जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Pratima

Pratima

 • कलाविष्कार आणि कल्पकता यांच्या समीकरणाने बनलेली डिझाइनिंग ही शाखा. या शाखेतील विद्यार्थी चित्रकलेमध्ये प्रवीण असतातच त्याचबरोबर त्या माध्यमाचा वापर करून एखादी वस्तू प्रत्यक्ष वापरात आणण्यासाठीदेखील त्या वस्तूचे डिझाइन करण्यात पारंगत असतात. नाशिकचा चैतन्य वर्मा हा डिझाइन शाखेचा विद्यार्थी. म.वि.प्र.समाजाच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये तृतीय वर्षात तो सध्या शिकत आहे. लहान वयातच त्याने आपल्या हटके दृष्टिकोनाने आणि कल्पक बुद्धिमत्तेने 100 हून अधिक पुरस्कार मिळवले आहेत. काही...
  January 14, 12:40 AM
 • त्रिनिदाद व टोबॅगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि मूळ भारतीय वंशाच्या कमला प्रसाद बिसेसर या अलीकडेच देशात झालेल्या प्रवासी भारतीय परिषदेसाठी प्रमुख पाहुण्या म्हणून देशात आल्या होत्या. कमला प्रसाद या जुन्या कागदपत्रावरून बिहारची कन्या असल्याचे आढळले आहे. या वेळच्या भारत भेटीत त्यांनी आपल्या मागच्या पिढीतील लोकांच्या येथील वास्तव्याचा आढावा घेतला. त्यांनी भारताशी आपले असलेले नाते जाणून घेण्यासाठी त्रिनिदादचे पुरातत्त्व संशोधक शम्सुद्दिन यांची खास नियुक्ती केली होती. कमला...
  January 14, 12:35 AM
 • बांगलादेश युद्धासह अनेक युद्धे व लष्करी मोहिमांत सहभागी झालेले 1971 ला 12 इन्फंट्री डिव्हिजनचे प्रमुख म्हणून लष्करात सेवेचा प्रारंभ करणारे 40 वर्षे सेवा बजावणारे तसेच निशान-ए-पाकिस्तान या पाकच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवलेले 59 वर्षीय जनरल अश्फाक परवेझ कयानी हे पाकिस्तानचे लष्करप्रमुख व सर्वेसर्वा आहेत. शांत डोक्याने राजकारण खेळणारा लष्करप्रमुख वा लष्करी गणवेशातील राजकारणी, अशी त्यांची ओळख इस्लामाबादेत आहे. पंजाब प्रांताच्या गुजरखान तालुक्यामध्ये 1952 मध्ये जन्म झालेले कयानी हे...
  January 14, 12:30 AM
 • डॉ. संगीता पेठकर या मूळच्या औरंगाबाद येथल्या. वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांनी भरतनाट्यमचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. आई-वडिलांनी त्यांच्यातील नृत्याचे गुण ओळखूनच त्यांना भरतनाट्यमच्या क्लासला घातले होते. पुढे त्यांना उडिसी नृत्याच्या एका कार्यशाळेत सहभाग घेण्याची संधी मिळाली आणि भरतनाट्यमबरोबरच आपण उडिसी नृत्यदेखील आत्मसात करू शकतो अशी त्यांची धारणा पक्की झाली. त्यांच्या सुदैवाने लवकरच महागामी अकादमी औरंगाबादमध्ये स्थापन झाली आणि त्यांचा उडिसी नृत्याचा प्रवासही सुरू...
  January 6, 10:06 PM
 • स्वीटीला लहानपणापासूनच गणित व विज्ञान या विषयात आवड. देशभरातील फर्टिलायर्स कंपन्यांसाठी पॉलिथीन बॅग तयार करणारे तिचे वडील, प्रकाश पाटे यांनी तिच्या या आवडीला बळ दिले. डॉक्टर किंवा इंजिनिअर बनण्यापेक्षा काही तरी वेगळ्या क्षेत्रात जावे, हे लहानपणापासूनच तिच्या मनावर रुजत गेले. लहानपणीच गणितातील व विज्ञानातील विविध शोध कसे लागले, त्याच्यातील मूळ कल्पना कशी झाली व त्यातून मुख्य शोध कसा लागला हे व्यवस्थित समजण्यासाठी वडिलांनी स्वीटी आणि तिच्या लहान भावाला बंगलोर येथील विश्वेश्वरय्या...
  January 6, 10:05 PM
 • 1955- 56 चे वर्ष होते ते भाषावार प्रांतरचनेमुळे कै. पोहनेरकर, कै. भगवंतराव देशमुख, कै. अनंत भालेराव इ. साहित्यिक मंडळी औरंगाबादला स्थायिक होणार होती आणि मराठवाडा साहित्य परिषदेची एक शाखा आता औरंगाबादला उघडणार होती. निरोप घेताना कै. पोहनेरकर म्हणाले, दत्तोबा, ही मराठवाडा साहित्य परिषदेच्या मराठी मंडळाची निम्मी पुस्तके औरंगाबादच्या परिषदेसाठी नेत आहे. त्याची ही यादी. यात पोथ्यांची नावे, ही पुस्तकांच्या नावांची यादी तुझ्याजवळ राहू दे..., पण... गुरुजी ... ही एवढी मोठी तुमची परिषद मी कसं काय सांभाळेन...,...
  January 6, 10:02 PM
 • केरळातील पालघाट या लहान शहरात 1932 मध्ये त्यांचा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन हे त्यांचे शालेय मित्र. या दोघांमध्ये शाळेत असताना मार्क्स मिळविण्याची जोरदार स्पर्धा असे, परंतु या स्पर्धेत श्रीधरन यांचीच सरशी होई. सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर ते 1954 मध्ये भारतीय रेल्वेत दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी काही काळ कोझिकोडे येथील शासकीय तंत्रनिकेतनात लेक्चरर म्हणून व नंतर काही काळ मुंबई पोर्ट्र ट्रस्टमध्ये नोकरी केली. मात्र नंतर ते रेल्वेत दाखल...
  January 6, 10:01 PM
 • ब्रिटनच्या राजघराण्याकडून एखाद्या व्यक्तीची दखल घेण्याची शाही पद्धत म्हणजे नाइटहूडचा सन्मान. यंदाच्या यादीत सर व्यतिरिक्त जी स्थानिक पातळीवरील यादी प्रसिद्ध झाली त्यात भारतीय वंशाचे दहा व्यक्ती आहेत. यात सुरजित यांचे नाव ठळक अक्षरात नोंदवले गेले आहे. पंजाबच्या घुमान या छोट्या गावात जन्मलेले सुरजित वयाच्या तेराव्या वर्षी ब्रिटनमध्ये आले. त्यानंतर शिक्षण, परदेशी संस्कृतीशी जुळवून घेताना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी आपल्या नावावर नोंदवली व तेव्हा प्रकाशझोतात...
  January 6, 10:00 PM
 • निर्मलदादा म्हणजे प्रचंड उत्साहाचा अखंड वाहणारा खळाळता झरा...! आजही 78 वर्षे वयातही ते दररोज पहाटे 4 ते रात्रीच्या 9 पर्यंत काम करतात, असे त्यांच्या शाळेतील शिक्षकांकडून ऐकल्यानंतर मन थक्क होऊन जाते. दादा मात्र हे कौतुक हनुवटीखाली दोन्ही हाताचे पंजे दुमडून बसत तीन ते चार वर्षे वयाच्या मुलांसारखे ऐकत राहतात. दादांमध्ये कायमचे एका निरागस लहान मुलांचे मन दडलेले आहे. बालपणापासूनच दादांचे जीवन मनाला चटका लावणारे आहे. अवघ्या दोन वर्षांचे असताना वडिलांचे छत्र हरपले. आई कृष्णाताई ग्यानानी या...
  January 6, 09:58 PM
 • एकीकडे सोशल नेटवर्किंगचे व्यसन लागलेली तरुणाई आणि दुस-या बाजूला याच माध्यमातून वाढती सायबर गुन्हेगारी अशी परिस्थिती असताना शिक्षण क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइट्स म्हणजे निव्वळ टाइमपासच असणार हे नक्की .. असंच काहीसं मत आजघडीला एका नामांकित आयटी शिक्षण संस्थेचे संचालक असलेल्या प्रमोद यांचंदेखील होतं. अर्थात त्यांची पार्श्वभूमी मात्र ग्रामीण आहे. धुळ्यासारख्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊनही आज या क्षेत्रात घट्ट पाय रोवलेल्या प्रमोद...
  December 30, 09:43 PM
 • औरंगाबाद येथील आशिष गोखले यांचे शिक्षण बी.ई इलेक्ट्रिकल झाले आहे. त्यांचा या क्षेत्राशी निगडित व्यवसायदेखील आहे. मात्र, काहीतरी वेगळे करण्याची गोखले यांना इच्छा असल्याने त्यांनी छंद म्हणून वेगवेगळ्या प्रकारची शिल्पे तयार करण्यास सुरुवात केली. गत पंधरा वर्षांपासून गोखले यांनी जवळपास 450 कलाकृती तयार केल्या आहेत. त्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन हे कलाग्राम संग्रहालयात आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाले आहे. शहरातील रामा इंटरनॅशल येथे गोखले यांनी तयार केलेली व वेगवेगळ्या आकारांतील दर्जेदार...
  December 30, 09:41 PM
 • बुलडाणा जिल्ह्यातील धाड या गावी शालेय शिक्षण पूर्ण झाले. वडील शेतमजूर. त्यामुळे शाळेत शिकतानाही शेतात सहा आणे रोजाने मजुरी करावी लागली. महाविद्यालयात शिकत असताना गुलमंडीवरील कामाक्षी हॉटेलमध्ये नोकरी केली. मात्र, दहावीला 74 टक्के गुण मिळाल्याने नोकरीच्या संधीही मिळत गेल्या. 1978 दरम्यान आकाशवाणी, पोस्ट तसेच दूरसंचार खात्यामध्ये नोकरी मिळाली. पुढे 3 जून 1983 मध्ये औरंगाबादच्या एमएसईबी कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती झाली; पण अवघ्या सात दिवसांत त्यांची बदली भांडूपला झाली अन्...
  December 30, 09:40 PM
 • जन्मजात सोन्याचा (किंवा त्याहून महाग असलेला कोणत्याही धातूचा) चमचा तोंडात घेऊन आलेले सौदी राजपुत्र वाहीद बिन तलाल यांचा जन्म सौदी अरेबियातला असला तरी त्यांचे सर्व उच्च शिक्षण अमेरिकेतच झाले. किंगडम होल्डिंग कॉर्पोरेशन ही त्यांची गुंतवणूक कंपनी असून या कंपनीच्या मार्फत ते जगभरातील आपली सर्व गुंतवणूक करतात. अशा प्रकारे जगभरातील अनेक कंपन्यांत अब्जावधी रुपयांची गुंतवणूक असलेल्या किंगडम होल्डिंग या कंपनीची 2007 मध्ये सौदीतील शेअर बाजारात नोंद करण्यात आली. या राजपुत्राचा जन्म 1955 मध्ये...
  December 30, 09:38 PM
 • गेली चाळीसहून अधिक वर्षे सई परांजपे विविध माध्यमांतून सहजतेने वावरत आल्या आहेत. लेखन, दिग्दर्शन, निर्मितीची सर्व क्षेत्रे त्यांनी अजमावली आहेत. प्रख्यात गणितज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ रँग्लर परांजपे यांचा वस्तुनिष्ठ विचारांचा वारसा लाभलेल्या सई परांजपे नित्य नव्या कल्पना नाटक, चित्रपट, मालिकांतून मांडत आल्या आहेत. लेखन, दिग्दर्शन, निर्मिती या सर्व जबाबदा-या समर्थपणे सांभाळत असतानाच लोकप्रियतेचे गणितही सई यांनी कुशलतेने सोडवले आहे याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. माध्यमाची बलस्थाने...
  December 30, 09:35 PM
 • कलेचा वारसा चालणा-या कलावंतांची दीर्घ परंपरा मराठी कलाविश्वात आहे. नाटक, चित्रपट, गायन, वादन, नृत्य अशा विविध कलाक्षेत्रांत दोन वा तीन पिढ्यांचे सादरीकरण रसिकांनी अनुभवले आहे. डॉ. नेहा देशपांडे यांच्या रूपाने या परंपरेत एक वेगळे नाव नव्याने जोडले गेले आहे. डॉ. नेहा या ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या नात आहेत. पुलंचे बंधू उमाकांत देशपांडे यांच्या मुलाची त्या कन्या आहेत. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे डॉ. नेहा या गोळाबेरीज नावाच्या चित्रपटात आपल्या आजीची म्हणजे सुनीताबाई देशपांडे...
  December 23, 10:15 PM
 • ऑस्कर पिस्टोरिअस हा दोन्ही पायांनी अधू असलेला दक्षिण आफ्रिकेचा धावपटू काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये कृत्रिम पायानिशी धावला आणि तो जगातला पहिला ब्लेड रनर म्हणून ओळखला गेला. देवेंद्र पाल सिंग हे भारतीय लष्करातील डोग्रा रेजिमेंटमध्ये मेजर होते. 1999 मधील कारगिल युद्धात ते जखमी झाले. मेजर देवेंद्र पाल सिंग सांगतात, 15 जुलै 1999 या दिवशी आमची डोंग्रा रेजिमेंट कारगिलच्या अतिशय संवेदनशील ठिकाणी होती. आम्ही शत्रूच्या मॉर्टरच्या रेंजमध्ये होतो. तुफानी धुमश्चक्री सुरू...
  December 23, 10:08 PM
 • आयआयटी खरकपूर येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले अजितसिंग हे खरे तर अपघाताने राजकारणात आले, कारण आपले शिक्षण पूर्ण केल्यावर ते तब्बल 15 वर्षे अमेरिकेत नोकरी करीत होते आणि तेथेच स्थायिक होण्याचे त्यांनी जवळजवळ निश्चित केले होते. मात्र, चौधरी चरणसिंग यांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात उतरण्याचे ठरवले आणि ते त्यात यशस्वीही झाले. वडिलांप्रमाणे अजितसिंग हेदेखील जाट समाजाचे नेते म्हणून आज उत्तरप्रदेशात ओळखले जातात. संपूर्ण उत्तरप्रदेशात सुमारे सात टक्के आणि उत्तरप्रदेशाच्या पश्चिम...
  December 23, 09:55 PM
 • मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे भाजपचे (किंवा बिगर काँग्रेस) पहिले मुख्यमंत्री झाले आहेत, ज्यांनी सलग सहा वष्रे मुख्यमंत्रिपदावर राहून राज्याच्या इतिहासात स्वत:चे नाव कोरले. शिवराजसिंह हे प्रमोद महाजन यांचे अनुयायी मानले जायचे. त्यांना नोव्हेंबर 2005 मध्ये मुख्यमंत्री बनवले तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटले होते.देशाच्या हृदयस्थानी सर्वात मोठय़ा भूभागावर वसलेल्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे देशात एक वेगळेच महत्त्व असते. नेहरूंच्या काळापासून (तेव्हा डी. पी. मिर्शा हे वजनदार...
  December 17, 04:16 AM
 • झरदारींची सुरुवातीची राजकीय कारकीर्दही अपयशीच होती. कराचीसह सिंध प्रांतात झरदारी परिवाराची हजारो एकर जमीन आहे. पण नवाबशहा शहराच्या नगरपालिका निवडणुकीत झरदारी सपशेल आपटले होते. त्यांच्या आयुष्यात भरभराट झाली ती बेनझीर भुत्तोसोबत निकाह झाल्यानंतरच..राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारींची पाकिस्तानात मिस्टर टेन पर्सेंट आणि दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे पती हीच ओळख. बेगम पंतप्रधान असताना प्रत्येक सरकारी कंत्राटामध्ये झरदारींचे दहा टक्के कमिशन पक्के होते. त्यामुळे आजही...
  December 17, 04:07 AM
 • पडद्यावर अंगप्रदर्शन करणारी विद्या काही पहिली नायिका नाही. मात्र अंगप्रदर्शनातही एक कलात्मकता असते हे तिने दाखवून दिले. केवळ तिच्या एकटीच्या बळावर डर्टी पिक्चर तिकीट खिडकीवर यशाचे मजले गाठत आहे. बर्याच वर्षांनंतर केवळ एखाद्या नायिकेच्या खांद्यावर एखाद्या चित्रपटाने यशाचा झेंडा रोवला आहे.एकता कपूरच्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या हम पांच मालिकेतून अभिनेत्री विद्या बालनने कॅमेर्यासमोर पदार्पण केले होते. आता एकता कपूरच्याच डर्टी पिक्चरमुळे ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. सध्या...
  December 17, 04:04 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात