जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • स्त्री उमेदवाराच्या अंंतर्वस्त्रांपासून पंतप्रधानांच्या चड्डीपर्यंत आणि देवादिकांच्या जातीपासून महिला नेत्यांच्या चारित्र्यापर्यंत... सध्या निवडणुकांच्या निमित्ताने सुरू असलेली सर्वपक्षीय वाचाळ नेत्यांची एकेक विधाने ऐकली की सभ्यता, तारतम्य, विवेक आणि लाज यांचा पूर्णपणे ऱ्हास झाल्यानंतर जे काही शिल्लक राहते ते म्हणजे भारतीय राजकीय संस्कृती, असंच म्हटले पाहिजे. प्रचाराचीच पातळी इतकी खालावली आहे की देश म्हणून आपल्या प्रगतीची, विचारांची आणि नैतिकतेची पातळी खालावल्याचे ते...
  May 12, 12:20 AM
 • टाकळी लोणार येथे यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या हरिभाऊ बडेसह शिवकन्या कचरे यांच्या तमाशातील कलावंतांवर गावातील गुंडांनी प्राणघातक हल्ला करत महिला कलाकारांचा विनयभंग केला. या हल्ल्यामध्ये बारा तमाशा कलावंत जखमी झाले. दुष्काळ, कर्जाचा विळखा, जागतिकीकरणाचा बसलेला फटका अशा दुर्दैवाच्या चक्रव्यूहात आधीच अडकलेल्या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेवर आता अशा पद्धतीचे आणखी एक नवे संकट ओढवणार असेल तर या लोककलेचे जतन-संवर्धन होणार तरी कसे? तमाशा कलेची सुरक्षितता ही चिंतनीय बाब झाली आहे....
  May 12, 12:18 AM
 • जरा वेळाने मार्केटकडून गलका ऐकू आला. काय झालं म्हणून पहायाला तिकडं गेलो तर डोळे विस्फारून पहात बसलो. क्षणभर डोळ्यांवर विश्वास बसेना. आपण हे काय पाहतो आहोत? काही वेळापूर्वी ज्याच्याबरोबर मिसळ पाव खात होतो, त्या मित्राला आपण ह्या कुठल्या अवस्थेत पाहतोय? गण्या बेफाम झाला. कसं थांबवायचं गण्याला? बैलाचं सुध्दा असंच असावं. त्याला नांगरणी-वखरणीची एवढी सवय होऊन गेलेली असते की एखाद दिवशी शेतीचं कुठलंच काम नसलं की त्याला गव्हाणीत बसून राहण्याचा कंटाळा येतो. चुकल्या चुकल्यासारखं होतं. तसंच...
  May 12, 12:16 AM
 • बारक्याचे लक्ष त्या माशांकडे गेले. तो जवळ जाऊन त्या प्रत्येक माशाकडे निरखून पाहू लागला. चकचकीत निमुळते खवल्याखवल्यांचे अंग आणि उघडे निर्जीव डोळे. ते डोळे तो बराच वेळ हरवून जात एकटक पाहत राहिला. जरा वेळाने मग हळूच हात लावून बारक्या बारक्या बोटांनी माशाला स्पर्श करून ते थंडगार अंग अनुभवात जमा करू लागला. जाव्या - अकल्या, रैशा - इर्फ्या, शारख्या - चैत्या, पत्या - सिद्धू अशा चार जोड्या चार सायकली काढून डबलसीट टांग मारून तयार होत्या. आजचा प्रोग्रम लईच सिक्रेट होता. गुपचूप एकेक सायकल हळूच काढून...
  May 12, 12:14 AM
 • मुळात ब्रिटिश साम्राज्यातली नोकरशाही चांगली चालावी म्हणून मॅकोलेने दिलेली ही आपली आजची शिक्षणव्यवस्था. परीक्षांमधून माणसं निवडणं हा तिचा मूळ उद्देश. ब्रिटिशांपेक्षाही जास्त निष्ठेने आपण शिक्षणव्यवस्थेचा हा आत्मा जपला. इतका, की आज जगात इतर कोणत्याही देशात नाही इतकं भारतात परीक्षांना महत्व दिलं जातं. सकाळच्या पेपरसाठी धावतपळत वर्गात पोचले. माझ्यासारखेच सगळे जण धापा टाकत वर्गात शिरत होते. कुणी नाईट मारून, रात्रभर अभ्यास करून तारवटलेल्या डोळ्यांनी थेट पेपरला आले होते तर कुणी...
  May 12, 12:12 AM
 • इंडियन ॲनिमल फार्म या शीर्षकातून सूचित होत असल्याप्रमाणे ही प्राणिजगतातील पात्रांच्या साहाय्याने आकाराला येणारी समकालीन राजकारणाची एक रूपककथा आहे. जॉर्ज ऑरवेल यांच्या अॅनिमल फार्म या कादंबरीशी उघड नाते सांगणाऱ्या या कादंबरीचे इसापनीती, पंचतंत्रापासून अनेक संहितांशी संबंध आहेत. विविध पातळ्यांवर वावरणारे वेगवेगळ्या जातकुळीचे प्राणी येथे आहेत. डुकरे, कुत्री, गायी, बैल, गाढव, घोडे, बकऱ्या, मांजरे, कोंबड्या, बदके, कावळे, कबुतरे, पोपट अशा केवळ प्राणी आणि पक्षी यांच्या माध्यमातून या...
  May 12, 12:10 AM
 • ग्रीष्म, शिशिर, वसंत, शरद अशा अनेक, कोणत्याही ऋतूंमध्ये पवित्र रमजानचे आगमन होत असतं आणि याचे कारण म्हणजे इस्लाम धर्म चांद्रवर्ष मानतो. चांद्रवर्षामुळे रमजान हा महिना वेगवेगळ्या ऋतूंत येऊ शकतो. ग्रीष्म, शिशिर, वसंत, शरद अशा अनेक, कोणत्याही ऋतूंमध्ये पवित्र रमजानचे आगमन होत असतं आणि याचे कारण म्हणजे इस्लाम धर्म चांद्रवर्ष मानतो. चांद्रवर्षामुळे रमजान हा महिना वेगवेगळ्या ऋतूंत येऊ शकतो. या चंद्रावर आधारित कॅलेंडरनुसार वर्षाचे जवळपास ३५४ दिवस असतात आणि त्याउलट सूर्यावर आधारित...
  May 12, 12:08 AM
 • थ्री इडियट्समधल्या रँचोचा मूलमंत्र अंगीकारला तर आपलं आयुष्य फार सुकर होईल. काय आहे तो मंत्र ? बेटा काबील बनने के लिये पढो, कामयाबी झक मारके पीछे भागेगी. दहावी बारावीच्या परीक्षा झाल्या असून काही बोर्डांचे निकाल लागले आहेत. महाराष्ट्र बोर्डाचे आज-उद्या निकाल लागतील. त्यानंतर खरी रॅट रेस चालू होईल. ही रेस चालू होण्याआधी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ही कोटा फॅक्ट्री सिरीज आवर्जून पाहायला हवी म्हणजे कोटासारख्या ठिकाणांची जवळून ओळख होईल. कोटा शहरात असं म्हटलं जातं की, अगर आप आसमान में...
  May 12, 12:06 AM
 • पु.ल. देशपांडे, सुधीर फडके आणि ग.दि . माडगूळकर आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे या तिघांचे २०१९ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. प्रा. प्रवीण दवणे यांच्या जीवश्च कंठश्च या पुस्तकामध्ये अशा या तीन थोर व्यक्तींचे कार्य उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तोदेखील त्यांच्या सहज आणि सोप्या भाषेत, हे महत्त्वाचे. महाराष्ट्राचे तीन दिग्गज... पु.ल. देशपांडे, सुधीर फडके आणि ग.दि . माडगूळकर आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे या तिघांचे २०१९ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या शताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर अनेक...
  May 12, 12:04 AM
 • आजच्या घडीला हिंदी भाषिक प्रदेशात कम्युनिस्टांचे हातावर मोजता येतील एवढे जे काही गड आहेत त्यापैकी एक शहर म्हणजे बेगुसराय. १९९५पर्यंत बेगुसराय लोकसभा मतदारसंघातील ७ पैकी ५ विधानसभा मतदारसंघावर डाव्यांचाच कब्जा होता. पण ९०च्या मंडल-कमंडल राजकारणाने बिहारमध्ये भाजप, नितीश कुमार, लालूप्रसाद यादव यांचे राजकारण पसरू लागले. तथाकथित उच्च-नीच जातीतला संघर्ष, उच्चवर्णीय जातींना मिळालेले आव्हान व धर्मांधता अशांनी बिहारचे राजकारण पुरते बिघडले त्यात बेगुसरायमधील डावी विचारधारा झाकोळत गेली....
  May 5, 08:10 AM
 • विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे या साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देशांच्या संस्कृतीचा परिचयही होतो. म्हणूनच पॉप्युलरने असे साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात तुर्की भाषेतल्या महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. त्यापैकी ही एक कादंबरी. सुप्रसिद्ध तुर्की लेखक बुऱ्हान सोनमेझ यांची इस्तंबूल इस्तंबूल ही तुर्की भाषेतील कादंबरी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. इस्तंबूल...
  May 5, 12:10 AM
 • भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी ती समजून घेण्यासाठी संस्कृत साहित्यासह इतर साहित्याचा अभ्यास करणेही तितकेच गरजेचे आहे. त्यापैकीच एक तामिळ साहित्य, जे भारताच्या सर्वता प्राचीन साहित्यापैकी एक समजले जाते. रामायण आणि महाभारत या भारतीय उपखंडाच्या दोन महाकाव्यांबद्दल आणि राम -कृष्ण या नायकांबद्दलच आपण वारंवार बोलत असतो. परंतु दक्षिण भारतातील किती महाकाव्यांबद्दल उत्तर भारतीयांना माहिती आहे? दीड ते दोन हजार वर्षांपूर्वी दक्षिण भारतात तब्बल पाच महाकाव्ये लिहिली गेली... या...
  May 5, 12:09 AM
 • नाटक आणि मालिकांमध्ये काम करणारे कलाकार आता वेगळे राहिलेले नाहीत. सकाळी शूट, तर संध्याकाळी प्रयोग, पुन्हा रात्री शूट अशा दोन-दोन-तीन-तीन शिफ्टमध्ये कलाकार काम करत असतात. प्रॉडक्शन हाऊसची इकॉनॉमी, चॅनलची स्पर्धा, मालिकेचा टीआरपी आणि त्याच वेळी नाटकांची संधी या सगळ्या खेळात जगण्याचं म्हणण्यापेक्षा आरोग्याचंच नाटक होत आहे. नाट्यक्षेत्र वर्तुळाच्या पाचवीला पुजलेली नाट्यगृहांची दुरवस्था आता कलाकारांच्या जिवावर उठते याची उदारहणं कमी नाहीत. गेल्याच आठवड्यात सांगलीत अभिनेता वैभव...
  May 5, 12:08 AM
 • शेतकऱ्याचं अवलंबित्व मात्र आजच्या दुष्काळात अस्थिरतेच्याही पलीकडे गेलं, जेव्हा धान्यांच्या थप्प्यांनी भरलेलं घर रिकामं झालं आणि अंगणातली जनावरांनी भरलेली दावणदेखील ओस पडली. सकाळी झोपेतून उठल्या-उठल्या दावणीला शेपटं हलवत उभ्या असलेल्या जनावरांना वैरणीच्या चार पेंढ्या कातरून फेकणारा शेतकरी आज चारा आणि पाणी नाही म्हणून या जनावरांना बाजारात उभा करतो तेव्हा हा भेगाळलेला दुष्काळ रोज किती तापतोय हे लक्षात येतं.... अ वलंबून असणं हे कायम अस्थिर असतं आणि ही अस्थिरता कधी कुठली परिस्थिती...
  May 5, 12:07 AM
 • डॉक्टर, माझ्या पोटात हल्ली प्रचंड दुखतं. हंऽऽऽऽ, झोपा बघू त्या टेबलावर. इथं दुखतं? इथं? की या बाजूला? जरा आणखी खाली, मध्यभागी! इथं? ओयोयोयोयोयो! अच्छा, बेंबीजवळ दुखतंय तर. भयंकर! मोठ्ठा आऽऽऽऽ करा पाहू. आऽऽऽऽ. अरे बापरे! अशी केस पहिल्यांदाच पाहतोय! काय झालं डॉक्टर? एनीथिंग सीरियस? नाही म्हटलं तरी सीरियसच आहे. पण झालंय तरी काय नेमकं? तुमच्या बेंबीच्या देठावर ना, सूज आलीय. अरे बापरे! मग आता काय करायचं? भाषणं देताना बेंबीच्या देठापासून मुळीच ओरडायचं नाही. नाहीतर बेंबीचं देठ खूऽऽऽऽप लांब होईल आणि...
  May 5, 12:07 AM
 • हे समदं आपल्याच लोकांनी केलंय, ईश्वास ठेवा तुमी! हे कुण्या बाहेरच्याच काम नाय. नाही तर कसं, तिच्या छाताडाला एवढी भोकं पाडली कुणी? ही एवढी धुरकांडी आनून तिचा गळा दाबला कुनी? आरं ही समदी एका वानाची माकडं हायती. आन तुमी त्यात नाय म्हनताव का काय? उगी उन्हाच्या नावानं बोंबा मारण्यात काय अर्थय! असे किती जन्माचे दुःखाचे उमाळे बाहेर येताहेत तिचे? तिच्या पोटातला लाव्हा जणू वाऱ्यावर वाहतोय. त्या लाव्ह्यातून ओसंडणारी कोरडी आग अंग भाजून काढतेय. हे कोणत्या प्रदेशात आलोय मी, आणि कोणत्या होरपळणाऱ्या...
  May 5, 12:05 AM
 • मीनाच्या हृदयाच्या आत एक काळीज आहे. त्या काळजाला जणू तिच्याच हृदयाचे दोन पंख सोबत घेऊन दूर उडत असतात. हृदयाचं एक रंगीत पंख ओलं असतानाच पिसाट वाऱ्यांत सापडून फाटून गेलं आहे. आता एकाच पंखावर झेपेल तेवढा भार पेलत हे एका पंखाचं फुलपाखरू उडत आहे. रणरणत्या उन्हातून दूर जाताना एका हिरडीच्या झाडांखाली लहान मुलांची किलबिल ऐकू आली. रणरणतं ऊन अंगाची कातडी जाळत असताना ही मुलं हिरडीच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारून जाताना खळखळून हसत होती. मी हिरडीच्या जवळ जाऊन पाहिलं, तर ती सगळीच मुलं...
  May 5, 12:04 AM
 • अस्वलांच्या हल्ल्याच्या धक्क्यातून पूर्णत: न सावरलेल्या डाबरेंची हालत जबर जखमी श्यामलालचा रक्तबंबाळ चेहरा पाहून अधिकच बिकट झाली होती. त्यांनी श्यामलालला झालेल्या जखमांचे निरिक्षण केले. श्यामलालच्या एका डोळ्याचे बुब्बूळ बाहेर लटकले होते, दृश्य विदारक होते. मन घट्ट करून डाबरेंनी खिशातून रुमाल काढला, बुब्बूळ अलगदपणे श्यामलालच्या रक्तलांच्छित डोळ्याच्या खोबणीत ठेवले आणि त्यावर कसून रुमाल बांधला. मेळघाटातील आदिवासींची भाषा कोरकू. तुटक हिंदी/मराठी आणि कोरकू भाषेतील शब्दांचे तुकडे...
  May 5, 12:03 AM
 • समकालीन पॉप कल्चरमध्ये मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समधील (एमसीयू) अॅव्हेंजर्स चित्रपट मालिका आणि एचबीओची गेम ऑफ थ्रोन्स ही मालिका या दोन्ही गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या दोन्ही सिनेमॅटिक विश्वांनी गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत अवाढव्य पसारा मांडलेला आहे. हा पसारा पलायनवादी भूमिकेपुरता मर्यादित न राहता चाहत्यांना खुश करणाऱ्या घटकांपलीकडे जात, वेळोवेळी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा भूमिका घेणारा आहे. त्यामुळे या विश्वाला राष्ट्रवाद,...
  May 5, 12:01 AM
 • delete
  May 4, 07:43 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात