Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • एका वाचनात समजावी अशी माया पंडितांची कविता साधी आणि सोपी नक्कीच नाही. परत ती ऐकावी लागते, वाचावी लागते. तिच्याशी समरस व्हावे लागते, तेव्हाच ती आपल्या काळजाचा ठाव घेते. या संग्रहातील मला सगळ्याच कविता समजल्यात, असा मी दावा करणार नाही. काही ज्या कळल्या म्हणून आवडल्यात, अशा कवितांचा हा आस्थेवाईक उहापोह आहे... थोर विदुषी, निर्भिड कार्यकर्ती, बुद्धिमान प्राध्यापक म्हणून माया पंडित ख्यातनाम आहेतच. आजवर शिवाजी विद्याापिठात इंग्रजीच्या प्राध्यापक म्हणूनही त्या विद्यार्थ्यांमधे लोकप्रिय...
  July 29, 10:08 AM
 • शिवपत्नी पार्वती हे म्हटले तर एक गूढ आहे, म्हटले तर उघड गुपितही. तिचा मानी स्वभाव, या स्वभावाचे मोहक विभ्रम, शिवासोबतचे तिचे बहुपदरी नाते हे पुराणातले एक विलोभनीय पर्व आहे. त्याचेच प्रतिबिंब शिल्पकलेत उमटणे ही मोठीच अविस्मरणीय सृजनघटिका आहे... पार्वती ही शिवपत्नी, शिवाशी असलेले गतजन्मीचे नाते म्हणजे, पार्वतीचा स्वाभिमानी स्वभाव दर्शविणारे नाते होय! ती गतजन्मात दक्षकन्या सती होती. दक्षाने यज्ञप्रसंगी शिवाला आमंत्रिले नव्हते, कारण तो स्मशानात राहाणारा सर्वांगाला भस्म फासणारा, नागांचे...
  July 29, 10:06 AM
 • सिनेमा असो वा वेब सिरीज या माध्यमातल्या दृश्य-भाषेचा केवळ पोतच बदलेला नाही, तर सादरीकरणाच्या पातळीवर ही माध्यमं बंधनमुक्तही होऊ पाहत आहेत. विशेषत: लस्ट स्टोरीज, ट्विस्टेड, माया, गंदी बात, गन्स अँड थाइज, इनसाइड एज्ड आदी प्रसारित झालेल्या ऑनलाइन सिरीजमध्ये निषिद्धहा शब्दच निषिद्ध ठरला आहे. सामाजिक-सांस्कृतिक चौकटींची मोडतोड करणाऱ्या या बहुसंख्य कलाकृती स्फोटक सुरुंगांसारख्या आहेत. या कलाकृतींच्या माध्यमातून साठलेल्या भावभावनांचे जणू स्फोट होऊ लागले आहेत. त्यातली नेटफ्लिक्सवरून...
  July 29, 10:03 AM
 • वेदनेपासून दूर जाण्याच्या धडपडीत माणूस पुन:पुन्हा वेदनेकडेच झेपावतो का? दिग्दर्शक गौतम घोषने पार नावाची पडद्यावर साकारलेली दृश्य-कविता हेच चिरंतन सत्य समोर आणते. तेव्हा जगण्याचा संघर्ष कितीतरी उन्नत घेऊन आपल्या पुढ्यात अवतरतो, जाणिवा-नेणिवेत खोलवर रुजतो... नदीचा घाट. घाटावरचं झाडं आणि झाडाच्या एका बाजूला शंकराची पिंड. या पिंडीवर श्लोक म्हणत फूल वाहणारा एक माणूस. नदीचा हा विस्तीर्ण काठ, जणू दोन विश्व एकाचवेळी सांभाळतोय. त्या श्लोकाच्या सुरांवर ओव्हरलॅप होणारे, तिराजवळ बसलेल्या...
  July 29, 09:54 AM
 • राजकीय-सामाजिक बदलाचे खरेखुरे शिलेदार (चेंज एजंट) बिनचेहऱ्याचे कार्यकर्ते असतात. मात्र बदलत्या अस्मिताकेंद्री राजकारणात त्यांना एक चिंताजनक चेहरा देण्याचा प्रयत्न होतो आहे. हा चेहरा जसा अहिंसक आहे, तसाच तो हिंसक आणि आत्महत्याप्रवणही आहे. एक कार्यकर्ता कुणाच्या तरी आदेशावरून झुंडीत शिरून हिंसक होतो, अन्याय सहन न झाल्याने एक कार्यकर्ता विष पिऊन वा नदीत उडी घेऊन स्वत:चा जीव देतो. हे राजकारण आणि समाजाच्या पातळीवर विचार करता कशाचे लक्षण आहे? हा कशा-कशाचा प्रभाव -दुष्प्रभाव आहे?...
  July 29, 09:37 AM
 • मैथिली ही साहित्य संस्कृतीच्या दृष्टीने भारतीय भाषांमध्ये नेहमीच अग्रभागी राहिलेली भाषा आहे. अगदी रामायणातील मिथिलेच्या राज्याशी थेट संबंध सांगणारी, ही भाषा बौद्ध दार्शनिकांमुळे अधिकच समृद्ध होत गेली. आद्यकवी विद्यापती यांच्यापासून ते जनकवी नागार्जुन अर्थात यात्री यांच्यापर्यंत ही परंपरा काळानुरूप अधिकच व्यापक होत राहिली. याच परंपरेतील समकालातील एक महत्वाचे नाव म्हणजे, कवि अरुणाभ सौरभ हे होय... अरुणाभ सौरभ यांचा एतबे टा नहि हा प्रकाशित झालेला पहिला मैथिली काव्यसंग्रह. या...
  July 22, 10:25 AM
 • २०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधातील नाराजीसोबत भाजपला सोशल मीडियानेही मोठा हात दिल्याचे जगजाहीर आहे. पंतप्रधान मोदींचा वर्तमानातल्या सोशल मीडिया युजर्सवरही पूर्वीइतकाच मोठा प्रभाव असल्याचे गृहितक वारंवार मांडले जात आहे. पण मग भाजपाध्यक्ष अमित शहा ऑनलाइन समर्थकांच्या भेटीगाठी घेऊन खुंटा बळकट का करताहेत? विरोधकांच्या तुलनेत सत्ताधारी भाजपची सोशल मीडियावर पिछेहाट होतेय का? स्वत:च निर्माण केलेलं अस्त्र स्वत:वरच उलटतंय का? मुख्य म्हणजे २०१९ सार्वत्रिक निवडणुकीत सोशल...
  July 22, 10:20 AM
 • पाकिस्तानचे नाव घेतल्याशिवाय विद्यमान सत्ताधारी-समर्थकांचा हल्ली दिवस उजाडत नाही. निवडणूक काळात हा पाकिस्तानद्वेष विशेषत्वाने उफाळून येताना दिसतो. यात एकतर पाकिस्तान आपल्या देशात हस्तक्षेप करत असल्याची हाकाटी पिटली जाते किंवा मुस्लिमांची बाजू समजून घेणाऱ्यांना, मोदी विरोधकांना पाकिस्तानात निघून जाण्याची धमकी तरी दिली जाते. खुद्द पंतप्रधानही संधी साधून हा आगीचा खेळ खेळतात. आगामी लोकसभा निवडणुका नजरेपुढे ठेवून हा खेळ पुन्हा एकदा सुरु झालेला असताना तिकडे पाकिस्तानात २५ जुलै रोजी...
  July 22, 10:08 AM
 • प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने माजी न्यायमूर्ती, ज्येष्ठ लेखक नरेंद्र चपळगावकर यांना राजहंस प्रकाशनाचे संचालक दिलीप माजगावकर यांच्या हस्ते नुकतान स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. श्रवणसंस्कृतीचे संवर्धन या उद्देशाने दिल्या गेलेल्या या पुरस्काराप्रसंगी चपळगावकर आणि माजगावकर यांनी केलेल्या मर्मग्राही भाषणांचे हे संपादित अंश... न्या. नरेंद्र चपळगावकर, उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश समाजाच्या प्रबोधनाची गरज आणि त्यासाठी एक सुलभ आणि परिणामकारक साधन...
  July 22, 12:26 AM
 • एक असतो विचारांचा थिसिस, दुसऱ्या प्रकाराच्या विचारांचा असतो अँटिथिसिस. आणि यातल्या घुसळणीतून पुढे येतो तो सिंथेसिस. आचार्य कुरूंदकर हे असे सिंथेसिस मांडणारे होते. अतिशयोक्तीचा आरोप स्वीकारूनही म्हणायचं झाल्यास कुुरुंदकर हे महाराष्ट्रातील शेवटचे पुरोगामी होते. कारण विचारव्यूहाला पुरो-पुढे घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्यात होती आणि त्यात पूर्वग्रहाची लागण त्यांनी होऊ दिली नव्हती... आज आचार्य नरहर कुरुंदकर (१९३२-१९८२) असते, तर ८६ वर्षांचे असते. मात्र, मला तसं वाटत नाही. कुरुंदकर ८२...
  July 22, 12:25 AM
 • असे सत्ताधारी, असे राजकारणी आणि अशी लोकशाही काय उपयोगाची, जिथे जाटव समाजातल्या तरुणाची घोड्यावरून वरात नेण्याची इच्छा झाल्यावर सवर्णवर्ग त्याला आडवा जातो. संभाव्य हिंसक प्रतिक्रिया गृहीत धरून शासन-प्रशासनावर लग्नस्थळी मेटल डिटेक्टर बसवण्याची नामुष्की ओढवते... आखेर १५ जुलै २०१८ रोजी संजयकुमारची वरात शीतलच्या दारात येऊन पोहोचली. एकदाचं दोघांचं लग्न पार पडलं आणि आनंदाने मी माझ्याच भोवती छान गिरकी घेतली! नाही, संजय किंवा शीतल यांच्यातलं कुणीही माझ्या घरातलं नाहीय. ते माझ्या...
  July 22, 12:24 AM
 • शिर्डी येथील द्वारकामाईच्या मंदिरात साईबाबांची छबी भिंतीवर दिसल्याची बातमी सर्वदूर पसरली. परिणामी, शिर्डीत भाविकांची एकच गर्दी उसळली. स्वदेशी बनावटीचे मंगळयान तयार करणाऱ्या देशात चमत्कारांचे दावे केले जातात आणि जनता चिकित्सा न करता त्याला सहजपणे भूलून जाते हे चिंताजनक विरोधाभासी चित्र पुन्हा एकदा त्यातून पुढे आले... मागील आठवड्यात शिर्डी येथील द्वारकामाईच्या मंदिरात साईबाबांची छबी भिंतीवर दिसून आल्याची बातमी महाराष्ट्रात पसरली. सोशल मीडियावरून ही बातमी देश-विदेशातल्या साई...
  July 22, 12:23 AM
 • गेल्या चार वर्षात सत्ताधाऱ्यांनी चाटवलेली राष्ट्रवादाची मात्रा, आता खरे रंग दाखवू लागली आहे. रक्षकाचा मुखवटा घालून भक्षकांच्या टोळ्या सगळ्यांच क्षेत्रात यथेच्छ धुमाकूळ घालताहेत. त्यातली मीडिया-सोशल मीडियावर दादागिरी करणारी टोळी जणू आपला घटनादत्त अधिकार असल्यागत रोज नवे सावज शोधून तिथल्यातिथे फैसला करू लागली आहे. पडद्याबाहेरच्या आयुष्यात चुकांशिवाय दुसरं काहीच न केलेला, बेबंद नि बेपर्वा आयुष्य जगलेला नट संजय दत्त सध्या या टोळीचे लक्ष्य बनला आहे. देशद्रोही, दहशतवादी अशी ओळख सांगून...
  July 16, 03:11 PM
 • घडलेला इतिहास हे दुुधारी शस्त्र आहे. अस्मिता आणि भावनांना धग देण्यासाठी राजकारणात ते यथेच्छ वापरात येत आहे. यात उघडउघड समाजपुरुषांचाच पराभव होताना दिसतो आहे. वर्तमानाशी त्यांचं असलेलं नातं हास्यास्पद बनत चालल्याचं दिसत आहे. यातल्याच व्यंगावर बोट ठेवत शोभायात्रा या नाटकाने सामाजिक - एेतिहासिक समतोल साधला आहे... जाधव : कुणावरही अन्याय करू नका - खराखुरा इतिहास दाखवा (बार्बीला उद्देशून)... - दोन चार फोटो सुभाषबाबूंचेही काढ - म्हणजे इतिहासाला न्याय दिल्यासारखं होईल. बापट : काढा - यांचे फोटो...
  July 15, 06:50 AM
 • मागण्या आणि मोर्चे यातून समाजाला अंगणवाडी सेविकांची क्वचित ओळख होते, पण त्यांचं कार्यक्षेत्र, शोषित-वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची चाललेली त्यांची धडपड, त्यातले अडथळे, आव्हानं सुस्थापितांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे त्या किती मोलाचं काम करताहेत आणि शासनाचा त्यांना कसा प्रतिसाद आहे, हेही उमगत नाही... वैदू जमातीची ३०० घरं आणि १७०० लोकसंख्या असलेल्या जनवाडीमधल्या अंगणवाडीमध्ये २९ जूनच्या सकाळी रडण्याहसण्याचा ऊनपावसाचा खेळ सुरु होता. अडीच-तीन-चार वर्षांची मुलं...
  July 15, 06:45 AM
 • बुद्धाने अग्नि उपदेशात ज्वाळांनी जळणाऱ्या जगाचे वर्णन केले आहे. ते म्हणतात,साधुंनो सर्व काही जळते आहे. डोळा आणि डोळ्यांमधील विवेक जळतो आहे. तो कशाने जळतो आहे? तीव्र अनुरागाच्या, तिरस्काराच्या, भ्रमाच्या आगीत जळतो आहे. बृद्धाचे जगही दुःख आणि वेदनेने जळत होते आणि आजचे युद्धाचे जगही एकमेकांच्या तिरस्काराने आणि आर्थिक स्पर्धेने जळत आहे. या धगधगत्या जगाला सामोरे जाण्याचा एक सुंदर सांस्कृतिक उपाय म्हणजे, पंढरीची वारी आहे. मनाची दारे उघडी करुन सर्व मानवप्राण्यांवर प्रेम करणे, ही प्रत्येक...
  July 15, 06:43 AM
 • कादंबरी, आत्मकथन, प्रवासवर्णन, रिपोर्ताज, कविता आणि सिनेमाची पटकथा अशा नानाविध रूपबंधातून साकारलेली सईद मिर्झालिखित ही अजोड कलाकृती आहे. ती वाचताना आपण खरोखर समृद्ध होत जातो. विशिष्ट धर्माविषयीचे पूर्वापार संस्कारातून जोपासलेले गैरसमज गळून पडतात. लेखकाइतकीच कष्ट करणाऱ्या दुर्लक्षित माणसाविषयी आपली आस्था वाढत जाते... आणीबाणी नंतर सुरू झालेल्या समांतर सिनेमा चळवळीच्या दुसऱ्या पिढीतील एक प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा. मिर्झांच्या सिनेमातील जग फुटपाथवर राहणारा बेघर...
  July 15, 12:35 AM
 • कल्याण सुंदर. शिव-पार्वतीच्या विवाहप्रसंगांचे विविध क्षण टिपणारे शिल्पपट. हे दिसतात, वेरुळ येथील कैलास लेण्यात आणि घारापुरी येथील एलिफंटा लेण्यात. दोन्ही शिल्पांना कलाप्रांतात तोड नाही की जोड नाही.... सामान्यत: शिवाची पत्नी म्हणून पार्वतीची ओळख आपणा सर्वांस असते. पण ितच्या विविध अाविष्कारांची, अन्य रूपांची काही थोड्याच जणांना कल्पना असते, असे आढळते. ती कुमारी म्हणून आपल्यासमोर येते, तेव्हा तिच्या जिद्दी स्वभावाची ओळख होते. तिला त्या काळात गौरी म्हणून संबोधावे लागते. त्याचे कारण...
  July 15, 12:33 AM
 • एक माणूस समजून घेणं, एक पुस्तक वाचण्यासारखं असतं. गोष्टीचे किती तरी पैलू उलगडणं असतं. एक दिवस प्रवासात सहज परशुराम माळी भेटले आणि ग्रामीण भागातल्या एका परिवर्तनवादी कुटुंबाची अनेक पदरी क्रांतिकारी गोष्ट उमगली... नगुबाई तुकाराम माळी ही बाई कोणाला माहिती असण्याची शक्यता नाही. मलाही या बाईबद्दल खूपच उशिरा समजले. एकदा पंढरपूरवरून विट्याला येत असताना, एसटीत शेजारी एक मध्यमवयीन माणूस बसलेला. त्याच्या खिशावर शेतकरी संघटनेचा बिल्ला होता. त्या बिल्ल्यामुळे तो शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता...
  July 15, 12:31 AM
 • ज्यांच्या राजवटीवरून कधी सूर्य मावळत नव्हता, त्या एकेकाळच्या महासत्ता असलेल्या इंग्लंडपुढे सध्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. ब्रेक्झिटच्या आततायी निर्णयामुळे आर्थिक संकटे या देशापुढे आ वासून उभी आहेत. अशात फुटबॉल संघाची घोडदौड उपांत्य फेरीतच संपुष्टात आल्याने बाजारपेठेची पार निराशा झालेली आहे. म्हणजेच, ब्रेक्झिटही घडले, विश्वचषकही गेला... हाती उरले फक्त ब्रिटिश राजघराणे अशी इंग्लंडची सध्याची अवस्था आहे. श्रीमंतीत मागे पडत चाललेले हेच राजघराणे इंग्लंडचा सगळ्यात मोठा ब्रँड...
  July 15, 12:30 AM
 
जाहिरात

RECOMMENDED