जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Niramay

Niramay

 • पाश्चात्त्य देशात अलीकडे शाकाहार चांगला की मांसाहार, असा प्रश्न विचारला जातोय. आता अन्नपदार्थांचे नेमके गुणधर्म कळले. त्यामुळे शरीराला काय उपयुक्त आहे, याचा विचार करूनच आपण आहाराची योजना करावी. शाकाहार म्हणजे सात्त्विक आणि चांगला. तर मांसाहार म्हणजे तामसी आणि वाईट, असे ढोबळ निष्कर्ष लावून चालणार नाही. आहार शरीराला पोषक असावा. प्रतिकारशक्ती वाढवण्याची आणि काही विशिष्ट विकार टाळण्याची त्या आहारात ताकद असावी. लहानथोरांना सारख्याच प्रमाणात उपयोगी पडणारा असा शाकाहार अस्तित्वात आहे....
  March 10, 02:00 AM
 • कृती : हे पोटावर झोपून करावयाचे आसन आहे. १) स्वच्छ संतरंजीवर पोटावर झोपावे. २) दीर्घ श्वास घ्यावा. जमिनीवर छातीच्या दोन्ही बाजूला हातांचे पंजे टेकलेले ठेवावेत. ३) श्वास घेत शरीराचा छातीपर्यंतचा भाग वर उचलावा. ४) मान मागे टाकावी. नजर आकाशाकडे ठेवावी. ५) पाय मागे ताठ सरळ ठेवावेत. ६) काही सेकंद या स्थितीत थांबून शवासन विश्रांती घ्यावी. लाभ : कफ विकार दूर होतात. चेह-यावर तेज येते. महिलांच्या तक्रारींवर गुणकारी पचनक्रिया वाढून भूक लागते रक्त शुद्ध होते. 0 लेखिका योग शिक्षिका आहेत
  March 10, 02:00 AM
 • ( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे ) अल्सर म्हणजे शरीरग्रस्त होणारी जखम होय. अल्सर हा जगातील अनेक देशामधील लोकांना होणाऱ्या आजारापैकी एक आजार आहे. पचन संस्थेतील कुठल्याही भागात अल्सर होऊ शकतो. ज्या भागात पाचक रस येत राहतात, अशा ठिकाणी जखम होऊ शकते. अन्न नलिका वा जठरात होणारी जखम आंत्रव्रण. अशी जखम होण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील जठरात किंवा लहान आतड्यात तीव्र आम्ले जास्त प्रमाणात स्रवण. शरीरात आम्लचे प्रमाण जास्त झाल्यास त्या आम्लाची प्रक्रिया आतड्यातील...
  February 24, 05:48 AM
 • होमिओपॅथी एक खूप प्रगतिशील वैद्यकीय शास्त्र आहे; परंतु या शास्त्राचा सखोल अभ्यास नसल्यामुळे बरीच डॉक्टर मंडळी त्याकडे दुर्लक्ष करतात, तसे पाहता या शास्त्राची उपचारपद्धती ही शरीराच्या अति सूक्ष्म भागावरती म्हणजे रुग्णांच्या जीन्सवरदेखील उपचार करून त्यात योग्य ते बदल घडवून आणू शकते आणि ही गोष्ट आता दिवसेंदिवस रुग्णांना होणार्या फायद्यावरून सिद्ध होत आहे. आपल्याला भविष्यामध्ये कोणकोणत्या त्रासाला सामोरे जावे लागेल, त्याची एक ब्ल्यू प्रिंट ही आपल्या जीन्सवर अधोरेखित झालेली...
  February 3, 03:00 AM
 • निसर्गोपचारात तज्ज्ञांनी अनेक प्रयोग करून मातीमधील पुढील औषधी गुणधर्म शोधून काढले आहेत. जवळजवळ सर्व प्रकारच्या व्याधी-विकारांवर माती उपचार लाभदायक होतात. सर्व रसायनांचे मिश्रण मातीत आहे. म्हणून अनेक औषधांचा उपयोग करून जो फायदा होत नाही, तो फायदा एका माती उपचाराने होतो. विषशोषक गुण : विंचू, मधमाशी, साप, कुत्रा चावला असल्यास शरीरात विषाचा प्रवेश होतो. त्या ठिकाणी मातीलेप लावल्यास विष बाहेर खेचण्यास मदत होते. वेदनाशामक गुण : कानदुखी, दातदुखी, संधिवातातील वेदना, मणक्याचे विकार, सायटिका...
  February 3, 03:00 AM
 • जगभरात होणार्या ९.५ दक्षलक्ष मृत्यूंपैकी ७ टक्के मृत्यू हे कर्करोगामुळे होत आहेत. कर्करोग हा जगासोबतच भारताला भेडसावणारी गंभीर समस्या बनत आहे. ४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन आहे. जनसामान्यांमध्ये कर्करोग व त्यामुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोलतर्फे उपक्रम राबवण्यात येत आहे. एमजीएम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि इंड्स हेल्थ प्लस यांनी संयुक्तरीत्या तयार केलेल्या अॅब्नॉर्मलिटी रिपोर्टमध्ये १४ टक्के स्त्रियांना स्तनाचा...
  February 3, 03:00 AM
 • मूत्रपिंड तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी निकामी झाल्यास किडनीचे कार्य कृत्रिमरीत्या करणे म्हणजेच डायलिसिस होय. दररोज डायलिसिस करण्याची आवश्यकता नाही. नियमित स्वरूपात केल्यास दीर्घकालावधीपर्यंत रुग्ण चांगला राहतो. किडनीचे कार्य १० टक्क्यांपेक्षा कमी होते तेव्हा डायलीसिसची आवश्यकता असते. डायलिसिस कधी करणे आवश्यक आहे किडनीचे कार्य १० टक्क्यांपेक्षा कमी होणे, शरीरातील पाणी अतिरिक्त होणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, रक्तातील क्षार कमी-जास्त होणे, रक्तातील विषारी घटकांचा कुप्रभाव...
  January 20, 02:00 AM
 • अटेंशन डेफिसीट हाईपर डिसऑर्डर म्हणजे अतिचंचल मुलांमधील एकाग्रतेचा अभाव असणारा हा आजार. म्हणजे लहान मुलांमधील सर्वाधिक आढळून येणारा न्यूरोबिहेवीथरल प्रकारात मोडणारा हा एक आजार! शाळेत जाणा-या मुलांत एडीएचडी असण्याचं प्रमाण ४ टक्के ते १२ टक्के इतकं जास्त आहे. या आजाराची अनावधान किंवा एकाग्रतेचा अभाव, उताविळपण आणि अतिचंचलता ही वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे आहेत. अशी मुलं कुठलंच काम स्थिरपणे करीत नाही. त्यांची सतत चुळबुळ सुरू असते. अभ्यास नीट करीत नाहीत. लक्ष देत होमवर्क पूर्ण करणे त्यांना जमत...
  January 20, 02:00 AM
 • पित्ताच्या सर्व आजारांमध्ये (जसे आम्लपित्त, डोकेदुखी, शौचास आग होणे, रक्त पडणे, सर्व अंगाची आग होणे) मनुका खाणे फायदेशीर. नियमित काळ्या मनुका खाल्ल्याने अथवा त्या मनुका भिजवून त्याचे पाणी पिल्याने पोट साफ होण्याशी संबंधित सर्व आजार दूर होतात व पोट नियमित साफ होते. लघवीला जळजळ होणे, लघवीला थांबून थांबून होणे, लघवीला जोर लावावा लागणे. या सर्व त्रासांमध्ये मनुका खाणे फायदेशीर. काळ्या मनुकांच्या नियमित सेवनाने त्वचेची कांती वाढते व त्वचेशी संबंधित अनेक आजार दूर होण्यास मदत मिळते. काळ्या...
  January 20, 02:00 AM
 • हे बसून करावयाचे आसन आहे कृती : १. पाय पुढे पसरून बसावे. २. डावा पाय गुडघ्यात वाकवून त्याची टाच शिवणीजवळ पक्की बसवावी. ३. उजवा पाय गुडघ्यात वाकवून डाव्या बाजूला डाव्या गुडघ्याजवळ ठेवावा. ४. डावा हात उजव्या गुडघ्यावरून घ्यावा आणि हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडावा. ५. संपूर्ण शरीर डावीकडे फिरवावे. उजवा हात पाठीमागून डाव्या मांडीवर ठेवावा. ६. डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला दाब देत उजव्या हाताने मांडीला ताणून शरीर उजवीकडे जास्तीत जास्त फिरवावे. मान उजवीकडे नेऊन नजर मागे न्यावी. या स्थितीत...
  January 20, 02:00 AM
 • शरीरातील सर्व घटकांचा समतोल घडवून आणणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे व अवयवांचे पोषण वाढवणे या गोष्टी सर्व नियंत्रक बिंदूवर दाब दिल्याने घडून येतात. शरीरास फक्त ४ बिंदू मर्म आहे. एस.टी. ३६-ठिकाण : गुडघ्याच्या वाटीखाली ३ चुन समोरून खालच्या बाजूस वाटीपासून ४ बोटे टि.बी. या हाडाच्या वरच्या भागापासून १ बोट बाहेरच्या बाजूस. उपयोग : गुडघ्याच्या संबंधित सर्व विकार, सर्व साधारण आरोग्याच्या सर्व तक्रारी, उच्च व कमी रक्तदाब, मधूमेह, खालच्या अवयवांचा लकवा, चेह-याचा लकवा, उलट्या, भूक न लागणे, ढेकर येणे,...
  January 20, 02:00 AM
 • हे बसून करावयाचे आसन आहे. कृती : १. स्वच्छ सतरंजीवर पद्मासन घालून बसावे. २. श्वास घेत दोन्ही बाजूंनी दोन्ही हात सरळ डोक्यावर न्यावेत. ३. पाठीचा कणा ताठ ठेवावा. हाताचे तळवे नमस्कार स्थितीत एकमेकांना टेकलेले ठेवावेत. ४. संथ श्वसन चालू ठेवावे. ५. काही सेकंद या स्थितीत थांबून श्वास सोडत हात खाली आणावेत. लाभ : पोट, छाती, पाठीचा कणा यांना आरोग्यदायक ताण बसतो. त्यामुळे दम्यासारखे विकार दूर होऊ शकतात. मज्जातंतूंचे कार्य सुधारते. छातीचे श्वसनाचे विकार दूर होण्यास याचा उपयोग होतो.
  January 13, 07:08 AM
 • पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचेही आवडते खाद्य आहे. विषेशत: पोपटाचे पेरू-मिरची आदी. पेरूचे शास्त्रीय नाव - सिडियम ग्वाजाव्हा हे झाड साधारणत: १५ ते २० फूट उंचीचे असते. त्याच्या पानांना असा एक खास वास असतो. पाने चुरगळल्यावर तो जास्तच तीव्र होतो. याचे फूल पांढरे असते. त्या फुलामागील भागच मग मोठा होत पेरू फळ आकाराला येते. बिया दातात अडकतात व त्यामुळे सर्दी होते हा एक...
  January 13, 07:05 AM
 • मानवी शरीरातील व्याधी प्रतिरोधक प्रणाली ही अनेक रोगांविरुद्ध लढून शरीर रोगमुक्त ठेवण्यास व कुठल्याही आजाराचा प्रतिकार करण्यास कारणीभूत असते. ही व्याधी प्रतिरोधक शक्ती कुठल्याही कारणामुळे जर कमी झाली, तर वरचेवर सर्दी, ताप, खोकला, पोटदुखी अशी लक्षणे व आजार शरीरावर वारंवार दिसून येतात, परंतु कधी कधी शरीरातील ही व्याधी प्रतिरोधक शक्ती विपरीत कार्य करण्यास सुरुवात करते व ती स्वत:च्या शरीरातील पेशींविरुद्धच कार्य करण्यास सुरुवात करते. अशा बिघडलेल्या Immune System च्या प्रभावाखाली शरीरातील अनेक...
  January 13, 07:01 AM
 • वाढत्या वजनाकडे लक्ष देऊन वजन वेळीच योग्य आहारविहार, व्यायामाने नियंत्रणात आणावे भारत हा ओबेसिटी या लठ्ठपणाशी संबंधित आजारात जगात तिस-या क्रमांकांचा देश आहे आणि ओबेसिटी हा एक आजार आहे, हे लोकांना माहितीच नाही. ओबेसिटी ही फक्त आहारावर नियंत्रण व विहार यानेच नियंत्रणात राहते. वजन कमी करण्यासाठी कोणतेही औषध घेण्याची यास आवश्यकता नाही. ओबेसिटी ही स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत सर्वांमध्ये आढळते. 1. लठ्ठपणाची कारणे शारीरिक श्रमाचा अभाव, चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार, थोड्या प्रमाणात...
  January 13, 06:57 AM
 • भारतीयांप्रमाणेच आता युरोप अमेरिकेसारख्या पाश्चात्त्य देशातील स्त्रियांनाही आरोग्यदायक हळदीचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळे युरोपियन स्वयंपाकघरातूनही हळदीने शिरकाव केलेला आहे. भारतात हळदीची शेती केली जाते. इतर काही देशांतही हळदीची लागवड वाढत आहे. हळदीच्या ओल्या कंदाचे लोणचे करतात. ते रूचकर, भूक वाढवणारे व अन्नपचन करणारे असते. हळद दळून तिचे चूर्ण स्त्रिया कपाळावर लावण्यासाठी वापरतात तसेच दररोजच्या स्वयंपाकातही वापरले जाते. उपयोगी अंग हळद (मुळाचा कंद) हळद चवीला थोडी तिखट,...
  January 13, 06:53 AM
 • आवळा अम्लपित्तावरील श्रेष्ठ औषध आहे -आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात. -ज्यांना पोट साफ होण्यास त्रास होतो. मलावरोध असतो, त्यांनी नियमीतपण आवळ्याचा रस अथवा आवळा खावा. याने पोट नियमीतपणे साफ होऊ लागते. -आवळ्यामध्ये vit c प्रचूर प्रमाणात असते. त्यामुळे हिरड्यातून, नाकातून रक्त येणे अशा आजारांमध्ये आवळा हे उत्तम औषधआहे. -नियमीत आवळा खाल्याने त्वचेची कांती सुधारते. तसेच त्वचेशी संबंधीत आजार...
  January 6, 08:31 AM
 • आपण दररोज प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पीत असाल तर सावधान होण्याचा महत्वाचा सल्ला नुकताच काही संशोधकांनी दिला आहे. प्लास्टिकच्या बाटलीतले, कॅनमधले किवा प्लास्टिकच्या पेल्यातले पाणी आपण सतत प्यायले तर आपला रक्तदाब वाढून आपल्याला हाय ब्लड प्रेशर चा त्रास होण्याची शक्यता आहे असे एका संशोधनात आढळून आले आहे. कोरियातील सेउल राष्ट्रीय विद्यापीठातील संशोधकांनी काही लोकांवर शास्त्रीय प्रयोग करून वरील आशयाचा नित्कर्ष काढल्याचे एका अमेरिकन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत....
  January 6, 08:31 AM
 • सर्व प्रकारच्या तुळशीच्या पानांची, फुलांच्या मंजिऱ्यांची चव कमी जास्त तिखट असते व उष्ण गुण असतो. तुळशीच्या मंजिऱ्यांमधील बिया अतिशय बारीक, गोल व काळ्या रंगाच्या असतात. या बिया पाण्यात घातल्या असता बुळबुळीत होतात. चवीला गोड असून थंड गुणाच्या असतात. तुळशीच्या पानांना, मंजिऱ्यांना तैलांशामुळे सुगंध येतो. या तेलामध्ये सुमारे सत्तर टक्के युजेनाॅल नावाचे औषधी कार्यकारी तत्त्व असते. याशिवाय पानात कॅलशियम, फाॅस्फरस इत्यादी खनिजे असतात. तुळशीचे उपयोग बाहेरून १. शिबे, गजर्क इत्यादी...
  December 23, 08:38 AM
 • आयुर्वेदानुसार मानवी शरीराचे पोषण आहारामुळे होत असल्याने शरीर हे आपण जसा आहार घेऊ तसेच तयार होत असते. सात्विक, राजसी, तामसी असे आहराचे देखील प्रकार असतात व ते मनावर देखील आपला प्रभाव सोडतात. आहारा च्या चुकीच्या सवयी, अवेळी आहार घेणे, अपथ्यकर आहार, दिवसा झोप, रात्री जागरण इ. अनेक गोष्टी पचनावर परिणाम करतात व त्याचे परिणाम पोटाचे व इतर आजारांत होते. आजकालच्या धकाधकीच्या यांत्रिक युगात आहार व त्याच्याशी निगडित बाबींकडे लक्ष देण्यास कुणाकडेच वेळ नाही. जेवणाच्या वेळा नियमित नसणे, टी.व्ही....
  December 23, 12:19 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात