Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • मनाची कवाडं खुली होतात... मेंदूच्या बंद झडपा उघडतात... पुस्तकं तुमच्यात माणूसपणाचा अंश पेरत राहतात... कणाकणाने तुम्हाला माणूस म्हणून घडवत राहतात.... पुस्तकांशी असलेल्या आंतरिक नात्याचं, मैत्रीचं अगदी प्रणयाचंही हेच खरं कारण असतं. घरातलं हेच पुस्तकांचं बहरतं झाड हरघडी जगण्याची बिघडू पाहणारी लय सावरू पाहतं... मी आठवी-नववीत असेल, तेव्हाची गोष्ट. शाळेत आम्हाला मास्तरांनी निबंध लिहायला सांगितला. विषय होता, माझे ध्येय. मला डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शास्त्रज्ञ, सरकारी अधिकारी असं काहीही व्हायचं...
  07:47 AM
 • अमिताभ बच्चन, आमिर खानसारखे तगडे नट आणि यशराज फिल्मसारखे त्याहून तगडे बॅनर असूनही दोन-अडीचशे कोटी रुपये खर्चून बनवलेला अतिभव्य, अद््भूत ठग्स ऑफ हिंदुस्थान हा चित्रपट साफ पडला. तरीही वर्तमान प्रथेप्रमाणे प्रसिद्धी तंत्राचा वापर करून उत्पन्नाचे कोटींचे आकडे सांगून सकारात्मकतेचं सोंग आणण्याचा प्रयत्न झाला. अर्थात, चित्रपट का पडला-आपटला याचे विश्लेषण करण्यास चित्रपट समीक्षक समर्थ आहेत. इथे मुद्दा, ज्यांच्यावर अख्खा चित्रपट बेतला होता, त्या ठगांच्या वास्तवदर्शी नोंदींचा, ब्रिटिश...
  07:39 AM
 • एखाद्या संपूर्ण जमातीमध्ये जर बालविवाहाची प्रथा मोठ्या प्रमाणात असेल तर ती संपूर्ण जमातच दुबळी, अविकसित राहण्याचा धोका आहे. म्हणजे जमात आदिम आहे, शिक्षणाअभावी मागास आहे म्हणून बालविवाहांचे प्रमाण जास्त आणि बालविवाह होत आहेत म्हणून दुबळी पिढी जन्माला येऊन जमात मागास राहणार, असे हे दुष्टचक्र आहे. रायगड जिल्ह्यातील कातकरी आदिवासी हे या दुष्टचक्राचे बळी आहेत... आठवीत शिकत असताना शेवंताला मासिक पाळी आली आणि घरच्यांना तिच्या लग्नाची घाई झाली. मुलगी मोठी झाली, आता तिचे लग्न करायला हवे, अशी...
  12:02 AM
 • जनतेच्या भावनांशी खेळणे आणि कायद्याला बायपास करून जनतेला वारंवार भावनिक प्लेझर मिळवून देणे, यातून राजकारणी आपली सत्ता बळकट करत राहतात. यामुळे एकाच वेळी सत्तेच्या ताकदीचे दर्शनही घडते, जनता धाकातही राहते आणि खुशही. जनतेच्या भल्यासाठी आखलेली व्यवस्थेची ही एक सूत्रबद्ध योजना असते. समाजविघातक गुंडांचे किंवा अवनी वाघिणीचे एन्काउंटर हे त्याच योजनेतून स्फुरते... कायद्याचं राज्य असलेल्या आणि प्रभु श्रीरामाचं राज्य येऊ घातलेल्या उत्तर प्रदेशातलं अलिगड. २० सप्टेंबर २०१८. मीडियाच्या...
  12:01 AM
 • वेगवेगळे परिसर,परिसरातील मिथकं, तिथली बोलीभाषा, आशयाला अनेक पदर अन् अर्थांची गहनता आणणारे शब्द. अशा अनेक अंगांनी कविता आज फुलून येत आहे. ही गोष्ट सार्वांगीण परिवर्तनाच्या लढ्याला अधिक बळकट करणारी आहे. पुन्हा फुटतो भादवा हा दर्या प्रकाशनाचा कवी अमृत तेलंग यांचा काव्यसंग्रह त्याचीच साक्ष देतो आहे... वतामाजी झालीय कविता, ही ओळ कवितेचा सन्मान करणारी खचितच नाही. तुलनेत हजारो फुलू देत फुले या विधानात मात्र नैसर्गिक विविधतेला अश्वासक अवकाश अधिक आहे. पंचावन्न नंतर खूप लिहिली जातेय कविता....
  12:00 AM
 • विस्तारणाऱ्या मराठी भावकवितेतील नवे नाव आहे, वर्षा पवार-तावडे. `मनाला दार असतंच` हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह आश्वासक आहे. या संग्रहात कवयित्री तिचे भावविश्व उलगडताना मनाच्या जाणीव-नेणिवेवरच्या संवेदना अधोरेखित करत वाचकांशी सहजपणे अंतस्थ संवाद साधते... मनात भाव-भावनांचा कल्लोळ माजलेला असतो. या भावभावना कधी आत खोल घुमतात, तर कधी ओठांवर सहज येतात. मनाची कवाडे खुली ठेवली,की स्वच्छ मोकळी वाऱ्याची झुळूक आत येते आणि अंतःपटलावर काही खुणा सोडून जाते. या खुणाच मग कविता होऊन जातात. `मनाला दार...
  12:00 AM
 • शिल्पातील स्त्रियांवर लिहितो आहे. लिहिताना एकदा एका गीतातील पंक्ती स्त्री जन्मा ही तुझी कहाणी... आणि पाठोपाठ स्मरण झाले मायावती, गौतमी, यशोधरा, सुजाता आणि विशाखा या सिद्धार्थाच्या म्हणजेच, गौतमाच्या म्हणजेच बुद्धाच्या जीवनात डोकावून गेलेल्या स्त्रियांचे. या संबंधीचे एकेक हृदयस्पर्शी, भावनांना हेलावणारे, शिल्पबद्ध झालेले प्रसंग बघणाऱ्यांना अलौकिक अनुभूती मिळवून देतात... मायावतीराणी पहिलटकरीण म्हणून माहेरी बाळंतपणासाठी निघालेली असताना प्रसूतिकळा अनावर झाल्या, तेव्हा झाडाच्या...
  12:00 AM
 • प्रतिमा कशा निर्माण होतात, कशा संवर्धित केल्या जातात, त्यामागचा नेमका अजेंडा कोणता याचा विविध पातळीवर सूक्ष्म विचार करुन त्या अनुषंगाने प्रतिमानिर्मितीतून राजकारण पुढे आणलं जातं, कधी लपवलं जातं, पार्श्वभूमीदाखल मांडलं जातं, प्रतिमांतरण केलं जातं अथवा गायबही केलं जातं... सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची अलीकडे बरीच चर्चेत होती. हा पुतळा जगातला सर्वाधिक उंच पुतळा असावा असा प्रधानसेवकांचा दुर्दम्य निर्धार होता आणि अर्थातच तो त्यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न करुन अंमलात आणला....
  November 11, 09:16 AM
 • त्याचं नाव वेल्या. तोरणमाळ परिसरातला हा एक पावर. पावर म्हणजे सालगडी. वय बारा-तेराच्या आसपासचं. हा दिवसभर गुरं राखतो. मधल्या वेळेत गाडीघोड्यांतून जाणाऱ्या सौंदर्यासक्त पर्यटकांना तळ्यात बुडी मारून कमळ तोडून देतो. दुर्गम भागात जगण्याचा संघर्ष पेलणारा हा भारतमातेचा फाटका लेक. आदिवासी विकास, बालकल्याण आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण या तीन योजनांसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांची उधळण करणाऱ्या या महाराष्ट्रात आजही अशी काही मुलं आहेत, याची कल्पना असेल का, अंत्योदय हेच आपले ध्येय मानणाऱ्या या...
  November 11, 07:13 AM
 • सण म्हटला, की घरातली स्त्री दररोजच्यापेक्षा काहीशी अधिकच स्वयंपाकघरात गुंतून पडते. फराळापासून ते दोन्ही वेळची साग्रसंगीत जेवणे, शिवाय पाहुणे-येणारे जाणारे-नातेवाईक, रितीभाती, घराची अधिकची टापटीप... हे तर परंपरेने आपण स्त्रीचेच कर्तव्यक्षेत्र मानले आहे, नाही का? आणि नेहमीपेक्षा जास्त राबूनही, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना पुरे पडत, त्यांचे विविध मूड सांभाळत, परंपरा सांभाळत... सर्वांत जास्त आनंदी- उत्साही- हसतमुख तिनेच राहायचे. म्हणजे, सर्वार्थाने...
  November 11, 07:05 AM
 • आपण सारे उत्सवप्रिय आहोत. पण हा आनंद आपण गरज असलेल्या इतरांपर्यंत नियमितपणे व शाश्वत स्वरूपात का वाटत नाही, वाटू शकत नाही? आदिवासी पाड्यात किंवा गरिबांच्या वस्तीत फराळाचं वाटप टाइप चांगुलपणा इथे अपेक्षित नाहीये. मी अधिक काही मोठी, व्यापक देण्याची भूमिका मांडू पाहतोय. आजचा दिव्य मराठी अंक हातात पडताना दिवाळी संपत आली असणार आणि आठवडाभराच्या दिवाळी दगदगीनंतर रविवारच्या सुस्तावलेल्या सकाळी तुम्ही थोडे निवांत असणार. फराळ भरपून खाऊन, वाटून उरला असेल आणि भेटवस्तूंचे (आता रिकामे) खोके...
  November 11, 06:58 AM
 • दुर्दैवाने बस्तर म्हणजे फक्त नक्षली जिल्हा इथपर्यंतच आपली समज मर्यादित राहते. मग बॉम्ब, बंदुकांच्या हिंसाग्रस्त परिवेशाच्याही पलीकडेही एक समृद्ध विश्व या भूमीत काही हजार वर्षांपासून नांदत आलेलं आहे, याकडे आपण सोयीस्कर दुर्लक्ष करतो. या समृद्ध परंपरेची आणि बस्तरची अस्सल ओळख लोकपरंपरा आणि लोककथांच्या माध्यमातून देशभर करून देणारे महत्त्वाचे कवी म्हणून हरिहर वैष्णव यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते... कित्येक वर्षांपासून मागास आणि नक्षली म्हणून हिणवलेला बस्तर जिल्हा हा येथील...
  November 11, 06:40 AM
 • ज्येष्ठ संपादक, लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक अनंत काशिनाथ भालेराव यांच्या जन्मशताब्दीला १४ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने अनंत भालेराव यांच्या पत्रकारितेवर, लेखनावर, त्यांच्या व्यासंगावर अनेकांगांनी चर्चा होत असताना त्यांच्या नातीला मात्र तिचे लाडके अण्णा नेमके कसे दिसतात... सांगताहेत सानिया भालेराव... अनंतराव भालेराव यांची तू नात आहेस का? असं आजही जेव्हा काही लोकं मला विचारतात तेव्हा अण्णांची पुण्याई अजूनही आपल्या बरोबर आहे याची खात्री पटते. मी साधारण सात एक...
  November 11, 06:31 AM
 • कुमार गंधर्व हे एक अलौकिक शास्त्रीय गायक होते, हे खरं तर अधोविधान ठरावं. अलौकिकत्वाचा स्पर्श त्यांच्या गायकीला होताच, पण त्याहीपेक्षा संगीतातल्या प्रस्थापित घराण्यांना आव्हान देण्याचं धाडस त्यांच्या ठायी होतं. म्हणूनच ख्याल, ठुमरी, टप्पा आदी पारंपरिक प्रकार लीलया हाताळणाऱ्या गंधर्वांनी मालवतीसारख्या नादमधुर रागांची निर्मिती केलीच, पण माळव्यातल्या लोकधुनांनाही मानाचं स्थान देण्याची बंडखोरी केली. अशा या दैवी देणगी लाभलेल्या गंधर्वांच्या आयुष्यात गजल गायनप्रकाराशी दोस्ती...
  November 4, 07:17 AM
 • तुमचा आवडता लेखक कोण? या प्रश्नावर दहापैकी नऊ वाचक पु. ल. देशपांडेअसे उत्तर देतात. यामागचे त्यांचे कारण असते-पुलंच्या खदखदून हसायला लावणाऱ्या कोट्या आणि गुदगुल्या करणारा निर्भेळ विनोद. हे खरेच की निर्भेळ विनोद ही पुलंची खासियत होती, पण याहीपलीकडे पुलंचे या महाराष्ट्राला योगदान होते. त्यातला एक पैलू होता, त्यांच्यातल्या सजग सामाजिक भानाचा. त्याचेच दर्शन राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या मंगला गोडबोले लिखित पु. ल.: चांदणे स्मरणाचे या आगामी पुस्तकातून वाचकांना घडणार आहे. ८ नोव्हेंबर...
  November 4, 07:08 AM
 • चित्रपट हा पडद्यावर रंगणारा दृक्-श्राव्य सोहळा. त्यातली लार्जर दॅन लाइफ दृश्ये जशी स्मरणात राहतात, तसेच दृश्यांना अकल्पित उठाव देणारे आवाजही लक्षात राहतात. आवाज हा खरे तर चित्रपटांचा प्राण. तो कसा निर्माण करण्यात आला, उपयोगात आणला गेला, यावर चित्रपटांचा प्रभाव ठरतो. प्रभावी आवाज दृश्यांत नाट्यमयता निर्माण करतात आणि त्यातूनच आस्वादनाचा कळसाध्याय गाठला जातो. परंतु, आवाजाला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व बहाल करणाऱ्या योग्य जागा शोधणे, त्या आवाजांची स्वतंत्रपणे निर्मिती करणे आणि त्यांचा...
  November 4, 06:59 AM
 • दुसऱ्याचं मन आणि भावना जाणणारी संवेदनशीलता, जगण्यात हरवत चाललेल्या समतोलाचा माग काढणारी संशोधक वृत्ती आणि स्त्री-पुरुष असा भेद न करता माणूसपणाचा सन्मान करणारी साहित्यिक प्रतिभा लाभलेल्या डॉ. अरुणा ढेरे यांना यवतमाळ येथे भरणाऱ्या ९२व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मानाने बहाल करण्यात आले. ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने साहित्यप्रेमींची मने सुखावून गेली. त्यातही सभोवताली स्त्रीमनाचे बंडखोर उद््गार उमटत असताना, पुरुषकेंद्री अन्याय्य परंपरांना आव्हान देणारा...
  November 4, 06:50 AM
 • प्रस्तावित शिवस्मारकाच्या भूूमिपूजनासाठी शासकीय अधिकारी, पत्रकार, कार्यकर्ते अशा सगळ्यांना घेऊन जाणारी बोट खडकाळ भागाला लागून फुटली. बोटीतल्या सर्वांना वाचवण्यात आलं, मात्र एक जण बेपत्ता होता. संध्याकाळी उशिरा त्याचं नाव सिद्धेश पवार असल्याचं कळलं.पाठोपाठ त्याच्या मृत्यूची बातमीही आली. मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिलेत. सिद्धेशच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आलीये. पण प्रश्न इथेच संपत नाहीत.... द्धेश पवार गेला. तिशीच्या आतबाहेर होता तो. सीए होता. पाच लाख...
  October 28, 08:54 AM
 • सीआयडी ही पोलिसी रहस्यकथांवर बेतलेली लोकप्रिय मालिका. एसीपी प्रद्युम्न, इन्स्पेक्टर दया, अभिजित, डॉ. सालुंके या त्यातल्या लोकप्रिय झालेल्या व्यक्तिरेखा. तब्बल वीस वर्षं या सिरियलने प्रेक्षकांना गुंगवून ठेवलं आणि गेल्या आठवड्यात सीआयडीचं प्रक्षेपण थांबणार अशी बातमी आली. सिरियलच्या कट्टर चाहत्यांना मोठाच धक्का बसला. पाठोपाठ सीआयडीच्या गुणवैशिष्ट्यांची चर्चा झाली. प्रेक्षकांमधलं व्यक्तिरेखांविषयीचं प्रेम उफाळून आलं. पण, दोन दशकं सीआयडीने गारूड केलं कसं, याचा शोध घेणारा हा लेख......
  October 28, 08:53 AM
 • मी टूच्या अनुषंगाने याच सदरात गेल्या पंधरवड्यात माझा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर मी काहीशी बदलून गेले आहे. हा बदल दोन्ही स्तरांवरचा आहे. माझ्या आतला आणि माझ्या बाहेरचा, मला लगटून असणाऱ्या भोवतालातला. हा भोवताल वेगवेगळ्या तऱ्हांनी आपल्या मनावर अंकुश ठेवत असतो, निर्बंध घालत असतो. तरीही वर्षानुवर्षं मनात दडवून ठेवलेलं सत्य आपण सांगून बसलो आणि आता आपल्याला एकाएकी बरं वाटेनासं झालेलं आहे. एक प्रकारची अस्वस्थता अचानकच आपल्या मनाचा ताबा घेऊन बसलेली आहे. या अस्वस्थतेचं नाव काय, तिचं अचूक शब्दांत...
  October 28, 12:10 AM
 
जाहिरात

RECOMMENDED