जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • पंतप्रधान मोदींनी आपल्या पहिल्या भाषणातच मुस्लिमांच्या कल्याणासाठी योजना जाहीर केल्या. मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी ५ कोटींची स्कॉलरशिप, मुस्लिम मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन योजना आणि मदरशांचे आधुनिकीकरण... प्रथमदर्शनी सरकार मुस्लिमांसाठीच्या वरील योजनांबद्दल अभिनंदनास पात्र आहे. गेल्या पाच वर्षांतील मुस्लिमांच्या सामाजिक सुरक्षेवर घाला घालणाऱ्या भाजपकडून उशिरा का होईना मुस्लिमांच्या संविधानिक अधिकारासाठी कल्याणकारी उपक्रम सुरू केलेला आहे. पण हा विश्वासघात ठरू नये अशी...
  June 23, 12:18 AM
 • दोन शेर बियाण्याचं नाव काढताचदादा असे काही कडाडले की जणूत्यांची खूप मोठी दौलत लुटली जाणार होती. तेवढाच तर एक धागा होता. पिकापाण्याची सृष्टी निर्माण करण्याचा. तो धागाच असा निसटून पडला तर सृष्टी कधीच हिरवी होणार नाही. तिच्यासर्जनाचा मार्ग बंद होईल. ती कायमची वांझ होईल. त्याच्याशिवाय गावातराहूनही उपयोग काय? देवळातल्या देवापेक्षाही लोकांनी दादाला माणुसकीचा देव करून टाकला होता. आज त्याच दादांच्या घरचीच चूल विझली होती. होता करता सारंच गाव दिवस पाठीवर घेऊन निघून गेलं. उरलं एकटं दादांचं घर....
  June 23, 12:16 AM
 • जांभळीची फडफड अजूनच वाढली. ती गिरक्या घेत लालला कापायची शिकस्त करू लागली. लाल स्वतःला सावरत बाजूला सरकत होती आणि अनपेक्षितपणे लालने जांभळीच्या पोटाखालून शिरत एकच जोराचा हिसडा दिला तशी जांभळीची फडफड एकदम शांत झाली. ती हवेवर डोलत डोलत खाली जमिनीच्या दिशेने यायला लागली. लाल पतंग मात्र काहीच न झाल्यासारखे आपल्याच नादात मजेत हवेवर विहरत होती, उडत होती. आकाशात मळभ साचलेलं. काळेकरडे स्वैर स्ट्रोक्स् कुणा चित्रकाराने उत्स्फूर्तपणे मारल्यासारखं.पावसाचा माहौल झालेला. यात दुपारपासून...
  June 23, 12:14 AM
 • सर्वांशी मैत्री करण्यासाठी मन खुलं ठेवा. आपल्यासारखं न दिसणाऱ्या आपल्या भाषेत न बोलणाऱ्यांशी आवर्जून मैत्री करा आणि एकमेकांकडून शिकायला कायम तयार रहा. कदाचित तुमच्या आधीच्या सगळ्या पिढ्यांपेक्षा अवघड चढ-उतार तुमच्या वाट्याला येतील. चालता चालता दम लागेल, तेव्हा एकमेकांचा हात धरायला मागे पुढे पाहू नका. अवघड वाटा ज्यांच्या वाट्याला येतात तेच सर्वात सुंदर गाणी रचतात, हे विसरू नका. प्रिय मनू आणि तुमच्या वर्गाची दहावी पास गँग, पूर्ण वर्षभर छान गप्पाच मारता आल्या नाहीत आपल्याला. दहावीचं...
  June 23, 12:12 AM
 • ज्याच्या हातात यसनीचं दावं, त्यानं पोटभरून तुपाशी खावं... आन ज्याच्या नाकात यसनीचं दावं, त्यानं उपाशी रहावं. ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या यसन या आत्मकथावजा कादंबरीच्या या ओळी माणसांच्या आयुषअयात दृश्य-अदृश्य असंख्य प्रकारच्या यसनी कशा बांधलेल्या आहेत हे स्पष्ट करतात. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या व्यवस्थेने हे यसन कसे अद्याप करकून बांधलेलचं आहे हेच या कादंबरीतून मांडण्यात आलेले आहे. उसतोडणी कामगारांचे दिवाळीपासून एप्रिलपर्यंतचे...
  June 23, 12:10 AM
 • महाभारतावर अनेक अंगांनी चर्चा केली जात असली तरी ती प्रामुख्याने अतिशय प्रचलित अशा संस्कृत महाकाव्याच्याच अनुषंगाने केली जात असते. परंतु सबंध भारत पालथा घातला तर आपल्याला हे लक्षात येईल की महाभारत ही फक्त साहित्यकृती नाहीये, तर ती एक परंपरा आहे. महाभारतावर असंख्य कथा रचल्या गेल्या आहेत, अनेक मंदिरे स्थापन केली आहेत, तर अनेक प्रथा-परंपरा या महाकाव्यावर आधारित आहेत. महाभारतावर अनेक अंगांनी चर्चा केली जात असली तरी ती प्रामुख्याने अतिशय प्रचलित अशा संस्कृत महाकाव्याच्याच अनुषंगाने...
  June 23, 12:08 AM
 • स्मार्टफोनच्या, नव्या तंत्रज्ञानाच्या गरजेपासून सवयीपर्यंत आणि आता सवयीपासून अगदी जीवघेण्या व्यसनापार्यंतचा पल्ला आपण गाठला आहे. तरीही अनेक गोष्टींच्या बाबतीत आपण भारतीय जगाच्या काही वर्षे मागे आहोत. युरोपातील देशांत तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रचंड विकास झालाय. उरली सुरली कसर ते कल्पनाशक्तीच्या जोरावर साय-फाय म्हणजेच सायन्स फिक्शन चित्रपटांच्या माध्यमांतून पूर्ण करू पाहतायेत. अशीच एक साय-फाय सिरीज ब्लॅक मिरर नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. नुकतीच बाळंत झालेली बाळंतीण शुद्धीवर आली. एक...
  June 23, 12:06 AM
 • सेलिब्रिटी बनण्याची अंतर्भूत क्षमता व्यक्तीचे जातवर्ग चरित्र आणि माध्यमं कोणाच्या हातात आहेत, यावर अवलंबून होती. पण आज एकरेषीय माध्यमांमध्येच ही ताकद नाहीये. ग्रामीण आणि निमशहरी भागात इंटरनेटचं प्रमाण वाढत गेलं, तसं अनेक सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर ग्रामीण-निमशहरी, आशय-विषय-शैली-मांडणीचा झपाट्यानं विस्तार झाला. जे विषय कधीही मुख्य माध्यमांमध्ये हिट ठरतील, असे वाटतही नव्हतं अशा अनेक गृहीतकांना आज धक्का बसतोय. सेलिब्रिटी नावाच्या मिथकासाठी लागणारे वलय निर्माण होण्यासाठी आता कुण्या...
  June 16, 12:20 AM
 • करिअर, बेटर फ्यूचर, इन्व्हेस्टमेंट आणि हायर रिटर्न याभोवती फिरणाऱ्या आजच्या काळात डॉ. मानसी पवार यांनी त्यांच्या जगण्याची आदत बदललेली नाहीये, तर यासाठी त्यांनी जो प्रदेश निवडला त्यानं ती दिशा बदलली आहे.तोप्रदेशम्हणजेउर्वरितभारतासाठीफक्तदोनटोकं-निसर्गरम्यकाश्मीरकिंवाअस्वस्थकाश्मीर!पुण्यात फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत डॉ. मानसी दर महिन्याला काश्मीरला जाऊन तेथील रुग्णांसाठी काम करताहेत. त्यांचे खूप प्रश्न आहेत. प्रतिकूल हवामानाचे आहेत, गुंतागुंतीच्या वातावरणाचे आहे....
  June 16, 12:18 AM
 • दिवसभरच्या उन्हाळ्यात अनेक किमी जंगल तुडवल्यानंतर प्रचंड तहानलेल्या अवस्थेत असतानाही या रानगव्यांनी सैन्यशिस्तीचा आदर्श नमुना प्रस्तुत केला होता. घाई-गडबड, धडपड, अरेरावी, रेटारेटी, लोटालोटी, धसमुसळ ह्यापैकी काहीही न होता इतक्या मोठ्या कळपाचा पाणी पिण्याचा कार्यक्रम अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला. म्हसोबांसारखे ढिम्म वाटणारे रानगवे अशा अटीतटीच्या वेळी कल्पनेच्या पलीकडची चतुर चाल खेळतात. वाघ जवळ असला आणि पळून जाणे शक्य नसले तर रानगवा पाठ झाडाला लावून उभा राहतो....
  June 16, 12:16 AM
 • डॉ.अश्विनी धोंगडे यांचे अर्धे आकाश हे स्त्रीवादी चिंतनपर लेखांचे पुस्तक दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. अर्धे आकाश या पुस्तकात त्यांनी स्त्रीवादी चर्चा विश्वातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर विवेचन केले आहे. त्यासाठी कार्ल मार्क्स, फ्रॉइड, व्हर्जिनिया वुल्फ, केट मिलेट इत्यादींचे विवेचन आधारभूत धरले आहे. शेक्सपिअरसारख्या पुरुषांनी आपल्या साहित्यकृतीत क्लिओपात्रा अँटिगनी, लेडी मॅकबेथसारख्या प्रभावशाली, समर्थ स्त्रिया रंगवल्या. पण या स्त्रिया काल्पनिक...
  June 16, 12:14 AM
 • मुळात बुद्धिमत्ता म्हणजे काय, हे आपल्याला तरी कुठं नीटसं कळलंय. दोन प्रकारच्या बुद्धिमत्तेपासून एकशे ऐंशी प्रकारच्या बुद्धिमत्तेपर्यंत मानसशास्त्रज्ञ चकरा मारताहेत. आता तर तुमच्या निव्वळ बुद्ध्यांकापेक्षा भावनिक बुद्धिमत्ता अधिक महत्वाचा आहे, हे सर्व मानसशास्त्रज्ञ सांगू लागले आहेत. म्हणजे तुमच्या कोणत्याही परीक्षेतील मार्कांपेक्षा तुमचं स्वतःवरील नियंत्रण, तुमची विश्वासार्हता, कर्तव्यनिष्ठा, लवचिकता आणि कल्पकता ही अधिक महत्त्वाची असते कारण या साऱ्यांची गोळाबेरीज म्हणजे...
  June 16, 12:12 AM
 • डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येमुळे मागासवर्गीय विद्यार्थिनींची शैक्षणिक संस्थांमध्ये असणाऱ्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपल्या पुरुषप्रधान यंत्रणेमध्ये मुलं जातीयवाद आणि अत्याचार यावर बोलण्याचं एखाद्या वेळी धाडस तरी करू शकतात, पण मुली मात्र या विषयावर बोलत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कुटुंबामध्ये वावरत असताना कोणतेही निर्णय घेण्याची परवानगी नसणाऱ्या या महिला जेव्हा शिक्षणाच्या विश्वात येतात तेव्हा जातीयवादी मानसिकतेलाही त्या सहज बळी पडतात. रोहित वेमुला...
  June 16, 12:10 AM
 • सध्या उत्तर भारतात कार्तिकेयाची पूजा करण्याचे प्रमाण हल्ली कमी झाले आहे. कार्तिकेयाची मूर्ती शंकराच्या मंदिरात किंवा बंगालमध्ये दुर्गा पूजेच्यावेळी दुर्गेजवळ ठेवलेली आढळते. मात्र, दक्षिण भारतात नेमके याउलट घडते. कार्तिकेय हा दक्षिण भारताचा एक महत्त्वपूर्ण देव म्हणून ओळखला जातो. कौरवांना युद्धात मारल्यानंतर पश्चात्तापाने पछाडलेल्या युधिष्ठिरने कुरुक्षेत्राजवळ भगवान शंकराचा मुलगा म्हणजे कार्तिकेयाचे मंदिर बांधले, असे म्हणतात. आजही हे मंदिर हरियाणा राज्यातील...
  June 16, 12:08 AM
 • वेफर्स वा कुरकुरेंचे आवाज, त्याच्या रॅपर्सचे आवाज, कुठे पाेरगंच रडतं तर कुठे काेणी तरी माेठा आवाज करत आपल्या झाेपेला जवळ करतं, काेणी आपल्याला आलेल्या शिंकेचं प्रदर्शन करतं तर काेणी खुर्च्यांचा कर्र कर्र आवाज करत नाट्यगृह प्रशासनाचे वाभाडे काढण्यात मग्न असतं. काेणाला दहा वेळा तहान लागते तर काेणाला प्रेक्षागृहाच्या दरवाजाचा आवाज फारच आवडू लागताे. नाटकाच्या पार्श्वसंगीतापेक्षा हेच संगीत दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. नाशिकलाच एक शून्य तीन या नाटकादरम्यान असाच फाेन वाजला आणि सुमीत...
  June 16, 12:06 AM
 • चड संपला की उतार आहे आणि उतार संपला की चड आहे, हे जसं पूर्णतः नैसर्गिक अगदी तसंच आहे मेघराजाचं. तो हमखास बरसतो या चड-उताराप्रमाणे. परंतु आपण आता हा चडही सोडलाय आणि उतारही. आपण भौतिकतेच्या कृत्रिम एक्स्प्रेस हायवेवरती अगदी सुसाट आहोत जिथे अगदी गतिरोधकसुद्धा उखडून फेकलेत. काळाच्या ओघात माणूस बदलतोय हे सत्य असलं तरी त्या बदलाच्या ओझ्याने निसर्ग रोज काकणभर वाकतोय हे कसं नाकारता येईल. आपल्या सुखाच्या आणि समाधानाच्या संकल्पना इतक्या जाड झाल्यात की त्याच्या आड आपल्याला जन्मताच मिळालेलं...
  June 16, 12:03 AM
 • सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच नुसत्या ट्रेलरच्या आधारे एखादा लेख लिहिला जावा का हा प्रश्न आहेच खरा. परंतु आपकी औकात आपको ये ट्रेलर देखने की अनुमती नहीं देता है असे म्हणत मैं और तुम इन्हें दिखाई ही नहीं देते हैं. हम कभी हरिजन हो जाते हैं तो कभी बहुजन हो जाते हैं. बस जन नहीं बन पा रहे कि जन गण मन में हमारी भी गिनती हो जाए... यासारखे किंवा ये उस किताब को नहीं चलने देते जिसकी शपथ लेते हैं... अशा संवादांचा आणि जाती-उपजातींचा थेट उल्लेख असणारा आर्टिकल १५ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होतो काय अन् या देशाचे...
  June 9, 12:20 AM
 • आपल्या घराव्यतिरिक्त, नात्यातल्या लोकांव्यतिरिक्त दुसऱ्या लोकांचा मुलांसोबत संपर्क येण्याबाबत आई, बाबा आणि घरातले सगळे बहुतेक वेळा नाखुश असतात. शिवाय अनेकदा मध्यमवर्गीय आई-बाबा मुलांना नकळतपणे आपली मालमत्ता असल्यासारखं मानतात. त्यामुळे दुसऱ्या जातवर्गाच्या, वेगळ्या प्रकारच्या संस्कृतीतल्या लोकांचा मुलांशी संपर्क येऊ देणं हर प्रकारे टाळलं जातं. सरकारी पाळणाघरांमध्ये शिपायापासून अधिकाऱ्यापर्यंत सर्वांची मुलं जर एका पाळणाघरात जाऊ लागली तर सगळ्या मुलांना वाढीच्या किती तरी...
  June 9, 12:18 AM
 • राधाईनं लेकांपुढे माघार घेतली. तिला खूप वाईट वाटलं. त्या रात्री जेवणाचं ताट तिनं बाजूला सरकवून ठेवलं. खूप काही तरी आत आत उसवल्या गेलं, इतकं की त्यास न शिवता येणारा मोठा वाभारा गेला! गायीत अन आपल्यात फरक तो काय? रक्ताची कूस जरी वाळून गेली होती; पण आज भावनेची कूस तिच्यासाठी मोठी ठरली होती. अन तिला संदीपची आई असण्याचा आनंद झाला. ज्याने तिला देव करून टाकलं होतं. राधाईचे हात आपोआपच आशीर्वादासाठी वर उचलले गेले.. खरंच ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची नव्हती. सगळ्याच गोष्टी सांगण्यासाठीच पैदा...
  June 9, 12:16 AM
 • अब्बू, इ ऐशी खुल्ली जगापर लै सुकून लग्ता देको. मस्त थंssडी हवा न् छाँवच छाँव. नैतो घरमें पंखे लगाव, एसी लगाव नैतो थंडे पानीशे न्हाव, कुच्बी करो, येत्ता गरम हुता की पुचूच नको. नक्को जान हुती नुस्ती. अरे, इ झाडां हय कर्के तो आपन हय बेटे. नैतो सांस कैसा ले आस्ते. पन आबी पैशेके पिच्चे, तरक्की के पिच्चे न् सब झाकपाक कर्नेके पिच्चे भागताना इन्सान सब जंगला तोडने लगे, बडेबडे जुने झाडां... नेहमीप्रमाणे रात्रीचा जेवणानंतरचा गोंधळ चालू होता. छोटा स्टिव्ह आणि मोठी एलिसा बाबाच्या पाठीला घोड्याची खोगीर समजून...
  June 9, 12:14 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात