जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • आहान नऊ- दहा महिन्यांचा गोड बाळ. त्याच्या नाजूक ओठातून अजून शब्द बोलत नाहीत; पण त्याला सांगता येते. म्हणजे भाषेचे बीज अंकुरू लागले आहे. घरात त्याला कडेवर घेतले म्हणजे तो दरवाजाकडे बोट दाखवतो. दरवाजा उघडला म्हणजे कडेवर असूनसुद्धा त्याचे शरीर पुढे पुढे करतो. घराबाहेर पडले तरी याचे हात लांब करून बोट दाखवणे सुरूच राहते. त्याला पहिजे त्या दिशेला तो तुम्हाला घेऊन जायला लावतो. हे सगळे घडत असताना नुकतेच वाचलेले काही शोधनिबंध, भाषाविज्ञानासंबंधीचे मला आठवू लागले. सॉसुर, चॉमस्की...
  August 20, 11:25 PM
 • सध्या जगात आर्थिक अरिष्टाचे वादळ घोंगावत आहे. मध्ये काही काळ, अमेरिकेतील मंदी उठली अशी आवई होती. आता इंग्रजी व्ही (V) ह्या अक्षराऐवजी डब्ल्यू (W) ह्या अक्षरासारखा (म्हणजे डबल डीप - दुहेरी डुबकी) मंदीचा ग्राफ असणार आहे, असे अर्थशास्त्रातले विद्वान म्हणतात. ह्या सर्व भेलकांड्याची भीती सर्वसामान्य माणसाला वाटणे स्वाभाविक आहे. काही दिवसांपूर्वी स्टँडर्ड अँड पुअर ह्या संस्थेने अमेरिकेची पतप्रतिष्ठा एक खाच खाली घसरली आहे, असे जाहीर केले. त्या दिवसापासून सर्वांना प्रश्न पडला आहे की...
  August 20, 11:23 PM
 • फाळणी झाली नसती, तर भारत अखंड राहिला असता. म्हणजे हे गृहीत धरून, की काश्मीरपासून त्रावणकोरपर्यंतची सर्व संस्थाने रीतसर व स्वेच्छेने अखंड भारतात विलीन झाली असती! पाकिस्तान, बंगलादेश आणि कदाचित, ब्रह्मदेश ऊर्फ म्यानमारही त्या अखंड भारतात समाविष्ट झालेले असते. भारतीय उपखंडच जणू भारत म्हणून ओळखला गेला असता. रामायण-महाभारतातील संदर्भ घेऊन बोलायचे, तर त्यात गांधारीचा कंदहार (अफगाणिस्तान) आणि रावणाची लंकाही आली असती! म्हणजे मग नेपाळ, भूतानही या महान भू-राजकीय वा भू-सांस्कृतिक विशाल...
  August 20, 11:21 PM
 • ईदच्या पवित्र सणाच्या निमित्ताने पाकिस्तानात दुकाने आणि हॉटेले फुललेली आहेत. तयार कपड्यांच्या दुकानांमध्ये तोबा गर्दी आहे. संध्याकाळी इफ्तारच्या निमित्ताने खाद्यपदार्थांची बाजारपेठही ओसंडून वाहते आहे. गोडधोड पदार्थांना प्रचंड मागणी आहे. संध्याकाळनंतर रस्त्याने जातानाही आपल्याला गोडधोड पदार्थांचे वास अस्वस्थ करत असतात. जिलबी हा पदार्थ असा आहे, की तो लहानथोर, श्रीमंत, गरीब या सर्वांनाच एकदम मनपसंत असतो. कुणाला वाटेल, की जिलबी ही फक्त भारतीयांची मालमत्ता आहे; पण वस्तुस्थिती...
  August 20, 11:14 PM
 • अमरावतीपासून सुमारे ८५ किमी अंतरावर मोर्शी ते चांदूरबाजार चिखली सावंगीमार्गे धारुर गावाजवळून दिसणा-या सातपुडा पर्वतावर सर्वात उंचीवर असलेल्या मुंगसादेव या १४३ फूट बाय २५ फूट रुंद आणि तेवढ्याच उंचीच्या गुहेत प्रचंड शिळेवर अश्मयुगीन चित्रे काढलेली आढळून आलेली आहेत. ज्येष्ठ पुरातत्व संशोधक डॉ. व्ही.टी. इंगोले, वन्यजीव लेखक प्र.सु. हिरुरकर, कुमार पाटील, ज्ञा.अ. दमाहे, पद्माकर लाड, डॉ. मनोहर खोडे या सहा जणांच्या पथकाने या गुहाचित्रांचा शोध लावला आहे. यात वाघ, हत्ती, जिराफासारखा प्राणी,...
  August 20, 11:12 PM
 • वेदव्यासांच्या महाभारतातील अर्थ एव प्रधानं ह्या उक्तीला अनुसरून, लोकहितवादी यांच्या लक्ष्मीज्ञान या ग्रंथात उद्योगाचे विभाग (म्हणजे आजच्या परिभाषेत श्रम-विभाग) क्रयविक्रय, भांडवल, निर्भयपणा, किंमत, धारा, नफा व मजुरी अशी प्रकरणे असून शेवटचे प्रकरण हिंदुस्थानाविषयी विचार असे आहे. हरी केशवजी यांनी आपला देश व्यवहारव्यवस्था हा ग्रंथ लिहिताना मिसेस मार्सेट या इंग्रज लेखिकेच्या ग्रंथाचा कोठे भाषांतर, कोठे भावार्थ असा उपयोग केला आहे, तसेच जॉन स्टुअर्ट मिलच्या पद्धतीस बहुतेक प्रकरणी...
  August 20, 11:10 PM
 • धनुर्धारी मासिकाच्या अमृत महोत्सवाचा शुभारंभ नुकताच औरंगाबाद येथे समारंभपूर्वक झाला. एकेकाळी महाराष्ट्राच्या विचारविश्वावर ज्यांचा पगडा होता, त्या नवयुग, धनुर्धारी आणि चित्रा या तीन साप्ताहिकांपैकी पहिले व तिसरे कालौघात लयाला गेले, टिकले ते धनुर्धारी. ते आता महिन्यातून एकदा प्रसिद्ध होते आणि ज्योतिष या विषयापुरतेच त्याने स्वत:ला सीमित केले आहे. मात्र, एकेकाळी राजकारण, समाजकारण, साहित्य किंवा अगदी नाटक-सिनेमाच्या विषयातही धनुर्धारीचा शब्द गाजत असे. याचे कारण आधी श्री. रा....
  August 20, 11:06 PM
 • एका कथेचा सारांश सांगायचा होता. खरे म्हणजे प्रस्तुत लेखकाचीच एक कथा त्यासाठी घेतली असती; पण ती पुरेशी प्रभावी असण्याबद्दल शंका आहे म्हणून एका ब्रिटिश लेखकाचे नाव आठवत नाही, त्याचीच अशी एक इंग्रजी कथा घेतो. तात्पर्य वाचकांनी काढायचे. आफ्रिकेतील छोटासा नवस्वतंत्र देश. साम्राज्यवादी वसाहतीतून मुक्तझाल्यावर लोकशाही स्वीकारतो खरे; पण लवकरच अंदाधुंदीमुळे तेथील स्वातंत्र्यवीर अध्यक्ष सैन्यदलाच्या साहाय्याने हुकूमशाही आणतो. अध्यक्ष उदारमतवादी कनवाळू, गरिबांचा त्राता वगैरे....
  August 20, 11:04 PM
 • ऑगस्टच्या सहा तारखेला लंडनच्या उत्तरेकडील टॉटनहॅम या भागात पोलिसांकडून डुगन या नावाचा नागरिक मारला गेला. डुगनने प्रथम गोळी झाडली की, पोलिसांनी हा वादाचा विषय असून चौकशी समितीच याचा निर्णय करू शकेल. पण नंतर पेटलेली दंगल केवळ टॉटनहॅमपुरतीच मर्यादित न राहता ती अनेक ठिकाणी पसरली आणि त्या वेळची दृश्ये टीव्हीमुळे जगभर दिसून जगालाच हादरा बसला. चार दिवस ही दंगल चालू होती. या दंगलीची कारणमीमांसा व उपाययोजना याची चर्चा निरनिराळ्या दृष्टिकोनातून चालू आहे. उल्लेखनीय गोष्ट ही की, या दंगलीचा...
  August 20, 11:00 PM
 • श्रावणाचे अस्सल वैशिष्ट्य काय जाणवते? एवढ्या एकमेव महिन्यातच प्रत्येक स्त्रीचे मानस हे पावित्र्याने भारलेले असते तर, प्रत्येक पुरुषाला विरक्तीची ओढ लागलेली असते. ही विरक्ती स्पष्ट होते ती असंख्य मंडळींच्या दाढी-मिशा वाढलेल्या पाहून! श्रावणात दाढी-कटिंग करू नये, असे व्रत कोणी कोणास सांगून ठेवले होते याचे स्पष्टीकरण मात्र आजवर झालेले नाही. ही वृत्ती का बळावते, याचा शोध घेण्यासाठी म्हणून एक शोध पत्रकार जेव्हा स्टाइल हेअर कटिंग सलूनमध्ये बाबूरावांची मुलाखत घ्यायला गेले तेव्हा...
  August 20, 10:57 PM
 • अच्युत खारकर म्हणजे माझे काका. आता ते ९० वर्षांचे असतील; पण अजूनही काही छोटी- मोठी गोष्ट घडली की मोडक्यातोडक्या अक्षरातली मायेनं ओथंबलेली अच्युतकाकांची पोस्टकार्डे मला येतात. काकांचा इतिहास मोठा रंजक आहे. काकांचे वडील सेलूला वकील होते. त्या काळात त्यांची प्रॅक्टिस खूप चालत होती. असं म्हणत की, काकांना पैसे ठेवण्यासाठी पोती आणावी लागत असत. त्यांचं नाव किसनराव खारकर. त्या काळात वकिलीचे शिक्षण घ्यायचे म्हणजे हैदराबादला जावं लागत असे. हैदराबादला लॉ क्लास करून वकिलीची सनद मिळत असे....
  August 20, 10:57 PM
 • भटकण्याचा मला अजिबात कंटाळा नाही; पण विमान प्रवासात, विशेषत: आंतरराष्ट्रीय प्रवास करताना मध्येच घ्यावे लागणारे थांबे आणि सुरक्षिततेच्या कारणासाठी जरा जास्तच लवकर घरातून बाहेर पडावे लागणे, याचा मात्र वैताग येतो. शिकागोच्या मराठी अधिवेशनासाठी मी पुण्यातून सकाळी साधारण अकराच्या सुमारास निघालो. पनवेलजवळ दत्तला गाडीत डिझेल आणि पोटात कोथिंबीरवडी-वडापाव ढकलल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. दादरला राजा-राणीमधून तिकीट कलेक्ट केल्यानंतर पुन्हा आस्वाद किंवा प्रकाशची चव घ्यायचा मोह होत...
  August 20, 10:50 PM
 • लोकपाल विधेयकावरून सध्या देशात जो काही गदारोळ उडाला आहे हे बघता, या देशात भ्रष्टाचाराव्यतिरिक्त सर्वच समस्या सुटल्या असून फक्त भ्रष्टाचार या एकमेव रोगाला पळवून लावण्याचे काम बाकी राहिले आहे, असा कुणाचा समज होऊ शकतो. एकदा हा भ्रष्टाचार पळवून लावला तर देशात आनंदीआनंद पसरेल, रामराज्य येईल, गरिबांना श्रीमंत लुटणार नाहीत, पोलिसांना चिरीमिरी द्यावी लागणार नाही, जमिनीचे व्यवहार निर्धाकपणे पार पडतील, राजकीय नेते विकास कार्यक्रम धडाडीने राबवू लागतील, कामगार संप करणार नाहीत,...
  August 20, 10:47 PM
 • जुल्फे उलझाये तो दुनिया परेशान होजुल्फे सुलझाये तो ये झिस्त आसां होजुल्फ जंजीर है फिर भी कितनी हसींरेशमी रेशमी अंबरी अंबरीनुसरतमुळे सूफीच्या जन्मखुणा मिळाल्या. या सूफीमुळे सुरांचे भान नाही की ते बेभान आहेत हे सांगणे कठीण ठरू लागले. मैने काबे का हज कर के देख लिया असे म्हणत सहाशे वर्षांच्या इतिहासाचा भूगोल बदलायला लागला. तेरा तुझ को सोप दे, क्या लागत हे मोर... मेरा मुझ मे नहीं जो हावत सो तोर असे म्हणत परमेश्वराला सिंहासनावरून खाली खेचून काळजात खोचायला सुरुवात झाली. पीर, थडगे, उद्ध्वस्त...
  August 20, 10:45 PM
 • लंडन हे शहर जगभरातील बुद्धिवंत, विचारवंत, अभ्यासकांची मक्का आहे. याच शहरातील ब्रिटिश म्युझियमच्या लायब्ररीत बसून कार्ल मार्क्सने भांडवलशाहीच्या जोखडातून समाजाची मुक्तता करणारे तत्त्वज्ञान जगाला दिले. तर भांडवलशाही जागतिक मंदीच्या गर्तेत सापडलेली असताना तिला जगविण्याचे- फुलविण्याचे सूत्र शोधून काढणारा जॉन म्येनार्ड केन्स हा थोर अर्थतज्ज्ञही याच शहराने जगाला दिला. इंग्रज हे व्यापारी मनोवृत्तीचे आहेत, त्यामुळे ते कधीच युद्ध जिंकू शकत नाहीत, असे मानणा-या नेपोलियन बोनापार्टला...
  August 20, 10:42 PM
 • आता काय, सगळीकडे पाऊस पडलाय, सगळीकडे हिरवंगार झालंय. मन वेडं व्हायलाही वेळ लागत नाही. त्यात तो रम्य परिसर, उल्हसित वातावरण आणि त्या जोडीला हवी असणारी प्रिय व्यक्तीची साथ... मग काय विचारायलाच नको. मन उंच उंच आकाशात भरा-या घेते. पावसाळ्यातले ते आउटिंग, सहलीचे वातावरण, घाटात कुठेतरी गाडी खराब होणे, पावसात कुडकुडत ताटकळत उभे राहणे, आहे ते जेवण उभ्या उभ्या भिजतच खाणे, ओल्या हाताने भेळभत्ता चाटत खाणे, याची मजा काही औरच. आणि हे एवढं सगळं झाल्यावर खायला काहीही न उरणे, जवळपास एकही हॉटेल न...
  August 19, 12:08 AM
 • अनेकता में एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. भारताइतके भाषिक वैविध्य इतर कुठल्या देशात नसावे. आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे. चित्रपट व दूरदर्शन वाहिन्यांमुळे काश्मीरपासून (आता) कन्याकुमारीपर्यंत लोकांना हिंदी कळते. अर्थात दक्षिणेत काही वेळा हिंदी कळत असूनही एकवेळ इंग्रजी बोलू; पण हिंदी नाही, असा बाणा दिसतो. आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणी भेटणारी दोन अपरिचित मराठी माणसेही एकमेकांशी हिंदीत बोलतात, चौकशी करतात. तसा आपल्यालाही आपल्या मातृभाषेचा अभिमान आहे. मराठीतून पाट्या व्हायला हव्यात, एफएम...
  August 14, 05:43 AM
 • ये ढ़ाई किलो का हाथ जब किसी पर पड़ता है तो आदमी उठता नहीं, उठ जाता है... दामिनी चित्रपटातील हा डायलॉग ऐकण्यासाठी सनी देओलचे चाहते पुन्हापुन्हा थिएटरला जायचे. सनीची पिळदार शरीरयष्टी पाहून त्याची खात्रीही पटायची. खरा अॅक्शन हिरो कसा असतो त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दामिनीतील सनी देओलची वकिलाची भूमिका. बेताबद्वारा सनीने रुपेरी पडद्यावर आगमन केले. बेताबची गाणी आणि कथानक प्रेक्षकांना चांगलेच आवडले आणि हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला. सनी देओलने आपल्या पित्याची हीमॅनची इमेज कायम ठेवत,...
  August 14, 05:41 AM
 • मित्राचा सकाळी सकाळी फोन आला की, आपण जसे सकाळी उठल्यावर कुटुंबात एकत्र बसून चहा पितो, कौटुंबिक अथवा इतर गप्पागोष्टी करतो, मग प्रत्येक जण आपापल्या नित्यकर्माला लागतो, तसे मुकेश अंबानीच्या घरी होत असेल का? आणि आता, पेडर रोडवर तेवीस-चोवीस मजली इमारतीत त्यांचे छोटे कुटुंब राहू लागल्यावर त्यांच्या एकमेकांशी भेटीगाठी कशा होतील? घरी, निदान जेवणाच्या टेबलावर तरी घरच्या सर्वांनी एकत्र यावे, हा संस्कार फक्त आपल्या मध्यमवर्गीयांसाठी असतो का? त्याच्या प्रश्नांची फैर वाढत चालली होती; पण मला...
  August 14, 05:30 AM
 • हल्ली कुणी वाचत नाही... पुस्तकांच्या प्रती संपत नाहीत... प्रकाशन व्यवसाय डबघाईला आलेला आहे, हा सगळा ठरवून केलेला कांगावा वाटावा, अशी तेजी काउंटरला हातोहात खपणाया वाचकप्रिय पुस्तकांमुळे ग्रंथविक्रेते अलीकडच्या काळात अनुभवत आहेत. बदलती जीवनशैली, बदलत्या आवडी-निवडी, नव्याचे स्वागत करण्याची तरुणाईची मोकळीढाकळी वृत्ती यामुळे वास्तुशास्त्र, पाकशास्त्र, व्यक्तिमत्त्व विकास आदी विषयांवरील मराठी आणि इंग्रजी पुस्तकांना असलेली वाढती मागणी या तेजीच्या मुळाशी असल्याचे दिसून आले आहे. केवळ...
  August 14, 05:26 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात