Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • कर्तृत्ववान स्त्रियांना भेटून त्यांची माहिती मिळवणे आणि नंतर ती वाचकांना रंजक आणि मननीय वाटेल अशी मांडणे हे अवघड काम आहे. ते मूळ लेखिकेने समर्थपणे केले असून मराठी अनुवादही तितकाच उत्तम, साध्या-सोप्या, ओघवत्या मराठीत झाला आहे. अनुवाद औत्सुक्य वाढवणाऱ्या भाषेत केल्याने वाचताना कंटाळा येत नाही, उलट त्या त्या व्यक्तीच जणू डोळ्यापुढे उभ्या राहतात. एकाच वेळी अनेक प्रकारच्या भूमिका निभावणं स्त्रियांसाठी असंभव नाही; कारण त्यांच्यात हे गुण जन्मजात असतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया...
  July 17, 06:28 AM
 • स्त्रियांच्या नजरेतून शारीरिक प्रेमाच्या अनुषंगाने लिहिलेली आणि चित्रित झालेली गाणी बॉलीवूडमध्ये फार कमी आहेत. प्रियकराच्या भेटीसाठी आतुरलेल्या नायिकेवर चित्रित अशाच काही मोजक्या गाण्यांविषयी आजच्या भागात. बॉलीवूड जरी प्रेम आणि शृंगाराच्या पायावर उभे असले तरी स्त्रियांच्या नजरेतून, शारीरिक प्रेमाच्या अनुषंगाने लिहिलेली गाणी अतिशय कमी आहेत आपल्याकडे. प्रेम खट्याळ, पवित्र, निरपेक्ष सगळे काही असते, पण जेव्हा त्याची कामुक बाजू दाखवायचा प्रश्न येतो, तेव्हा सेन्सॉर बोर्ड जागा...
  July 17, 06:15 AM
 • गरज सरो वैद्य मरो, अशा स्वभावाच्या व्यक्ती या मॅनिप्युलेटिव्ह व्यक्तिमत्त्वाचा उत्तम नमुना असतात. अशा माणसांशी वागताना आपली मतं स्पष्टपणे आणि ठामपणे मांडणं, त्यांच्यात भावनिक गुंतवणूक होऊ न देणं, आपले कच्चे दुवे उघड न करणं, सावधपणे आणि हुशारीनं राहणं या तंत्रानंच वागायला हवं. हे मंत खूप प्रयत्न करूनही त्याचा फोन सुरू करू शकला नाही. सारखाच बिघडायचा. शेवटी कंटाळून त्याने नवा फोन घेतला. तो फोन त्याच्या सहकाऱ्यांना तो दाखवत होता. मात्र, सुदीप आल्याबरोबर सगळे गप्प झाले. सुदीपने तो फोन...
  July 17, 06:11 AM
 • केवळ पोस्ट टाकणं, व्हिडिओ अपलोड करणं यापुरताच सोशल मीडियाचा वापर होतो असं नाही. तर नोकरी शोधण्यासाठी, इंटर्नशिपसाठी, करिअरमध्ये बदल करतानाही सोशल मीडियाचा वापर करता येतो. यासंबंधीच्या काही टिप्स आजच्या लेखात... नोकरी शोधताना करिअर वेबसाइटबरोबर सोशल मीडियाचा वापरही गरजेचा आहे. वेगवेगळे व्यवसाय करणारे तसेच कंपन्या, जागा भरायच्या असतील तेव्हा तेव्हा सोशल मीडियाचा वापर करत असतात. रिक्रूटिंग एजन्सीज सोशल मीडियाचा वापर करतात. फ्रीलान्स काम करणारे किंवा त्यांच्याकडून काम करून घेणारे...
  July 17, 06:03 AM
 • बाळंतपणाची रजा कायद्याने लागू असली तरी ती मिळणं किती कठीण होतं, याची काही उदाहरणं. आणि कंपन्यांचे एचआर विभाग मुलाखतींची चाळणी लावतानाच महिला उमेदवारांना कसं वागवतात, याचीही. अकोल्यातील कृषी विद्यापीठात विविध विभागांमध्ये शंभरहून अधिक महिला काम करत आहेत. बाळंतपणासाठी सुटीची तरतुद असली, ती योग्य प्रकारे दिली जात असली तरी प्रत्येक महिलेला त्याचा फायदा होतोच असं नाही. विभागातील सहकाऱ्यांशी संबंध, हेवेदावे, राजकारण, पदोन्नतीच्या संधी/शक्यता अशा अनेक बाबींचा परिणाम होत असतो. काही...
  July 17, 05:54 AM
 • बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पुण्यातल्या निम्नस्तरातील वसाहतींमधून होत असलेल्या कामाविषयी, मनापासून ते काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांविषयी... अंगणवाडीमध्ये मुलं जाऊन काही तरी शिकतील, त्यांची वाढ नीट होईल, विकास होईल या दृष्टिकोनातून कोणी बघत नाही. मात्र, पुणे शहरामध्ये काही उच्चशिक्षित महिला वसाहतींमध्ये चालणाऱ्या काही अंगणवाड्यांमध्ये आगळंवेगळं काम करत आहेत. गोखलेनगरमधील दहा बाय बाराच्या घरात दोन-अडीच वर्षं वयापासून अगदी पाच वर्षांपर्यंतची मुलं हसत येत असतात. आल्यानंतर...
  July 17, 05:48 AM
 • मार्केटिंगसारखं निश्चित आर्थिक उत्पन्न देणारं क्षेत्र आणि अभिनयासारखं सतत स्वत:ला शाबित करत राहावं लागणारं अनिश्चित क्षेत्र यापैकी काय करिअरसाठी निवडायचं हे निश्चित झालेलं असतानाही शिक्षणाचं महत्त्व जाणून मार्केटिंग या क्षेत्रात एमबीए करणारा महाराष्ट्राचा लाडका अभिनेता भूषण प्रधान याच्याशी मारलेल्या गप्पा! ज्याला हजारों दिलों की धडकन, चॉकलेट बॉय, handsome hunk आणि याशिवाय इथे उल्लेख करता येणार नाहीत अशा मिनिटाला १४३ रोमँटिक कॉम्प्लिमेंट्स मिळतात, अशा मराठी अभिनेत्याने...
  July 17, 05:41 AM
 • मूल जन्माला घालणं ही बाईच्या जातीसाठी अत्यंत नैसर्गिक गोष्ट. पुरुषांमध्ये अजून तरी गर्भधारणा शक्य नाही, विज्ञानामुळे ते कदाचित भविष्यकाळात घडूही शकेल. गरोदरपणाचा नऊ महिन्यांचा काळ अनेकींसाठी आनंदाचा असतो.ज्या स्त्रियांवर गरोदरपण लादलेलं असतं, त्यांना तो नकोसा वाटतो. काहीजणींना या काळात काहीही त्रास होत नाही, त्या दैनंदिन कामकाज अगदी सहजरीत्या पार पाडू शकतात. पण काहीजणींना हे नऊ महिने किंवा त्यातले काही दिवस तरी असह्य झालेले असतात. ज्यांना घर सोडून कामावर जावं लागत नाही, त्यांना या...
  July 17, 05:40 AM
 • भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख. जु न्या ओव्यांची संकलनं वाचताना त्या-त्या काळाचा एक सामाजिक पटदेखील डोळ्यांपुढे उभा राहतो. स्त्रीशिक्षण सुरू झालं, त्या सुरुवातीच्या काळात शिकणाऱ्या मुलींना नावं ठेवली जात; त्याची झलक या ओवीतून मिळाली - साठ्यांच्या मुली तुम्ही अशा गं कशा ।...
  July 17, 05:35 AM
 • बाळंतपणाची रजा २६ आठवडे देण्यात यावी, असं विधेयक नुकतंच लोकसभेत मंजूर करण्यात आलं. वरवर महिलांसाठी उपयुक्त वाटणारं हे पाऊल प्रत्यक्षात त्यांच्या नोकरीवर गदा आणणारं ठरू शकतं, हे सूचित करणारी ही कव्हर स्टोरी. तुम्ही नवविवाहित दिसता, पण जर तुम्हाला नोकरीत रुजू व्हायचे असेल तर तुम्हाला काही वर्षे चान्स घेता येणार नाही. प्रथम या वाक्याचा अर्थ काही उमगला नाही. मग जेव्हा वरिष्ठ हसून म्हणाले, पगारी मॅटर्निटी रजेची सोय नाही हो आपल्याकडे! तेव्हा लक्षात आले की, आता आपल्या आयुष्यातले पुढचे...
  July 17, 05:29 AM
 • कधी तरी सिंहकटीवरून दुमडून दुमडून अचानक खूप फुलणारा पिवळा भोपळ्याचा गाउन, गळ्याशी दाटीदाटीने झालर करणारे ओले खोबरे, दाणे, मोहरी-जिऱ्याचे बुट्टे आणि केसात खुपसलेला कोथिंबिरीचा राजमुकुट... आणि कार्टलंड बाईंची रथातून धावणारी गोष्ट. आणि कधीतरी एखाद्या शेलाट्या भांड्यात, चापूनचोपून नेसलेली पिवळी धमक नऊवारी पैठणी, जिरे-मोहरीचे काठपदर, लावणीचे बोल थिरकताना उडलेले थोडे कुंकू, थोडी मिरची कढीपत्त्याची कलाकुसर आणि त्यावर शुभ्र खोबऱ्याचा अंगावर पेललेला रेशमी शेला आणि दहीशेठना बघताच...
  July 10, 06:50 AM
 • कुटूंबातल्या इतर सदस्यांच्या त्वचेच्या रंगाचा इतिहास काही का असेन पण गर्भवतीनं केशर खाल्लं की गोरं गुटगुटीत बाळ जन्माला येतं असा एक समज आहे. भारतीयांचा गोऱ्या रंगाकडे असणारा ओढा लक्षात घेता, याच विषयाची सांगोपांग चर्चा करणारा आजच्या सदरातला लेख. डॉक्टर, केशर किती पिऊ? जरा लाडिक प्रश्न. कशाला? माझा स्थितप्रज्ञ प्रतिप्रश्न. ....! चेहऱ्यावर माहीत असून मलाच विचारता होय? असे भाव. मी गप्प. नाही डॉक्! डॉक्? अरेच्चा, ही तर गुगल संप्रदायातील स्त्री, मी मनोमन ओळखतो. आजकाल हे डॉक्, डॉक् ऐकून ऐकून माझं...
  July 10, 06:45 AM
 • अर्चनाच्या आयुष्यातल्या पोस्टपार्टम सायकाॅसिस च्या अवघड काळात तिला व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन, परस्परांना जमेल तसा, जमेल तेवढं समजून, सावरून, सांभाळून घेत, मानसोपचाराबद्दल कुठल्याही शंकाकुशंका न घेता डोळसपणा दाखवणाऱ्या एका कुटूंबाचा प्रवास... अर्चनाची आई एका लग्नात भेटली. मी विचारलं, आता कशी आहे अर्चना? गोळ्या सुरू हायेत पन् आता तशी बरीये, त्या म्हणाल्या. अर्चनाची केस म्हणजे टिपिकल पोस्टपार्टम सायकाॅसिसची. बेबी ब्लूज आणि पोस्टपार्टम डिप्रेशन यात थोडासा फरक आहे. बेबी ब्लूज म्हणजे...
  July 10, 06:37 AM
 • बदललेल्या शिक्षण पद्धतीनुसार तू अनेक पर्याय निवडलेस, त्यात तू यशस्वी झालास, तर तू त्याला दिलेला प्रतिसाद आहे तो बरोबर आहे असे समज. तू कोठेही कमी आहोत असे समजू नकोस. प्राप्त परिस्थितीत आपण किती गोष्टीवर विचार करू शकतो त्यातून मार्ग काढू शकतोस, याची क्षमता यातून दिसते हे मी तुला सांगतो. त्यामुळे तू हुशारच आहेस व प्रॅक्टिकली विचार करणारा आहेस हे लक्षात घे. आज अमोघचा रिझल्ट होता. बारावी म्हणजे मुख्य वर्ष, महत्त्वाचे वर्ष, आयुष्याला आकार देण्याचे वर्ष. खूप अभ्यास, सगळ्यांचे सल्ले, आणि क्लास...
  July 10, 06:28 AM
 • आजकाल सगळीकडेच विजेवर चालणारी घड्याळं आलेली आहेत. पण चाळीसपन्नास वर्षांपूर्वी घरोघरी चावी द्यायची घड्याळं असत. चावीने स्प्रिंग ताणली जाई, आणि त्या स्प्रिंगमध्ये साठवलेली शक्ती हळूहळू वापरत एक लंबक हलत राही. या लंबकाच्या एका झोक्याला सेकंदाचा काटा पुढे जात असे. हा लंबक म्हणजे नक्की काय? आणि तो घड्याळांमध्ये का वापरला जाई? कुठलीही टांगलेली, झुलणारी वस्तू म्हणजे म्हणजे लंबक. आपण झोपाळ्यावर झोके घेतो, तेव्हा आपण आणि झोपाळा मिळून एक लंबकच झालेलो असतो. आदर्श लंबक हा एका दोरीचा किंवा एका...
  July 10, 06:20 AM
 • थिंक महाराष्ट्र डॉट कॉम हा प्रकल्प गावोगावच्या कर्तबगार व्यक्तींचा सातत्याने शोध घेऊन ती माणसे समाजासमोर मांडत अाहे. अाजच्या या सदरामध्ये महाराष्ट्राबाहेर जाऊन मोत्यांच्या शेतीसारख्या वेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या मयूरी खैरे-अांबटकरच्या संघर्ष अाणि जिद्दीची कहाणी. मयूरी खैरे ही बुलडाण्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली मुलगी. वय वर्षे केवळ २५! एमपीएससी देऊन सरकारी नोकरी करावी अशी इच्छा एकीकडे होतीच, पण ती अचानक शेतीकडे वळली. तीदेखील साधीसुधी नाही, मोत्यांची शेती!...
  July 10, 06:13 AM
 • लवकरच येणाऱ्या आषाढस्य प्रथम दिवसे म्हणजेच महाकवी कालिदास दिनानिमित्त त्यांच्या काव्यातील सौंदर्यस्थळे उलगडून दाखवणारा लेख. वैशाखाच्या उष्मादाहानंतर वर्षाऋतूची मोहक चाहूल लागते. आकाशामध्ये ढग दाटीवाटी करतात. कविमन उद्युक्त नाही झाले तर नवलच! पावसांच्या सरींबरोबर कविता, चारोळ्यांच्या सरी देखील बरसू लागतात. पर्वतीय प्रदेशामध्ये जलभारामुळे नभ जणू काही डोंगरावरच उतरले आहेत असा भास होतो. परंतु या नियमित घडणाऱ्या भौगोलिक घटनेकडे पाहून शंभर-सव्वाशे श्लोकांचे नितांत सुंदर...
  July 10, 06:04 AM
 • महिलांना २६ आठवडे भरपगारी बाळंतपणाची रजा देण्यात यावी, असं विधेयक गेल्याच आठवड्यात लाेकसभेत मंजूर झालं आहे. बाळाला इतके दिवस आईची, स्तनपानाची गरज असते, त्यातून त्याची सुयोग्य वाढ होते, व त्याच्या आयुष्याचा भक्कम सुरक्षित पाया या काळात उभा राहातो. वरकरणी हा अगदी साजरा करण्याजोगाच निर्णय. परंतु, त्याचे परिणाम काय होतील, याची कल्पना आपण करू शकतो. या निर्णयाचा आर्थिक भार संपूर्णपणे कंपनीवर पडणार. अगदी कोट्यवधीची उलाढाल असलेल्या कंपन्यांना हा आर्थिक बोजा झेपेलही, परंतु लहान कारखाने, उद्योग,...
  July 10, 05:56 AM
 • पोलीस कर्मचारी ललित साळवे नुकतेच लिंगबदल शस्त्रक्रिया करून नोकरीवर रुजू झाले अाहेत, त्यामुळे या विषयावर चर्चा होऊ लागली आहे. अशीच लिंगबदल शस्त्रक्रिया केलेल्या कोलकात्यातील एक शिक्षिकेचे हे अनुभव. या व्यक्तींचा प्रवास किती खडतर होतो, तोही निव्वळ समाजातील चुकीच्या मानसिकतेमुळे, हे सांगणारे. दुपारची वेळ. तिशीतील सुचित्रा प्राचार्यांच्या केबिनमध्ये गेल्या. इंग्रजी आणि भूगोल विषयात एमए, बीडएडची पदवी आणि जोडीला १० वर्षांचा शिकवण्याचा अनुभव असल्याने नोकरी आपल्यालाच मिळेल हा...
  July 10, 05:48 AM
 • समाजाच्या लेखी अस्पृश्य असलेल्या लैंगिक शिक्षणासारख्या गंभीर नि महत्त्वाच्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करून त्यावर स्वतंत्रपणे सातत्याने परखड विचार मांडण्यासाठी समाजस्वास्थ्य मासिकाला रधों यांनी सलग हत्यार बनवले. रघुनाथ धोंडो कर्वे (जन्म : १४ जानेवारी १८८२ मृत्यू : १४ ऑक्टोबर १९५३) हे मुळात गणित विषयाचे प्राध्यापक. त्यांच्या जडणघडणीवर प्रामुख्याने समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा प्रभाव होता. वडील धोंडो केशव कर्वे यांच्या प्रगल्भ सुधारणावादी विचारांची त्यांना प्रेरणा मिळाली...
  July 3, 05:56 AM
 
जाहिरात

RECOMMENDED