जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Pratima

Pratima

 • Delete
  March 19, 12:07 PM
 • समीक्षक आणि साहित्यिक या दोन्ही लेखनप्रकारांमधील अत्यंत मान्यवर नाव असणा-या डॉ. विजया राजाध्यक्ष यांना नुकताच कुलकर्णी प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर झाला आहे. एक प्रतिभासंपन्न लेखिका म्हणून त्या वाचकांना परिचित आहेत, त्याचप्रमाणे टीकात्मक, समीक्षात्मक आणि आस्वादात्मक अशा लेखनाचा त्रिवेणी संगम विजयांच्या लेखनातून प्रत्ययास येतो. त्यांनी संपादित केलेली ग्रंथसंपदाही मोठी आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी लेखनविश्वात डॉ. विजया राजाध्यक्ष हे अत्यंत उल्लेखनीय नाव आहे. दर्जेदार...
  August 17, 11:10 PM
 • मगचा वापर तुम्ही चहा, कॉफी पिण्यासाठी करीत असाल; पण काही मग बोधामृतही पाजू शकतात! एखाद्या प्रिय व्यक्तीची आठवण मग जपू शकतो तसंच हसवूही शकतो! याचा अनुभव घ्यायचा असेल तर अहमदनगर येथील प्रमोद कांबळे यांच्या घरी जावं लागेल. प्रमोद हे शिल्पकार आणि चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर ते उत्तम संग्राहकही आहेत. जगावेगळा सहाशेहून अधिक मगांचा संग्रह त्यांनी केला आहे. घोटभर चहापासून लिटरभर कॉफी मावेल असा थिंक बिग सांगणारा मग त्यांच्याकडे आहे. वाघ, सिंह, हरिण व माशाचा आकार असलेले मग आहेत....
  August 17, 11:06 PM
 • सावित्रीबाई खानोलकर या मूळच्या इव्हा युओन लिंडा मॅदे -दे मोरॉस! जन्म स्वित्झर्लंडमध्ये 20 जुलै 1913 रोजी झाला. वडील हंगेरियन, तर आई रशियन. इव्हाने आईला कधी पाहिलं नाही. वडिलांनीच तिचे संगोपन केले. वडील जिनेव्हाच्या लीग ऑफ नेशन्स मध्ये ग्रंथपाल होते. इव्हाचे बालपण शाळा आणि वसतिगृह यात गेले. रिव्हिएराच्या समुद्र किना-यावर हिंडताना इव्हाचे लक्ष ब्रिटिश सोल्जर्सच्या एका घोळक्याकडे गेले. सँडहर्स्ट (लंडन) हून सुटीवर आलेला तो ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये विक्रम खानोलकर नावाचा तरुण अधिकारी होता. ही...
  August 10, 10:19 PM
 • कुठे सहलीला गेलं की, तुम्ही फोटो काढत असाल. कितीतरी वर्षांनंतरही हे फोटो पाहिले की, सहलीच्या आनंदाचा पुन:प्रत्यय येतो. गुलमोहोर रस्त्यावर असलेल्या देवगावकरांच्या श्रावण बंगल्यात गेलं की, या कुटुंबानं विविध देशांत केलेल्या सहलींचे साक्षीदार दिसू लागतात. इजिप्तमधील पिरॅमिड््सपासून मॉरिशसच्या चमकदार शंख, शिंपल्यांपर्यंत अनेक गोष्टींचा खजिना आपले डोळे दिपवून टाकतो. सदाशिव देवगावकर हे बांधकाम व्यावसायिक असले, तरी त्यांना राजकारणात मोठा रस आहे. राजकारणातील तणाव घालवण्यासाठी पर्यटन हा...
  August 10, 10:18 PM
 • एक बंद खोली आणि त्यामध्ये दाटीवाटीने बसलेली मुलं.. शिकवणारं कोणीतरी काहीतरी शिकवत असतं खरं पण सारं काही डोक्यात शिरतच असं मात्र नाही .. त्यातून जी मुलं जेवढा परफॉर्मन्स दाखवतील त्यावरच त्यांचं अस्तित्व आणि जगण्याची लायकी ठरवणार अशी आपली शिक्षण पद्धती. अनेक वर्षापासून हीच शिक्षण परंपरा आपण मान्य केलेली आहे त्यामुळेच मुख्य प्रवाहाच्या विरूद्ध पोहून ख-या अर्थाने बिनभिंतींची शाळा चालवण्यात यशस्वी ठरलेल्या पुण्याच्या माधुरी देशपांडे यांचे चोवीस वर्षापासून अव्याहतपणे सुरू असलेले...
  August 10, 10:16 PM
 • आपल्या आयुष्याचा 70 वर्षांहून अधिक काळ बाबासाहेब ऊर्फ बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांनी छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व, प्रशासन आणि पराक्रम कथन करण्यात सार्थकी लावले आहे. पुरंदरे यांच्या मूळच्या अस्खलित, तेजस्वी वाणीला शिवचरित्र कथन करताना जी धार चढते, तो निखळ श्रवणानंद राज्यभरातील श्रोत्यांच्या आयुष्यातला कायमचा मौल्यवान ठेवा बनला आहे. मात्र पुरंदरे यांचे कर्तृत्व शिवचरित्रकथनापुरतेच मर्यादित नाही. ते अत्यंत डोळस, चिकित्सक इतिहास संशोधक आहेत. उत्तम लेखक आहेत, नाटककार आहेत, भाषेचे जाणकार...
  August 4, 09:44 AM
 • डॉ. प्रियंका सोनी 12 वर्षांपासून लेखन करीत आहेत. आजवर त्यांनी तीन हजार कविता, गाणी, गझल, 25 ते 30 कथा लिहिल्या आहेत. सध्या त्यांचे 4 उपन्यासांचे लेखन सुरू आहे. त्यांचे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून आजवर सुमारे 80 पुरस्कार मिळाले आहेत.रशियाकडून स्वतंत्र झालेल्या उझबेकिस्तानमधील ताश्कंद शहरात पाचवे आंतरराष्ट्रीय हिंदी संमेलन झाले. संमेलन सृजन सन्नाम छत्तीसगढ, प्रेमाह वर्मा स्मृती सन्मान नागपूर, ओएनजीसी भारत सरकार, तिराला शिक्षण समिती नागपूर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले होते. यात...
  August 4, 09:39 AM
 • सरकारी नोकरी सांभाळून, शिवाय कर्मचारी संघटनेचा व्याप पाठीशी असताना एखादी व्यक्ती ऐतिहासिक वस्तूंचा किती मोठा संग्रह करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नगरचे अबुबकर पठाण! आगपेट्यांच्या टिक्क्यांपासून सुरू झालेला त्यांचा छंद विस्तारत आता त्याला संग्रहालयाचे स्वरूप आले आहे. काय नाही त्यांच्या संग्रहात ? नाणी, नोटा, हस्तलिखिते, पोथ्या, ग्रंथ, सनदा, भांडी, अडकित्ते, दिवे, कुलपे, मूल्यवान खडे, शस्त्र, राजे-रजवाड्यांचे भरजरी कपडे, अत्तरं...पाहण्यासाठी एक दिवस कमी पडेल इतक्या बेहत्तरीन चिजा...
  July 27, 10:38 PM
 • भारतीयांनी जगभरात आपल्या कर्तृत्वाने नाव कमावले आहे. कधी काळी ज्या ब्रिटिशांनी आपल्या भूमीवर राज्य केले त्यांच्याच देशामध्ये राहून ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर, ब्रिटिश एम्पायर मेडल अशा अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी भारतीयांना सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच चन्नी सिंग यांना ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर म्हणजेच ओबीई या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1975 मध्ये पंजाबमधील एका छोट्या गावातून इंग्लंडमध्ये नोकरीनिमित्त स्थलांतरित झालेल्या चन्नी सिंग यांचे खरे नाव हरचरणजित सिंग....
  July 27, 10:32 PM
 • याहू या टेक्नॉलीजी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी गुगलच्या उपाध्यक्ष मारिसा मेयर (37) यांची नियुक्ती झाल्याने सिलिकॉन व्हॅली व अमेरिकेतील कॉर्पोरेट जगतातील एक महत्त्वाची महिला म्हणून मेयर यांची गणना झाली आहे. या नियुक्तीपाठोपाठ त्यांनी आपण गरोदर असल्याची गोड बातमीही सांगितली. मेयर यांची झालेली ही नियुक्ती म्हणजे हे एक प्रकारचे कॉर्पोरेट बंडच म्हटले पाहिजे. कारण सध्याच्या स्थितीत याहू आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी सतत धडपडत आहे. दोन वर्षांत त्यांनी नेतृत्वपदी तीन वेळा बदल...
  July 27, 10:25 PM
 • प्रचंड संख्येने असलेल्या तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन करणारी संस्था आजही अपवादाने आढळते; परंतु जर एखादी व्यक्ती अथवा संस्था मागे खंबीरपणे उभी राहिली, तर दिशाहीन होऊ पाहणारे तरुण किती आश्चर्यकारक प्रगती करू शकतात, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अविनाश धुमे आणि त्यांचे मित्र अजय गायकवाड, अविनाश कोष्टी. याच अविनाश धुमे यांना यूथ बिझनेस इंटरनॅशनल या संघटनेतर्फे आयोजित पीपल्स चॉइस अवॉर्डसाठी नामांकन देण्यात आले आहे. अविनाश धुमे हे पुण्यातील एका प्रकाशन संस्थेमध्ये विक्रेते म्हणून दहा...
  July 20, 11:19 PM
 • हळपावत यांचा मूळ पिंड कलावंताचा. मग ती नखचित्रे असोत, की जादूचे खेळ. त्यांचे हस्ताक्षरही सुंदर आहे. जामखेडला होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमांत सजावटीची जबाबदारी मामांवर असते. त्यांच्याकडे अनेक गोष्टींचा संग्रह आहे. त्यात नामवंतांच्या पत्रांपासून, कात्रणे, तिकिटे, नाणी, दिवे, वजनमापे, लेखण्या अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. शिवराई या शिवकालीन नाण्यांचे तर हजारावर प्रकार त्यांच्याकडे आहेत. दुर्मिळ समजले जाणारे छत्रपती संभाजीमहाराजांचे तांब्याचे नाणेही त्यांच्या संग्रहात आहे. ही नाणी...
  July 20, 11:12 PM
 • उंचीपुरी शरीरयष्टी, गौरवर्ण, चेह-यावर सतत स्मितहास्य, चष्म्यातून वेध घेणारी नजर आणि नेहरू शर्ट-पायजमा अशी वेशभूषा म्हणजे पन्नालाल सुराणा. त्यांची माझी ओळख केव्हा झाली आणि त्याचं मैत्रीत रूपांतर कधी झालं हे कळलंही नाही. कधीही आम्ही भेटलो तर शिळोप्याच्या गप्पात रंगलो, असे कधीही झाले नाही. कुठला तरी चिंतनाचा विषय घेऊनच गप्पा व्हायच्या. अनंत भालेरावची पुण्याई लाभलेल्या दैनिक मराठवाड्याच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. तेव्हा मात्र नियमित भेटीगाठी व्हायच्या. संपादकपदाच्या...
  July 20, 11:08 PM
 • नीता कुलकर्णी मूळच्या रत्नागिरीच्या. लग्न होऊन पुण्याला स्थायिक झाल्या. साहित्याचं माहेरघर समजल्या जाणार्या पुण्यामध्ये त्यांच्या लेखनाला अधिक बळ मिळालं. पुणे विद्यापीठातून र्जनलिझमचा डिप्लोमा पूर्ण केला असल्याने त्यांनी काही वर्षे मुक्त पत्रकारिता केली. एका स्वयंसेवी संस्थेच्या द्वैमासिकासाठी त्यांनी संपादनाचं काम केलं. हे मासिक केवळ लहान मुलांकरिताच होतं. त्यामुळे लहान मुलांचे विश्व डोळ्यासमोर ठेवून त्यांनी संपादन केलं. पुढे अमेय प्रकाशनासारख्या प्रतिष्ठित संस्थेत त्या...
  July 14, 02:35 PM
 • अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता या तिन्ही भूमिकांमध्ये सचिन यांची यशस्वी कारकीर्द आहे. मुख्य म्हणजे मराठीप्रमाणेच हिंदी तसेच काही भोजपुरी चित्रपटांतूनही सचिन नायक म्हणून चमकले आहेत. कृष्णधवल चित्रपटांचा 1960 च्या सुमाराचा काळ सचिन यांनी बालकलाकार म्हणून गाजवला आहे. हा माझा मार्ग एकला (1962) हा सचिन यांचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट होता.नायक म्हणून सचिन यांचे गीत गाता चल (1975), बालिकावधू (1976), अंखियों के झरोके से (1978) तसेच नदिया के पार (1982) हे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरले. त्यानंतर मात्र...
  July 14, 02:33 PM
 • सुपरहीरोंच्या दुनियेत नैसर्गिक सुपर पॉवर नसलेला परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दुष्ट शक्तींपासून लोकांना वाचवणारा नायक म्हणजे बॅटमॅन. कॉमिक्समधून रुपेरी पडद्यावर आलेल्या या सुपरहीरोने सुपरमॅन, स्पायडरमॅनप्रमाणे लोकप्रियता मिळवली. परंतु नंतर बॅटमॅन शर्यतीतून बाहेर पडल्यासारखा झाला होता. बॅटमॅनला नव्या रूपात आणि एका वेगळ्या विचाराने प्रेरित करीत पडद्यावर आणले. या नव्या बॅटमॅनला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि आता या बॅटमनचा शेवटचा भाग द डार्क नाइट राइजेज दोन...
  July 14, 02:31 PM
 • सध्या छोट्या पडद्यावर घराघरात पोहोचलेल्या घनश्यामची म्हणजेच स्वप्निल जोशीची खासगी आयुष्यातदेखील दोन लग्ने झाली आहेत, हे फार कमी लोकांना माहिती असेल. पण ही वस्तुस्थिती आहे.एका लग्नाची दुसरी गोष्टमध्ये तो सध्या राधापासून (मुक्ता बर्वे) घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे त्याने खासगी आयुष्यात दुसरा विवाह गेल्या वर्षी 16 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथील ताज या पंचतारांकित हॉटेलमध्ये केला. यामध्ये विशेष म्हणजे स्वप्निलच्या पहिल्या बायकोप्रमाणे त्याची दुसरी बायकोदेखील...
  July 7, 10:03 AM
 • कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व बंडाचे निशाण रोवलेले बी. एस. येदियुरप्पा हे एकेकाळी भाजपचे दक्षिण भारतातील भूषण समजले जात. आता मात्र भाजपसाठी ते एक डोकेदुखी ठरले आहेत. अलीकडेच त्यांच्या समर्थक आठ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपले राजीनामे सुपूर्द करून बंडाचे निशाण रोवले होते. अर्थात त्यांच्यामागे येदियुरप्पाच होते. येदियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या नवीन मुख्यमंत्र्यांना त्यांनी काही स्वस्थतेने राज्य करू दिलेले नाही. गेल्या...
  July 6, 10:14 PM
 • कलेचा वारसा असलेल्या कुटुंबात माझा जन्म झाला, ही माझ्या दृष्टीने भाग्याची गोष्ट होती. माझी आई रमादेवी कोल्हापूरला प्रभात कंपनीत काम करत असे, तर माझे वडील श्रीकृष्ण साक्रीकर अत्रे यांच्या कंपनीत होते. त्यामुळे मला अगदी लहानपणापासूनच कलेविषयी प्रेम होते. कोल्हापूरला त्या काळात अनेक मेळे होत. त्यातून मी हमखास भाग घेत असे आणि चांदीची पदके मिळवत असे. या काळात मी मिरजकर यांच्याकडे कथ्थक आणि भरतनाट्यमचे शिक्षणही घेत होते. गांधर्व महाविद्यालयाच्या नृत्याच्या परीक्षाही मी दिल्या....
  July 6, 09:57 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात