Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख. विधवा स्त्रीच्या पुनर्विवाहास मान्यता नसणे ही अनेक जातींमधली सामाईक बाब होती. पूर्वी पुनर्भू ही संज्ञा त्यासाठी वापरली जात असे. प्रामुख्याने पुनर्विवाह करणाऱ्या विधवांना पुनर्भू म्हटले जाई. अशा स्त्रियांचे तीन प्रकार नारदाने सांगितले...
  May 22, 01:00 AM
 • हे लिहिताना ब्रिटनच्या राजघराण्यातली राजपुत्र हॅरी आणि अमेरिकी अभिनेत्री मेघन यांचा विवाहसोहळा सुरू आहे. ब्रिटिश वृत्तपत्रं अाणि प्रसिद्धीमाध्यमांमध्ये या विवाहसोहळ्याच्या क्षणाक्षणाचं वार्तांकन सुरू आहे. यात एक मुद्दा विशेष वाटला. मेघनचे वडील आजारी असल्याने ते उपस्थित राहून तिला विवाहवेदीपर्यंत नेऊ शकणार नसल्याने हॅरीचे वडील, राजपुत्र चार्ल्स ही जबाबदारी घेणार आहेत.मेघनची आई सोहळ्याला उपस्थित होती. ख्रिस्ती विवाहविधींनुसार वधूला तिचे वडील चर्चमध्ये धर्मगुरूंपर्यंत घेऊन...
  May 22, 01:00 AM
 • मूल कसं वाढवायचं, ते वाढवताना आपण कसं आणि काय शिकत जायचं, कोणत्या गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करायचा, कोणत्या मुद्दाम टाळायच्या, या व अशा मुद्द्यांना स्पर्श करणाऱ्या या सदराचा आजचा हा समारोपाचा लेख. आ जचा आपला शेवटचा दिवस, पालकत्वावर बोलायचा! माझं बोलणं संपलं तरी माझं आणि तुमचंही पालकत्व चालू राहणार, ते चालू राहायलाच लागणार, मुलं कमीत कमी अठरा वर्षांची होईपर्यंत तरी! भारतात तर ते फारच काळ सुरू राहतं. माणसाच्या सामाजिक उत्क्रांतीमध्ये आजही पालकत्वाला खूप महत्त्व आहेच. माणसाचं मूल...
  May 22, 01:00 AM
 • माताबालमृत्यूच्या बातम्या राेजच्या रोज कानावर येतात, वाचायला मिळतात. यावर कागदोपत्री उपाययोजनाही केली जाते. परंतु, प्रत्यक्षातलं चित्र वेगळं नि विदारक आहे... सकाळी सकाळी माताबालमृत्यूच्या बातम्या वाचनात आल्या. भारतातल्या लोकांना कधी अक्कल येणार हे पांढरपेशे उद्गार मी काढले आणि नेहमीप्रमाणे लेकाचा नाष्टा, डबा, शाळेची तयारी यात गुंतले. शाळेत जाण्यापूर्वी लेकाला सुकामेवा भरवायचा राहिला, हे क्लिनिकला आल्यावर लक्षात आलं. अरे संसार संसार... चालायचंच. क्लिनिकला आले. त्या बातमीचा विचार...
  May 22, 01:00 AM
 • मोमेंट अाॅफ इनर्शिया हे भौतिकशास्त्रातलं तत्त्व शिकवताना झोपाळ्याचा छान उपयोग करून घेता येतो, जेणेकरून विषय समजायला सोपा होतो. आ ज बिलकुल प्रॅक्टिकल करायचं नाहिये. मॅडम, सुट्टी? सुट्टी नाही पण लॅबमध्येच पीटीचा तास आहे असं समजा. म्हणजे? आज खेळायचंय... लॅबमध्ये काय खेळणार? झोका... ऐकलं की, सगळ्या जणी हसायला लागतात. मॅडम जोक करतायत म्हणून. पण जेव्हा मी दोन दोऱ्यांच्या मदतीने बांधलेला रॉड दाखवते, खुश होतात. हो, पण तिथं जायच्या आधी काही प्रश्न. मग उत्तरं आणि मग खेळ. चालेल ना? हो. तर मग मला...
  May 22, 01:00 AM
 • शाळेतलं शिक्षण विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी सुकर व्हावं म्हणून अनेक अॅप्स मोबाइलवर उपलब्ध आहेत. यातल्या काही अॅप्सची ओळख करून घेऊ. क्विवर अॅप प्लेस्टोअरवरून सदर शैक्षणिक अॅप डाउनलोड करता येते. या अॅपमध्ये आपणांस प्राणी पेशी [animal cell], वनस्पती पेशी [plant cell], ज्वालामुखी, जगाचा नकाशा असे वेबवरून प्रिंट काढून घेता येते. या प्रिंटवर खालच्या बाजूला फुलपाखरावर क्लिक केल्यास कॅमेरा उघडतो. मग निळा रंग येईपर्यंत मोबाइल प्रिंट वरखाली करावी लागते. काही क्षणात निळा रंग येतो, तेव्हा मोबाइल...
  May 22, 01:00 AM
 • व्यक्तिमत्त्व विकासासाठीची पुस्तकं हल्ली गल्लोगल्ली मिळतात. मात्र, यातली बहुतांश पुस्तकं तांत्रिक, बोजड आणि उपदेशात्मक भाषेतल्या तत्त्वज्ञानानं भरलेली असतात. डॉ. जयश्री गोडसे अनुवादित साधने हे पुस्तक मात्र याला अपवाद आहे. रुग्णाची मन:शक्ती वाढवण्यावर भर देणाऱ्या या पुस्तकाचा अनुवाद अनुवादिकेनं तितक्याच सहज, सोप्या भाषेत केला आहे. वै यक्तिक विकासाबाबत बाजारात इंग्रजी भाषेतली भरपूर पुस्तकं मिळतात. त्यातील लोकप्रिय पुस्तकांचे मराठीत अनुवादही बऱ्यापैकी खपतात. डॉ. जयश्री गोडसे...
  May 22, 01:00 AM
 • पायाखालची जमीन आणि डोईवरची हिरवीगार फांदी हा खरा जगण्याचा मूलभूत विषय आहे. निद्रानाशाची रोजीनिशी हा कवी महेश दत्तात्रय लोंढे यांचा नवा कोरा कवितासंग्रह. मराठी कवितेच्या दालनात या कविता पाऊल टाकत असताना त्यांचं स्वतःचं असं दमदार वजन आहे हे या कविता वाचताच लक्षात येतं. पुस्तकाची बांधणी, त्याची निर्मिती आणि मुखपष्ठापासून अंतरंगातील रेखाटनांपर्यंत शब्दविरहित फक्त रेषांचं ते उत्तम काव्यच कागदावर उतरवलेलं आहे.ही सर्व रेखाटने कवी महेश लोंढे यांचीच आहेत. स्वतः कवी असणं आणि चित्रकारही...
  May 22, 01:00 AM
 • वय वाढल्यावर हसलं, खोकलं की, कपड्यात थोडीशी लघवी निसटण्याचा त्रास बऱ्याच बायकांना असतो. पण सहसा याबद्दल फारशी वाच्यता कोणी करत नाही. आईला होत होतं, ताईलाही होतंय, म्हणजे हे असंच चालायचं, अशी काही तरी मनाची समजूत घातली जाते. याला म्हणतात स्ट्रेस युरिनरी इन्काँटिनन्स (SUI). शुद्ध मराठीत सांगायचे तर दाबजन्य मूत्र विसर्जन. लघवीवर नियंत्रण नसणे यात अनेक प्रकार आहेत, त्यांची प्रकारपरत्वे अनेक कारणे आहेत. आपण सध्या स्ट्रेस युरिनरी इन्काँटिनन्स (SUI) या प्रकाराबद्दलच बोलू. इथे थोडेसे हसले, खोकले,...
  May 22, 12:25 AM
 • व्हीलचेअरवर असलेली, आधुनिक पेहराव केलेली, सुंदर स्त्री किंवा देखणा पुरुष पाहून अरेरे... असं मनात येतं बहुतेकांच्या. पण असं वाटण्यानं, आणि मुख्य म्हणजे ते व्यक्त करण्यानं, आपण त्या व्यक्तींच्या सर्वसामान्य जगण्याला, मनोव्यापारांना, भावभावनांना थेट नाकारतोय, हे त्यांच्या लक्षात येतं का? व्हीलचेअरमधूनच लिहिलेली आजची ही कव्हर स्टोरी. पेल्यातली वादळं पेल्यात शमतात, अनेकदा! हेही एक असंच असं वाटू शकेल. किंवा होईलसुद्धा तसं. पण या निमित्तानं माणसं व्यक्त होताहेत ते महत्त्वाचं आहे. यातूनही...
  May 15, 01:00 AM
 • उन्हाळा टिपेला पोहोचलाय, राज्यात बहुतेक भागांत पाऱ्याने चाळिशी गाठलीय, काही ठिकाणी ओलांडलीय. या उन्हाळ्याचा एक विशेष म्हणजे रंगीबेरंगी फुलं. जो मनुष्यप्राण्याला उन्हाळा सहन करायला मदत करतो. पशुपक्ष्यांनाही उन्हाचा कडाका जाणवतोच, त्यांच्यासाठी पाणी ठेवलं शक्य होईल तसं, तर त्यांनाही तो सुसह्य होईल. सध्या उन्हाळा आपली लक्ष्मणरेषा ओलांडून बाहेर पडलाय. उग्र रूप दाखवू लागलाय. सोलापूरचा उन्हाळा म्हणजे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा असं एकसारखं चकाकणारं पिवळधम्मक झगझगीत प्रकाश देणारं...
  May 15, 01:00 AM
 • तहान तर सर्वांनाच लागते. मला, तुम्हाला आणि सर्वांनाच. पण अाणखीही कोणाला तरी तहान लागते, आणि ती म्हणजे प्राणी, पक्षी, आणि झाडं. पण आपण यांचा विचार करतच नाही. किती स्वार्थी झालोय ना आपण. विचार करा, तुम्ही जेव्हा उन्हातून येता तेव्हा पाणी द्या रे पटकन असं लगेच म्हणता, कारण ते साहजीक आहे. घशाला कोरड पडते आणि त्या क्षणी पाणी पिणे हा एकमेव उद्देश असतो आपला. आणि जर अशा अवस्थेत आपल्याला पाणी मिळालंच नाही, तर काय होईल? आपण पटकन उठून स्वतः पाणी पिऊ, घरात नसेल तर शेजारी मागू. हो की नाही? पण काही करून आपण तर पाणी...
  May 15, 01:00 AM
 • अपंग, विकलांग, दिव्यांग, स्पेशल, विशेष, मतिमंद, गतिमंद, असे अनेक शब्द आपण कोणतीही शारीरिक वा मानसिक कमतरता असलेल्या व्यक्तींना वापरतो. अशा व्यक्तींशी वागायचं कसं, बोलायचं कसं हे ना आपली शिक्षणपद्धती शिकवते ना कुटुंबीय. इतकंच काय, कसं वागू नये, हेही आपल्याला लहानपणापासून सांगितलं जात नाही. म्हणजे थेट स्पष्ट शब्दांत सांगितलं जात नाही इतकंच. आईवडील, शेजारीपाजारी, कुटुंबीय अशा व्यक्तींशी कसं वागतायत हे पाहूनच बहुतेकांचं शिक्षण होत असतं. लंगडा, आंधळी, काणा, चकणा, अशी संबोधनं, त्या...
  May 15, 01:00 AM
 • तरुण मुलं-मुली चॅटिंग, गेमिंग, सोशल नेटवर्किंग आणि पोर्न साइट्सच्या मायाजालात अडकून इंटरनेट व्यसनाधीन तर झाली नाहीत ना, याची खात्री करून घेण्यासाठी काय करता येईल, त्याची माहिती देणारा लेख. चेतन एक हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी. वसतिगृहात राहून विद्यापीठात एमसीए करणारा. चेतनचा चौथ्या सेमिस्टरचा निकाल मात्र त्याच्या पालकांसाठी अगदीच अनपेक्षित आणि धक्कादायक होता. चक्क चार विषयात तो नापास झाला होता. त्याच्या नापास होण्याचे कारण दिवस अन रात्र सोशल नेटवर्किंग, चॅटिंग आणि पोर्न साइट्स....
  May 15, 01:00 AM
 • मळलेल्या वाटेने न जाता वेगळा विचार करणं, नवीन दृष्टिकोन मिळवणं, नवा शोध लावणं, प्रश्न वेगळ्या पद्धतीने सोडवणं आणि बदल करण्यासाठी तयार होणं या सगळ्याचा नवनिर्मितीत मोठा वाटा असतो. मुलांच्या कल्पनांना, विचारांना आणि कृतीला नवं क्षितिज मिळावं असं वाटत असेल तर क्रिएटिव्ह थिंकिंग हे जीवनकौशल्य प्राप्त करण्यासाठी मदत करावी. आजोबांची सत्तरी पूर्ण झाल्याने घरगुती वाढदिवस साजरा करायचं ठरलं. सगळे नातेवाईक त्या निमित्तानं काकाजींच्या घरी आले होते. काकाजी पेशानं वकील, देशभक्ती आणि सामाजिक...
  May 15, 01:00 AM
 • उन्हाळ्याच्या सुटीत बोअर होतंय,आता मी काय करू? या मुलांच्या प्रश्नावर हमखास लागू पडेल असा उपाय आज आम्ही सांगणार आहोत. घरच्या घरी, जवळपास फुकटात सूर्यचूल कशी तयार करता येईल हे आज या लेखातून आम्ही सागंतो आहोत. जेणेकरून मुलांचा उत्साह, कुतूहल आणि जिज्ञासू वृत्ती अधिक वाढायला मदत होईल. उन्हाळ्यात बाहेर ऊन मी म्हणत असतं. त्यात मुलांना सुट्ट्याही असतात. बाहेर खेळणंही शक्य नाही इतका उष्मा होतो. घरात बसून तर कंटाळा येतो. मग त्यांना काहीतरी उद्योग द्यायचा आणि शिवाय उन्हाचा वापर करून घ्यायचा...
  May 15, 01:00 AM
 • फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅपबरोबरच जगात सर्वाधिक वापरलं जाणारं माध्यम म्हणजे यूट्यूब. लेखमालेच्या या भागात जाणून घेऊयात यूट्यूबविषयीची आणखी माहिती आणि त्याच्या वापराविषयी... अनेक सिनेमांचे ट्रेलर्स, सिनेमा वा गाणी बघण्यासाठी आपण यूट्यूबचा वापर करतो. एखादी पाककृती हवी असेल तर गुगल सर्चबरोबर यूट्यूबवरही सर्च करतो. पुस्तकाचं परीक्षण, नखांना नेलपॉलिश कसे लावायचे, एखादे गणित कसे सोडवायचे या प्रश्नांची उत्तरेसुद्धा आपल्याला यूट्यूबवर मिळतात. आपण पोस्ट केलेले व्हिडिओ शेअर करता येतात,...
  May 15, 01:00 AM
 • भाषांतर करताना मूळ कथांचा बाज नीट ठेवणे फार गरजेचे असते. दोन्ही भाषांवर सखोल पकड असेल तर हा बाज टिकवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत हे सुमती जोशी यांचा कथासंग्रह वाचल्यानंतर जाणवते. उन्मेष प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेला बंगबंध हा सुमती जोशी यांचा कथासंग्रह. आपल्या भाषेतील वाङ्मय वाचताना नेहमी इतर भाषेतल्या वाङ्मयाची ओळख व्हावी अशी इच्छा असते. दूरचित्रवाणीसारख्या माध्यमामुळे अशा कथांची ओळख होते पण मूळ बंगालीतील कथा उत्तम भाषांतरित केलेल्या वाचायला मिळणे ही एक पर्वणीच....
  May 15, 01:00 AM
 • सिनेमातल्या अनेक गाण्यांंमध्ये अभिनयाच्या माध्यमातून कथा फुलवत नेलेली दिसते. चित्रपटाला अधिक आकर्षक बनवण्यासाठी, कथेचा वेग वाढवण्यासाठी, कथा फुलवण्यासाठी अशा गाण्यांचा उपयोग केला जातो. शब्दाबरोबर सुरांचा उपयोग केला तर ही कथा लक्षात तर राहातेच पण मनाला भिडते. कथेत गाणी तर नेहमीच पेरता येतात, पण काही गाणी अशी आहेत की, ज्यात कथा पेरली आहे. अशाच काही गाण्यांविषयी... संध्याकाळी दिवेलागणी झाली की, आई देवापुढे निरांजन लावायची. तुपाच्या वातीचा गंध घरभर दरवळायचा. देवापुढे बसून परवचा आणि पाढे...
  May 15, 12:02 AM
 • कर्मवीर भाऊरावांंनी स्थापलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाकाचं काम करणाऱ्या ताराबाई मुगटराव तावरे या नव्वदीतल्या आजी अजूनही मुलांना जेवू घालतायत. गो ष्टीतल्या म्हातारीसारखे पांढरेफेक झालेले केस, आयुष्याच्या अनुभवाचे अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिल्याची जाणीव चेहऱ्यावरील सुरकुत्या करून देत होत्या. तोंडातील दातांनी आता रामराम केलेला, कष्टानं पार वाकून जाऊन पाठीत बाक निघालेला, वयोमानानुसार सुरकुतलेल्या शरीरावरील कातडं ढिलं पडलेलं जाणवत...
  May 8, 09:10 PM
 
जाहिरात

RECOMMENDED