जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Rasik

Rasik

  • बाजार या शब्दाअगोदर माझी ओळख झाली ती बझार या त्याच्या इंग्रजीकरण झालेल्या शब्दाबरोबर. माझ्या लहानपणी आम्ही सायमाळच्या टाटा कॉलनीत राहत होतो. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर खोपोली सोडल्यावर घाट सुरू झाला, की टाटा कॉलनी दिसते. वडील तिथे मेडिकल ऑफिसर होते. ही पन्नासच्या दशकातली गोष्ट. संध्याकाळी कंपनीचा बझारमन येई. तो सांगितलेल्या वस्तू आणि सामान मुंबईहून घेऊन येई आणि अजून काय हवे त्याची ऑर्डर घेई. शहरापासून लांब राहाणा-या लोकांसाठी कंपनीने केलेली ही सोय होती. माझ्या बालमनाला मात्र...
    June 12, 12:03 PM
  • कधी तरी निघूया, केव्हा तरी पोहोचवूया हा दृष्टिकोन आजही ग्रामीण जनतेसाठी एसटीने राखीव ठेवलेला आहे. हे वास्तव असले तरी आता प्रवाससेवेच्या गाड्यांमध्ये परिवर्तन आले असून, या परिवर्तन नामक सेवेमध्ये टू बाय टूच्या आसन व्यवस्थेचा आनंद प्राप्त होतो. कोणत्याही आसनावर बसलेल्या प्रवाशांचे गुडघे समोरच्या आसनाच्या पाठीला लागत असतात, तर उच्च दर्जाच्या आणि उष्णतावहन करणा-या शेवाळी रेक्झीनमुळे प्रवासाच्या पहिल्या तासातच पार्श्वदाह सुरू होतो; खिडकीतून जग बघण्याच्या कुतूहलामुळे जी बाजू...
    June 12, 11:56 AM
  • कडकडाटासह पत्रे उडवत कोसळणारा पाऊस मी केरळच्या वाटेवर अनुभवला, तर रिपरिप करत रेंगाळत राहणा-या पावसाची कंटाळवाणी संततधार पुण्यात अनेकदा अनुभवली. गदगदा हलणारी झाडं, वा-याच्या वेगानं वाजणारा मोटारीचा पत्रा, क्षणात रस्त्यावरची धूळ आणि पालापाचोळा भिंगरीसारखा भिरभिरत डोळ्यांत शिरता शिरता अंगावर पाण्याच्या तुषाराचे सपकारे सुरू होणं, क-हाड-कोकणच्या वाटेवर घडलं. एकदा तळपत्या उन्हात सुरू झालेल्या अवचित पावसानं संगमनेर-नाशिक रस्त्यावर ऊनपावसाचा खेळ पाहिला, तर पार तिकडे अमेरिकेत डेनवरला...
    June 12, 11:53 AM
  • अण्णा हजारे वा रामदेव बाबा यांचे अराजकीय आंदोलन आणि त्यात वेगवेगळ्या उद्देशाने सहभागी होणारे लोक याला अलीकडच्या काळातच घडलेली प्रक्रिया, असे समजणे हा निव्वळ भ्रम आहे. कारण जगभरात वेगवेगळ्या काळात जेव्हा म्हणून राजकीय- अराजकीय आंदोलने झाली त्यात अभ्यासपूर्ण, विचारपूर्वक सहभागी होणारे आंदोलक होते, तसेच भावनांच्या लाटांवर स्वार होऊन आंदोलनात उडी घेणारेही होते. क्रांतिकारक शेजारच्या घरात जन्माला यावा ही अलिप्ततावादी मानसिकता तेव्हाही होती, आताही आहे. निरुद्देश, कोणत्याही निश्चित...
    June 12, 11:41 AM
  • पं. नेहरूंचा स्वातंत्र्योत्तर काळ, आणीबाणी आणि नंतरचा काळ, धर्माचे राजकारण व धर्मांधतेचा काळ, खुल्या अर्थव्यवस्थेचा काळ अशा सर्व परिस्थितीमधून भारतातील न्यायालयीन सक्रियता (ज्युडिशिअल अॅक्टिव्हिझम) विकसित होत गेली आहे. जनतेच्या व्यापक प्रश्नांवर सक्रिय न्यायव्यवस्था प्रत्यक्षात आणली, ती न्या. पी. एन. भगवती आणि न्या. व्ही. आर. कृष्णा अय्यर यांनी. राष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण आयोग 1993मध्ये सुरू झाले. काहीच काम करीत नसल्याचे सातत्यपूर्ण आरोप राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने झेलले आहेत. तर...
    June 12, 11:36 AM
  • अण्णांबरोबर जंतरमंतर परिसरात उपोषणासाठी जमलेला वर्ग आणि बाबा रामदेव यांच्याबरोबर उपोषणासाठी गोळा झालेली गर्दी यांच्यात एक साम्य होते; ते म्हणजे यात मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गाचा भरणा मोठा होता. भरल्यापोटी तत्त्वज्ञानाच्या गप्पा मारणे सोपे जाते, तसेच उपोषणाच्याही. नेमका हाच वर्ग कधीही मतदान करायला घरातून खाली उतरत नाही. या आंदोलनाला पाठिंबा देण्यामागची यांची मानसिकता कोणती? या दोन्ही ठिकाणच्या जमावांतले आणखी एक साम्य कोणते? तर त्यांना कोणतीही कृती करण्यासाठी नेता लागतोच....
    June 12, 11:29 AM
  • मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरात फेरफटका मारताना उषा नाडकर्णींशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा.उषातार्इंची लोकप्रियता केवळ त्यांच्या पवित्र रिश्तामध्ये साकारलेल्या आई या व्यक्तिरेखेपुरतीच मर्यादित नाही हे त्यांच्याकडे पाहत उभ्या असणा-या त्यांच्या चाहत्यांवरून लक्षात येते.0 उषाताई, पवित्र रिश्ता मधली आई तुमच्याकडे कशी काय आली?- नाना पाटेकरच्या यशवंतमध्ये झोपडपट्टीतल्या बाईची एक छोटीशी भूमिका मी केली होती. स्मृती इराणीला ती खूप आवडली. तिच्यामुळे मला त्या वेळी बालाजीची थोडीसी जमीं......
    June 6, 01:05 PM
  • राजा हरिश्चंद्र ते लवकरच येऊ घातलेला शाहरुखचा सुपरहीरो रा-वन हा ट्रिक फोटोग्राफी ते थ्रीडी ते सीजी असा प्रवास आहे. प्रेक्षकांना 100 वर्षांपासून भुरळ घालणार्या या प्रवासाविषयी.. Clip हिंदी चित्रपटसृष्टीची सुरुवात झाली तीच मुळी चमत्कृतीयुक्त प्रसंगांनी भरलेल्या चित्रपटांनी. तांत्रिक कौशल्य नसतानाही चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्रमध्ये चमत्कृतींची रेलचेल घडवून आणली आणि तो चित्रपट पाहताना प्रेक्षकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती. पहिला भारतीय...
    June 6, 12:55 PM
  • दबंगमधले मुन्नी बदनाम हुई अधिक मोहित करणारे आहे. कारण त्यातल्या कथात्मकतेने ते गाणेच एक सूडनाट्य होऊन जाते.मी दबंग पाहिलेला नाही. मला तो पाहण्याची इच्छा नाही; अर्थात याचा अर्थ, मला तो टाळायचा आहे असाही नाही. पण मुन्नी बदनाम हुई जालिम तेरे लिएची जादू मला मोहित करते. मुन्नी अजूनही चलनात आहे. मस्ती, झूम अशा वाहिन्यांवर ती तीन-चार तासांनी एकदा तरी पाहायला मिळते, शीला मात्र हवेत विरून गेली. शीला की जवानीची हवा जेवढी तापवली गेली तेवढे तथ्य त्या गाण्यात होते का, याबद्दल मला शंका आहे.हिंदी सिनेमात...
    June 5, 09:44 PM
  • कागज हा शब्द अनेकांना फारसी, उर्दू कुलातील वाटतो. पण त्याचे मूळ आहे ते चिनी भाषेतले. पोर्तुगीज पाणी भरण्याच्या भांड्याला बाल्डे म्हणत. बंगाली भाषेने बाल्डेला बालटी म्हणून आपल्यात सामावून घेतले .नंतर हिंदीने बालटी शब्द आहे तसा उचलला. हिंदी भाषक पत्रकार अजित वडनेरकर अशाच शब्द व्युत्पत्तींच्या शोधात गेली २५ वर्षे प्रवास करत आहेत...मराठीत बादली हा शब्द आला तो हिंदीतील बालटी या शब्दांतून. पण हिंदीत तो कसा आला? १६व्या शतकात पोर्तुगीज वसाहती बंगालमध्ये वसल्यानंतर ते पाणी भरण्याच्या भांड्याला...
    June 5, 09:26 PM
  • सर्वात विलक्षण आहे ती के. बी. कुलकर्णी या बेळगावच्या अविवाहित कला-शिक्षकाची कहाणी. ते इतक्या निर्मळपणे नग्न चित्रण करत की त्यांच्या तरुणपणी ज्या विद्यार्थिनी होत्या, त्या आज्या झाल्या तरीही नातीला त्यांच्याकडे शिकायला पाठवीत आणि त्यांच्याकडून चित्र काढून घे असा आग्रह धरीत. तुम्हाला चिन्हचा वार्षिक अंक आणि त्याचे संपादक सतीश नाईक ठाऊक आहेत? गेला काही वर्षे ते या कलेला वाहिलेल्या अंकाचे बहारदार विशेषांक प्रसिद्ध करताहेत. दरवर्षी अधिकाधिक देखणा, वाचनीय, संग्राह्य, लोभस असा चिन्हचा अंक...
    June 5, 09:13 PM
  • निसर्गातील तत्त्वे तारतम्याने वापरून शेतीला पर्यावरणस्नेही करणे शक्य आहे. महाराष्ट आणि देशभरातील लाखो शेतकरी आपल्या शेतावरच्या प्रयोगशाळेत त्याचे प्रयोग करून निसर्ग-पर्यावरणाचा तोल सांभाळत शेती उत्पादनात वाढ करण्याचे मोलाचे काम करत आहेत. परंपरा आणि अनुभव यांच्या मुशीतून घडत आलेली ही लोकबुद्धी आणि आधुनिक विज्ञान यांचा सांधा नीट जुळला तर हे काम अधिक सुकर होईल.शेती हा मूलत: निसर्गाच्या विरोधात जाऊन केलेला उद्योग आहे. जंगलात शिकार करत फिरस्तीचे जिणे जगणाया मनुष्यप्राण्याला फळ खाऊन...
    June 5, 08:59 PM
  • माणसाचा स्वभाव वाकड्यातिकड्या लाकडासारखा असतो, त्यातून सरळ काही निघत नाही, असे एका विचारवंताने म्हटले आहे. पण वाकड्यातिकड्या लाकडातून कारागीर कलापूर्ण वस्तू घडवतो हा विरोधाभास मोहक आहे.दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. नोव्हेंबर महिना होता. दिवस तिळातिळाने लहान होत होता. मुंबईतील संध्याकाळ सुखावणारी होती. एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयातून इकॉनॉमिस्ट या ब्रिटिश नियतकालिकाचे अंक घेऊन बाहेर पडलो. शनिवार असल्यामुळे गर्दी कमी होती. लोकलमध्ये बसायला जागा मिळाली. अंक चाळू लागलो. गेल्या काही...
    June 5, 08:43 PM
  • दुस-या महायुद्धाच्या काळात नाझी सैन्याकडून माणसांसोबतच प्राण्यांवर होणा-या अत्याचारांनी विलियम वान इलन हादरून गेला. भुकेच्या, क्रौर्याच्या, अमानुषतेच्या त्या आठवणींतून त्याच्या मनाची सुटका होत नव्हती. अशाच एका क्षणी एका कल्पनेने त्याला वेढले : मासांचे उत्पादन शरीराच्या बाहेर प्रयोगशाळेत करता आले तर?युद्धाची दाहकता भयाण असते, जाणिवा बोथट करणारी. दुस-या महायुद्धात अशा ज्या हजारो जाणिवांची राख झाली, त्यात नेदरलँड्सच्या विलियम वान इलनचा समावेश होता. तारुण्यात असतानाच, नाझी फौजांनी...
    June 5, 08:37 PM
  • ओबामांची लोकप्रियता घटत चालली असतानाच ओसामा बिन लादेन त्यांच्या जाळ्यात सापडला आणि निदान त्यानंतर काही दिवस ओबामांची लोकप्रियता जरा वाढली होती. परंतु ओसामाची शिकार केल्याचा राजकीय फायदा किती काळ टिकेल हे सांगता येणार नाही. कारण त्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ले वाढले आहेत आणि अल कायदाच्या दहशतवाद्यांनी ओसामाबद्दलचा सूड युरोप- अमेरिकेतच घेतला जाईल अशा धमक्याही दिल्या आहेत. त्या धमक्या पोकळ आहेत असे समजून चालणार नाही. कारण ओसामाच्या हत्येनंतर काही दिवसांतच अल कायदाच्या...
    June 5, 02:54 PM
  • खांडू मोनपा जमातीतल्या गेलुपा पंथाचे होते... मोनपा जमातीत अंत्यसंस्कारांचा भाग म्हणून मृत व्यक्तीच्या शरीराचे 108 तुकडे केले जातात आणि ते नदीत सोडण्यात येतात...पण सुधारणावादी खांडूंचे अंत्यसंस्कार अशा पद्धतीने केले जाणार नाहीत याचा निर्णय घेण्यात आला...पण खांडूंची लोकप्रियताच एवढी व्यापक होती की, एकाच वेळी जन्मभूमी तवांग आणि कर्मभूमी इटानगर अशा दोन्हीही ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला...अरुणाचलचे दिवंगत मुख्यमंत्री दोरजी खांडू यांच्याशी झालेल्या एप्रिल महिन्यातल्या...
    June 5, 02:02 PM
  • किमान तीन पिढ्यांना वेड लावणारा बॉब डिलन नुकताच 70 वर्षांचा झाला. जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींवर अजूनही त्याची जादू का चालते? बॉब डिलनचा उल्लेख किंवा ओळख नक्की कोण म्हणून करावी, हा एक कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. फोक, ब्लूज, रॉक अशा अनेक पाश्चात्त्य संगीत प्रकारांमध्ये त्याचे नाव इतर कोणत्याही कलाकारापेक्षा मोठे असले तरी बॉब डिलन हा काही रॉक स्टार नव्हे. पाश्चात्त्य देशांमध्ये कुणीही व्यक्ती लोकप्रियतेच्या अगदी शिगेपर्यंत पोहोचली की त्या व्यक्तीला रॉक स्टार म्हटले जाते. प्रसिद्धी,...
    June 5, 01:52 PM
  • कराचीमध्ये नौदलाच्या पीएनएस मेहरान या हवाई तळावर हल्ला झाला, त्याच दिवशी संध्याकाळी कराचीत कुस्त्यांचे जंगी मैदान झाले. सध्या तेथे जाहीर कार्यक्रम होत नसले, तरी कव्वालीला बरे दिवस आले आहेत. कव्वालीचे नाव उच्चारले की गुलाम फरीद साब्री, मकबूल अहमद साब्री, कमाल साब्री, मेहमूद गझनवी साब्री आदी नावे आठवतात. या साब्री बंधूंपैकी काही भारतात जन्मले आणि नंतर पाकिस्तानात गेले, तर काहींचा जन्म तिकडेच झाला. ते सगळे इनायत सेन साब्री यांच्याकडे गाणे आणि कव्वाली शिकले. वार्षिक उरुसांमध्ये कव्वाली...
    June 5, 01:43 PM
  • अजित भुरे निर्मित काटकोन त्रिकोण या नाटकाचा शंभरावा प्रयोग नुकताच विजया मेहता यांच्या उपस्थितीत पार पडला. मानसोपचारतज्ज्ञ आणि अभिनयकौशल्याने घाशीराम कोतवालमधली नाना फडणविसाची भूमिका जगाच्या कानाकोप-यात पोहोचवणारे डॉ. मोहन आगाशे यांची या नाटकातील भूमिका विशेष गाजतेय. या नाटकाविषयी आणि त्यातल्या भूमिकेच्या प्रवासाविषयी त्यांना काय वाटते?आपण आपल्या मुलाबाळांचा म्हणजे आपल्या पुढच्या पिढीचा जरा जास्तच विचार करतो. त्यांचे पालनपोषण करणे ही पालकांची नैसर्गिक जबाबदारी असते; मान्य आहे....
    June 5, 01:37 PM
  • पावसाळा तोंडावर येताच महाराष्ट्रातल्या विठ्ठलभक्तांना पंढरीच्या वारीचे वेध लागतील. अनेक संतांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेला मराठवाडाही आषाढातल्या या सावळ्याच्या उत्सवासाठी आतुर होईल. आषाढात माऊलीच्या दुधासारखा घननिळा बरसू लागतो आणि पंढरीच्या सावळ्याचा उत्सव सुरू होतो. अलंकापुरीहून श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली आणि देहूहून तुकोबाराय यांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात. वैष्णवांचे डिंगर, दिंड्या, पताकांचे भार घेऊन पंढरीच्या पायवाटेला लागतात. पंढरीये माझे माहेर...
    June 5, 01:15 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

    जाहिरात
      जाहिरात