जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • अमेय तिरोडकर नुकतंच लोकवाङ्मय गृहातर्फे संजीव खांडेकर यांच्या ऋतुसंहार या पुस्तकाचं प्रकाशन झालं. चित्रकार, कवी आणि स्तंभलेखक म्हणून ओळख असणाऱ्या खांडेकरांच्या दीर्घ लेखांचा हा संग्रह आजच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने आजची आपलीसमोरची आव्हानं जागतिक परिप्रेक्ष्यात अधिक समजून घेता येतील ही किमान अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांपासून संजीव खांडेकर सातत्याने मराठी विचार वर्तुळात त्यांच्या सखोल आणि अभ्यासू विश्लेषण शैलीमुळे महत्त्वाची भर घालत आहेत....
  August 11, 12:03 PM
 • गणेश बा. पोकळे मानवाने प्रगतिपथावर जाण्याचे स्वप्न पाहिले आणि भौतिक सुखाच्या हव्यासाने रस्त्याच्या कडेचे नाले आणि शहरातल्या गल्लीबोळातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याप्रमाणे हे रस्ते तुंबलेत या भौतिक सुखाने. हे ढीग जेव्हा एक कवी, गीतकार, नाट्यलेखक, प्राध्यापक आणि एक संवेदनशील माणूस म्हणून याकडे पाहतो तेव्हा तो लिहितो, बोलतो आणि कमालीचा हतबल होतो तो माणूस म्हणजे कवी दासू वैद्य सर... जे मिळालंय ते गमावल्यावर पुन्हा मिळेल ही शक्यता जोपर्यंत असते तोपर्यंत माणूस स्थिर असतो. पण जेव्हा ही शक्यताच...
  August 11, 12:02 PM
 • प्रदीप आवटे आपण मागे डोकावून पाह्यलं तर आपल्याला दिसेल की, श्रमाचा आणि साहित्याचा, कवितेचा एक अतूट संबंध होता. तुकोबा दुकान पाहत होते, कबीर कपडे विणत होता, सावता माळी शेती करत होता, गोरा कुंभार कुंभारकी करत होता. अशी किती तरी उदाहरणं सांगता येतील. पण हळूहळू श्रमाचा आणि कवितेचा अतूट बंध क्षीण होत गेला आणि त्याचा परिणाम आपल्या काव्याच्या एकूण गुणात्मकतेवर झाला, हे नाकारता येणार नाही. कुठून तरी पाखराची एक लडिवाळ शीळ कानावर आली. मी क्षणभर रस्ता विसरलो. कुठे जायचं आहे, ते विसरायला झालं. वाटलं, या...
  August 11, 12:00 PM
 • देवदत्त पटनायक श्रावण महिन्यात अनेक लोक उपवास करतात. काही लोक हे मद्यापासून दूर राहतात, तर काही पुरुष या काळात दाढीही करत नाहीत. शारीरिक आणि आध्यात्मिक पवित्र्याचा असा हा महिना ख्रिस्ती धर्मातील लेंट (Lent) आणि मुस्लिम धर्मातील रमजान महिन्याप्रमाणे असतो. श्रावण महिन्यात अनेक लोक उपवास करतात. काही लोक हे मद्यापासून दूर राहतात, तर काही पुरुष या काळात दाढीही करत नाहीत. शारीरिक आणि आध्यात्मिक पवित्र्याचा असा हा महिना ख्रिस्ती धर्मातील लेंट (Lent) आणि मुस्लिम धर्मातील रमजान महिन्याप्रमाणे...
  August 11, 11:58 AM
 • यशवंत पोपळे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची लोकसभा निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाते हे नॅशनल जिओग्राफी आंतरराष्ट्रीय चॅनेलच्या माध्यमातून येत्या १५ ऑगस्टला द ग्रेट इंडियन इलेक्शन माहितीपटातून सबंध जगाला दाखवण्यात येणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया जगाला समजावून सांगण्यासाठी भारतामधून फक्त दोन जिल्हाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. त्यापैकीच एक आहेत सोलापूर जिल्ह्याच्या कन्या तथा तामिळनाडू, सेलमच्या डॅशिंग जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे-बिदरी... सोशल मीडियावर...
  August 11, 11:57 AM
 • वाघ, बिबटे आणि रानकुत्रे एकाच वनक्षेत्रात निवास करत असले तरी त्यांच्या सावजांच्या निवडीत आकार आणि प्रकाराच्या बाबतीत तफावत असते. सावजाच्या निवडीतील तफावतीचे कारण वाघाला अमुक एक प्राण्याची चव आवडते, बिबट्याला तमुकच प्राणी गोड लागतो आणि रानकुत्र्याला तिखट प्राणी आवडतो असे काही नियम नसून त्याला कारण आहे प्रत्येकाची शारीरिक क्षमता, एकट्याने किंवा कळपाने राहण्याचा मूळ स्वभाव आणि सावज मारणे व खाण्याची विशिष्ट पद्धत... त्यामुळे प्रत्येकाला अन्नसाखळीत एक आगळे स्थान प्राप्त झाले आहे....
  August 11, 11:55 AM
 • भारतातल्या एक टक्का अतिश्रीमंतांकडे देशातल्या एकूण संपत्तीपैकी ७३ टक्के संपत्ती एकवटलेली आहे असा धक्कादायक अहवाल ऑक्सफॅम संस्थेने काही महिन्यांपूर्वी जाहीर केला आणि सबंध देशभरात, सगळ्याच माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली. त्याच ऑक्सफॅम संस्थेने हू टेल्स अवर स्टोरीज् मॅटर्स आिण जेंडर इनइक्वॅलिटी इन इंडियन मीडिया हे माध्यमांसंबंधीचे दोन अहवाल नुकतेच प्रसिद्ध केले आहेत. परंतु कुठेही या अहवालाची दखल घेतली गेली नाही की यावर चर्चा झाली नाही. या अहवालाकडे सगळ्यांनीच...
  August 11, 11:54 AM
 • अॅड. लालसू नोगोटी गडचिरोलीत पावसाचा कहर... भामरागडचा जगाशी संपर्क तुटला... गेल्या कित्येक वर्षांपासून दर पावसाळ्यात हे हेडिंग आपण सतत वाचत असतो. पण खरंच जेव्हा जगाशी संपर्क तुटतो तेंव्हा नेमकं काय होतं? साधं मोबाइलचं नेटवर्क नाही मिळालं किंवा बॅटरी लो झाली की आपल्या जिवाची घालमेल सुरू होते... मग भामरागडचे तब्बल ४० हजार आदिवासी अशा अवस्थेत कसे जगत असतील...? ही परिस्थिती का सुधारत नाही...? दरवर्षी पावसाळा आला की जगाशी तुटण्यासाठी भामरागड का सज्ज होतो...? प्रत्येक पावसाळ्यात इथल्या पुलांवरून...
  August 11, 11:52 AM
 • स्वातंत्र्योत्तर काळातील ध्येयवादी संपादक अनंत भालेराव यांच्या अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व या न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर लिखित चरित्रग्रंथाचे प्रकाशन मंगळवारी (१३ आॅगस्ट) औरंगाबाद येथे डाॅ. अभय बंग यांच्या हस्ते होत आहे. नांदेडच्या अभंग प्रकाशनातर्फे येणाऱ्या या चरित्रग्रंथातील लोकनेता संपादक या प्रकरणाचा संपादित अंश. सुमारे चारपाच वर्षे अनंतराव (भालेराव) महाराष्ट्र परिषदेचे (स्टेट काँग्रेसवर बंदी असल्यामुळे घेतलेले नाव) पूर्णवेळ कार्यकर्ते होते. फुलटायमर अशी संज्ञा...
  August 11, 12:05 AM
 • झुंडबळींच्या घटनांवरून विविध क्षेत्रातील नामवंतांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले. रामाचे नाव घेऊन देशात आजवर जमावाकडून मारहाणीचे २५४ गुन्हे घडले आहेत. ८४० घटनांमध्ये दलितांवर अत्याचार झाले आहेत. आपण अशा घटनांमधील गुन्हेगारांवर काय कारवाई केली? असा सवालही त्यांनी पंतप्रधानांना विचारला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून मोदी समर्थक नामवंतांनीही या पत्राची निंदा करत दुसरे एक पत्र लिहिले. मॉब लिंचिंगवरचे पत्र व्हायरल झाल्यानंतर ट्रोल सेनेने या सगळ्या कलाकारांना...
  August 4, 12:20 AM
 • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकूण लेखाजोखा तपासण्याची वेळ आता आली आहे. आज लोकसभेत त्यांचे एकूण पाच सदस्य असले तरी एकूण संख्येत हा आकडा नगण्य आहे. विधानसभेतील संख्या हीदेखील विरोधी पक्षात बसण्यापुरतीच आहे, हे विसरता येत नाही. काय झाले आहे नेमके राष्ट्रवादी काँग्रेसला? पवारांची संसदीय कारकीर्द यावर्षी ५२ वर्षांची झाली आहे. त्यांनी जे राजकारण केले, ज्या राजकीय संस्कृतीला खतपाणी घातले, ज्या इलेक्टिव्ह मेरिटचा आग्रह धरला, त्याचीच परिणती आज त्यांचाच पक्ष उद्ध्वस्त धर्मशाळा...
  August 4, 12:18 AM
 • आजपर्यंत आत्महत्या केलेले ते सर्व लोक एकत्र जमले. म्हणजे त्यांनी तसं ठरवलंच होतं. गेले कित्येक दिवस त्यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. खरं तर त्यांनी यासाठी जी काही मेहनत घेतली, ती इथे सांगणे कठीण. तिची नुसती कल्पनाच केलेली बरी. सतरा नद्या ओलांडल्या, तेव्हा जाऊन आजचा दिवस उजाडला होता. आजचा दिवस त्यांच्यासाठी खास असणार होता, एवढं नक्की! आपल्या आत्महत्येचं फलित काय? खरंच ही गोष्ट नाहीये, मी गोष्टीसारखी रचून ती सांगतोय. म्हणून तिला तुम्ही गोष्ट समजावी असं मी म्हणणार नाही! आजपर्यंत...
  August 4, 12:16 AM
 • तसं पाहता शाळा चालत फक्त वीस मिनिटांच्या अंतरावर. दहा मिनिटांच्या अंतरावर करंजीचा पार अन् तिथून दहा मिनिटांवर शाळेचं गेट. पण गेल्या आठवड्याभरापासून पारापासून शाळेपर्यंतचं दहा मिनिटांचं अंतर पार करताना युनूस शब्दशः पळायचा. किंबहुना त्याअगोदर पारापर्यंत पोहोचण्यासाठीची दहा मिनिटं म्हणजे त्याला हजारो युगं वाटायची. ती दहा मिनिटं अति विचारात जायची. पण वाट काही सापडायची नाही ती नाहीच! युनूस बोळातून बाहेर पडून शाळेच्या वाटेवर येताना दिसला तसं पक्या, विन्या, बाब्या हे त्रिकूट सरसावून...
  August 4, 12:14 AM
 • जेएनयू कॅम्पसच्या बहुतेक भिंतींवरची पोस्टर्स निघालेली होती. कुलगुरूंच्या आदेशाखातर सुरू झालेल्या स्वच्छ जेएनयूच्या प्रकल्पामध्ये ही सगळी पोस्टर्स काढून टाकण्यात आली. किती तरी विद्यार्थ्यांची अनेक दिवसांची मेहनत चिंध्या चिंध्या होऊन जमिनीवर गोळा झाली. जेएनयूच्या चार भिंती नाही, गेल्या पन्नास वर्षांमध्ये शेकडो प्राध्यापकांनी आणि हजारो विद्यार्थ्यांनी उभी केलेली एक संस्कृती हळूहळू भकास होताना दिसतेय. तुला सोडून तर चालले आहे, पण तुझा निरोप घेणं मला कधी जमायचं नाही. मी पुन्हा...
  August 4, 12:12 AM
 • कॉ.गोविंद पानसरे : समग्र वाङ्मय हा पहिला खंड पानसरे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रसिद्ध झाला होता. आताडॉ. अशोक चौसाळकर व डॉ. रणधीर शिंदे संपादित दुसरा खंड हा लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. महात्मा गांधींचा खून ज्या कारणांसाठी करण्यात आला त्याच कारणांसाठी त्यांचा खोटा गौरव केला जातोय. खुन्यांचा वैचारिक वारसा मिरवणारे हिंदुत्वनिष्ठ जेव्हा महात्मा गांधींचा गौरव करतात तेव्हा त्यांची भूमिका स्पष्ट असते. खून करून जे साधायचे होते तेच आता खोटा गौरव करून साधू...
  August 4, 12:10 AM
 • चातुर्मासाच्या या चार महिन्यांत असुर आणि राक्षस देवांपेक्षा जास्त शक्तिशाली होतात. काळ्या मेघांचे रूप धारण करून, हे असुर आकाशात वावरतात आणि पाणी अडवून ठेवतात. जेव्हा इंद्र त्याच्या मेघगर्जनेसह आपल्या वज्राने त्यांच्यावर वार करतो तेव्हा पाऊस पडतो. वैदिक काळात ग्रीष्म ऋतूमध्ये यज्ञ केला जायचा तो अशासाठी की इंद्राला पाऊस पाडण्याची शक्ती मिळावी. मुंबई किंवा भारतातील काही मोठी शहरे पावसाळ्यामध्ये नेहमी चर्चेत असतात. अनेकांची त्यावेळी चर्चा सुरू होते की वरुण देवाचा हा प्रकोप आहे. कोण...
  August 4, 12:08 AM
 • ताली कभी एक हात से नहीं बजती, दोनो हाथो से बजती है. कोई शरीफ लडकी रात के नौ बजे नहीं घुमती असं मुकेश सिंग नावाचा आरोपी बीबीसीच्या डॉक्युमेंटरीमध्ये बोलतो. त्यांचा वकील स्वतः असं म्हणतो की लेडी, वुमन, गर्ल आर मोअर प्रेशियस दॅन जेम. इफ यू पुट युवर डायमंड ऑन द स्ट्रीट सर्टन्ली डॉग विल टेक इट ऑफ, यू कांट स्टॉप. या अशा विचारांमुळे एका मुलीला तिचं आयुष्य प्रचंड वेदनेत गमावावं लागलं. साउथ दिल्लीच्या डीसीपी छाया शर्मा यांच्या स्पेशल टास्क फोर्सद्वारे ही सर्व तपास मोहीम पूर्ण झाली. त्या नेतृत्वाला,...
  August 4, 12:07 AM
 • प्रस्थापितांना, बॉलीवूडमधल्या घराणेशाहीला बेधडकपणे अंगावर घेणाऱ्या कंगनाबद्दल सर्वसामान्य प्रेक्षकाला एक सॉफ्ट कॉर्नर होता. पण सध्याच्या वादात एरवी डोळे झाकून कंगनाला पाठिंबा देणारा वर्गही तिच्यापासून दूर जाताना दिसतोय. सततच्या आक्रस्ताळेपणामुळे, स्वतःच सगळं क्रेडिट घेण्याच्या प्रवृत्तीमुळे, शिवराळ भाषा वापरण्यामुळे, इतरांना देशद्रोहाची लेबलं लावण्यामुळे तिचे अनेक समर्थक, चाहते तिच्यापासून दुरावत चालले आहेत. एकेकाळी इंडस्ट्रीमधल्या दुर्गुणांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या या...
  July 28, 12:20 AM
 • लेखक मरून जातो, त्यानंतर वाचकाने लेखकाला कुठे भेटायचं असतं? परवा प्रवीण बांदेकर मला म्हणाले, पंजाबराव विसरता येणार नाही सहजी. तो आपल्यातही मिसळून गेला आहे. बांदेकरांचं म्हणणं अगदीच खरं आहे. आपण पंजाबरावला भेटतो तेव्हा बोरकरांना भेटतच असतो. पंजाबराव साहेबराव पाटील गरसोळीकर आपल्या आत मिसळून गेलेला असेल तर बोरकरही आपल्या आत आहेतच. खरं तर हल्लीचं एकूणच वातावरण असं आहे की एखादा माणूस कवी किंवा लेखक आहे, असं म्हटलं की ऐकणारे लोक मनाशीच कुत्सितपणे हसतात. या पार्श्वभूमीवर बोरकर स्वत:चा...
  July 28, 12:18 AM
 • शेर अपनी शिकार खुद करता है या ज्ञात नियमाला हा अपवाद होता. बिबट्याची उरलेली शिकार खायला तयार झालेली वाघीण त्या क्षणी प्रथम भुकेजलेल्या तीन पिलांची आई होती. पिलांच्या भुकेपुढे वाघ खानदानाची इज्जत वगैरे तिच्यासाठी दुय्यम बाब होती. पिल्लांचे पोट भरणे हीच तिची प्रथम प्राथमिकता होती. पोटच्या पिलांसाठी आई कुठल्याही स्तराला जाऊ शकते, याचं ते उदाहरण होतं. दोन गाड्यांच्या हेडलाइट्समध्ये उपस्थितांनी ते दृश्य चवीने पाहिले. सर्वांना चिडीचूप राहण्याच्या सूचना आधीच दिलेल्या होत्या, त्यामुळे...
  July 28, 12:16 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात