जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Pratima

Pratima

 • शिवाजी महाराजांचा गनिमी कावा वाचनात आला आणि पुढे याच विषयावर प्राध्यापक सतीश कदम यांनी पीएचडी केली. यादरम्यान त्यांनी युद्धभूमीवरील सैनिकांच्या गावाला भेटी देऊन त्यांच्या वंशजाकडून माहिती जमवली. शिवाजी महाराजांच्या अलौकिक कार्याने भारावलेल्या कदम यांनी आतापर्यंत 200 पेक्षा अधिक मूळ दस्तासह इतिहासाच्या महत्त्वाच्या संदर्भांचा शोध घेतला आहे. तुळजापूरच्या श्री तुळजाभवानीदेवीचा इतिहास ते लिहीत आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी, काजळा, येडशी, वाघोली ही गावे इ.स. 1728 मध्ये छत्रपती...
  May 12, 11:23 AM
 • छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी नक्षलवाद्यांना त्यांच्याकडून दोन मध्यस्थ नेमायला दिले आणि राज्य शासनाकडून सुयोग्य मिर्शा आणि निर्मला बुच या दोन माजी मुख्य सचिवांची नियुक्ती करण्यात आली. सुयोग्य मिर्शा हे छत्तीसगडचे तत्कालीन मुख्य सचिव होते, तर निर्मला बुच या 1990-92 दरम्यान भाजप राजवटीत मध्य प्रदेशच्या मुख्य सचिव होत्या. सुंदरलाल पटवा तेव्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. असो. निर्मला बुच मध्य प्रदेशच्या पहिल्यावहिल्या महिला सनदी अधिकारी. उत्तर प्रदेशच्या राहणार्या आणि...
  May 12, 10:50 AM
 • लक्ष्मी मंडईचा गजबजलेला परिसर. मंडईतूनच छोटीशी वाट मशिदीकडे जाते. येथून बाहेर पडताच डावीकडे दाल-चावलचे (वरण-भात) लहानसे दुकान दिसते. कष्टकरी वर्गातील लोक येथे लाकडी बाकड्यावर बसून पोट भरताना दिसतात. येथेच एका बाकड्यावर पांढर्या कपड्यात एक ज्येष्ठ व्यक्ती बसलेली. त्यांच्याभोवती दोन-चार जणांचा घोळका. सर्वांच्या डोक्यावर नमाजाची टोपी. त्या ज्येष्ठाच्या डोक्यावर पांढरी टोपी, नाकावर चष्मा (दोरी असलेला) आणि पांढरी शुभ्र दाढी. हे आहेत हाजी उबेदुल्ला डोणगावकर. वय वर्षे 76. लोक येत. त्यांना सलाम...
  May 5, 05:07 AM
 • महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एकशिक्षकी मराठी शाळेत शिकलेले डॉ. विजय भटकर आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त संगणकतज्ज्ञ आहेत. प्रारंभीच्या काळात अनेक प्रतिकूलतांशी संघर्ष करत त्यांनी हे यश मिळवले आहे. आपल्याला घडवण्यात आजी, आई-वडील आणि ग्रंथ यांचे मोठे योगदान असल्याचे डॉ. भटकर वारंवार सांगतात. विज्ञानावर निष्ठा ठेवून संशोधनावर भर देणार्या भटकर यांच्या व्यक्तिमत्त्वात विज्ञान आणि भारतीय अध्यात्माचा संगम झाला आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा त्यांनी विशेष अभ्यास केला असून...
  May 5, 05:01 AM
 • अजिंठा चित्रपटामध्ये गिलच्या भूमिकेसाठी फिलिप स्कॉट वालेस या ब्रिटिश तरुणाची तसेच पारोच्या भूमिकेसाठी सोनाली कुलकर्णी हिची निवड केली गेली. या चित्रपटाची थीम ही नृत्यावरदेखील आधारित असल्याने अश्विनी काळसेकर यांची नृत्य दिग्दर्शनासाठी निवड केली गेली. अश्विनी या नाशिकमधील कीर्ती कला मंदिराच्या संस्थापिका व प्रसिद्ध नृत्यांगना रेखा नाडगौडा यांची ज्येष्ठ कन्या. नाशिकमध्ये असताना त्यांनी आदिरेखासारख्या अनेक कार्यक्रमांमध्ये, पंडित गोपीकृष्ण महोत्सवामध्ये आपला कलाविष्कार सादर...
  May 5, 04:56 AM
 • नुकताच श्यामची आई या इंग्रजी नाटकाचा शुभारंभ नाशिक येथील कालिदास कलामंदिर येथे झाला.या नाटकाचे दिग्दर्शन केले होते राहुल मनोहर यांनी. श्यामची आईसारख्या गाजलेल्या मराठी नाटकास इंग्रजीत रूपांतरित करून महाराष्ट्राबाहेरदेखील पोहोचवण्याचा एक उत्तम प्रयत्न करणार्या राहुल मनोहर यांच्याविषयी...राहुल मनोहर मूळ जळगावचे. बारावीत असताना त्यांनी संगीत वर्षा हे नाटक पाहिले आणि त्यापासून प्रेरित होऊन मुळजी जेठा महाविद्यालयामध्ये त्यांनी बीए नाट्यशास्त्र पूर्ण केले. ते करीत असताना नाटक...
  April 28, 05:00 AM
 • बीबीसी न्यूज, हिंदुस्थान टाइम्स, बिझनेस स्टॅँडर्ड आदी अनेक ठिकाणी स्तंभलेखक असलेले, 20 हून अधिक गाजलेल्या अर्थविषयक पुस्तकांचे लेखक, अनेक शोधनिबंध लिहिलेले. प्रख्यात आणि परखड भारतीय अर्थतज्ज्ञ आणि भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार असलेले कौशिक बसु हे अमेरिकेत केलेल्या विधानांमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांनी त्यावर लगेच खुलासा केला पंतप्रधानांची भेटही घेतली; मात्र भारतीय आर्थिक सुधारणांवर केलेल्या तिखट प्रतिक्रियेमुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांच्या मते मीडियाने त्यांची...
  April 28, 04:56 AM
 • असं म्हणतात की लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही एकाच ठिकाणी नांदत नाहीत आणि आपल्या अवतीभोवती वावरणा-या कलाकारांकडे पाहिलं तर जवळजवळ 80 टक्के कलाकारांच्या बाबतीत ही म्हण खरी ठरल्याचे दिसून येते. कलेची समृद्धी असली तरीही आर्थिक सुबत्ता, समृद्धी असेलच असे नाही किंवा प्रसिद्धी आणि पैसा असला तरीही श्रेष्ठ दर्जाची कला असेलच याचीही शाश्वती देता येत नाही. कलाकारांची ही अडचण ओळखून नाशिकमधील वास्तुविशारद सुनील पुराणिक आणि त्यांच्या पत्नी मृगनयनी यांनी नाशिक शहरामध्ये कलाप्रेमींसाठी साधना आर्ट...
  April 20, 10:26 PM
 • रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी तीन दिवसांपूर्वी पतधोरण सादर करताना व्याज कपात करण्याच्या दृष्टीने पावले टाकली, त्या वेळी आर्थिक क्षेत्रातील अनेकांना आश्चर्य वाटले. कारण खरे तर देशाची स्थिती पाहता व्याज कपातीसाठी पूर्णत: पोषक असे वातावरण काही झालेले नव्हते. मात्र असे असूनही देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी व्याज कपातीचे धोरण अवलंबले. त्यांच्यातील अर्थतज्ज्ञ आणि कुशल प्रशासकाने हा निर्णय घेतला होता. नजीकच्या काळात त्यांचा हा निर्णय योग्य होता हे सिद्ध...
  April 20, 10:24 PM
 • डॉ. मुकुंद सबनीस हे औरंगाबादचेच स्थानिक रहिवासी. वडील सुधाकरराव सबनीस हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक होते. बारावीनंतर आयुर्वेदातच पदवी -पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे त्यांनी ठरवले होते. नांदेड येथून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयुर्वेदात दररोज नवे संशोधन झाले पाहिजे असा एक ध्यास त्यांनी घेतला. त्यातूनच बीड बायपास येथे जीवनरेखाच्या चार अत्याधुनिक अनालॅटिकल लॅब आणि अत्रेय फाउंडेशनची 2005 मध्ये स्थापना केली. जीवनरेखाची महाराष्ट्रात आणि बाहेर 28 सेंटर्स असून त्याद्वारे सुमारे 22 हजार रुग्ण...
  April 20, 10:22 PM
 • अॅपलचा मोबाइल असलेल्यांसाठी त्यांनी फोटो शेअरिंग करण्याचे सॉफ्टवेअर विकसित केले. पाहता पाहता त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळू लागला. 6 ऑक्टोबर 2010 या दिवशी मध्यरात्री त्यांनी ही साइट सुरू केली. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्याच तासात तब्बल दहा हजार जण याचे सदस्य झाले. हा दिवस आमच्या आयुष्यातील फार महत्त्वाचा होता, केव्हिन सिस्टॉर्म आपल्या आठवणी सांगताना भारावून जातो. दोन दिवसांपूर्वी सोशल नेटवर्किंगमध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या फेसबुकने तब्बल एक अब्ज डॉलर खर्च करून इन्स्टाग्राम...
  April 14, 01:38 AM
 • भारतात आयपीएलचा पाचवा सीझन मोठ्या धूमधडाक्यात सुरू झाला. सुपरस्टार अमिताभ बच्चनसह बॉलीवूडच्या अनेक ता-यांनी आयपीएलच्या उद्घाटनाला हजेरी लावली. यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते अमेरिकन पॉप स्टार कॅटी पेरीने. अवघ्या 24 वर्षांच्या या ललनेने भारतीय रसिकांची उत्सुकता बरीच चाळवली होती. कोण ही केटी? असा प्रश्न तरुणाईत विचारला जाऊ लागला. आपल्या गाण्यांनी अमेरिकेच्या पॉप जगतावर साम्राज्य गाजवणारी ही कॅटी आयपीएलच्या निमित्ताने पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आली. गीतकार, नायिका आणि गायिका अशा...
  April 6, 10:45 PM
 • राहुल गांधींना उत्तर प्रदेशच्या राजकारणात चीत करून ख-या अर्थाने आपणच उत्तर प्रदेशचे युवराज असल्याचे त्यांनी सिद्ध केले. युवा नेता अशी ओळख असणारे अखिलेश यादव मात्र मुरलेल्या नेत्याप्रमाणे निर्णय घेत आहेत. पन्नासावर खाती स्वत:कडे ठेवून सत्तेचे लोणी हळूहळू वाटू अशी भूमिका घेऊन सर्वच इच्छुकांना त्यांना आशेला लावले आहे. याचा दुसरा अर्थ असा की, सत्तेचे गणित व आपली हुकमी पाने ते इतक्यात उघड करू इच्छित नाहीत हे निश्चित. राजाभैयासारख्या वादग्रस्त मित्राला त्यांनी मंत्रिमंडळात घेऊन...
  April 6, 10:42 PM
 • रागिणीताई मूळच्या औरंगाबादच्या. वयाच्या 5-6 व्या वर्षापासून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्या सांगतात, सहावीत असताना गाणं काय असतं याची समज यायला लागली तेव्हा खरी माझी शिकायला सुरुवात झाली. वडिलांना जुनी गाणी गुणगुणायची अत्यंत आवड होती. त्यांच्याच प्रेरणेने मी शिकत गेले. पंडित बाळासाहेब बहिरगावकर यांच्याकडे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण होईस्तोवर संगीताचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीत शिक्षणही एमए आर्ट्स घेऊन पूर्ण केले व संगीतात गांधर्व महाविद्यालयातून...
  April 6, 10:37 PM
 • फॅशनची दुनिया वरून कितीही आकर्षक दिसत असली तरी प्रत्यक्षात तेथे मार्गक्रमण करू इच्छिणा-यांची वाट ब-याचदा काट्यांनी भरलेली असते. त्यातही स्ट्रगलर्ससाठी तर हे क्षेत्र आव्हानांनी भरलेले असते. तथापि, या क्षेत्रात अल्पावधीत पाय रोवत नाशिकच्या अदिती गीध हिने डस्की आणि ब्युटीफूल लूकच्या बिपाशा बसूसाठी ड्रेस डिझाइन करण्याची किमया साध्य केली आहे. एवढेच नव्हे तर आघाडीची फॅशन डिझायनर नीता लुल्लासोबत काम करण्याच्या संधीचे सोने करत चित्रपट तसेच लॅक्मे फॅशन वीकमध्येही योगदान देण्यापर्यंत मजल...
  March 23, 11:37 PM
 • लखनऊ काल्का - बिंदादीन घराण्याची कथ्थक नृत्याची लखलखती परंपरा लाभलेले महाराजजी कथ्थक नृत्याचा चालताबोलता कोश आहेत. स्वत: उत्कृष्ट नर्तक असणारे पं. बिरजू महाराजजी एक संकीर्ण कलाकार आहेत, असे म्हटले पाहिजे. ते नृत्यप्रवीण आहेत, एवढेच नव्हे तर उत्कृष्ट पखवाजवादक आहेत, प्रतिभावंत रचनाकार आहेत, उत्तम गायक आहेत, पढतकार आहेत. चित्रकला, शिल्पकला यातही ते अवगाहन करू शकतात. त्यामुळे महाराजजींचे कलाव्यक्तित्त्व सर्वांगपरिपूर्ण बनले आहे. महाराजजी आज 74 वर्षांचे आहेत, पण त्यांच्या प्रस्तुतीत...
  March 23, 11:32 PM
 • वाचकांना आठवत नसेलही, परंतु ममतादीदी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ झाल्यावर 11 जुलै 2011 रोजी त्यांच्या जागी रेल्वेमंत्रिपदी मुकुल रॉय यांची नियुक्ती झाली होती. रॉय यांचा शपथविधी झाल्यानंतर लगेचच आसाममध्ये गुवाहाटी-पुरी एक्स्प्रेसला झालेल्या अपघातस्थळाची पाहणी करण्यास जाण्याचे आदेश त्यांना पंतप्रधानांनी दिले. मात्र, पंतप्रधानांचा हा आदेश धुडकावून रॉय यांनी घटनास्थळी जाण्यास नकार दिला. याचा परिणाम असा झाला की, त्यांना दुस-याच दिवशी पंतप्रधानांनी मंत्रिमंडळातून डच्चू दिला...
  March 23, 11:26 PM
 • उकिरड्यावर विष्ठा खात बसलेला एक मनोरुग्ण बघून हेलवलेल्या या दांपत्यानं कार्य, तेही खडतर समाजकार्य करण्याच्या वेडाच्या भरात या वंचित गटासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. सुरुवात केली अन्नपूर्णा प्रकल्पापासून. यामध्ये रस्त्यावरच शक्य होईल तितक्या लोकांना जेवण देणे हा उद्देश. अहमदनगर-शिर्डी महामार्गावर साईबाबांच्या दर्शनासाठी जाणा-या-येणा-यांची प्रचंड गर्दी असते. या महामार्गावर खूप वेळा अशी माणसे येतात किंवा आणून सोडली जातात. बेभानपणे चालतच राहणा-या या माणसांना जेवण दिलं तरी ती...
  March 17, 01:54 AM
 • धनंजय खाडे हे मूळचे विदर्भातील अकोल्याचे... नागपूर येथे कमर्शियल आर्ट्सची पदवी प्राप्त केल्यानंतर मुंबईला काही काळ खासगी कंपनीत नोकरी केली. सुमारे 27 वर्षांपूर्वी व्यवसायाच्या निमित्ताने ते औरंगाबादेत आले. अमेय ग्राफिक्स ही जाहिरात संस्था काढली. त्यातून कंपन्यांची माहितीपत्रके, विविध प्रकारचे फोल्डर्स बनवणे, तसेच वृतपत्रांतून जाहिरातीचे आर्टवर्क बनवणे अशी कामे केली. यात नाव, पैसा, व्यावसायिक यश मिळाल्याचे समाधान खाडेंना लाभले. 56 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर, त्यांच्या...
  March 17, 01:47 AM
 • पर्यावरणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील क्षेत्रात दीर्घकाळ सकारात्मक कार्य करणा-या धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून सुनीता नारायण परिचित आहेत. पर्यावरणाशी आणि परंपरागत जीवनशैलीशी सुसंगत असा विकासच ग्रामीण भारताचा चेहरामोहरा उजळून टाकेल हा सिद्धांत सुनीता यांनी मांडला असून त्याला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. सुनीता यांच्या पर्यावरण क्षेत्रातील कारकीर्दीची सुरुवात पर्यावरण अहवाल, वन व्यवस्थापनातील अडचणी, समस्या समजून घेण्यापासून झाली. हे काम करत असतानाच नैसर्गिक...
  March 17, 01:43 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात