जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Pratima

Pratima

 • सिन्नर येथील गारगोटी संग्रहालयाला ज्यांनी भेट दिली असेल त्यांचे डोळे तेथील भूरत्नांची दुनिया पाहून विस्फारले असतील. अशीच स्थिती नगर येथील बहिरनाथ वाकळे यांच्या घरी गेल्यावर आपली होते. वरून ओबडधोबड दगड, पण आतमध्ये स्फटिकाचे फूल फुललेले...काहींचा आकार तीक्ष्ण सुयांसारखा, काही खोब-यासारखे, तर काही पांढ-या शुभ्र कापसासारखे. काहींचा रंग निळाभोर, तर काहींना गुलाबी-जांभळी छटा. काहींमधून पाझरणारा हिरवा रंग, तर काहींमध्ये एकाच दगडात तीन-चार रंग सामावलेले. कॅलसाइट, कॅवनसाइट, स्टीलबाइट,...
  June 29, 09:30 PM
 • स्टेज मॅनेजर आणि टीव्ही निर्माता जॉन स्टीवर्ट आणि पटकथा सुपरवायझर ज्यूल्स मान स्टीवर्ट या रुपेरी दुनियेत काम करणा-या माता-पित्याच्या पोटी जन्मलेली क्रिस्टिन सध्या फक्त हॉलीवूडच नव्हे, तर जगभरातील तरुणांच्या दिलाची धडकन बनली आहे. एवढेच नव्हे, तर आज ती हॉलीवूडमधील वर्षाला सगळ्यात जास्त मानधन घेणारी नायिका म्हणूनही ओळखली जाऊ लागली आहे. क्रिस्टिन वर्षाला 34.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 160 कोटी रुपये कमवत आहे. भारतीय नायिकांच्या अनेक वर्षांचीही एवढी कमाई नाही. क्रिस्टिनने कॅमेरून डायजला मागे...
  June 29, 09:30 PM
 • कला शाखेच्या पदवीधर असलेल्या सोनाली यांनी पुण्यात एसएनडीटी विद्यापीठातून नृत्यामध्ये डिप्लोमा केला आहे. लहानपणापासूनच त्यांना नृत्याची आवड होती. ज्युनियर केजीपासून त्यांनी प्रसिद्ध नृत्यांगना माणिक अंबिके यांच्याकडे भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली. पुढे डिप्लोमानंतर त्यांनी डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांच्याकडे नृत्याचे पुढील शिक्षण घेतले. नाशिकमध्ये स्थायिक झाल्यानंतर गेल्या 9 वर्षांपासून त्या नृत्याली ही नृत्यसंस्था चालवीत आहेत. सुचेता चापेकर यांच्या कलावर्धिनीचा पाच...
  June 22, 11:28 PM
 • राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवण्यासाठी संगमा यांना राष्ट्रवादी पक्षाचा त्यागही करावा लागला. कदाचित केंद्रात मंत्री असलेल्या त्यांच्या कन्येलाही आपले पद गमवावे लागण्याची शक्यता आहे. संगमा हे काही वर्षांपूर्वी मेघालयाच्या राजकारणात नाइलाज म्हणून परतले होते. मात्र, त्यांचे लक्ष नेहमीच दिल्ली दरबारी असे. आता त्यांना पुन्हा दिल्लीत परतायची मोठी आस लागली होती. राष्ट्रपतींची निवडणूक ही एक मोठी संधी असल्याचे त्यांना जाणवले. निवडणुकीत हरलो तरी आपण त्यानिमित्ताने राष्ट्रीय राजकारणात...
  June 22, 11:25 PM
 • सर्वसाधारण कुटुंबाची पार्श्वभूमी असणारी ऊर्मिला सारेगमप या स्पर्धात्मक कार्यक्रमातून सर्वप्रथम लोकांसमोर आली. एकामागोमाग राउंड जिंकत गेली आणि शेवटी सारेगमपच्या अंतिम फेरीतही विजयी ठरली. आवाजातील अस्सल मराठमोळेपणा ही ऊर्मिलाच्या गाण्याची जमेची बाजू किंवा बलस्थान आहे. मोकळेपणाने चांगला फिरणारा आवाज असल्याने इथल्या मातीचे स्वत्व घेऊन आलेल्या ग्रामीण बाजाच्या गाण्यांत तिचा आवाज अधिकच खुलतो. सध्या गाजणारी तिची लावणीही याचा प्रत्यय देते. मात्र, सध्या सुगम संगीतात बिझी असली तरी...
  June 22, 11:14 PM
 • उत्तर प्रदेशातील कनौज लोकसभा मतदारसंघातून तरुण मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या अलीकडेच बिनविरोध निवडून आल्या आहेत. लोकसभा मतदारसंघातून अलीकडच्या काळात बिनविरोध निवडून जाणार्या या एकमेव महिला खासदार ठरल्या आहेत. 2009 च्या निवडणुकीत अखिलेश यादव हे कनौज व फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी फैजाबाद मतदारसंघातून राजीनामा देऊन आपल्याकडे कनौज मतदारसंघ राखला होता. मात्र, आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यावर त्यांनी कनौजमधून राजीनामा...
  June 16, 07:34 AM
 • गोविंदपुर्यात राहणारे शेख शब्बीर अहमद बिलाल यांच्याकडे टपाल तिकिटांचा मोठा संग्रह आहे; पण त्याहीपेक्षा मोलाचा ठेवा आहे ग्रंथांचा. नगर जिल्ह्यातील लेखक, कवींच्या पुस्तकांचा संग्रह तुम्हाला पाहायचा असेल, तर शब्बीरभाईंना भेटावेच लागेल. नगर जिल्ह्यातील कुठल्याही ग्रंथालयाने घेतले नसतील इतके कष्ट त्यांनी त्यासाठी घेतले आहेत.या कलेक्शनची सुरुवात झाली निझामशाहीत एका नाण्यापासून. या नाण्याची माहिती घेण्यासाठी शब्बीरभाईंनी नगरविषयीची जुनी पुस्तके मिळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा...
  June 16, 07:31 AM
 • नगर शहरात बांधकाम व्यवसाय करणार्या सचिन डागा यांच्या या छंदाची सुरुवात झाली ते शिर्डीत असताना. क्रमांकातील संगती किंवा विसंगती पाहून वैशिष्ट्यपूर्ण नोटा ते आपल्या संग्रही ठेवतात. काही नोटांवरील क्रमांकात सगळे आकडे सारखे असतात. काही वेळा नोटा छापताना गडबड होऊन अर्धा भाग कोराच राहिलेला असतो, तर कधी एक बाजूच छापली गेलेली असते.सुरुवातीला त्यांनी '786' हा क्रमांक असलेल्या नोटांचा संग्रह सुरू केला. नंतर त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीपासून रिझर्व्ह बँकेच्या वेगवेगळ्या गव्हर्नरांच्या...
  June 9, 07:55 AM
 • जागतिक स्तरावरील एक लक्षणीय नाटककार म्हणून सतीश आळेकर यांचे नाव घेतले जाते. 'महानिर्वाण' आणि 'बेगम बर्वे' या आळेकरांच्या नाटकांचे जगातील अनेक भाषांत प्रयोग झाले आहेत. नाट्य परिषदेने आळेकरांना जीवनगौरव देऊन त्यांच्या या योगदानाला सलाम केला आहे.सतीश आळेकरांचा जन्म दिल्लीचा, पण ते वाढले पुण्यात. पुणे विद्यापीठातून त्यांनी बायोकेमेस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात ते संशोधक म्हणून काही काळ कार्यरतही होते. महाविद्यालयीन जीवनापासूनच आळेकर रंगभूमीशी...
  June 9, 07:50 AM
 • 19 91 च्या नांदेड जिल्ह्यातील मालेगावच्या यात्रेतला एक प्रसंग.. रघुवीर खेडकर यांचा तंबू यात्रेत लागला होता आणि राजीव गांधी हत्या प्रसंगावर वग सादर होणार होता. त्यासाठी एक हेलिकॉप्टर बनवण्यात आले होते आणि फटाक्यांची दारू आणि सुतळी बॉम्ब तयार ठेवण्यात आले होते. वामन लोहगावकर हा सोंगाड्या आणि रघुवीर खेडकर यांचा मुलगा व भाचेमंडळी राजीव गांधींच्या स्वागताला तयार होती, असा प्रसंग त्या वगात दाखवण्यात आला होता. आपटबारच्या पेटीचे झाकण आदळल्याने मोठा स्फोट झाला. रघुवीरचा पाच-सहा वर्षांचा भाचा...
  June 9, 07:46 AM
 • 'लावू का लाथ नावाचा नवा मराठी चित्रपट शुक्रवारपासून सगळीकडे प्रदर्शित झाला. प्रत्येक शुक्रवारी एक तरी मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने याच चित्रपटाचा उल्लेख का, असा प्रश्न तुमच्या मनात स्वाभाविकच उमटला असेल. याचे मुख्य कारण हरहुन्नरी अभिनेता विजय पाटकर हा आहे. रंगमंच, मालिका, जाहिराती, मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये चतुरस्र कामगिरी करीत असतानाच दिग्दर्शनात उडी घेऊन एक-दोन नव्हे, तर चक्क पाच चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन आल्यानंतर विजयने निर्मात्याच्या रूपात आपली नवी इनिंग...
  June 2, 12:58 AM
 • जर्मनीत फ्रँकफर्ट येथे मुख्यालय असलेल्या डॉइश बँकेचा कारभार 70 देशांमध्ये पसरला असून एक लाखाहून अधिक कर्मचारी त्यांच्या ताफ्यात आहेत. सुमारे 34 अब्ज युरो उलाढाल असलेल्या या बँकेची स्थापना 1879 मध्ये बर्लिनमध्ये झाली. विदेशी चलन बाजारातील उलाढालीत या बँकेचा वाटा 21 टक्के एवढा आहे. या बँकेचा इतिहास मोठा मजेशीर आहे. हिटलर सत्तेवर येताच या बँकेतील तिघा ज्यू संचालकांची त्याने हकालपट्टी केली. मात्र दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जर्मनीचा पराभव झाल्यावर 1948 मध्ये या बँकेचे 10 विभागीय बँकांमध्ये...
  June 2, 12:51 AM
 • दिवसाला किमान चार - पाच सोनसाखळ्यांची चोरी, तीन ते चार घरफोड्या, दोन -चार दुकानांची लूट, पाच-सात प्रवासी वा वृद्धांची तोतया पोलिसांकडून होणारी लुटीची प्रकरणे, टोळक्यांकडून शिक्षक-प्राध्यापकांवर हल्ले आणि तडीपार गुंड, राजकीय प्रतिष्ठा लाभलेल्या गुंडांकडून धुमाकूळ घालत दुचाकी, मोटारींच्या जाळपोळीसारख्या गुन्ह्यांनी नाशिककरांचे जीवन त्रस्त झाले होते. महिलांना तर दिवसाढवळ्या त्यांचे सौभाग्यलेणेदेखील गळ्यात घालून बाहेर पडणे मुश्कील बनले होते. इतकी असुरक्षितता आणि बेबंदशाही...
  June 2, 12:48 AM
 • अँपल या जगप्रसिद्ध कंपनीचे असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी मूळ इंडस्ट्रियल इंजिनिअर असलेलेले टीम कुक हे 2011 या आर्थिक वर्षातील अमेरिकेतील सर्वात अधिक वेतन घेणारे अधिकारी असल्याचे वॉल स्ट्रीट र्जनलच्या सर्वेक्षणात दिसून आले. तब्बल 378 लक्ष डॉलर्स इतके (2100 कोटी रुपये )वेतन गेल्या वर्षी अँपल या कंपनीकडून त्यांना देण्यात आले. टीम कुक यांनी स्टीव्ह जॉब्ज यांच्या मृत्युपूर्वी म्हणजेच ऑगस्ट 2011 मध्ये अँपल समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतली होती. टीम कुक यांना 9 लक्ष अमेरिकन...
  May 26, 03:41 AM
 • नुकतीच देशातील पहिली नागरी मोहीम एव्हरेस्टवर यशस्वीपणे समिट करून परतली आहे. या मोहिमेचे नेतृत्वही उमेश झिरपे याने केले आहे. त्यानिमित्ताने..कु ठलीही गिरीमोहीम हे एकट्याचे काम नसते. त्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आलेले असतात. ही मदतही केवळ पर्शिमांची नसते तर विशिष्ट मोहिमेसाठी आर्थिक पाठिंबा, नैतिक पाठबळ, व्यक्ती-वस्तू यांची मदत, सामाजिक मदत असे अनेक घटक एकाच वेळी काम करत असतात. गरज असते ती या सार्या सहकार्याची. एकत्र मोट बांधण्याची.. हे काम मात्र एखादाच सर्मथपणे पार पाडत असतो. संस्कृत...
  May 26, 03:38 AM
 • कविता हा ऐश्वर्यचा छंद कधीच नव्हता. आपल्या जन्माबरोबरच कविता लगडून आली असे त्याला वाटते. त्याच्याबरोबरच ती रांगली, बाळसं धरलं, जावळ उभारलं, वाढत्या वयातील कटू अनुभवांचा, हलाखीच्या परिस्थितीच्या झळाही तिने सोसल्या आणि पाचव्या इयत्तेत केलेल्या कवितेची समज या झळा सोसत मोठी होत गेली. आपल्याच अनुभवांकडे तटस्थपणे पाहताना त्या अनुभवांमधली वेदना कवितांमधून सहजपणे व्यक्त व्हायला लागली असे ऐश्वर्यला वाटते.आपल्या दु:खाचं परिचयपत्र घेऊन समाजात आपल्याला फिरावं लागत नाही ते अशा अभिव्यक्तीमधून...
  May 26, 03:33 AM
 • आपल्या देशात टेलिकॉमचे एकच सर्कल करणे, एसटीडी व रोमिंग रद्द करणे इत्यादी अनेक आव्हाने त्याचबरोबर टेलिकॉम सेवा ग्राहकाभिमुख करणे अशी अनेक महत्त्वाची कामे खुल्लर यांच्यापुढे असतील. या आव्हानांकडे खुल्लर कसा मुकाबला करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.1975 च्या आयएएस कॅडरचे असलेले खुल्लर हे एक शिस्तप्रिय व स्वच्छ अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या प्रतिमेमुळेच ट्रायच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. कारण सध्याच्या या काळात टेलिकॉम उद्योगाला कडवी शिस्त लावणाराच...
  May 19, 08:23 AM
 • चित्रपटात येण्याचे स्वप्न वगैरे घेऊन सौमित्र यांचा रुपेरी पडद्यावर प्रवेश झालेला नाही. कोलकात्याजवळ्च्या कृष्णनगर येथे 19 जानेवारी 1935 रोजी त्यांचा जन्म झाला. यथावकाश ते शिक्षणासाठी कोलकात्यात आले आणि तेथील विद्यापीठातून त्यांनी बंगाली साहित्य हा विषय घेऊन पदव्युत्तर पदवी मिळवली. साहित्याविषयी उपजत आवड असलेले सौमित्र कवितेचे विशेष चाहते आहेत. बंगाली रंगभूमीविषयीही प्रेम त्यांना आहे. शिक्षणानंतर सौमित्र यांनी आकाशवाणीवर उद्घोषक म्हणून काम सुरू केले. याच ठिकाणी त्यांना ज्येष्ठ...
  May 19, 08:20 AM
 • किल्ला बागेसमोरील रस्त्यावरून सकाळी साडेनऊच्या सुमारास 81 वर्षांचे बुजूर्ग हातात काठी घेऊन सावकाश चालताना भेटतात. गेल्या 63 वर्षांपासून त्यांचा हा अव्याहत रतीब सुरू आहे. हे आहेत हिराचंद नेमचंद वाचलनालयाचे ज्येष्ठ ग्रंथपाल किसनराव शिंदे. 160 वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या हि. ने. ला आहे. त्यापैकी साठ वर्षांच्या परंपरेचे शिंदे साक्षीदार. शिंदे वाचनालयासाठी रत्नच. त्यामुळे संचालक मंडळ त्यांना निवृत्ती देत नव्हते. वारंवार विनंती करून ते वयाच्या 76व्या वर्षी निवृत्त झाले, तरीही मंडळाने...
  May 19, 08:17 AM
 • स्वत: ते कोणत्याही पक्षाचे आपण नाही, असे म्हणत असले तरी शर्मा हे नक्षलवादी डाव्या चळवळीकडे काहीसे झुकलेले आहेत. कारण पत्रकारांनी त्यांना अपरहणाबाबत विचारले त्या वेळी ते म्हणाले की, आपण अपहरणाबाबत बोलता, पण इकडे हजारो आदिवासींना खोट्या तक्रारीत गोवून तुरुंगात डांबले आहे त्याचे काय? शर्मा हे बस्तर या आदिवासी जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी आहेत. त्यांना त्या भागातील आदिवासींच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे. ते नक्षलवाद्यांचे समर्थक असले तरी शर्मा म्हणतात, मी कोणत्याही पक्षाचा नाही....
  May 12, 03:53 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात