Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • आपण खरोखरीच कोऱ्या नजरेने हे जग पाहू शकतो का? तर मुळीच नाही. पाहण्याच्या क्रियेत अनेकानेक सामाजिक-सांस्कृतिक-व्यक्तिगत गोष्टी मिसळलेल्या असतात. पाहण्याच्या क्रियेत आपण कोरे असत नाही. असू शकत नाही... असे म्हटले जाते की, The Innocent Eye is Blind, The Virgin Mind is Empty. आणि ते खरेही आहे. अज्ञानी लोकांबद्दल संत ज्ञानेश्वर एका ठिकाणी म्हणतात - मोराच्या अंगी आसोसे । पिसे आहाती डोळसे ।। परी एकली दिठी नसे । तैसे ते गा ।। मोराच्या सुंदर पिसाऱ्यावर अनेक डोळे असतात, पण दृष्टी नसते, तसेच अज्ञ जनांबाबत म्हणता येईल. डोळे असणे...
  June 3, 01:00 AM
 • ती प्रत्यक्षात दिसते, एवढीशी, पण पडद्यावर जेव्हा अवरते, तेव्हा लार्जर दॅन लाइफ होऊन जाते. या ज्या दोन टोकाच्या अवस्था आहेत, दोन अवस्थांमधला जो अवकाश आहे, त्यात आलिया भट्ट नावाच्या अभिनेत्रीच्या असण्याचं सगळं सार सामावलेलं आहे. अर्थातच आलिया आजच्या गुणवान पण बेधडक, बेपर्वा, अलिप्त आणि अगोचर पिढीची प्रतिनिधी आहे. तिचं चुकणं, त्यातून सावरणं, धडपडणं, यश मिळवणं, त्या यशाचा अर्थ लावणं आजच्या पिढीशी जवळचं नातं सांगणारं आहे. म्हणूनच तिचा आजवरचा प्रगल्भ होण्याकडे सुरू झालेला प्रवास समजून घेणं...
  May 27, 01:00 AM
 • जो उपद्व्यापी त्याला फिल्मी भाषेत सुलेमानी किडा म्हणतात. तसा अभ्यासात जो हुशार त्याला पुस्तकी किडा असं आपण म्हणतो. पण किडा जिनियसही असतो, हे जगभरातल्या ४० ते ५० चित्रपट महोत्सवात दाखवलेला गेलेल्या, अर्थातच भारतात गाजलेल्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त न्यूटनच्या दिग्दर्शकाची झेप पाहिली की पटते. तेही दोनशे टक्के! अमित मसूरकरचा आधीचा सिनेमा सुलेमानी किडा. आणि दुसऱ्याच सिनेमांत थेट ऑस्करच्या स्पर्धेत हा न्यूटन घेऊन उभा. तरीही त्याची माध्यमांना दखल नाही. तो मराठी आहे, हा निव्वळ योगायोग,...
  May 27, 01:00 AM
 • विचारांत प्रगल्भता असूनही कुठे तरी रितेपणाची बाेच तिला अाहे. याच रितेपणाचा ती सतत अर्थ लावत असते. माणसं वाचत असते, वेळ अाली तर बंडखाेरी करते अाणि जे याेग्य अाहे, त्याच पारड्यात वजन टाकते. रंग, वर्ण, जात, धर्म यासह शाेषण, स्त्री-पुरुष भेद यावर ठामपणे व्यक्त होत राहते. तिने साकारलेल्या छाेट्या-छाेट्या भूमिकाही तिच्या समृद्ध जगण्याची छटा सहज दाखवून जातात. तिचे सिनेमा आंतरराष्ट्रीय महोत्सवात गाजतात. तिच्या जगण्यात अभिनय महत्त्वाचा ठरताेच. पण त्याही पलीकडचं जगणं तिच्यालेखी मोलाचं असतं....
  May 27, 01:00 AM
 • डोंगराएवढं काम करायचं, पण लोकांनी टाकलेल्या कौतुकाच्या जाळ्यात अडकायचं नाही, आपला स्वभाव सोडायचा नाही, तडजोड करायची नाही, हे सारं साधायचं म्हणजे खायचं काम नाही. त्यातही अभिनयाच्या क्षेत्रात बंद्या रुपयासारखा खणखणीत असलेल्या एखाद्या नटासाठी तर हे आव्हानच असते. पण जवळपास तीसहून अधिक वर्षे अमराठी रंगभूमी गाजवणाऱ्या मकरंद देशपांडे यांना हे लीलया साधले आहे. त्यामागे रंगभूमीशी असलेली अतूट निष्ठा हे कारण आहेच, पण माणूस नावाची प्रचंड मोठी गुंतवळ समजून घेण्याची त्यांची आसही खूप मोठी आहे.......
  May 27, 01:00 AM
 • काही व्यक्तिमत्त्वं नेहमीच वडिलधारी भासतात. म्हणजे, त्यांच्या वागण्या-बोलण्यात, दिसण्या-असण्यात एकप्रकारची प्रगल्भता झळकत असते. त्यांनी काहीही केलं तरीही हे प्रगल्भतेचं वलय काही हटत नाही. वैविध्यपूर्ण भूमिका जगणारा पंकज त्रिपाठी हा अभिनेता या वर्गात मोडतो. तो जी भूमिका साकरतो, त्यात अस्सल प्रगल्भता झळकते. हे सारं दैवी नसतं, तर परिस्थितीच्या माऱ्यातून आकारास आलेलं असतं. माणसाने माणूस होण्याची प्रक्रिया साधीसरळ नसते, महत्प्रयासाने साध्य होत असते. वलयाआडचा पंकज त्रिपाठी नेमकं याचंच...
  May 27, 01:00 AM
 • दर रविवारी रसिक पुरवणी प्रकाशित झाली की एक घटना न चुकता घडते. आडवळणावरच्या गावाचे अशोक सोनार नावाचे चोखंदळ वाचक सगळी पुरवणी लक्षपूर्वक वाचून काढतात. काय भावलं, काय खटकलं याची मनोमन नोंद करतात आणि न कंटाळता प्रत्येक सदर लेखकाला प्रतिसादाचा फोन करतात. त्यांचं हे प्रतिसाद देणं, गेली सात वर्षे अव्याहत सुरू आहे. त्यांनी आजवर प्रकाशित झालेली प्रत्येक रसिक पुरवणी जपून ठेवली आहे... दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत मुलुख माती सदर लिहायला लागल्यापासून अनेक वाचकांचे फोन येतात. त्यात एका रविवारी...
  May 27, 01:00 AM
 • म. गांधींची हत्या ही भारताच्या इतिहासातील एक काळीकुट्ट घटना. या हत्येत सहभाग असल्याच्या आरोपाखाली स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक झाली. त्यांच्यावर खटला चालवला गेला. तेव्हापासून आजतागायत सावरकरांचे नाव गांधीहत्येशी जोडले गेले. परिणामी, सावरकरांचे कर्तृत्व या घटनेने डागाळत राहिले. सावरकरांना न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरविले असताही गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांना बदनाम करण्याची मोहीम कशी चालू आहे? सावरकरांचा खरोखरच गांधीहत्येत सहभाग होता का?...
  May 27, 01:00 AM
 • अकिरा कुरोसावांचा प्रत्येक चित्रपट हे एक जीवनभाष्य आहे. याच जीवनभाष्यातली एक ओळ कुरोसावा मादादायोमध्ये चितारून जातात. आपापल्या खजिना शोधासाठी प्रेरणा देऊन जातात... उत्फुल्लपणे आयुष्य जगणारे सत्त्याहत्तर वर्षांचे सेवानिवृत्त प्राध्यापक ह्याकेन उचिदा विद्यार्थी आणि कुटुंबीयांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीहून प्रकृती अस्वस्थ होऊन परतलेत. जमिनीवरच टाकलेल्या गादीवर शांतपणे झोपलेत. बाजूला नाइट लॅम्प, पुस्तके आहेत. त्यांना घरी सोडायला आलेले, एकेकाळचे...
  May 20, 02:12 AM
 • आताचा काळ हा, अपेक्षाभंगाचा काळ आहे. सत्ताधारी व्यवस्थेच्या सत्शील समर्थकांच्या आणि विरोधकांच्या सैरभैर समर्थकांच्याही! जाती-धर्माच्या सीमारेषांची नव्याने आखणी होण्याचीसुद्धा हीच घातक वेळ आहे. हिंसा जितकी प्रत्यक्षात दिसतेय, त्याहीपेक्षा अधिक ती मनामनांत दडून आहे. समाज म्हणून आपण सर्रास मुखवटे घालून वावरण्यात तरबेज झालो आहोत आणि राजकीय संस्कृतीने तळ गाठलेला आहे. या पार्श्वभूमीवर समाजमनाचा उभा-आडवा छेद घेणाऱ्या नाटककार विजय तेंडुलकरांची (१९ मे २०१८) दशकस्मृती पाळताना त्यांच्या...
  May 20, 02:00 AM
 • उदारमतवाद्यांनी जोरदार किल्ला लढवूनही कर्नाटकच्या जनतेने नरेंद्र मोदींना नाकारलेले नाही. प्रचारादरम्यान इतिहासाशी संबंधित धादांत असत्य सांगूनही मोदींची लोकप्रियता घटलेली नाही. हे मोदींच्या आक्रमक प्रचारतंत्राचे यश आहे की, उदारमतवाद्यांच्या हुकत चाललेल्या लढाईचा परिणाम? नरेंद्र मोदी सरकारच्या सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक धोरणांसंबंधी तीव्र टीका करणारा वर्ग गेली चार वर्षे सक्रीय आहे. रोहित वेमुलाच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर या वर्गाने मोहीम हाती घेतली. सुजाण नागरिकांना शरम...
  May 20, 02:00 AM
 • सुखी माणसं एकसारखीच असतात, पण प्रत्येक दु:खी माणसाचं दु:ख वेगळं असतं...बारबाला म्हणून औरंगाबादमध्ये खितपत पडलेल्या टिनाच्या वाट्याला आलेलं दु:खही असंच हादरवून टाकणारं होतं... र्धावर्धा वैशाख संपत आला होता. या महिन्यात लग्नाच्या तिथी खूपच दाट होत्या. गावात रोज पंगती उठायच्या. पण काही काम नसल्यानं गावात थांबूनही उपयोग नव्हता. आपला कामधंदा पाहणं गरजेचं होतं. म्हणून मी दुसऱ्या दिवशी औरंगाबादची गाडी धरली. पण रेश्मा व सुमन मुंबईला गेल्यानं तिथं जाण्याची इच्छा होत नव्हती. लेडीज बारमधील नोकरी...
  May 20, 02:00 AM
 • प्रबोधनाच्या युगामधील वैचारिक घुसळणीतून अनेक नव्या संकल्पना शब्दांच्या माध्यमातून जन्माला आल्या. हक्क, स्वातंत्र्य, समता, अल्पसंख्याक, बहुसंख्याक आदी नवे शब्द घडवतच मानवी समाज विकसित झाला.इतिहासाच्या विविध टप्प्यांवर प्रचलित झालेले हेच वेगवेगळे शब्द आपल्या समाजाचा उभा- आडवा छेद दाखवतात. त्यामागची विचारसरणी स्पष्ट करतात... चांगले- वाईट, सुंदर- कुरूप असे शब्द निर्माण झाले, कारण हे काळे तरी आहे किंवा पांढरे तरी आहे, हे चांगले तरी आहे किंवा वाईट तरी आहे, असा विचार करणे सोपे असते. म्हणून...
  May 20, 02:00 AM
 • गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून धनगर समाजातील शिक्षित तरुण आपलं जगणं आत्मकथनातून, तर कधी कादंबरीतून मांडू लागले आहेत. त्यापैकी धनंजय धुरगुडे यांचे माझा धनगरवाडा हे धनगरी अन् एकूणच मराठी साहित्यातील मैलाच्या दगडाचे आत्मकथन आहे. एका कुटुबांचा नव्हे, तर मेंढरं राखणाऱ्या धनगर समाजाच्या प्रातिनिधिक चरित्राचा हा अस्वस्थ करणारा पटही आहे... मेंढपाळ, मेंढरं, माळ हा मराठी साहित्यासाठी चित्रकला, संगीत आणि फोटोग्राफीसाठी दुरून डोंगर साजरेसारखा भुरळ घालणारा विषय. संशोधकांनाही तो वर्ज्य नाही....
  May 20, 02:00 AM
 • अकिरा कुरोसावांचा प्रत्येक चित्रपट हे एक जीवनभाष्य आहे. याच जीवनभाष्यातली एक ओळ कुरोसावा मादादायोमध्ये चितारून जातात. आपापल्या खजिना शोधासाठी प्रेरणा देऊन जातात... उत्फुल्लपणे आयुष्य जगणारे सत्त्याहत्तर वर्षांचे सेवानिवृत्त प्राध्यापक ह्याकेन उचिदा विद्यार्थी आणि कुटुंबीयांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीहून प्रकृती अस्वस्थ होऊन परतलेत. जमिनीवरच टाकलेल्या गादीवर शांतपणे झोपलेत. बाजूला नाइट लॅम्प, पुस्तके आहेत. त्यांना घरी सोडायला आलेले, एकेकाळचे...
  May 19, 11:20 PM
 • निबिड अरण्यातून वाट काढताना ढगांआडून अचानक चंद्र डोकवावा आणि त्याच्या शांत-शीतल प्रकाशाने सैरभैर मन सुखावून जावं, तसा क्लांत मनांवर सावली धरणारा सूर होता, दिवंगत अरुण दाते यांचा. मराठी भावगीतांनी दातेंना स्वतंत्र ओळख मिळवून दिली, पण त्याआधीचे अरुण दाते गझल गायकीत मनसोक्त मुशाफिरी करू पाहत होते. उर्दू भाषेशी त्यांची लोभस यारी होती. या त्यांच्या फारशा परिचित नसलेल्या गायनपैलूवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख... साधारण १९४० सालची गोष्ट. लखनऊला ज्येष्ठ गझल गायिका बेगम अख्तरांच्या कोठीवर एक...
  May 13, 02:00 AM
 • नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेत आलेल्या एनडीए सरकारचा गेल्या चार वर्षांचा कार्यकाळ निवडणुकांचाच काळ ठरला. या काळात विधानसभा निवडणुका नजरेपुढे ठेवून हिंदू-मुस्लिम, पाकिस्तान, टिपू सुलतान हे विषय सातत्याने चर्चेला आणले गेले.रामजन्मभूमीचा मुद्दा यात सर्वात कळीचा ठरत आला. नुकतीच पार पडलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूकही त्याला अपवाद नव्हती. मात्र, ज्याच्या नावे मशीद बांधली गेली, तो बाबर नेमका कोण होता, हेच कोणी धडपणे सांगितले नाही. कोणी समजूनही घेतले नाही. अशा वेळी ज्याचे...
  May 13, 02:00 AM
 • निरुपमा दत्त गेल्या तीन दशकांपासूनचे भारतीय पत्रकारितेतील एक महत्त्वाचे नाव आहे. त्यासोबतच त्यांचे पंजाबी साहित्यामध्ये कथा, कविता आणि अनुवादाच्या माध्यमातून लक्षवेधी योगदान राहिलेले आहे. कोणत्याही प्रकारचं दुय्यम जगणं नाकारत आत्मभानातून न्याय हक्कांशी झगडणारा विस्तृत साहित्यपट त्यांनी पंजाबी वाचकांसमोर ठेवला आहे... पंजाबी साहित्यातील कैक पिढ्यांचं उदरभरण करणाऱ्या अमृता प्रीतम यांच्या सहवासातून अधिकाधिक बंडखोर अभिव्यक्तीकडे वळत गेलेल्या निरुपमा दत्त यांच्या लेखनात...
  May 13, 02:00 AM
 • प्राचीन भारतीय शिल्पसृष्टीत नृत्यांगनांच्या एकापरीस एक अशा शिल्पाकृती आढळतात. कोठे त्या एकल नृत्य सादर करत असतात, तर कोठे समूह नृत्य, तर आणखी कोठे वाद्यवृंदासह. ते सादर करणाऱ्या नर्तिका सुडौल देहाच्या, देखण्या, अभिनयकुशल आणि चेतोहारी असतात, असाव्या लागतात, असे त्यांच्या शिल्पाकृती सांगतात... भारतीय शिल्पसृष्टीत नृत्यांगनांच्या शिल्पांनी फार मनोहारी भर घातली आहे, तिला समृद्ध केले आहे. एवढेच नव्हे, तर कालिदास, भवभूती, बाण यांसारख्या नवनवोन्मेषशाली प्रतिभेच्या कवींना, साहित्यिकांना...
  May 13, 02:00 AM
 • मॅचो हीरोंचा भरणा असलेल्या बॉलीवूडला सत्ताधारी व्यवस्थेने सहज खिशात घातलं आहे. मराठी चित्रसृष्टी तळ्यात-मळ्यात करतेय. पण तिकडे दक्षिणेत पडद्यावरचा खलनायक, पण वास्तवातला नायक शोभणाऱ्या प्रकाश राजने प्रश्न विचारू न देणाऱ्या सत्तेला मोठ्या हिमतीने शिंगावर घेतलंय... म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात... कवी कुसुमाग्रजांनी रचलेल्या ख्यातनाम गीतातील या ओळी. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी या गीताला स्वर दिला. महाराष्ट्राच्या गल्लीबोळात होणाऱ्या सार्वजनिक...
  May 13, 02:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED