Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • महेश भट्टच्या राज चित्रपटातून बॉलीवूडमध्ये दणक्यात एंट्री करून तत्कालीन नट्यांना धडकी भरवणारी हॉट अँड सेक्सी बिपाशा बासू राज ३मध्ये दिसणार आहे. भट्ट ग्रुपच्या राज आणि जिस्ममध्ये चमकल्यानंतर बॉलीवूडमधील तिच्या करिअरला टेक ऑफ मिळाला. मर्डर- २ मध्ये बिपाशाने एक आयटम साँग करावे यासाठी मुकेश भट्ट यांनी तिची भेट घेतली. मात्र हरभ-याच्या झाडावर चढलेल्या बिपाशाने एका गाण्यासाठी सांगितलेली रक्कम ऐकून मुकेश भट्ट यांना चक्करच यायची बाकी राहिली होती. याच कारणामुळे बिपाशाला मर्डर-२च्या सक्सेस...
  August 27, 10:44 PM
 • कृष्णशास्त्रींनी अर्थशास्त्र ही नवीच संज्ञा पॉलिटिकल इकॉनॉमी या अर्थाने वापरली; आणि राज्यव्यवस्था, लक्ष्मीज्ञान आणि देशव्यवहारव्यवस्था या पूर्वीच्या संज्ञा वापरल्या नाहीत. ही नवी संज्ञा त्यांनी का वापरली असावी? चिपळूणकरांनी ग्रंथाच्या प्रस्तावनेत आपल्या ग्रंथाला अर्थशास्त्र परिभाषा हे नाव का दिले याची कारणे दिलेली नाहीत; परंतु या नावाकडे आपण विशेष लक्ष पुरविणे इष्ट होईल. अर्थशास्त्र हा शब्द गेल्या शंभर वर्षांत मराठीत इतका अंगवळणी पडला आहे की फार पूर्वीपासून वापरात असलेला शब्द...
  August 27, 10:39 PM
 • पाकिस्तानात सध्या ईदचे वातावरण असल्याचे गेल्या लेखात म्हटले होते. मुस्लिमांमध्ये सर्वात पवित्र असणारा हा महिना आणि त्यातही सर्वाधिक पवित्र आणि भाग्यशाली असा दिवस म्हणजे रमजान ईद. या अशा भारलेल्या परिस्थितीत करमणुकीची साधने शोधली जातात. सध्या पाकिस्तानात भारतीय चित्रपटांना भरपूर मागणी आहे. केवळ डीव्हीडीजना नव्हे, तर चित्रपटगृहांमध्येसुद्धा! अमिताभ बच्चनची भूमिका असलेला आरक्षण कोणत्याही कात्रीविना सध्या पाकिस्तानातल्या चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळतो आहे. त्याखेरीज जिंदगी ना...
  August 27, 10:37 PM
 • मनीष साबडे यांचा सायकल मॉल म्हणजे सायकलींचे एक अत्याधुनिक म्युझियमच आहे. या मॉलमध्ये जगातील सर्व नामवंत कंपन्यांच्या १६० प्रकारच्या सायकली उपलब्ध आहेत.मनीष साबडे यांचा हा सायकल मॉल कदाचित आशिया खंडातला मोठा सायकल मॉल असावा. मात्र, साबडे म्हणतात की, एवढा मोठा मॉल उभारताना केवळ धंदा हे एकमेव लक्ष्य नजरेसमोर नव्हते. शरीरासाठी व्यायाम आणि दिलखुलास भटकंती आणि मन प्रसन्न करणारा निसर्गाचा सहवास, या कल्पनेतून मी सायकल टूरिझमची कल्पना राबविली. सायकलची आवड आणि आगळ्यावेगळ्या प्रवासाच्या...
  August 27, 10:35 PM
 • एकेकाळी ज्या वर्गाने गरिबीसुद्धा अभिमानाने पेलली, तो मध्यमवर्र्ग जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणानंतर अधिकाधिक आत्मकेंद्री बनत गेला. आत्मप्रौढीत रमला. वाढते उत्पन्न, भौतिक साधनसुविधांची रेलचेल, विस्तारते पर्याय यामुळे तो प्रसंगी मस्तवालही झाला. मध्यमवर्गाचे चित्र आणि चरित्र बदलाची ही केवळ सुरुवात नव्हती, तर त्याचे चारित्र्यही अनिष्ट वळणाला लागण्याचाही तो हाच काळ होता. त्यात प्रामाणिकपणाऐवजी अप्रामाणिकपणा ओसंडून वाहत होता. तत्त्वनिष्ठेऐवजी दांभिकता होती. बांधिलकीपेक्षा...
  August 27, 10:33 PM
 • आपण मागच्या आठवड्यात आहान या नऊ-दहा महिन्यांचा गोड बाळाची गोष्ट पाहिली. त्याच्या नाजूक ओठातून अजून शब्द बोलत नाहीत; पण त्याला सांगता येते. म्हणजे भाषेचे बीज अंकुरू लागले आहे. घरात त्याला कडेवर घेतले म्हणजे तो दरवाजाकडे बोट दाखवतो. दरवाजा उघडला म्हणजे कडेवर असूनसुद्धा त्याचे शरीर पुढे पुढे करतो. घराबाहेर पडले तरी याचे हात लांब करून बोट दाखवणे सुरूच राहते. त्याला पहिजे त्या दिशेला तो तुम्हाला घेऊन जायला लावतो.भाषा ही गुंतागुंतीची गतिमान जैविक क्रिया आहे. ती कशी उत्क्रांत झाली असावी, या...
  August 27, 10:31 PM
 • सध्या वातावरणात सर्वत्र एकाच वेळी बंडखोरी आणि बेबंदशाही दिसते आहे. बंडखोरीत अमूर्त आकांक्षा असतात आणि आशावादही असतो. बेबंदशाहीत एक प्रकारचा बेभानपणा असतो, ज्यात अराजकी बीजे असतात. अनेकदा बंडखोरी आणि बेबंदशाही यातील सीमारेषा स्पष्ट दिसत नाही. त्याचप्रमाणे बंडखोरीचे केव्हा बेबंदशाहीत पर्यवसान होईल हेही सांगता येत नाही. याचे एक कारण म्हणजे दोन्ही प्रवृत्ती सिस्टिमच्या विरोधात असतात.परंतु सिस्टिम म्हणजे काय? असे मानले जाते की, तरुण रक्त बंडखोरीने सळसळत असते. सिस्टिमविरुद्ध म्हणजे...
  August 27, 10:29 PM
 • खग गण दृष्टिसुखाबरोबरच श्रवणसुखाची अनुभूती देतात. प्रेमगीतांची स्फूर्ती, राघू-मैनांचं गुलूगुलू. खगगणांचा स्वर्गीय आनंद लुटावा नवेगाव अभयारण्यात. पक्ष्यांच्या गीतमालेसाठी नांदूर-मधमेश्वर खास अभयारण्य. क्षेत्र लहान, परंतु कीर्ती महान. एवढ्या छोट्या क्षेत्रात पक्ष्यांची अतोनात दाटी म्हणूनही. हजारो पक्ष्यांचा गगन तरंग पाहताना बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात ओळ सहज ओठावर तरळते. व्हाइट स्टॉर्क, पांढ-या मानेचे करकोचे, ब्राह्मणी बदक आणि आमच्यासारखे कृष्णवर्णीय प्रेक्षक. श्वेतवर्णीयांत...
  August 27, 10:27 PM
 • सीओबान लॅम्बर्ट- हर्ले व सुनील शर्मालिखित अतियाज जर्नीज : अ मुस्लिम वुमन फ्रॉम कलोनिअल बॉम्बे टू एडवर्डियन ब्रिटन हे पुस्तक वाचायला घेण्यामागे बरेच उद्देश होते. पहिला म्हणजे, जुन्या काळातील मुस्लिम स्त्रीविषयी हे पुस्तक आपल्याला काही सांगणार आहे. ही स्त्री तय्यबजींच्या घराण्यातील आहे. तय्यबजी काँग्रेसचे अध्यक्ष होतेच, परंतु मुस्लिम लीगचेही संस्थापक होते. अनेक शतकांपूर्वी येमेनहून इराणमार्गे भारतात येऊन वसलेले हे सुलेमानी बोहरा कुटुंब गुजरातेतील खंबातहून मुंबईला व्यापारानिमित्त...
  August 27, 10:25 PM
 • कुटुंबात बाळाचा जन्म हा पन्नास वर्षांपूर्वी आनंदोत्सव असे. त्याच्या आई-बाबांना, आजी-आजोबांना सुखसमाधान वाटेच; परंतु त्याचे काका-काकू, आत्या, दुसरीकडे मामाच्या घरी सर्वत्र आनंद पसरे. त्यात बाळंतिणीची सुटका सुखरूप झाली, बाळ अव्यंग जन्माला आले याचा भाग मोठा असे, कारण वैद्यकीय सुविधा नव्हत्या; सीझर अपवादात्मक परिस्थितीत होई. बाळंतिणीला कळा सहन कराव्या लागत. त्यांतच बाळजन्माचा आनंद साठवलेला आहे, अशी तिची समजूत करून दिलेली असे. बाळंतपणाच्या आधी नऊ महिने गर्भवतीची काळजी घेण्याचे इतके आखलेले...
  August 27, 10:23 PM
 • माधुरी-काजोलपासून ते थेट टाटा-अंबानी, गावसकर-सचिनपर्यंत अनेकांचे पोर्ट्रेट करणारे ज्येष्ठ छायाचित्रकार-लेखक गौतम राजाध्यक्ष का आणि कसे वाचतात, याबद्दल मला नेहमी कुतूहल असते. एकदा त्यांनी तेरेस रेटिंग्टनची नाटके वाचायला मागितली. एकदा हॉलीवूड बायोग्राफी. आताही ते जेन फोंडाचे आत्मचरित्र वाचताहेत. पुस्तकाबद्दल त्यांचे बोलणे ऐकण्यासारखे असते. ते सांगतात, जेन कॅथरीन हेपबर्नबरोबर काम करत होती. हेपबर्न लोकांत फार मिसळत नसे. ती ग्लॅमर टाळत असे.जेनने तिला फॉलो केले. पण अॅक्टर म्हणून व्यक्ती...
  August 27, 10:21 PM
 • आरक्षण सिनेमावरून काही राजकीय पुढारी आणि मीडियाचा एक गट यांनी हवा तापवण्याचा प्रयत्न केला; परंतु फार यश आले नाही; परंतु त्यावरून जुनी आठवण जागी झाली. आरक्षणविरोधी उच्चवर्णियांच्या आंदोलनात उत्तर प्रदेशमध्ये अक्षरश: काही दिवसांत वीस-पंचवीस कोवळ्या तरुण मुलांनी स्वत:ला जाळून घेतले होते. ती सारी मुले अठरा-एकोणीस वर्षांची होती. त्यांच्या अंगात कोणते वेड संचारले होते कोण जाणे? कारण एकदा मृत्यू पावल्यावर त्यांना ना खुल्या स्पर्धेचा लाभ होणार होता, ना चुकीचे...
  August 20, 11:31 PM
 • कुठल्या ना कुठल्या प्रकारचे वाद, हे अलीकडील काळात आपल्या साहित्य संमेलनांचे व्यवच्छेदक लक्षण राहिले आहे. वादांच्या या नौबती साहित्याला चालना देण्यासाठी झडणार असतील, तर त्याला कुणाची ना असण्याचे कारण नाही. पण, साहित्यबाह्य वादाच्या धुरळ्यात पूर्ण संमेलनच झाकोळून जाण्याचे चिंतास्पद प्रकार सुरू झाले आहेत, हे लक्षण काही ठीक नाही. अध्यक्षीय भाषण, कविसंमेलन आणि चार-दोन परिसंवाद वगळल्यास संमेलनाच्या मंडपात फुकाच्या फुगड्या घालण्यावाचून दुसरे काही होत नाही. ज्या मराठी...
  August 20, 11:30 PM
 • निसर्गाला स्वत:चा असा आवाज आहे. केवळ इशारा देणाराच नव्हे तर आनंदाचा मोहर फुलवणाराही. आनंदाचे तरंग उठवणाराही. अरण्याला गंध असतो, नादही असतो. पानांची सळसळ कानांना तृप्ती देते. हिमालयात वायाचे जणू साम्राज्य असते. त्याला स्वत:ची गाज असते; परंतु तो जेव्हा देवदार वृक्षराईतून घुमू लागतो, त्या कंपनाने कानच काय, सारी काया पुलकित होते. समुद्र गाजेचा महिमा म्या पामराने काय वर्णावा?लाडघरच्या किनायावर होतो. भरती ओसरली होती. एका गावकयाच्या सूचनेनुसार पुळणीला कान लावला, आणि अद्भुत नवलाई...
  August 20, 11:27 PM
 • आहान नऊ- दहा महिन्यांचा गोड बाळ. त्याच्या नाजूक ओठातून अजून शब्द बोलत नाहीत; पण त्याला सांगता येते. म्हणजे भाषेचे बीज अंकुरू लागले आहे. घरात त्याला कडेवर घेतले म्हणजे तो दरवाजाकडे बोट दाखवतो. दरवाजा उघडला म्हणजे कडेवर असूनसुद्धा त्याचे शरीर पुढे पुढे करतो. घराबाहेर पडले तरी याचे हात लांब करून बोट दाखवणे सुरूच राहते. त्याला पहिजे त्या दिशेला तो तुम्हाला घेऊन जायला लावतो. हे सगळे घडत असताना नुकतेच वाचलेले काही शोधनिबंध, भाषाविज्ञानासंबंधीचे मला आठवू लागले. सॉसुर, चॉमस्की...
  August 20, 11:26 PM
 • आहान नऊ- दहा महिन्यांचा गोड बाळ. त्याच्या नाजूक ओठातून अजून शब्द बोलत नाहीत; पण त्याला सांगता येते. म्हणजे भाषेचे बीज अंकुरू लागले आहे. घरात त्याला कडेवर घेतले म्हणजे तो दरवाजाकडे बोट दाखवतो. दरवाजा उघडला म्हणजे कडेवर असूनसुद्धा त्याचे शरीर पुढे पुढे करतो. घराबाहेर पडले तरी याचे हात लांब करून बोट दाखवणे सुरूच राहते. त्याला पहिजे त्या दिशेला तो तुम्हाला घेऊन जायला लावतो. हे सगळे घडत असताना नुकतेच वाचलेले काही शोधनिबंध, भाषाविज्ञानासंबंधीचे मला आठवू लागले. सॉसुर, चॉमस्की...
  August 20, 11:25 PM
 • सध्या जगात आर्थिक अरिष्टाचे वादळ घोंगावत आहे. मध्ये काही काळ, अमेरिकेतील मंदी उठली अशी आवई होती. आता इंग्रजी व्ही (V) ह्या अक्षराऐवजी डब्ल्यू (W) ह्या अक्षरासारखा (म्हणजे डबल डीप - दुहेरी डुबकी) मंदीचा ग्राफ असणार आहे, असे अर्थशास्त्रातले विद्वान म्हणतात. ह्या सर्व भेलकांड्याची भीती सर्वसामान्य माणसाला वाटणे स्वाभाविक आहे. काही दिवसांपूर्वी स्टँडर्ड अँड पुअर ह्या संस्थेने अमेरिकेची पतप्रतिष्ठा एक खाच खाली घसरली आहे, असे जाहीर केले. त्या दिवसापासून सर्वांना प्रश्न पडला आहे की...
  August 20, 11:23 PM
 • फाळणी झाली नसती, तर भारत अखंड राहिला असता. म्हणजे हे गृहीत धरून, की काश्मीरपासून त्रावणकोरपर्यंतची सर्व संस्थाने रीतसर व स्वेच्छेने अखंड भारतात विलीन झाली असती! पाकिस्तान, बंगलादेश आणि कदाचित, ब्रह्मदेश ऊर्फ म्यानमारही त्या अखंड भारतात समाविष्ट झालेले असते. भारतीय उपखंडच जणू भारत म्हणून ओळखला गेला असता. रामायण-महाभारतातील संदर्भ घेऊन बोलायचे, तर त्यात गांधारीचा कंदहार (अफगाणिस्तान) आणि रावणाची लंकाही आली असती! म्हणजे मग नेपाळ, भूतानही या महान भू-राजकीय वा भू-सांस्कृतिक विशाल...
  August 20, 11:21 PM
 • ईदच्या पवित्र सणाच्या निमित्ताने पाकिस्तानात दुकाने आणि हॉटेले फुललेली आहेत. तयार कपड्यांच्या दुकानांमध्ये तोबा गर्दी आहे. संध्याकाळी इफ्तारच्या निमित्ताने खाद्यपदार्थांची बाजारपेठही ओसंडून वाहते आहे. गोडधोड पदार्थांना प्रचंड मागणी आहे. संध्याकाळनंतर रस्त्याने जातानाही आपल्याला गोडधोड पदार्थांचे वास अस्वस्थ करत असतात. जिलबी हा पदार्थ असा आहे, की तो लहानथोर, श्रीमंत, गरीब या सर्वांनाच एकदम मनपसंत असतो. कुणाला वाटेल, की जिलबी ही फक्त भारतीयांची मालमत्ता आहे; पण वस्तुस्थिती...
  August 20, 11:14 PM
 • अमरावतीपासून सुमारे ८५ किमी अंतरावर मोर्शी ते चांदूरबाजार चिखली सावंगीमार्गे धारुर गावाजवळून दिसणा-या सातपुडा पर्वतावर सर्वात उंचीवर असलेल्या मुंगसादेव या १४३ फूट बाय २५ फूट रुंद आणि तेवढ्याच उंचीच्या गुहेत प्रचंड शिळेवर अश्मयुगीन चित्रे काढलेली आढळून आलेली आहेत. ज्येष्ठ पुरातत्व संशोधक डॉ. व्ही.टी. इंगोले, वन्यजीव लेखक प्र.सु. हिरुरकर, कुमार पाटील, ज्ञा.अ. दमाहे, पद्माकर लाड, डॉ. मनोहर खोडे या सहा जणांच्या पथकाने या गुहाचित्रांचा शोध लावला आहे. यात वाघ, हत्ती, जिराफासारखा प्राणी,...
  August 20, 11:12 PM
 
जाहिरात

RECOMMENDED