Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • ओसामा बिन लादेनने आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवले आहे म्हणे, की त्याच्या मुलांनी त्याचा मार्ग अनुसरू नये. दाऊदलासुद्धा आपल्या मुलीचे लग्न सुव्यवस्थित स्थळ पाहूनच करावेसे वाटले. आपल्या काळातली निर्दयी आणि क्रूर म्हणून मान्यताप्राप्त अशी ही व्यक्तिमत्त्वे. त्यांनाही आपला मार्ग चुकीचा ही जाणीव का झाली? या जाणिवेमागचे खरे कारण म्हणजे त्यांना समजलेले कौटुंबिक जीवनशैलीचे महत्त्व. सा-या मानवजातीला हे महत्त्व मान्य आहे. म्हणूनच कुटुंबवेड शाश्वत आहे. टर्मिनेटर उपाख्य आर्नल्ड...
  July 3, 12:08 PM
 • ज्ञानपीठ विजेत्या ख्यातनाम हिंदी लेखिका महादेवी वर्मा यांच्यासंबंधीचा एक किस्सा आहे. त्यांच्या अतिकर्मठ घराण्यामध्ये मुलगी जन्मणे मोठे अशुभ मानले जाई. मुलगी जन्मली की तिला दुधाच्या मोठ्या भांड्यामध्ये बुडवून मारण्याची अत्यंत अघोरी प्रथा त्यांच्या कुटुंबात परंपरेने चालत आली होती. महादेवींचा जन्म झाला तेव्हाही लक्ष्मी आयी है... असे अशुभ वर्तमान त्यांच्या आजोबांना देण्यात आले. आजोबांनीही लागलीच उस का गंगार्पण करा दो अशी आज्ञा देऊन टाकली. दुधाच्या हंड्यात बुडवण्यासाठी या छोट्या...
  July 3, 07:17 AM
 • कमर इकबाल कविता म्हणायला उभे राहिले की, एखादा विद्वान प्राध्यापक त्याच्या आवडीच्या विषयावर सिद्धहस्तपणे बोलतोय असं जाणवायचं. त्याच्या धारदार नजरेतून एकाच वेळेस शेकडो रसिकांसमोर ते अशा काही पद्धतीने कविता वाचायचे की, प्रत्येकाला वाटायचे ते फक्त माझ्यासाठीच कविता म्हणत आहेत. ऐंशीच्या दशकात मराठवाड्यात कवितेचे वातावरण होते. दर चार-आठ दिवसाला कुठेतरी मुशायरा वा कवी संमेलन असायचे. आम्ही नव्याने लिहिणारे कवी मोठ्या उत्साहाने कवी संमेलनाला जायचो. ते माझे कॉलेजमधले दिवस होते....
  July 3, 07:10 AM
 • काही दिवसांपूर्वी एक अनोखा अनुभव आला जो कायम आठवणीत राहील. युरोपमधील माध्यमसम्राज्ञी लिझ मोन यांच्याशी बर्लिनमध्ये एका समारंभाच्या निमित्ताने भेट झाली. त्यांनी काही सन्मानितांसाठी भोजन ठेवले होते. लिझ मोन यांच्या मालकीची युरोपमध्ये अनेक वृत्तपत्रे, टेलिव्हिजन चॅनेल, पुस्तक प्रकाशन संस्था आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभात अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांच्यासह अनेक देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान उपस्थित होते. हा समारंभ सुरू होण्यापूर्वी मी अनेकांशी...
  July 3, 05:45 AM
 • जून ते सप्टेंबर असे चार महिने भारताच्या भेटीवर येणाया मान्सूनच्या ढगांचा पाठलाग करण्याची भन्नाट कल्पना सर्वप्रथम डोक्यात आली ती ब्रिटिश लेखक अलेक्झांडर फ्रेटर याच्या. पुढे त्या अनुभवांवर त्याने चेसिंग द मॉन्सून नावाचे पुस्तक ही लिहिले. फ्रेटरच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी आम्ही मित्रमैत्रिणी सज्ज झालो आणि प्रोजेक्ट मेघदूत आकारास आला. सुरुवातीला केवळ एकाच्या डोक्यातून निघालेल्या या वावटळीने आणखी सहा जणांना (आमचे सारथ्य करणारे काका यांना धरून सात) पछाडलं. बघता बघता सगळा प्लॅन ठरला....
  July 3, 05:40 AM
 • लवकरच संसदेत मांडला जाणारा अन्न सुरक्षा कायदा हा केंद्रातील यूपीए सरकारचा सर्वांत महत्त्वाकांक्षी, पुढील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर निर्णायक परिणाम करण्याची क्षमता असणारा आणि क्रांतिकारक कार्यक्रम ठरू शकतो; पण... आणि हा पण खूप महत्त्वाचा आहे.या पणकडे वळण्याअगोदर या कायद्याची क्रांतिकारकता समजावून घेऊ.आज जगभर भारत हा एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला येणार, अशी चर्चा आहे. आपल्याकडील उच्च वर्गाला आणि उच्च-मध्यम वर्गालाही नजीकच्या भविष्यात तसे होणार, याची मनोमन खात्री वाटते; पण जर...
  July 3, 05:36 AM
 • दोन परस्परविरोधी विचारसरणींचा दावा करणा-या; परंतु जागतिक अर्थकारणाची एकच दिशा प्रत्यक्षात अवलंबणा-या अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांना नियतीने एका विशिष्ट भू-राजकीय टप्प्यावर आणून ठेवले आहे. त्यात सत्तासंघर्ष, कुरघोडी, सहकार्य आहेच; परंतु जगाला भेडसावणाया जागतिक महासमस्या - जागतिक तापमानवाढ, प्रदूषण, आर्थिक अरिष्ट, आण्विक संकट - येत्या काळात कोणते रूप धारण करतील, हे या दोन महासत्तांच्या परस्परविरोधी व परस्परपूरक अशा दोन्ही भूमिकांवर अवलंबून आहे.एका अर्थाने इतिहासाच्या ज्या बिंदूवर...
  July 3, 05:29 AM
 • वाढती विषमता, बाजारपेठीय विचारसरणीचा अतिरेक, चंगळवादाचे अतिरिक्त स्तोम, जागतिकीकरणाचा नवा संकुचित अर्थ, ग्लोबलायझेशनची महती सांगतानाच नव्याने निर्माण झालेली धर्माची, जातीची, भाषेची, संस्कृतीची अतिरेकी अस्मिता, या सर्वांना विटून लोक पुन्हा डावे किंवा नवे डावे होतील? की हा नवा डावा भ्रम आहे?सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वी भारतातलीच नव्हे, तर जगभरचे बहुतेक विचारवंत, लेखक, पत्रकार इतकेच नव्हे, तर अगदी चित्रकार आणि चित्रपटकारही डावे होते. डावे म्हणजे अगदी मार्क्सवादी-लेनिनवादी वा माओवादी किंवा...
  July 3, 05:24 AM
 • पाश्चिमात्य देशांत चेरी ब्लॉसम हा वसंतोत्सव. चेरीच्या शुभ्र तसेच पीच, सफरचंदाच्या गुलाबी फुलांनी युरोपातील उद्याने चैतन्यमयी झालेली असतात. मॅग्नेलिया व होडोडेड्रॉनची विविध ढंगी फुले त्यात रंग भरतात. होडोडेड्रॉनची फुले हिमालयातली खोरीही रंगमयी करतात.स्वाद,रुची, गंध हे काहीसे समान गुणधर्म. गंध शब्द उच्चारताच मनात चित्र तरंगते फुलांचे. फुलांबाबतीत एक सर्वसाधारण निरीक्षण असे की ज्या फुलांना बहारीचा गंध नसतो, निसर्ग त्यांच्यावर बहारदार रंग उधळण करतो. रंगाच्या टेक्निकलर शोमध्ये...
  July 3, 04:27 AM
 • जन्नतनंतर तीन वर्षे तुझा एकही चित्रपट का नाही आला?- जन्नतमध्ये मला पहिला ब्रेक मिळाला, पण माझं शिक्षण अपुरं राहिलं होतं. त्या चित्रपटानंतर मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तसेच शिक्षण सुरू असताना दक्षिणेतल्या फिल्ममध्ये मी काम केले, पण तो चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे लोकांना त्याबद्दल कळलेही नाही.बुढ्ढा होगा तेरा बापची आॅफर कशी मिळाली?- एक दिवस अचानक अमिताभजींचा फोन आला आणि या चित्रपटात काम करणार का म्हणून विचारले. अमिताभजींबरोबर कोणाला काम करायला आवडणार नाही. तसेच मला...
  July 3, 04:23 AM
 • मराठवाड्यातील आर्र्थिक दारिद्र्य, कल्पनादारिद्र्य आणि रसिकांचा निरुत्साह हे सिनेमांना हानिकारक ठरले. देखण्या लोकेशन्सचीही मराठवाड्यात प्रचंड मारामार आहे. पैसे खर्च करून उजाड माळरान आणि रखरखीत ऊन कोण पाहणार? मराठवाडी सिनेमात भलत्याच प्रमाण भाषेचे अवडंबर असल्याने प्रेक्षक फिरकले नाहीत.पडद्यावरील धूसर दृश्य, १६ एम. एम. चित्रीकरण, स्टॉक पार्श्वसंगीत आणि प्रचंड कल्पनादारिद्र्य ही मराठवाड्यातील चित्रपटांची वैशिष्ट्ये ३० वर्षांनंतरही ठाण मांडून आहेत. अभिनेते श्रीराम गोजमगुंडे यांनी...
  July 3, 04:18 AM
 • मुंबई - दक्षिणेतील नायकांना बॉलीवूडवर राज्य करण्यात यश मिळाले नाही, परंतु दक्षिण भारतीय चित्रपट शैलीने आणि तेथील नायिकांनी मात्र बॉलीवूडवर अनेक वर्षे राज्य केले. जवळजवळ २५-३० वर्षांनंतर मात्र आता पुन्हा एकदा दक्षिण भारतीय चित्रपट शैलीने बॉलीवूडला ग्रासलेले दिसून येत आहे.बॉलीवूडच्या चित्रपटांवर पुन्हा एकदा दक्षिणेतील चित्रपटांची छाया पडलेली दिसून येत आहे. ७० आणि ८० च्या दशकात बॉलीवूडमधील चित्रपट थेट दक्षिणेच्याच वळणावरचे होते आणि आता पुन्हा दक्षिणेतील चित्रपटांच्या धर्तीवरच...
  July 3, 04:14 AM
 • आमिर खान स्वत:ला फारच ग्रेट समजतो आणि त्याच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणा-या दिग्दर्शकाला तो नेहमी दाबून ठेवतो. अर्थात आमिर स्वत: खूप हुशार आहेच; परंतु दुस-याला कमी लेखण्याचा त्याचा स्वभाव त्याला कधी तरी मारक ठरेल यात शंका नाही. आमिरद्वारा निर्मित पीपली लाइव्ह चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडण्यात आला नाही. चित्रपटाची दिग्दर्शिका अनुषा रिझवीने यासाठी आमिरलाच जबाबदार ठरले आहे. अनुषाने म्हटले होते, माझा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासाठी योग्य होता; परंतु आमिरने मुद्दाम तो...
  June 26, 06:25 PM
 • कैद्यांचे आयुष्य म्हणजे भिंतीमागचा बंदिस्त संसार. साहित्य, मनोरंजन आदी गोष्टींना तिथे थारा नसतो. सुखदु:खाच्या चार गोष्टी करण्याचीही परवानगी नसते; पण या कडेकोट वातावरणातही आता सुधारणांचे वारे वाहू लागले आहे.आईची महानता सारेच सांगतात. परंतु, आईचं आणि मुलाचं नातं कसं असावं, याचं नेमकं दर्शन साने गुरुजींनी आपल्या श्यामची आई या अजरामर कादंबरीत घडवलं आहे. श्यामची ही आई केवळ श्यामपुरतीच मर्यादित नसून ती प्रत्येक मुलाला आपली वाटते. गुरुजींनी आईचेच नाही तर तिच्यासोबत सुसंस्कारित मुलाचेही...
  June 26, 06:18 PM
 • चंद्रकोरीच्या छायेत हे अब्दुल कादर मुकादम यांचे नवे पुस्तक हे त्यांच्या वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन आहे. हे पुस्तक वाचताना मला मुख्यत: जाणवला तो मुकादम यांचा अफाट व्यासंग! आणि स्फुट लेखनाच्या मर्यादा. प्रत्येक लेख वाचताना वाटत राहते, की लेखकाने या विषयावर आणखी खूप लिहायला हवे होते. त्यांचा आवाका मोठा आहे; परंतु आपल्यापर्यंत फारच थोडे पोहोचत आहे. तरीही जेवढे पोहोचले आहे, तेही वाचनीय व मननीय आहे. मुकादम यांनी अत्यंत सोप्या व ओघवत्या भाषेत चंद्रकोरीच्या छायेत लिहिले आहे....
  June 26, 06:07 PM
 • भारतातील संस्कृती प्राचीन आहे. तिचा चार - पाच हजार वर्षांचा इतिहास ढोबळमानाने सांगता येतो. त्या आधीच्या मोहनजोदडो - हडाप्पा - लोथाल वगैरे संस्कृतींचे इतिहास संशोधन बाजूला ठेवले तरी ! जगात इतका काळ अखंड चालत आलेली दुसरी संस्कृती नाही. भारतभूमीवर या प्रकारे मानवी वसाहत टिकून राहिली याचे महत्त्वाचे, परंतु साधे कारण भौगोलिक आणि पर्यावरणीय आहे. अगदी उत्तरेकडचे काही भाग वगळले तर या भूमीत बाराही महिने विनाकपडे, विनाछप्पर आरामात राहता येते. दरवर्षी चार महिने नियमाने पाऊस पडतो, सर्व जमीन धुऊन...
  June 26, 05:58 PM
 • दुस-या महायुद्धाच्या काळात विध्वंसक म्हणून काही रसायनं बनवली गेली. त्यातील काही रसायनांनी कीटक मरतात असे आढळून आले. ही रसायने कीटकांना मारक, परंतु मानवाला सुरक्षित आहेत या श्रद्धेतून कीटकनाशकांची निर्मिती होऊ लागली. यातले महत्त्वाचे कीटकनाशक होते डीडीटी. नोबेल पारितोषिक विजेते डॉ. म्युस्लर यांनी या रसायनाचा शोध लावला.पुढे या कीटकनाशकांचे मानवी आरोग्य आणि एकूणच पर्यावरणावर होणारे घातक परिणाम दृश्य होऊ लागले. रेचल कार्सन या महिलेने १९६२ साली सायलेंट स्प्रिंग नावाचे पुस्तक लिहून हे...
  June 26, 05:05 PM
 • लहानांपासून मोठ्यांपर्यंत, जादू सगळ्यांना आवडते, खेचून घेते. बाप भी खेले बच्चा भी खेले अशी स्थिती. छोटे मोठे जादूगार आपआपल्या परीने खेड्यातील शाळेपासून मोठ्या सभागृहापर्यंत जादूचे प्रयोग करून लोकांचे मनोरंजन करत असतात; पण काही जादूगार जगप्रसिद्ध होतात. जादूगिरीला कलेच्या पातळीवर नेऊन ठेवतात. इतिहास अशा जादूगारांची कलावंत म्हणून नोंद घेतो. हॅरी हुडिनी हा असा एक कलावंत जादूगार. आजही तो एक आख्यायिका होऊन राहिला आहे. हुडिनी : आर्ट अँड मॅजिक हे त्याच्या जीवनावरील प्रदर्शन २७ मार्च २०११...
  June 26, 04:53 PM
 • वर्ल्ड सायन्स फेस्टिव्हल हा जगभरातल्या वैज्ञानिक, कलाकार, गणितज्ञ व विज्ञानाबद्दल कुतुहूल असणा-या लोकांचा कुंभमेळा २००८पासून अमेरिकेत दरवर्षी भरतो. माणसाच्या सौंदर्यकलादी प्रेरणांचा ठाव घेत त्याचा विज्ञानाशी असलेला संबंध तपासणे, विज्ञानाबद्दल आत्यांतिक जिव्हाळा असणा-या सामान्य लोकांना संवादाचे एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि माणसाच्या प्रश्नांचा व भेडसावणा-या कोड्यांचा भविष्यकालीन आढावा घेणे ही त्याची काही प्रमुख उद्दिष्टे आहेत. कला, सौंदर्य, इतिहास व विज्ञान यांचे अतूट नाते...
  June 26, 04:41 PM
 • देशाबाहेर असताना २००६ मध्ये लष्करी उठावात पद गमावून परागंदा अवस्थेत राहायला लागलेले थायलंडचे पदच्युत माजी पंतप्रधान थकसिन शिनवात्रा हे वादळ अजूनही थाई राजकारणात घोंगावतच आहे. गेली जवळजवळ एक दशक ते आधी पंतप्रधान म्हणून आणि नंतर परागंदा राजकारणी म्हणून व परागंदा असूनही लोकांचा पाठिंबा असलेला राजकारणी म्हणून चर्चेत आहेत. त्यांची ही अवस्था कायम राहते का, हे ३ जुलै रोजी थायलंडमध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुका ठरवतील. दुबईत वास्तव्याला असलेले थकसिन शिक्षेच्या भीतीने देशात परतू शकत...
  June 26, 04:29 PM
 
जाहिरात

RECOMMENDED