जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Niramay

Niramay

 • हिवताप हा आजार डासांची मादी अॅनॉफिलिस या जातीच्या चावण्याने होतो. यात थंडी वाजून ताप येणे, डोके दुखणे, मळमळ होणे, चक्कर येणे आदी लक्षणे आढळून येतात. वेळेवर उपचार न केल्यास रुग्णांचा मृत्यूदेखील ओढवतो. यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्यावी -* डास होऊ नयेत म्हणून काळजी घ्या.* घरातील कूलर, टायर, मडके आदी वस्तू स्वच्छ ठेवाव्यात. खराब असल्यास फेकून द्याव्यात.* आठवड्यातून एकदा तरी माठ, रांजण, टाक्या, हौद स्वच्छ व कोरडे करावेत.* रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.* वेगवेगळ्या कंपन्यांच्या मच्छर...
  November 7, 09:43 PM
 • हृदयविकाराचा झटका कसा ओळखावा?- धमनीच्या आत गुठळी झाल्यानंतर लगेच हृदयाच्या संगत भागाचा रक्तपुरवठा पूर्णपणे बंद होतो. रुग्णाला छातीत वेदना होऊ लागतात. धाप लागते. मोठ्या प्रमाणावर घाम येतो. येणा-या संकटाची चाहूल लागते. काही रुग्ण पाठदुखी, खांद्यातील वेदना किंवा डाव्या हातातील वेदनेची तक्रार करतात. मळमळ व उलट्या सामान्य आहेत. हृदयविकाराचे परिणाम काय असतात? - हृदयविकाराच्या झटक्याची सर्वांत उद्ध्वस्त करणारी गुंतागुंत म्हणजे रक्ताची गुठळी तयार झाल्यानंतर काही सेकंद किंवा मिनिटांमध्येच...
  November 7, 09:42 PM
 • थंडीमध्ये आढळणारा अत्यंत त्रासदायक, परंतु सोपा आजार. परवाची गोष्ट आहे. 12 वर्षांचा प्रणय त्याच्या आई-बाबांसोबत मला भेटायला आला होता. खूप आनंदाने सांगायला लागला. डॉक्टर, यावर्षी माझ्या हातापायाला भेगा नाहीत. तरीही मला अचानक दिवाळीनंतर प्रणयची आठवण झाली. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून सातत्याने प्रत्येक थंडीत हातापायाला भेगा पडल्याने अतिशय वैतागलेला तो लहान मुलगा होता. त्याचे आई-बाबा चिंतेत पडले होते. कोणी सोरायसिस, कोणी एक्झिमा, कोणी व्हिटॅमिनची कमी तर कोणी प्रोटिनची अशा वेगवेगळ्या...
  November 7, 09:40 PM
 • जापनीज एनकॅफलायटिस या आजारात काळजीचे कारण म्हणजे लहान मुलांमध्ये मृत्युदर खूप जास्त आहे. शिवाय या आजारावर नेमके असे औषध उपलब्ध नाही. ब-या झालेल्या 50 ते 60 टक्के रु ग्णांना कायमचे अधूपण येऊ शकते. जापनीज एनकॅफलायटिस हा मुख्यत: मेंदूचा जंतूसंसर्ग असल्यामुळे सुरुवातीची लक्षणे ताप, डोकेदुखी, उलट्या, जुलाब, असली तरी नंतर झटके, बेशुद्ध पडणे असे गंभीर स्वरूप दिसून येते. मेंदूज्वराप्रमाणेच बहुतांश लक्षणे असतात. आजार सहसा दोन ते तीन आठवडे चालतो. मग हळूहळू बरा होऊ लागतो. जापनीज एनकॅफलायटिस मुख्यत:...
  November 7, 09:38 PM
 • विविध आजारांवर उपचार करण्यासाठी लेसर किरणांचा उपयोग केला जातो. ही एक नवीन संकल्पना आहे. शल्यचिकित्सक, नेत्रशल्यचिकित्सक आणि वेदनाभीषक (पेन फिजिशियन) यांच्या हातातील लेसर हे एक शस्त्र आहे. शल्यचिकित्सक आणि नेत्रशल्यचिकित्सक हे तीव्र स्वरूपाच्या लेसर किरणांचा वापर करतात, तर वेदनाभीषक (पेन फि जिशियन) मृदू लेसर किरणांचा वापर करतात. या किरणांची वेव्हलेंथ 600-1000 नॅनो मीटर एवढी असते. आपण मृदू लेसर उपचार यासंबंधी माहिती करून घेणार आहोत. याचा मुख्यत्वे खालील गोष्टीकरिता उपयोग होतो. 1) पेशी व...
  November 7, 09:37 PM
 • पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये सोमॅटायझेशन डिसऑर्डर हा रोग जास्त प्रमाणात आढळतो. हा विकार तारूण्यात सुरू होतो. वर्षानुवष्रे पिच्छा पुरवतो. रुग्ण कधी पोटाची तक्रार घेऊन येतो, तर कधी पाठीची. कधी डोक्यात आग होते असे सांगतो, तर छातीत जळजळ, उलटी आल्यासारखे वाटणे अशा अनेक तक्रारी असतात. जुलाब, चक्कर येणे, झटक्यासारखी लक्षणे, घशात टोचल्यासारखे वाटणे, अशा तक्रारी असतात. अशा रुग्णांचे आयुष्य दवाखान्यातच जाते. मानसिक रुग्णांमध्ये सोमॅटायझेशनचे प्रमाण 2 टक्के तर सर्वसाधारण बाह्यरुग्ण विभागात 5...
  November 5, 01:31 PM
 • 1) काही जिवाणू व विषाणू यांचा दाह होणे. 2) जठरातील पित्ताचे प्रमाण वाढल्यास करण्यात येणार्या उपचारात रॅनिटीडीन व ओमेप्रोझोलच्या वापरामुळे जुलाब होतात. 3) शिळे अन्न किंवा बुरशीयुक्त अन्नाच्या सेवनाने जुलाब होतात. 4) आतड्यामध्ये जियार्डियानिक किंवा ट्रायकोमोनीस जंतूंमुळे संसर्ग झाल्यास मोठय़ा प्रमाणावर मल बाहेर पडतो. यामध्ये काही वेळेस पोट दुखते. अमेबिक डिसेन्ट्रीचा त्रास होतो. मोठय़ा आतड्याचा कर्करोग किंवा अनेक जिवाणूंमुळे होणारे दाह, जंतू गव्हात असणार्या ग्लुटेन नावाच्या प्रथिनाचे...
  November 5, 01:22 PM
 • दिवसेंदिवस स्पर्धेच्या बनत चाललेल्या जीवनशैलीमुळे विविध समस्या उद्भवत आहेत. यातील काही समस्या मुलांच्या वर्तणुकीशी निगडित असतात. मुलांवर कळत-नकळत पडणार्या ताणतणावांमुळे या समस्या निर्माण होतात. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्हीही घटकांवर ताणतणावाच्या स्थितीमुळे परिणाम होतो. मुलांच्या या समस्येकडे वेळीच लक्ष द्यायला हवे. शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांवर स्पर्धात्मक वातावरणामुळे पालकांचा-शिक्षकांचा दबाव वाढतो. यामुळे तणाव निर्माण होऊन शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांचा मेळ घालणे...
  November 5, 01:18 PM
 • निमीसुलाइड हे औषध लहान मुलांसाठी जितके घातक आहे तितकेच प्रौढांसाठीही आहे. मात्र, अजून तरी या औषधावर पूर्णपणे बंदी आलेली नाही. वर्षानुवष्रे तापासाठी पॅरासिटामॉल या औषधाचा वापर होत आला आहे. पॅरासिटामॉलचा प्रभाव 4 ते 6 तास राहतो; पण निमीसुलाइड हे औषध 10 ते 12 तास तापाला रोखून धरते. त्यामुळे ताप गेल्याची खोटी सुरक्षितता निर्माण होते. पण रुग्णाला बरे वाटण्याची ताप गेला एवढी मानसिक तयारी असल्याने दशकभरापूर्वी बाजारपेठेत दाखल झालेले निमीसुलाइड औषध डॉक्टर व रुग्णांच्या गळ्यातले ताईत बनले....
  November 5, 01:12 PM
 • नायलॉन आणि लायक्रापासून तयार करण्यात आलेले टी-शर्ट दंड आणि पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी घटवण्याचे काम करतील. अतिरिक्त चरबी कमी करणा-या निकर्सनंतर आता दंडाची चरबी कमी करण्यासाठी खास टी-शर्ट सादर करण्यात आले आहेत. या टी-शर्टला थिनगो असे नाव देण्यात आले आहे. हे टी-शर्ट दंडाच्या वरच्या भागाला टोन करून चरबी हटवण्यास मदत करतील. कसा आहे टी-शर्ट ? टी-शर्ट तयार करण्यासाठी प्लास्टिकचे गुण असणाया नायलॉन आणि लायक्रा यांचा वापर करण्यात आलेला आहे. हे मटेरियल दंडावरील चरबी कमी करील. आकुंचनामुळे उष्णता...
  November 5, 11:14 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात