जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Pratima

Pratima

 • नोकरी - व्यवसाय सर्वच जण करतात; पण या नोकरीचा किंवा व्यवसायाचा खरा लाभ गरजू, शेतात काबाडकष्ट करणार्या शेतकरी-शेतमजुरांना झाला पाहिजे अशी धारणा असलेल्या व्यक्ती विरळाच असतात. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहण्याची त्यांची वृत्ती असते. अशा व्यक्तिमत्त्वांपैकीच औरंगाबादेतील एक डॉक्टर दांपत्य विजय आणि क्षमा पांगरेकर हे आहे. चेतनानगरातील एका लहानशा जागेत सेवानिवृत्तीनंतर डॉ. क्षमा या कन्सल्टिंग चालवतात. रुग्णांची खर्या अर्थाने नाममात्र शुल्क घेऊन त्या सेवाच करत आहेत. तर डॉक्टर विजय...
  December 17, 04:01 AM
 • वैद्यकीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावणा-या अनिरुद्ध धर्माधिकारी यांची पार्श्वभूमी मात्र ग्रामीण आहे. नाशिकजवळच्या ओझर येथे त्यांचे बालपण गेले. वडील विलास धर्माधिकारी हे परिसरातले प्रख्यात डॉक्टर असल्याने वैद्यकीय क्षेत्र त्यांच्या दृष्टीने नवीन नव्हते. बारावीपर्यंतचे शिक्षण ओझरमध्ये झाल्यावर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी त्यांनी पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला. तेथे एम.डी. केल्यावर वर्षभर लेक्चरर म्हणून जबाबदारी सांभाळली. तेथून कार्डिओलॉजीसाठी मुंबईत...
  December 9, 11:33 PM
 • डॉ. स्मिता खळीकर या औरंगाबादच्या शासकीय दंत महाविद्यालयात कृत्रिम दंतशास्त्र विषयाच्या ज्येष्ठ सहायक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. दुबईत झालेल्या परिषदेत त्यांनी सहभाग घेतला होता. या परिषदेत देश-विदेशातील सुमारे साडेसहाशे कृत्रिम दंतविशेषज्ञांनी सहभाग घेतला होता. कृत्रिम दंतशास्त्र शाखेत दातांना शक्य तेवढ्या नैसर्गिक रंगछटा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी आवश्यक त्या शेड ची निवड हे दंतवैद्यापुढील मोठे आव्हान असते हे संशोधनांती सिद्ध झाले आहे. याच संदर्भातील...
  December 9, 11:30 PM
 • राज्य सरकारने तडकाफडकी त्यांची पाटण्याहून अररिया येथे बदली केल्यामुळे पाटण्यातील नागरिक कमालीचे चिडले आहेत. दुसरीकडे सरकारी कर्मचा-याची बदली रद्द करावी म्हणून उत्स्फूर्तपणे होणारी जनआंदोलने असे विरोधाभासाचे चित्र बिहारमध्ये दिसत आहे. जनतेच्या मनात हीरो ठरलेला हा पोलिस अधिकारी मराठी मातीतील आहे. मराठमोळा शिवदीप लांडे पाटण्यातील जनतेला आपला तारणहार असल्याचे वाटत होते. याच नागरिकांनी त्याला खराखुरा दबंग मानले. त्याच्यावर जीव ओवाळला. अवघ्या दहा महिन्यांत शिवदीप यांनी हेवा वाटावा...
  December 9, 11:27 PM
 • अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या जागतिक पातळीवरील बुद्धिवंतांच्या 100 जणांच्या यादीत नामवंत उद्योगपती अझीम प्रेमजी यांचा समावेश झाला. बौद्धिक संपत्तीच्या जिवावर विप्रो लि. ही देशातील तिस-या क्रमांकाची आय. टी. कंपनी उभारणा-या अझीम प्रेमजी यांचा झालेला हा गौरव यथोचितच म्हटला पाहिजे. प्रेमजी हे काही पहिल्या पिढीतील उद्योजक नव्हेत. त्यांचे वडीलही उद्योजक होते. त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या विप्रो या कंपनीचे रूपांतर त्यांनी एका वटवृक्षात करून बौद्धिक संपत्तीच्या जिवावर कशा प्रकारे...
  December 9, 11:18 PM
 • मराठी रंगभूमीने सुमारे दीडशे वर्षांच्या काळात अनेक टप्पे अनुभवले. त्यातील काही टप्पे गौरवाचे, अभिमानाचे, तर काही वैफल्याचे, निराशेचे होते. बोलपटांच्या आगमनानंतर म्हणजे 1932 नंतर रंगभूमीला झपाट्याने उतरती कळा लागली. एक नवे माध्यम दाखल झाल्याने रंगभूमीवरील दिग्गजही या नव्या माध्यमाकडे काही काळ ओढले गेले होते. याच सुमारास नाट्यपंढरी सांगलीतल्या किर्लोस्करवाडीत सुविद्य कुटुंबात श्रीकांत मोघे यांचा जन्म झाला. शालेय जीवनापासून नाटकाची ओढ जपलेल्या श्रीकांतजींचे शालेय शिक्षण...
  December 9, 11:13 PM
 • अखेर मोठ्या लढाईनंतर कॅनडाच्या सरकारने घटनादुरुस्ती करून शिखांना पगडी घालण्याचा अधिकार बहाल केला. ही लढाई जिंकण्याचा बहुमान जातो तो कॅनडाच्या पोलिस दलात कार्यरत असणारे बलतेजसिंग धिल्लन या अधिका-यास. सनदशीर मार्गाने परकीय भूमीवर स्वाभिमान आणि आत्मसन्मान कसा राखता येऊ शकतो, याचा वस्तुपाठ त्यांनी जगापुढे घालून दिला. बलतेज धिल्लन कॅनडाच्या रॉयल कॅनडियन माउन्टेड पोलिस दलात गेली दोन दशके कार्यरत आहेत. ते 1983 मध्ये कॅनडाला स्थलांतरित झाले. एका शेतावर ब्ल्यू बेरीज नावाची फळे वेचण्याचे...
  December 3, 03:10 AM
 • भुजंग बाबडे यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील उदगीर या गावी 2 मे 1983 रोजी झाला. त्यांचे वडील रामराव प्रल्हाद बोबडे हे लातूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष होते. भुजंग बोबडे लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लालबहादूर शास्त्री विद्यालयात झाले. दहावीच्या वर्गात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शिवाजी महाविद्यालयातून त्यांनी 12 वी सायन्सचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा महाविद्यालयात दुसरा क्रमांक आला. पुढील शिक्षणासाठी त्यांनी लातूर जिल्ह्यातील निलंगा या...
  December 3, 03:06 AM
 • नाशिकजवळील महिरावणीसारख्या लहानशा खेड्यात जन्मलेल्या सुनील यांनी शालेय शिक्षण पूर्ण करून इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण झाल्याने महाविद्यालयात शिकताना होणारा इंग्रजीचा वापर सतत पेचप्रसंग उभे करी. इंजिनिअरिंगमधील तांत्रिक शब्द सारखे सारखे अडू लागले. अमुक एका शब्दाला मराठीत काय म्हणतात अशी सतत शब्दांची भूक लागायला सुरुवात झाली आणि मग सुरू झाला एक शोध. अभ्यासाबरोबरच भाषेचा ..इंग्रजी शब्द अडला की त्याला पर्यायी मराठी शब्द शोधायचा आणि एका वहीत तो...
  December 3, 03:02 AM
 • साबीर भाटिया या महान संशोधकाने आता जगाला एक नवी भेट दिली आहे. ही भेट आहे मोफत एस.एम.एस. सेवा देण्याच्या नव्या सॉफ्टवेअरची. एकदा का तुम्ही हे सॉफ्टवेअर तुमच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड केलेत की, तुम्ही जगात कोठेही एस.एम.एस. मोफत करू शकता. ही प्रणाली पत्रकारांना समाजावून सांगण्यासाठी गेल्याच आठवड्यात साबीर भाटिया मुंबईत येऊन गेले. साबीर भाटिया यांचा जन्म 1969 मध्ये चंदिगडमध्ये एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील लष्करात अधिकारी होते आणि आई सेंट्रल बँकेत नोकरीला होती. त्यांचे सुरुवातीचे...
  December 3, 02:59 AM
 • इला भट सेल्फ एम्लॉयड वुमेन्स असोसिएशन(सेवा) या महिलांच्या सक्षमीकरणाकरिता स्थापन झालेल्या संस्थेच्या संस्थापक आहेत. या पुरस्काराच्या निवड समिती अध्यक्ष डॉ. मनमोहन सिंग आहेत. इला भट यांचा जन्म 1933 साली अहमदाबाद येथे झाला. गांधीच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर प्रथमपासूनच होता. वडिलांप्रमाणे त्यांनीदेखील कायद्याचे शिक्षण घेतले व हिंदू लॉ मध्ये सुवर्णपदक मिळवून 1954 साली त्या वकील झाल्या. त्यानंतर अहमदाबादमधील टेक्सटाइल लेबर असोसिएशनमध्ये प्रवेश केला. त्या काळात टेक्सटाइल...
  December 3, 02:58 AM
 • बुधवारी सायंकाळी ज्या वेळी रतन टाटा यांचे वारस म्हणून सायरस मिस्त्री यांचे नाव जाहीर झाले त्या वेळी अनेकांना आश्चर्य वाटले. कारण शापूरजी पालोनजी समूहाचे 43 वर्षीय व्यवस्थापकीय संचालक असलेल्या सायरस मिस्त्री यांचे नाव रतन टाटांचे वारसदार म्हणून कधीच चर्चेतही नव्हते. सुमारे 15 हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेला समूह सांभाळणारे मिस्त्री कधीही प्रसिद्धीच्या झोतात येत नाहीत. ते कधी पेज थ्रीच्या ग्लॅमरस कॉकटेल पार्ट्यांनाही हजर राहणे पसंत करीत नाहीत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला...
  November 26, 07:56 AM
 • अनेक वर्षे महिला हॉकीमध्ये विघा स्टोक्सचे (हिमाचल प्रदेश) नाव चमकायचे, मग अर्र्नवाझ दमानिया (पुणे) या महाराष्ट्राच्या हॉकी संघटनेच्या अध्यक्षा झाल्या; परंतु राष्ट्रीय व राज्य पातळीवर महिला संघटक एकूणच बोटावर मोजण्याएवढ्याच आहेत. महिलासुद्धा चांगल्या क्रीडा संघटक असू शकतात हे या महिन्याच्या सुरुवातीस म. प्र. मध्ये झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर खो-खो स्पर्धेमुळे क्रीडा जगताच्या समोर आले ते माजी केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन यांच्या देखण्या संघटनकौशल्यामुळे. इंदूरच्या अत्यंत...
  November 26, 07:51 AM
 • अब्दुल सत्तार यांनी गेल्या वीस वर्षांत जवळपास हजारहून अधिक लोकांचे प्राण या ठिकाणांवरून वाचवले आहेत. अब्दुल सत्तार हे काही प्रोफेशनल डायव्हर नाहीत. त्यांचे बालपण हे यमुना नदीच्या जवळच असलेल्या जगतपूर या गावात गेले. या कामामध्ये अब्दुल सत्तार यांना इतरांच्या आयुष्यासाठी स्वत:च्या आयुष्याबरोबर खेळावे लागते. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अब्दुल सत्तार सांगतात, पावसाळ्याचे दिवस होते. नुकताच मी विडी शिलगावून निवांतपणे दुपारच्या उन्हात पुलाकडे पाहत बसलो होतो. इतक्यात एक लाल रंगाची...
  November 26, 07:44 AM
 • नागरी सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले माळोदे त्यादृष्टीने तयारी करत होते आणि त्यांना मुळातच विज्ञानाची आवड होती. याकरिता एमएस्सी मॅथ्सबरोबरच त्यांचा एमए इतिहासाचा अभ्यासदेखील सुरू होता. रेडिओ या माध्यमाचे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत होते आणि नवनवीन तंत्रज्ञानाने रेडिओमध्ये बदल होत होते. 1990 मध्ये ऑल इंडिया रेडिओमध्ये एफएम सुरू झाले आणि रेडिओने एका नव्या बदलाचे आव्हान स्वीकारले. या सर्व क्षणांचे माळोदे साक्षीदार ठरले. 1996 मध्ये ऑल इंडिया रेडिओवरून दर गुरुवारी प्रभात किरण हा...
  November 26, 07:40 AM
 • मुंबई - इटलीची अर्थव्यवस्था सध्या अगदी रसातळाला गेली असून त्यामुळे संपूर्ण युरोपावर संकट आले आहे. माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांचा अशा आर्थिक स्थितीतही काही रंगेलपणा कमी झाला नव्हता. त्यांना असे वाटत होते की, इटलीला वाचवणे हे संपूर्ण युरोपियन समुदायाचे कामच आहे आणि आपल्याला आर्थिक मदत ते देणार असल्याने आपण निश्चिंत राहू. मात्र, शेवटी इटलीची आर्थिक स्थिती बिघडत गेली आणि त्यांना राजीनामा द्यावाच लागला. शेवटी अर्थशास्त्रज्ञ आणि विश्लेषक असलेले 68 वर्षीय मारियो माँटी यांची...
  November 26, 07:36 AM
 • परभणी- गुलाबाच्या फुलासारखं व्यक्तिमत्त्व, गोल चेहरा, रस्त्याने गाडी जाताना लोक आदराने त्यांच्याकडे बघायचे. त्यांची गाडीतून उतरण्याची लकब, सभास्थानी जाताना त्यांची पावलं अशी रुबाबदार पडायची की, नवख्या माणसाला वाटायचं हे पोलिस संचालक. मात्र, रावसाहेब होते मुरब्बी राजकारणी. त्यांची जनतेशी जवळीक होती. अंगावर खादीचे कपडे, पांढरीशुभ्र पँट, रेशमी पिवळा शर्ट हा त्यांचा ड्रेस कोड. दरवर्षी गाडीचं नवं कोरं मॉडेल. रावसाहेब एक चोखंदळ रसिक होते. रावसाहेब वक्ते नव्हते, तर नेते होते. मोजकं पण...
  November 19, 02:25 PM
 • नाशिक- अगदी लहानपणापासूनच कीर्तींना नृत्याची आवड होती. घरातूनदेखील कलेशी निगडित असे वातावरण होते. आई स्वत: संगीत विशारद आणि वडील नोकरीबरोबरच नाटकातून अभिनय करायचे. प्रकाशयोजना, दिग्दर्शनदेखील करायचे. मामा उत्कृष्ट तबला, ढोलकीवादक म्हणून सुपरिचित होते. अशा अभिरुचीसंपन्न वातावरणात कीर्तींवर आपोआपच कलेचे संस्कार होत होते.कोणीतरी मैत्रीण नृत्याच्या क्लासला जाते म्हणून कीर्तीदेखील तिच्याबरोबर जायला लागल्या. रेखा नाडगौडा यांच्याकडे त्यांनी वीस वर्षांपासून नृत्याचे धडे गिरवले. अखिल...
  November 19, 02:20 PM
 • मुंबई- देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा समावेश आता फोर्ब्सच्या यादीत झाला आहे. ओ.पी. जिंदाल या उद्योगपींच्या त्या पत्नी. जिंदाल यांचे 2005 मध्ये हेलिकॉप्टरच्या अपघातात निधन झाल्यावर जिंदाल समूहाची सर्व सूत्रे त्यांच्याकडे आली. 60 वर्षीय सावित्री जिंदाल या जिंदाल समूहाच्या आता अध्यक्षा आहेत.20 मार्च 1950 मध्ये आसाममध्ये जन्मलेल्या सावित्रीबाईंचे लग्न जिंदाल यांच्याशी झाल्यावर त्या हरियाणातील हिस्सार येथे राहावयास आल्या. त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झालेले असले तरी...
  November 19, 02:14 PM
 • औरंगाबाद- व्यावसायिक आनंदकुमार आणि पुष्पलता लोया या दांपत्यास दोन मुली. मोठी डॉ. निशिगंधा आणि दुसरी क्षमा. क्षमाचे सातवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण औरंगाबादेतील नाथ व्हॅली स्कूलमध्ये झाले, तर विधी शाखेतील पदवी तिने पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजातून विशेष प्रावीण्यासह संपादित केली. सध्या ती लंडन येथील किं ग्ज कॉलेजमध्ये एलएलएमचे शिक्षण घेत आहे.28 ते 30 ऑक्टोबरदरम्यान लंडन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पध्रेत तिने किंग्ज कॉलेजचे प्रतिनिधित्व केले. क्षमा आणि तिची ब्रिटिश...
  November 19, 02:08 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात