जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Niramay

Niramay

 • अंगावरीलखुणेने व्यक्तीला ओळखतो. (तीळ, लहापणीचा मार) आंतरिक, अतिसूक्ष्म पातळीवर व्यक्ती ओळखीसाठी डीएनए फ्रिंगर प्रिंटींगचा उपयोग होतो. ही चाचणी संपूर्ण जगात सगळ्यात जास्त वापरली जाणारी आणि सर्वाधिक विश्वास पात्र अशी चाचणी आहे. याची सत्यता ही ९९.९९ टक्के असते. डीएनए फ्रिंगर प्रिंटींग ही सगळ्यात जास्त उपयोगी पद्धत आहे. डीएनए finger printing १. रक्त २. केसांची मुळे ३. लाळ, थंुकी ४. semen शुक्र ५.vaginal fluid इत्यादी. डीएनए : डिआॅक्सिरायबो न्यूक्लिक अॅसिड डीएनएहा एखाद्या जीवाचा अतिसूक्ष्म असा रासायनिक...
  July 14, 04:59 AM
 • दीर्घकाळासाठी वजन पाठीवर घेणे पाठीसाठी घातक दप्तर पाठीवर घेतले की हात मोकळे राहतात; मग सायकल चालवायला, मित्र-मैत्रिणींशी गप्पा-खेळताना त्याची अडचण होत नाही. म्हणूनच शक्य तेवढी मुलं दप्तराचे ओझे पाठीवरच घ्यायला बघतात. सोय होते; परंतु त्यामुळे निर्माण होणारा पाठीवर आणि मानेवरचा ताण घातक ठरू शकतो. मणक्यांना आधार देणारे कोर स्नायू (core muscles) हे अत्यंत महत्त्वाचे आणि शरीरातले सर्वांत ताकदवान स्नायूंतील एक गट आहेत. त्यांच्यात जास्त भार पेलण्याची क्षमता नैसर्गिकच असते. म्हणूनच शरीरावर...
  July 14, 04:30 AM
 • आपल्या देशात प्रत्येक वर्षी साधारणत: ४ कोटी युनिट रक्ताची आवश्यकता भासते. पण प्रत्यक्षात ४० लाख युनिट रक्त उपलब्ध असते. प्रत्येक दुसऱ्या सेकंदाला रुग्णाला रक्त देण्याची आवश्यकता आहे. दररोज ३८ हजार रक्तदात्यांची आवश्यकता आहे. सिकलसेल रुग्णांना आयुष्यभर वारंवार रक्ताची आवश्यकता भासते. रोज साधारणत: लाखो नवीन कॅन्सरच्या रुग्णांची भर पडत आहे. यातील बहुतेकांना केमोथेरेपी दरम्यान वारंवार रक्ताची आवश्यक्ता असते. अपघातात जखमींना साधारणत: शेकडो युनिट रक्ताची गरज भासते. रक्त शरीराबाहेर तयार...
  July 7, 06:03 AM
 • सूर्यनमस्कार स्थिती बारावी कृती : १. श्वास सोडून हात खाली घ्यावेत २. हातांचे पंजे जुळवून छाती समोर नमस्कार करावा. ३. पाय जुळवून ठेवावेत (सूर्यनमस्कार स्थिती एक प्रमाणे) ४. ऊं भास्कराय नम: हा मंत्र म्हणावा. लाभ : चित्त एकाग्र झाल्याने मनोनिग्रहास मदत होते. मन शांत व एकाग्र होते. शरीर व मन सुदृढ बनते. * लेखिका या योग शिक्षिका आहेत.
  July 7, 05:59 AM
 • Obsessive-compulsive disorder (ओसीडी) हा एक मंद गतीने वाढणारा मानसिक आजार आहे, हा आजार अचानक उद्भवत नाही किंवा या आजाराने ग्रासलेल्या व्यक्ती इतर मनोविकाराच्या रुग्णांसारखे इतरांना त्रास किंवा हानी पोहोचवत नाहीत. एखाद्या गोष्टीबद्दल अतिप्रमाणापेक्षा जास्त माहिती घेणे, ही माहिती टीव्ही, पुस्तके, वर्तमानपत्र, मासिक यातून ती व्यक्ती गोळा करत असते. आपल्यालाही असाच त्रास होईल हा विचार वारंवार त्यांना त्रास देत असतो. या विचारांवर त्यांचे नियंत्रण नसते. त्या गोष्टीविषयी विनाकारण काळजी बाळगणे किंवा चिंता...
  July 7, 05:56 AM
 • नीतू ही माझी सहा वर्षांची मुलगी आहे. तिला स्वमग्न म्हणजे ऑटिझमचा रोग आहे. ती नेहमी खूपच उत्तेजित असे, वेड्यासारखी वागे. सारखी न सांगता सातत्याने उड्या मारे, थकतच नसे, हातवारे करायला लागली की सारखे हातवारे करी, सारखी कुरकुर-रडणे चालूच असे, रात्री तर कहर असे, झोपतच नाही, आम्हा सर्वांना जागरण होई, तिचे मन शरीर कधीच शांत नव्हत. आम्ही सारेजण कंटाळलो शेवटी मानसोपचाराकडे दाखवले. त्यांनी झोपेसारख्या गोळ्या दिल्या त्यामुळे ती सारखी झोपून असे. तिला कधीही शौचास नियमित झाली नाही. तीन-चार दिवसांनीही ती...
  July 7, 05:54 AM
 • हसण्यात रोग बरा करण्याची शक्ती आहे. चिंता करणे, झोप न येणे, नकारात्मक विचार करणे. यामुळे आपले आरोग्य खराब होत आहे. या सर्व समस्या घालवण्यासाठी एक फुकट औषध आहे. तुम्ही ते औषध कधीही घेऊ शकता त्याचे काही नकारात्मक परिणामही नाहीत. त्या औषधाचे नाव आहे हास्य. दिवसातून तुम्ही किती वेळा हसता याचा विचार करा. अभ्यास असे सांगतो की चार वर्षांचा मुलगा दिवसातून ४०० वेळा हसतो आणि प्रौढ माणूस दिवसातून फक्त चौदा वेळा हसतो. हे काय चालू आहे? अभ्यास असे सांगतो की हसणा-या लोकांना जास्त मित्र असतात. हसणा-या लोकात...
  July 7, 05:50 AM
 • सामान्यत: जगभरात होणा-या आकस्मिक मृत्यूंचे मुख्य कारण अचानक हृदयाच्या कार्यात बिघाड होणे किंवा हृदयाचे कार्य बंद पडणे हे असू शकते. यामुळे मेंदूसारख्या शरीराच्या मुख्य अवयवांना रक्त व ऑक्सिजन पुरवठा होत नाही आणि यामुळे या अवयवांना कायमस्वरुपी इजा पोहोचते. मेंदूला होणा-या रक्त व ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे अथवा रक्त व ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे अथवा रक्त व ऑक्सिजन पुरवठा थांबल्यापासून पहिल्या पाच ते सात मिनिटात कायमस्वरुपी अथवा गंभीर इजा...
  July 7, 05:37 AM
 • ज्यामध्ये मतिमंदत्व (डाऊन सिंड्रोम) सारखे आजार हे मातेच्या गर्भामध्येच सुरु झाल्यामुळे त्यावर सुरक्षितता घेण्याचा कुठलाही योग्य मार्ग उपलब्ध नाही, परंतु अशी बालके जन्माला आल्यानंतर त्यांचे संगोपन व आयुष्यभर होणारे त्यांची उपचार, त्यामुळे पालकांवर ती एक आव्हानात्मक जबाबदारी असते. त्यामध्ये उमेदीने कुठलीही, अपराधीपणाची जाणीव न ठेवता ते पूर्ण पार पाडावेच लागते. परंतु होमिओपॅथीमध्ये त्यांचा चांगल्या पध्दतीने उपचार करुन बरीचशी बालके आज ओळखायला येत नाहीत. की त्यांना मतिमंदत्व व...
  July 7, 05:33 AM
 • वैद्यकीय क्षेत्रात बर्याच वेळा टाॅन्सिल, अॅपेंडीक्स तसेच सिझेरीयन या शस्त्रक्रिया निष्कारण पैसे उकळण्यासाठी केल्या जातात, अशी धारणा आहे. त्यात तथ्य असल्याने डाॅक्टरांना कठोर आत्मपरीक्षणाची गरज आहे. सर्व डाॅक्टरांनी अंतर्मुख होऊन याबाबत प्रामाणिकपणे शोध घ्यावा. हल्ली वैद्यकीय व्यवसाय हा व्यवसाय न राहता धंदा समजल्या जातो. म्हणून ग्राहक संरक्षण, कायदा (consumer protection act) व दुकानदारी कायदा (shop act) या व्यवसायला लाग्ू करण्यात आलेला आहे. आपल्या व्यवसायाचा व्यावसायिक लेखाजोखा (professional audit) करण्याची वेळ...
  June 23, 04:01 AM
 • मनोविकारावरील औषधी (समज गैरसमज) मनोविकारांमध्ये नैराश्य (डिप्रेशन), चिंतेचे आजार (अॅझायटी), संशयविकार (स्किझोफ्रेनिया), फोबिया, मंत्रचळ, अतिउत्साह, मनोकायिक आजार इ. आजार येतात त्याबद्दल काही गैरसमज आहेत त्यानिमित्ताने... १ मनोविकारावर औषधोपचाराची गरज नाही ? त्यावर प्रभावी औषधी नाही बहुतांश मनोविकारांचे निदान हे रक्त/ लघवी तपासणी, सिटी. स्कॅन, सोनोग्राफी, एक्सरे इत्यादी कुठल्याही तपासणीद्वारे होत नाही किंवा तपासण्यांचे रिपोर्ट नाॅर्मल येतात. त्यामुळे शरीरात काहीही दोष नाही आणि...
  June 23, 04:00 AM
 • मला सहा वर्षांपूर्वी कंबर व पोट दुखण्याचा त्रास सुरू झाला. त्या नंतर पाच वर्षांपूर्वी पित्ताचा त्रास सुरू झाला. तीन वर्षांपूर्वी पायांवर सूज येण्यास सुरुवात झाली. दोन वर्षांपूर्वी वरील त्रासासोबत वजन वाढण्यास सुरुवात झाल्यामुळे डाॅक्टरांना दाखवले त्यावेळी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार केलेल्या तपासणीत थायराॅइड नावाचा आजार आहे हे कळले. औषधोपचार सुरू झाले. त्यानंतर वर्षापूर्वीपासून हाताचे सांधे दुखण्यास व पायांना गोळे येण्यास सुरुवात झाली. चार महिन्यांपासून ताण-तणावामुळे डोके...
  June 23, 04:00 AM
 • माझ्या पत्नीला लग्न झाल्यापासून मासिक पाळीचा त्रास होता तिची पाळी तीन-चार महिन्यांतून एकदाच यायची लग्नापूर्वी नियमित येत होती. पाळी नियमित नसल्यामुळे तिला गर्भधारणा होत नव्हती, काही दिवसांनी सुदैवाने गर्भवती राहिली पण दुसऱ्या महिन्यातच गर्भपात झाला खूप निराश झाली, गर्भापाताचे कारण कळले नव्हते. नंतर काही दिवसांनी पुन्हा दिवस गेले त्यावेळी आम्ही कामानिमित्त सूरतमध्ये राहत होतो, साडेतीन महिन्यांचा गर्भ होता डॉक्टरांनी सोनोग्राफीचा सल्ला दिला सोनोग्राफीत समजले की हा गर्भ नसून...
  June 16, 02:45 AM
 • योगा दिवस २१ जून निमित्त.... आसन व प्राणायामायाने मेंदूला जागविणारे मज्जातंतू शांत झाल्याने ही गोष्ट मेंदूही स्वीकारतो तो शांत बनतो. त्यामुळे बुद्धी शक्तीला योग्य चालना मिळते. बुद्धीची निर्णयक्षमता वाढते. परिणाम कल्पनाशक्ती, एकाग्रता, विचारशक्ती यांना एक उच्च पातळी प्राप्त होते. योग हे समुद्राप्रमाणे विशाल व अथांग असले म्हणून काय झाले. आपण समुद्राच्या किनारी उभे राहून लाटांचा आनंद घेऊ शकतो. तद्वतच समाधी, त्रैलोक्यप्राप्ती यासारखे अतिउच्च असे योगासनांचे उद्दिष्ट असले तरी आपण...
  June 16, 01:45 AM
 • नवजात बालकातील हायपोथर्मिया नवजात बालके पहिल्या महिन्यात अतिशय नाजूक असतात. घरातच तातडीचे उपाय करून आणि आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचार करण्याचे महत्त्व जाणून घेतले, तर नवजात बालकांचे मृत्यू टाळता येतील. नवजात बालकाला स्वत:ची ऊब राखणे कठीण असते. त्यामुळे बाळाचा जीव वाचविण्याच्या दृष्टीने बाळाला ऊब देणे (विशेषत:थंड वातावरणात) आवश्यक असते. नवजात बालकांचे वजन जर कमी असेल तर आपल्या शरीराचे तापमान योग्य मर्यादित राखणे त्यांना शक्य नसते. वर्षाचा बराच काळ हवामान जरी उष्ण असले तरी...
  June 16, 01:39 AM
 • प्रतेक घरातील किचनमध्ये अर्थात स्वयंपाकघरात कसदार मसाले वापरली जातात. मसाले हे रामबाण औषधीचे काम करतात. हे आपल्याला ठाऊक असेलच. आज आम्ही आपल्याला आठ रामबाण औषधींविषयी सांगणार आहोत... ते वाचा पुढीलप्रमाणे...
  June 16, 12:35 AM
 • वंध्यत्व म्हणजे एखाद्या जोडप्याने सतत एक वर्ष सोबत राहून कुठल्याही गर्भनिरोधकाचा वापर न करता आठवड्यातून किमान दोन वेळेस शरीरसंबंध ठेवूनसुद्धा गर्भधारणा झाली नसल्यास त्या वंध्यत्व आहे, असे म्हणता येईल. आजच्या धकाधकीच्या जीवनात पती व पत्नी दोघेही काम किंवा नोकरी करतात ज्यामुळे खूप मानसिक ताण-तणाव असू शकतो तो तुमच्या वंधत्वाचेदेखील कारण असू शकतो. आजकालच्या पिढीत उशिरा लग्न होणे नेहमीचे झाले आहे. करिअर करायच्या नादात लग्नाला किंवा गर्भावस्थेला नकार दिला जातो ते कधी कधी धोकादायक ठरू...
  June 2, 07:28 AM
 • कृती : पाठीवर झोपून करायचे आसन. १. पद्मासन घालून बसावे. मनगट, कोपरा जमिनीवर टेकवून त्या आधारे झोपून डोके जमिनीला लावावे. २. दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे धरावेत. ३. हातांच्या कोपरांचा आधार घेऊन त्याच्या साह्याने मान वळवून टाळू जमिनीला टेकवावी आणि पाठीची कमान करावी. ४. श्वसन सामान्य ठेवावे. उलट क्रमाने आसन सोडावे. लाभ : पाठीचे कुबड नाहीसे होते. पाठ, कंबर मानेचे दुखणे दूर होते. पोट पातळ बनते. गळा, ओटीपोट व छातीचे स्नायू बळकट बनतात. मधूमेह, दमा, फुफ्फुसांचे विकार यावर गुणकारी. * लेखिका...
  June 2, 07:26 AM
 • डीएनए म्हणजे डिआॅक्सिरायबो न्युक्लिक अॅसिड (गुणसूत्र) सर्व सजीवांच्छ पेशीत आढळतो. अतिरेकी जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबुजिंदाल याची ओळख त्याच्या आई-वडीलांच्या डीएनए चाचणीमुळे निश्चित झाली. त्यामुळे या चाचणीला अनन्यसाधारण महत्व आहे. डीएनए ही आयुष्याची ब्ल्यूप्रिंट आहे. प्रत्येक व्यक्तीला जगातील इतर व्यक्तीपासून वेगळे करतो. त्याच्या माध्यमातून स्वत: बद्दलच्या कदाचित तुम्हा आम्हाला माहीत नसलेल्या गोष्टींचा ही शोध घेऊ शकतो. डीएनए हा एक अनुवंशिक घटक असून तो प्रत्येक सजिवांमध्ये आढळतो,...
  June 2, 07:23 AM
 • उन्हाळ्यातील चिकू खाण्याचे फायदे चिकू गोड, थंड भरपूर औषधी गुणांनी भरलेले चविष्ट फळ आहे. उन्हाळ्यात याचे दररोज सेवन केल्यास आरोग्यदायी लाभ होतात. चिकू खाल्ल्याने शरीरात विशेष प्रकारचा उत्साह, चैतन्य निर्माण होते. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. चिकूचा रस रक्तात मिसळून ऊर्जा निर्माण करतो. चिकूची साल तापनाशक आहे. चिकूच्या सालीमध्ये टॅनिन असते. आतड्यांसाठी चिकूचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. चिकूच्या बियांमध्ये सापोनीन आणि संपोटिनीन नावाचा कडवट घटक असतो. चिकूमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर...
  June 2, 07:20 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात