूरक ठरणाऱ्या जीवनकौशल्यांची माहिती लेखिकेनं या आधीच्या सदरातून आपल्याला दिली. मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचा आढावा घेणारं त्याच लेखिकेचं हे नवं सदर या अंकापासून... माणसाचे आयुष्य खरेच मजेदार आहे. घरात, समारंभात, ऑफिसमध्ये समाजिक जागी आपला सतत विविध प्रकारच्या माणसांशी संबंध येत असतो. कधीकधी असे काही विचित्र प्रसंग घडतात की अगदी नकळत आपल्या तोंडून शब्द निघून जातात की, काय नमुना भेटला आज मला. एक माणूस दुसऱ्या माणसासारखा थोडीच असतो?...
  June 5, 01:19 AM
 • एखादा मनुष्य किती विषयांवर प्रभुत्व मिळवू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. विद्याधर ओक. कलाक्षेत्राला ते ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि २२ श्रुतींचं अस्तित्व दाखवणारे संशोधक म्हणून परिचित आहेत. वैद्यकीय क्षेत्राला ते उत्तम फार्माकाॅलॉजिस्ट म्हणून माहीत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. तर भारतीय, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य ज्योतिषतज्ज्ञ म्हणून चाळीसहून अधिक वर्षांचा त्यांचा व्यासंग आहे. याशिवाय विविध...
  June 5, 01:16 AM
 • ग्रामीण आरोग्य सुधारण्यात मोलाचा वाटा असतो तो आशा स्वयंसेविकांचा. खासकरून महिला व लहान मुलींच्या आरोग्याची प्रत या आशा सेविकांमुळे नक्कीच सुधारते आहे. यवतमाळ जिल्ह्यात असणाऱ्या झरीजामणी तालुक्यातील आदिवासी पाड्यावरती राहणारी सुनीता (नाव बदलेले आहे) सांगते, गर्भवती राहिल्यानंतर आधी कोणत्याही प्रकारची तपासणी केली जायची नाय. बाळंतपणही घरीच केले जायचे. त्यात गावातल्या एक-दोन बायका दगावल्या. पण करणार काय, आमच्या पाड्यावरून सरकारी दवाखाना लय लांब हाय. डॉक्टरकडे गेलं तरी त्यांची भाषा...
  June 5, 12:59 AM
 • पाऊस कधी एकदा येतोय असं झालंय सध्या सगळीकडेच. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा वणवा तर मुंबई आणि कोकणात घामाच्या धारा. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पावसाचे वेध लागले आहेत, त्यात हवामान खात्याने पावसाच्या आगमनाच्या तारखा जाहीर करून पाऊस वेळेवर महाराष्ट्रात पोचणार असं सांगितल्याने जरा दिलासा मिळालाय. गेल्या काही वर्षांपासून ऋतूंमधले बदल आपण सगळेच अनुभवतोय. उन्हाळा अधिक तीव्र झालाय, थंडी कमी झालीय, पावसाचं प्रमाण कमीजास्त झालंय इतकंच नव्हे तर तो कधीही...
  June 5, 12:53 AM
 • मेळघाटातल्या लवादा येथे १९९६मध्ये पहिलं बांबूचं घर सुनील आणि निरुपमा देशपांडे यांनी बांधलं. गेल्या २२ वर्षांत देशभरात बांबूची पर्यावरणपूरक १७०० घरं उभी करणाऱ्या या दांपत्याच्या कार्याची ओळख आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं. छोटंसं टुमदार कौलारू घर हे जणू परीकथेसारखं वाटू लागलं आहे. शहरात तर सोडाच, पण गावातदेखील जिकडेतिकडे सिमेंटची घरं बांधली गेली. दगड, मातीची घरं आता बांधणं शक्य तरी आहे का, त्यापेक्षा सिमेंटची घर आम्हाला सुटसुटीत, सोयीस्कर वाटू लागली. पण या सिमेंटच्या जंगलातून...
  June 5, 12:45 AM
 • आजच्या अनेक टीनेजर मुली बॉयफ्रेंडची गरजच नाही असं म्हणतात, म्हणजे त्यांचा भ्रमनिरास होतो आहे का? याच मुली पुढे लग्नाचीही गरज नाही असं म्हणतील. किंवा जरी पडल्याच लग्नात तर ते मोडतानाही फार विचार करणार नाहीत. ओघाने याचा कुटुंबसंस्थेवर परिणाम होणारच. कारण लग्नंच झाली नाहीत तर कुटुंबं कशी तयार होणार? कुटुंबसंस्था नष्ट होईल म्हणून माणसं एवढी का घाबरतात? ती तर सुरुवातीपासूनच पुरुष सत्तेच्या बळावरच उभी आहे. माझ्या वयाच्या मुलींना लग्न करायचा सतत आग्रह होत असतो. पण लग्न सोडाच, तरुण मुलींना...
  May 29, 12:48 AM
 • नवीन पिढीत लग्न उशिरा होणार,भीडभाड न बाळगता लग्नं मोडली जाणार, परत लग्नं केली जाणार. लग्न नाकारून जगणारे बरेच असणार. लग्न करून निवडीने अपत्य नाकारणारी जोडपी अधिक दिसणार. मित्रमंडळी कुटुंबाचा भाग अधिक होणार. नुकतीच जवळच्या नात्यात लागोपाठ तीन लग्नं झाली. नुकताच जवळच्या नात्यात एका मुलाचा डिव्होर्सही झाला आणि नुकतंचमुलीला लग्नापेक्षा खरेदीत रस आहे, असं म्हणूनलग्नाच्या दहा दिवस आधीचमोडलेलं एकलग्नही पाहिलं. पूर्वीच्या काळी वरपक्षाकडून पसंत आहे मुलगी असा निरोप आला की वधुपिता खुशालून...
  May 29, 12:41 AM
 • येत्या काळात संसार हा एखाद्या भागीदारी संस्थेप्रमाणे समजला जावा. आणि तो भले खंडित करायची वेळ आली तर त्यावेळी आर्थिक विभागणी कशी करावी हेदेखील रीतसर ठरायला हवे. जी प्रथा आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या देशांमध्ये सुरू झाली असून नजीकच्या भविष्यात ती आपल्या देशातही रुळण्याला पर्याय नाही. विवाहसंस्था कालबाह्य होत चालली आहे आणि शेवटचे आचके देते आहे, अशी एक गंभीर स्वरूपाची काळजी अधनंमधनं कानावर येत असते. विवाहसंस्था ही काही कालची पोर नव्हे, तसं पाहिलं तर ती एक जख्ख म्हातारी असायला हवी...
  May 29, 12:40 AM
 • जे प्रश्न पंधरावीस वर्षांपूर्वी मला छळत होते, तेच आज नव्याने लग्न झालेल्या मुलींना विचारले जातात. मुलींचं घराबाहेर पडणं, स्वतंत्र्य असणं, स्वत:च्या जगण्याचे निर्णय लग्नाआधी आणि नंतरही स्वतः घेणं या गोष्टी आजही समाजाला तितक्याच खटकतात जितक्या तेव्हा वर्षांपूर्वी खटकत होत्या. मग आपण प्रगती केली असं म्हणणार तरी कसं? पालकांच्या दृष्टीने मी लग्नाच्या वयाची जेव्हा झाले तेव्हा डोक्यात एकच मुद्दा होता, कुठल्याही परिस्थितीत कांदापोह्याचे कार्यक्रम करून लग्न करायचं नाही. अरेंज्ड मॅरेज हा...
  May 29, 12:28 AM
 
जाहिरात

RECOMMENDED