Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • बरोबर महिनाभरापूर्वी मी जगातल्या सर्वात शक्तिशाली देशाच्या राजधानीत, वॉशिंग्टनमध्ये होतो. या शक्तिमान देशाचा तरुण अध्यक्ष ओबामांच्या निवासस्थानाबाहेर उभा होता. दुपारी साडेचारच्या सुमारास मिलिटरी खाक्या जाणवेल अशा रंगाचे नि धर्तीचे विमान पाठच्या निवासस्थानात उतरत होते. इतक्या खालून अध्यक्षाचे विमान कसे काय उडू शकते, असे वाटत असतानाच कळले की, या शहरात न्यूयॉर्कसारख्या गगनचुंबी इमारती नाहीत. उंचीवर मर्यादा आहे. या शहराच्या कुठल्याही भागातून वॉशिंग्टन मॉनिमेंटचा पेन्सिलीसारखा...
  September 3, 11:58 PM
 • असे मानले गेले आहे की, सर्व ऋतूंचे सार फक्त भाद्रपद महिन्यामध्येच पाहायला मिळते. याचाच अर्थ असा की, हेमंत ऋतूचा गारवा आणि वसंत ऋतूसारखेच पुष्पवैभव या भाद्रपदातही दिसते अन् कोणतीही सजीव वस्तू बहरलेली, मोहरलेली, फुललेली दिसते. अंगांगावर रूपपालवी फुलवून घेते. आपल्या अंगगंधाने आसमंत दरवळून टाकते. या काळात ज्याने त्याने आपापल्या भार्येकडे भद्रदृष्टीने पाहिले तर हे पटण्यासारखे आहे. संपूर्ण श्रावणातल्या प्रत्येक दिनरातीच्या उपासतापासांनी आणि व्रतवैकल्यांनी बंदिस्त झालेले...
  September 3, 11:55 PM
 • मी पहिली-दुसरीत असताना जिंतूरला आम्ही एका भाड्याच्या घरात राहत होतो. हरीबाई नावाच्या बाईंचा तो मोठा वाडा होता. गावाच्या एका टोकाला १०-१२ पाय-या चढून गेल्यावर उंच जोत्यावर तो वाडा होता. त्या वाड्यातल्या माडीवर आम्ही राहत असू. हरीबाईंना एकुलता एक मुलगा होता. त्याचं नाव होतं गोविंद. त्या त्याला प्रेमाने गोविंदबाळ म्हणायच्या. म्हणून मग सगळा गावच त्याला गोविंदबाळ म्हणायचा. तो साधारण २५ वर्षांचा असेल. त्याचं एस.टी. स्टँडवर हॉटेल होतं. तो आम्हा भावंडांचे खूप लाड करायचा. माझे वडील कडक...
  September 3, 11:53 PM
 • पंढरीची वारी आणि दरवर्षी दिमाखाने साजरा होणारा गणेशोत्सव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक-सामाजिक वैशिष्ट्ये पाऊसधारांच्या सोबतीनेच साकार होतात. जगभर या उत्सवांचे आकर्षण आणि कुतूहल असते. अमराठी काय किंवा विदेशी काय, अनेक अभ्यासक, संशोधकांना या उत्सवांनी भूल घातली आहे. तोच गणेशोत्सव आपण सध्या साजरा करतो आहोत. दोन्ही उत्सवांची परंपरा आपल्या संस्कृतीत प्रदीर्घ स्वरूपाची आहे. दोन्ही उत्सवांना अनेक पैलू असणारे सामाजिक आयाम आणि संदर्भही आहेत. दरवर्षी हे उत्सव नित्य नव्या उत्साहाने,...
  September 3, 11:49 PM
 • चित्रपट पाहण्यात तुम्ही गुंग झाला आहात... अचानक हिमवादळ होऊ लागते आणि तुम्हाला स्वत:लाही त्या वादळात अडकल्याचा सैरभैर करणारा अनुभव मिळतो. एखादी ओलेती नायिका स्वीमिंग पुलबाहेर येते. आपल्याच मस्तीत केस झटकते तेव्हा तिच्या केसातील पाणी तुमच्या चेहयावर उडेल, असे वाटून तुम्ही क्षणभर मागे सरकता... नायक-नायिका नखशिखांत हादरवून टाकणा-या रोलर कोस्टरमध्ये बसलेले असतील तर तुम्हालाही वाटेल की, तुम्ही स्वत:ही त्यांच्यासोबत रोलर कोस्टरमध्ये बसून छाती दडपून टाकणारा थरारक अनुभव घेत आहात; पण...
  September 3, 11:47 PM
 • वर्ष १९४८. अमेरिकेतील बेल टेलिफोन लॅबोरेटरीजने सूक्ष्म अशा इलेक्ट्रॉनिक सेमी कंडक्टरचा शोध लावल्याची घोषणा केली. रुपेरी रंगाचा, हातावर ठेवल्यास शेकडोने मावतील असा या सेमी कंडक्टरचा आकार होता. या नव्या उत्पादनाचे नाव काय ठेवायचे यासाठी एका कमिटीची स्थापना करण्यात आली. काही जणांनी त्याचे नाव सेमी कंडक्टर ट्रायोड असे सुचवले, तर काहींनी आयोटाट्रॉन, तर काहींनी ट्रान्सझिस्टर असे सुचवले. अखेर ट्रान्सझिस्टर या नावावर शिक्कामोर्तब झाले. बेल लॅबने या शोधाच्या निमित्ताने एक पत्रक जाहीर...
  September 3, 11:43 PM
 • गणपती किंवा गणेश म्हणजे गणांचा स्वामी. गण म्हणजे समुदाय अथवा जमात. इंद्राला व ब्रह्मणस्पती या देवाला ऋग्वेदात गणपति हे विशेषण वरील अर्थी योजले अहे. ब्रह्मणस्पती हा स्वतंत्र देव इंद्रादिकांसारखा ऋग्वेदात वर्णिला आहे. ऋग्वेदात (११-११२-९) इंद्राला उद्देशून हे गणपती, तू नीट बैस; ज्ञानी वा कवी यांत तू श्रेष्ठ आहेस; तुझ्याशिवाय कोणते कर्म केले जात नाही. असे म्हटले आहे. वेदांच्या संहिता व ब्राह्मणग्रंथ यांमध्ये गणपती ही स्वतंत्र देवता म्हणून कोठेही निर्देशिलेली नाही. गणपतीच्या मूर्तीचे वर्णन,...
  August 28, 06:45 AM
 • स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात भारतीय समाजाला एकत्र करण्यासाठी देव्हा-यातील गणपती सार्वजनिक करण्याची कल्पना मांडली. १८९३ मध्ये टिळकांनी पुण्याला बैठक घेतली. या बैठकीत ब्रिटिशांच्या विरोधात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या बैठकीला मालेगावचे संस्थानिक श्रीमंत गोपाळराव राजेबहाद्दर उपस्थित होते. त्यामुळे संतप्त झालेल्या ब्रिटिशांनी श्रीमंत राजेबहाद्दर यांचे संस्थान खालसा केले. ब्रिटिशांच्या या कारवाईच्या...
  August 28, 06:43 AM
 • मुंबईतील लालबागचा राजा. देशभरातील गणेशभक्तांमध्ये आगळे स्थान प्राप्त केलेला लोकप्रिय गणपती. गर्दीचा उच्चांक दरवर्षी स्थापन करणारा आणि मोडणाराही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून लालबाग परिसरात बसवण्यात येणारा हा गणपती, गेली कित्येक वर्षे गिरगाव चौपाटीला ठरलेल्या मार्गाने विसर्जनास नेण्यात येतो. वाजत गाजत, भक्तांच्या जयघोषात. त्या वेळी कुणी नवपरिणित जोडपे येऊन नवस फेडतात, कुणी आता आपल्या लहानग्याला बाप्पांच्या पायावर घालतात, तर कुणी आजोबा आपल्या नातीला राजाच्या दर्शनासाठी घेऊन येतात....
  August 28, 06:42 AM
 • निजामशाहीतून मुक्त झालेली जनता स्वातंत्र्याचा आस्वाद घेत होती. त्या मुक्त वातावरणात दादासाहेब गणोरकर, बाबुलाल पराती, राजाराम बसैये प्रभृतींनी येथे गणेश महासंघाची स्थापना केली. त्यामुळे उत्सवाला ख-या अर्थाने संघटित स्वरूप आले. पण निजामाचा काळ नुकताच संपलेला होता. रझाकारांमुळे समाजमनाला झालेल्या जखमा भळभळत होत्या. रझाकाराने केलेल्या अत्याचारामुळे मुसलमानही तसे दबूनच राहत असत. अशा वातावरणात हिंदू आणि मुसलमानांमध्ये एकोपा निर्माण करण्याचे काम गणेशोत्सवाने केले. तेव्हा...
  August 28, 06:41 AM
 • माझ्या वडिलांची पाठची बहीण म्हणजे प्रभाआत्या. काळ्या-सावळ्या वर्णाच्या, मध्यम उंचीच्या प्रभाआत्या दिसायला चारचौघींसारख्याच होत्या. नऊवारी साडी, कपाळावर मोठं कुंकू, खोचलेला पदर आणि काहीतरी काम करते आहे, अशीच प्रतिमा माझ्या डोळ्यांसमोर आहे.त्यांचं लग्न वयाच्या १५व्या वर्षी झालं. त्यांना वडिलांनी म्हणजे माझ्या आजोबांनी विचारलं की, मुलगा थोडा वयस्कर आहे आणि त्याचं हे दुसरं लग्न आहे, तुला चालेल का? त्यावर त्या म्हणाल्या, तुम्हाला जे बरोबर वाटेल ते करा. माझे वडील माझं नेहमी चांगलंच करतील...
  August 28, 06:40 AM
 • कारगिलची लढाई होऊन गेल्यानंतर आजपर्यंत एकदाही युद्ध का झाले नाही हा प्रश्न श्रीकांतला त्याच्या पत्नीने अचानकपणे विचारला. हा प्रश्न तिने जेव्हा विचारला त्या दिवशी स्वातंत्र्यदिन होता. सर्वसामान्यांप्रमाणे तेव्हा तिचेही मानस अंतर्बाह्य देशभक्तीने ओतप्रोत भरून वाहत होते. ही क्षणिक उत्तेजनाही असावी. खरेतर श्रीकांत हा मात्र त्या वेळी मनोमन दु:खी होता, कारण या वेळी स्वातंत्र्यदिन हा सोमवारी आला होता. त्यामुळे रविवारची त्याची संध्याकाळ कोरडीच गेली होती आणि सकाळी लवकर उठण्याचा नाईलाजही...
  August 28, 06:39 AM
 • तुमच्याही एव्हाना लक्षात आले असेल आपल्याकडची सगळी शहरे हळूहळू एकसारखी होत चालली आहेत. कोणत्याही गावात जा, ती सारखीच दिसतात. मोठ्या शहरांच्या क्षितिजरेषा पाहून आपण कोणत्या शहरात आहोत, हे सांगणे आता जवळपास अशक्य होऊन बसले आहे. फार पूर्वी नाही; पण एक वीस-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत मुंबई आणि दिल्ली यांच्यात मोठा फरक जाणवायचा. बंगलोर आणि कोलकाता एकमेकांपेक्षा वेगळे दिसायचे. अहमदाबाद आणि हैदराबाद यामध्ये मोठे अंतर होते तसेच पुणे आणि चेन्नई यांच्यातही होते. हल्ली मात्र सगळी शहरे एकाच छापाची...
  August 28, 06:37 AM
 • महाराष्ट्रात आणि केंद्रात सध्या काँग्रेसचे राज्य आहे. इतर काही मोजक्याच राज्यांत (राजस्थान, दिल्ली, हरियाणा) या १२६ वर्षे जुन्या पक्षाची सरकारे आज दिसतात; पण अनेक मोठ्या राज्यांत जसे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरात आणि बिहारमध्ये काँग्रेसची परिस्थिती दुबळी किंवा चिंताजनक आहे. कारण तेथे अनेक वर्षे काँग्रेस सत्तासुखापासून दूर आहे आणि निवडणुकीत सतत पराभूत होत आहे. काँग्रेस म्हटले की सतत खलबते करणारे त्यांचे नेते, भ्रष्टाचार माजवणारे मंत्री - मुख्यमंत्री आणि युवक काँग्रेसचे...
  August 28, 06:36 AM
 • सातासमुद्रापार राहूनही भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे क्रांतिकुंड अखंड धगधगते राहावे, यासाठी आपल्या आयुष्याची समिधा देणारे नाव म्हणजे मादाम कामा. तिरंग्यावर वंदे मातरम् आणि सूर्य-चंद्राच्या प्रतिमांचे रेखांकन, अशा स्वरूपातला भारताचा पहिला राष्ट्रीय ध्वज फडकवणा-या सेनानी म्हणजे, मादाम कामा, अशी वर्णने वाचनात होतीच. त्यातच यापुढे मंत्रालयाचा पत्ता मादाम कामा मार्ग, राजगुरू चौक असाच लिहावा, असा शासन अध्यादेश नुकताच निघाला. त्याची यथावकाश कार्यवाहीही सुरू झाली; पण मनात मात्र मादाम कामा...
  August 28, 06:33 AM
 • भारतीय हवाई दलातील उडत्या शवपेटिका असा बदलौकिक प्राप्त झालेली मिग-२१ जातीची विमाने आता जुनाट व अद्ययावत तंत्रज्ञानदृष्ट्याही पिछाडीला पडलेली असल्याने ती वर्ष २०१५-१६ पर्यंत ताफ्यातून काढून टाकण्यात येणार आहे. मिग-२१ विमानांचे शेवटचे स्क्वाड्रन २०१७मध्ये ताफ्यातून काढण्यात येईल, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री एम. एम. पालम राजू यांनी नुकतीच दिली. मिग-२१ विमानांची जागा एसयू-३० एमकेआय, स्वदेशी बनावटीची लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट, मिडियम मल्टिरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट, पाचव्या पिढीतील...
  August 28, 06:31 AM
 • * अभिनयात जोरदार बॅटिंग सुरू असताना अचानक सूत्रसंचालनाकडे कसा वळलास? - माझ्या एका चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना स्टार प्रवाहकडून आता होऊन जाऊ द्या या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करण्याबाबत विचारणा झाली. शोचे वेगळेपण लक्षात घेऊन मी उत्साहाने काम करण्याची तयारी दाखवली. हल्ली नाटक आणि चित्रपटात व्यग्र असल्याने टीव्ही या माध्यमाकडे तसेही दुर्लक्षच झाले होते. पण या निमित्ताने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर काम करायला मिळणार म्हटल्यावर मी खूश आहे.* यासाठी काही तयारी करावी लागली का?- हो, खरं तर...
  August 27, 10:51 PM
 • गेल्या सहा महिन्यांत बालगंधर्व चित्रपटाचा अपवाद वगळता मराठी चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र दुस-या बाजूला प्रदर्शित होणा-या मराठी सिनेमांची संख्या बेसुमार वाढली आहे. त्यात बाष्कळ आणि सपक विनोदी चित्रपटांचे तर मोठे पीकच फोफावले आहे. पहिल्या फळीचे अनेक कलावंत या सुमार चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसतात. चित्रपट धडाधड पडतात. तरीही विनोदी चित्रपटांनाच गर्दी होते हा निर्मात्यांचा गोड गैरसमज काही दूर होत नाही. त्यात मार्के टिंग व वितरणाची यंत्रणा नसल्याची मराठी...
  August 27, 10:49 PM
 • काही दिवसांपूर्वी इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये एका चित्रपट अभिनेत्याची कॅन्सरशी झुंज सुरू असल्याच्या बातम्या छापून आल्या. फक्त वर्तमानपत्रेच नव्हे तर इंग्रजी वेबसाइटवरही या अभिनेत्याबद्दल छापून आले. आता तुम्ही म्हणाल यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? तर तसे नक्कीच आहे. हा अभिनेता हिंदी, बांगला वा दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील नसून मालेगावसारख्या छोट्या ठिकाणचा व्हिडिओ पार्लरसाठी बनवण्यात येणा-या चित्रपटांचा नायक आहे. मराठी चित्रपटांबद्दल एक ओळही न छापणा-या या इंग्रजी...
  August 27, 10:47 PM
 • एकेकाळी मिस इंडियाचा मुकुट मिरवणारी डॉली मिन्हास सब टीव्हीवरील एका कॉमेडी मालिकेत चक्क आजीच्या भूमिकेत दिसणार आहे. चिंटू चिंकी और एक बडीसी लव्ह स्टोरी या मालिकेत चिंकीची मनाने तरुण आणि रोमँटिक आजी साकारणा-या डॉलीने १९८८ मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला होता. मूळच्या चंदीगडच्या डॉलीने मिस इंडियानंतर चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. बॉम्बे ड्रीम्स यासह तीन हिंदी आणि १५ कन्नड चित्रपटांतून तिने काम केले. त्यानंतर आता चिंटू और चिंकी या मालिकेत ६० वर्षांच्या आजीची भूमिका करणार आहे.मात्र ही...
  August 27, 10:46 PM
 
जाहिरात

RECOMMENDED