जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • जेनिफर लोपेझ...अर्थात जे लो. हॉलीवूडच्या झगमगाटात चमकणारे बहुचर्चित नाव. रेखीव चेहरा, एखाद्या अॅथलीटला शोभणारे ग्रेसफुल असे व्यक्तिमत्त्व. न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या जेनिफरच्या घरात संगीताची परंपरा नव्हती. तिची आई शिक्षिका, तर वडील कॉम्प्युटर स्पेशालिस्ट. चाणाक्ष बुद्धीच्या जेनिफरने शिक्षणासोबतच नृत्याचीही आवड मनोमन जपली. पुढे शिक्षण संपल्यानंतर एकीकडे नोकरी करत असताना नाइट क्लबमध्ये नृत्य सादर करून ती आपली नृत्याची हौस भागवत असे. जेनिफरने आपल्या करिअरची सुरुवात बॅक डान्सर...
  July 30, 11:23 PM
 • ज्यू परिवारात जन्मलेली गायिका एमी वाइनहाऊस वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी स्वत:च्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली. जॅझ म्युझिकमधला एक आश्वासक आवाज कायमचा बंद झाला. लहानपणीच एमीला गायनाची गोडी लागली. शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन एमीने गायनक्षेत्रातच करिअर करायचे ठरवले. सुरुवातीला एका लोकल बँडमध्ये गाणारी एमी हळूहळू यशाची एकेक शिखरे पादाक्रांत करू लागली. फारच कमी वयात तिने म्युझिकच्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला. लाइव्ह परफॉर्मन्स देताना तिने लिहिलेल्या म्युझिकने तरुणाईला वेड...
  July 30, 11:00 PM
 • नो पॉलिटिक्स, नो कास्ट, जस्ट क्रिकेट ही घोषणा होती १९११ मध्ये भारतातून इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या पहिल्या क्रिकेट संघाची. पतियाळाच्या महाराजांची ही टीम भारतातून आलेली पहिली क्रिकेट टीम होती. मात्र, तरीही पहिल्या अधिकृत कसोटी सामन्याचा बाप्तिस्मा मिळायला भारताला तब्बल १९३२पर्यंत वाट पाहावी लागली. १९११च्या संघातील १८ खेळाडूंच्या जवळपास आठ ते दहा वेगवेगळ्या भाषा होत्या. खाण्या-पिण्याच्या सवयी वेगळ्या, आचार-विचार वेगळे, चालीरीती वेगवेगळ्या. क्रिकेटच्या मैदानावर जाण्याआधी अनेक...
  July 24, 10:44 AM
 • योगायोग म्हणा किंवा आणखी काही म्हणा, धोनीचा भारतीय संघ वेस्ट इंडीज दौ-यावरून विजयी होऊन इंग्लंडला पोहोचला आहे. अगदी तसेच आम्ही १९७१ मध्ये विंडीजला मालिकेत १-० असे हरवून इंग्लंडविरुद्ध मालिका खेळायला गेलो होतो. सोबर्सच्या वेस्ट इंडीज संघाला धूळ चारल्याचा आत्मविश्वास ओसंडून वाहत होता. आम्ही इंग्लिश क्रिकेट हंगामाच्या दुस-या अर्ध्यात तेथे गेलो होतो. पाकिस्तान संघ आमच्या आधी खेळून गेला होता. दुस-या अर्ध्यात गेल्यामुळे चांगल्या हवामानाची अपेक्षा होती. विशेषत: प्रारंभीचे सराव सामने...
  July 24, 10:38 AM
 • नदी ही एक पर्यावरणीय व्यवस्था असते. ती डोंगरात उगम पावते, उतारावरून वाहत येताना गाळ मैदानात आणते. जमीन सुपीक करते. तीच गाळपेर शेती. कोल्हापूरला हातकणंगले आणि अन्य तालुक्यांत यालाच पोयट्याची जमीन म्हणतात. खोयातून नदी समुद्राकडे जाते. भरतीच्या वेळी समुद्राचं खारं पाणी नदीतून उलटं वर चढतं. म्हणून तर नदी जिथे समुद्राला मिळते त्याला नदीचं मुख म्हणतात. नदी अनेक मुखांनी समुद्राला मिळते, उदाहरणार्थ गंगा. त्या प्रदेशाला त्रिभुज प्रदेश म्हणतात. प्राथमिक शाळेत शिकलेला भूगोल मोठा झाल्यावर...
  July 24, 10:29 AM
 • भूलोकी यंदाही चांगली पर्जन्यवृष्टी होईल, असा अंदाज शेषनागाने बांधला होता. शेषनागाला मानवमित्राचा पुरस्कार मिळून गेल्याने त्याला मानवजातीच्या कल्याणाची नेहमीच काळजी आहे. या काळजीमुळेच यंदाही इंद्रदेव पावसाबाबत वरुणराजाला काय बोलले आहेत, याची तो माहिती घेण्याच्या प्रयत्नात होता. कैलास पर्वतावरून दोन तक्षक ती माहिती देण्यासाठीच खास आज पाताळात आले होते. शेषनागाने पहिल्या तक्षकाला विचारले, काय खबर आहे? पहिला तक्षक म्हणाला, वरुणराजांनी गेल्या वर्षी जसे मेघांचे कलश भरभरून वसुंधरेवर...
  July 24, 10:24 AM
 • मंजी माझ्या आजोळी केरकचरा काढून अंगण लख्ख ठेवायची. मंजी सहा ते साडेसहा फूट उंच, काळाभोर रंग, दाट कुरळ्या केसांचा अंबाडा, मोठे टपोरे डोळे, भिरभिरती नजर, हसली की मशेरी लावलेले काळे कुळकुळीत दात दिसत. आम्ही दिवाळीच्या, उन्हाळ्याच्या सुटीमध्ये आजोळी गेलो की, दुपारी मंजीची भेट व्हायची. ती साधारण दहा अकरा वाजता यायची. दोन्ही वाड्यांतली अंगणं, बाहेरचं अंगण झाडून पुसून लख्ख करायची. अंगणातल्या मोया स्वच्छ करायची. मग हात-पाय स्वच्छ धुऊन येऊन समोरच्या पाय-यांवर बसून येणाया पाहुण्यांची चौकशी...
  July 24, 10:17 AM
 • दुसरे महायुद्ध संपल्यावर जगात नवे देश निर्माण होण्याची प्रक्रिया संपुष्टात येईल, असे मानले जात होते. मात्र, १९९३ मध्ये इथिओपियातून एरिट्रिया, तर २००० मध्ये इंडोनेशियाचे विघटन होऊन जेव्हा पूर्व तिमूर हे देश निर्माण झाले, तेव्हा जाणवले की ही प्रक्रिया सहजासहजी संपणारी नाही. जुलै २०११मध्ये पूर्व आफिकेत दक्षिण सुदान हा नवा देश निर्माण झाला. भारताने या संधीचा योग्य तो वापर करून आफ्रिका खंडातील राजकारणात चीनचा जो वरचष्मा झालेला आहे त्याला शह दिला पाहिजे. या दृष्टीने भारताने सुरुवात...
  July 24, 10:10 AM
 • चार-पाच वर्षांपूर्वी प्रसिद्ध इंडो-अँग्लियन लेखक सलमान रश्दी यांनी एक विचित्र निरीक्षण केले होते. त्यावर निदान भारतात तरी खळबळ माजायला हवी होती. पण तसे झाले नाही. का ते कळत नाही. भारतीय लेखक इंग्रजी भाषेतून जे साहित्य लिहितात तेच भारताच्या आत्म्याचे खरेखुरे दर्शन घडविणारे साहित्य होय, असे त्यांचे म्हणणे. विशेषत: भारतीयांच्या इंग्रजी कादंब-या म्हणजेच खरी भारतीय कादंबरी. भारतीय भाषांमधील (नेटिव्ह, व्हर्नाक्युलर) कादंबरी ही संकुचित, अपूर्ण चित्र उभे करणारी म्हणून तिला भारतीय म्हणता...
  July 24, 10:05 AM
 • मुंबईसह महाराष्ट्राचे नष्टचर्य संपले नाही आणि नजीकच्या काळात संपण्याची चिन्हे नाहीत. मुंबईत तीन ठिकाणी झालेल्या दहशतवाद्यांच्या बॉम्बस्फोटांमुळे प्रत्येकाच्या मनात हाच विचार आला असेल. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष निवडणुकीपुरते एकत्र येऊन मंत्रिमंडळ बनवण्यात यशस्वी होतात; पण नंतर त्यांच्यात सतत चढाओढ चालू असते. कारभाराचा विचका संपत नाही. त्यांच्या जागी विरोधी पक्ष आल्यामुळे काही बदल होण्याची आशा नाही. राजकीय पक्षांची ही नादानी महापालिका आणि राज्य सरकार या...
  July 24, 09:57 AM
 • नुकताच फुकेत या नयनरम्य गावाला जाण्याचा योग आला. या आधी परदेशात ब-याच वेळा जाऊन आल्यामुळे फुकेतला जाण्याचं नावीन्य नव्हते; परंतु फुकेतमध्ये मात्र नावीन्य आहे, असे समजले. बँकॉक, फुकेत ही नावे माझ्याकडून सारखी ऐकल्यामुळे आणि फुकेत हे नाव काही परदेशातले वाटत नसल्यामुळे आमच्या गावात ब-याच जणांना मी बँकेत चाललो असेच वाटले; पण ज्यांना थायलंडचे सगळे काही माहीत आहे, त्यांना आपण पट्टाया, फुकेतला चाललो असे सांगताना मात्र लाजायला होते. फुकेतला विमान उतरताना निसर्गाचा विलक्षण सुंदर आविष्कार...
  July 24, 09:50 AM
 • काही वर्षांपूर्वी महंमद हनीफ यांनी लिहिलेल्या एका प्रहसनात्मक कादंबरीचे नाव होते अ केस ऑफ एक्स्प्लोडिंग मँगोज. पाकिस्तानचे एकेकाळचे हुकूमशहा सत्ताधीश झिया उल हक यांच्यावर लिहिलेली ही कादंबरी आहे. आज ती आठवायचे कारण म्हणजे पाकिस्तानी निर्यातदार सध्या त्यांच्याकडून निर्यात होणा-या आंब्यांसंबंधी चिंतेत आहेत. अमेरिकेने त्यांच्या आंब्यांच्या निर्यातीला बळ मिळावे म्हणून मदत सुरू केली होती; पण आता त्यांनी ती आणि त्यांच्याकडून अमेरिकेत होणारी आयातही काही काळासाठी थांबवली आहे....
  July 24, 09:43 AM
 • परस्यूट ऑफ हॅपीनेस, रिफॉर्म्सचे मृगजळ आणि रिफॉर्म्स-कसले रिफॉर्म्स? या तीन स्फुटांमधून आजच्या जीवनविषयक ज्वलंत विषयाला स्पर्श करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ह्या प्रश्नाच्या मुळाशी फक्त अमेरिका आहे, असे नव्हे. उल्लेखलेल्या ४०-५० हजार मल्टिनॅशनल कॉर्पोरेशन्स या जगातील श्रीमंत देशांतील श्रीमंत लोकांच्या मालकीच्या आहेत. त्यातील अधिकतर कंपन्या अमेरिकन आहेत हे खरे असले तरी जी-८ देशांची पूर्ण नसली तरी काही प्रमाणात मालकी अशा कंपन्यांवर आहे. याचे ठळक उदाहरण द्यावयाचे झाले तर...
  July 24, 09:31 AM
 • कोणतीही भाषा शिकण्याची एक परिभाषा असते. ती आत्मसात केली की मूळ भाषा आपलीशी होते. ब-याचदा मूळ भाषा तितकीशी शुद्ध बोलणे आपण सोडून देतो. शुद्धलेखनाचे नियम धाब्यावर बसतात आणि समोरच्यापर्यंत भावना पोहोचताहेत ना, मग कसेही बोलले तरी चालते, अशी धारणा पक्की होते. ही अशुद्ध बोलण्याची सवय ज्या मोठ्यांना मोडायचीय किंवा लहानांना लागूच द्यायची नाही, त्यांच्यासाठी माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेले लिहावे नेटके हे दोन खंडांमधले पुस्तक ज्योत्स्ना प्रकाशनाने गेल्या वर्षी बाजारात आणले. सहाशेहून...
  July 24, 01:09 AM
 • महाराष्ट्राच्या साहित्यिक-सांस्कृतिक चळवळीत ग्रामीण साहित्याबाबत सुगीची अवस्था असताना दुसरीकडे महानगरी संवेदनांचे लेखक हरवले असावेत की काय, अशी अवस्था निर्माण झाली आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात झोकून देत मक्त अर्थव्यवस्थेचा अवलंब केल्यानंतर बदललेल्या आर्थिक हितसंबंधांनी शेतकरीवर्गाची उत्तरोत्तर परवड कशी होत गेली, त्याचे प्रभावी रेखाटन अलीकडील काळात सदानंद देशमुखांपासून आसाराम लोमटे- आनंद विंगकरांपर्यंतच्या लेखकांनी कमालीच्या संवेदनशीलतेने केले आहे. गावगाड्याच्या...
  July 24, 01:04 AM
 • लस टोचणीस्मॉल पॉक्स देवी हा विषाणूमुळे होणारा रोग. १७९६ मध्ये एडवर्ड जेनर याने यावर लस शोधून काढली. गायीला होण्याया देवीला वॅक्सिनिया म्हणतात. गायी वासरांबरोबर काम करणायांना वॅक्सिनिया होतो; पण त्यांना देवी हा भयावह रोग होत नाही, हे जेनरच्या लक्षात आले. त्याने वॅक्सिनियाची लस माणसांना टोचायला सुरवात केली. ज्यांना लस टोचली त्यांना देवीपासून संरक्षण मिळाले. वॅक्सिनियापासून वॅक्सिनेशन हा शब्द तयार झाला व जगभर पसरला. जेनरच्या खूप आधी भारतात व चीनमध्ये देवी झालेल्या माणसाच्या अंगावरील...
  July 17, 01:36 AM
 • सत्तेच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदाच्या सिंहासनाला अनन्यसाधारण महत्त्व असते. राज्याच्या राजकारणातले सर्वाेच्च पद असलेल्या या मुख्यमंत्रिपदाचा आजवरचा इतिहास नाना लटपटी-खटपटी, शह-काटशह, दगाबाजी, विश्वासघात आणि अतर्क्य घटना-प्रसंगांनी भरलेला आहे. त्याचीच ही झलक...आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभर काँग्रेसचे पानिपत झाले होते. महाराष्ट्रातील ४८पैकी २८ जागा काँग्रेसला गमवाव्या लागल्यामुळे महाराष्ट्रात लगेचच विधानसभा निवडणुका घेऊन हे राज्यही ताब्यात घ्यावे, असे विचारमंथन...
  July 17, 01:27 AM
 • विधिमंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या (१९८७-८८) वेळची परिस्थिती, आजच्या तुलनेत कितीतरी स्थिर, आश्वस्त आणि आशावादी होती. राजीव गांधींनी उत्साहाने आणलेले कॉम्प्युटर पर्व लोकांचे कुतूहल वाढवीत होते. देश एकविसाव्या शतकात नेण्याची त्यांची आकांक्षा तरुणांना स्फूर्तिदायक वाटत होती. राजीव गांधी तेव्हा फक्त ४४ वर्षांचे होते आणि अवघा देश तरुणाईने सळसळत होता. राजीव गांधींच्या पाकिस्तान आणि चीन भेटीनंतर तर भारतीय उपखंडातील वातावरण शांततेच्या मार्गावर असेल, असे वाटू लागले होते. पण त्या...
  July 17, 01:19 AM
 • महाराष्ट्र विधिमंडळाला १९ जुलै २०११ रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त अमृतमहोत्सवी वाटचालीतील विचारप्रवर्तक भाषणांचे संकलन असलेल्या नोंदी या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येत आहे. या ग्रंथाला दैनिक दिव्य मराठीचे मुख्य संपादक कुमार केतकर यांची प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...इतिहास आणि राजकारण एकमेकांमध्ये अशा रीतीने गुंफलेले असते की, त्यांना एकमेकांपासून विभक्त करणे अशक्यच. महाराष्ट्र विधिमंडळाचा ७५ वर्षांचा इतिहास अर्थातच त्या त्या वेळच्या राजकारणाने ओतप्रोत...
  July 17, 01:19 AM
 • भायखळा मार्केट ही एक अजब जागा होती. तिथे अडीच किलोपेक्षा कमी भाजी विकली जात नसे. अनेक छोटे भाजी विक्रेतेदेखील तिथे माल घ्यायला यायचे.मुंबईत, म्हणजे चेंबूरला आम्ही राहत होतो त्या वेळी एका मोठ्या बाजारात अनेकदा जात होतो. पहाटे अगदी लवकर उठून साडेपाच वाजेपर्यंत भायखळा भाजी मार्केटमध्ये मी माझ्या वडिलांबरोबर जात असे. त्या वेळी आमची मॉरिस किंवा हिंदुस्तान गाडी होती. माझे वडील डिकी भरून भाजी घ्यायचे, घरी आल्यावर फ्रिज भाजीनेच भरून जायचा.भायखळा मार्केट ही एक अजब जागा होती. तिथे अडीच किलोपेक्षा...
  July 17, 01:09 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात