Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • दुस-या महायुद्धाच्या काळात नाझी सैन्याकडून माणसांसोबतच प्राण्यांवर होणा-या अत्याचारांनी विलियम वान इलन हादरून गेला. भुकेच्या, क्रौर्याच्या, अमानुषतेच्या त्या आठवणींतून त्याच्या मनाची सुटका होत नव्हती. अशाच एका क्षणी एका कल्पनेने त्याला वेढले : मासांचे उत्पादन शरीराच्या बाहेर प्रयोगशाळेत करता आले तर?युद्धाची दाहकता भयाण असते, जाणिवा बोथट करणारी. दुस-या महायुद्धात अशा ज्या हजारो जाणिवांची राख झाली, त्यात नेदरलँड्सच्या विलियम वान इलनचा समावेश होता. तारुण्यात असतानाच, नाझी फौजांनी...
  June 5, 08:37 PM
 • ओबामांची लोकप्रियता घटत चालली असतानाच ओसामा बिन लादेन त्यांच्या जाळ्यात सापडला आणि निदान त्यानंतर काही दिवस ओबामांची लोकप्रियता जरा वाढली होती. परंतु ओसामाची शिकार केल्याचा राजकीय फायदा किती काळ टिकेल हे सांगता येणार नाही. कारण त्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ले वाढले आहेत आणि अल कायदाच्या दहशतवाद्यांनी ओसामाबद्दलचा सूड युरोप- अमेरिकेतच घेतला जाईल अशा धमक्याही दिल्या आहेत. त्या धमक्या पोकळ आहेत असे समजून चालणार नाही. कारण ओसामाच्या हत्येनंतर काही दिवसांतच अल कायदाच्या...
  June 5, 02:54 PM
 • खांडू मोनपा जमातीतल्या गेलुपा पंथाचे होते... मोनपा जमातीत अंत्यसंस्कारांचा भाग म्हणून मृत व्यक्तीच्या शरीराचे 108 तुकडे केले जातात आणि ते नदीत सोडण्यात येतात...पण सुधारणावादी खांडूंचे अंत्यसंस्कार अशा पद्धतीने केले जाणार नाहीत याचा निर्णय घेण्यात आला...पण खांडूंची लोकप्रियताच एवढी व्यापक होती की, एकाच वेळी जन्मभूमी तवांग आणि कर्मभूमी इटानगर अशा दोन्हीही ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला...अरुणाचलचे दिवंगत मुख्यमंत्री दोरजी खांडू यांच्याशी झालेल्या एप्रिल महिन्यातल्या...
  June 5, 02:02 PM
 • किमान तीन पिढ्यांना वेड लावणारा बॉब डिलन नुकताच 70 वर्षांचा झाला. जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींवर अजूनही त्याची जादू का चालते? बॉब डिलनचा उल्लेख किंवा ओळख नक्की कोण म्हणून करावी, हा एक कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. फोक, ब्लूज, रॉक अशा अनेक पाश्चात्त्य संगीत प्रकारांमध्ये त्याचे नाव इतर कोणत्याही कलाकारापेक्षा मोठे असले तरी बॉब डिलन हा काही रॉक स्टार नव्हे. पाश्चात्त्य देशांमध्ये कुणीही व्यक्ती लोकप्रियतेच्या अगदी शिगेपर्यंत पोहोचली की त्या व्यक्तीला रॉक स्टार म्हटले जाते. प्रसिद्धी,...
  June 5, 01:52 PM
 • कराचीमध्ये नौदलाच्या पीएनएस मेहरान या हवाई तळावर हल्ला झाला, त्याच दिवशी संध्याकाळी कराचीत कुस्त्यांचे जंगी मैदान झाले. सध्या तेथे जाहीर कार्यक्रम होत नसले, तरी कव्वालीला बरे दिवस आले आहेत. कव्वालीचे नाव उच्चारले की गुलाम फरीद साब्री, मकबूल अहमद साब्री, कमाल साब्री, मेहमूद गझनवी साब्री आदी नावे आठवतात. या साब्री बंधूंपैकी काही भारतात जन्मले आणि नंतर पाकिस्तानात गेले, तर काहींचा जन्म तिकडेच झाला. ते सगळे इनायत सेन साब्री यांच्याकडे गाणे आणि कव्वाली शिकले. वार्षिक उरुसांमध्ये कव्वाली...
  June 5, 01:43 PM
 • अजित भुरे निर्मित काटकोन त्रिकोण या नाटकाचा शंभरावा प्रयोग नुकताच विजया मेहता यांच्या उपस्थितीत पार पडला. मानसोपचारतज्ज्ञ आणि अभिनयकौशल्याने घाशीराम कोतवालमधली नाना फडणविसाची भूमिका जगाच्या कानाकोप-यात पोहोचवणारे डॉ. मोहन आगाशे यांची या नाटकातील भूमिका विशेष गाजतेय. या नाटकाविषयी आणि त्यातल्या भूमिकेच्या प्रवासाविषयी त्यांना काय वाटते?आपण आपल्या मुलाबाळांचा म्हणजे आपल्या पुढच्या पिढीचा जरा जास्तच विचार करतो. त्यांचे पालनपोषण करणे ही पालकांची नैसर्गिक जबाबदारी असते; मान्य आहे....
  June 5, 01:37 PM
 • पावसाळा तोंडावर येताच महाराष्ट्रातल्या विठ्ठलभक्तांना पंढरीच्या वारीचे वेध लागतील. अनेक संतांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेला मराठवाडाही आषाढातल्या या सावळ्याच्या उत्सवासाठी आतुर होईल. आषाढात माऊलीच्या दुधासारखा घननिळा बरसू लागतो आणि पंढरीच्या सावळ्याचा उत्सव सुरू होतो. अलंकापुरीहून श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली आणि देहूहून तुकोबाराय यांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात. वैष्णवांचे डिंगर, दिंड्या, पताकांचे भार घेऊन पंढरीच्या पायवाटेला लागतात. पंढरीये माझे माहेर...
  June 5, 01:15 PM
 • बादलदांना अपघात झाल्याचे कळल्यावर कोलकात्यामधील मित्र-मैत्रिणींना फोन लावले. पण बहुतेक सगळे त्यांना विसरले होते. शेवटी बादलदांचा ठावठिकाणा शोधून मी कोलकात्याला जाऊन थडकलो. नाटक-सिनेमासाठी नव्हे, तर केवळ त्यांची भेट घेण्यासाठी आलो आहे हे कळल्यावर बादलदांचे डोळे पाणावले... मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येवर उपाय शोधण्यासाठी, तसेच वाहतूक आणि इतर नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने, १९६६च्या सुमारास एक समिती नेमली होती. या उच्चस्तरीय समितीमध्ये नगर नियोजन तज्ज्ञ या...
  June 5, 01:06 PM
 • अंडर के.जी.चा मराठीतून खरा गर्भितार्थ म्हणजे कमी (बौद्धिक) किलोग्रॅमचे बालक. मृगासारखे अल्लड, चपळ असलेले हे मुक्त, निष्पाप बालक तसे या वयात बौद्धिक कुपोषित असते. त्याला मोकळेपणातून आपोआपच गंमतज्ञान मिळत असते. असे असले तरी त्याची मम्मी त्याला हट्टाने प्रीप्रिपरेटरी स्कूलमध्ये टाकून देते. जल म्हणजे जीवन. या जीवनाची निर्मिती आणि या निर्मितीच्या सोहळ्याची सुरुवात करून देणारे हे नक्षत्र असल्याने या काळातच अर्थात जून महिन्यातच सुजाण नागरिक निर्माण व्हावे यासाठी त्यांना ज्ञानामृत पाजणाया...
  June 5, 12:55 PM
 • महाराष्ट्रातील उत्तर भागात असलेल्या धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याचा खानदेश हा विभाग. याच खानदेशात विशेषत: जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस असलेला सातपुडा पर्वत म्हणजे महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशातील नैसर्गिक सीमारेषा आहे. या सातपुड्यात मुख्यत: आदिवासी जमातीची लोकवस्ती आहे. पावरा, बारेला, भिल्ल, पारधी, पाडवी जमाती प्रामुख्याने वर्षानुवर्षे या भागात राहतात. नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या सातपुड्यात अनेक वर्षांपासून स्वभावत: शांत, प्रामाणिक नि काटक असलेल्या आदिवासींची वस्ती आहे....
  June 5, 12:49 PM
 • तथाकथित भोगवादी समाजात जन्मलेले हॅन्सी क्रोनिए किंवा आर्नल्ड श्वार्झनेगर सत्याचा स्वीकार करण्याची हिंमत दाखवतात तशी हिंमत आपले अजय जडेजा, अझरुद्दीन किंवा नारायण दत्त तिवारी का दाखवू शकत नाहीत? सगळे काही भोगून सावपणाचा आव आणण्याचा निर्लज्जपणा आपल्याकडच्या या मंडळींमध्ये कशाने येतो? दर पंधरा दिवसांनी वाचकांशी संवाद साधण्यासाठी संधी देणा-या थर्ड आयची सुरुवात कोणत्या विषयाने करावी, याचा विचार मनाशी करत असताना सचिन तेंडुलकरबद्दल कुरकूर करणारा मोहम्मद अझरुद्दीन टीव्हीवर दिसला....
  June 5, 12:43 PM
 • सेक्युलर पक्षाच्या अनुनयवादी राजकारणामुळे मुस्लिम समाजाचे दुहेरी नुकसान झाले. एकीकडे या समाजात आधुनिकीकरणाची प्रक्रिया खोळंबली, तर दुसरीकडे हिंदुत्ववादी प्रवृत्ती अधिक प्रबळ व आक्रमक झाला. बाबरी मशिदीचा विध्वंस, त्यानंतरच्या हिंसक दंगली, गुजरातमधील वंशविच्छेदी हिंसाचार, हा याच अनुनयवादी राजकारणाचा परिपाक होता...भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वर्षांतच संविधान तयार झाले. देशातील शोषितांना, वंचितांना विकासाची संधी मिळावी हे स्वातंत्र्याचे उद्दिष्ट होते. त्यामुळेच न्याय,...
  June 5, 12:16 PM
 • राजकारण हे नेहमीच इतर जातींच्या द्वेषावर आणि इतर जातींना वगळणारे असते. ते कितीही सामाजिक न्यायाची, लोकशाहीची, जातिव्यवस्था अंताची व समतेची भाषा बोलत असले तरी ते जात्यंधताच पसरवीत असते. अशांनी फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेणे ही लोकांची केलेली धूळफेक आहे. नेहरू युगामध्ये राजकीय स्थैर्य व सामाजिक एकोपा भारताने अनुभवला त्याचे रहस्य हे या प्रभुत्वशाली जाती आणि प्रबळ वर्ग यांच्या साहचर्यात होते. सत्तरीच्या दशकानंतर हे साहचर्य नष्ट होण्याची प्रक्रिया जी सुरू झाली, ती साधारण नव्वदीच्या...
  June 5, 12:09 PM
 • दलित चळवळीचे बारा वाजले, ते एसआरएसारख्या योजनांमुळे. आजघडीला बहुतांश दलित कार्यकर्ते बिल्डरांच्या सेवेत रुजू आहेत. ज्या मंचावरून सम्यक क्रांतीची स्वप्ने दाखविली जात होती, त्या मंचावरून आज दीपकभाऊ निकाळजे भाषण करतात...'अस्सल रेव्होल्युशनरी काव्य स्रवणारा नामदेव ढसाळ हा सत्तरीच्या दशकात केवळ दलित तरुणांसाठीच नाही तर शोषितांच्या जनलढ्यांमध्ये वाहून घेणा-या प्रत्येकासाठीच चे गव्हारा होता. आणि ज्या दलित पँथरच्या उबदार कुशीत नामदेव ढसाळ, राजा ढाले, अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे यांच्या...
  June 5, 12:02 PM
 • आंतरराष्ट्रीय अल कायदा या दशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन संपल्याने अमेरिकेसह सगळ्या जगाने सुटकेचा नि:श्वास टाकला. आता लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदा ही संघटना दहशतवाद बंद करील आणि जगभर शांतता पसरेल, असा विश्वास शाळकरी मुलालाही वाटत नाही. मात्र तो मारला गेल्याने अमेरिका, पाकिस्तान, अरब राष्ट्रे (काही प्रमाणात भारत) आणि काही युरोपीय देशांमध्ये थोडेफार बदल घडण्याची शक्यता आहे. जानेवारी २००९मध्ये अध्यक्षपदावर निवडून आलेले बराक ओबामा यांची लोकप्रियता २०१०मध्ये ब-यापैकी...
  June 2, 02:20 PM
 • 'बालगंधर्व' चित्रपटात सुबोध भावे याच्या सकस अभिनयाने सर्वांची वाहवा मिळवली; पण गंधर्वांच्या पदांचा सुखद पुन:प्रत्यय देणारा गायक मात्र अजून पडद्याआड राहिला आहे. खरे तर या चित्रपटातील गीतांचे मोल मोठे आहे. बालगंधर्वांच्या तोंडी असलेली ही विविध नाट्यपदे गाणारा गायक म्हणजे, आनंद भाटे. पण आनंदची इतकीच ओळख असू शकत नाही. खासकरून 'मला मदन भासे हा', 'कशी या त्यजू पदाला' ही पदे एेकल्यावर तर नाहीच नाही. कारण या पदांत नारायणरावांच्या हरकती, त्यांनी घेतलेल्या जागा आनंदने हुबेहूब सादर केल्या आहेत....
  June 2, 02:06 PM
 • 'चिन्ह' या चित्रकलेला वाहिलेल्या अंकाचा 'नग्नता विशेषांक' येत्या आठ-पंधरा दिवसांत मुंबईतून प्रकाशित होत आहे. त्याचे संपादक-संचालक सतीश नाईक इंटरनेटवरून गेले काही महिने या अंकाचा प्रसार करत होते. 'नग्नते'च्या आकर्षणामुळे की काय, लाखापेक्षा अधिक वाचकांनी या अंकात रस दाखवला आहे. परिणामी नाईक खूष आहेत. कारण यंदा प्रथमच 'चिन्ह'ची मोठी आवृत्ती निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण या सुखद कहाणीला एक 'ट्विस्ट' आहे. एका हिंदुत्ववादी संघटनेने या अंकाविरुद्ध आवाज उठवण्याची धमकी दिली आहे. त्यांचा...
  June 2, 01:54 PM
 • आपल्या येथील पुस्तक प्रदर्शन किंवा जत्रा म्हणजे प्रचंड कोलाहल, धूळ, पुस्तकांच्या स्टॉल्समध्ये चिक्कार गर्दी, प्रकाशकांचे स्टॉल्स म्हणजे पुस्तकांचे रचलेले गठ्ठे व त्यांची मोठमोठी पोस्टर्स, वाचकांविषयी विशेष अनादर असणारे (काही अपवाद वगळून) पुस्तक विक्रेते, कुठलीच नेमकी किंवा ठोस माहिती न देऊ शकणारं माहिती केंद्र, वाचकांशी संवाद साधण्यास वेळ नसणारे किंवा उत्सुक नसणारे महान प्रकाशक व लेखक, 'आजची पिढी वाचतच नाही' म्हणणारे कुरकुरे प्रकाशक, माझ्या कवितेची दखलच घेतली जात नाही, असं सांगणारे...
  June 2, 01:40 PM
 • महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने राज्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून गेल्या वर्षी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर भव्य लेझर शो योजला. त्यासाठी अनेकरंगी फोल्डर छापला. त्या फोल्डरमध्ये पहिले पान उलटल्या उलटल्या ठसठशीत शीर्षक होते - 'अभिजात लोककला!' लोककला हे महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. वासुदेव, गोंधळी, शाहीर असे काही कलावंत दोन-तीन दशकांपूर्वीपर्यंत समाजात वावरताना दिसायचे. आधुनिक काळात त्यांना स्थान राहिलेले नाही. लोकजीवनातून निर्माण व विकसित झाली ती लोककला....
  June 2, 01:32 PM
 • जसे वाचक तसे त्यांचे लेखक, तशा त्यांच्या संस्था आणि तसा त्यांचा कारभार! आपल्या मराठी भाषेला आणि साहित्याला हे वर्णन पूर्णपणे लागू पडते. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उदाहरण पाहा. गावात तिचा पत्ता विचारलात तर पुणेकरांना तो ठाऊक असेलच असे नाही. ज्या टिळक रोडवर तिची छोटीशी वास्तू उभी आहे, ती चिमुकली इमारत आपल्याला दिसेलच असे नाही. दिसली तरी त्यात हालचाल असेलच असे नाही. आणि हालचाल असली तरी त्यात जिवंतपणा असेलच असे नाही! मग त्या वास्तूचा पुनर्विकास करण्याचा घाट वारंवार घातला जातो;...
  June 2, 01:27 PM
 
जाहिरात

RECOMMENDED