Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • औरंगाबादेत जानेवारी महिन्यात झालेल्या अखिल भारतीय वैदिक परिषदेत केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतीवाद सिद्धांतावर आक्षेप घेतला होता. सत्यपाल यांनी निर्माण केलेल्या वादाला ४० वर्षांपासून सूक्ष्मजीवशास्त्राचे अध्यापन करणारे डॉ. रंजन गर्गे यांचे पृथ्वीवर पहिल्या जीवाचा अवतार हे पुस्तक नेमके उत्तर ठरले आहे... मी कोण आहे? मी आलो तरी कुठून? माझा इतिहास काय? माझे पूर्वज कोण? हाडामासांचा, धट्टाकट्टा, बुद्धिमान मानव आज पृथ्वीवर अधिराज्य...
  July 8, 07:23 AM
 • बातम्यांच्या गदारोळात काही बातम्या वर्तमानाच्या उदरात लपलेल्या भयसूचक भविष्याची झलक दाखवतात. फिफा वर्ल्डकप पाहून चित्कारणाऱ्या, बिग बॉस पाहत परपीडा-दु:ख, सुखाचे घुटके घेणाऱ्या समाजाच्या फेसाळणाऱ्या अभ्र्याखालची जमा झालेली राळही त्या दाखवतात... पत्रकारिता करताना गेल्या १२-१५ वर्षांच्या काळात असंख्य घटना म्हणजे, बातम्या पाहिल्या-वाचल्या आणि दिल्यात की, आता त्यातली भीषणताही जून झाल्यासारखी वाटते. आपणही निबर, निर्ढावलेले होतो. मात्र, मनातला एखादा कोपरा असतोच, जो या घटनांबाबत आतल्या...
  July 8, 07:14 AM
 • आधी संशय, मग अफवा आणि सगळ्यात शेवटी फैसला. आगीचा वणवा पसरायला वेळ लागेल, पण अफवा काही सेकंदांत हजारो-लाखोंपर्यंत पोहोचवली जाते. पोलिस यंत्रणा, न्यायव्यवस्था, प्रशासन, सत्ताधारी सारे या सगळ्यांना गृहीत धरून कधी गोमांसावरून, तर कधी मुलं पळवून नेणारी टोळी समजून तिथल्या तिथे फैसला केला जातो. हिंसेचा व्हायरस वेगाने पसरत राहतो... जुलैचा धुवाधार पाऊस अनेक ठिकाणी सुरू झालेला आहे. एकूणातच पावसाचं आणि कवितेचं नातं खूप आतलं आहे. अनेक वर्तमानपत्रांच्या जून-जुलै महिन्यातल्या रविवारच्या पुरवण्या...
  July 8, 07:11 AM
 • कट्टर धर्मवाद्यांच्या गोळ्या लागून निधड्या छातीच्या आणि तत्त्वाच्या पक्क्या कॉ. गोविंद पानसरेंचा मृत्यू ओढवला. लौकिकार्थाने हा कष्टकऱ्यांचा आधारस्तंभ या जगातून गेला असला तरीही त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे पैलू त्यांच्यातले मोठेपण उजळवून टाकतात. प्रस्तुत छायाचित्र-चरित्र एका कार्यकर्त्याबरोबरच त्यांच्यातल्या हळव्या माणसाचेही दर्शन घडवते... महाराष्ट्राची ओळख संतांची, वीरांची, योद्ध्यांची, सुधारकांची आणि कार्यकर्त्यांची मोहोळ असणारी भूमी अशी सार्थ आहे. वैयक्तिक लाभाची...
  July 8, 07:05 AM
 • बंगाली साहित्यात कवितेची फार मोठी परंपरा आहे. भारतीय साहित्याला नोबेल मिळवून देणाऱ्या रवींद्रनाथांची बंगाली भाषा साहित्य-संस्कृतीच्या संदर्भात नेहमीच समृद्ध राहिलेली आहे. या भाषेतील साहित्याने नेहमीच जनसामान्यांना जीवनमूल्ये दिलेली आहेत. अशा या समृद्ध बंगाली साहित्य-परंपरेमधील एक महत्त्वाचे नाव म्हणून सुबोध सरकार यांची निश्चितच नोंद घेतली जाते... सुबोध सरकार यांनी गेली पस्तीस वर्षात मुख्यतः कविताच लिहिलेल्या आहेत. त्यांचा कबीता -७८ ते ८० हा पहिला काव्यसंग्रह एकोणीशे ऐंशीच्या...
  July 8, 06:57 AM
 • निवड प्रक्रिया ही प्रत्येक घटक, समाविष्ट व संलग्न संस्थेने सुचवलेले प्रत्येकी एक नाव, निमंत्रक संस्थेचे एक नाव, त्या त्या वेळच्या संमेलनाध्यक्षांनी सुचवलेले एक नाव अशा प्राप्त नावांमधूनच महामंडळ एका नावाची निवड करेल. महामंडळ स्वतंत्रपणे कोणतेच नाव सुचवणार नाही. संमेलनाध्यपदासाठी ज्या व्यक्तीची निवड करायची, त्याचा एकमेव निकष नावे सुचवणाऱ्यांचा विवेक हाच आहे. मला वाटते हीच पारदर्शकता आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांत संमेलनांचे वाढत चाललेले आर्थिक गणित,त्याची तरतूद करू शकणारे...
  July 8, 06:54 AM
 • लोकशाहीचा भास तयार करून आडपडद्याने महामंडळाचे पदाधिकारी आणि संमेलनाचे संयोजक अध्यक्ष ठरवणार असतील तर सरळ या नव्या पद्धतीनुसार महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीच संमेलनाचा अध्यक्ष निवडला तर अधिक बरे नाही का? आता पद कोणाला दिले जाते, यापेक्षा ते सन्मानाने दिले जाते का, याची बूज राखण्याची महामंडळाची जबाबदारी वाढली आहे. अन्यथा ते किंग मेकरच्या आवेशात फिरतील हे उघड आहे... अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी होणारी निवडणूक पुढील वर्षापासून होणार नाही. निवडणुकीऐवजी अखिल भारतीय...
  July 8, 06:52 AM
 • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी घेण्यात येत असलेली निवडणूक प्रक्रिया रद्द करून निवड पद्धतीने अध्यक्ष जाहीर करण्याच्या महामंडळाच्या निर्णयामुळे आहे रे गटातल्या साहित्यविश्वात अपेक्षेप्रमाणे आनंद-तरंग उमटले. अर्थात, ज्या ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांनी निवडणुकीशी संबंधित अप्रिय घडामोडींबाबत नाराजी दाखवत आजवर स्वत:ला संमेलनाच्या झमेल्यापासून दूर ठेवले, त्या नेमाडे-एलकुंचवार आदी साहित्यिकांच्या चाहत्या-समर्थकांमध्ये महामंडळाच्या नव्या निर्णयाचे सावध...
  July 8, 06:40 AM
 • प्रत्येक समाजाचा नैसर्गिक दृश्यभोवताल वेगळा असतो, तसाच प्रत्येक समाजाचा मानवनिर्मित/सांस्कृतिक दृश्यभोवतालदेखील वेगळा असतो. यांकडे पाहण्याची, त्याचा अर्थ लावण्याची प्रत्येक समाजाची एक स्वतंत्र दृष्टी असते. स्वतंत्र संवेदना व अर्थधारणा असतात. यांतूनच त्या त्या समाजाची दृश्यसंस्कृती घडत असते... आपला दृश्यभोवताल हा अनेकविध-अक्षरशः कोट्यवधी घटकांपासून बनलेला असतो. सोयीसाठी आपण त्याचे पुढीलप्रकारे वर्गीकरण करूया - १. नैसर्गिक २. मानवनिर्मित/सांस्कृतिक. आपल्या आसमंतातील आकाश,...
  July 1, 07:51 AM
 • शुद्ध मन आणि परोपकारी वृत्ती म्हणजे दगडूअप्पा. कोणे एकेकाळी गरिबांची दैनावस्था दूर करण्यासाठी त्यांनी श्रीमंतांच्या घरी दरोडे घातले, पुढे जाऊन पाणी पंचायतीचंही काम जीव झोकून केलं आणि विनोबांच्या आश्रमात जाऊन आदराने डोकंही टेकवलं... पुरंदर तालुक्यातील राजुरी गाव. या गावच्या दगडूअप्पा चव्हाण यांना भेटायला मी आलेलो आहे. तसं दगडूअप्पा हे नाव अवघ्या पंचक्रोशीला माहिती असणार आहे. कारण इथल्या लोकांना दगडूअप्पा आणि त्याचं कलंदर जगणं माहिती आहे, याच जगण्यामुळं अप्पांच्या नावाभोवती एक...
  July 1, 07:47 AM
 • आवली हा समर्थ स्त्रीत्वाचा एक आविष्कार आहे. सर्वसामान्य स्त्रीमध्ये दडलेलं असामान्यपण म्हणजे आवलीची गाथा आहे. ही गाथा पाहताना, ऐकताना एक हुरहूर मनाशी राहतेच. कडेलोटाच्या सीमेपर्यंत जाऊन परत येणं नाकारत आणि चारी दिशांनी उतू जात तुकोबांप्रमाणेच विठ्ठलभक्तीत दंग व्हावं असं कधी आवलीला वाटलं तर... संत तुकारामपत्नी आवली आणि विठ्ठलदेवाची पत्नी रखुमाई यांच्या अंतरीच्या वेदनांचा सल हळुवारपणे उलगडत एक देखणा नाट्यानुभव संगीत देवबाभळी हे नाटक देतं. जगण्याच्या दोन टोकांवर उभ्या असलेल्या दोन...
  July 1, 07:44 AM
 • कलाकार हिच्या दर्शत देहाच्या सौष्ठवावर इतके लुब्ध झाले की, त्या मोहापायी त्यांनी तिचे ठायी ठायी शिल्पांकन केले आहे. खरे तर ती भारतभरातील किती तरी प्राचीन मंदिरांच्या बाह्यभिंतींवर आढळते. असे असण्याचे कारण, तिने यच्चयावत् प्राणिमात्रांना दंश केलेला आहे, हे असावे. त्यामुळे जेथे जेथे माणसाचा वावर आहे तेथे तेथे तिने आपली उपस्थिती दाखवली आहे... मदनाची ही सखी वा सहचरी. प्रेम आणि काम हे हिच्याद्वारे समूर्त झालेले आहेत. रूपासी आलेले आहेत. ही स्वर्गलोकीची अप्सरा सौंदर्य आणि मोहकता यासाठी...
  July 1, 07:36 AM
 • साहित्य अकादमीचा मराठी भाषेसाठीचा युवा पुरस्कार नवनाथ गोरे यांच्या फेसाटी कादंबरीला नुकताच जाहीर झाला. दोन वेळची भाकरी मिळणे हीच दिवसातील मोठी कमाई असे समजणाऱ्या नवनाथ यांनी आपल्या वाट्याला आलेल्या दारिद्ऱ्याचे उदात्तीकरण करण्यापेक्षा अनुभवाची दाहक वास्तवता शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न फेसाटीच्या पानावर केला आहे. अकादमी पुरस्कार मिळाला, पण नवनाथ यांच्यापुढे आजही नोकरीची आणि भाकरीची चिंता आ वासून उभीच आहे. मी उमदीला, सचिन ऐवळेच्या चुलत भावाच्या लग्नाला आलोय, हे समजल्यावर नवनाथ...
  July 1, 07:25 AM
 • आयुष्यभर स्वत:ची ओळख विसरून आपण फरफटत राहतो. बेसुमार. बेहद्द. विसरतो, स्वप्न आणि स्वप्नाच्या संगतीने भरारी घेणं. अखेरचा क्षण येऊन ठेपतो, पण फरफटत जाणं थांबत नाही, स्वप्नं काही डोळ्यांत पुन्हा तरळत नाहीत. अखेरच्या व्याख्यानात रॅण्डी पॉश नावाचा अमर खेळिया हेच आयुष्यभर निसटत राहिलेलं स्वप्न आपल्या मुठीत अलगद घेतो आणि ती मूठ प्रत्येकाच्या हातात थोडीथोडी रिती करत जातो... समुद्रात काही संकट आल्यावर निरोप लिहून कागद बाटलीत बंद करून बाटली समुद्राच्या पाण्यात टाकून द्यायची. मग ती लाटांवर...
  July 1, 07:16 AM
 • वयाच्या १२ व्या वर्षापासून ते आजतायागत तोंडाला पावडर आणि ओठांना लिपस्टिक लावून नाच करणाऱ्या रामचंदर मांझी यांची अनेक वर्षापासूनची तपश्चर्या अखेर यावेळी फळाला आली. यंदाचा प्रतिष्ठेचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना जाहीर झाला. अश्लील, बिभत्स अशी निर्भत्सना करत ज्या व्यवस्थेने सांस्कृतिक परिघाच्या आजूबाजूलाही फिरकू दिले नाही, त्या लौंडा नाच या लोककला प्रकाराची आणि या कलेस मानाचा सन्मान मिळवून देणाऱ्या रामचंदर माझी यांची ही चित्तवेधक कहाणी... आईये, आईये... अब आप के सामने आ रही है...
  July 1, 07:12 AM
 • देशात कधी नव्हे, तो मनूचा आद्य घटनाकार म्हणून गौरव होताना दिसत आहे. समतेसाठीचं युद्ध अधिकाधिक अवघड बनत चाललं आहे. आणि या समतेच्या युद्धामध्ये महिला आरक्षणासाठीचा संघर्ष ही एक मोठी लढाई आहे. म्हणजे, सर्व जगातील देशांची वाटचाल महिलांच्या स्थितीबाबत ऊर्ध्वगामी दिशेने चालू असताना भारतात मात्र नेमकी उलट्या दिशेने वाटचाल सुरू आहे... हिंदीत लिहिणारी माझी आवडती कवयित्री कात्यायनी तिच्या इस पौरुषपूर्ण समय में या कवितेत म्हणते, संकल्प चाहिये /अद्भुत-अन्तहीन/ इस सान्द्र, क्रूरता भरे अँधेरे...
  June 24, 07:15 AM
 • मराठी माणसाने कधी नव्हे तो इतका मोठा निर्लेप ब्रॅण्ड तयार केला होता. किती अभिमान होता मराठी माणसांना या ब्रॅण्डचा! आणि भोगले परिवाराने तो अचानक थेट अमराठी माणसाच्या हवाली करून टाकावा? तोही अवघ्या ८० कोटी रुपयांत? हेच प्रश्न घेऊन मग थेट राम भोगले यांनाच गाठले. त्यांनी त्यांची बाजू समजवून सांगता सांगता निर्लेपचा संपूर्ण प्रवासच उलगडला. नस्टिक किचन वेअर्स म्हणजे निर्लेप असं सुत्र भारतीय बाजारात बनायला किती मेहनत घ्यावी लागली असेल भोगले कुटुंबियांना? औरंगाबादसारख्या ठिकाणी अशा...
  June 24, 07:15 AM
 • टिश्यू पेपर... म्हटलं तर हा सारं काही मुकाट्याने शोषून घेतो आणि त्यातच संपतो. हा सोसण्याचा, संपण्याचा, संपून पुन्हा नव्याने उभारी घेण्याचा प्रवास इथे मी थांबवतोय. या प्रवासात समाजाच्या नजरेला कधीही न दिसलेलं जग पुढे आणता आलं हे सगळ्यांत मोठं समाधान आहे... मित्रांनो, वर्षभरापासून दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत टिश्यू पेपर हे सदर लिहीत होतो. आजच्या या लेखाने मी सदराचा समारोप करत आहे. दहावी पास झाल्यापासून ते पीएच.डी. या संशोधन शिक्षणापर्यंतचा एक विस्तीर्ण पट या सदरामध्ये मी चितारला. खरं...
  June 24, 07:09 AM
 • किंफम यांच्या कवितेतून मेघालयाच्या राजकारणासोबतच आपणाला उत्तर ईशान्य भारतातील सामाजिक नि सांस्कृतिक जगण्यातील ताणेबाणे पाहायला मिळतात. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या हिंसक परिवेशाचा तळ समजतो. त्यांच्या कविता या प्रामुख्याने राजकीय व्यवस्थेला यासाठी जबाबदार धरतात. त्यांना जाब विचारतात... आजमितीस आपल्याकडे लिहिल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये उत्तर ईशान्य भारतातील कवितेचे योगदान खूप मोठे आहे. या प्रदेशात कित्येक दशके सुरू असलेल्या अघोरी हिंसक काळाच्या मुळाशी अनेक कवी जाऊ पाहताहेत. या...
  June 24, 06:59 AM
 • इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केल्याच्या घटनेला उद्या २५ जून रोजी ४३ वर्षे पूर्ण होत आहेत. दुसऱ्या बाजूला सावरकर, त्यांचा संघर्ष, त्यांचे माफीनामे आणि या अनुषंगानं त्यांना मुळात स्वातंत्र्यवीर म्हणायचं की नाही यावर खल सुरू आहे. याच धर्तीवर एका दोघांना नव्हे, तर आणीबाणीच्या काळात तुरूंगावास भोगलेल्या साऱ्यांनाच भाजप स्वातंत्र्यवीर ठरवू पाहतंय. त्यांना पेन्शनही दिली जाणार आहे. वरवर पटण्याजोग्या वाटणाऱ्या या निर्णयामागे वस्तुत: आपल्या विचारसरणीला जनतेकडून अधिस्वीकृत करून घेण्याचं...
  June 24, 06:53 AM
 
जाहिरात

RECOMMENDED