Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • नदीचे पाणी समुद्राला मिळते तेव्हा त्या खाऱ्या गोड्या पाण्याच्या मिश्रणावर काठाला मॅंग्रोव्ह वने फोफावतात. त्यावर कीटकांची अमाप उत्पत्ती होत असते. त्यावर मासोळया, मोठे मासे असे अनेक जलचर पोसले जातात. सामुद्रिक जीवसृष्टीचे चक्र मूलत: वनस्पतीवर अवलंबून असते. मानवाला उपयुक्त अशा मध, लाकूड, जलचर, मेण, टरपेंटाईन, कार्बोहायड्रेटस् आदी अनेक गोष्टींनी ही वने समृद्ध असतात. तसेच वाघ, कोल्हे, हरणे, मगरी, पाणमांजरे, सरपटणारे प्राणी, अशा अनेक जीवांना ही वने आधारवत असतात. मुख्य म्हणजे चक्रीवादळे, पूर,...
  June 2, 01:20 PM
 • प्रत्येक भाषेचे रूप वेगळे असते. या रूपाचे काही निकष आहेत. त्यावर भाषा शिकायला सोपे का कठीण हे ठरवता येते. ध्वनिवर्ण आणि लेखनचिन्हे यांच्या साम्याचे गुणोत्तर हा एक निकष. ते जितके एकास एक तितकी भाषा सोपी. इटालियन भाषेत लेखनचिन्हे व उच्चार-ध्वनीवर्ण यांचे गुणोत्तर ३३:२५ असे आहे. इंग्लिश भाषेत एकाच अक्षराचे अनेक उच्चार असतात. उदाहरणार्थ बी यू टी बट आणि पी यू टी पुटमध्ये यू अक्षराचे उच्चार वेगवेगळे आहेत. इंग्लिशमध्ये हे गुणोत्तर ११२:४ असे आहे. चिनी भाषेत लेखनचिन्हे म्हणजे कॅरॅक्टर्स असतात....
  June 2, 01:12 PM
 • आपल्याकडे धर्मश्रद्धांना चुचकारीत राहणे हाच मुळी राजकारण्यांचा उद्योग होतो. ज्या वेळी धर्म हा लोकभावना भडकावू शकणारा घटक होतो, तेव्हा मालकी हक्क ठरवून भागत नाही. ते काम न्यायालयाने ते करावे की सरकारने करावे हा वेगळा प्रश्र आहे. पण केवळ तांत्रिकदृष्ट्या मालकी हक्क ठरवून न्यायालयातले प्रकरण संपले तरी लोकांच्या मनात ते धुमसत राहते. वस्तुत: अशा जागेचा धर्मनिरपेक्ष उपयोग केला जाईल, असे सर्व संबंधितांना सांगण्याची सरकारची हिंमत पाहिजे...३0 सप्टेंबर २0१0 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या...
  June 2, 01:07 PM
 • डॉ. मनमोहन सिंग आणखी किती काळ पंतप्रधानपदी राहतील? समजा, पुढच्या वर्षी त्यांची राष्ट्रपतिपदाचा उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाने निवड केली, तर पंतप्रधान कोण होईल? प्रणव मुखर्जी, राहुल गांधी की कुणीतरी... 'डार्क हॉर्स' म्हणजे ए. के. अॅन्टनी, सुशीलकुमार शिंदे की पी. चिदम्बरम? याच प्रकारचे प्रश्न महाराष्ट्राबद्दलही विचारले जात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादींची आघाडी किती काळ तग धरील? केंद्रात काही बदल होऊन त्याच्या परिणामी राज्यातही काही पडझड वा उलथापालथ झाली तर प्रस्थापित आघाडी विस्कटेल आणि...
  June 2, 01:00 PM
 • भारत -चीन युद्धाला पन्नास वर्षं होत आल्याचा उल्लेख निघाला होता... मोठ्या अभिमानानं ते म्हणाले होते, आता तेव्हाचा भारत राहिलेला नाही, तसंच तेव्हाचं भारतीय लष्करही राहिलेलं नाही... बदलत्या परिस्थितीची कल्पना चीनला असल्यानंच पुन्हा कुणी काही थेट कुरापत काढील अशी शक्यता आता तरी दिसत नाही... एप्रिलच्या चार तारखेची गोष्ट... अरुणाचलच्या सीमावर्ती भागाला भेट देण्यासाठी आम्ही काही समवयस्क-समविचारी मित्र गुवाहाटीत उतरलो होतो... गुवाहाटी विमानतळावर आमच्या स्वागतासाठी आमचा एकेकाळचा रोजमित्र दीपक...
  June 2, 12:46 PM
 • मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील देशांमध्ये गेल्या काही काळात उठाव झाले. खरे तर उठावांमागील सामान्य लोकांच्या असंतोषाचे कारण तेथील दशकानुदशके असलेल्या हुकूमशाही आणि घराणेशाही राजवटी हे होते. ही घराणेशाही तेथील नवीन पिढीला अजिबात नको होती. अरबांची नवीन पिढी सुशिक्षित आणि सुजाण आहे. अल्लाने आपल्याला दिलेल्या तेलावर ताबा मिळवून हे हुकुमशाह अतिश्रीमंत आणि सुखासीन जीवन जगतात आणि सुसंस्कृत, सुशिक्षित जनतेला आधुनिक सोयी-सुविधा, सुखांपासून वंचित ठेवतात, याची जाणीव त्यांना आहे....
  June 2, 12:38 PM
 • मृत माणूस आणि सागर!ते लिहितात, 'आम्ही आमच्या अमानवी शक्तिकेंद्राला (प्लँचेटसदृश) लादेनशी संपर्क साधण्यास सांगितले. लादेनच्या आत्म्याशी आम्ही बोलू लागलो.'आम्हाला सांगा, की अबोटाबादमध्ये ज्या रात्री तुम्हाला मारण्यात आले तेव्हा नेमके काय घडले?' 'श्रीमान ओसामा, तुम्हाला आम्ही काय म्हणतो आहोत ते ऐकू येते आहे काय?'बुडबुडे, बुडबुडे, बुडबुडे...'मला वाटते, आपल्यातून निघून गेलेल्या आत्म्याशी संपर्क साधण्यात आम्हाला यश आले असावे. श्रीमान ओसामा, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतो आहे का?' 'होय, पण मी आता कोठे...
  June 2, 12:30 PM
 • पाकिस्तानात खोलवर घुसून अमेरिकेने ओसामा बिन लादेनची हत्या केली. त्यामुळे सर्व जगात पाकिस्तानची फजिती आणि नाचक्की झाली, तसेच अमेरिका-पाकिस्तानचे संबंध तुटण्यापर्यंत ताणले. याबद्दल आपल्याला हर्षवायू होता कामा नये. उलट हा प्रकार फारच गांभीर्याने घ्यायला हवा. पाकिस्तान हा द्विधा मन:स्थितीत सापडलेला अशांत व अस्वस्थ देश आहे. तेथील एका शांतताप्रिय राजकीय गटाला सुरळीत लोकशाही हवी आहे, तर दुसऱ्या लष्करी व मूलतत्त्ववादी गटाला आक्रमक हुकूमशाही. हा दुसरा गट देशाला दुष्ट अशा गुंड प्रवृत्तीकडे...
  June 2, 12:20 PM
 • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आवाका असलेला व्यासंग, विषय, वैविध्य, सुस्पष्ट विचार आणि टोकदार भाष्य ही ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांच्या लिखाणाची खास वैशिष्ट्ये. मराठी वृत्तपत्रसृष्टीवर व्यापक प्रभाव असलेले तळवलकर गेली सहा दशके आपल्या ठाशीव विचारांनी मराठी वाचकांचे वाचनविश्व समृद्ध करीत आले आहेत. त्यांच्या लेखणीतून उतरलेले हे सदर दर पंधरवड्याला प्रसिद्ध होईल.अमेरिकन खास सुरक्षा सैनिक पथकाने ओसामाचा अंत केला असला तरी जगभर मोठे बदल होण्याची नजीकच्या काळात शक्यता नाही. ओसामाचा...
  June 2, 12:11 PM
 • भटकणं, भेटणं, भरभरून बोलणं या तीन गोष्टींत मला विलक्षण रस. त्यामुळे मी 'निमित्त' मिळताक्षणी गावोगावी भटकतो. 'ठिकाणां'ची अट नसते. न्यूयॉर्कच्या मॅनहटनमधल्या फुटपाथपासून कोकणातल्या आंबा घाटापर्यंत कुठल्याही रस्त्यावर असू शकतो. आदल्या रात्री टोकियोत कार्यक्रम करून पहाटे मुंबई विमानतळावर उतरून, लगेचच्या 'मुंबई-भुसावळ' गाडीत बसून, रात्री जळगावात कार्यक्रम करू शकतो. वाहनाची अट नसते. उपलब्ध असेल तर सोयीसाठी विमान, नाहीतर झुकझुक गाडी किंवा इनोव्हा. वाटेत गाडी बंद पडली तर गाडी ड्रायव्हरकडे...
  June 2, 12:01 PM
 • सर्वत्र उन्हं तापलेली आहेत. दिवस खूपच मोठा झालेला आहे. दिवसभरातील बहुतांश वेळी वारा थांबून आहे. सूर्याचा दाह नकोसा वाटतो आहे. तापल्या रस्त्यावर भरदुपारी चालण्याची कल्पनाच मनाला दचकवणारी आहे. हे असे वर्तमान दरवर्षीच वैशाख महिन्यात प्रत्येकाच्या वाट्याला आलेले असते. यालाच वैशाखदाह म्हणतात. हा प्राक्तनात लिहिलेला ऋतुभोग आहे. शरीर आणि आसमंत होरपळून टाकणारा हा महिना मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची एक घटना लिहून टाकत असतो. ही घटना ज्याच्या त्याच्या तारुण्यात घडून गेलेली असते. या...
  June 2, 11:54 AM
 • सिग्मंड फ्रॉइडला समस्त मानव जातीच्या विविध गंड व प्रेरणांवर भाष्य करता आले, परंतु भौगोलिकतासुद्धा गंड व प्रेरणा तयार करू शकतात, याचे आकलन त्याला झाले नसावे. अशा गूढ व कूट मानवी भावना महाराष्ट्रदेशी अनुभवण्यास मिळतात. त्यांना 'मराठवाडी', 'वैदर्भीय' तसेच 'कोकणी' गंड म्हणता येते. हा गंड प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामुळे आढळतो. (जसा इतर प्रांतीयांना उत्तर भारतीयांशी सामोरे जाताना येतो) समस्त गंडधारकांकरिता पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे-मुंबईच! पुणे-मुंबईकडचे लोक काय म्हणतील, त्यांनी...
  June 2, 11:45 AM
 • घोटी गाव तसं टीचभरच असल्यानं एरवी त्याची फारशी दखलही कुणी घेतली नसती. पण गावातल्या वैशिष्ट्यपूर्ण आठवडी बाजारामुळे त्याची ओळख दूरवर पसरली आहे. त्यातही तांदूळ, धान्य, मुरमुरे आणि बियाणे यांसाठी हा बाजार प्रसिद्ध आहे. 'घेनार माझ्यावाला मुरमुरा तर बाजार व्हनार पुरा...!' अस्सल ग्रामीण ढंगातली अन् खणखणीत आवाजातली ही साद आपसूकच ग्राहकांची पावलं आपल्याकडे वळवून घेते. धान्यासाठी पूर्वापार प्रसिद्ध असलेल्या घोटीच्या आठवडी बाजारातला नुसता फेरफटका पावलोपावली जणू विक्री व्यवस्थेचं तंत्र...
  June 2, 11:35 AM
 • अंगावर अर्मानी सूट... सोनेरी कडा असलेला चष्मा आणि कानाला कायम व्हर्टूचा मोबाईल... ललितकुमार मोदीचे हे रूप यंदाच्या आयपीएलमध्ये पाहायला मिळाले नाही. ज्याने आयपीएल ही मिलियन डॉलर बेबी जन्माला घातली तोच ललित मोदी आज नालायक बाप ठरला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, सीबीआय, प्राप्तिकर खाते, सक्त वसुली संचालनालय सगळेच जण मोदीच्या हात धुऊन मागे लागले आहेत. आयपीएलच्या फ्रॅन्चायझीमध्ये आपल्या नातेवाइकांची भागीदारी, फ्रॅन्चायझी मिळवून देण्यासाठी केलेली तोडपाणी आणि टेलिव्हिजन राईट्सच्या...
  June 1, 06:59 PM
 • सट्टेबाजी आणि क्रिकेट या खेळाचे अतूट नाते आहे. हिमनगासारखे, कधी एक दशांश पाण्यावर दिसणारे तर कधी दिसते त्यापेक्षा कितीतरी पाण्याखाली दडलेले. क्रिकेट आणि सट्टेबाजी किंवा बेटिंगचे विश्व आशिया खंडाभोवती अधिक प्रमाणात पसरलेले. भारत, पाकिस्तान आणि आता श्रीलंकन क्रिकेटवरही या सट्टेबाजीची काळीकुट्ट छाया पसरली आहे. प्रचंड प्रमाणावर पैसा मिळूनही क्रिकेटपटू त्यात गुरफटलेले. पदाधिकारी, संघटक आणि क्रिकेटभोवती वावरणारा वर्गदेखील यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे गुरफटलेला, गुंतलेला. त्यामुळे...
  June 1, 06:48 PM
 
जाहिरात

RECOMMENDED