Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • डिझेल, केरोसीन आणि स्वयंपाकाचा गॅस यांच्या दरात केंद्र सरकारने वाढ केल्यानंतर देशात भाजपसह डाव्यांनीसुद्धा जी काही ओरड केली ती बघता आंतरराष्ट्रीय तेलबाजारात तेल पुरवठा करणारी ओपेक ही संघटना आणि तेलाचे मोठे ग्राहक असलेल्या २८ देशांच्या इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी या दोहोंमध्ये गेले काही महिने सुरू असलेला संघर्ष या लोकांच्या गावीही नाही असे दिसते. इजिप्त आणि लिबिया यांमधील संघर्षामुळे गेले काही महिने कच्च्या तेलाचे मोठे ग्राहक असलेल्या २८ राष्ट्रांना आपली अर्थव्यवस्था...
  July 10, 09:04 AM
 • प्रभाकर कोलते यांचे चित्र एक कोटी रुपयांना विकले गेल्यावर त्यांच्या चाहत्यांना आणि विद्यार्थ्यांना आनंद झाला तो केवळ पैसे मिळाल्याचा नव्हता, तर अमूर्त चित्रकलेसारखी बिकट वाट चोखाळूनही यश मिळवल्याचा. त्यानंतर कोलते यांची चित्रं आणि ते ख-या अर्थाने प्रकाशात आली. पण, जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये उत्तम पोर्ट्रेट चित्रकार असतानाही कोलते यांनी अमूर्ततेची वाट स्वीकारली ती आपले शिक्षक शंकर पळशीकर यांच्यामुळे आणि वाचनामुळे. कोलते यांचे वाचन असे एका विषयाला किंवा लेखकाला धरून असते....
  July 3, 03:11 PM
 • स्वातंत्र्यानंतरच्या चौसष्ट वर्षांत देशातील जवळ जवळ निम्मी धरणे महाराष्ट्रात बांधली गेली. त्याचा फायदा मूठभरांनी लाटला. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात उसासाठी पाण्याच्या अतिरिक्त वापराने जमिनी बरबाद झाल्या, तर सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील अनेक तालुके दर २-४ वर्षातून पडणा-या दुष्काळात आजही भरडले जात आहेत. आनंद विंगकर यांची अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट ही कादंबरी याच परिसरातील कोरडवाहू शेतकरी कुटुंबाची विदारक कथा आहे. पतसंस्थेचे दीड लाखावर कर्ज. गावच्या शंकर...
  July 3, 03:04 PM
 • अलीकडे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असतानाचा एक प्रसंग आठवतो. ते मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील त्यांच्या केबिनमध्ये भेटीगाठी करत बसले होते. बाहेर दोनशे-अडीचशे लोक गटागटाने उभे-बसलेले होते. काही भेटीची वेळ ठरवून आले होते, काही वशिला काढून आयत्या वेळी घुसता येईल अशा अपेक्षेने आले होते. त्यात आमचा एक सहकारी होता. तो वेळ ठरवून एका आमदारांमार्फत तिथे पोहोचला होता. शिंदे एरवी रसिक माणूस. राजकारणाच्या धबडग्यातल्या भेटींचा कंटाळा आला आणि त्याच वेळी सांस्कृतिक क्षेत्रातील एक-दोन माणसे...
  July 3, 02:57 PM
 • अलीकडे कथा-कादंबरीकार कमल देसाई यांचे निधन झाले. त्याच्या आधी नारायण सुर्वे, विंदा करंदीकर, अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, शांताबाई शेळके... अशी बरीच मंडळी काळाच्या पडद्याआड गेली. त्याहीपूर्वी य. दि. फडके, वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, पुल, दळवी, मर्ढेकर, पु. शि. रेगे, द. ग. गोडसे, बाबुराव बागूल, नरहर कुरुंदकर, दीनानाथ दलाल... कितीतरी नावे समोर येतात. प्रश्न असा पडतो की, ही नावे आता मुद्दाम का आठवावी लागतात? त्यांचा बोलबाला लगेच का ओसरतो? विक्रेत्यांकडील त्यांची पुस्तके मागे का पडतात? ग्रंथालयांत त्यांच्या...
  July 3, 02:46 PM
 • आग्य्राच्या गल्लीबोळातून रिक्षा जायला लागली की या बोळाच्या शेवटी कुठे तरी जगातली सर्वोत्तम सौंदर्याची वास्तू उभी आहे, यावर विश्वास बसत नाही. एक छोटासा रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूला दुकानांची प्रचंड गर्दी. रिक्षावाला अशा काही कसरत करत असतो, की जणू प्रत्येकाला खो देत असावा. सोमनाथाच्या मंदिराकडे जाणारा रस्ताही त्याला अपवाद नाही. फरक फक्त एवढाच की इथे रस्ता मोठा आहे आणि ज्या परिसरातून तो आपल्याला घेऊन येतो तो नारळाच्या दुतर्फा झाडांनी भरून गेलेला. कोकण पाहिलेले असेल तर सोमनाथाचा...
  July 3, 01:28 PM
 • पाकिस्तानमध्ये संगीताची अवस्था काय आहे ते मी माझ्या गेल्या लेखात स्पष्ट केले होते. सदारंग अर्काइव्ह्जने संगीतविषयक संशोधन करायला मला एवढी चालना दिली, की पाकिस्तानमध्ये शास्त्रीय संगीताला आज असे दारोदार का भटकावे लागते, याचा शोध घ्यायला हवा असे वाटू लागले. कित्येक वर्षांपूर्वी रोशनआरा बेगम भारतात यायच्या आणि मिरजेच्या उरुसात गायच्या. तेव्हा त्यास जमलेल्या गर्दीमध्ये मी नव्हतो, पण माझे वडील असायचे. त्यामुळे लाहोर ही त्या संगीताची जननी असताना आणि जिथे गांधर्व महाविद्यालयासारख्या...
  July 3, 01:21 PM
 • प्रस्तुत सदराचे नाव ब्लोइंग इन द विंड असे आहे. ब्लोइंग इन द विंड ही बॉब डिलन ह्या गायकाची कविता आहे. बॉब डिलनवर ह्या सदरात त्यांच्या सत्तरीनिमित्त एक लेख दोन भागांत प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच खो खो आणि ग्रँडस्लॅम ह्या सदराचा शेवट करतानाही ह्या गाण्याचा उल्लेख केला आहे. तेव्हा त्याविषयी थोडेसे विस्ताराने लिहिण्याची गरज आहे. हे गाणे १९६३ मध्ये फ्रीव्हिलिन या बॉब डिलनच्या अल्बममध्ये प्रथम प्रसिद्ध झाले. या गाण्याला प्रचारकी गीत असा दर्जा मिळाला असून मूलत: ते शांतता, युद्ध आणि...
  July 3, 01:13 PM
 • गेल्या महिन्याभरात नांदेड दोनदा चर्चेत आले. पहिले निमित्त झाले ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यंदाच्या परीक्षेत नांदेडचा राहुल चंदावार राज्यात पहिला आणि देशात पंधरावा आल्याचे आणि दुसरे निमित्त झाले ते स्टार माझाने दिलेल्या बातमीनुसार उच्च माध्यमिक परीक्षेतही नांदेडच्याच विद्यार्थिनीने 98.16 टक्के गुण मिळवत राज्यभरातले बहुधा पहिले स्थान पटकावल्यामुळे... पण या दोघांच्या गुणवत्तेची आणि त्यांनी नांदेडला मानाचं स्थान मिळवून दिल्याची ताजी आठवण तिस-यांदा निघाली ती नांदेडच्याच आणखी...
  July 3, 12:53 PM
 • न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अल-कायदा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने २००१मध्ये हल्ला केल्यानंतर अमेरिकेने ओसामा बिन लादेनविरोधात पुकारलेल्या लढ्याचे एक पर्व त्याच्याच मृत्यूमुळे समाप्त झाले आहे. दहा वर्षांच्या या लढाईत अमेरिकेने अब्जावधी डॉलर खर्च केले, हजारो सैनिकांची प्राणाहुती दिली. एक वेळ अशी आली होती की लादेन अमेरिकेच्या हाती कधीच लागू शकणार नाही, अशी शक्यता होती. अमेरिकन जनतेनेही अफगाणिस्तानात तैनात केलेल्या फौजा माघारी याव्यात यासाठी ओबामा सरकारवर दबाव...
  July 3, 12:40 PM
 • मंजिरी आणि तिचे दोन पुरुष सहकारी कार्यालयीन कामासाठी मुंबईहून रत्नागिरीला गेले होते. परतीच्या प्रवासाची रेल्वेची तिकिटे ऐन वेळी मिळाली नाहीत. त्यामुळे तिघे रात्री रत्नागिरीहून सुटणा-या स्लीपर कोच बसने मुंबईकडे निघाले. या बसमध्ये सुमारे अडीच फूट रुंद आणि पाच फूट लांब असे बर्थ होते, ज्यावर अर्थातच दोन व्यक्ती झोपणे अपेक्षित होते. मंजिरीला ही व्यवस्था पाहून धक्का बसला; परंतु वेळेत घर गाठायचे होते. आणि दुसरा कोणताच पर्याय रात्री 11 वाजता त्या परक्या गावात उपलब्ध नव्हता.बसमध्येही बर्थ...
  July 3, 12:34 PM
 • ओसामा बिन लादेनने आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवले आहे म्हणे, की त्याच्या मुलांनी त्याचा मार्ग अनुसरू नये. दाऊदलासुद्धा आपल्या मुलीचे लग्न सुव्यवस्थित स्थळ पाहूनच करावेसे वाटले. आपल्या काळातली निर्दयी आणि क्रूर म्हणून मान्यताप्राप्त अशी ही व्यक्तिमत्त्वे. त्यांनाही आपला मार्ग चुकीचा ही जाणीव का झाली? या जाणिवेमागचे खरे कारण म्हणजे त्यांना समजलेले कौटुंबिक जीवनशैलीचे महत्त्व. सा-या मानवजातीला हे महत्त्व मान्य आहे. म्हणूनच कुटुंबवेड शाश्वत आहे. टर्मिनेटर उपाख्य आर्नल्ड...
  July 3, 12:08 PM
 • ज्ञानपीठ विजेत्या ख्यातनाम हिंदी लेखिका महादेवी वर्मा यांच्यासंबंधीचा एक किस्सा आहे. त्यांच्या अतिकर्मठ घराण्यामध्ये मुलगी जन्मणे मोठे अशुभ मानले जाई. मुलगी जन्मली की तिला दुधाच्या मोठ्या भांड्यामध्ये बुडवून मारण्याची अत्यंत अघोरी प्रथा त्यांच्या कुटुंबात परंपरेने चालत आली होती. महादेवींचा जन्म झाला तेव्हाही लक्ष्मी आयी है... असे अशुभ वर्तमान त्यांच्या आजोबांना देण्यात आले. आजोबांनीही लागलीच उस का गंगार्पण करा दो अशी आज्ञा देऊन टाकली. दुधाच्या हंड्यात बुडवण्यासाठी या छोट्या...
  July 3, 07:17 AM
 • कमर इकबाल कविता म्हणायला उभे राहिले की, एखादा विद्वान प्राध्यापक त्याच्या आवडीच्या विषयावर सिद्धहस्तपणे बोलतोय असं जाणवायचं. त्याच्या धारदार नजरेतून एकाच वेळेस शेकडो रसिकांसमोर ते अशा काही पद्धतीने कविता वाचायचे की, प्रत्येकाला वाटायचे ते फक्त माझ्यासाठीच कविता म्हणत आहेत. ऐंशीच्या दशकात मराठवाड्यात कवितेचे वातावरण होते. दर चार-आठ दिवसाला कुठेतरी मुशायरा वा कवी संमेलन असायचे. आम्ही नव्याने लिहिणारे कवी मोठ्या उत्साहाने कवी संमेलनाला जायचो. ते माझे कॉलेजमधले दिवस होते....
  July 3, 07:10 AM
 • काही दिवसांपूर्वी एक अनोखा अनुभव आला जो कायम आठवणीत राहील. युरोपमधील माध्यमसम्राज्ञी लिझ मोन यांच्याशी बर्लिनमध्ये एका समारंभाच्या निमित्ताने भेट झाली. त्यांनी काही सन्मानितांसाठी भोजन ठेवले होते. लिझ मोन यांच्या मालकीची युरोपमध्ये अनेक वृत्तपत्रे, टेलिव्हिजन चॅनेल, पुस्तक प्रकाशन संस्था आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभात अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांच्यासह अनेक देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान उपस्थित होते. हा समारंभ सुरू होण्यापूर्वी मी अनेकांशी...
  July 3, 05:45 AM
 • जून ते सप्टेंबर असे चार महिने भारताच्या भेटीवर येणाया मान्सूनच्या ढगांचा पाठलाग करण्याची भन्नाट कल्पना सर्वप्रथम डोक्यात आली ती ब्रिटिश लेखक अलेक्झांडर फ्रेटर याच्या. पुढे त्या अनुभवांवर त्याने चेसिंग द मॉन्सून नावाचे पुस्तक ही लिहिले. फ्रेटरच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी आम्ही मित्रमैत्रिणी सज्ज झालो आणि प्रोजेक्ट मेघदूत आकारास आला. सुरुवातीला केवळ एकाच्या डोक्यातून निघालेल्या या वावटळीने आणखी सहा जणांना (आमचे सारथ्य करणारे काका यांना धरून सात) पछाडलं. बघता बघता सगळा प्लॅन ठरला....
  July 3, 05:40 AM
 • लवकरच संसदेत मांडला जाणारा अन्न सुरक्षा कायदा हा केंद्रातील यूपीए सरकारचा सर्वांत महत्त्वाकांक्षी, पुढील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर निर्णायक परिणाम करण्याची क्षमता असणारा आणि क्रांतिकारक कार्यक्रम ठरू शकतो; पण... आणि हा पण खूप महत्त्वाचा आहे.या पणकडे वळण्याअगोदर या कायद्याची क्रांतिकारकता समजावून घेऊ.आज जगभर भारत हा एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला येणार, अशी चर्चा आहे. आपल्याकडील उच्च वर्गाला आणि उच्च-मध्यम वर्गालाही नजीकच्या भविष्यात तसे होणार, याची मनोमन खात्री वाटते; पण जर...
  July 3, 05:36 AM
 • दोन परस्परविरोधी विचारसरणींचा दावा करणा-या; परंतु जागतिक अर्थकारणाची एकच दिशा प्रत्यक्षात अवलंबणा-या अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांना नियतीने एका विशिष्ट भू-राजकीय टप्प्यावर आणून ठेवले आहे. त्यात सत्तासंघर्ष, कुरघोडी, सहकार्य आहेच; परंतु जगाला भेडसावणाया जागतिक महासमस्या - जागतिक तापमानवाढ, प्रदूषण, आर्थिक अरिष्ट, आण्विक संकट - येत्या काळात कोणते रूप धारण करतील, हे या दोन महासत्तांच्या परस्परविरोधी व परस्परपूरक अशा दोन्ही भूमिकांवर अवलंबून आहे.एका अर्थाने इतिहासाच्या ज्या बिंदूवर...
  July 3, 05:29 AM
 • वाढती विषमता, बाजारपेठीय विचारसरणीचा अतिरेक, चंगळवादाचे अतिरिक्त स्तोम, जागतिकीकरणाचा नवा संकुचित अर्थ, ग्लोबलायझेशनची महती सांगतानाच नव्याने निर्माण झालेली धर्माची, जातीची, भाषेची, संस्कृतीची अतिरेकी अस्मिता, या सर्वांना विटून लोक पुन्हा डावे किंवा नवे डावे होतील? की हा नवा डावा भ्रम आहे?सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वी भारतातलीच नव्हे, तर जगभरचे बहुतेक विचारवंत, लेखक, पत्रकार इतकेच नव्हे, तर अगदी चित्रकार आणि चित्रपटकारही डावे होते. डावे म्हणजे अगदी मार्क्सवादी-लेनिनवादी वा माओवादी किंवा...
  July 3, 05:24 AM
 • पाश्चिमात्य देशांत चेरी ब्लॉसम हा वसंतोत्सव. चेरीच्या शुभ्र तसेच पीच, सफरचंदाच्या गुलाबी फुलांनी युरोपातील उद्याने चैतन्यमयी झालेली असतात. मॅग्नेलिया व होडोडेड्रॉनची विविध ढंगी फुले त्यात रंग भरतात. होडोडेड्रॉनची फुले हिमालयातली खोरीही रंगमयी करतात.स्वाद,रुची, गंध हे काहीसे समान गुणधर्म. गंध शब्द उच्चारताच मनात चित्र तरंगते फुलांचे. फुलांबाबतीत एक सर्वसाधारण निरीक्षण असे की ज्या फुलांना बहारीचा गंध नसतो, निसर्ग त्यांच्यावर बहारदार रंग उधळण करतो. रंगाच्या टेक्निकलर शोमध्ये...
  July 3, 04:27 AM
 
जाहिरात

RECOMMENDED