जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Rasik

Rasik

  • हे माझे वाक्य नाही; राजन खान यांचे आहे. गेल्या शनिवारी, ११ जून रोजी महाराष्ट्र माझा पाक्षिकाच्या सहकार्याने दादर सार्वजनिक वाचनालयात दीपक करंजीकर यांनी त्यांची जाहीर मुलाखत घेतली; त्या वेळी ते अत्यंत तळमळीने बोलले. काही गोष्टींना त्यांनी मनापासून दाद दिली तर काही वेळा न राहवून त्यांच्याकडून शिव्याही गेल्या. ते दोन-अडीच तास एक वेगळेच राजन खान रसिकांसमोर आले!मुळात खान नावाचा राजन या कार्यक्रमाच्या शीर्षकाबद्दलही त्यांनी नापसंती दर्शवली. सगळी माणसं सारखीच असताना खान नावाकडे असे...
    June 19, 01:52 AM
  • फळे, फुले, भाज्या यांना गंध असतो तसा स्वाद असतो, रुची असते. नरसोबावाडीजवळचं आमचं गाव. तिथली वांगी भलतीच रुचकर. शेतातली वांगी खुडून आम्ही सरळ तोंडात टाकत होतो. एखादा पेरू किंवा चिकू खावा तशी वांगी खात होतो. काही महिन्यांपूर्वीच गावाला गेलो. तीच जमीन, तीच वांगी. एक वांगे तोडले. तोंडात घातले. शी! तो स्वाद हरवला होता. ते ते वांगे नव्हते. जमीन तरी तीच होती का? प्रश्न.जमिनीचा पोत बदलू शकतो का? जमीन कस हरवू शकते का? चँगो गिरिकंदातील सफरचंदाचा स्वाद हा चँगो न्याल्यातील दिव्य खनिजांचा परिपाक होय. बयाच...
    June 19, 01:47 AM
  • वाजपेयींच्या विचारवैभवाचा ठेवा पुढील पिढ्यांकडे वेळीच सुपूर्द करावा या हेतूनं रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीनं हाती घेतलेला महाप्रकल्प म्हणजे समग्र अटलजी. या प्रकल्पाची मुहूर्तमेढ नुकतीच दिल्ली येथे झाली...प्रशस्त आणि ऐसपैस, अडीच हजारांहून अधिक श्रोत्यांना सामावून घेणारं, राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचं मानलं जाणारं असं नवी दिल्लीतलं सिरी फोर्ट सभागृह... गेल्या आठवड्यात समग्र अटलजी नामक एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या शुभहस्ते...
    June 19, 01:41 AM
  • अरुण हा अठरा वर्षांचा कुमार. परीक्षा संपल्या. सुटी सुरू झाली. त्याच्या मित्रांनी पार्टी करायचे ठरविले. आईवडिलांची परवानगी घेऊन अरुण पार्टीला गेला. रात्री अंमळ उशिराच आला. आईबाबा वाट पाहत होते. घरात आला आणि त्याला उलटी झाली. पार्टीत मित्रांच्या संगतीने त्याने बिअर घेतली होती. बिअर पिण्याची ही त्याची पहिलीच वेळ. आईबाबांना हे सगळे सांगताना त्याला झोप लागली. सकाळी उठला तेव्हा त्याचे डोके दुखत होते. अरुणचे आईबाबा सर्व समजले होते. ते म्हणाले आज सकाळीच आपण आपल्या डॉक्टरांकडे जाऊ. ते अरुणला घेऊन...
    June 19, 01:30 AM
  • पाऊस पडेल का, असा प्रश्न नंदीबैलाला विचारल्यावर तो मान कशी हलवतो यावर प्रत्यक्षात पावसाचे आगमन जरी ठरत नसले तरी त्या प्रश्नातून भविष्याबद्दलची चिंता आणि आशा दोन्ही व्यक्त होत असतात. आशावादी शेतकरी नंदीबैलाच्या त्या मानेच्या हालचालीचा अर्थ, लवकरच (आणि चांगला) पाऊस पडणार असा लावेल आणि निराशावादी शेतकरी दुष्काळाची शक्यता असल्याचे सांगेल. प्रश्न अर्थातच फक्त नंदीबैलापुरता वा त्या शेतक-यापुरता मर्यादित नाही. आशा आणि निराशा या दोन प्रवृत्ती आहेत. जवळजवळ परस्परविरोधी. आणि तरीही त्या...
    June 19, 01:21 AM
  • भगतसिंगांच्या जीवनावरील मेरा रंग दे बसंती चोला हे नाटक लाहोरच्याच अजोका थिएटर्सने सादर केले. या नाट्यसंस्थेच्या दिग्दर्शिका आहेत मदिहा गौहर. अजोकाचे ब्रीद आहे धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी आणि मानवी हक्कांसाठी लढणा-या शक्तींचे हात बळकट करण्याचे.हे कथानक आहे लाहोरचे, इंग्रजांविरुद्ध तिथे झालेल्या रणरणत्या संघर्षाचे. तेव्हाच्या अखंड पंजाबला आणि विशेषत: लाहोरला स्वातंत्र्यलढ्याची एक देदीप्यमान परंपरा आहे. महाराजा रणजितसिंगांपासून ते सरदार भगतसिंगांपर्यंत जो तो या भूमीत लढलेला आहे....
    June 19, 01:12 AM
  • परदेश प्रवासादरम्यानचे टोकाचे तीन अनुभव. पहिल्या अनुभवाने अमेरिकेचा गरीब चेहरा दाखवला. दुस-याने भाषेच्या अनभिज्ञतेपोटी ओढवलेल्या संकटातून जायला भाग पाडले, तर तिस-याने जगण्या-मरण्याच्या सीमेवरचा थरार दाखवला... 1. न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळावर विमान उतरले. सामान ताब्यात घेऊन मी जरा तिथल्या बाकड्यावर विसावलो. मुंबई - न्यूयॉर्क 20 तासांचा प्रवास, यामुळे मी कंटाळून गेलो होतो. नीलेश विमानतळावर घ्यायला येतो म्हणाला होता, पण तो कुठे दिसत नव्हता. मोबाइलवरून त्यास reached JFK. Waiting near exit gate असा एसएमएस...
    June 19, 01:03 AM
  • जगाच्या अर्थकारणावर प्रभाव टाकणा-या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) नव्या अध्यक्षपदासाठी सध्या विकसित देश आणि उगवत्या आर्थिक सत्तांमध्ये संघर्ष सुरू आहे. या संघर्षात सध्या तरी विकसित देशांचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे; पण भविष्यकाळात या संस्थेची सूत्रे निश्चितपणे नव्या आर्थिक सत्तांकडे द्यावी लागणार आहेत.आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक (वर्ल्ड बँक) या दोन आर्थिक संस्थांवर गेली ६० वर्षे युरोप आणि अमेरिकेचा ताबा आहे. दुस-या महायुद्धानंतर युरोप आणि अमेरिकेची...
    June 19, 12:47 AM
  • अध्यात्मातून लोकप्रबोधनाचे काम संतसाहित्याने केले. याच वारकरी संप्रदायाच्या किमयेने लाखो लोक भागवतधर्माच्या झेंड्याखाली एकवटले. त्याच परंपरेचा पाईक म्हणजे राजूबाबा शेख. गेल्या पन्नास वर्षांपासून बाबांचे कीर्तन आणि भजनाच्या सुरावटींत मराठवाड्याचा कोपरान् कोपरा तल्लीन झाला आहे...डोक्यावर घागर घेऊन नाचणारा ७१ वर्षांचा वारकरी काही दिवसांपूर्वी अचानक प्रकाशझोतात आला. मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमातून हा वारकरी घराघरात पोचला. शहरी मध्यमवर्गीय माणसाला त्याच्या कलेचे मोठे...
    June 19, 12:39 AM
  • दशावतारमध्ये डॉक्टरेट मिळविणारे आणि स्वत: अस्सल दशावतार सादर करणारे डॉ. तुलसी बेहरे यांनी फक्त महिलांचा दशावतार सादर करण्याचा एक क्रांतिकारक निर्णय अलीकडेच अमलात आणला. बेहरे यांचा हा धाडसी प्रयोग म्हणजे चुकीच्या रूढी-परंपरेचे थोतांड माजवणा-या प्रवृत्तीवर एक जोरदार हातोडा होता.ज्या देशाच्या राष्ट्रपती सुखोईसारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानात प्रवास करतात, त्याच देशाच्या कोल्हापूरसारख्या एका भागात महालक्ष्मी मंदिराच्या गाभा-यात महिलांना प्रवेश नाकारला जातो हे फक्त भारतातच घडू शकतं....
    June 19, 12:32 AM
  • जुन्या काळी व्हिक्टोरिया राणीने जेव्हा मुंबईला भेट दिली होती तेव्हा तिच्या सामानातून व्हायोलिन चोरीला गेले होते आणि ते मटन स्ट्रीटवरच्या दुकानात विकायला ठेवलेले सापडले, तेव्हापासून या जागेला चोरबाजार म्हणतात, अशी आख्यायिका आहे.मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. ती अनेक कारणांसाठी ओळखली जाते. विविध प्रांतातले विविध भाषेचे लोक इथे राहतात. या मुंबईत वेगवेगळ्या प्रकारचे बाजार आहेत. त्या त्या उद्योगांमुळे ते बाजार ओळखले जातात. दक्षिण मुंबईत असाच एक बाजार आहे तो म्हणजे चोरबाजार. त्याला...
    June 19, 12:23 AM
  • लाखो भाविक महिला वडाला सुताचे वेष्टन बांधून सात जन्मी हाच पती लाभू दे, असा आशीर्वाद मागतील, असे आपण गृहीत धरतो. या वटवृक्षाकडे त्या खरोखरीच हेच मागणे मागत असतील काय? ग्रीष्म ऋतू सुरू झाला की कधी पाऊस येईल याचा नेम नसतो. गेल्या आठवड्यातही असेच घडले. आम्ही महामार्गावरून जात होतो आणि अचानक पाऊस सुरू झाला. स्वत:ला भिजण्यापासून वाचवावे म्हणून आम्ही रस्त्यालगतच्या एका वटवृक्षाखाली जाऊन थांबलो. नभात मेघ खूपच दाटले होते. टपोरी जलधार कोसळत होती. पाऊस थांबण्याचा नेम नव्हता. गर्द हिरव्या रंगाच्या...
    June 19, 12:17 AM
  • भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन गडकरी यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यावर समस्त महाराष्ट्राच्या नजरा लागल्या होत्या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे. मुंडे आता काय करणार, हा प्रश्न त्यांच्या कट्टर पाठीराख्यांना जसा पडला होता तसाच विरोधी पक्षांमध्ये काम करणा-यांनाही. गडकरींचे हे एवढे मोठे प्रमोशन मुंडेंना रुचणार नाही हे सगळ्यांनीच गृहीत धरले होते. त्यांनी तर हेही गृहीत धरले होते की, गडकरी अध्यक्ष होण्याच्या आधीच मुंडे स्वत:च्या भविष्याचा विचार करतील आणि भाजपातून बाहेर पडतील; पण तसे...
    June 19, 12:08 AM
  • आयपॅड तुमच्याशी गुलुगुलू गोष्टी करू शकत नाही. तुमचे डिक्टेशन घेऊ शकत नाही. आयपॅड तुमच्या मुलांना स्वतंत्र सांभाळू शकत नाही, तो तुमचा स्वयंपाक करणार नाही, तसेच तो फार हलका असल्याने त्याला वापरताना तुम्हाला व्यायाम पण घडणार नाही! यंदाच्या ७ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजता, अमेरिकेतल्या कनेक्टिकट संस्थानातल्या स्टॅनफर्ड या गावी मी चक्क रांगेत उभा होतो. तिथे पोचण्याकरिता मी सकाळी साडेपाचलाच घर सोडले होते. पहाटेच्या कडकडीत थंडीत रांग लावून मला त्या वेळी नवीनच बाजारात आलेला आयपॅड-२ घ्यायचा...
    June 19, 12:01 AM
  • अनवाणी पायाने काट्याकुट्यातील वाट तुडवत शाळा गाठणा-या सुनील खांडबहाळेने दहावीपर्यंत शहराचे तोंडही पाहिले नव्हते. पण, आज त्याच सुनीलने शब्दकोशांच्या माध्यमातून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला व्हॅल्यू मिळवून देण्याचे मोलाचे काम केले आहे. म्हणूनच नोकियासारख्या जगविख्यात मोबाइल कंपनीलाही सुनीलला टाळून पुढे जाता येत नाही...शेणा-मातीने भरलेली वाट अनवाणी पायाने तुडवत शाळा गाठावी लागणा-या सुनील खांडबहाळेने दहावीपर्यंत शहराचे तोंडही पाहिले नव्हते. पण, आज याच सुनीलने दहा भारतीय भाषांची...
    June 18, 11:45 PM
  • स्टीव्ह जॉब्सच्या कल्पक नेतृत्वाखाली आयपॅड-१ आयफोन आणि माध्यमक्षेत्रात क्रांती करू पाहणा-या आयपॅड -४ची निर्मिती अॅपलने केली. यांतील प्रत्येक उत्पादन हे बदलत्या काळाचे द्योतक आहेच; पण त्याचबरोबर त्याने जगाकडे बघण्याची दृष्टी अधिक समृद्ध केली आहे. अॅपलच्या जगभर लोकप्रिय असणा-या सर्व उत्पादकांच्या नावात, इंग्रजी मुळाक्षरातला 'i' काहीसा अपरिहार्यपणे झळकत असतो. त्याचा इंग्रजी शब्दकोशातला अर्थ आहे मी; (सर्वनाम) माझे! त्या आय ला विशेष तांत्रिक अर्थ नाही; पण अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या अॅपल...
    June 18, 11:29 PM
  • सारांशमध्ये तरुणपणीच वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेला अनुपम खेर सध्या फारच कमी चित्रपटांमध्ये दिसतो. स्वत:च्या अॅक्टिंग अॅकेडमीमध्ये व्यस्त असलेल्या अनुपम खेरची कुछ लोग चित्रपटाच्या सेटवर भेट झाली. 0 गेल्या काही वर्षांपासून तू नवीन दिग्दर्शकांबरोबर जास्त दिसत आहेस. याचे कारण काय?- कारण एवढेच की, नवीन पिढीच्या या दिग्दर्शकांकडे चांगले कथानक आणि त्या कथेचे उत्कृष्ट सादरीकरण करण्याची हातोटी आहे. त्यामुळेच मी नीरज पांडे, योगेश मित्तल, अयान मुखर्जी, दिवाकर...
    June 12, 04:39 PM
  • रविवारी, सुट्टीच्या दिवशी आळसावलेल्या अवस्थेत असताना सकाळीच एक फोन वाजला. समोरून आवाज आला, मी झहीर बोलतोय! पुण्यात घरी आहे. मोकळाच आहे! या गप्पा मारायला! ब-याच दिवसांपासून झहीरशी गप्पा मारण्याचा योग जुळून येत नव्हता! आला तोही असा अचानक. पटापट तयार झालो. गाडी काढली. कॅमेरा सोबत घेतला. पुण्यात शिरताच धो धो कोसळणा-या पावसाने स्वागत केलं. झहीरच्या कोरेगाव पार्क भागात शिरलो तेव्हा तेथे पावसाचा थेंबदेखील पडलेला नव्हता. झहीर खान कुठे राहतो हे विचारावंच लागलं नाही. तो राहतो त्या गेरा...
    June 12, 04:33 PM
  • महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व खात्याचे उपसंचालक भा. वि. कुलकर्णी यांनी लिहिलेले मुंबई परिसरातील अर्थात एकेकाळच्या फिरंगणातील किल्ले हे पुस्तक इतिहास संशोधन व लेखनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. महाराष्ट्रात साडेतीनशेहून अधिक किल्ले आज अस्तित्वात आहेत. इतिहासकाळापासून युद्धांमध्ये जे किल्ले साफ नामशेष झाले त्यांची संख्याही अगदीच नगण्य नाही. नामशेष किल्ल्यांची मूळ ठिकाणे शोधणे हे खूप किचकट काम असते. त्यात संशोधकाचा कस लागतो. भा. वि. कुलकर्णी यांनी लिहिलेले पुस्तक हे स्थानीय इतिहास प्रकारात...
    June 12, 04:26 PM
  • आषाढवारीचा कार्यक्रम वर्तमानपत्रांत वाचला आणि त्यातील नियोजनाने स्तंभित झालो. लक्षावधी वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचतात. वारीसाठी ते देहू-आळंदीहून निघतात. पदयात्रा करत दोन आठवड्यांनी पंढरपूरला पोहोचतात. रस्त्यात त्यांना शेकडो दिंड्या आणि हजारो वारकरी येऊन मिळतात. हा इव्हेंट गेली चारशे वर्षे चालू आहे. त्यामुळे त्यास परंपरेचे स्वरूप आलेले आहे. आता तर यात्रेच्या प्रसिद्धीसाठी पीआर एजन्सीदेखील नेमली जाते. हे नेटवर्किंग साधते कसे? विठोबाचा मेसेज दूरस्थ शेतकरी-आदिवासींपर्यंत...
    June 12, 02:01 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

    जाहिरात
      जाहिरात